Home Blog Page 245

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा स्नेह मिलन कार्यक्रम व पालकमंत्र्यांचा सत्कार संपन्न:

0

 

प्रतिनिधी:(जालना)केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे,जिल्हाध्यक्ष संतोष दानवे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे,ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अशोक अण्णा पांगरकर,प्रतीक भैया दानवे,गोवर्धन कोल्हे साहेब यांनी आयोजित केलेल्या स्नेह मिलन कार्यक्रमाला जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांचा सत्कार करण्यात आला.हा कार्यक्रम जालना येथे संपन्न झाला.यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून,मा.भास्कर आबा दानवे यांची भेट घेतली व भावी आमदार व्हावे व आपल्या माध्यमातून जालन्याचा झपाट्याने विकास व्हावा यासाठी विनंती केली.यासाठी पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.यावेळी उपस्थित ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर,तालुकाध्यक्ष वसंतराव शिंदे,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष संजय डोंगरे,ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संजय आटोळे,भटके विमुक्त आघाडीचे तालुकाध्यक्ष तुकाराम राठोड,राजू राठोड,भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ पदाधिकारी बाबुराव(शाहीर)राठोड,छबुराव राठोड,लक्ष्मण राठोड,शिवाजी राठोड,पांडुरंग आहेरकर,विष्णू राठोड,अनिल राठोड,सचिन चव्हाण,संजय रंधवे व समस्त भारतीय जनता पार्टी जालना ग्रामीण पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री क्षेत्र नागझरी येथे अवैध धंद्यांना ऊत पोलीस प्रशासनाचे पाठबळ

0

 

इस्माईल इराणी शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव : शेगाव पासून जवळ असलेल्या गजानन महाराज यांचे गुरु श्री संत गोमाजी महाराज श्री क्षेत्र नागझरी असे प्रख्यात असलेले जुने संस्थान येथे अवैध धंद्यांना ऊत आला आहे याला पोलीस प्रशासनाचे पाठबळ असल्यामुळे हा धंदा येथे जोरात सुरू आहे याचा विरोध सर्व गावकऱ्यांनी केला होता परंतु यामध्ये पोलीस प्रशासनाने काही मदत केली नाही. या धंद्यामुळे श्री क्षेत्र नागझरी येथील तरुण वर्ग पूर्ण या व्यसनाच्या आधीन झाला आहे.या गावांमध्ये वरली मटका गावरान दारू देशी दारू असे अनेक धंदे चालू आहेत. या धंद्यांपासून पोलीस स्टेशनला हप्ते जात असल्यामुळे हा धंदा कोणीही बंद करू शकत नाही .या धंद्यांचे अनेक वेळा पोलीस स्टेशनला तक्रार देऊनही पोलीस स्टेशन ने आजपर्यंत हे धंदे बंद करू शकले नाहीत याचा अर्थ असा होतो की पोलीस प्रशासनाचे या धंद्यांना पाठबळ असल्यामुळे हा धंदा कोणीही बंद करू शकत नाही असे धंदेवाल्यांचे म्हणणे आहेत. या धंद्यांमुळे अनेक जनावर केसेस दाखल झाले आहेत तरीसुद्धा हे धंदे चालूच आहेत.

अवैध धंद्यावर पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांचा लवकरच पडणार हातोडा !

0

 

