Home Blog Page 260

नगर परिषद हिंगणघाट व वृक्ष मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने 2 ऑक्टोबर रोजी राबविणार खिळे मुक्त झाड अभियान

0

 

हिंगणघाट – नगर परिषद हिंगणघाट द्वारे सेवा पंधरवाडा निमित्त शहरामध्ये खिळे मुक्त झाड अभियान राबविणार असल्याची माहिती नगर परिषद तर्फे देण्यात आली. हे अभियान छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथून सुरु होणार असून सर्व प्रथम महात्मा गांधी यांचे पुतळयाला माल्यापण करून अभियान सुरु केले जाणार आहे अभियान यशस्वी करण्यासाठी नगर परिषद तर्फे वृक्ष प्रेमी / वृक्ष मित्र यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे…

29 ग्रा पं नी दिला नाही दिव्यांगांचा 5 % निधी 

0

 

 

जिल्हा प्रतिनिधी सतीश बावस्कर

बोदवड तालुक्यातील राष्ट्रीय विकलांग पार्टीचे प्रदेश अध्यक्ष धनराज गायकवाड यांनी 27 सप्टेंबरला बीडीओना निवेदन दिले त्यात तालुक्यातील ग्रामपंचायत मध्ये दिव्यांगांच्या पाच टक्के निधी वाटप न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला दिलेल्या निवेदनात दिव्यांग निधी तातडीने वितरित करणे संदर्भ क्रमांक 1 ते 12 मध्ये दिव्यांग बांधवांना पाच टक्के निधी वाटपाबाबत वारंवार सूचना आदेश व कारणे दाखवा नोटीस देऊनही अद्याप पर्यंत तालुक्यातील 29 ग्रामपंचायतीने कारवाई केलेली नाही हा निधी पंधरा दिवसाच्या आत वितरित करावा अन्यथा राष्ट्रीय विकलांग पार्टी कडून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला निवेदन देताना प्रदेशाध्यक्ष धनराज गायकवाड तालुका अध्यक्ष प्रविण वंजारी शहराध्यक्ष श्यामलाल लुंड प्रकाश चाकूरकर उपस्थित होते दरम्यान दिव्यांगांना निधी देण्याबाबत सूचना करण्याचे आश्वासन देण्यात आले

नवरात्री आणि नवं अवतार उत्सव नवरात्रीचा जागर विचारांचा …

0

 

