Home Blog Page 253

बोरगाव वैराळे येथे कोजागिरी निमित्त व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम ! बोरगाव वैराळे

0

 

प्रतिनिधी अशोक भाकरे

बाळापुर तहसिल अंतर्गत येत असलेल्या बोरगाव वैराळे येथे श्री जागेश्वर मंदिर सेवा समिती व स्थानिक ग्रामपंचायत चे सरपंच कल्पना विनायक वैराळे, उपसरपंच राजेश्वर वैराळे, सेवा सहकारी सोसायटी चे अध्यक्ष सदाशिव गावंडे यांच्या पुढाकाराने श्री जागेश्वर मंदिरात कोजागिरी निमित्ताने व्यसनमुक्तीवर आधारित हभप रामदास महाराज अवताडे,हभप हांडे महाराज हिंगोली भारुडाचा व संपूर्ण गावकऱ्यांसाठी सामूहिक कोजागरीचा कार्यक्रम ग्रामपंचायतीच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता
यावेळी हभप रामदास महाराज अवताडे यांनी दारू पिणाऱ्या व्यक्तीची हुबेहुब भुमिका करून गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते यातच दारुडयाच्या पत्नीची भुमिका हांडे महाराज यांनी वठविली दारू चे व्यसन करणाऱ्या व्यक्तीचे घर कसे उध्वस्त परिवाराचे काय हाल होतात दारूचे व्यसन किती वाईट हे हुबेहुब करून दाखविले आणि गावातील उपस्थित असलेल्या नवतरुण मंडळी कडून आयुष्यात कधीच दारूचे व्यसन करणार नाही याची शपथ घेतली तसेच आज कोजागिरी आहे तुमच्या गावचे सरपंच, उपसरपंच आणि गावातील कर्ती मंडळी गाव व्यसन मुक्त व्हावे यासाठी प्रयत्न करत आहे त्यामुळे सामूहिक कोजागरीचा कार्यक्रम ठेवला आहे हि बाब अभिनंदनीय असल्याचे प्रतिपादन यावेळी हभप रामदास महाराज अवताडे यांनी केले
या कार्यक्रमात सदाशिव गावंडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष विठ्ठलराव वैराळे, सामाजिक कार्यकर्ते विनायक वैराळे, रामराव शेळके, मंगेश वैराळे, बळीराम वैराळे, बाळू वैराळे, सुनील गावंडे, माणिकराव वैराळे,बाळू गोसावी, राजेश मात्रे, पुरूषोत्तम शेळके, विठ्ठल दुगाणे,श्रीदत्ता सुरतकार,नागोराव धांडे,रामा घाटे,प्रदीप वाकोडे, पांडुरंग बाहकर, रामभाऊ सुर्यवंशी, गजानन मात्रे, शंकर इंगळे, हरिभाऊ दांगटे, प्रमोद वैराळे, आशिष वैराळे, दिवाकर वैराळे, ज्ञानेश्वर शेळके, मनिष वैराळे, सागर डोंगरे,माणिकराव वानखडे, पुंजाजी अमरावते, विठ्ठल सुर्यवंशी, जानकीराम बांगर आदीसह बहुसंख्य पुरूष आणि महिला मंडळाचे सहकार्य लाभले हिंगोली येथील हभप हांडे महाराज यांच्या सोबत अजून दोन सहकारी यावेळी उपस्थित होते आणि त्यांनी देखील नववधू व लग्न होत नसलेल्या उपवराची भुमिका वठवून समाजात मुलींचा जन्मदर वाढविणे काळाची गरज असून आज पुरूष पेक्षा स्त्रियाची संख्या कमी असल्यामुळे अनेकांना बिन लग्नाचं रहावे लागत आहे हि परिस्थिती बिघडू नये म्हणून आताचं जागृत व्हावे लागणार आहे असा महत्त्वाचा संदेश देऊन कार्यक्रमाची सांगता कोजागिरी चे वाटप करून करण्यात आला

