Home Blog Page 251

२० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करू नये-माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

0

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट:- १८ ऑक्टोबर
ग्रामीण आणि शहरी भागात सुरू असलेल्या २० पेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्येच्या शाळा बंद करण्यात येऊ नये अशी विनंती माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शिक्षणाची गंगा ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने निर्णय घेऊन जिल्हा परिषद व खाजगी शाळांना परवानगी देऊन शिक्षण क्षेत्रात बदल घडवून आणला. ५० वर्षापूर्वी ग्रामीण व शहरी भागात विद्युत पुरवठा नसताना कंदीलाच्या दिव्याखाली अभ्यास करून संपूर्ण देशांमध्ये शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणली. ग्रामीण भागातील लोकांनी जिल्हा परिषद व खाजगी शाळेमध्ये मराठीच्या अभ्यासक्रमानुसार डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट, शिक्षक,बाबू, चपराशी घडविले. त्यावेळेस अनु ते रेणू असा विकास साधून भारत देश विकसित केला. नंतर विज्ञानाच्या क्षेत्रात शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून देशाची विकासाकडे वाटचाल झाली आणि आज आपण २१ व्या शतकात कम्प्युटरच्या युगात वाटचाल करीत आहोत.
कॉन्व्हेंटच्या शिक्षण प्रणालीमुळे विज्ञान आणि कम्प्युटरच्या युगात पालक व विद्यार्थ्यांचे वाटचाल शहरीकरणाकडे वळली असून ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी
होत आहे.
२० पेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून तो निषेधार्थ आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा येथून सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी,शेतमजूर,कामगारांचे मुले शिक्षण घेत असून ते विद्यार्थी कॉन्व्हेंटच्या महागड्या पैशाचे शिक्षण घेऊ शकत नाही त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहील.संपूर्ण देशातील लोकांना साक्षर करण्यासाठी केंद्र सरकारने वर्धा जिल्ह्याची निवड केली असून साक्षरता अभियान राबवले होते आणि लोकांना साक्षर केले होते.
सन २०११ च्या जनगणनेनुसार, देशातील १५ वर्षे आणि त्यावरील वयोगटातील निरक्षरांची संख्या २५.७६ कोटी आहे, त्यातील पुरुष ९.०८ कोटी आणि १६.६८ कोटी महिला आहेत . सन २००९-१० ते २०१७-१८ दरम्यान राबविण्यात आलेल्या साक्षर भारत कार्यक्रमांतर्गत ७.६४ कोटी एवढे. साक्षर झालेल्या व्यक्तींच्या प्रगती अहवालाचा विचार करता, असा अंदाज आहे की सध्या देशात सुमारे १८.१२ कोटी लोक अजूनही निरक्षर आहेत.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने आणि २०२१-२२ च्या अर्थसंकल्पीय घोषणांच्या अनुषंगाने, प्रौढ शिक्षणाची एक नवीन योजना, “नव भारत साक्षरता कार्यक्रम सन २०२२-२३ ते २०२६-२७ या कालावधीत केंद्र शासनाच्या सूचनांनुसार राज्यात राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती . शासन निर्णय : केंद्र शासन पुरस्कृत “नव भारत साक्षरता कार्यक्रम सन २०२२-२३ ते सन २०२६-२७ या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे . योजनेचा उद्देश :
