Home Blog Page 262

रोटरीने पालिकेच्या सहकार्याने राबवली स्वच्छता मोहीम

0

 

हिंगणघाट :मलक नईम –

शासनउपक्रम*राष्ट्र नेत्यापासून राष्ट्रपिता पर्यंत सेवा पंधरवड्याअंतर्गत रोटरी क्लबने नगरपालिकेच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबवली. त्याअंतर्गत इंदिरा गांधी पुतळ्यापासून टिळक चौक व परिसराची स्वच्छता करण्यात आली.
क्लबचे अध्यक्ष पराग कोचर यांनी सांगितले की, प्रदूषण आणि पावसामुळे शहरात रोगराई पसरत आहे.त्यासाठी शहर व परिसर स्वच्छ करणे गरजेचे आहे. रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष डॉ.अशोक मुखी म्हणाले की, स्वच्छ हिंगणघाट, निरोगी हिंगणघाट यासाठी रोटरी क्लब नेहमीच प्रयत्नशील आहे. प्लास्टिक निर्मूलनासाठीही प्रयत्न सुरू आहेत.स्वच्छता अशीच सुरू राहिली तर गाव सुंदर, शहर सुंदर, देश सुंदर होईल. रोटरीच्या टीमने इंदिरा गांधी पुतळ्याच्या परिसरात आणि आजूबाजूला गोठलेला कचरा साफ केला. त्यानंतर तेथून टिळक पुतळ्यापर्यंत संपूर्ण परिसराची पाने व कचरा उचलून जाळण्यात आला. यावेळी आमदार समीर भाऊ व माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी यांनी त्या ठिकाणी भेट देऊन रोटरीच्या कार्याचे कौतुक केले.पालिकेने रोटरी क्लब सदस्यांचे आभार व्यक्त केले.
या स्वच्छता मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सचिव सतीश डांगरे, शाकीर खान पठाण, मुरली लाहोटी, पंकज देशपांडे, प्रभाकर साठवणे, उदय शेंडे, पुंडलिक बकाणे, मुकुंद मुंधरा, माया मिहाणी, मितेश जोशी आदींनी परिश्रम घेतले.

ड्रग्स प्रकरणात मुंबईच्या पथकाने बोदवड मधुन ऐकास घेतले ताब्यात

0

 

 

जिल्हा प्रतिनिधी सतीश बावस्कर

मुंबईच्या सीआयडी पथकाने सहा महिन्यापासून फरार असलेल्या ड्रग्समधील एका आरोपीला बोदवड येथील मन्यार वाड्यातून ताब्यात घेतले आहे मन्यार वाड्यात राहत असलेल्या साडूच्या घरी चार ते पाच दिवसापासून राहत असल्याची गुप्त माहिती मुंबईच्या सीआयडी पथकाला मिळाली होती त्यानुसार मुंबई येथील सीआयडी पथकाने रविवारी ( दि. 25) रात्री तीन वाजता बोदवड गाठले व त्याच्या नातेवाइकांच्या घरून त्याला ताब्यात घेतले पुढील चौकशीसाठी आरोपीला मुंबई येथे सीआयडी पथक सोबत घेऊन गेले आहे अशी माहिती बोदवड पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी दिली

नात्याला काळीमा फासणारी घटना काकूवर केला पुतण्याने अत्याचार

0

 

अल्लीपूर दि. 26 सप्टेंबर
फिर्यादी हिचा पुतण्या आरोपी आशिष सुनील खोंड वय 21 राहणार अल्लीपूर याने ता. 20 सप्टेंबर दोन वाजताच्या दरम्यान फिर्यादीच्या मुलीला मारण्याची धमकी देऊन फिर्यादी चे घरात जाऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध केले व मारहाण केली ,फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून 452,376, 354 324,323,506 भा द वी गुन्हा नोंद केला. पुढील तपास अल्लीपूर पोलीस स्टेशन करीत आहे.