शिरतुन्नबी कमेटीचे वतीने ईदमिलादुनबी साजरी

0

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

. हिंगणघाट दि.१०/
जश्ने ईद मिलादुन्नबी मर्कजी शिरतुन्नबी कमिटीचेवतीने नातंखानी, तकरीर तसेच बालकांचा दिनी मुकाबल्याचे आयोजन करण्यात आले.
शहरात मुस्लिम बांधवांकडुन शहरातिल निशानपुरा ,गौतम वार्ड, पिली मस्जिद, सुभानिया मस्जिद , टाॅका मस्जिद, येथून जुलूस काढत रुबा चौक येथे एकत्र झाले.
स्थानिक रुबा चौक येथून शांतता पाळत सद्भावना तसेच बंधुभाव कायम ठेवीत शहराच्या प्रमुख मार्गाने जुलूस काढण्यात आला,या दरम्यान कारंजा चौक तसेच विठोबा चौक येथे मिठाई व आलू पोहा वितरित करण्यात आला.
यात रब्बानी स्पोर्टिंग क्लब तसेच गुलामाने मदिना कमिटी व इतर समाजसेवी युवकांच्या वतीने सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शहरात मुस्लिमबांधवांच्या प्रत्येक प्रभागात सजावटिचे आयोजन करण्यात आले होते .
या सजावटीला प्रतिसाद देऊन किड्स ब्राईट फ्युचर स्पोर्टिंग क्लब तर्फे प्रथम क्रमांक
निशाणपुरा R.B.N गृप,द्वितीय क्रमांक कादरी ग्रुप तर तृतीय क्रमांक अंजुमन गुलशन रजा कमिटी स्टेशनफैल,चतुर्थ क्रमांक मदनी ग्रुप चोखोबा वार्ड, पांचवा क्रमांक पाकीजा ग्रुप नन्नाशा वार्ड, याॅ ख्वाजा गरीब नवाज ग्रुप चोखोबा वार्ड यांना शील्ड देण्यात आले.
निशाणपुरा, जामा मस्जिद, नन्नाशा वार्ड, सुभानीया मस्जिद, विठोबा चौक येथे ठिकठिकाणी लंगरचे आयोजन करण्यात आले. यावेळी पोलीस प्रशासनाचे विशेष सहकार्य लाभले,पोलिस विभागाने सहकार्य केल्याबद्दल मर्कजी शिरतुन्नबी कमिटी हाजी तौसीफ, अब्रारभाई, मुबारक मलनस, मोबीन भाई, युनुस कुरेशी, शेख इम्रान, ताजू भाई , अज्जू मिर्झा,
अझहरभाई, आसिफ भाई, माहीन शेख, शेख इर्शाद इत्यादिच्यावतीने पोलिस प्रशासनाप्रती आभार व्यक्त करण्यात आले.
ईद मिलादुन्नबीच्या पर्वावर आयोजित जुलूससोबत मागे असलेल्या युवकांचेवतीने रस्त्यावर झालेल्या केरकचऱ्याचे निर्मूलन करीत शहरातील नागरिकांसमोर आदर्श निर्माण केला,सदर स्वच्छता मोहिमेचे आयोजन मरहबा गृपचेवतीने
करण्यात आले.

शेतकऱ्यांना तात्काळ न्याय देऊन मागण्या मान्य करा,मनसेने केले रामनगर येथे रस्ता रोको आंदोलन,शासनाला दिला इशारा:

0

 

प्रतिनिधी:(जालना)तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची तात्काळ पाहणी करून मदत द्या व पिक विमा कंपनीने विमा तात्काळ मंजूर करा व ओला दुष्काळ जाहीर करावा.यासाठी दिनांक १३/०९/२०२२ रोजी निवेदन देऊन ही शासन-प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली नाही.या अनुषंगाने आज रामनगर येथे रस्ता रोको करण्यात आला.

जालना तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे.आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या सोयबीन,कापुस,तुर,मुग,उडिद,भुईमूग,ऊस व फळबाग तसेच द्राक्ष या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.तरी आता पिक विमा कंपनीने नुकसान भरपाई शंभर टक्के सरसकट शेतकऱ्यांना देण्यात यावी.राज्य सरकारने महाराष्ट्रतील शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच पंचनामे न करता शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट १,०००००रु.(एक लक्ष रुपये) नुकसान भरपाई म्हणून मदत जाहीर करा.असा तीव्र इशारा शासनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिला.

