Home Blog Page 25

ज्ञानदीप विद्यानिकेतन, हिंगणघाट येथील मुलींचा फुटबॉल संघ पोहोचला विभागीय स्तरावर(Hingnghatnews)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghatnews/हिंगणघाट :- क्रीडा व युवक सेना संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि वर्धा जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने दि. 11 जुलै 2025 शुक्रवार, रोजी वर्धा येथे घेण्यात आलेल्या सुब्रोतो मुखर्जी जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत ज्ञानदा हायस्कूल, सातेफळ विरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात ज्ञानदीप विद्यानिकेतन येथील 17 वर्ष गटातील मुलींच्या फुटबॉल चमूने 1-0 ने स्पर्धक खेळाडूंचा पराभव करून घवघवीत यश संपादन केले. तसेच नागपूर येथे होणाऱ्या विभागीय स्तराकरिता आपले स्थान निश्चित केले.

फुटबॉल संघात कनक जामुनकर,तिलाष्का राठोड, श्रावणी बोरकर, श्रावणी वाणे, लीना घिये, पल्लवी मुडे, धनश्री मोहाड, दिशा पाटील, तनुजा डफ, ज्ञानाई खारपाते, अनन्या चौधरी, आरती शिरजोरकर, नंदिनी डेहणे या विद्यार्थीनींनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता शिक्षणासोबत क्रीडेलाही अनन्यसाधारण महत्त्व आहे.

म्हणूनच शाळेचे संस्थापक गिरधर राठी विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहित करतात. क्रीडा शिक्षक योग्य तालीम देऊन विद्यार्थ्यांना स्पर्धेकरिता सक्षम करतात. ही खास उल्लेखनीय बाब.

विद्यार्थ्यांच्या विक्रमा बद्दल गिरधर राठी (संस्थापक- हिंगणघाट बहुउद्देशीय शिक्षण विकास संस्था, हिंगणघाट द्वारा संचालित ज्ञानदीप विद्यानिकेतन हिंगणघाट व वाघोली), अर्पणा राठी ( अध्यक्षा), रशेष राठी (सचिव ), प्रवीण धोबे

Hingnghatnews/(कोषाध्यक्ष), अभिनव जयस्वाल (मुख्याध्यापक- ज्ञानदीप विद्यानिकेतन हिंगणघाट), रोहन हुमाड ( क्रीडा शिक्षक), पायल तळवटकर (क्रीडा शिक्षिका) तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी फुटबॉल खेळाडूंचे कौतुक करून पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या. तसेच क्रीडा क्षेत्रात उच्चांक गाठण्याचा संकल्प केला.

Atulvandile /अतुल वांदिले यांच्या निवेदनानंतर ना गडकरी यांच्या दणक्याने उड्डाणं पुलाच्या दुरुस्तीला वेग

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Atulvandile/हिंगणघाट येथील राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव चौकातील उड्डाणं पुलावर एका वर्षात दोनवेळा पडलेल्या जीवघेण्या खड्ड्या बाबत पुराव्या सहित माहिती केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांना भेटून दिल्यानंतर ना. गडकरी यांनी त्वरित राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यां ह्या उड्डाण पुलाबाबत माहिती देऊन सदर काम करणाऱ्या ठेकेदाराला ताबोडतोब ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्याचे आदेश दिले.

ना. गडकरी यांचा आदेश येण्याच्या आधी ज्या पद्धतीने थातूर मातुर काम सुरु होते ते बंद करून वरिष्ठ महामार्ग अधिकारी हें स्वतः आपल्या तांत्रिक अधिकारी वा कर्मचाऱ्यांसह स्वतः घटनास्थळी येवून या पुलाची स्थायी स्वरूपात दुरुस्तीचे काम सुरु केले आहे.

SarpanchNews/संग्रामपूर तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत जाहीर.

यांच बरोबर उपजिल्हा रुग्णालयाजवळील व कलोडे चौक येथे सुरु असलेल्या उड्डाण पुलाच्या कामाकडेही या राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांचे बारीक लक्ष दिसत आहे. दि. 7 जुलैला ना. नितीन गडकरी यांना राका नेते अतुल वांदिले यांनी प्रत्यक्ष भेटीत निवेदन दिल्यावर व ना. गडकरी यांनी त्वरित दखल घेतल्याने हिंगणघाटचे सर्वसाधारण नागरिक या दोघांनाही धन्यवाद देत आहे. यावेळी मनसेचे राज्य चिटणीस हेमंत गडकरी हें उपस्थित होते.