१ ) देशातील १५ वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता (वाचन, लेखन ) व संख्याज्ञान विकसीत करणे .
२) देशातील १५ वर्ष आणि त्यावरील वयोगटातील शिकाऊ व्यक्तींना महत्वपूर्ण जीवन कौशल्ये विकसीत करणे . या कौशल्यांमध्ये आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता आपत्ती व्यवस्थापन कौशल्य आरोग्याची काळजी व जागरुकता, बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंब कल्याण, इ. बाबींचा समावेश आहे
३ ) देशातील १५ वर्ष आणि त्यावरील वयोगटातील शिकाऊ व्यक्तींना मूलभूत शिक्षण देणे यामध्ये समतुल्य पूर्वतयारी स्तर ( इयत्ता तिसरी ते पाचवी), मध्य स्तर ( इयत्ता सहावी ते
आठवी आणि माध्यमिक स्तर ( इयत्ता नववी ते बारावी ) असून सदर कार्यक्रम एनसीईआरटी / एससीईआरटी आणि NIOS / SIOS यांच्या सहकार्याने राबविण्यात येईल
४ ) स्थानिक रोजगार, पुनर्कुशलता आणि उच्च कौशल्य प्राप्त करण्याच्या दृष्टीकोनातून प्रौढ नव साक्षरांसाठी निरंतर शिकण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून देशातील १५ वर्षे आणि
त्यावरील वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्ये विकसीत करणे . त्याची अंमलबजावणी केंद्र आणि राज्य / केंद्रशासित प्रदेश स्तरावरील संबंधित मंत्रालये / विभागांच्या सहाय्याने केली जाईल.
५ ) देशातील १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील विद्याथ्र्यांना निरंतर शिक्षण देणे.ज्यामध्ये कला, विज्ञान, तंत्रज्ञान, संस्कृती, क्रीडा, मनोरंजन, तसेच स्थानिकांना स्वारस्य असेलेले विषय यांचा समावेश असेल . उच्च शिक्षण विभाग आणि केंद्र आणि राज्य / केंद्रशासित प्रदेश स्तरावरील इतर संबंधित मंत्रालय / विभागांच्या साहाय्याने निरंतर शिक्षणावरील उत्तम प्रतीचे आणि प्रगत साहित्य उपलब्ध करुन देणे योजनेचा कालावधी : सदर योजना १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत राबविण्यात येईल . या योजनेसाठीचा कालावधी पाच वर्षे ( ६० महिने ) आहे . योजनेचे कार्यक्षेत्र : ही योजना राज्ये / केंद्र शासित प्रदेशांतील सर्व जिल्ह्यांमधील ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात लागू केली जाईल. तथापि, राज्य सरकार /केंद्रशासित प्रदेश योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार योजनेच्या अंमलबजावणीसाठी संबंधित जिल्ह्यांना / क्षेत्रांना प्राधान्य देईल . या योजनेत सर्व जिल्हे, उपजिल्हे, गट शहर, ग्रामपंचायती, वार्ड आणि गावे समाविष्ट असू शकतील . थोडक्यात, १५ वर्षे वा त्यावरील वयोगटातील निरक्षर असतील तेथे ही योजना लागू केली जाईल . योजनेची ठळक वैशिष्ट्ये – 2
1. प्रौढ शिक्षण ” याऐवजी ” सर्वांसाठी शिक्षण ” ही संज्ञा वापरली जाईल . ” शाळा ” हे योजनेच्या अंमलबजावणीसाठी एकक ( Unit) असेल लाभार्थी आणि स्वयंसेवी शिक्षक यांचे
सर्वेक्षण शाळांकडून केले जाईल.
असे केंद्र सरकारने परिपत्रक काढले आहे, असे असताना वीस पेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्येच्या असलेल्या शाळा बंद करण्याचा सरकारने घेतलेला निर्णय निषेधार्थ आहे.
तरी सरकारने ० ते २० पटसंख्या असलेला शाळा जनहितार्थ सुरू ठेवाव्या अशी विनंती माजी आमदार प्रा राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना निवेदनाद्वारे केली आहे.