तसेच मनसे पदाधिकारी व शेतकरी बांधवांना पोलिस प्रशासनाने केली अटक व सुटका
यावेळी उपस्थित जालना जिल्हाध्यक्ष गजानन भाऊ गिते व तालुकाध्यक्ष कृष्णा खलसे,हरीदास लांडे जिल्हाध्यक्ष विधीकक्ष,श्रीकांत राठोड तालुका उपाध्यक्ष,राम कातकडे तालुका उपाध्यक्ष,सुनिल चव्हाण उपसरपंच,गजानन मगर,गजानन गायके,मच्छिंद्र चव्हाण,बाळु कावळे,रोहित व्येव्हारे,ऋषिकेश शिवंत,नागेश वाघमारे,कृष्णा गाडेकर,ओमकार गवळी,विलास घाटे,कृष्णा काटकर,वामन चौधरी,हरी लोंढे,मुक्तर सय्यद,अर्जुन नागवे आदी शेतकरी बांधव व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

प्रतिनिधी:तुकाराम राठोड,जालना

लक्झरी बस व टिपर मध्ये अपघात

0

 

अर्जुन कराळे शेगाव प्रतिनिधी

तालुक्यातील शेगाव खामगाव रोड वर टाकळी विरो या फाट्या जवळ लक्झरी बस व टिपर मध्ये अपघात, झाला असुन लक्झरी बस हि पुणे वरून शेगाव मार्ग अकोला जात होती, लक्झरी बस हि अकोला मनस्वी ट्रवल्स ची असल्याची माहिती समोर आली आहे, तर टिपर हे शेगांव येथील असलल्याची माहिती मिळाली असुन ते वाळु ने भरलेले होते व खामगाव ला जात होते, सकाळी अपघात झाला लक्झरी बस मधील प्रवासाना किरकोळ मार लागला असुन बस चे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, लक्झरी बस चा चालक जख्मी झाला आहे त्याला जवळच्या खामगाव सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे,

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त शिवसेना महिलांचे स्नेह मिलन (आढावा बैठक) कार्यक्रम

0

 