Nitingadkariयेथील राष्ट्रीय महामार्गावरील उपजिल्हा रुग्णालया जवळील लोखंडी पूल वणा नदीवर स्थानांतरीत करण्याच्या एका विरोधी पक्षाच्या नेत्याने करूनही पक्ष भेद विसरून या दोन्ही मागणीची त्वरित दखल ना गडकरी यांनी घेतली हें विशेष! यावेळी राकाचे जिल्हाध्यक्ष श्री सुनील राऊत, दशरथ ठाकरे उपस्थित होते.

SarpanchNews/संग्रामपूर तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत जाहीर.

0

 

[ जनतेतून सरपंच पदाची थेट निवडणूक होत असल्याने निवडणूक चुरशीची होणार!]

SarpanchNews/संग्रामपूर (अनिलसिंग चव्हाण )ः- महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार संग्रामपूर तालुक्यातील ५० ग्रा.प.च्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत सन २०२५ – २०३० ह्या कालावधीसाठी आज दि.९ / जुलै रोजी पार पडली. सरपंच पदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार!

Foreshtnews /पोलिस स्टेशन आकोट येथे सहायक वनसंरक्षक नम्रता टाले यांच्या विरोधात सोमंत रजाने यांची तक्रार दाखल.

जि प हायस्कूल संग्रामपूरच्या प्रांगणातील सभागृहात आज दु.१२ वा. जळगाव (जामोद ) उपविभागाचे उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संग्रामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील ५० ग्रा.पं.चे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. ह्यावेळी निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार सुनील नामदेव जुनघरे, निवासी ना.तह. तहसीलदार राहुल वसावे,सं.गां.नि.यो.चे नायब तह. विकास शिंदे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

सर्व प्रथम तहसीलदार प्रशांत पाटील यांनी सन २०२५ – २०३० ह्या वर्षासाठी सरपंच पदाकरीता सरपंच पदातून काढण्यात येणाऱ्या आरक्षणाबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती देवून तालुक्यातील ५० ग्रामपंचायती करीता अनु. जाती स्त्री – ४ , अनु. जमाती स्त्री -३ , ना.मा.प.प्रवर्ग स्री- ५ , सर्वसाधारण स्री- १३ एकूण महिला सरपंच पदासाठी २५ , तर सर्वसाधारण – १० , ना.मा.प्र.- ६ , अ.जमाती- ५ , अ.जाती- ४ , एकूण २५ असे ५० सरपंच पदासाठी सन २०२५ – २०३० करिता नवीन आरक्षण काढण्यासाठी लहान मुलांच्या हस्ते इश्वर चिठ्ठी काढून आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यामध्ये खालील प्रमाणे आरक्षण काढून जाहीर करण्यातआले.

SarpanchNews/ह्या आरक्षण सोडत साठी निवडणूक विभागाचे सहा. महसूल अधिकारी जी.पी. ठाकरे , योगेश खारोडे , महसूल सहा. नितीन गोरे , निवडणुक विभागाचे संगणक परिचालक गोपाल बोंबटकार व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. आज आरक्षण सोडतीचे वेळी सुद्धा रिमझिम पाऊस सुरू होता.तरीही अनेक आजी ,माजी सरपंच तसेच महिला सरपंचाचे पती,इतर राजकीय पदाधिकारी,कार्यकर्ते ,नागरिक उपस्थित होते.

राष्ट्रीय महामार्ग वरील लोखंडी पूल वणा नदीवर स्थानांतरीत करण्यास अतुल वांदिले यांच्या मागणीवर ना.गडकरी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश Hingnghatnews 

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट येथील राष्ट्रीय महामार्गावरील उपजिल्हा रुग्णालयाजवळील लोखंडी पूल येथील वणा नदीवर स्थानांतरीत करण्यात यावा या मागणीचे निवेदन आज दि. 7 जुलैला ना. नितीनजी गडकरी यांना राका नेते अतुल वांदिले यांनी प्रत्यक्ष भेटीत दिले. यावेळी ना. नितीन गडकरी यांनी तातडीने राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत त्वरित या पुलाबाबत अहवाल पाठविण्याचे आदेश दिले व पूल उत्तम स्थितीत असल्यास तो वणा नदीवर स्थानातरीत करण्यात यावे असे स्पष्ट निर्देश राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना दिले.त्याचप्रमाणे नांदगाव येथील उड्डाण पुलावर दोन वेळा पडलेल्या भगदाडा बाबत माहिती घेऊन अधिकाऱ्यांना या पुलावरील या गड्डया बाबत कायमस्वरूपी तोडगा काढून दुरुस्त करावा व संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश दिले.

