Home Blog Page 246

अकोला राणी सती यांचा753 वा जन्मोत्सव मोठ्या भक्तीभावाने दिपोत्सव लावून साजरा

0

 

प्रतिनिधी अशोक भाकरे

अकोला येथील सामाजिक तसेच अध्यात्म ,भक्ती, श्रद्दे सोबत मानवतेचे कार्य राणी सती दादी भक्त .त्यांच्या प्रेरणेने करीत असल्यामुळे 753 वर्षानंतर सुद्धा त्यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो ही संस्कृती व परंपरा मातृ शक्तीने राजस्थान पासून महाराष्ट्र पर्यंत देशातील कोणाकोपऱ्यामध्ये पोहोचून ते कार्य केल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध गायिका चंदादेवी हरिप्रसाद तिवारी यांनी केले.गजानन महाराज यांच्या पावनस्पर्शाने पवित्र शताब्दी पूर्व मोठ्या राम मंदिरात गेल्या 80 वर्षाच्या परंपरेनुसार श्री राणी सती दादी यांचा जन्मोत्सव आवळा नवमीला साजरा करण्यात येतो या निमित्ताने श्री राणी सती दादी चे मंगल पाठ चार अध्यायाचे पठण सामूहिकरीत्या माञुशक्तीने करून भक्ती आणि श्रद्धेच पालन केलं यावेळी महाआरती व विशेष पूजा अर्चना करण्यात आली सुमन अग्रवाल , मंजू झुंझुनवाला हरिप्रसाद तिवारी निर्मला पंडित संगीता अग्रवाल विशाखा पोद्दार रतन गिरी माधव मानकर अजय गुल्हाने, जनक जोशी आदींनी कार सेवा करून उत्सव साजरा केला यावेळी विशेष पूजा अर्चना पंडित चेतन शर्मा गिरीश जोशी झलक शर्मा संतोष शुक्ला यांनी केली

टायगर ग्रुप मा. तानाजी भाऊ जाधव (पैलवान) यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्याचे आयोजन

0

 

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट :- 2 नोव्हें
मा.तानाजी भाऊ जाधव(पैलवान) यांच्या वाढदिवसानिमित्त
हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय व दीनदयाळ उपाध्याय अनाथ, बेघर आश्रम येथे फळवाटप करण्यात आले. तसेच वृक्षरोपण सुद्धा करन्यात आले. या वेळेस टायगर ग्रुप चे विशाल जयराज,सचिन उदासी,प्रीतम रेवतकर,रोहन सरोदे,नरेश मेसरे,अनूप पठारे,अजय सडमाके, सौरव साठोने,भगवान मडावी,ईश्वर डोमडे,प्रणीत सोरटे,जयेश मेशकर,तुषार भाकरे, आशु सोनकुवर, राजु इल्मलेवार,प्रणय थुल,अतुल कुमरे, उपस्थित होते

बबन राठोड या गरिब शेतकरी मुकडदमाला किडनॅप करून,धमकावून खिशातील पैसे घेऊन जिवे मारण्याचा प्रयत्न वारंवार घडत असल्यामुळे या घटनेला कंटाळून त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे मदतीची मागणी केली आहेत:

0

 

