Home Blog Page 261

रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्या पुढाकाराने आज नवीन आष्टी -अहमदनगर नवीन लाईनचे उद्घाटन आणि नवीन आष्टी-अहमदनगर डेमू सेवेचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ:

0

 

तुकाराम राठोड,जालना

प्रतिनिधी:(जालना) दि.22 सप्टेंबर 2022 रोजी
भारत सरकारचे रेल्वे,कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या पुढाकाराने आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या नवीन आष्टी-अहमदनगर नवीन रेल्वे मार्गाचे उद्घाटन होणार आहे. तसेच नवीन आष्टी-अहमदनगर डेमू सेवेच्या उद्घाटनाच्या सेवेला हे मान्यवर दि.23.09.2022 रोजी हिरवा झेंडा दाखवतील.

या प्रसंगी ना.राधाकृष्ण विखे पाटील,श्रीमती पंकजा मुंडे,श्रीमती रोहिणी शेंडगे,डॉ. प्रीतम मुंडे,डॉ.सुजय विखे पाटील,श्रीमती रजनी पाटील यांच्यासह आ.धनंजय मुंडे,बाळासाहेब आजबे,संग्राम जगताप,नमिता मुंदडा,संदिप क्षीरसागर,प्रकाश सोळंके,लक्ष्मण पवार,सुरेश धस,विक्रम काळे,सतीश चव्हाण,पल्लवी धोंडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत,तसेच इतर मान्यवरांना ही निमंत्रित करण्यात आले आहे.

पार्श्वभूमी आणि फायदे:

*66 किमी नवीन आष्टी-अहमदनगर ब्रॉडगेज लाईन 261 किमी अहमदनगर – बीड- परळी वैजनाथ नवीन ब्रॉडगेज लाईन प्रकल्पाचा एक भाग आहे. ज्यामध्ये भारत सरकार आणि राज्य सरकार यांच्यात 50-50 खर्चाचा वाटा आहे.

• डेमू सेवा नवीन आष्टी – अहमदनगर पट्ट्यातील रहिवाशांना आणि जवळपासच्या भागातील रहिवाशांना उत्तम कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करेल.

• यामुळे स्थानिक व्यापार आणि उद्योगांना चालना मिळेल आणि त्यामुळे मराठवाडा क्षेत्राच्या सामाजिक – आर्थिक विकासाला चालना मिळेल.

• डेमू ट्रेन अहमदनगरहून सकाळी 07.45 वाजता सुटेल आणि न्यू आष्टीला सकाळी 10.30 वाजता पोहोचेल आणि परतीच्या प्रवासात न्यू आष्टी येथून सकाळी 11.00 वाजता सुटेल आणि दुपारी 1.55 वाजता अहमदनगर येथे पोहोचेल.ही गाडी रविवार वगळता दररोज धावणार आहे.

• कडा,नवीन धानोरा,सोलापूरवाडी,नवीन लोणी आणि नारायणडोहो येथे थांबेल.

व्यापारी गणेशजी कोटेच्या यांचा बोदवड तालुक्याचे वतीने करण्यात आला सत्कार

0

 