हिंगणघाट :- 9 ऑक्टोंबर
रविवारला ठीक दुपारी 12:00 वाजता शिवसेना हिंगणघाट शहर महिला पदाधिकारी व शिवसैनिक यांच्यातर्फे वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख श्री .बाळाभाऊ राऊत तथा पूर्व विदर्भ महिला संघटीका प्रा. शिल्पाताई बोडखे यांच्या आदेशाने तथा वर्धा जिल्हा समन्वयक डॉ.उमेश तुळसकर, तथा उपजिल्हाप्रमुख श्री.राजेंद्र खूपसरे ,तसेच महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका सौ. संगीता कडू ,कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष अनिताताई येवले, तालुकाप्रमुख सतीश धोबे, शहरप्रमुख सतीश ढोमणे, समद्रपूर येथील महिला उपजिल्हा संघटिका श्रीमती मंदाताई चौधरी यांच्या उपस्थितीत कोजागिरी पौर्णिमेनिमित्त महिलांचे स्नेह मिलन (आढावा बैठक) कार्यक्रम तुळसकर सभागृह येथे घेण्यात आला .कार्यक्रमात मुख्य अतिथी प्रा. शिवमती सिमाताई बोके महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड तथा प्राचार्य सौ. नयनाताई तुळसकर यांच्या प्रमुख व्याख्यान महिलांना लाभले. प्रास्ताविक सिमाताई गलांडे यांनी केले .व्यासपीठावर ज्येष्ठ नगरसेवक श्रीधर कोटकर यांनी सभेत सन 1966 पासून जन्माला आलेला शिवसेना पक्ष त्याचे बोधचिन्ह धनुष्यबान हे निवडणूक आयोग यांनी रद्द केले. चिन्ह गोठवले असले तरी माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्यासोबत हिंगणघाट येथील एकनिष्ठ महिला शिवसैनिक व पदाधिकारी संघटना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असे त्या ठिकाणी एकमताने निर्णय घेण्यात आला. भाजप सरकारने या देशाच्या स्वायत्त संस्था जसे ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग ,न्यायालय यांचा आधार घेतला असला तरी ,शिवसेना पक्ष हा न डगमगणारा आहे पुन्हा उभारी घेईल .तथा संभाजी ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष सौ . प्रतिभाताई पडोळे उपस्थित होते त्यांनीही सभेत मार्गदर्शन केले ,सौ .नीताताई धोबे यांनी हिंगणघाट नगरपरिषद मधील प्रश्न व कार्य याबद्दल महिलांना मार्गदर्शन केले,तसेच स्थानिक आमदार यांनी पैश्याच्या जोरावर लोकांना खरीदी करतो असा अहम त्यांना झाला आहे . तो तोरा या वेळेस दाखुन दयाचे आहे. तर मंदाताई चौधरी माजी जिल्हा परिषद सदस्या यांनी जिल्हा परिषदेतील ग्रामीण भागातील कार्य, प्रश्न व संघटन याबद्दल विस्तृत माहिती महिलांना दिली. त्यानंतर महिला जिल्हा संघटिका यांनी पक्ष संघटन बद्दल माहिती महिलांसमोर सांगितले .तसेच उपजिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे यांनी स्त्री शक्ती व शिवसैनिक मिळून काम करून पुढे आपण उद्धव साहेबांसोबत खंबीरपणे उभे राहून असेच कार्य करत राहू असे आश्वासित केले .वर्धा जिल्हा समन्वयक डॉ. उमेश तुळसकर यांनी सभेत मोलाचे मार्गदर्शन केले जिल्ह्यात शिवसेनेमध्ये समन्वय साधावा असेच पुढे कार्यक्रम महिलांचे मेळावे, आरोग्य शिबिर,कार्य -शाळा घेत राहा. कार्यक्रमात आभार प्रदर्शन तालुका संघटिका सौ .माधुरी खडसे यांनी केले . सूत्रसंचालन श्री प्रकाश अनासाने उपतालुकाप्रमुख हिंगणघाट यांनी केले. या कार्यक्रमात नगरसेवक मनीष देवडे, भास्कर ठवरे, सौ संगीता ताई वाघमारे, ,शंकर मोहम्मारे ,उप शहर प्रमुख संजय पिंपळकर, जयंत रोहनकर, शंकर झाडे ,गजानन काटोले, विभाग प्रमुख सचिन मुळे, मोहन तुमराम , अविनाश धोटे, रुपेश काटकर तसेच महिला पदाधिकारी सौ. नीलिमा मोहम्मारे, सौ राजेश्री देवडे, सौ. सारिका अनासाने,सौ. प्राची पाचखेडे, सौ. संगीता वाघमारे,सौ तुमराम ,आशाबाई टेकाम, सौ.रश्मीताई बाकडे,सौ. रुपाली धनवन,सौ. गीता क्षीरसागर, सौ. पांडे ताई, सौ. मुनघाटे,सौ. सुमित्रा पारधे,सौ.किरणताई खुरपडे, .विद्याताई बदाडे ,सौ. सुनीता सुपारे, सौ. स्वाती पिंपळकर ,सौ.मंगला ठेवरे,सौ. प्रियंका धोटे,सौ. मीना काटकर,सौ. धनश्री क्षिरसागर, सौ. सुवर्णा वैद्य,सौ. स्वेता मानकर,सौ. राणी काटकर,सौ. रजनी झाडे,सौ. वैशाली लालटेनवार,सौ. संजना मानकर, मंदा धोबे,सौ. संगीता चौधरी, सौ. भरती नाईक सौ. कलावती निखाडे,सौ प्रियांका मून,सौ. सुटे, सौ. प्रतिभा धोबे, सौ. रिटा बाराहाते, सौ. वनिता झिबल,सौ. पूजा आवारी,सौ. वर्षा धोबे,सौ. उज्वला भगत,सौ.शिल्पा होरे, सौ.वृषाली खुरपुढे,सौ. प्रतिभा गेडेकार,सौ. अरुणा झाडे,सौ. प्रियांका घोडे,सौ. कुंदा गिरडकर, सौ.नेहा शाहू, सौ. सुनीता तेलंग,सौ. मनीषा चौधरी, सौ. शीतल चौधरी,सुरेश चौधरी,मनोज मिसाळ, बंटी वाघमारे,दिगंबर दुरत,अनिल लालटेनवार, प्रफुल क्षीरसागर, दिनेश धोबे, मोहन तुमराम, रुपेश काटकर,नितीन वैद्य,भास्कर मानकर, अविनाश धोटे, गोवर्धन शाहू व समस्त महिला शिव सैनिक मोठया संख्येने उपस्तीत होते.

आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कर्ज प्रकरणे तात्काळ मंजूर करा.भाजपा जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बाबासाहेब कोलते यांची केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्याकडे मागणी:

0

 

(तुकाराम राठोड/जालना)

प्रतिनिधी:(जालना)आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कर्ज प्रकरणे मंजूर करण्यास राष्ट्रीयकृत व सहकारी बँका मराठा समाजातील तरुणांना कर्ज प्रकरणे मंजूर करण्यास हेतुपुरस्सरपणे टाळाटाळ करीत असून,तात्काळ कर्ज प्रकरणे मंजूर करण्याचे संबंधित राष्ट्रीयकृत व सहकारी बंकांचे व्यवस्थापक यांना निर्देश देण्याची मागणी भाजपा जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बाबासाहेब पाटील कोलते यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री मा.ना.डॉ.भागवत कराड यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.