प्रतिनिधी:(जालना)दिनांक २१/०९/२०२२ रोजी पोलीस अधीक्षक जालना यांना दिलेल्या निवेदनात बबन राठोड यांनी असे म्हटले आहे की,मी दि.२१/०९/२०२२ या रोजी संध्याकाळी सात वाजेच्या दरम्यान रामनगर कारखाना येथील सोमनाथ जळगाव फाट्यावर मला संतोष काळे,गणेश रंधवे,दादासो करांडे रा.पंढरपूर या तीनही लोकांकडून मला मारहाण केली आहे.खिशातील ४६ हजार रुपये काढून घेतले आहे.यावेळी ते मला म्हणाले की,तु आमच्यासोबत चल व तुझी किडणी विकुन तुझ्याकडील पैसे २,८६०००/-हजार रुपये वसूल करतो.असे म्हणून त्यांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली.व बळजबरीने मला बोलेरो गाडीमध्ये बसवून मारहाण करु लागले.तेंव्हा त्यांनी माझ्या खिशातील ४६ हजार रुपये बळजबरीने काढून घेतले.तेंव्हा मी आरडा-ओरडा केल्यानंतर जवळच असलेल्या लोकांनी मला त्यांच्या तावडीतून सुटका केली.तसेच वरील लोकांना व वाहान मालकाला मी आठ ते दहा जोडी कोयते दिले होते.त्या लेबरनी काम करुन पैसे फेडली आहेत.तरी पण या लोकांनी मला तगाता रावने सुरू केला आहे.या अगोदर देखील मला पैशासाठी किडनॅप केले होते.तेव्हा पण मला नातेवाईकांनी त्यांच्या तावडीतून सोडवून आणले होते.तेव्हा मी त्यांच्या विरोधात दिनांक १४/१०/२०२२ रोजी तक्रार अर्ज आपल्या कार्यालयाला दिला होता.सदरील- दादासो करांडे,संभाजी पाटील,सोमनाथ पाटील या लोकांनी माझे चेक वर खोट्या सह्या घेऊन,माझ्या कडे पैसे आहेत म्हणून माझ्या विरोधात माळशिरस येथील पोलीस स्टेशन येथे खोटी तक्रार दिली.त्यामुळे पोलीस अधीक्षक साहेबांनी मला न्याय द्यावा व माझ्या कुटुंबामध्ये मला सुखरूप जीवन जगू द्यावे व अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून मला वाचवावे अशा पद्धतीने मी आपल्याकडे विनंती करीत आहे.

प्रतिनिधी:तुकाराम राठोड,जालना

संग्रामपूर तालुक्यातील वडगाव वान येथील शासकीय स्वस्त धान्य दुकानदारावर जो अन्याय झाला आहे त्या विरोधामध्ये शेगाव तालुका व शहर स्वस्त धान्य दुकानदार याच्या संघटनेतर्फे माननीय बुलढाणा जिल्हाधिकारी यांना तहसीलदार तर्फे निवेदन देण्यात आले.

0

 

शेख इस्माइल शेगांव

या ठिकाणी निवेदनामध्ये संघटनेच्या पदाधिकाऱ्याने असे म्हटले आहे की जो स्थानिक स्वस्त धान्य दुकानदार व त्याचा मुलगा याला गावातील एका इसमाने मारहाण व शिवीगाळ केली व ईपास मशीनचे तोडफोड केले

त्याच अनुषंगाने या स्वस्त धान्य दुकानदारांचा असा रोष आहे की संबंधित व्यक्तीवर शासनाची मालमत्ता व शासकीय कामांमध्ये अडथळा निर्माण केल्यामुळे त्याच्यावर 353 हा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे .
परंतु दुसरा सवाल असा आहे की शासनाने या स्वस्त धान्य दुकानदारांना जी ई पास मशीन दिलेली आहे तिच्यामध्ये असंख्य नेटवर्कचे प्रॉब्लेम येतात त्यामुळे संबंधित ग्राहकाला काही तास थांबावे लागते त्यामुळे असे प्रकार घडतात शासनाने या ठिकाणी योग्य दखल घेऊन या मशीनला चांगल्या दर्जाचे नेटवर्क देऊन ही सगळी समस्या सोडवावी अशी सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांची मागणी आहे.
यावेळी निवेदन देताना स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विजय भाल तिलक, तालुकाध्यक्ष रमेश धनोकार, शहराध्यक्ष विनोद लांजुळकार, ए व्ही देशमुख, छोटू पाटील गजानन डिगोळे माजी तालुकाध्यक्ष मोहन कराळे तालुका सचिव प्रभाकर पहुरकर आधी तालुक्यातील व शहरातील स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते.

सावदा पोलीस ठाण्यातील एपीआयसह पीएसआय जाळ्यात लाच मागणी भोवली ;

0

 

 

विकी वानखेडे

सावदा पोलीस ठाण्यातील एपीआयसह पीएसआय जाळ्यात
लाच मागणी भोवली
जळगाव :अपहार प्रकरणातील आरोपींना अटक न करण्यासाठी लाच मागणाऱ्या सावदा, ता.रावेर पोलिस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक देवीदास इंगोले व उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने अटक केली. या कारवाईने जिल्हा पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
शहरातील एका दाखल झालेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला अटक न करण्यासाठी सावदा पोलीस स्थानकाचे सपोनि देवीदास इंगोले आणि उपनिरिक्षक समाधान गायकवाड यांनी ६० हजार रूपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर १५ हजार इतक्या रूपये देण्याचे ठरलेमात्र ट्रॅपचा संशय आल्याने संबंधितांनी लाच स्वीकारली नसलीतरी लाच मागणी सिद्ध झाल्याने जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात पथकाने आज मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास दोघांना ताब्यात घेतल्याने पोलिस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