जिल्हा प्रतिनिधी सतीश बावस्कर

बोदवड बाजार समितीच्या आवारात शेतकरी उत्पादीत मालाची खरेदी विक्रीचे मागणीला यश
कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक यांचे कडे तालुका संघटक शांताराम कोळी सह शिवसेना पदाधिकारी यांनी निवेदनात
बाजार समितीच्या आवारात शेतकरी उत्पादित कळधान्य मका, ज्वारी, कापूस,कांदा, मिरची इत्यादी शेती मालाची खरेदी विक्री करणेसाठी मलकापूर व इतर बाजार समित्यांच्या धर्तीवर व्यापारी व शेतकरी यांना प्रोत्साहीत करून सुविधा पुरविणेत यावी याबाबत मागणी केली असता प्रशासक साहेब यांनी दि१७/०९/२२ ला बोदवड परिसरातील व्यापारी बांधव यांची यांचे सोबत मिटिंग घेण्यात आली असता व्यापारी बांधव यांनी अळचन व त्यावर उपाययोजना सांगण्यात आल्यात त्या मध्ये व्यापारी यांची मुख्यमागणी बाजार समितीमध्ये अडते असणे आवश्यक असल्याचे निर्दशनात आणून दिले असता बोदवड येथील व्यापारी श्री गणेशजी कोटेच्या यांनी अडत चालवण्यास अनुकूलता दर्शवली असता शिवसेना परिवारासह सर्व व्यापारी बांधव,शेतकरी बांधव, हमाल मापडी बांधव ,यांनी आनंद व्यक्त करून गणेशजी कोटेच्या यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला
बाजार समितीचे आवारात शेती मालाची खरेदी विक्री ला सुरुवात झाल्यास शेतकरी यांना चांगला भाव मिळेल व्यापारी यांना एकाच ठिकाणी मला मिळेल व हमाल व मापाडी यांचे सह वाहन धारक चहा नसता विक्रेते यांना रोजगार मिळेल तसेच स्थानिक पातळीवर्ती शेतीमालाची खरेदी विक्री झाल्यास शेतकरी बांधव यांच्या कडे आलेल्या पैशातून जे काही खरेदी होईल ती स्थानिक बाजारपेठेत होईल त्या मुळे आपल्या स्थानिक बाजारपेठेतही सुगीचे दिवस येतील बाजारपेठ मध्ये चांगली उलाढाल होईल त्या मुलेही रोजगार ही मोठ्या प्रमाणात निर्माण होईल
सर्व शेतकरी बांधव यांना विनंती आहे त्यांनी आपला शेती मला बाजार समितीच्या आवारात खरेदी विक्री साठी आणावा जेने करून शेतीमालाला चांगला भाव मिळेल इतरांना ही मोठा रोजगार मिळेल
गणेशजी कोटेच्या यांचा सत्कार करतांना तालुका संघटक
शांताराम कोळी , अल्पसंख्यांक उपजिल्हाप्रमुख कलीम शेख, शहर प्रमुख राहुल शर्मा, तालुका अल्पसंख्यांक सादिक पटवे, अल्पसंख्यांक शहर प्रमुख अप्पू भांजा, कैलास सूर्यवंशी, तोसिफ पिंजारी, योगेश भोई, भास्कर गुरचल,शेतकरी उत्तम भाऊ मेंबर राजू भाऊ वाघ ,संतोष देठे, योगेश माळी, विलास काजळे, अजय पाटील ,रघुनाथ जवरे, अजय शेळके, रमेश गावंडे ,भिकू रेंगे, कैलास वाणी, गोपाळ बडगुजर ,रवींद्र बांगर, शरीफ मण्यार ,अजय राजपूत, रोहित पांडे, सनी पाटील, इम्रान खान, लियाकत कुरेशी, पंकज वाघ, शेख सोईल, शेख जाबीर खा, सुमित भोई,धनराज माळी, निरंजन चंदनकार,सहा नागरिक उपस्थित होते

भुसावळ येथे मुले पळवणारी टोळी म्हणजे निवड अफवा

0

 

जिल्हा प्रतिनिधी सतीश बावस्कर

भुसावळ शहरात लहान मुले अपहरण करणारी टोळी असल्याची अफवा पसरवली आहे मात्र कोणीही विश्वास ठेवू नये असे आव्हान पोलीस प्रशासनाने केले आहे मागील काही दिवसापासून सोशल मीडियावरून लहान मुलांचे अपहरण करणारी टोळी आली किंवा चोर आल्याच्या अफवा पसरवत आहे यामुळे अन्य जिल्ह्यात जमावाकडून बहुरूपी वाटसरू भिकारी व अन्य निष्पाप लोकांना मारहाण झाली आहे यातुन जमावावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे अफवा फैलविणारे जर कोणी व्हायरल करीत असल्यास अशांची नावे माहिती असल्यास त्यांची नावे पोलिसांना कळवावी असे आव्हान पोलिसांनी केले आहे लोकांनी कायदा हातात घेऊ नये कायदा व सुव्यवस्था आबाधीत राहण्यासाठी सहकार्य करावे असे आव्हान पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी केले आहे

हिंगणघाट तालुक्यात नकली विषारी दारू , गांजा जुवा, हुक्का पार्लर या व्यवसायात प्रचंड वाड ?