येथील राष्ट्रीय महामार्गावरील उपजिल्हा रुग्णालया जवळील लोखंडी पूल वणा नदीवर स्थानातरीत केल्यास वणा नदीवरील गाडगेबाबा समाधी व 51 फूट उंचीच्या विठ्ठलाच्या दर्शनाला जाणे भाविकांना सोयीचे होणार आहे.

Foreshtnews /पोलिस स्टेशन आकोट येथे सहायक वनसंरक्षक नम्रता टाले यांच्या विरोधात सोमंत रजाने यांची तक्रार दाखल.

जर या ठिकाणी शक्य नसल्यास राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड जवळ हा पूल स्थानातरीत केल्यास हायवेवर मोठ्या प्रमाणावर होणारे अपघात टळू शकतात त्यामुळे हा पूल वणा नदीवर किंवा छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड परिसरात उभारण्यात यावा अशी आमची मागणी वजा विनंती अतुल वांदिले यांनी ना. गडकरी यांना भेटून केली. यावेळी ना गडकरी यांच्यासोबत अर्धा तास झालेल्या चर्चेत शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष व मनसेचे राज्यचिटणीस हेमंत गडकरी उपस्थित होते.

राष्ट्रीय महामार्गवर प्राधिकरण यांनी अंदाजे तीन वर्षापूर्वी या उपजिल्हा रुग्णालयात होणारी गर्दी पाहून पायी जाणाऱ्या व्यक्तीसाठी हा पूल तयार करण्यात आला होता. परंतु आता या चौकात व कलोडे चौकात राष्ट्रीय महामार्ग कडून उड्डाणं पुलाचे काम प्रगतीपथावर आहे.

त्यामुळे भविष्यात या पुलाचा कोणताही ऊपयोग नसल्याने हा पूल या ठिकाणावरुन उचलून वणा नदीवरील गाडगेबाबा समाधीकडे जाणाऱ्या मार्गावर उभारल्यास नदीला पाणी असते त्यामुळे असंख्य भाविकांना या परिसरातील 51 फूट श्री विठ्ठलाच्या व संत गाडगेबाबा यांच्या समाधीजवळ जाण्यास भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

Hingnghatnews:त्यामुळे हा तयार पूल जर या उपरोक्त जागेवर उभारल्यास असंख्य भाविकांची व नदीपल्याड अनेक गावातील जनतेची सोय होऊ शकते. ठिकाणी शक्य नसल्यास शहरातील अन्य कोणत्याही वर्दळीच्या जागेवर स्थानातरीत केल्यास जनतेची सोय होऊ शकते अशी राकाचे अतुल वांदिले यांनी केली. या मागणीची त्वरित दखल ना नितीन गडकरी यांनी घेतली.यावेळी मनसेचे राज्य चिटणीस हेमंत गडकरी,राकाचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, दशरथ ठाकरे उपस्थित होते.

Foreshtnews /पोलिस स्टेशन आकोट येथे सहायक वनसंरक्षक नम्रता टाले यांच्या विरोधात सोमंत रजाने यांची तक्रार दाखल.

0

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.

Foreshtnews/अकोट:-अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील प्रकरणासंदर्भात गैर अर्जदार यांच्या विरोधात फिर्यादीने पोलिस स्टेशन अकोट येथे कारवाई करण्याबाबत तक्रार दाखल केली आहे.प्रकरण असे आहे की,
फिर्यादी सोमंत वसंतराव रजाने वय ३५ वर्ष,धंदा- शेती रा.बोर्डी, ता. अकोट, जि. अकोला व गैरअर्जदार नम्रता टाले,सहाय्यक वनसंरक्षक (वने) अकोला वनविभाग अकोला व इतर संबंधीत वनअधिकारी गैरअर्जदाराच्या विरुध्द गुन्ह्याची नोंद करुन कायदेशिर कार्यवाही करणेबाबत लेखी तक्रारीच्या व्दारे मागणी केली आहे.policenews

त्याचप्रमाणे मला व माझ्या कुटुंबाला पोलिस सरंक्षण मिळण्याबाबत सुद्धा फिर्यादी यांनी मागणी केली आहे.
प्रकरण असे आहे की दिनांक ०६.१२.२०२० रोजी सोपान गणेश रेळे याची दु-व्हिलर बाईक स्लिप झाल्यामुळे त्याचा अपघात झाला होता. त्याला मी ग्रामीण शासकीय रुग्णालय अकोट येथे उपचारा करीता नेले होते.