हिंगणघाट विधानसभा राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या अध्यक्षपदी सौ.निताताई गजबे यांची नियुक्ती

0

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख सुबोध मोहिते,जिल्हाध्यक्ष सुनीलभाऊ राऊत, जिल्हा निरीक्षक राजाभाऊ टाकसाळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विद्या चौहान यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सौ.ज्योतीताई देशमुख यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे हिंगणघाट विधानसभा अध्यक्षपदी सौ.निताताई गजबे यांची नियुक्ती करण्यात आली.नवनियुक्त गजबे यांनी रा.कॉ.पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांचेवर श्रद्धा ठेवत प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले व महिला जिल्हाध्यक्ष सौ.ज्योतिताई देशमुख यांच्या नेतृत्वात पक्षसंघटन मजबुतीसाठी व पक्ष विस्तारासाठी जोरकसपणे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे,नागपूर जिल्हा निरीक्षक सौ.सुरेखाताई देशमुख,ओबीसी जिल्हाध्यक्ष हरीश काळे, जिल्हा उपाध्यक्ष पवन तिजारे,विधानसभा अध्यक्ष संजय तपासे, तालुकाध्यक्ष विनोद वानखेडे, शहराध्यक्ष विठ्ठल गुळघाणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

भुलाबाईच्या गाण्यांच्या स्पर्धाचे आयोजन जल्लोषात !

0

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट :- कोजागिरी पौर्णिमेनिमित्त घरोघरी मुली व स्त्रिया भुलाबाईचे खेळ खेळून पारंपारिक गाणी म्हणत असतात. आधुनिक काळात या कला नष्ट होत चालल्या आहे. नव्या पिढीला त्याची जाण व्हावी आणि या सण, परंपरा व कला पुढेही जोपासल्या जाव्यात या अनुषंगाने समर्था इव्हेंट्स अँड सिने प्रोडक्शन एल एल पी द्वारा आयोजित भुलाबाईच्या गाण्यांची भव्य स्पर्धा १६ ऑक्टोबर २०२२, रविवारी रोजी नगरपरिषद सार्वजनिक वाचनालय टाका ग्राउंड हिंगणघाट येथे उत्साहात पार पडली.
स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी पी व्ही टेक्स्टाईल जामचे प्रबंधक श्री भूपेंद्रजी शहाणे, सौ. विनया शहाणे , आधार फाउंडेशनचे अध्यक्ष श्री अतुल वांदिले, मातोश्री महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमेश तुळसकर, माजी नगरसेविका सौ शुभांगी डोंगरे, माजी नगरसेवक श्री मनीष देवडे, श्रीमती शकुंतला दुधलकर, सर्पमित्र श्री प्रवीण कडू, जेष्ठ पत्रकार श्री सतीश वखरे, समर्था इव्हेंट्स अँड सिने प्रोडक्शन चे संचालक सौ श्रृती दुधलकर सोरटे व श्री राहुल सोरटे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भुलाबाईचे पारंपरिक रित्या पूजन करून करण्यात आली. प्रसंगी कु.दीक्षा मून हिने स्वागत गीत सादर केले.

कार्यक्रमाला परीक्षक म्हणून संगीत शिक्षक श्री विजय गावंडे व सेवानिवृत्त प्रा. सौ. सुरेखा देशमुख हे उपस्थित होते.

या स्पर्धेत सर्व वयोगटातील मुली व स्त्रियांच्या एकूण १२ समूहांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत वेगवेगळी पारंपरिक भुलाबाईची गीत तसेच काही नव्याने लिहिलेली आधुनिक भुलाबाईंच्या गाण्यांचे सादरीकरण व विविध पारंपारिक खेळ स्पर्धकांनी सादर करून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.
या स्पर्धेत प्रथम पारितोषिक ₹ ३००१/- शिवकन्या ग्रुप यांनी प्राप्त केले द्वितीय पारितोषिक ₹ २००१/- जय मातादी महिला मंडळ यांना मिळाले.
तृतीय पारितोषिक ₹ १००१/- श्री स्वामी समर्थ ग्रुप यांना देण्यात आले.
प्रोत्साहनपर पुरस्कार ₹ ५०१/- सोनामाता महिला मंडळ
तसेच उत्तेजनार्थ पुरस्कार ₹ २०१/- व भेट वस्तू विद्या विकास जुनियर कॉलेज हिंगणघाट या ग्रुपला देऊन विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देण्यात आल्या.

या प्रसंगी सौ. निशा तिनगसे, सौ.अर्चना झालटे, सौ. भाग्यश्री साबळे, सौ. वैशाली तडस, श्री प्रवीण कडू व श्री सतीश वखरे यांचा सत्कार करण्यात आला.

