Home Blog Page 252

इराणी टोळीतील विदेशी नागरीक डी.बी. पथका कडुन अटक 9,54133 रू. चा माल जप्त,

0

 

 

सचिन वाघे हिंगणघाट

हिंगणघाट :- 12 ऑक्टोंबर
भारत देशातील विविध राज्यातील एकुन 10 गुन्हे उघड.
दि. 06/10/2022 रोजी फिर्यादी शासकिय कर्तव्यावर हजर असतांना त्यांना पोलीस निरीक्षक हिंगणघाट के. एम. पुंडकर यांनी माहिती दिली कि. धोत्रा कडुन हिंगणघाट कडे एक सिल्वर रंगाची स्विफ्ट डिझायर कार क. KA-02 MK-0744 येत असुन त्यामधे एक संशयीत ईराणी आरोपी असल्याची माहिती मिळाल्याने पोलीसांनी हैद्राबाद नागपुर नॅशनल हायवे क. 44 (7) वरील महाकाली नगरी, येथे हैद्राबाद कडुन नागपुर कडे येणाऱ्या रोड वर नाकाबंदी करीत असता नमुद कार ही भरधाव वेगाने हैद्राबाद कडुन नागपुर कडे येतांना दिसली.

करीता नमुद कर्मचारी यांनी संपुर्ण रस्ता लगेच बॅरीकेड ने बंद केला आणि कारला थांबवण्याचा प्रयत्न केला. सदर कारच्या चालकाने त्याच्या ताब्यातील गाडी थांबवुन पळुन जाण्याच्या उददेशाने गाडी वळवली आणि यातील फिर्यादी यांच्या गाडीला जिवे मारण्याच्या उददेशाने धडक देवुन त्यांना जखमी केले आणि गाडीचे नुकसान केले. कर्तव्यावर हजर असलेले कर्मचारी पोहवा शेखर डोंगरे, नितिन राजपुत, नापोशि निलेश तेलरांधे, अझहर खान, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, सचिन भारशंकर यांनी नमुद गाडीची बॅरीकेड्सच्या मदतीने अडणुक केली आणि आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपी विरूद्ध पोलीस स्टेशन, हिंगणघाट येथे गुन्हा दाखल करून त्याच्या ताब्यातुन बनावट नबंर प्लेट ची स्विफ्ट डिझायर कार क. KA-02-MK-0744 सह विदेशी चलनाच्या नोटा, मोबाईल व इतर इलेक्ट्रानिक महागडया वस्तु असा एकूण जु.कि. 9,54133 रू. चा माल जप्त करून त्याचा मा. विदयमान कोर्टातुन पिसिआर घेतला असता, तपासात सदर आरोपी हा इराण देशाचा रहीवासी असुन त्याने भारतात मध्य प्रदेश, कनार्टक, रत्नागिरी, पुणे, चिमुर, वरोरा, वर्धा व विविध ठिकाणी हात चलाखीचे गुन्हे केल्याचे सिसिटीव्ही फुटेज व्दारे माहीती प्राप्त झाली आहे. तसेच सदर दाखल गुन्हयातील एफ.आय.आर. प्राप्त करण्यात आल्या आहे. सदर आरोपीने भारतात 10 गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन इतर ठिकाणी आणखी गुन्हे उघड येण्याची दाट शक्यता आहे.
सदरची कार्यवाही ही मा. श्री. प्रशांत होळकर पोलीस अधिक्षक साहेब, वर्धा, मा. यशवंत सोळंके, अपर पोलीस अधिक्षक, वर्धा. मा. श्री. दिनेश कदम उपविभागीय पोलीस अधिकारी सा. हिंगणघाट, कैलाश पुंडकर, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात प्रशांत पाटणकर सहा. पोलीस निरीक्षक हिंगणघाट, डी.बी. पथकाचे पोहवा शेखर डोंगरे, नापोशि निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, सचिन भारशंकर, वाहतुक शाखेचे पोहवा नितिन राजपुत, नापोशि अझहर खान, व पोहवा जगदीश चव्हाण यांनी केली.