हिंगणघाट : 27 ऑक्टोबर

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

शहरासाठी अतिरिक्त पोलिस ठाण्याचे निर्मितीसह,बंद अवस्थेत असलेली सीसीटीवी यंत्रणा यासंबंधी लवकरच निर्णय घेतला जाईल,अवैध धंदे,वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी तात्काळ पाऊले उचलण्यात येणार असून यासाठी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांनी केले.
नवनियुक्त पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांनी आज हिंगणघाट येथे लोकप्रतिनिधी,माध्यम प्रतिनिधी व नागरिकांशी संवाद साधतांना बोलत होते.
यावेळी हिंगणघाट बचाव समितीचे वतीने दामिनी पथकाची निर्मिती करुन शहरातील महिला व मुलींना न्याय देण्याची मागणीसह अवैध धंदे रोखण्याचीही मागणी करण्यात आली,पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांनी दामिनी पथक तसेच वेगळ्या वाहतूक पथकाची तात्काळ निर्मिती करण्याची मागणी मंजूर केली.
वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून नूकतेच रुजू झालेले आयपीएस अधिकारी नुरुल हसन यांनी आज शहरात भेट देऊन लोकप्रतिनिधी, सामान्य जनता तसेच पत्रकारांशी संवाद साधला. स्थानिक पोलीस स्टेशन परिसरात आज त्यांनी सर्व सामान्य जनतेशी संवाद साधत नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या यावेळी माजी आमदार अशोक शिंदे, माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी , पत्रकार, पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
शहरात खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंदे व त्यातून होणारी गुन्हेगारी व त्यातून वाढलेली गुन्हेगारी या विषयी पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांना माहिती देण्यात आली . शहरातील बिघडलेली वाहतूक व्यवस्था, अनेक वर्षापासून बंद असलेले सीसीटीव्ही यंत्रणा, वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण करण्याकरिता शहराची वाढती लोकसंख्या पाहता अतिरिक्त पोलीस स्टेशनची मागणी इत्यादी प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले. नवोदित पोलीस अधीक्षकांनी यावेळी समाधानकारक उत्तरे देऊन गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याकरता कायद्यातील कठोरात कठोर कारवाई करीत सामान्य जनतेला न्याय दिला जाईल असे आश्वासन उपस्थित नागरिकांना दिले.पोलिसांच्या कर्तव्याचे ठिकाणी लवकरच क्यूआर कोडची व्यवस्था करण्यात येणार असल्याचीही माहिती नुरुल हसन यांनी यावेळी दिली.

मुरपाड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना फलकाचे अनावरण

0

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट दि.26 ऑक्टोंबर 10/मुरपाड येथे माननीय राज साहेब ठाकरे यांचे विचार गाव खेड्यात पोहोचण्या करिता शाखा फलकाच्या अनावर करण्यात आले माननीय हेमंत भाऊ गडकरी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस. यांच्या मार्गदर्शना खाली . उद्घघाटन रमेश घंगारे वर्धा जिल्हा उपाध्यक्ष. जयंत कातरकर हिंगणघाट तालुकाध्यक्ष. जितेंद्र रघाटाटे वाहतूक सेना विधानसभा सरचिटणीस. यांच्या हस्ते फलकाच्या अनावरण करण्यात आले. तसेच शाखाध्यक्ष निशिकांत तडस. शाखा उपाध्यक्ष नाना सलाम .शाखा सचिव रुपेश विरुटकर.शाखा करोषाधक्ष.अनिल ठाकरे शाखा सहसचिव निलेश नेहारे व प्रमुख पाहुणे व पदाधिकारी म्हणून रुपेश चंदनखेडे तालुका उपाध्यक्ष. रुपेश रघाटाटे सावली सर्कल प्रमुख. हिंगणघाट शहर प्रमुख श्याम इडपवार… सदस्य… कुणाल वाघाडे .निखिल नेहारे. आकाश दातारकर. आकाश सलाम. अभय गावस्कर. कृष्णा तडस .शंकर मडावी. पवन दातारकर .विनोद सलाम. विनोद भाऊ हाते . राकेश भगत .व सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते

रोटरी क्लबची वडरसमाजाचे वस्तीत दिवाळी साजरी.

0

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट:-स्थानिक रोटरी क्लब चे वतीने शहराला लागुन असलेल्या वडर समाजाचे वस्तीत दरवर्षी प्रमाणे दिवाळी साजरी करण्यात आली.
रोटरी क्लब सामाजीक कार्यात नेहमीच अग्रेसर असतो दिवाळी सारख्या सणात कोणीही वंचित राहु नये यासाठी आर्थीक परिस्थीतीने कमकुवत असलेल्या वर्गात जाऊन दिवाळी साजरी करुन त्यांनाही या आनंदोत्सवात सामिल करुन घेतले.
ही दिवाळी साजरी करण्यासाठी क्लबने मिठाई,नमकीन, दिपक,व सुगंधी साबणाचे सर्व वस्तीतील लोकांना डाॅ.मुखी, सहप्रांतपाल प्रा.माया मिहानी,शाकिरखान पठाण,पंकज देशपांडे, सुरेश चाैधरी,डाॅ.सतीश डांगरे यांचे हस्ते वितरीत करुन त्यांचेही चेहर्‍यावर आनंद निर्माण केला.
या प्रसंगी क्लबचे अध्यक्ष पराग कोचर यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की या दिवाळीत तुमच्याही जीवनात सुख समृध्दी आरोग्य ऐश्वर्य प्राप्त व्हावे याच हेतुने आम्ही आपणासोबत दिवाळी साजरी करीत आहे. कार्यक्रमाचे संयोजक प्रा अशोक बोंगिरवार हे होते तर कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी पुडंलिक बकाणे, तारकेश्वर वांढरे , प्रभाकर साठवणे ,संजय शेंडे,मुरली लाहोटी , सतीष खियाणी यांनी सहकार्य केले.