स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात बी विथ मी चे संचालक श्री पितांबर चंदानी, विद्या विकास कॉलेज समुद्रपूरच्या उपप्राचार्य सौ. नयना शिरभाते, स्नेहल किसान नर्सरीच्या सौ. विद्या खांडरे व सौ. रितू खांडरे, श्रीमती शकुंतला दुधलकर तसेच स्पर्धेचे परीक्षक श्री विजय गावंडे व सौ सुरेखा देशमुख यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सौ. वैशाली तडस येळणे तर प्रास्ताविक सौ. श्रृती दुधलकर सोरटे यांनी केले.

कार्यक्रमाचे आयोजन व प्रबंधन कार्यक्रमाच्या समन्वयक कु. वृषाली तळवेकर, कु. महिमा खापरकर, कु. दीक्षा मून व कु. मयुरी गौळकार यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री मनोज दुधलकर,
कु. तानिया वाधवानी, कु.उत्कर्षा कडवे, कु. दिव्या हुलके, कु. मेघा तळवेकर, कु.स्वाती बेहेरे, कु. ईशा लोणकर, कु. नेहा बांदुरकर व समर्था इव्हेंट्स अँड सिने प्रोडक्शन च्या संपूर्ण टीमचा हातभार लाभला.

यावल नगर परिषदच्या दुर्लक्षित व भोंगळ कारभारामुळे शहरात मोकाट जनावरांचा गोंधळ दोन जणांचा गेला जिव

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

शहरातील प्रमुख मार्गावर मोकाट गुर , डुकर आणी कुत्र्यांचा वावर वाढल्याने पादचारी व मोटर वाहनांना प्रचंड त्रास सोसावा लागत असुन , प्रसंगी गुरढोर व मोकाट जनावरे हे वाहनात घुसत असल्याने अपघात होवुन शहरात दोन जणांनी आपला जिव गमावला असुन तरी देखील यावल नगर परिषद प्रशासना या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याची नागरीकांची तक्रार आहे. यावल शहरात मागील अनेक दिवसापासुन नगर परिषदच्या अक्षम्यः दुर्लक्षित कारभारामुळे शहरातील प्रमुख मार्गा पासुन तर विस्तारीत वसाहती मधील मार्गा पर्यंत सर्वत्र फिरतांना दिसुन येत असुन , यावल स्टेट बँक समोरील मार्गावर अशाच प्रकारे मोकाट फिरणारे जनावर वाहनात घुसल्याने काल शनिवार दिनांक १५ रोजी शिरपुर तालुक्यातील अशोक चव्हाण वय७० वर्षाच्या वयोवृद्ध व्याक्तीचा जिव गेल्याची घटना घडली असुन, या आदी शहरातील महाजन गल्ली परिसरात मागील एक महीन्या पुर्वीच नथ्यु बारी या मजुर व्यक्तिला मोकाट गुराने धडक दिल्याने बारी वाडयातील राहणारे बारी यांना गंभीर दुखापत होवुंन ते गृहस्थ उपचारा दरम्यान मरण पावले होते . यावल नगर परिषद कडे मोकाट गुरेढोर, मोकाट कुत्रे आणि डुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी मागणी वारंवार नागरीकांनी केली असतांना नगर परिषद प्रशासन या गंभीर विषयाकडे लक्ष देत नसल्याने शहरवासीयांमध्ये प्रशासनाच्या कारभारावर प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे . तरी नगर परिषद पुन्हा या मोकाट जनावरांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष न करता तात्काळ या मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लावावा व पुनश्न या जनावरांमुळे तिसरा निरपराध व्याक्तीचा बळी जाणार नाही याची दक्षता घ्यावी अशी अपेक्षा नागरीकांकड्डन व्यक्त करण्यात येत आहे .

नगर पालिका प्रशासन कडून प्लास्टिक बंदी विरोधात धडक कार्यवाही.