केंद्रीय अर्थराज्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात कोलते यांनी म्हटले आहे की,मराठा समाजातील तरुणांनी उद्योग व्यवसाय सुरु करून स्वत:च्या पायावर उभे राहावे यासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापन करण्यात आली आहे.राज्य शासनाच्या मोठ्या प्रमाणात ठेवी राष्ट्रीयकृत बँकामध्ये ठेवण्यात येतात राष्ट्रीयकृत बँकांनी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाअंतर्गत दाखल केलेले कर्ज प्रकरणाचे प्रस्ताव तात्काळ मंजूर न करता राष्ट्रीयकृत बँकाचे व्यवस्थापक हे कर्ज प्रकरण मंजूर करण्यास तरुणांना टाळाटाळ करीत आहे.

आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या सुधारित योजना राबविण्याबाबत कौशल्य विकास व उद्योजकता विकास विभागाने दि.२१ नोव्हेंबर २०१७ रोजी शासन निर्णय काढून सूचना दिलेल्या आहेत,तसेच महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीमती सुचिता भिकाने हिने शाखा प्रबंधक,शाखा व्यवस्थापक,जिल्हा शिखर बँक यांना पत्र देऊन महामंडळाअंतर्गत येणारे कर्ज प्रकरणे मंजूर करण्याचे आदेश दिलेले असतानाही सुद्धा राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवस्थापक व बँक कर्मचारी हे मराठा तरुणांना उद्योग व्यवसाय करण्यापासून वंचित ठेवत आहे.आतापर्यंत मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातील तरुणांनी महामंडळाकडे ऑनलाईन प्रस्ताव दाखल केले व पुढील कार्यवाहीसाठी प्रस्ताव बँकेच्या व्यवस्थापकाकडे दिले.परंतु बँक व्यवस्थापकाच्या असहकार्यामुळे व हलगर्जीपणामुळे मराठवाड्यातील अनेक मराठा तरुणांचे कर्ज प्रस्ताव प्रलंबित आहे.

तरी तात्काळ आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडील कर्ज प्रस्ताव प्राप्त झालेल्या मराठा तरुणांना तात्काळ कर्ज प्रकरणे मंजूर करण्याचे संबंधित बँक व्यवस्थापकांना निर्देश देण्यात यावे.अशी मागणी भाजपा जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बाबासाहेब पाटील कोलते यांनी केली आहे.

आधी मैत्री नंतर लग्नाचे आमिष देऊन बलात्कार ,एकदा गर्भपात केलाच्या धक्कादायक प्रकाराने खळबळ पोलिसात गुन्हा दाखल

0

 

यावल तालुका (प्रतिनिधी) विकी वानखेडे

लग्नाची आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार करून गर्भपात केल्याचा धोक्कादायक प्रकार यावल तालुक्यातील उघडकील आला आहे . याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आली असून अटक करण्यात आली आहे

या बाबत अधिक माहिती अशी आहे की यावल तालुक्यातील एका गावात २२ वर्षीय तरुणी ही आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे गावात राहणारा निलेश पंढरीनाथ पाटील
याची तरूणीशा
२०२१ मध्ये ओळख निर्माण झाली व मैत्रित रूपांतर झाले. त्या नंतर तरुणीली निलेशने लग्राचे आमिष दाखवत तिच्या आजीच्या घरी आणि
त्यांच्या खळ्यात तरुणीवर जून 2022 पर्यंत वेळोवेळी वारंवार अत्याचार केला. या अत्याचारातून तरुणी गर्भवती राहिली ही माहिती निलेशला समजल्यानंतर त्याने तरुणीची इच्छा नसताना गर्भपात केल्याचा धोक्कादायक प्रकार समोर आला. दरम्यान,तरूणीने नातेवाईकांसह यावल पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी निलेश पाटील याच्या विरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास विभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे करीत आहे

नगर पंचायत संग्रामपुर व प्रहार जनशक्ती पक्ष च्या वतीने लंपि आजारावर उपचार करण्यास सुरवात

0

 

आज दिनांक 9/09/2022 रोजी संग्रामपूर शहरातील लम्पी या संसर्गजन्य आजार झालेल्या पशुवर उपचारकरण्यास सुरूर्वात करण्यात आली…
नगर पंचायत संग्रामपूर व प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने लमपी संसर्गजन्य रोगांपासून पशू चा संरक्षण करण्यासाठी एक लाख रुपयांची औषधी खरीदी करुण सर्व पशुपालकाच्या घरी जाऊन मोफत उपचार करून घेण्यात आले….