मुलाने बनावट स्टोरी केली अपहरणची ची घटना घडली नाही

0

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट :- शहरात लहान मुलांचे अपहरण करणारी टोळी आली आहे अशी अफवा मोठ्या प्रमाणात पसरली आहे त्यामुळे ग्रामीण ,शहरी भागातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तालुक्यात मागील अनेक दिवसापासून सोशल मीडियावर मुलांचे अपहरण करणारी टोळी शहरात आली आहे. लहान मुलांचे अपहरण करून नेत असल्याचे मेसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत आहे . यामध्ये पुरुष व महिला असून
हे लहान मुलांचे अपहरण करत आहे. या टोळ्यापासून मुलांना धोका असल्याचे सांगत असून लहान मुलांना सांभाळण्यात यावे असे सांगितले जात असल्याने शहरातील तसेच ग्रामीण भागातील पालकांमध्ये दहशत निर्माण होऊ लागली आहे मात्र प्रत्यक्षात मुलांना पळून नेणारी अशी कुठलीही टोळी सक्रिय असल्याचे समोर आलेले नाही ,विदर्भात अनेक शहरात लहान मुलं मुलीचे अपहरण होत आहे . अशा अफवा होत आहे

श्री कैलास पुंडलिकर ( पोलीस निरीक्षक हिंगणघाट) दि. 10 ऑक्टोंबर ला मुलांच्या पालकांची तक्रार आम्ही घेतली . झालेल्या घटनेची ची चौकशी केली असता , मुलाने बनावट स्टोरी केली अपहरणची घटना दिसून येत नाही.

गट ग्रामपंचायत मोरगाव भाकरे येथे जेतवन बौद्ध विहार मध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाची सांगता समारोह समारंभ आणि सत्कार समारंभ संपन्न

0

 

प्रतिनिधी अशोक भाकरे

मोरगाव भाकरे येथे बुद्ध
आणि त्यांचा धम्म ग्रंथाचा सांगता समारोप करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ सुनदा ताई जंजाळ ह्या होत्या.उमाताई माळी सरपंच उपस्थित होत्या.प्रमुख पाहुणे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे अकोला जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती आकाश शिरसाट ,जिल्हा सुकाणू समिती सदस्य दिनकर खंडारे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला अकोला तालुका अध्यक्ष किशोर जामनिक अकोला तालुका महासचिव शरद इंगोले अकोला तालुका प्रसिद्धीप्रमुख मोहन तायडे अकोला पंचायत समिती उपसभापती आनंद डोंगरे तालुका प्रसिद्धीप्रमुख राजकुमार क्षीरसागर ,अतिश शिरसाठ सचिन शिरसाट , संदीप शिरसाट नीलेश सोनाग्रे सर्व प्रमुख पाहुण्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभु जंजाळ गुरुजी प्रत्रकार सदानंद सिरसाठ ग्रामपंचायत सदस्य मिलिंद खंडारे शुद्धधन शिरसाट, हर्षद जंजाळ शेषराव जंजाळ भगवान जंजाळ अंकुश जंजाळ एस पी जंजाळ दीप जंजाळ अंकुश जंजाळ, बबलू जंजाळ, संतोष जंजाळ किरण खंडारे भास्कर जंजाळ, दिलीप जंजाळ बाबाराव जंजाळ, सदाशिव जंजाळ व गावातील सर्व उपासक आणि उपासिका सर्व नागरिक उपस्थित होते

संत शिरोमणी आचार्य श्री विद्यासागर जी गुरुदेव यांच्या अवतरण दिनानिमित्त शिरपूर यात्रा

0

 