0

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट :- राज्य अभियान संचालक,महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग, महाराष्ट्र नागरी विकास संचनालय स्वच्छता अभियान (नागरी) मुंबई व विभागीय अधिकारी,महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ,नागपूर यांचे दिनांक १४/१०/२०२२ चे प्राप्त आदेशानुसार दिनांक १७/१०/२०२२ ते २०/१०/२०२२ या कालावधी मध्ये हिंगणघाट शहरात प्रभावी प्लास्टिक बंदी अभियान राबविणे बाबत आदेश प्राप्त झाले होते त्या अनुशंघाने हिंगणघाट नगर पालिका प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ तसेच पोलीस प्रशासन यांचे सयुंक्तिक पथकाद्वारे द्वारे प्लास्टिक बंदी विरोधात दिनांक १७/१०/२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजे पासून शहरातील आस्थापना तसेच लहान व मोठी दुकाने यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये स्थानिक विठोबा चौक येथील श्रीचंद कलेक्शन ,हिंगणघाट यांचे कडील साठवणूक केलेले प्लास्टिक ओवन पिशवी जप्त करण्यात आले तसेच आठवडी बाजार स्थित तूळजाई पूजा घर यांचे दुकानातून अंदाजे १ किलो सिंगल युज प्लास्टिक जप्त करण्यात आले ,आठवडी बाजार येथील झुलेलाल माल यांच्या दुकानातून अंदाजे १ किलो प्लास्टिक चम्मच जप्त करण्यात आले. सर्व दुकानदार यांना प्रथम वेळ असल्यामुळे प्रत्येकी ५,०००/- दंड आकारण्यात आला. शहरातील इतर लहान व मोठ्या आस्थापनांची प्लास्टिक बंदी पथकाने तपासणी केली व सर्वाना प्लास्टिक पिशवी तसेच इतर बंदी घालण्यात आलेले साहित्य न वापरण्या बाबत सूचना देण्यात आल्या. सदर कार्यवाही नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. हर्षल गायकवाड यांचे आदेशानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी श्री. महेश भिवापूरकर यांच्या मार्गदर्शन खाली प्लास्टिक बंदी पथकाचे नियंत्रण अधिकारी श्री.विशाल ब्राम्हणकर,स्वास्थ निरीक्षक श्री.विजय खोब्रागडे, श्री.अविनाश चव्हाण,शहर समन्वयक श्री.अक्षय इंगळे. पथक प्रमुख श्री.वसंत रामटेके, पथकातील कर्मचारी श्री.मदन मशानकर,श्री.रऊफ खान, श्री.वल्लभ जोशी,श्री.राज खरे, श्री.सागर बैस तसेच पोलीस प्रशासनातील पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री.राजकुमार कुवर यांनी केली. नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री.हर्षल गायकवाड यांनी शहरातील नागरिकांना तसेच व्यापारी वर्गाना प्लास्टिक चा वापर न करणेबाबत आवाहन केले असून शहरातील आस्थापनांची नियमितपणे प्लास्टिक बंदी पथकाद्वारे तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी प्लास्टिक बंदी मोहिमेस सहकार्य करणेबाबत आवाहन केले आहे.

तहसीलदार राजू गणवीर स्टॅम्प विक्रेत्यावर कारवाई का करत नाही ?