वारकरी साहित्य परिषदेच्या अकोला जिल्हाध्यक्षपदी ह.भ.प. शिवशंकर वासुदेव पाटील (डिक्कर) यांची निवड.

0

 

प्रतिनिधी अशोक भाकरे

वारकरी साहित्य परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष ह.भ.प.श्री.विठ्ठल पाटील काकाजी यांचे मार्गदर्शनाखाली,
अकोला येथील, जुना शहर संत श्री गजानन महाराज मंदिर, शिवनगर येथे आज दि. 31/ 10/ 2022 रोजी वारकरी साहित्य परिषदेची सभा संपन्न झाली.
सभेमध्ये वारकरी साहित्य परिषदेच्या अकोला जिल्हाध्यक्ष पदी ह.भ.प. श्री.शिवशंकर वासुदेव पाटील (डिक्कर) कंचनपूर यांची वा.सा.प.च्या अकोला जिल्ह्यातील जेष्ठ कार्यकर्त्यांनी एकमताने निवड केली.
या सभेच्या अध्यक्षस्थानी श्री. दिलावर नदाफ सर ( राज्य संपर्क प्रमुख प्रसिद्धी प्रमुख) हे होते. तसेच ह.भ.प. श्री. जितेंद्र कोलप (अकोला व वाशीम जिल्हासंपर्कप्रमुख ) ह.भ.प. श्री. संदीप गबाळे सर (सातारा जिल्हा संपर्कप्रमुख) ह.भ.प.दाभोळे सर (नांदेड संपर्क जिल्हाप्रमुख) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली
या कार्यक्रमास .श्री ह. भ. प. गुरुवर्य महाराज चोरे (भागवत धर्मप्रचारक) ह.भ.प.श्री गणेश गिरी महाराज (वा.सा.प.मुर्तीजापुर तालुकाध्यक्ष )
ह.भ.प. श्री.राजेंद्र महाराज वक्ते (अकोला तालुकाध्यक्ष)
ह.भ.प.श्री अच्युत महाराज बोराडे ( वा.स.प. अकोट तालुका )
ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज सोळंके, ह.भ.प. श्री. माणिकराव महाराज खूपसे, श्री ह.भ.प.भागवत बाबाश्री. ह.भ.प. सर्जेराव महाराज आणि कार्यवाही मंडळी उपस्थित होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अकोला जिल्हा संपर्क प्रमुख जितेंद्र कोलप सर यांनी केले तर सूत्रसंचालन श्री ह.भ.प. रामकृष्ण महाराज अंबुसकर यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री ह.भ.प. जोध सर यांनी करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

जालना तालुक्यातील माळशेंद्रा येथे भाजपाचा झेंडा. (भाजपाच्या सौ.आयोध्या शिवाजी जाधव यांची सरपंचपदी निवड).

0

 

(तुकाराम राठोड,जालना)

जालना तालुक्यातील माळशेंद्रा येथील सरपंच श्री.आनंद म्हस्के यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर भाजपाचे कार्यकर्ते आणि बूथ प्रमुख श्री.शिवाजी जाधव यांच्या अर्धांगिनी सौ.आयोध्या शिवाजी जाधव यांनी निवडणुकीमध्ये एक मतांनी विजय संपादन करून ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकविला,अटीतटीच्या निवडणुकीत सौ.आयोध्या शिवाजी जाधव यांनी सौ.भागुबाई तुळशीराम जाधव यांचा चार विरुद्ध तीन मतांनी म्हणजेच एक मत जादा घेऊन विजय संपादन केला आहे.यावेळी ग्रामपंचायत सदस्य विजय नामदेव लहाने,स्वाती विजय लहाने, रूखमनबाई नामदेव सुरसे यांच्यासह ज्ञानेश्वर बोडके, त्र्यंबक बोडके,विष्णू कापसे,रामाआप्पा काटकर,अंबादास काटकर,प्रभू लोखंडे,तेजराव शिंदे,विनायक जाधव,बबनराव कांबळे,दीपक कांबळे,भाऊसाहेब लहाने व अंबादास लहाने यांच्यासह ग्रामस्थांनी नवनिर्वाचित सरपंच सौ.आयोध्या शिवाजी जाधव यांचे अभिनंदन केले.