हिंगणघाट नजीकच्या कोल्ही शिवारात परवानगी न घेता ३ मोठ्या गोदामांची निर्मिती!..सबंधित विभागाचे दुर्लक्ष.brekingnews 

आवक पोलीस लिपीकर बयान नोंदविण्याकरीता दोन कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या होत्या. तसेच संबंधीत वनपरीक्षेत्र अधिकारी अजय बावने यांनी सदरच्या घटने संबंधी अधीनपरीक्षेत्र अधिकारी थोरात यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये माझे बयाण नोंदवून माझी सही सुध्दा घेतली होती.परंतु जेव्हा मी ते बयाण वाचले असता ते खोटे व चुकीचे दिसले होते. कारण घटना ही मोटार अपघाताची असतांना माझे बयाण हे वनप्राणी हल्ला प्रकरणा संबंधी नोंदविले होते.

म्हणून मी माझे बयाण परत मागितली होते. परंतु दिनांक 3/7/2025 प्रेषक लिपीक जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला यांनी सदरहू बयाण परत देता येत नाही असे म्हटले होते व सदरहू बयाण आम्ही रेकॉर्डला लावणार नाही असे सुध्दा त्यांनी म्हटले होते.

जेव्हा मला वर्तमान पत्राव्दारे माहिती पडले होते की, सोपान गणेश रेळे चे वन्यप्राणी हल्ला नुकसान भरपाईचे प्रकरण मंजूर झाले आहे. तेव्हा माझ्या बयाणाचा वन विभागांने दुरुपयोग केला असे मला वाटले म्हणून मी वनपरीक्षेत्र अधिकारी यांना माझे बयाण परत करण्याची फोनव्दारे विनंती केली तेव्हा त्यांनी मला त्यांच्या कार्यालयात येण्याचे सांगितले होते. मी व माझ्यासोबत शेख मुन्ना आम्ही दिनांक २२.०६.२०२५ रोजी वनपरीक्षेत्र अधिकारी अकोला यांच्या कार्यालयात गेलो असता दिसून आले नाही.

त्यांना वारंवार फोन सुध्दा लावण्यात आले होते.परंतु त्यांनी माझा फोन नंबर ब्लॅकलिस्ट मध्ये टाकल्याचे लक्षात आले. शेवटी मी हताश होवून कोर्टाच्या रोडच्या बाजुने असलेल्या कॅटीनवर चहा पित असतांना तेथे अॅड. एस.जी. खंडारे यांच्याशी ओळख झाली व त्यांना सदरच्या प्रकरणाची संपूर्ण माहिती सांगितली तेका त्यांनी असे म्हटले होते की तुम्हाला खोट्या प्रकरणात अडकविण्याची शक्यता आहे.

Foreshtnews/करीता माझा कसले प्रकारचा दोष नसताना मला दोषी ठरवणे हे कितपत योग्य आहे?म्हणून सदर प्रकरणात आपण योग्य ती चौकशी करून मला न्याय द्यावा व गैर अर्जदारांवर गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी आणि माझ्या कुटुंबाला संरक्षण द्यावा अशी विनंती फिर्यादी आणि केली आहे.

हिंगणघाट नजीकच्या कोल्ही शिवारात परवानगी न घेता ३ मोठ्या गोदामांची निर्मिती!..सबंधित विभागाचे दुर्लक्ष.brekingnews 

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- हिंगणघाट सीमेनजीकच्या ग्रामपंचायत आजंती हद्दीत येत असलेल्या मौजा कोल्ही(बोरगाव) या क्षेत्रात शहरातील राठी या उद्योजक परिवाराने मोठे गोदाम उभारले आहेत.