श्री दिगंबर जैन युवक मंडळ (सैतवाल) व महिला शाखेच्या वतीने आचार्य श्री विद्यासागर जी गुरुदेव यांच्या अवतरण दिनानिमित्त भगवान श्री १००८ अंतरिक्ष पारसनाथ शिरपूर तीर्थक्षेत्र येथे सर्व गुरु भक्तांसाठी यात्रा काढण्यात आली. महिला शाखेला अवतरण दिनानिमित्त गुरुभक्ती, गुरुपूजनाचा विशेष लाभ मिळाला आणि गुरुदेवांचा आशीर्वाद मिळाला. सर्व गुरु भक्तांनी मोठ्या उत्साहात पूजा करून गुरुदेवांचा आशीर्वाद घेतला. सर्व गुरू भक्तांना शिरपूर तीर्थ क्षेत्रासह भातकुली तीर्थ क्षेत्राचा दर्शनाचा लाभ मिळाला. सर्व भक्तांचे स्वागत सत्कार श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. मंडळांचे अध्यक्ष विनय सावळकर व कार्यवाह प्रशांत भुसारी यांनी ही धार्मिक यात्रा यशस्वी केल्याबद्दल संपूर्ण कार्यकारिणीचे कौतुक केले. महिला शाखा अध्यक्षा प्रतिभाताई नखाते व त्यांच्या सर्व कार्यकारिणींचे यात्रा यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य लाभले. संचालन राजेश जैन तर आभार अविनाश शाहकार यांनी मानले. किशोर महात्मे, सुनील भुसारी, उमेश फुलंबरकर,संजय भरडे,सावळकरजी, विनोद उबाळे,अनिल महात्मे,मायाताई सावलकर,भारती उबाळे,नीता भुसारी, जयश्री भुसारी, मनीषा सावलकर, अर्चना शाहकार, वैशाली मानेकर, माधुरी भुसारी, विना झवेरी, संध्या काळे , स्मिता महात्मे , रुपाली फुलबारकर , माधुरी बोबडे , अरुणा पळसापुरे यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.
सुर्या मराठी न्यूज़ साठी उमेश सावळकर नागपुर

संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने विजयादशमी निमित्त स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न:

0

 

(तुकाराम राठोड/जालना)

जालना संभाजी ब्रिगेड महीला आघाडी च्या वतीने विजयादशमी निमीत्ताने स्नेहमीलन कार्यक्रम संपन्न,या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेष कोषाध्यक्ष संतोषजी गाजरे,प्रमूख मार्गदर्शीका म्हणून जालना सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती निशाताई बनसोड,प्रमूख ऊपस्थीती संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचीव दत्तात्रय कपाळे,संभाजी ब्रिगेड महीला आघाडी जिल्हाध्यक्षा श्रीमती दीपालीताई दाभाडेपाटील,जिल्हासचीव शिलाताई म्हस्के,जालना शहराध्यक्षा सूवर्णाताई राऊत,जिल्हासंघटक संतोष चाळसे, दीलीपराव गायकवाड,यांची ऊपस्थीती होती कार्यक्रमाचे प्रास्तावीक जिल्हाध्यक्षा दीपालीताई दाभाडे यांनी तर सुत्रसंचालन शिलाताई म्हस्के तर आभार सूर्वणाताई राऊत यांनी केले कार्यक्रमास जालना तालूक्यातील अनेक गावातील महीलांची उपस्थीती होती.

जालना तालुक्यातील रामनगर,नेर,शेवली शिवारातील कपाशी पिक व सोयाबीन जमीन दोस्त,पंचनामा करून,मदत करण्याची युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संजय डोंगरे यांची मागणी

0

 

प्रतिनिधी:(जालना)दिनांक ११/१०/२०२२ रोजी जालना तालुक्यातील रामनगर,नेर,शेवली परिसरामध्ये मुसळधार पाऊस व चक्रीवादळामुळे परिसरात कपाशी,सोयाबीन आणि तुर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.मौजे बाजीउम्रद,पारेगांव,जैतापूर, दहिफळ,सावंगी तलाव व अनेक गावांमध्ये व परीसरात अचानक दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत वीजा सहीत मोठया प्रमाणात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला.काढणीला आलेल्या सोयाबीन,कापूस व तुरीचे तसेच नेट चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.व कपाशी जमीनदोस्त झाली आहे.तसेच अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे हाता-तोंडाशी आलेला घास डोळ्यासमोर हातातुन जात असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.सदरील झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच चक्रीवादळामुळे झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी.जेणे करून शेतकऱ्यांवर आलेल्या संकटावर थोड्याफार प्रमाणात मदत होईल.अशी मागणी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संजय डोंगरे यांनी प्रशासनाकडे केली आहे.