चार महिन्यात पाच प्रकल्प राज्याबाहेर वळवल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक.. शिंदे – फडणवीस सरकारचा जाहीर निषेध.

0

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट :- 31 ऑक्टोंबर विदर्भासह महाराष्ट्रातील पाच मोठे प्रकल्प बाहेर राज्यात गेल्याने शिंदे – फडणवीस सरकारचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करत उपविभागीय अधिकारी श्रीमती शिल्पा सोनोले यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

वेदांता फाँक्सकॉन ,बल्क ड्रम प्रकल्प, टाटा एअरबस, सॉफ्रन प्रकल्प, मेडिकल डिव्हाईस पार्क हे पाच प्रकल्प चार महिन्यात राज्याबाहेर शिंदे- फडणवीस सरकारने वळविले, यामुळे महाराष्ट्रातील लाखो युवकांना रोजगारापासून मुकावे लागले आहे.
केंद्र सरकारने देशात तीन ड्रग प्रोजेक्ट स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. प्रत्येक प्रकल्पातून तीन हजार कोटींची गुंतवणूक व पन्नास हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराची संधी निर्माण होण्याची अपेक्षा होती. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने यातील एक प्रकल्पावर दावा केला होता.यासाठी रायगड मधील रोहा येथे होणाऱ्या प्रकल्पासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला होता.मात्र त्याला सरकारकडून हिरवी झंडी मिळाली नाही. आता हेच प्रकल्प गुजरात, हिमाचल प्रदेश,आंध्रप्रदेश येथे साकारण्यात येत आहे.
केंद्र सरकारने मेडिकल डिव्हाईस पार्क सुद्धा प्रस्तापित केले आहे.महाविकास आघाडी सरकारने औरंगाबाद येथे एका पार्कची मागणी केली होती. याप्रकल्पात ४२४ कोटींची गुंतवणूक होणार होती.तीन हजार तरुणांना रोजगार मिळणार होता. यासंदर्भात तत्कालीन महाविकास आघाडी सरकाने पाठविलेल्या प्रस्तावला अजुनही केंद्र सरकारने मंजुरी दिली नव्हती, आता हेच प्रकल्प गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश ,हिमाचल प्रदेश,मध्य प्रदेश येथे साकार होणार आहेत. हे गेलेले प्रकल्प परत आणण्याकरिता उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, अमोल बोरकर,युवक जिल्हा कार्याध्यक्ष सचिन परासडे, जिल्हा महासचिव राजू मुडे, जिल्हा उपाध्यक्ष सुशील घोडे, जिल्हा सचिव शेखर ठाकरे, विधानसभा अध्यक्ष तेजस तडस, विधानसभा उपाध्यक्ष प्रशांत लोणकर, शहर अध्यक्ष पंकज पाके, शहर उपाध्यक्ष मनोज हुमार शहर, तालुका संघटक पंकज भट्ट,लिलाधर मडावी,प्रवीण जनबधु सचिन पराशर, विध्यार्थी तालुका अध्यक्ष रवीकरण कुटे, विध्यार्थी तालुका सचिव निखिल ठाकरे, प्रशांत मेश्राम, नदीम अली, मो.शाहिद, विपुल वाढई, अभय सावरकर, मनीष मुडे, वैभव भुते, प्रज्वल भगत, गोपाल निशाने, गणेश सातपुते, समीर भोयर आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते..