येथील हिंगणघाट नागपूर महामार्गावरील शेत. सर्वे. क्र. १०२ ज्याची आराजी १.६५ चौ. मी. आहे, हे गोदाम योगीता गोविद राठी व पदमा गोपालदास राठी यांचे नावे आहेत. दुसरे गोदाम शेत सर्वे क्र.१००/१ या ठिकाणी असून त्याची आराजी १.१४ चौ.मी आहे.
नितीन गोपालदास राठी यांचे नावावरती हे गोदाम आहे तर शेत सर्वे. नं ९९/२ वरती आराजी १.२७ चौ. मी. गोपालदास धनराज राठी यांचे नावे आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक, भरपावसात राष्ट्रीय महामार्गावर दोन तास रस्ता रोको आंदोलन.(sharadpawar)

शेत सर्वे क्र. ९९/३ गोविंद गोपालदास राठी यांच्या नावाने आहे याची आराजी १.२७ अशी आहे.
हिंगणघाट तालुक्यात मौजा नांदगाव येथे जिनिंग तसेच आईल मिल, वणी येथे कॉटन व जिनिग कंपनी तसेच काही वर्षा अगोदर हिंगणघाट येथिल मोहता गृपची कपडा मिलसुद्धा यांनी खरेदी केली आहे. एकीकडे काही कपंनीचे कोरोना काळात दिवाळे निघाले तर दुसरीकडे राठी परिवारासारख्या उद्योजकानी आपला पसारा वाढविण्यात यश प्राप्त केले आहे.

राठी परिवाराने अल्पावधीतच हिंगणघाट शहरातच नव्हे तर जिल्ह्यात व विदर्भात आणि राज्यातसुद्धा एक यशस्वी उद्योजक म्हणून पुढे आले. यांचे व्यवसाय मोठे यांचा हिशोबात 1 रुपया सुद्धा गडबड होत नाही यांचा हिशोब चार्टर्ड अकाउंटन्ट कडुन तपासण्यात येते.
परंतु अधिक माहिती घेतली असता यात मोठा भ्रष्टाचार असल्याचे सकृतर्शनी लक्षात येते,यांचे व्यवसायाशी निगडीत अनेक बाबी नुसत्या कागदावरच असतात परंतु प्रत्यक्षात काही वेगळेच असते.

मौजा कोल्ही (बोरगाव)हिंगणघाट नागपूर महामार्गावरील असलेले येथे तीन विशाल गोदाम उभारण्यात आले आहे याचे मालक राठी परिवारातील विविध सदस्य आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या गोडाऊनची परवानगी नाही इतकेच नाहीतर शेती अकृषक सुद्धा नाही. यांचा नावाने असलेले ७/१२ वरती अकृषक केल्याची कुठलीही नोंद नाही, तसेच उपविभागीय अधिकारी किंवा नगररचनाकार यांचे कडून बांधकामाची परवानगी नाही, साधी ग्रामपंचायतिचीही परवानगी नाही,

Brekingnews :सबंधित विभाग व जबाबदार कर्मचारी व अधिकारी यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष ? झाल्याचे लक्षात येते.
त्यामुळे या ठिकाणी शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडाला असावा.
एकीकडे एक- एक रुपयाचा हिशोब ठेवणारे उद्योजक कर मात्र पद्धतशीरपणे बुडवितात.
या प्रकरणी सबंधित विभागाकडून दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार का ? असा सवाल या अनुषंगाने उपस्थित करण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक, भरपावसात राष्ट्रीय महामार्गावर दोन तास रस्ता रोको आंदोलन.(sharadpawar)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- हिंगणघाट शहरातून गेलेला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर नांदगाव चौक येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाला चार वर्षात दुसऱ्यांदा मोठा भगदाड पडलेले आहे. रस्त्याच्या मधोमध पडलेला हा भगदाड अपघातास निमंत्रण देतो आहे.

त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग भगदाड प्रकरणात समिति नेमून चौकशी करीत संबंधित अधिकारी व कंत्राटदारावर तातडीने कारवाई करा याप्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात नांदगाव चौक येथिल उडानपुलावर भरपावसात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

गांजा अंमली पदार्थाची विक्री करीता वाहतुक करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.(crimenews)

कृषी उत्पन्न बाजार समिती ते सेंट जॉन कॉन्व्हेंट पर्यंत उड्डाणपूल मागील चार वर्षापूर्वी निर्माण करून वाहतुकीसाठी सुरू केला. मात्र, त्यानंतर अनेकदा बंद करून वाहतूक वेगळ्या रस्त्याने वळवण्यात आली. अनेकदा पुलाची डागडुजी ही करण्यात आली. त्या खड्यात पडून तिथे जर अपघात झाले, त्याचे जबाबदार कोण राहणार, आम्ही जबाबदार कोणाला ठरवायचे ?