विठ्ठल अवताडे बुलढाणा

धर्म शास्त्रानुसार आपण आज नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत असतो याबद्दल आक्षेप घेण्याचे किंबहुना किंतू परंतु असण्याचे कारण असूच शकत नाही. परंतु जगतगुरु तुकाराम महाराज ज्या प्रमाणे म्हणतात ,*सत्य सत्याशी मन केले ग्वाही मनियले नाही बहुमता* याच आधारे नवरात्री उत्सव आणि नवं दुर्गा उत्सव साजरा करताना आपण या जगाला नाही तर विश्वाला एक विचार देऊन ज्यांनी स्त्रियत्वाची कल्याणकारी प्रेरणा निर्माण करत काळानुसार त्या त्या वेळी घेतलेली भूमिका आणि त्या सोबत केले समर्पण ,त्याग , अन्याय विरुद्ध चे बंड आणि त्यातून घडलेली नवक्रांती हे आज प्रत्यक्ष जागर घडवून आणणे आणि उत्सव नवरात्राचा जागर विचारांचा असे म्हणतात येईल , आज गाव खेड्या पासून तर मोठ मोठ्या मेट्रो सिटी पर्यंत आपण हा उत्सव साजरा करत असताना कुठे आई जगदंबेचे मंदिर असतील तिथे नवरात्र उत्सव असतोच बऱ्याच ठिकाणी नवदुर्गा उत्सव मंडळ उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात या सोबतच थोडासा आपण वरील हेडलाईन् प्रमाणे विचार केला तर ?
आज नवरात्री उत्सव म्हणजे महिलांची खूप मोठी लगबघ असते मंदिरात असू दे नाहीतर मंडळात असू दे , त्यांचे उपवास , कलर कोड ड्रेस ,गरबा,आणि त्यांची भावपूर्ण भक्ती ,पण थोडंसं भक्ती शक्तीचा जर संजोग घडला तर आज समाजातील सोशीत, वंचित, पीडित ,महिलांना सक्षमता आणि आत्मनिर्भर होण्यास मदत होईल यात शंका नाही , आता भक्ती शक्ती चे दर्शन कसे घडेल ज्या प्रमाणे आई जगदंबेचे नवं अवतार म्हणून आपण वेगवेगळी रूपे आणि कथा ऐकल्या त्याच सोबत या नऊ दिवसात कर्तुत्वाने आणि आपल्या कार्याने महान असणाऱ्या क्रांतिकारी विचार घेऊन अवघे विश्वाची माझे घर म्हणत ज्यांनी तुमच्या माझ्या येणाऱ्या अनेक पिढ्यांच्या भविष्याचा विचार करून कार्य केले त्या कर्तृत्ववान स्त्रियांच्या विचारांचा जागर झाला तर आज समाजात बदल घडेल आणि त्यांनी केलेल्या कार्याला आपण मानवंदना देऊ यात दुमत नाही , जेव्हा जेव्हा दानवण या धरतीवर उत्मात करत तेव्हा तेव्हा आई जगदंबे ने त्यांचा नाश केला , हाच विचार घेऊन आपण भक्ती भावाने आज त्यांचे पूजन करतो ,तसेच आजच्या युगात जेव्हा जेव्हा या धरतीवर महिलांवर अन्याय झाले अत्याचार झाले येवढेच नाही तर एखादे साम्राज्य संपण्याच्या मार्गावर असताना क्रांतीची मशाल घेऊन याच स्त्रीने जेव्हा विचारातून क्रांती केली त्यांचा जागर या नऊ दिवसात होयाल पाहिजे की नाही हे आपण ठरवू शकतो, म्हणून आज आपण बघत आहोत सरकार ने महिलांना ५०% आरक्षण दिले , नव्हे तर महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज देशाच्या कारभारात उभ्या आहेत ,आज असे एक ही क्षेत्र नसेल त्यात महिला नसतील ,हे खूप अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे , पण आज ह्या सगळ्यात कुठे तरी कोणी महिला जळून मरत असेल , कुठे तरी मुलगी झाली म्हणून गर्भातच तिचा बळी जात असेल , कुठे तरी सासरी सासुरवास असेल , कुठे तरी एकट्या मुलीला बाहेर भीती वाटत असेल , कुठे बलात्कार घडत असेल तर कुठे जिवंत ही जाळले जात असेल तर आजची परिस्थिती बघून गरज आहे ती भक्ती शक्तींनी परिपूर्ण सक्षम आत्मनिर्भर बनण्याची त्यासाठी उत्सव नवरात्रीचा आणि जागर विचारांचा असे मी म्हटले आहे , आज गरबा ,असू दे नाहीतर त्यासोबत महिलांचे विविध खेळ असू दे यावर मी टीका करणार नाही कारण त्यांना ही कधी वेळ मिळायला हवा पण ,आज भक्तिभावाने हे व्रत करत असताना शक्तीभाव जागृत करण्याची अनुभूती कशी घडेल हे महत्त्वाचे आहे , मग आता विचार करू आपण भक्ती सोबत शक्तीचा आजही आपण सुखाने श्वास घेत आहोत आणि स्वराज्यात जगत आहोत या स्वराज्याच्या जननी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब ज्यांनी या देशाला एक नव्हे तर दोन छत्रपति घडून दिले ज्यांनी स्वतंत्र ,समता ,न्याय , बंधुता विचार रुजवून छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्य निर्मितीची प्रेरणा दिली नव्हे तर स्वराज्य स्थापन करण्यात फार मोलाचे योगदान देऊन सर्वसामान्याच्या मनात अन्ायाविरुध्द पेटून उठण्याची जिद्द ज्यांनी आमच्या मनामनात निर्माण केली त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ ,माझा पुत्र गेला तरी बेहत्तर पण सर्वसामान्यांचे स्वराज्य उभे झाले पाहिजे इथली प्रजा ही सुखी आणि समृद्ध निडर असावी असे स्वराज्य शिकवण देणाऱ्या स्वराज्य जननी राजमाता राष्ट्रमाता मासांहेब जिजाऊ यांना पहिला वंदन ,