जी बी एम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट ला विद्यार्थांचा कौतुक समारंभ संपन्न

0

 

हिंगणघाट मलक नईम दिनाक २३/०९/२०२२ स्थानिक नगर पालीका संचालीत जी.बी.एम.एम.हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट येथे विद्यार्थांचा कौतुक समारंभ पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळेचे प्राचार्य श्री.ढगे सर व प्रमुख पावणे म्हणून जिल्हा समन्वयक श्री.शाहीद सर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले व विद्येची आराध्य दैवत माता सरस्वती यांच्या फोटोला माल्यापर्ण करून झाली.त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.ढगे सर व प्रमुख अतिथी श्री.शाहीद सर यांचे स्वागत श्रावणी वैद्य व राखी राठोड यांनी केले. त्याचप्रमाणे शाळेचे पर्यवेक्षक श्री. कुरेशी सर व जेष्ठ शिक्षक डॉ.अनिस बेग सर व काजी सर यांचे स्वागत कोमल सातकर,लक्ष्मी वाडेकर ,श्रुष्टी इखार यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यावसाय प्रशिक्षक श्री.त्रिरत्न नागदेवे यांनी केले. त्यानंतर जी.बी.एम.एम हायस्कूल मधील दोन विद्यार्थिनिनी आर्थिक परिस्थीतीवर मात करित स्वतःच्या जिद्द व परिश्रमाने गुरुकुल मधे सोफ्टवेयर इंजीनियर च्या प्रशिक्षणा करिता( Trainee)निवड झाली आणि विशेष म्हणजे 5000 विद्यार्थाना मागे टाकत ही जागा त्यानी मिळविली व प्रशिक्षण अभ्यासक्रम पुर्ण करताच त्यानां येत्या 2 वर्षात 20 ते 25 हजारी नौकरी सुद्धा मिळणार अशा विद्यार्थिनी प्रायुषा निमजे व ख़ुशी कचव्हा यांचा पुष्पगुच्छ व उपहार देऊन गुणगौरव करण्यात आला. विद्यार्थिनिनी त्याच्या यशाचे श्रेय व्यवसाय प्रशिक्षक व शाळेतील शिक्षक आणि त्यांच्या पालकांना दिले.प्रमुख अतिथी शाहीद सर यांनी व्यावसाय शिक्षणातील होणारे फायदे याबद्दल माहिती दिली.श्री.ढगे सर यांनी विद्यार्थांना यशाला गवसणी घालण्यासाठी जिद्द , चिकाटी , व मेहनत किती महत्वाची आहे याबद्दल मार्गदर्शन केले.डॉ अनिस बेग सरांनी निवड झालेल्या विद्यार्थांचे कौतुक केले व व्यावसाय शिक्षणाचे महत्व सांगितले.कार्यक्रमाचे संचालन ख़ुशी देशकर व प्रणाली हिवरे यांनी केले तर आभार प्रदर्शन भूमिका माने व प्राची कुकसे या विद्यार्थिनीनि केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कला शिक्षक श्री.ऊकेकर सर ,व्यावसाय प्रशिक्षक श्री. सुमित तलमले व श्री.हर्षल बोधनकर तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

भारतीय जनता पार्टी जालना ग्रामीण तर्फे सेवा पंधरवाडा उपक्रम हाती:

0

 

प्रतिनिधी:(जालना)भारताचे पंतप्रधान मा.ना.श्री.नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा उपक्रमांतर्गत भाजपाचे नारायणराव जाधव,दत्ता जाधव यांच्या वतीने मानेगांव ता.जि.जालना येथे प्रधानमंत्री आयुष्यमान भारत कार्ड,प्रधानमंत्री डिजीटल इंडीया कार्ड नोंदणी व वाटप करण्यात आले असून,त्याबद्दल त्याची माहिती व जनजागृती मेळावा घेण्यात आला,या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मौजपुरी पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक विलास मोरे,भाजपा तालुकाध्यक्ष वसंतराव शिंदे,बिराजदार साहेब,पोलीस पाटील,अंकुश बिल्लोरे,सुर्यकांत आचलखांब,हनुमान वाढेकर,नारायण मोहिते,अर्जुन मोहिते,बाबासाहेब शेळके, विठ्ठल गायकवाड,सुधाकर लाखे व प्रधानमंत्री जन आरोग्य लाभार्थी व गावकरी मोठया संख्येने उपस्थीत होते.

प्रतिनिधी:तुकाराम राठोड, जालना

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांची नवरात्री निमित्य दुर्गामाता दौड चे आयोजन

0

 

हिंगणघाट: दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा नवरात्री मध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान हिंगणघाट विभागाची दुर्गामाता दौड छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथून घटस्थापनेच्या दिवशी पासून निघणार आहे. घटस्थापना ते दसरा पर्यंत या दौड चे आयोजन शिवप्रतिष्ठान चे धारकरी करतात.

श्री राजमाता जिजाऊंनी शिवप्रभु पोटात असताना नवरात्रात अखंड नऊ दिवस आई तुळजाभवानी चा जागर करून जगदंबेच्या चरणी देशा, देवा, धर्मासाठी मागितलेले वरदान व आशीर्वाद तेच पुनरुपी मागण्याची प्रथा उपक्रम म्हणजे दुर्गामाता दौड.

