Home Blog Page 263

शेतकऱ्याच्या कल्याणासाठी शेतीविषयक व शेतीपूरक व्यवसाय मार्गदर्शन , संग्रामपूर मित्र परिवार तथा प्रहार जनशक्ती पक्ष यांचा संग्रामपूर येथे उपक्रम

0

 

संग्रामपूर मित्र परिवार व प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतीने आयोजित शेतीविषयक व शेतीपूरक व्यवसाय मार्गदर्शन दिनांक २२|०९ |२०२२ ला आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात शेतीपूरक व्यवसाय गाई व म्हशी पालन व त्या व्यवसायाला मिळणार अनुदान व सरकारी योजनांची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ शेंडे यांनी दिली .तसेच अतिशय सखोल मार्गदर्शन शेतीविषयक योजना व त्यावर मिळणार अनुदान विविध पिकांची लागवड कशी करावी व सिंचन योजनेत मिळणारे फायदे याची सखोल माहिती कृषी अधिकारी गवई साहेब यांनी दिली .या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचलन प्राचार्य अशोकजी थोटांगे सर यांनी केले. प्रास्ताविक विजूभाऊ वानखडे यांनी व हरिभाऊ नारायणराव तायडे यांनी केले .तसेच आभार प्रदर्शन आपल्या दमदार शैलीत मराठीतून हमीद भाऊ पाशा यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मित्र परिवार संस्थापक अध्यक्ष शंकरभाऊ पुरोहित व सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेऊन सांगता केली.

उमरी येथे २५० जनावरांना मोफत लसीकरण:

0

 

तुकाराम राठोड,जालना

प्रतिनिधी:(जालना)आज उमरी येथे मोफत लसीकरण संपन्न झाले.जवळपास २५० जनावराचे लसीकरण करण्यात आले.यावेळी उपस्थित युवा नेते धैर्यशिल भैय्या चव्हाण,सरपंच पद्माकर हंडे,विकास चव्हाण,डॉ.गोंविद मोहिते,लहूराव गाडेकर,बबनराव गाडेकर,मुरलीधर गाडेकर,बाबासाहेब गाडेकर,भिकाजी कळकुंबे,ज्ञानदेव चौधरी,भाऊराव गाडेकर,सखाराम कळकुंबे,भाऊसाहेब गाडेकर,गोंविद गाडेकर,माजी सरपंच गजानन गाडेकर,जनार्धन गाडेकर,बळीराम गाडेकर,सुभाष गाडेकर,तुकाराम गाडेकर,गुलाब शेख,अर्जून पटेकर,ज्ञानदेव मांदळे,तुकाराम किनकींने,कृष्णा कळकुंबे,संदिप गाडेकर,विष्णू गाडेकर,महादेव गाडेकर,कृष्णा गाडेकर,रतन मांदळे,अंकुश किनकीने,शरद गाडेकर,मयूर गाडेकर,भागवत गाडेकर,संग्राम गाडेकर,सुरेश गाडेकर अनेक शेतकरी बंधू उपस्थित होते.

बोदवड येथे निलंबीत पोलीस निरीक्षक किरणकुमार

0

 

बकाले यांचे विरुद्ध बडतर्फीची कारवाई करावी या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम राबवली जात आहे.