चुल आणि मूल या अंधश्रधेतून बाहेर पडून ज्यांनी शिक्षणाची गंगोत्री प्रत्येकाच्या दारा पर्यंत पोहचून शिक्षणाचे महत्व पटवून दिले ,आज गावाचा कारभार करणाऱ्या सरपंच असो की देशाचा कारभार करणाऱ्या राष्ट्रपती असोत प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार दिला त्या साठी त्याग समर्पण करून शिक्षण रुपी अलंकार देऊन सक्षम केलं त्या सावित्रीमाई फुले ,यामापासून प्राण वाचवनाऱ्या सावित्री भक्तीच दर्शन तर शिक्षणाचे धडे देणाऱ्या सावित्रीमाई भक्तीच दर्शन होय ,
यशस्वी पुरुषा मागे एक कणखर स्त्री असते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे माता रमाई भीमराव ते बाबासाहेब हा खडतर प्रवास घडत असताना ज्या बाबासाहेबांसोबत ज्या खांद्याला खांदा लाऊन उभ्या होत्या त्या माता रमाई जेव्हा देशाचा कारभार बाबा साहेब करत होते तेव्हा त्यांचा सोन्याचा संसार करून त्याग समर्पण आणि परिस्थिती सोबत दोन हात करून खाबिर राहिल्या त्या माता रमाई यांना वंदन .
अनिष्ट्र रूढी परंपरा अंधश्रधदेला न जुमानता ,सती न जाता एका हातात शास्त्र तर एका हातात शस्त्र घेऊन २९ वर्ष राज्यकारभार चालवणारी स्त्री म्हणजे माता अहिल्या राणी होळकर ज्यांनी स्त्रियांची पहिली फौज उभारून त्यांना संरक्षणाचे धडे देऊन तटस्थ केलं असा गौरवशाली इतिहास घडवणाऱ्या माता अहिल्याबाई होळकरांना वंदन .
राजा संपला म्हणजे त्याचे राज्य संपते या वाक्याला पुरेपूर उधळून लाऊन औरंगजेबाचे नीच विचार तिने सह्याद्रीच्या मातीत तुडवले आपला मान अभिमान आणि स्वाभिमान ज्यांनी कायम ठेऊन ज्यांनी स्वराज्य पुढे नेले दिल्ली झाली दीन वानी दिल्लिषास गेलं पाणी राम राणी ताराबाई भद्रकाली कोपली ,शुर कर्तव्य दक्ष स्वराज्याच्या रणरागिणी महाराणी ताराराणी यांना वंदन .
रामा सोबत सीतेला १४ वर्ष वनवास घडला पण त्यापेक्षा जास्त २९ वर्ष स्वतःच्या आयुष्याचे अग्निकुंड करून निस्वार्थ आणि त्यागाची भूमिका असणारे उत्तम उदाहरण म्हणजे महाराणी येसूबाई छत्रपती संभाजी महाराज गडावर नसतानाही स्वराज्याची मान उंच ठेवणाऱ्या स्वराज्याच्या रणरागिणी महाराणी येसूबाईना वंदन .
एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचे पाय ओढते त्यापेक्षा एक स्त्री जेव्हा दुसऱ्या स्त्रीच्या मदतीला उभी राहते तेव्हा ती फातिमा शेख होते स्त्री शिकली म्हणजे पाप होते ही लोकांच्या बुध्दीला लागलेली कीड काढण्याचं काम करत स्त्री शिक्षणाचे महत्व समजून सावित्री माई सोबत ज्यांनी स्त्री शिक्षांतून आपला उद्धार केला त्या जगातील पहिला मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांना वंदन .
कधी आमच्यावर प्रेम करणारी जन्म देणारी आई होते तर कधी आमच्यावर संस्काराची पेटी बनणारी आजी होते कधी आमच्या सुख दुःखात साथ देणारी बहिण ,मैत्रीण होते तर कधी आमचे रुसवे फुगवे काढणारी आत्या किंवा मावशी होते ,प्रतेक घटकात विभागलेली ही स्त्री आमच्या साठी कायमच महत्त्वाची ,गृहिणी पासून तर रोज नात्यांच्या बांधनाना रोज नव्या आव्हानांना पेलते ही ही आहे म्हणूनच हे जग इतके सुंदर आहे अश्या सर्व कर्तृत्ववान स्त्री ला वंदन