0

 

हिंगणघाट तालुक्यात प्रत्येक प्रभागात चौका- चौकात सेंटर सुरू आहे . यांच्यावर पोलीस प्रशासनाकडून कोणती कारवाई नाही ? आज अनेक प्रभागातील युवा तरुण नकली विषारी दारू पिल्यामुळे टीबी ,जलपंडू या सारख्या बिमारीने त्रस्त व मरत आहे , कॉलेज शाळेकरी मुले यांच्यामध्ये गांजा , दारू , जुवा ,हुक्का पार्लर याचे व्यसन वाढत आहे. त्यामुळे तालुक्यात याच्याशी संबंधित व्यवसाय सुद्धा वाढत आहे . आज प्रशासनाचा कोणताही धाक नाही ,सार्वजनिक ठिकाणी खुलेआम हे व्यसन सुरू आहे नशेमध्ये व्हिडिओ सुद्धा बनवत आहे. आजचा युवा व्यसनाच्या आहारी जात आहे ? हे सर्व शोक पूर्ण करण्याकरिता चोरी ,किडनॅपिंग , ग्रुपने भाईगिरी हे युवा करीत आहे . आज अवैध्य व्यवसाय करणारे( पत्रकार ), लोकप्रतिनिधी , निवडणुकीत अवैद्य धंदे करणारे पक्षाचे फायनान्सर, यांचे व्यवसाय प्रभागात चौका चौकात सुरू आहे हे पक्षाशी जुडुन आहे. कारण जनतेला याच्याशी काही घेणे देणे नाही. जनता विचार केव्हा करेल ? लोकप्रतिनिधी हेच अवैद्य धंद्याचे मास्टर माईंड तर नाही ? प्रभागातील सत्ताधारी लोकप्रतिनिधी हे प्रभागात अवैद्य धंद्याच्या विरोधात उठाव का करत नाही ? लोकप्रतिनिधी निवडण्याचे सर्व अधिकार हे प्रभागातील जनतेला दिलेले आहे. (जशी प्रजा तसा राजा )

अपघाताची मालिका सुरूच एकाचा जीव जाऊन ही प्रशासन झोपेतच आता पुन्हा अपघात झाल्याने दोन जन गंभीर जखमी, याकडे शासन लक्ष देईल की नाही नागरिकांमध्ये रोष

0

 

यावल तालुका( प्रतिनिधी)विकी वानखेडे

यावल : खड्ड्यांमुळे अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील अपघाताची मालिका थांबतचं नाहिये तालुक्यातील किनगाव – चिंचोली दरम्यान अचानक खड्डा समोर आल्याने दुचाकीस्वार एक खड्ड् चुकवत दुसऱ्या खड्ड्यात गेला व दुचाकी अनियंत्रीत होत दोघे रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाले, जखमींना नागरीकांच्या मदतीने किनगाव आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असुन दोघांवर प्रथमउपचार करून जळगाव हलवले आहे
अंकलेश्वर – बऱ्हाणपूर राज्य मार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे. या खड्ड्यांमुळे किनगाव जवळ एका तरुणाचा जीव गेला होता. त्यानंतर पुन्हा बुधवारी रात्री याचं रस्त्या चिंचोली – किनगाव दरम्यान रात्री दुचाकी क्रमांक एम. एच.१८ ए.आर. २७४० घेवुन जगन नानू धनगर वय ४७ व वसंत धनगर वय ४० दोघे राहणार साक्री जि. धुळे हे येत होते. अचानक समोर आलेले खड्डे पाहून ते घाबरले व एक खड्डा चुकवतांना दुचाकी दुसऱ्या खड्ड्यात जाऊन अनियंत्रित झाली व दोघेही रस्त्यावर कोसळले या अपघातात यांच्या डोक्याला दुखापत झाली व ते गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यात पडून होते. तेव्हा या रस्त्या वरून मार्गस्त होत असलेल्या नबाब पिंजारी, छब्बीर तडवी, भावेश महाजन, धीरज महाजनख् गजानन पाटील सह नागरिकांनी तातडीने या दोघ गंभीर जखमींना किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचाराकरिता दाखल केले येथे डॉ. मनीषा महाजन, सरदार कनाशा, मोहिनी धांडे, निलेश खंडारे आदींनी त्यांच्यावर प्रथमोउपचार केले असून त्यांना पुढील उपचारा करीता जळगाव जिल्हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या रूग्णालयात हलवण्यात आले आहे.
खड्ड्यांमुळे अपघात.
या राज्य मार्गावर प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असुन खड्ड्यामुळे वारंवार अपघात घडत आहे. तेव्हा अंकलेश्वर – बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील खड्डे बुजवण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन वतीने ,जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत लक्षवेक मोटासायकल रॅली काढून निवेदन