या वेळी प्रमुख अतिथी म्हणून पशुसंवर्धन आयुक्त डॉ राजकुमार रायजुरे, तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ तलोकार , तालुका पशुसंवर्धन विस्तार अधिकारी डॉ इंगळे,पशुसंवर्धन अधिकारी डॉ शेंडे साहेब, संग्रामपूर मित्र परीवाराचे संस्थापक अध्यक्ष तथा न प गट नेता आरोग्य सम्राट मा शंकर भाऊ पुरोहित, सह न प चे सर्व सभापती, सर्व नगरसेवक, संग्रामपूर मित्र परीवार प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व सदस्य उपस्थित होते….. आज लंपि आजारावर 210 पशुवर प्रथमोपचार करण्यात आले……
संपूर्ण महाराष्ट्रत असा उपक्रम कोणीच केला नाही संग्रामपूर नगर पंचायत ही प्रथम नगर पंचायत आहे ज्यांनी मुक्या जनावरांचा असा उपक्रम हाती घेतला असे गौरवदगार पशुसंवर्धन आयुक्त डॉ राजकुमार रायजुरे यांनी बोलतांना व्यक्त केले….

उपरोक्त सर्व प्रमुख अतिथीचे शाल श्रीफळ देऊन सर्व नगरसेवकाकडून स्वागत करण्यात आले……

शेतकऱ्यांनी तात्काळ पीक पाहणी करून घ्यावे,तलाठी एस.एम.खरात यांचे आवाहन:

0

 

प्रतिनिधी:(जालना)आज दिनांक 09/10/2022 रोजी रविवारी एस.एम.खरात साहेब तलाठी सावंगी तलाव,पाहेगाव,दहिफळ,साळेगांव आदी गावांमध्ये शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून पिक पाहणी करण्यासंदर्भात आवाहन केले आहे.तसेच काही शेतकऱयांना स्वतःच्या मोबाईल द्वारे पिक पाहणी करण्यासंदर्भात मार्गदर्शन आहे.तसेच दिनांक 15/10/2022 रोजी पिक पाहणी करण्याची अंतिम तारीख असून शेतकऱ्यांनी तात्काळ करून घ्यावे अशी आवाहन खरात साहेब यांनी केले आहे.यावेळी एस.एम.खरात(तलाठी),चंद्रकांत कळकुंबे,तुकाराम राठोड(पत्रकार),सखाराम मुळे,गजानन उगले,संजय रंधवे व काही शेतकरी बांधव उपस्थित होते.

प्रतिनिधी:तुकाराम राठोड,जालना

हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे बनावट उत्पन्नाचे प्रमाणपत्र तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

0

 

हिंगणघाट :- दि. 3 ऑक्टोंबर ला अर्जुन पवार (नायब तहसीलदार) यांनी केलेल्या तक्रारीवरून श्री. भारत नथ्थुजी महाकाळकर रा. हिंगणघाट यांचा मुलगा आदीत्य नारायण महाकाळकर यांनी दि. 19/09/2022 रोजी नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र मिळणेकरीता ऑनलाईन अर्ज सादर केलेला आहे. सदर अर्जाची पडताडणी दि 27/09/2022 रोजी या कार्यालयाव्दारे करतांना अर्जदाराने अर्जासोबत सादर केलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र क्र 40214455131 ची पडताडणी www.mahaonline.gov.in या संगणकीय स्थळावर केली असता सादर केलेल्या उत्पन्नाच्या प्रमाणपत्रावरील बारकोड हा पुरुषोत्तम बळीराम बुचके या व्यक्तीच्या नावे असून त्या व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे. त्यामुळे अर्जदाराने सादर केलेले प्रमाणपत्र हे बनावटी असल्याने कलम 465, 468, 471 भा.द.वी. अन्वये गुन्हा नोंद केला. पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे.

सोमनाथ टापरे (पोलीस उपनिरीक्षक तपास अधिकारी ) :- प्रतिनिधी यांनी माहिती घेतली असता सध्या पोलीस बंदोबस्त मध्ये व्यस्त आहे . ज्या ग्रामदूत मध्ये ऑनलाईन उत्पन्न काढले त्या ग्रामदूत वर सुद्धा कारवाई करून गुन्हा दाखल करू