0

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

समुद्रपूर :- तहसील आवारात व बाहेर 100 रुपयाचा स्टॅम्प 110 रुपये मध्ये विकण्यात येते याबद्दल तहसीलदार यांच्याकडे अनेकदा तक्रार केल्यावर सुद्धा कारवाई होत नाही ? तहसीलदार आमचे काहीही करू शकत नाही स्टॅम्प विक्रेते सांगतात . समुद्रपूर येथे 100 रुपयांच्या स्टॅम्प 110 रुपयात विकण्यात येते याबद्दल मीडियाच्या माध्यमातून माहिती वरिष्ठांपर्यंत गेली असताना सुद्धा समुद्रपूर येथे कोणतीही कारवाई होताना दिसत नाही ? समुद्रपूरचे तहसीलदार राजू रणवीर यांना याबद्दल पूर्ण माहिती असताना सुद्धा , त्यांच्याकडे या विषयावर चर्चा केली असता सांगतात की ते काम आमचं नाही ? शेवटी तहसील समुद्रपूर प्रमुख म्हणून तहसीलदार यांच्याकडून जनतेच्या काही अपेक्षा आहे .100 रुपयाचा स्टॅम्प ११० मध्ये स्टॅम्प विक्रेते विकत आहे. होणारी जनतेची लूट यामध्ये तहसीलदार यांनी हस्तक्षेप करावा अशी जनतेची इच्छा असते परंतु तहसीलदार राजू गणवीर यांच्याकडून कोणतीही कारवाई नाही . जनतेची होणारी लूट केव्हा थांबणार समुद्रपूर येथील प्रशासन यांच्याकडून होणारे दुर्लक्ष जनतेच्या मनात शंका निर्माण करीत आहे. या मागे अर्थकारण तर नाही ? तहसीलदार यांच्याकडे भूमि अभिलेख संबंधित तक्रार केल्या वर सुद्धा कारवाई होत नाही ? तक्रारदार यांचे समाधान होत नाही अशी माहिती समोर आली आहे .

शेतकरी लाभार्थ्याचे शासकीय अनुदान बँक व्यवस्थापकांनी कर्ज खात्यामध्ये कपात करू नये तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी,भारतीय जनता पार्टी च्या वतीने तहसीलदारांकडे मागणी:

0

 

प्रतिनिधी:(जालना)दिनांक-१७/१०/२०२२ रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन सादर केली आहे.या निवेदनाद्वारे अशी मागणी केली आहे की,जालना तालुक्यातील रामनगर येथील युनियन बँक ऑफ इंडिया व इतर काही बँका शेतकरी लाभार्थ्याची अनुदान कर्ज खात्यामध्ये कपात करीत असून,संबंधित बँक व्यवस्थापनाला लाभार्थ्याच्या खात्यामधील रक्कम कपात न करण्याच्या सूचना द्याव्यात व शासकीय अनुदान लाभार्थ्याच्या खात्यामध्ये तात्काळ वितरित करावे.तसेच मागील पंधरा दिवसापासून परतीच्या पावसाने जालना जिल्ह्यासह तालुक्यामध्ये हाहाकार माजवला असून,अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन,कापूस,मका,तुर,द्राक्ष इत्यादी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अनुदान,मदत जाहीर करुन वितरित करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी जालना तालुक्याचे वतीने होत आहे.या निवेदनावर संजय डोंगरे,अनिल सरकटे,तुकाराम राठोड,गजानन नरवडे,शिवाजी राठोड,गजानन उगले,राजू राठोड,विकास कदम,लक्ष्मण राठोड,विष्णू राठोड सह अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाची दुसरि केंद्रीय बैठक दिल्ली मध्ये संपन्न

0

 