याबाबत आम्हाला ठोस आश्वासन देण्यात यावे. या आधी सुद्धा महामार्ग अधिकाऱ्यांना निवेदने दिली होती. याकडे आपल्या राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यानी दुर्लक्ष केले. दुर्लक्ष केल्यामुळे आता आणखी हिंगणघाट शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ वर नांदगाव चौक येथील उडानपुलावर दुसऱ्यांदा भगदाड पडले आहे. आज अनेक नागरिक अपघात होता होता वाचले. जर तिथे कोणत्याही नागरिकांचा अपघात झाला असता तर त्यांचे जबाबदार कोण राहले असते?

त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गावरील पडलेल्या भगदाडाची तात्काळ दुरुस्ती करावी व तातडीन या प्रकरणात समिती नेमन संबधीत अधिकारी व कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी नांदगाव चौक येथील उडानपुलावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्त्वात भरपावसात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी राष्ट्रीय महामार्ग अधिकारी, तहसीलदार यांनी तात्काळ आंदोलन स्थळी उपस्थित झाले.

महामार्ग अधिकाऱ्यांनी पुलाचे पूर्ण ऑडिट केले जाईल व संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई केल्या जाईल असे आश्वासन दिल्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले..
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, शहर निरीक्षक महेश झोटिंग पाटील, तालुका अध्यक्ष विनोद वानखेडे, शहर अध्यक्ष बालू वानखेडे, मो.रफिक, समाजसेवक सुनील डोंगरे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे,माजी नगरसेवक दिनेश देशकरी, अमोल बोरकर, जिल्हा महासचिव मिलिंद कोपुलवार, कृषी सेल जिल्हाध्यक्ष प्रभाकर रेवतकर, वाहतूक जिल्हाध्यक्ष शेखर जाधव, युवक प्रदेश सचिव प्रशांत लोणकर,विजय तामगाडगे, श्रीकांत भगत, सुनील भुते, सिमा तिवारी, सुजाता जांभुळकर, मीना सोनटक्के, दिपाली रंगारी, आचल वकील,नितीन भुते, प्रवीण कलोडे,हेमंत घोडे, जितेंद्र रघाटाटे,नाना पुंड, जगदीश वांदिले,सुनिल घोडखांदे,मनोज मुरार, संजय गांभुळे, पप्पू आष्टीकर,समीर बाळसराफ,अन्सार शेख, विपुल थुल,सुशील घोडे,राहुल जाधव, राजू मुडे,प्रशांत मेश्राम,अमर धनविज,अमित रंगारी,अभिजित साबळे,नईम शेख,विपुल वाढई,छोटू वानखेडे,रवी बोरकर,मंगेश सातघरे, हुकेश ढोकपांडे,मयूर तपासे, राहुल बोरकर,मनीष मुडे, वैभव भुते,आदित्य तडस,सौरभ घोडखांदे आदी उपस्थित होते.

गांजा अंमली पदार्थाची विक्री करीता वाहतुक करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.(crimenews)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :– 01/07/2025 रोजी स्था.गु.शा. वर्धा येथील पथक पोलीस स्टेशन हिंगणघाट परीसरात अवैध धंद्यावर कार्यवाही करीता पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीवरून मौजा रिमडोह शिवार, जामकडुन हिंगणघाट कडे येणा-या राष्ट्रीय महामार्ग क्र. 44 वरील हॉटेल संस्कार जवळील मोठा मारोती मंदिर देवस्थान समोर सापळा रचुन एन.डि.पी.एस. ॲक्ट अंतर्गत कार्यवाही केली असता.

आरोपी 1) अंकित भाविक वावरे, वय 19 वर्ष, रा. फुकटा, आजनसरा, जि. वर्धा, ह.मु. शहालंगडी रोड संत ज्ञानेश्वर वार्ड हिंगणघाट, जि. वर्धा, 2) खेमेश भेरूदास भुते, वय 21 वर्ष, रा. टेलंग पेट्रोलपंप मागे, संत ज्ञानेश्वर वार्ड हिंगणघाट, हे मोक्कावर रंगेहाथ गांजा अंमली पदार्थाची वाहतुक करतांना मिळुन आले असुन, आरोपी अंकित वावरे याचे पाठीवर असलेल्या एका स्कुल बॅगमध्ये गांजा अंमली पदार्थ मिळुन आला.