प्रतिनिधी:तुकाराम राठोड,जालना

जालना महापालिकेसाठी हिंदू महासभेचे “जागर महापालिके”चा लक्षवेधी आंदोलन!- हिंदू महासभेच्या आंदोलनामुळे काहींच्या पोटात पोटशुळ उठले- माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर.

0

 

(तुकाराम राठोड/जालना)

प्रतिनिधी:(जालना)महानगरपालिका निर्माण करून नागरिकांना दर्जेदार मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या यासाठी अखिल भारत हिंदु महासभेच्या वतीने “जागर महापालिकेचा” लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.या आंदोलनास राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला.अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने शहरातील वीर सावरकर चौक येथे(दि.11 ऑक्टोंबर 2022)रोजी प्रदेश संघटन मंत्री धनसिंह सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पारंपारिक वाद्यासह जागर महापालिकेचा हे लक्षवेधी आंदोलन केले.याप्रसंगी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी आंदोलकास आश्वासन दिले की,जालना नगरपालिकेला महानगरपालिकेचा दर्जा देण्यासाठी स्वतःप्रयत्नशील असून,लवकरच मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन हिंदू महासभेचे निवेदन सुपूर्द करून त्यांचे या प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष वेधनार असल्याचे सांगितले.

तर माजी उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या सोबत चर्चा करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ जालना शहरातील नागरिकांच्या समस्या निराकरण करणे व विविध बाबतीत नगरपालिकेची यंत्रणा अपुरी पडत असल्यामुळे जालना महापालिकेची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आनुन देणार असल्याचे सांगीतले.यावेळी सराफा असोसिएशनचे अध्यक्ष महेश दुसाने,भाजपाचे नेता सिद्धिविनायक मुळे व वीरेंद्र प्रकाश धोका यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी हिंदू महासभेचे धनसिंह सूर्यवंशी यांच्या लक्षवेधी आंदोलनाचे कौतुक करुन जाहिर पाठिंबा दिला.

या प्रसंगी श्री सुर्यवंशी म्हणाले की,जालना नगर परिषदेला महानगरपालिकेचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी हिंदू महासभेचा संघर्ष सुरूच राहील.लवकरच मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन जालना नगरपालिकेला महानगर पालिका दर्जा देने का आवश्यक आहे.याचे सविस्तर मुद्यांसह भुमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगीतले.सदरिल आंदोलनास लहुजी शक्ती सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष सचिन शिरसागर,मराठा महासंघाचे अशोक पडुळ,जय भीम क्रांती सेनेचे दीपक बोर्डे यांनी पाठिंबा दिला.

आंदोलकांमध्ये सर्वश्री ईश्वर बिल्होरे,कालुसिंह राजपूत,तुकाराम मिसाळ,रमेश सातपुते,सुखलालसिंह राजपूत,विनोद आठवे,नारायण त्रिंबके,शिवप्रसाद राठी,देवीसिंग वर्मा,किशोर माधोवाले,राजुसिंग राजपूत,किशोर राजपूत,देवचंद सावरे,मगनसिंग राजपूत,नरेंद्र वलेचा,नरेश राजपूत,अशोक भगुरे,रामधन राजपूत,किशोर राजपूत,पवन राजपूत,आदित्य राजपूत,मदन खाकीवाले यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंदू महासभेने जालना महानगरपालिका व्हावे हे आंदोलन सुरू केले मात्र हे मागणी मी यापूर्वी केली आहे. काही लोकांना कळत नाही स्वतःचा मलिदा वाचण्यासाठी प्रयत्न करीत आहे.जिल्हाधिकारी कमिशनर यांनी हा प्रस्ताव पुढे नेला पाहिजे.ठराविक लोकसंख्या झाल्यावर महानगरपालिका प्राप्त होते.काही लोक सांगतात कर वगैरे वाढेल असं काही नाही.आय एस दर्जाचा अधिकारी येईल.जालना नगरपालिका भ्रष्टाचार पूर्ण झालेला आहे.यासाठी जालना महानगरपालिका झाली पाहिजे.असा आरोप माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यावर नाव न घेता टिका केली आहे.

तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथराव शिंदे असताना जालना महानगरपालिकेची घोषणा केली होती.मात्र अद्यापही अमलात आली नाही.जालना महानगरपालक व्हावी यापूर्वी देखील मागणी केली होती.मात्र केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट घेऊन जालना महानगरपालिका साठी प्रयत्न करू असे आश्वासन भाजपचे शहराध्यक्ष राजेश राऊत यांनी बोलताना सांगितले आहे.

रोटरी क्लब कडून संजय गांधी विद्यालय (परडा ) ला सिलिंग फॅन भेट

0

 

हिगंणघाट:- रोटरी क्लब तालुका स्तरावर कार्य करणारी संस्था असुन नेहमीच तालुक्यात असलेल्या शाळांना आवश्यक असणार्‍या वस्तु भेट देत असते.
शासनामार्फत शाळेला मिळनारे अनुदान फार तोकडे असते त्यामुळे विद्यार्थांना आवश्यक असणार्‍या सोई पुरवु शकत नाही त्यामुळे रोटरी क्लबने पुढाकार घेउन शाळेला तिन सिलिंग फॅन भेट दिले.
कार्यक्रमासाठी मंचावर रोटरी अध्यक्ष पराग कोचर शाकिरखान पठाण प्रा.अशोक बोंगिरवार डाॅ.सतिश डांगरे ,भुपेंद्र शहाने, दिगाबर खांडरे होते. आपले मनोगत व्यक्त करतांना भुपेंद्र शहाणे यांनी शिक्षकानी विद्यार्थाना घडविने म्हणजे कुभंराने ओल्या मातीच्या गोळ्याला आकार देण्यासारखे आहे.
.अध्यक्ष पराग कोचर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक मुळे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले

संत नगरी शेगाव येथे १५ व १६ ऑक्टोबर रोजी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा

0

 

अर्जुन कराळे शेगाव प्रतिनिधी

शेगाव (प्रतिनिधी ) जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमांतर्गत अंनत श्री विभूषीत जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज, जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम यांच्या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळया चे आयोजन शनिवार दि. १५ व रविवार दि. १६ ऑक्टोबर रोजी श्री गणेश प्रस्थ मंगल कार्यालय, पुरुषोत्तम हरी पाटील नगर, एम. एस. ई. सी. बी. चौक खामगाव रोड, संत नगरी शेगांव जि. बुलढाणा येथे सकाळी ९ वाजता आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पश्चिम विदर्भ पीठ प्रमुख श्री कुंडलिकराव वायभासे, व्यवस्थापक श्री सुरेश मोरे यांनी एका प्रसिध्दी प्रत्रकाद्वारे दिली आहे.
कार्यक्रमाच्या अनुषंगाने संस्थानाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात जसे की, ग्रामस्वच्छता अभियान, शैक्षणिक उपक्रमांतर्गत इंग्रजी माध्यमांची मोफत शाळा, वैद्यकीय उपक्रमांतर्गत मोफत दवाखाना, मोफत रुग्णवाहिका सेवा – महाराष्ट्रात विविध महामार्गावर 37 रुग्णवाहिका 24 तास अखंडपणे अपघातग्रस्तांच्या सेवेत कार्यरत आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे पुनर्वसन, महिला सक्षमीकरण, आपत्कालीन मदत उपक्रम, कायदेविषयक साक्षरता शिबिरे, ब्लड इन नीड, रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात.
या कार्यक्रमासाठी पश्चिम विदर्भ पिठ अंतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुकाप्रमुख व सर्व सेवाकेंद्र सदस्य, आरती केंद्र सदस्य व भाविक भक्त, साधक, शिष्य, हितचिंतक यांनी दि. १५ व १६ ऑक्टोंबर रोजी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांचा शुभ आशीर्वाद घेण्यासाठी संत नगरी शेगाव येथे उपस्थित रहावे. या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळयासाठी येणाऱ्या भाविकांसाठी कार्यक्रमाच्या दोन्ही दिवस महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. तरी या महन्मंगल समयी सर्व भाविकांनी उपस्थित राहून परम पूज्य जगद्गुरु श्रींच्या प्रवचनाचा व दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा. असे आवाहन पश्चिम विदर्भ पीठ प्रमुख, पीठ व्यवस्थापक, पिठ समिती सदस्य, जिल्हा निरीक्षक व जिल्हाध्यक्ष यांनी केले आहे.