आज दि. १६/१०/०२२ रोज रविवारला दुपारी १ वाजता न्यु महाराष्ट्र सदन, न्यू दिल्ली या ठिकाणी, मा. संस्थापक अध्यक्ष श्री. खुशालजी बोपचे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थिती मा.श्री अजयजी चौधरी मा. श्री खेमचंद कोली, मा. श्री. विनोद कुमार बिन्नी व राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाची दुसरि केंद्रीय बैठक घेण्याचे उद्दिष्टे असे की सर्वप्रथम संघटन बांधनि करणे, वेगवेगळ्या राज्यामध्ये मुलभूत समस्या जानून घेणे, जात निहाय जनगनना लवकरात लवकर कसे कार विण्यात येऊ शकते. या विषयाला भर देण्यात आला. सत्ताधारी यांना विनंती अर्ज करण्यात यावा, या गोष्ट्रीवर भर देण्यात आला. यामध्ये शेतकारीचे मुद्दे आणि त्यांना पेन्सन संबंधी मुद्दयावर चर्चा करण्यात आली… सत्ताधारी विनंती अर्ज मान्य करत असेल तर वास्तविक दृष्ट्या, शेतकरिंचे, शेतमजुरांचे, ओबीसींचे, बहुजनांचे प्रश्न मार्गी लागतील आणि मान्य करत नसतील तर आता गल्ली पासुन दिल्ली पर्यंतची लढाई लढण्यासाठी मैदानात उतरण्याची तयारी करायचि हे सर्व संमतीने. सर्वानुमते ठरविण्यात आले,ओबीसी बहुजन महासंघा मार्फत वेळेवर आलेल्या इतर विषयावर चर्चाही करण्यात आली….या प्रसंगी उपस्थिती खालील प्रमाणे..श्री अरविंदजी खटाना श्रीमती सरीताताई जामनिक श्री गणेश पारधी श्री भुमेश्वर कटरे श्री क्रिष्ण आर नामा श्री एड् जयकुमार ठाकुर श्री राजेश सीह श्री संतोष त्रिपाठी श्री ईकबाल शेख श्री हेमंत यादव श्री अनीलकुमार वर्मा श्री डॉ एस एम गौतम श्री श्रीरामनिवाश श्री समीम अहमद श्री प्रभात मिश्रा श्री प्रनवप्रखर श्री दिपक राय श्री जी यु खान श्री के सी कोली श्री तिरतकुमार श्री मुहम्मद श्री नीतीश श्रीवास्तव श्री अशोक कुमार गुप्ता आदि मान्यवर उपस्थित होते..

आदिवासी बहुउद्देशीय विकास व शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन

0

 

दिनांक १७ ऑक्टोबर २०२२ रोजी संतोषी माता मंदिर खरांगना मोरांगना, वर्धा येथे आदिवासी विकास व शिक्षण बहुउद्देशीय संस्थेच्या मुख्य कार्यलयचा उद्घाटन समारंभ पार पडला.त्या निमित्ताने संस्थे च्या माध्यमातून आणि माधव नेत्रालय नागपूर याच्या साह्याने निशुल्क नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ अंदाजे 600 नागरिकांनी घेतला.
प्रसंगी छ. शिवाजी महाराज,भगवान बिरसा मुंडा, राणी दुर्गावती मडावी, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पर्पण करून अभिवादन करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी संस्थेचे सचिव श्री दीपक मडावी म्हणाले या संस्थेच्या माध्यमातून येथील नागरिकांना साठी स्किल डेव्हलपमेंट सेंटर, इंग्लिश स्पीकीईंग प्रशिक्षण आणि स्वयंरोजगार चे प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस आहे.संस्थेचे नाव आदिवासी विकास व शिक्षण संस्था असले तरी ही संस्था सर्वच समाजासाठी समजतील शोषित,पीडित,वंचितां साठी काम करेल.

अतिरिक्त आयुक्त आदिवासी विकास नागपूर हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. आपल्या भाषणात श्री. रवींद्र ठाकरे यांनी “ग्रामीण भागामध्ये कौशल्य आहे, परंतु त्याचा पुरेपूर वापर होत नाही. त्यासाठी कौशल्य विकास व त्यातून अर्थाजन यावर संस्था काम करत आहे ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. दीपक मडावी यांनी अत्यंत कमी वयात हे शिधनुष्य पेलले आहे.त्यांचे मी अभिनंदन करतो तसेच आदिवासी बांधवांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. आपण त्यांचा लाभ घ्यावा” “ग्रामीण भागातुन अत्यंत मोठे उद्योजक,संशोधक, अधिकारी झाले आहे त्यामुळे निराश न होता मेहनती आणि जिद्दी च्या जोरावर आपण यशस्वी होऊ शकता” असे सांगितले.