ही काही ठराविक ज्वलंत उदराहान आहेत ज्यात भक्ती सोबत शक्तीचे दर्शन घडते ,आता जागर विचाराचा घालत असताना अश्या वैचारिक व्याख्यानमालेचे आयोजन असू दे किंबहुना अश्या असंख्य प्रेरणा दाई स्त्रियांचे उदाहरण नऊ दिवसात आपण कश्या पद्धतीने प्रचार प्रसार करू याचा प्रयत्न असू देत म्हणजे आज परिवर्तन घडेल यात शंका नाही , आज ऑफिस मध्ये काम करणारी स्त्री असेल आणि तिला तिथे काम करताना भीती वाटत असेल , आज एखाद्या रस्त्याने एकटी स्त्री जात असेल आणि तिची अब्रू लुटल्या जाऊन तिला मारणे असेल , त्याहूनही आज स्त्रीभ्रूण हत्या असेल तर आपल्या मधील एक मोठी अंधश्रद्धा असल्याचे जाणवते ,ज्या स्त्री ने आपले सौभाग्य घालवले त्यांना तर संसररुपी सर्वच गोष्टीपासून दूर कीव वेगळे ठेवले जाते ,आज नवरात्री उत्सव साजरा करत असताना आपल्याला कळायला पाहिजे ,एखादा शेतकरी आत्महत्या करून आपले जीवन संपवत असेल किंवा एखादा जवान आपली देश सेवा करताना शहीद झाला असेल किंवा एखादी विधवा स्त्री असेल तर त्या स्त्री चे आयुष्य ही संपल्या सारखेच असते म्हणजे त्यांना या सगळ्यापासून उत्सवात कुठे ही स्थान दिसत नाही , मग ती ही एक स्त्री आहे मग तिचा गौरव का म्हणून आपण करू नये हा प्रश्न सातत्याने मनात येतो ? *जगतगुरु तुकाराम महाराजांच्या उपदेशाप्रणने आज वेदात उपनिषधात म्हटल्या प्रमाणे आपण सगळे एकाच ब्रम्हतत्वतून निर्माण झालेले आहोत आणि शेवटी त्यातच विलीन पावणार आहोत तर हा भेदा भेद कशासाठी ,अवघी एकाचीच विन तेथे कैसे भिन्न भिन्न* तुकाराम महाराज यापुढे जाऊन असे ही म्हणतात *ब्राम्हण क्षत्रिय शूद्र वैश्य चांडाळा आहे अधिकार पाळे नरा नर आधी करून वेश्याही* सर्वांना नामसंकीर्तन करून परमेश्वरा जवळ जाण्याचा अधिकार आहे त्यामुळे आपण स्त्रियत्वात दैवी चे रूप बघत असु तर आयुष्यात त्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे आणि हा सन्मान नऊ दिवसाचं नाही तर कायम असायला हवा हे फार महत्त्वाचे आहे , परंतु आजही या जगात विरोधाभास आणि काही नीच विचाराचा म्हैशासुर मारण्यासाठी गरज आहे आम्हाला भक्ती सोबत शक्ती चा जागर घालण्याची , छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून आम्ही महाराष्ट्र बघत असू तर, एकटी मुलगी संधी नाही तर जबाबदारी आहे , क्षात्रूच्या सैन्यातील स्त्री ही आपली बहीण आहे हा विचार राजांनी आम्हाला दिला आहे , आई जगदंबेची तुळजाभवानीची ,शिवरायांनी केलेली भक्ती आणि शिवराय यांच्या विचारातून मिळालेली शक्ती हे आपल्याला प्रेरणादायी आहे , म्हणून हा भक्तीचा उत्सव शक्तीची साथ देऊन साजरा करता यावा , यासाठी कर्तृत्ववान महिलांचे सत्कार असतील , निराधार महिलांना. मदत असेल , मुलींना येणाऱ्या काळात स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कराटे , लाठी काठी , ड्रायव्हिंग , याहून पुढे जात गरजू आणि हुशार गरीब घरातील मुलींना शिक्षणासाठी मदत ,मुलींना विविध मार्गदर्शन शिबिर ,असे उपक्रम ही राबवणे ही काळाची गरज आहे , नवरात्रीचे शेवटच्या दिवशी नऊ कन्या जेवण करतात तेव्हा त्यांना शालेय साहित्य देऊन त्यांना प्रोत्साहन देणे , शहीद जवानाच्या पत्नीचा सत्कार असेल ,शेतकरी आत्महत्या ग्रस्थ महिलेचा सत्कार असो ,अश्या पद्धतीने खूप काही उपक्रम आपण राबवू शकतो , गरबा खेळणे , काही खेळ खेळणे आणि मोठे बँड लाऊन मिरवणुका काढणे हे ठीक आहे पण त्यासोबतच या विचारांचा जागर झाला तर ?
असो तूर्तास येवढेच की व्हिडिओ आणि आपल्या विचारांच्या माध्यमातून सगळे मांडणी करत असतात, पण काहीना कळतं तर काहींना कळून हि वळत नाही असो नवरात्रीचे औचित्य साधून वरील काही विचार आम्ही व्हिडिओ चे माध्यमातून प्रसारित केलेत त्यांना बरीच वाव मिळाली अनेकांनी स्टेटस ठेवले अनेकांना आवडले शेवटी आम्ही लेखनाच्या माध्यमातून यावर प्रकाश टाकला आणि आज लेखणी हातात घेतली , परंपरेतील सर्वच स्वीकारावं असा नसते, वेदांचा तो अर्थ अम्हसिस ठावां येरव्हणी वाहवा भार माथा असे तुकोबा राय लिहतात ,परंपरेत अडकून नबसाता अंधश्रध्देच्या बळी पडतात म्हणून परंपरे सोबत बदल ही आवश्यक असतो ,आणि थोडा काही बदल होऊन जर परिवर्तन होत असेल आणि ते ही आपल्या साठी सुखकर असेल तर आपण कानही करावं हा शेवटी प्रश्न ?
संकल्पना / व्हिडिओ
प्रगती पाटील मिरगे माटरगाव