मॅरेथॉन स्पर्धेत भिंगारा शाळेतील विद्यार्थ्यांचा दबदबा……यशाची परंपरा कायम.

0

 

बुलढाणा अर्बन फॉरेस्ट मॅरेथॉन स्पर्धा , बुलढाणा येथे आज दिनांक 8 ऑक्टोबर 2022 रोजी जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा भिंगारा तसेच निवासी वस्तीगृह भिंगारा येथील 14 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता…

त्यापैकी

बसंती सियाराम सस्त्या वर्ग सातवा या विद्यार्थिनींने 10 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे..

संतोष सोळंकी वर्ग सातवा याने पाच किलोमीटर मॅरेथॉन मध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे.

पूजा दिनेश राऊत वर्ग आठवा हिने पाच किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेमध्ये मुली मधून दुसरा क्रमांक पटकावला आहे.

वैशाली मुकेश खरात हिने मुली मधून तीन किलोमीटर मध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे.

शिवम टेटीराम राऊत वर्ग सहावा मुलांमधून तीन किलोमीटर मध्ये चौथा क्रमांक पटकावला आहे .

बक्षीस बक्षीस वितरणा दरम्यान विद्यार्थ्यांनी माननीय जिल्हाधिकारी रामामुर्ती साहेबांसोबत संवाद साधला…. त्याचबरोबर बुलढाणा अर्बन चे सर्वेसर्वा श्री राधेश्यामजी चांडक यांच्या सोबतही विद्यार्थ्यांनी संवाद साधला..

सदर स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना भिंगारा ते बुलढाणा ने आण करण्यासाठी वनविभागाची व्हॅन वनपरिक्षेत्र अधिकारी माननीय श्री किशोर पडोळ साहेब यांनी उपलब्ध करून दिली याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार…!

विद्यार्थ्यांची राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था उपवन रक्षक अधिकारी ,बुलढाणा माननीय श्री जायभाये साहेब यांनी वन विभागाच्या रेस्ट हाऊसला करून दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार..

विद्यार्थ्यांची मॅरेथॉन ची अगदी बालपणापासून तयारी घेणारे सलाईबन येथील सामाजिक कार्यकर्ता तसेच पर्यावरण प्रेमी आदरणीय मनजीत जी सिंग यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले तसेच विद्यार्थ्यासमवेत मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला त्याबद्दल त्यांचेही मनःपूर्वक आभार …

ज्यांच्या प्रेरणेतून आणि संकल्पनेतून विद्यार्थ्यांची स्किल बेस्ड प्रॅक्टिस चालू आहे असे आदरणीय गटशिक्षणाधिकारी फाळके साहेब यांचे सुद्धा खूप खूप आभार

सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे सुध्दा अभिनंदन आणि सहकार्याबद्दल आभार प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांना उलट्या व अशक्तपणा आला म्हणून 4/5 बक्षिसानी हुलकावणी दिली .. पुढच्या वेळेस हुलकावणी दिलेली बक्षिसे नक्कीच खेचून आणू..