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यात महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या तालुका संघटनेच्या वतीने राष्ट्रीय पेन्शन योजने ऐवजी शासनाने शासकीय कर्मचारी जुनी पेन्शन लागु करावी या मागणीसाठी शासनाने लक्ष वेधण्यासाठी मोटरसायकल रॅल्ली काढुन मागण्यांचे निवेदन तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना देण्यात आले .

 

आपल्या दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन म्हटले आहे की , राज्यात २००५ नंतर शासकीय सेवेत लागलेल्या कर्मचारी यांना जुनी पेन्शन लागु नाही त्यामुळे सेवानिवृत्ती नंतर शासकीय कर्मचारी हा आयुष्याच्या उतार वयात दवाखाना खर्च , कौटुंबीक कार्यक्रम उदारणार्थ , मुलांचे शिक्षण , लग्न ईत्यादी कौटुंबीक कर्तव्य पार पाडण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांच्या हातात सेवानिवृत्ती नंतर काहीच रक्कम उपलब्ध होत नसल्याने चरीतार्थ चालविणे देखील कठीन होत . त्यामुळे देशातील काही राज्याप्रमाणे शासनाने आपल्या राज्यात देखील जुनी पेन्शन योजना लागु करावी या मागणीसाठी संघटनेच्या माध्यमातुन संपुर्ण राज्यभरात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ठीकठीकाणी मोटरसायकल रॅली आयोजन करण्यात आले होते त्याच प्रमाणे यावल तालुक्यातील ग्रामसेवक संघटनेच्या वतीने तालुका अध्यक्ष रूबाब तडवी, तालुका सचिव पी. व्ही. तळेले, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष बी.के .पारधी यांच्या नेतृत्वाखाली यावल येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालया पासुन पंचायत समिती व तहसील कार्यालयापर्यंत मोटरसायकल रॅली काढण्यात आली यात ग्रामसेवक संघटनेचे हितु महाजन ,राजु तडवी, शिवाजी सोनवणे , भोयराज फालक , आर .टी. बाविस्कर , सुबोध सोये , दिपक तायडे , पी .आर . चव्हाण, गुरुदास चौधरी , बाळु वायकोळे, उदय पाटील , आर . यु . कोठोके , के .जी . पाटील , व्ही .एल . पाटील , प्रविण चौधरी आदी ग्रामसेवकांनी यात आपला सहभाग नोंदविला यावेळी तहसील कार्यालयात नायब तहसीदार आर डी पाटील , यावल पंचायत समितीचे कक्ष अधिकारी सरवर तडवी यांनी मागण्यांची निवेदन देण्यात आली .