Uddhavthakre /शिवसेना (उबाठा गट कडून धरणे व निषेध आंदोलन

सदर गांजा अंमली पदार्थ आरोपीतांनी 3) फैजान नावाचा ईसम रा. मोमीनपुरा नागपुर याचेपासुन खरेदी केल्याचे सांगितल्याने, जागीच जप्ती पंचनामा कार्यवाही करून, ताब्यातील दोन्ही आरोपीतांचे ताब्यातुन 1) निव्वळ गांजा अंमली पदार्थ 1.037 किलोग्रॅम कि. 20,740 रू 2) एक मोरपंखी निळ्या रंगाची टि.व्ही.एस. ज्युपीटर मोपेड क्रमांक एम.एच. 49 बी.एन. 6498 कि 1,00,000 रू 3) एक सॅमसंग कंपनीचा ॲन्ड्रॉईड मोबाईल कि. 15,000 रू 4) एक रिअरमी कंपनीचा ॲॅंन्ड्रॉईड मोबाईल कि. 15,000 रू, 5) एक स्कुल बॅग कि. 250 रू, असा जु.कि. 1,50,990 रू चा मुद्देमाल जप्त करून, तिन्ही आरोपीतांविरूध्द पो.स्टे. हिंगणघाट येथे कलम 8(क), 20(ब) ii(ब), 29 एन.डी.पि.एस ॲक्ट 1985 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन, जप्त मुद्देमाल व दोन आरोपीतांना पो.स्टे. हिंगणघाट यांचे स्वाधीन करण्यात आले आहेत.

crimenews/सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक अनुराग जैन यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांचे निर्देशाप्रमाणे स.पो.नि. अतुल थुल(पो.स्टे. हिंगणघाट), पो.उपनि. प्रकाश लसुंते, पो.अं. मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, महादेव सानप, पवन पन्नासे, रवि पुरोहित, दिनेश बोथकर, अक्षय राऊत, विनोद कापसे, अभिषेक नाईक सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा व फॉरेन्सिक विभागाचे स.फौ. अनिल साटोणे, अजित धांदरे, पो.हवा. मंगेश धामंदे यांनी केली.

मनसे कडून नांदगाव पुलावर पडलेल्या भोगदाडला श्रदांजली अर्पण करून निषेध (brekingnews)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

brekingnews/30/6/25 रोजी तब्ब्ल तिसऱ्यांदा नांदगाव चौरस्त्यावरील पुलाला बघदाळ पडलेले आहे आणि 3 ते 4 फुटाचे आर पार छिद्र झालेले आहे.

Uddhavthakre /शिवसेना (उबाठा गट कडून धरणे व निषेध आंदोलन

यात मोठा भ्रष्टाचार झाला असून नेहमी प्रमाणे लिपा पोथी चे काम पुन्हा पुन्हा होऊन होणाऱ्या मोठ्या अनर्थला टाळण्याकरिता मनसेने श्रद्धांजली वाहत निषेध केला व मनसे शहर अध्यक्ष केतन ता्यवाडे यांनी सांगितले.

brekingnews/कि एकदाची या पुलाची नवीन बांधणी करून उच्च दर्जाचा पूल बांधण्यात यावा व जुन्या ठेकेदारावर कारवाही करावी

Uddhavthakre /शिवसेना (उबाठा गट कडून धरणे व निषेध आंदोलन

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Uddhavthakre/२९ जून २०२५ रोज रविवारला शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख *मा. माजी मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने या सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्रात शाळेतील इयत्ता पहिलीपासून हिंन्दीसक्ती बाबत च्या निर्णयाविरोधात आंदोलन करण्याचे आदेश देण्यात आले.

त्याप्रमाणे पश्चिम विदर्भ संपर्क नेते खा. अरविंद सावंत तसेच वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख रमेश जाधव यांनी जिल्ह्यात धरणे आंदोलन करण्याच्या सूचना केल्या.