या दौड मध्ये धारकरी व पुरुष, महिला, तरुण युवक, युवती व लहान मुले, मुली नवरात्रीत दरदिवशी पहाटे देशभक्ती, धर्मभक्ती, राष्ट्रभक्ती पर गीते व श्लोक म्हणीत. छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांची, कार्यकर्तृत्वाची, ध्येयधोरणाची, आकांक्षा बनवण्यासाठी व असंख्य राष्ट्रपुरुष, देशभक्त, धर्मभक्त, नरवीर मावळे या सर्वांच्या पाऊलावर पाऊल ठेवत त्यांच्या विचारांचे पाईक होण्यासाठी नवरात्रीत दरदिवशी पहाटे दौड शहरातील देवीच्या एका मंदिरात जातात. या दुर्गामाता दौड मध्ये भगवा ध्वज, शस्त्र पथक असतात. तसेच या दौड मध्ये, शहरातील व ग्रामीण भागातील, तरुण, तरुणी, महिला, पुरुष व समस्त धारकरी उपस्थित असतात.

या स्फूर्ती प्रेरणादायक, देशभक्ती, राष्ट्रभक्ती, धर्मभक्ती बिंबवणाऱ्या कार्यात शहरातील व ग्रामीण भागातील सहकुटुंब आप्तजन यांनी हिंगणघाट मध्ये होणाऱ्या दुर्गामाता दौड मध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी आग्रहाची व कळकळीची विनंती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंगणघाट चे समस्त धारकरी यांनी केली आहे

जवाहर नवोदय विद्यालय परतूर येथे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते ज्यूडो स्पर्धेचे उद्घाटन:

0

 

खेळामुळे शरीर सुदृढ होण्याबरोबरच मानसिक विकास साध्य होतो.त्याचबरोबर मुलींना झिरो च्या माध्यमातून स्वसंरक्षण करता येते.त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळाची आवड जोपासावी असे आवाहन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले.
ते आंबा ता परतूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ज्यूडो स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की,आपण विद्यार्थी दशेत असताना आपणास खोखो,कबड्डी,कुस्ती आदी स्पर्धांची आवड होती.यादरम्यान आपण विद्यालय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये भागही घेतला असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले.
जवाहर नवोदय विद्यालयाची इमारत जीर्ण झालेली आहे.तिचा परिसराचा विकास करणे मुला-मुलींसाठी इनडोअर हॉल बांधणे वस्तीग्रह बांधकाम डायनिंग हॉल बांधणे सुसज्य क्रीडांगण इंदोर हॉल एसी हॉल करणे यासह मैदान विकास करण्यासाठी शंभर कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्याची तयारी आपण केलेली असून,या प्रस्तावाचा पाठपुरावा करत निश्चितपणाने या ठिकाणचा रखडलेला विकास निर्णय झालेल्या बिल्डिंग चा प्रश्न मार्गी लागेल असाही विश्वास यावेळी त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांना दिला.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आमदार लोणीकर विद्यार्थ्यांची समरस झाले व ते विद्यार्थी दशेत असतानाची कविता यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना ऐकवली विद्यार्थ्यांनीही त्यांनी सादर केलेल्या कवितेला जोरदार दात देत प्रचंड टाळ्यांचा कडकडाट केला.
पुढे बोलताना ते म्हणाले की,जवाहर नवोदय विद्यालयाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण या ठिकाणी उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध करण्यासाठी श्रम करण्याची आवश्यकता असून आपल्या भविष्यातील जिल्हाधिकारी,पोलीस निरीक्षक, पोलीस अधीक्षक,डॉक्टर,इंजिनीयर, प्राध्यापक आपण सर्वजण आहात.त्यामुळे आपण सर्वांनी अभ्यासाची कास धरत स्वतःला सिद्ध करत देश विकासाला हात-भार लावावा असेही यावेळी त्यांनी नमूद केले.
दरम्यान या स्पर्धेमध्ये छत्तीसगड, गोवा मध्य प्रदेश आदी राज्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे.
या कार्यक्रमाला प्राचार्य शैलेश नागदेवते,सर्वेश भाले डॉ.प्रशांत अंभोरे,भाजपाचा अध्यक्ष रमेश भापकर,संपत टकले,दिगंबर मुजमुले,प्रशांत बोनगे,बाबा आटोळे,मस्के सर,जॉन्सन सर, सोनवणे सर,अंधारे सर,गुप्ता सर यासह शिक्षक,विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