संग्रामपुर मित्र परिवार आघाड़ी व प्रहार जनशक्ति पक्ष यांनी वृद्धाश्रमात केली दिवाळी साजरी

0

 

संग्रामपूर मित्र परिवार आघाडी तसेच प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आज तेल्हारा तालुक्यातील दहीगाव (अवताडे )येथील वृद्धाश्रमात भेट देण्यात आली , या वेळी *”माय ही माय असते, दुधावरची साय असते”* *”तर बाप हा बाप असतो, घराचा मुख्य खांब असतो”* या प्रचलित म्हणीची प्रचिती मात्र उलट असल्याची जाणीव झाली या भेटीत अनेक वृद्धांनी आपापल्या व्यथा सांगितल्या या घरातील खंबलाच आत्ता वृद्धाश्रमाचा सहारा घ्यावा लागत आहे. तर ती माय जी एके काळी दुधावरची साय होती तिलाच आत्ता मायेच्या ममतेची गरज जाणवली खरच आपल्या ग्रामीण भागात ही आत्ता वृद्धाश्रमाची गरज आहे असे जाणवले , केंद्र सरकार चे तुटपुंज्या मानधनावर चालत असलेला हा वृद्धाश्रम अद्वितीय आहे येथे जवळपास 25 महिला व पुरुष आश्रय घेत असून तेथील कामकाज व दिनचर्या वाखांन्या जोगी आहे सकाळी 6 वाजेपासून सुरू होणारा दिवस दररोज चे दिनचर्येत कधी संपते समजत ही नाही , या मध्ये सकाळी योगा, प्राणायाम, त्या नंतर चहा नाश्ता , पेपर वाचणे ,tv पाहणे तसेच ध्यान धारणा सतसंग असे विविध कार्यक्रम दररोज घेण्यात येतात तर करमणूक साठी विविध उपक्रम राबवण्यात येतात खरच या वृध्श्रमाला भेट देऊन कृतज्ञ झाल्या सारखे वाटले या वेळी वृध्श्रमतील वृद्धांना दिवाळी फराळ किट, फळ , तसेच स्वेटर व ब्लँकेट चे वाटप करण्यात आले , या वेळी संग्रामपूर मित्र परिवार आघाडी चे संस्थापक अध्यक्ष श्री शंकरभाऊ पुरोहित, संत गुलाबबाबा विद्यालयचे प्राचार्य तथा नगर सेवक श्री अशोक थोटांगे सर, प्राध्यापक श्री हरिभाऊ तायडे सर, श्री सारंगधर इंगळे, नगर सेवक श्री मुन्ना मोरखडे, श्री अतुलभाऊ वानखडे , हमीद भाई पाशा , असिफ भाई, श्री मोहन उकर्डे, विजयभाऊ वानखेडे , संतोष भाऊ अंबलके, जाबिर शेख हे कार्यकर्ते उपस्थित होते सर्वांनी येथून प्रेरणा व आशीर्वाद घेऊन भविषयत असेच काहीतरी करण्याचे मनोमन ठरवले……