बोदवड तालुक्यात नुकसान ग्रस्त पिकाचे पंचनामे सुरु

0

 

जिल्हा प्रतिनिधी सतीश बावस्कर

बोदवड मागील आठवड्यात बोदवड तालुक्यात वारा व पावसामुळे शेतकर्यांचे पिके पडली मके तर जमीन दोस्त झाली आतापर्यंत ३५०शेतकर्याच्या पिकाचे पंचनामे केले सर्वात जास्त नुकसान साळसिगी येथे झाले असून १०६शेतकरी याचे मका पिकाचे नुकसान झाले आहे चिंचखेड ५० राजुर ५०ऐनगाव १५ वरखेड बु १५वरखेड खु ८ भानखेडा ३धानोरी २ जलचक्र खु १५धोनखेडा ३५ कुर्हा हरदो येवती१५ २४जामठी ११ मनुर बु १०पडसखेडा बु ६असी नुकसान ग्रस्त गावे आहे
या शेतकरी याचा अहवाल पाठवला असल्याची माहिती कुर्षी अधिकारी पाडवी यानी दिली

लोणार येथील भारतीय जनता पार्टीची जम्बो कार्यकारणी जाहीर….

0

 

 

भारतीय जनता पार्टी लोणार तालुका ७३ समस्यांची कार्यकारणी जाहीर या कार्यकारणी मध्ये भारतीय जनता पार्टीच्या घोषवाक्य प्रमाणे “सबका साथ सबका विकास और सबका विश्वास”याप्रमाणे सर्व स्तरातील नागरीकांना तालुका कार्यकारणी मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे.
आ. डॉ. संजयजी कुटे, माजी आ. चैनसुखजी संचेती, भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार आकाशदादा फुंडकर, आमदार सौ.श्वेताताई महाले या सर्व मान्यवर यांनी सदरील तालुका कार्यकारणीला मान्यता दिल्यानंतरच कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
भारतीय जनता पार्टी, लोणार तालुका अध्यक्षपदी भगवानराव सानप, तालुका सरचिटणीस गणेश तांगडे, देवानंद सानप, प्रकाश नागरे, सखाराम कुलकर्णी, तालुका उपाध्यक्षपदी संजय बुरुकुल, गणेश काकड, गजानन वाघ, सुरेश अंभोरे, सुबोध संचेती, कचरू डोळे, लक्ष्मण मोरे, गणेश राऊत, दिपक सांगळे, तालुका सचिव पदी जगन खोलगडे, अरुण तनपुरे, गजानन नागरे, विनोद कडाळे, संदीप हजबे, बद्रि कांगणे, कोषाध्यक्ष पदी दिलीप राठोड तर प्रसिद्धी प्रमुख म्हणुन भुषण शेटे यांची निवड झाली आहे. तालुका कार्यकारणीमध्ये १ तालुकाध्यक्ष, ४ सरचिटणीस, ८ उपाध्यक्ष, ६ तालुका सचिव, १ प्रसिध्दी प्रमुख, १ कोषाध्यक्ष, ४ महीला सदस्य, ३२ पुरुष सदस्य, १६ कायम निमंत्रित असे एकूण ७३ सदस्यांची जम्बो कार्यकारणी गठीत करण्यात आली आहे.
तालुक्यात भारतीय जनता पार्टी वाढीसाठी प्रयत्न करणार असुन लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिका, यामध्ये सत्ता स्थापनेचा प्रयत्न करणार आहे. यानंतर होणाऱ्या सर्वच निवडणुका यामध्ये सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते करणार आहे असा विश्वास तालुका अध्यक्षांनी वरिष्ठ मंडळीला दिला आहे.

पोलिस कर्मचारीच जेव्हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला कामात अडथळा आणतात तेव्हा दाद कुणाला मागणार ? पत्रकारांच्या वतीने समंधित अधिकाऱ्याचा निषेध