प्रतिनिधी:तुकाराम राठोड,जालना

Ptrkar Dhamki /यावल येथे पोलीसाकडून पत्रकारास धमकी भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघातर्फ पोलीस अधिक्षकांना निवेदन

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील मालोद व परसाडे येथील ग्रामपंचायत च्या पार पडलेल्या सार्वत्रीक निवडणुकीची मतमोजणी येथील तहसील कार्यालयात सुरू असताना वृत्तांकन कार्यासाठी गेलेले यावल येथील पत्रकार शेखर पटेल यांनी तहसीलदार महेश पवार यांची परवानगीने तसेच पोलीस निरीक्षकांनी ही परवानगी दिल्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्यांने, पत्रकार पटेल यांच्याशी विचारतांना खरोखरच साहेबांनी परवानगी दिली आहे खर बोला नाहीतर साहेबांनी परवानगी दिली नसेल तर तुम्हाला महाग पडेल अशी धमकी दिल्याने व स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांकडून वारंवार हे प्रकार होत असल्याने कारणांने संत्पत होवुन अखेर भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघ, महाराष्ट्र व पत्रकारांच्या वतीने या बाबतचे निवेदन अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांना देण्यात आले असुन , या निवेदनाद्वारे पोलीस प्रशासनातील वरिष्ठांना माहीती देतांना म्हटले आहे की , यावल शहरातील तहसील कार्यालयात मतमोजणी च्या ठीकाणी तहसीलदार आणी पोलीस निरीक्षकांचे परवानगी नंतर ही अशा प्रकारे पोलिसांनी पत्रकारास दिलेल्या धमकीबद्दल भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघ व यावल तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला असुन. या संदर्भातील निवेदन जळगाव जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधिक्षक देताना भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य प्रभारी ,अय्युब जी पटेल, जेष्ठ पत्रकार डी, बी.पाटील, सुरेश पाटील, शेखर पटेल , भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या ग्रामीण क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष संघाचे अध्यक्ष प्रकाश चौधरी, पत्रकार ललीत खरे राज्य संघटक सुनिल गावडे , उतर विभागीय उपाध्यक्ष महेश पाटील , संपर्क प्रमुख पराग सराफ , तेजस यावलकर, गोकुळ कोळी ,विकी वानखडे, दीपक नेवे, समाधान पाटील , ज्ञानेश्र्वर मराठे , मनोज नेवे यांचे सह ईतर पत्रकार बांधव याप्रसंगी उपस्थित होते. याप्रसंगी पत्रकारांशी बोलतांना अप्पर पोलीस अधिक्षक चंदकांत गवळी यांनी सांगीतले की यावल पोलिस ठाण्यात वृतसंकलनाच्या कार्यासाठी येणाऱ्या पत्रकारांशी स्थानिक पोलिस प्रशासनाने समन्यव्याचे व सोर्हादपुर्ण संबध राखण्या बाबतची सुचना आपण देणार असल्याने त्यांनी यावेळी सांगीतले .

 

Ptrkar Dhamki

बोदवड तालुक्यांतील गोर गरीब शेतकरी यांच्या मका उध्वस्त झालेला असुन श्री आमदार चंद्रकांत पाटील यांनी नुकसान ग्रस्ताचे पंचे नामे करून तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले

0

 

जिल्हा प्रतिनिधी सतीश बावस्कर

बोदवड तालुक्यातील येवती रेवती जामठी बोदवड व तालुक्यातील बर्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासहित पावसाने पिकांचे नुकसान झालेले आहे. आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या आदेशानुसार नगराध्यक्ष.आनंदा पाटील नगरसेवक सईदभाई बागवान ता कुषी अधिकारी पाडवी साहेब मंडळ अधिकारी पवार साहेब कुषी सहायक मोरे तलाठी उगले अप्पा तलाठी रतनाळे अप्पा नगरसेवक गोलूभाऊ बरडिया नगरसेवक हर्षल बडगुजर नगरसेवक नितीन चव्हाण यांनी पाहणी केली असता शेतकरी बांधव यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने शेतातूनच नगराध्यक्ष आनंदा पाटील यांनी आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांना भम्रणद्वणी दूवारे माहिती दिली असता त्यांनी संबंधित अधिकारी यांना तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करणयाचे आदेश दिले आणि शेतकरी बांधवाना मदत मिळवून देणयासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले यावेळी शेतकरी सुनिल बडगुजर अकबर मन्यार युवराज परदेशी प्रदिपभाऊ तांगडे सुभाष बडगुजर राजु माळी मनोज राजपूत धनराज पाटील खलील मन्यार अरूण बडगुजर नाना वंजारी रहेमतुललाभाई मन्यार जितेंद्र पाटील सर मनोज पाटील सचिन माळी गोपाल पाटील उपस्थित होते