विठ्ठल पाटील अवताडे शेगाव
लेखन / संकलन

जालना जिल्ह्यासह तालुक्यामध्ये सोयाबीन काढण्याची लगबग सुरू:

0

 

प्रतिनिधी:(जालना)जालना जिल्ह्यासह तालुक्यामध्ये सोयाबीन काढण्याची लगबग सुरू झाली आहे.एक-एकर मागे साडेतीन हजार ते चार हजार रुपये प्रति बॅग मजूर घेत आहे. मागील एक-दोन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.या वादळी वाऱ्यामुळे कपाशीचे फार मोठे नुकसान झाले होते.त्यामुळे हाता-तोंडाशी आलेल्या घास निसर्गाने हिरावून घेऊ नये,यासाठी शेतकरी वाटेल त्या भावाने मजुराला सोयाबीन कापणीला देत आहे.आज रोजी जालना मार्केट मध्ये सोयाबीन चार हजार ते चार हजार पाचशे क्विंटल जात आहे.त्यामुळे शेतकरी घाई-गडबडीने सोयाबीन कापणी करून मंळीयंतरातुन सोयाबीन काढुन घेत आहे.त्यामुळे शासनाने सोयाबीनला चांगल्या प्रकारे भाव द्यावा अशी मागणी सर्वसामान्य शेतकरी वर्गाकडून होत आहे. तसेच दिवसेंदिवस महागाई वाढल्यामुळे मजुराला तीनशे ते पाचशे रुपये रोजंदारी द्यावी लागते.तसेच बी बियाणे रासायनिक खते यांची सुद्धा भरमसाठ वाढ झाली असल्यामुळे शेतकऱ्याच्या हाती माल विकूनही पैसा टिकत नाही.यातच दवाखाना,घर खर्च,मुला-मुलींची शैक्षणिक खर्च या सगळ्या गोष्टींचा शेतकऱ्यांना सरासर विचार करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे व रासायनिक खताचे भाव कमी झाली पाहिजे अशी मागणी सर्वसामान्य शेतकरी वर्ग आपली भावना व्यक्त करीत आहे.

प्रतिनिधी-तुकाराम राठोड,जालना

बंजारा समाजाची काशी पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज यांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश:

0

 

प्रतिनिधी:(मुंबई)शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून आज बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज(पोहरादेवी) व राज्यातील बंजारा समाजाच्या प्रमुख सदस्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.आज पोहरादेवीची यात्रा आहे.तो मुहूर्त साधून मी शिवसेनेत प्रवेश करत आहे.असे गौरव उद्गार सुनील महाराज यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे.संपूर्ण राज्यातील बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात आणून,त्यांचा विकास घडविणे फक्त शिवसेनेलाच शक्य आहे,हे माझ्या लक्षात आले आहे.त्यामुळे मी शिवसेनेत प्रवेश केला आहे.असे यावेळी सुनील महाराज पोहरादेवी महंत म्हणाले आहे. मुंबई येथे मातोश्री येथील उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी एका कार्यक्रमात सुनील महाराज पोहरादेवी शिवबंधन बांधुन शिवसेनेत प्रवेश केला आहे.