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील मालोद व परसाडे येथील ग्रामपंचायत च्या पार पडलेल्या सार्वत्रीक निवडणुकीची मतमोजणी येथील तहसील कार्यालयात सुरू असताना वृत्तांकन करण्यासाठी यावल येथील पत्रकार शेखर पटेल यांनी तहसीलदार महेश पवार यांचे परवानगीने तसेच पोलीस निरीक्षकांनी ही परवानगी दिल्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्यांने, खरोखरच साहेबांनी परवानगी दिली आहे का जर दिली नसेल तर तुम्हाला महाग पडेल अशी धमकी दिल्याने यावल तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने याबाबतचे निवेदन फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे प्रांताधिकारी कैलास कडलक तसेच येथील पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना दिले आहे. तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षकांचे परवानगी नंतरही पोलिसांनी पत्रकारास दिलेल्या धमकीबद्दल तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला असुन. या संदर्भातील निवेदन देताना पत्रकार संघ शहराध्यक्ष सुरेश पाटील ,अय्युब जी पटेल, डी, बी.पाटील, शेखर पटेल , भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या ग्रामीण क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष प्रकाश चौधरी, सुनिल गावडे , तेजस यावलकर ,पराग सराफ , विकी वानखडे, दीपक नेवे, समाधान पाटील , भरत कोळी ,काबीज शेख फिरोज तडवी , ज्ञानेश्र्वर मराठे ,वासूदेव सरोदे ,योगेश सोनवणे, समीर तडवी , निलेश पाटील यांचे सह पत्रकार बांधव याप्रसंगी उपस्थित होते.

सेवा ही परमोधर्म,एका कामगाराची कैफियत:

0

 

प्रतिनिधी:(जालना)अनिल मिसाळ यांनी सांगितले की,काल माझ्या नोकरीच्या कामानिमित्त मी आणि माझी बायको मुंबईला तिकीट बुक करण्यासाठी जालना स्टेशनला गेलो होतो.मी स्टेशन कडे जात असताना मला कपिल दहेकर सर दिसले.मी माझ्या पत्नीला म्हणाले की,बोल की ते कपील दहेकर सर ओबीसी चे भा.ज.पा.जिल्हाध्यक्ष आहेत.मी म्हणालो पत्नीला बोल की आपली अडचण,सरांना सांगा आपली कैफियत.तेव्हा मी लगेच दहेकर सर कडे गेलो.आणि माझा परिचय दिला.व माझी सर्व हकीकत कामगार विभाग येथे 6 महिने अगोदर नोकरीला होतो. काही कारणवस्त मला नोकरीहून कमी करण्यात आले आहे.मी घरात मोठा असल्याने माझ्यावर आई-वडिलांची माझ्या पत्नीची सर्वांची जबाबदारी आहे.मुंबईतील अधिकाऱ्यांनकडे वारंवार मी चकरा मारूनही मला रुजू करून घेत नाही.कामावर परत घेत नाही.आणि आताही मुंबईचीच मी वारी करण्यासाठी तिकीट बुक करण्यासाठी आलो होतो.तेव्हा आपण मला दिसला,आपण मला काही मदत केली तर बरे होईल.सरांनी तात्काळ सदर अधिकाऱ्यांचा नंबर माझ्याकडून मागून घेतला. आणि अधिकाऱ्यांना विनंती केली व सरांची ही विनंती अधिकाऱ्यांनी मान्य केली.आणि सांगितले की मुंबईला अनिल ला पाठवू नका.मी उद्या फॅक्स द्वारे पुन्हा नोकरीवर परत घेण्याचा आदेश फॅक्स करून पाठवून देतो.मग सरांनी मला सांगितलं की,तुला मुंबईला जायची गरज नाही.उद्या तुला तू कामावर जा, तुला नोकरीला परत घेण्याचा उद्या आदेश येऊन जाईल.आणि या आनंदाने क्षणात डोळ्यात पाणी आले.असे होऊ शकते का? ते झाले मी लॉऊस स्पीकर मोठा करून,सरांनी मला ते ऐकवलं आणि विश्वास बसत नव्हता. पण तसे झाले होते.मी आणि माझ्या पत्नी ने सरांचे खूप-खूप आभार मानले.यापुढे अशा काही अडचण आल्या तर मला सांगा असे कपिल दहीकर सरांनी मला सांगितले आहे. तसेच सरांना अशाच त्यांच्या सामाजिक,राजकीय कार्याला माझ्याकडून खूप-खूप शुभेच्छा.देव त्यांना अशा सामाजिक कार्य करण्याची ताकद देवो हीच सदिच्छा.अशी भावना अनिल मिसाळ,रा.मांडवा,तालुका,बदनापूर,जिल्हा जालना यांनी आपल्या प्रतिनिधीकडे व्यक्त केली आहे.