विवाहितेस फाशी देऊन मारले… आरोपींनाही फाशी द्या … नातेवाईकांची मागणी…

0

 

जिल्हा प्रतिनिधी सतीश बावस्कर

चोपडा : चिंचाल लालबाग ता.बऱ्हाणपूर येथील विवाहितेस तिचा पती दिनेश सुरेश जाधव व इतर ८ आरोपींनी फाशी देऊन मारले आहे अशा आशयाचा तक्रार सतीश गंगाराम गायकवाड रा.मुक्ताईनगर जिल्हा जळगाव यांच्या फिर्यादीवरून लालबाग बऱ्हाणपूर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, सतिश गंगाराम गायकवाड मुक्ताईनगर जिल्हा जळगाव यांच्या फिर्यादीवरून दिनेश सुरेश जाधव, आरती सुरेश जाधव,ज्योती ईश्वर जाधव,सुरेखा गोपाल जाधव,कृष्णा गोपाल जाधव, ईश्वर दगडू जाधव,संजय सुरेश जाधव, अर्जुन गोपाल जाधव,सुरेश सखाराम जाधव सर्व रा.चिंचाल लालबाग तहसील बऱ्हाणपूर यांच्या विरुद्ध मृत्यू व हत्या अपराध प्रकरणी लालबाग पोलीस ठाणे बऱ्हाणपूर येथे तक्रार दाखल करण्यात आला आहे.
आरोपी हे फिर्यादीच्या बहिणीला नेहमी मारहाण करीत होते तसेच मानसिक छळ देखील करीत होते यापूर्वी देखील त्यांनी ५ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारच्या वेळेस दारू पिऊन अश्लील शिवीगाळ करून घरात असलेल्या डिझेलच्या साह्याने जाळण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता.
तसेच यापूर्वी ६ फेब्रुवारी २०२२ रोजी देखील त्यांनी मला व माझ्या बहिणीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.
माझी बहीण ज्योती व तिच्या पती दिनेश जाधव यांच्या विवाह १८ वर्षांपूर्वी झाला होता. विवाह नंतर त्यांना दोन मुलं जन्माला आली.त्यात सतरा वर्षाची मुलगी लक्ष्मी व पंधरा वर्षाचा मुलगा दीपक या दोन मुलांचा समावेश आहे.
आरोपी क्रमांक दोन माझ्या बहिणीची सासू आहे.आरोपी क्रमांक तीन, चार व पाच माझ्या बहिणीच्या ननंद आहेत. आरोपी क्रमांक सहा माझ्या बहिणीच्या नणंदचा पती आहे. आरोपी क्रमांक सात माझ्या बहिणीचा दिर आहे.आरोपी क्रमांक आठ माझ्या बहिणीच्या भाचा आहे आरोपी क्रमांक नऊ माझ्या बहिणीच्या सासरा आहे.
यासंदर्भात याआधी देखील मी व माझ्या बहिणीने ७ फेब्रुवारी २०२२ रोजी पोलीस निरीक्षक लालबाग ठाण्यात तसेच पोलीस अधीक्षक बऱ्हाणपूर येथे तक्रार अर्ज दाखल केला होता.
पोलीस ठाण्यात या आधी दाखल केलेल्या तक्रारींच्या गांभीर्याने जर विचार करून कारवाई केली असती तर आज रोजी माझ्या बहिणीची फाशी देऊन जी हत्या करण्यात आलेली आहे ती हत्या करण्याची हिम्मत आरोपींची झाली नसती अशा प्रकारची भावना फिर्यादीने व्यक्त केली आहे.तरी पोलीस प्रशासनाने आता तरी गांभीर्याने विचार करून आरोपींना कडक शिक्षा व्हावी व त्यांना देखील फाशी व्हावी अशा प्रकारची मागणी केली आहे.माझ्या बहिणीने फाशी लावली आहे अशा प्रकारची माहिती मला संजय सुरेश जाधव यांनी फोन करून सांगितले मी जेव्हा हॉस्पिटलला पोहोचलो तेव्हा माझी बहिण पी.एम. रूम मध्ये मला आढळून आली.
तरी सर्व आरोपींनी संगनमत करून माझ्या बहिणीच्या जीव घेतला असून सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी फिर्यादीने केली आहे.