यावल येथील अतिक्रमणामुळे कस्तुराबाई सावकारे.चुंचाळे या महिलेचे निधन संपूर्ण तालुक्यात तीव्र संताप व्यक्त(Yavalnews)

फडणवीस सरकारच्या विरोधात वर्धा येथील हिंदू सूर्य श्रीराजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जिल्हाप्रमुख राजेंद्र खुपसरे यांच्या नेतृत्वाखाली,तसेच भारती कोटंबकर, उपजिल्हा प्रमुख सतीश धोबे,युवा सेना जिल्हा प्रमुख प्रशांत सातपुते ,सतीश नवरखेले प्रमोद भोमले,तालुका प्रमुख संजय पांडे आणि शहर प्रमुख मिलिंद गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत धरणे व निषेध आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्रातील या फडणवीस सरकारच्या काळातील विविध व महत्त्वाचे प्रश्न असताना सुध्दा हे भाजप वाले आपल्या छुपा एजेंडा वर काम करून जाती – जाती, धर्मा – धर्मा मध्ये तेढ निर्माण करून राजकीय पोळी शेकण्याचे काम करीत आहे. या राज्यात महत्वाचे प्रश्न जसे की, शेतकऱ्यांचे प्रश्न, सुशिक्षित बेरोजगार तरुणांचे प्रश्न, आरोग्य बाबतचे प्रश्न, महागाईच्या प्रश्न असताना या प्रमुख विषयावर जनतेचा आक्रोश तयार होऊ नये!

म्हणून आता हिंदी भाषिक आणि मराठी भाषिक लोकांच्या मनात ऐकामेकाच्या विरोधात तेढ निर्माण व्हावे यासाठी या सरकारने शाळेतील इयत्ता पहिली पासून हिंदी शक्ती बाबत अध्यादेश काढण्यात आले. म्हणून शिवसेना सतत या राज्यातील मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढत आहे व राहील. व काढलेला हिंदी सक्ती होऊ देणार नाही . या ठिकाणी धरणे आंदोलन निषेध सभेत वर्धा शहर प्रमुख मिलिंद गांधी यांनी प्रास्ताविकपर केले.

मनीष देवडे ,उपजिल्हाप्रमुख सतीश धोबे, उपजिल्हा संघटिका वर्धा,भारती कोटंबकर ,त्यानंतर जिल्हाप्रमुख राजेंद्र खुपसरे यांनी या निषेध सभेत आपले मनोगत व्यक्त केले. हिंदी सक्तीच्या विरोधात धरणे व निषेध आंदोलन पक्षा तर्फे करण्यात आले. तथा शासनाच्या शासन निर्णय विरोधात शासन निर्णय पेटवून होळी करण्यात आली.

तसेच आम आदमी पार्टीचे माजी उपजिल्हाप्रमुख प्रमोद भोमले वर्धा यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे यांनी त्यांच्या हाताला शिवबंधन बांधून त्यांचा पक्षात प्रवेश करून घेतला. त्यांना पक्षातील सर्व पदाधिकारी शिवसैनिकांतर्फे पक्षात प्रवेश केल्याबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या.

Uddhavthakre/या वेळी पक्षातर्फे प्रकाश अनासाने, मनीष देवडे,गजानन काटवले,शंकर झाडे, सुनील आष्टीकर,तालुका संघटक लक्ष्मण डंभारे, सुभाष कडे,श्रीधर कोटकर,भास्कर ठवरे,शंकर मोहमारे, धीरज फुंडकर, धरमा शेंडे, नरेश भावरे, गणेश उरकुडे, धनश्री थोरात,शकील अहमद, भास्कर मानकर, गोपाल मेघरे,दिनेश धोबे, लक्ष्मण बकाने,सुरेश चौधरी,संजय पिंपळकर, बंडू मोरशे, चगेंज खान,नईम शेख, अमोल वादाफळे,हिरामण आवारी, संदीप नरड, डॉ. आनंद जगताप,बलराज डेकाटे,विजय कोरडे, भास्कर भिसे,दिलीप वैद्य, निलेश भगत,विलास धोबे, बाळा थोरात, विकी हातगडे, सुरज लोंढे, सिंधू पात्रे, अमन लोंढे ,वीरू शेंडे, रितिक नाडे, विनय शेंडे, संदीप नाडे, बावी शेंडे, ईशान शेंडे, अंगद शेंडे, विलास हातगडे, आकाश हातगडे, प्रथमेश कुरील, स्वानंद खपली, युधिष्ठिर थोरात , संजय बारई,श्याम वाघमारे,सचिन वावधने, श्रीकृष्ण रामगडे, दुर्गा कातोरे, जयमाला सोनगडे, शुभांगी कबळी, विद्या पाटील, विद्या वाघमारे,इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.