शिवकल्याण मराठा बीग्रेड कडून 1111 दीप लावून दिवाळी साजरी

0

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट : – दि. 24 ऑक्टोंबर
छत्रपती शिवाजी महाराज उद्याण, हिंगणघाट येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा “1111 दिप” लावून “दिवाळी दीपोत्सव”मोठया उत्साहात,आनंदात साजरा करण्यात आला.
त्यामुळे संपुर्ण उद्याण दिव्यांच्या रोषणाईने प्रकाशमय झाल होत. या उत्सवाला यशस्वी करण्यासाठी प्रामुख्याने शिवकल्याण मराठा ब्रिगेड, हिंगणघाट चे सदस्य अभिजीत शिंगारे,चेतन काळे, अमित गावंडे, अक्षय निकम, अक्षय गायकवाड,प्रविण काळे,आकाश गायकवाड, अक्षय भांडवलकर, हेमंत काशिद, गौरव थोरवत, नरेंद्रजी थोरात, पिंटू काळे व समस्त मराठा समाज बांधवांनी खुप परिश्रम घेतले. तसेच उत्सव साजरा करतांना राजमाता जिजाऊ चौक, शिवप्रतिष्ठान संघटना,जय दुर्गा नवरात्री उत्सव मंडळ(तिवारी लेआऊट)व ईतर शिवप्रेमी सामाजिक संघटनाचे असंख्य सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.

मा.आ.बच्चू कडू यांचा सामाजिक दायित्वाचा वारसा जपत एक दिवा दुरितांसाठी उपक्रम साजरा:

0

 

प्रतिनिधी:(धाराशिव)आमचे प्रेरणास्थान मा.आ.बच्चुभाऊ कडू यांच्या आचार -विचाराने प्रेरित होऊन त्यांच्या वैचारिक -सामाजिक संकल्पनेतून दुरितांचे तिमिर जावो या ज्ञानेश्वर महाराजांच्या श्लोकानुसार समाजातील दुरित गरजवंत दिव्यांग,ऊस तोड कामगार,अनाथ तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबात दिवाळीचा आनंद प्रकाश पोहचवण्यासाठी श्री.संतोष राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनाव्दारे एक दिवा दुरितांसाठी उपक्रम राबवण्यात येत आहे.
प्रहार शिक्षक शिक्षकेतर संघटना उस्मनाबाद(धाराशिव)येथे गोरगरीब,गरजू,निराधार,विधवा महिला यांना किराणा मालाचे किट्स वाटप करण्यात आले.याप्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री.वैजीनाथ सावंत,जिल्हा कोषाध्यक्ष श्री.रघुनाथ दैन,तालुका उपाध्यक्ष श्री.शहाजी झगडे,तालुका नेते श्री.लक्ष्मण औताडे,तालुका संघटक श्री.सुबराव सुरवसे आदि.पदाधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमात योगदानाबद्ल श्री.वैजिनाथ सावंत व त्यांच्या पदाधिका-यांचे प्रहार संघटनेतर्फे खुप खुप आभार व धन्यवाद.

बंजारा समाजाची दिवाळी पारंपारिक पद्धतीने,विविध लोकनृत्य व लोकसंगीत आणी गीत गायन करून साजरा

0

 

जालना जिल्ह्यासह तालुक्यामध्ये तसेच भारतातील विविध राज्यांत बंजारा समाजाची लोकसंख्या अधिक प्रमाणात आहे.त्यामुळे प्रत्येक समाजाची एक भाषा,एक सण,एक गीत,रिती-रिवाज, चालीरीती असते.त्याच प्रमाणे तसेच बंजारा समाजाचे आहेत.
आज दिपावली सण भारतामध्ये पृत्येक समाज मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने आणी घरोघरी लक्ष्मी पूजन करून साजरी केली जाते.

मुली घरोघरी जाऊन हातात दिवा घेऊन मेरा मागतात.मणतात की, “वर्षे दनेरी कोट दवाळी भैय्या तोंन मेरा”,वर्षे दनेरी कोट दवाळी दिदी तोंन मेरा”,”वर्षे दनेरी कोट दवाळी ममी-पापा तोंन मेरा”,वर्षे दनेरी कोट दवाळी आजी-आजोबा तोंड मेरा”. तसेच दुसर्या दिवसी एकत्र येऊन नदी काठी जाऊन फुल घेऊन येतात.व घरोघरी जाऊन शेणाची पुजा करतात.व विवध पृकारच्या बंजारा बोली भाषेत गीत गायन करतात.