चुंचाळे फाटा ते चुंचाळे गावा पर्यंतच्या रस्त्यावरील काही भागाचे झालेले डांबरीकरण हे निकृष्ठ प्रतिचे पैसा गेला पाण्यात

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील बु्ऱ्हाणपुर अंकलेश्वर मार्गाशी जोडलेला चुंचाळे फाटा ते चुंचाळे गाव या रस्त्याची अत्यंत दयानिय अवस्था झाली असुन या मार्गावरून वाहन चालविणे जिकरीचे झाले आहे, यातील काही रस्त्याचे मागील काही महिन्यापुर्वी डांबरीकरण करण्यात आले होते या रस्त्याची देखील ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट प्रतिच्या कामामुळे पुनश्च वाईट अवस्था झाली आहे . यावल तालुक्यातील चुंचाळे या गावा पासून ते चुंचाळे फाटया पर्यंतच्या मार्गा वरील सुमारे ४ किलोमिटर रस्त्यांची ठीकठीकाणी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे अत्यंत वाईट अवस्था झाली असुन , हा रस्ता दुरुस्ती व्हावा या मागणीसाठी काही सामाजीक संघटनांनी आंदोलने देखील केली होती . या आंदोलनामुळे या लोकप्रतिनिधीच्या आश्वासनानंतर या मार्गावरील ७०० ते८०० मिटरचा रस्ता सुमारे १४ लाख रूपये खर्च करून काही महीन्यापुर्वीच डांबरीकरण करण्यात आले होते , मात्र संबधीत ठेकेदाराने या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट प्रतिचे केल्याने हा रस्ता पुनश्च आपल्या जुन्या रूपात दिसु लागला असून, ठेकेदाराने केलेल्या अशा प्रकारच्या रस्ता डांबरीकरणामुळे शासनाचे १४ लाख रुपये पाण्यात गेल्याची संत्पत प्रतिक्रीया वाहनधारक व चुंचाळे गावातील व परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे . या रस्त्याची तात्काळ दखल घेत दुरूस्तीन झाल्यास काही दिवसात या मार्गाने येणारी एसटी बस व ईतर वाहनांची वाहतूक बंद होईत अशी अवस्था या रस्त्याची झाली आहे

जळगाव जिल्ह्यात नवीन कलेक्टर अमन मित्तल

0

 

विकी वानखड़े कार्यकारी संपादक

जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची नांदेड जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली असून त्यांच्या जागी लातूर महानगपालिका आयुक्त अमन मित्तल यांची नियुक्ती झाल्याचे आदेश रात्री उशिरा प्राप्त झाले. याबाबतचे आदेश प्रधान सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांच्याकडून जारी करण्यात आले आहेत.

 

गुरुवारी राज्य शासनाने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या. यात जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आज त्यांची बदली करण्यात आली आहे. तर अमन मित्तल हे आता जळगाव जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी असणार आहेत.

प्रकाश राऊत यांनी लहान मुला मुलींना पळून नेणारी टोळी हिंगणघाट शहरात सक्रिय झाली अशी माहिती उघड केली