कार्यक्रमात मंचावर प्रामुख्याने मा.रवींद्रजी ठाकरे अतिरिक्त आयुक्त आदिवासी विकास नागपूर,मा.सौ.स्वाती सूर्यवंशी उपजिल्हाधिकारी वर्धा,मा.दीपकजी भेंडे माजी न्यायाधीश, मा. महादेवजी मडावी,संतोषजी मडावी, उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे सदस्य श्री.सतीश सिडाम यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडण्यासाठी सर्वश्री उमेश सावलकर,दिलीपजी येडमे, धनराज उईके,अविनाश उईके,दीपक इरपतकर,रवी कुरसुंगे,प्रफुल्ल कवरती व संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न केले.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांची नुकसान भरपाई द्या – माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

0

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट:- १८ ऑक्टो
माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांची जिल्हाधिकारी कडे मागणी.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांचे नुकसान भरपाई म्हणून सरकारने ०३ हेक्टर पर्यंत जाहीर केलेली मदत न दिल्याबाबत तसेच सरकारने शेतकऱ्याला घोषित केलेली अतिवृष्टीची मदत बँक ऑफ इंडिया हिंगणघाट व इतर शाखांनी पीक कर्जाच्या लोनमध्ये कपात करत असल्याबाबत माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा नेत जिल्हाधिकारी यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले. त्यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने रोष व्यक्त करण्यात आला.
खरिपाच्या हंगामात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून ऑक्टोबर महिन्याच्या आज मिती पर्यंत सततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिके जळाली. अतिवृष्टीमुळे नदी नाल्याचे पाणी शेतात साचल्यामुळे शेती खरडून गेली आणि काही शेतकऱ्यांच्या शेतात गाळ साचून पिके नष्ट झाली. त्यामुळे शेतकरी अंधकारमय चाकोरीतून वाटचाल करीत आहे.
सरकारने शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकाचे नुकसानीचा आढावा घेऊन ०३ हेक्टर पर्यंत मदत जाहीर केली परंतु वेळा येथील पटवारी श्री.कपूर यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर ०३ हेक्टरची मदत दाखविली नाही त्यामुळे ज्यांच्याकडे १० एकर,१५ एकर,२० एकर,२९ एकर जमीन अतिवृष्टीमुळे पिके नष्ट झाली त्यांना ०१ हेक्टर पर्यंत १३ हजार रुपयाची सरकारकडून जमा झाली. तर काहींना फक्त ०८ हजार १६० रुपये खात्यात जमा झाली.
अशाप्रकारे वेळा येथील पटवारी श्री.कपूर यांनी शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीपासून वंचित ठेवून सरकारची लफ्तरे वेशीवर टांगली आहे. तरी त्वरित सर्वे करून शेतकऱ्यांना घोषित केलेली सरकारची हक्काची मदत देण्यात यावी तसेच संबंधित पटवाऱ्याने शासकीय कामात दुर्लक्ष केले त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
तसेच काजळसरा येथील शेतकरी चोखाराम डफ यांना १७ एकर ७४ आर शेती असताना फक्त ०२ हेक्टरची मदत खात्यात जमा झाली. अशा अनेक शेतकरी या निष्काळजीपणामुळे मदतीपासून वंचित आहे.त्या गावला सौ.ढोक मॅडम या पटवारी असून त्यांनी सुद्धा सर्वे करून शेतकऱ्याला ०३ हेक्टर पर्यंत मदत दाखविली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना पूर्ण मदत झाली नाही.
तसेच बँक ऑफ इंडिया हिंगणघाट शाखेने काजळसरा येथील शेतकरी चोखाराम डफ व इतर शेतकऱ्यांची मदत पीक कर्जात कापून सरकारचे नियम धाब्यावर ठेवले आहे. तरी संबंधितावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. त्यावेळी नुकसानग्रस्त शेतकरी गुणवंत कामडी, सतीश सायंकार, चोखाराम डफ, वामन वरघणे, नागो भुते,सुभाष शेंडे, शंकर भुते,नारायण लोणकर, सुरेश नखाते ,बंडूजी वाघमारे, बादशहाराव नखाते,नामदेव लोणकर,रुपेश तळवेकर, नारायण नखाते,प्रवीण आत्राम, मधुकर गायकवाड,शोभा सायंकार,कृष्णा बोरकर,अभिलाष कामडी, सिद्धेश सायंकार,सुजल शेंडे,देवा शेंडे आदि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.