तसेच पत्रकार तुकाराम राठोड यांच्या घरी सावंगी तलाव येथे मुली आले असता,त्यांनी आपल्या कॅमेरा मध्ये या गीत गायनाचे शूटिंग केली आहे.यावेळी मुली गीत गायन करत असतांना काय म्हणतात ते आपण व्हिडिओ च्या माध्यमातून पाहुयात.

अशाप्रकारे बंजारा समाजाची दिवाळी पारंपारिक पद्धतीने व विविध लोकनृत्य व लोकसंगीत गीत-गायन करून,साजरा केली जाते.

दिवाळीच्या खर्चाला फाटा देत,धारा येथील युवकांनी केले जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना बॅग व खाऊ वाटप:

0

 

प्रतिनिधी:(जालना)जालना तालुक्यातील धारा येथील युवक वंकर घेंम्बड व कृष्णा घेम्बड यांनी पारंपरिक पद्धतीने साजरा होत असलेल्या दीपावली या सणावर होणारा व्यर्थ खर्च टाळत,धारा या गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना बॅग व खाऊ वाटप केले आहे.या त्यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे ग्रामीण भागातील धारा येथील शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना शाळेत जाण्यासाठी अतिशय चांगल्या दर्जाचे बॅग व खाऊ मिळाल्यामुळे,विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण झाला आहे.

यंदा अतिवृष्टीमुळे शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे,शेतकऱ्यांचा लाखो रुपये पाण्यात गेले आहे.व धुळीस मिळाले आहे.त्यामुळे फुल ना फुलाची पाकळी म्हणून गाव खेड्यातील मुला-मुलांची दिवाळी गोड व्हावी या आशेने मी नेहमी मदत करीत असल्याचे वंकर घेंम्बड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.

वंकर घेंम्बड यांनी पुढे सांगितले की,माझा भाऊ कृष्णा घेम्बड यांनी मला फोन केला आणि तो म्हणाला की मला दिवाळी सणानिमित्त होणारा फालतू खर्च टाळून आपल्या गावातील शाळेतील सर्व मुला मुलींना चांगल्या दर्जाची बॅग वाटप करायचा आहे.तर तुझ्याकडे सरांना फोन नंबर असेल तर त्यांना विचार की,शाळेमध्ये किती मुलं-मुली आहे.मी सरांना फोन केला आणि किसन ईरमुरे सरांनी सांगितले की इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत एकूण 50 ते 60 विद्यार्थी आहे.मी सरांना चांगल्या दर्जाची बॅगची व्यवस्था करतो म्हणून सांगितले.सर म्हणाले की तुम्ही कधी या मी येतो.आणि परत मी कृष्णाला फोन केला की सर म्हणाले की तुम्ही या मी येतो.म्हणून मी मुंबई वरून पुणे तसेच दीपावली निमित्त घरी आलो व सरांनी दिवाळीच्या सुट्टीमध्ये त्यांच्या स्वतःच्या घरी न जाता विद्यार्थ्यांसाठी गाव खेड्यांच्या शाळेत आले व आपला अमूल्य वेळ दिला याबद्दल वंकर घेम्बंड यांनी सरांचे आभार मानले.

तसेच वंकार घेंम्बड पुढे म्हणाले की,त्यानंतर मी शंकर भाऊ यांना म्हणालो की,आपण मुलांना बॅग वाटप बरोबर,खाऊ वाटप करू आणि त्यांनी बिस्किट,शेंगदाणा चक्की आणले व शाळेमध्ये सर्व विद्यार्थी पालक व गावातील मित्रमंडळी व शिक्षक यांना बोलावून आज दिपावली निमित्त वाटप केले.याबद्दल शिवराजे ग्रुप धाराचे अध्यक्ष- शंकर घेंम्बड,उपाध्यक्ष- कृष्णा घेम्बड,सचिव- भरत घेंम्बड,सल्लागार-वंकर घेंम्बड यांचे प्रशंसनीय व उल्लेखनीय तसेच सामाजिक कार्य केल्याबद्दल ग्रामीण भागामध्ये एक आदर्श निर्माण झाला आहे. असेच नेहमी समाज उपयोगी कार्य यांच्या हातून घडो हीच आई तुळजाभवानी प्रार्थना करीत आहे.

प्रतिनिधी-तुकाराम राठोड,सावंगी तलाव,जालना