0

हिंगणघाट :- सध्या शहरात
लहान मुलांना पळून नेणारी टोळी आली आहे अशी अफवा मोठ्या प्रमाणात पसरली आहे त्यामुळे ग्रामीण ,शहरी भागातील नागरिकांना मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तालुक्यात मागील अनेक दिवसापासून सोशल मीडियावर मुलांना पळून नेणारी टोळी शहरात आली आहे. लहान मुलांना पळवून नेत असल्याचे मेसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल असून यामध्ये पुरुष व महिला असून
हे लहान मुलांचे अपहरण करत आहे. या टोळ्यापासून मुलांना धोका असल्याचे सांगत असून लहान मुलांना सांभाळण्यात यावे असे सांगितले जात असल्याने शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण होऊ लागली आहे मात्र प्रत्यक्षात मुलांना पळून नेणारी अशी कुठलीही टोळी सक्रिय असल्याचे समोर आलेले नाही परंतु ही गोष्ट सत्य आहे अशी माहिती प्रकाश राऊत माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते यांनी या प्रकरणातील सत्यता समोर आणली त्यांनी प्रतिनिधीशी बोलताना माहिती दिली
हिंगणघाट शहरा मध्ये दोन दिवसा अगोदर घडलेली घटना एका मुली चे अपरहण होता होता टळले .
घडलेल्या घटनेबद्दल माहिती दिली . माझी मुलगी तिच्या मैत्रिणी सोबत घडलेली घटना माझ्या मुलीने मला सांगितली , सरकारी दवाखाना जवळील सरकारी गोडाऊन जवळून माझी मैत्रीण जात असताना तिथे अनोळखी स्त्री आली व तिने तिचा हात पकडला व सोबत चल तुझ्या घरी अशी म्हणू लागली व एका गाडीकडे पाहून इशारा केला . मुलीने हात झटकून लगेच पळ काढला त्यामुळे ती पूर्णपणे घाबरली ,तिच्या मनात खूप भीती निर्माण झाली घडलेल्या प्रकार माझ्या मुलीने मला सांगितला. मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार कर असे सांगितले. परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे. व सध्या विदर्भात अनेक शहरात लहान मुलं मुली पळविण्याचे प्रकार सुरू आहे अशा घटना घडत आहे व सोबत अफवा सुद्धा होत आहे त्यामुळे या प्रकारच्या घटना घडू नये व शहरातील जागरूक पालक व मुला मुलींनी याबद्दल सतर्क असणे आवश्यक आहे. अशा घटनेपासून सावध असणे आज आवश्यक आहे. या प्रकरणाची दखल घेऊन एक सामाजिक कर्तव्य म्हणून याबद्दल शहरातील शाळेमध्ये जाऊन मुला मुलींनी अनोळखी व्यक्ती पासून सावध राहावे तसा काही संशय असल्यास पोलीस स्टेशन
07153 :- 244033, हिंगणघाट येथे संपर्क करावा
हिंगणघाट शहरात प्रत्यक्ष शाळेत मुला-मुलींना याबद्दल अशा घटना आपल्या सोबत सुद्धा घडू शकतात व याची काळजी घ्यावी व यावर मार्गदर्शन करावे त्या अनुषंगाने मी एस.एस. एम. कन्या विद्यालय ,हिंगणघाट. शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . सतर्क राहा,सावधान राहा. पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी. अस काहीं वाटलं तर माझ्या फोन वर संपर्क करावे:9823748771 ,मी सदैव सोबत राहील

सर्व विभाग प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कान टोचत आढावा बैठक संपन्न.

0

 

गोरगरीब जणतेचे लवकरात लवकर योग्य मार्गदर्शन करून कामे करण्यात यावी :- आमदार एकनाथ खडसे