राष्ट्रवादी युवक अध्यक्ष ॲड देवकांत पाटील व शहराध्यक्ष हितेश गजरे यांच्या नेतृत्वात राज्य सरकारच्या निषेधार्थ नायब तहसीलदार यांना निवेदन

0

 

यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे

आज यावल येथील खरेदी-विक्री संघाच्या सभागृहात यावल राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षा च्या वतींने देशाची राष्ट्रीय एकता टिकवण्यासाठी भरीव योगदान देणारे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले त्याचबरोबर असामान्य कर्तुत्वाने जागतिक राजकारणात ठसा उमटणाऱ्या माजी पंतप्रधान स्व इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले व त्यानंतर यावल राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरात येथे नेल्या संदर्भात निषेध व्यक्त करत यावल नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरात येथे नेण्यासंदर्भात संपूर्ण राज्यभर आज निषेध करण्यासाठी राज्य व जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नव्याने स्थापन झालेले सरकारच्या विरोधात आज निषेध करत निवेदन देण्यात आले काही दिवसापूर्वी वेदांत प्रकल्प गुजरात येथे पाठवला काही दिवसापूर्वी टाटा एअर बस सेकंड असे प्रकल्प गुजरात येथे पाठवण्यात आले मागील २०१४ ते १९ मध्ये ही फडणवीस सरकारने आय एफ एस सी एन एस जी यासारखे प्रकल्प गुजरात येथे नेण्यात तत्कालीन सरकार ने सहकार्य केले केंद्रीय नेतृत्वाची हुजेरेगिरी करण्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेचा रोजगार हिसकावून गुजरातच्या घशात घालण्याचा केविलवाणा प्रकार हे सरकार करत असून आम्ही या घटनेचा निषेध व्यक्त करतो तसेच गेलेले प्रकल्प महाराष्ट्रात पुन्हा परत आणावेत आणि पुन्हा असे कृत होता कामा नये अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल त्यामुळे कायदा व सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण झाल्यास विद्यमान सरकार जबाबदार राहील अशा आशयाचे निवेदन नायब तहसीलदार यावल यांना देण्यात आले याप्रसंगी निवेदन देताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड करा देवकांत पाटील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष हितेश गजरे राष्ट्रवादी चे समन्वयक किशोर माळी तालुका सरचिटणीस हेमंत दांडेकर जिल्हा युवक सरचिटणीस विनोद पाटील तालुका कार्याध्यक्ष नरेंद्र शिंदे तालुका सचिव विनोद पाटील सदस्य गोपाळ पाटील संघटक भूषण नेमाडे, विजय भोई ,पवन पाटील, यश अडकमोल , लक्ष्मण धनगर आदींची निवेदन देते प्रसंगी उपस्थिती होती .

साध्वी कालंका माता पुण्यतिथी महोत्सव साजरा

0

 

दानापूर- गोपाल विरघट

येथील साध्वी कालंका माता मंदिरात मातेच्या 21व्या पुण्यतिथी महोत्सव कार्तिक शुद्ध पंचमी दिनांक 29/ 10 ,/2022 शनिवारी ला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.दि28/10/2022शुक्रवार सायंकाळी 5 वाजता हरीनाम गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली दानापूर,सोगोडा,पळशी,उमरा एकलारा,चांगेफळ, येथील ढोलाचे भजन मंडळ सहभागी झाले होते दिनांक 29/ 10/ 2022 पांडवपंचमी ला मातेच्या समाधीवर विधिवत पूजन करून जलाभिषेक करण्यात आला.दुपारी12 वाजता महंत कृष्णानंदजी भारती महाराज श्री क्षेत्र वारी हनुमान यांच्या प्रवचनाचा ग्रामस्थांनी लाभ घेतला.या नतंर देवीची आरती नंतर दहीहंडी काला वाटुन महाप्रसादाला सुरुवात झाली. सायंकाळी उमरा ता अकोट येथील महिला भजन मंडळ यांच्या भजनाचा कार्यक्रम झाला. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला याकरिता शारदा माता महिला मंडळ, कालंक माता उत्सव मंडळाचे स्वंयसेवक, गावातील प्रतिष्ठित नागरिक , गणेश मंडळ,दुर्गा माता मंडळ, आदींनी परिश्रम घेतले.हा उत्सव म्हणजे माहेरी आलेल्या लेकीबाईसाठी दिवाळी असतो कारण दिवाळी नंतर पाचव्या दिवशी येणारा हा उत्सव गावातील सर्व लेकीसाठी महत्वाचा उत्सव असतो , त्यामुळे महाप्रसादासाठी त्या आवर्जून उपस्थित राहतात.