जिल्हा प्रतिनिधी सतीश बावस्कर

बोदवड येथे आज दि:- 29 रोजी सकाळी 11 वाजे पासून तहसील कार्यालयात माजी महसूलमंत्री आमदार एकनाथराव खडसे व रोहिनीताईंची खडसे यांच्या उपस्थितीत तालुक्यातील सर्व विभागांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समवेत तालुका आढावा बैठक घेण्यात आली होती या बैठकीला तहसीलदार संजय कुवर,गटविकास अधिकारी कथेपुरी साहेब,तालुका कृषी अधिकारी पाडवी साहेब,तालूका आरोग्य अधिकारी चौधरी साहेब,सार्वजनिक बांधकाम विभागाचे बेंडकुळे साहेब महावितरण चे झोपे साहेब व पशुवैद्यकीय अधिकारी पाचपांडे साहेब यांच्या उपस्थितीत आज आढावा बैठक घेण्यात आली बैठकीत तालुक्यातील हजार ते पंधराशे रेशन कार्ड (शिधापत्रिका) संबंधित नागरिकांच्या अडीअडचणी मांडण्यात आल्या गेल्या सात महिन्यांपासून नागरिकांना स्वतःचे रेशनकार्ड व नवीन रेशनकार्ड धारक तसेच तत्कालीन तहसीलदार टोम्पे यांच्या काळातील शासन आपल्या दारी या अभियानातील पुरवठा विभागा संबंधित कामे बंद ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना तहसीमध्ये एरझाऱ्या कराव्या लागतात त्यांचा प्रश्न मार्गी लावावा तसेच कृषी विभागातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान व शेतकऱ्यांच्या पंपा संबंधित असलेल्या विजवीतरण बद्दल अडीअडचणींचा यावेळी पाढा वाचण्यात आला त्यांच्या अडीअडचणी दूर करण्यात याव्या आणि येणाऱ्या पुढील काळात शेतकऱ्यांच्या संबंधित महावितरण विभागासोबत स्वतंत्र बैठक लावण्यात येईल असे आमदार खडसे यांनी सांगितले यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी पाचपांडे यांना गुराढोरांवर आलेल्या लंपी रोगाविषयी सूचना देण्यात आल्या त्यामध्ये गुरा ढोरांची १००% लसीकरण करण्यात आली पाहिजे तसेच जी गुरे ढोरे बाढित असतील त्यांच्यावर तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी लक्ष घालून उपचार करावे त्यावेळी बांधकाम विभागाला गावखेडे जोडणारे रस्ते पावसामुळे खड्डे मय व खराब झाले असे आढळून यते त्यांचे त्वरित काम सुरू करण्यात यावे तसेच रस्त्याच्या आजूबाजूला वाढलेली झाडेझुडपे काढण्यात यावी व साईडपट्या तयार करण्यात याव्या यासाठी निधी आवश्यक असल्यास माझ्या आमदार निधीतून देण्यात येईल यासह ग्रामीण भागासह शहरी भागातील नागरिकांना योग्य सोयीसुविधा पुरविल्या जाव्यात त्यांचे प्रशासकीय कामे लवकरात लवकर पूर्ण करावी अश्या सूचना प्रशकीय कर्मचारी अधिकारी यांना करण्यात आल्या तसेच नागरिकांनि विकासात्मक काही कामे असल्यास ती माझ्या पर्यंत सुचवावी असे अव्हान आमदार एकनाथ खडसे यांनी आढावा बैठकीत केले.
यावेळी नगरपंचायत गटनेते जफर शेख,रामदास पाटिल,कैलास चौधरी,कैलास माळी,दीपक झांभड,गोपाल गंगतिरे,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील,भरत अप्पा,किशोरभाऊ गायकवाड,गणेश पाटील,रामराव पाटील,प्रमोद शेळके,नजीर सेठ,प्रफुल्ल पाटील,नईम खान बागवान,विजय चौधरी,किरण वंजारी,हकीम बागवान,लतीफ शेख,मुजम्मील शाह,राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रदीप बडगुजर,दीपक वाणी,रवी खेवलकर,नाना माळी,फिला राजपूत यांच्यासह असंख्य नागरिक व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जालना तालुक्यातील पारेगाव शिवारातील कपाशी पिक जमीन दोस्त,पंचनामा करून,मदत करण्याची शेतकऱ्याची मागणी:

0

 

प्रतिनिधी:(जालना)दिनांक २८/०९/२०२२ रोजी जालना तालुक्यातील पारेगांव,पारेगांव तांडा,पारेगांव वाडी,जैतापूर व अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस व चक्रीवादळामुळे परिसरात कपाशी,सोयाबीन आणि तुर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मौजे पारेगांव,पारेगांव तांडा,पारेगांव वाडी,जैतापूर व परीसरात अचानक संध्याकाळी ७.०० वाजता वीजा सहीत मोठया प्रमाणात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस व हाताशी आलेल्या सोयाबीन,कापूस व तुरीचे तसेच नेट चे मोठ्या प्रमाणात जमीनदोस्त झाली आहे.तसेच अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे हाता-तोंडाशी आलेला घास डोळ्यासमोर हातातुन जात असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.सदरील झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच चक्रीवादळामुळे झालेल्या पिकांची तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना एकरी ५०,०००/-(पन्नास हजार रुपये) आर्थिक मदत द्यावी.जेणे करून शेतकऱ्यांवर आलेल्या संकटावर थोड्याफार प्रमाणात मदत होईल.तात्काळ पंचनामा करावे अशी विनंती- रामजी शेजुळ(मा.सरपंच),भाऊराव शेजुळ(सरपंच),छबुराव राठोड(मा.सरपंच),राजेश पवार,केशव सुरूशे,लहु राठोड पारेगाव व अनेक शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.

प्रतिनिधी:तुकाराम राठोड,जालना