जिल्हा प्रतिनिधी सतीश बावस्कर

येथील आंबेडकर चौकात आज दुपारी चार वाजेपासून सुरू झालेली ही मोहीम उद्या सुद्धा सुरू उद्या पर्यंतसुरू राहणार आहे. आज सुरू असलेल्या या मोहिमेसाठी नगराध्यक्ष आनंदा पाटील, सुनील बोरसे, संजय गायकवाड, हर्षल बडगुजर,शांताराम कोळी, कलीम शेख, नगरसेवक राजेश नानवाणी,नगरसेवक सईद बागवान,दिनेश माळी,गोलु बरडिया गोपाळ पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.यावेळी अँड. रवींद्र पाटील यांनी सुद्धा स्वाक्षरी करून पाठींबा दिला .विनोद पाडर, शांताराम गंगतिरे ,देवेंद्र खेवलकर,जयदीप शेळके, निवृत्ती ढोले, संजय पाटील,अनंत वाघ, महेंद्र पाटील,संजय पाटील, जिया शेख,निलेश ठाकरे , नितीन चव्हाण, लतीफ शेख,यांच्या सह आठशेच्या वर विविध समाजाच्या प्रतिनिधी व नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. उद्या या सर्व स्वाक्षऱ्या असलेले निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रकांत पाटील ,यांना पाठवण्यात येणार आहे

जालना तालुक्यातील श्रावण बाळ,निराधार,अपंग,विधवा,मंजूर झालेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान वितरीत करणे बाबत,तहसीलदार जालना यांना भटके विमुक्त आघाडी तालुका अध्यक्ष तुकाराम राठोड यांच्यातर्फे निवेदन सादर:

0

 

प्रतिनिधी:(जालना)जालना तालुक्यातील श्रावण बाळ,निराधार,अपंग,विधवा,सेवा योजनेतील लाभार्थी मागील एक ते दोन वर्षापासून मंजूर किंवा पात्र झालेली आहेत.पण या सर्व लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.आजुनही त्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा झालेले नाही.त्याचे काय कारण असु शकते ? पण सदर लाभार्थ्यांनी मंजूर झाल्यानंतर सर्व कागदपत्राची पुर्ताता आपल्या कार्यालयाकडे सादर केलेली आहे.तरी पण आपले कर्मचारी बजेट नाही,येईल,होईल,बँकेत यादी पाठविली आहे.असे अनेक कारण वारंवार देत आहे.व अनुदान टाकण्यास टाळाटाळ करीत आहे.सदरील लाभार्थ्यांची जसे गोरगरीब,वचंती,शोषीत व कष्टकरी तसेच वयोवृध्द अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात यावे,जर एक आठवडयामध्ये अनुदान जमा झाले नाही.तर आपल्या तहसिल कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल व या आंदोलनामध्ये जालना तालुकयातील पात्र असुन सुध्दा अनदान न मिळणाऱ्या सर्व लाभार्थ्यांचा या ठिकाणी आंदोलनामध्ये समावेश केला जाईल.तसेच आंदोलनामध्ये काही अनुच्चीत प्रकार घडल्यास याची जबाबदारी आपली व आपल्या तहसिल प्रशासनाची राहील.याची आपण नोंद घ्यावी, अशा अशियाचे निवेदन तहसीलदार जालना यांना भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी तर्फे देण्यात आला आहे.या निवेदनावर तुकाराम राठोड,राजु राठोड,पांडूरंग आहेरकर,छबुराव राठोड,संजय रंधवे,लक्ष्मण राठोड ,शिवाजी राठोड,विष्णू राठोड,सचिन चव्हाण,श्याम पवार,नितीन पवार,गोरख जाधव,रमेश पवार,सुभाष चव्हाण,अनिल राठोड,गजानन चव्हाण,किशोर झोरे,संदीप चव्हाण सह अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.

Jalgaon Pik Nuksan/ येवती शिवारात अज्ञातांनी कपाशी पिक कापून फेकली.

0

 

जिल्हा प्रतिनिधी सतीश बावस्कर

बोदवड तालुक्यातील येवती येथे आसामी संकटातून वाचलेली कपाशी अज्ञातांनी शक्य बुडखापासून कापून फेकल्याच्या खळबळजनक प्रकार येवती येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आला याप्रकरणी शेतकऱ्याने बोदवड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला येवती शिवारात अल्पभूधारक शेतकरी शब्बीर खा आलफ खा पठाण यांची गट क्रमांक 438 मध्ये शेती आहे. त्यांनी खरिप हंगामात कपाशीची पिकांची लागवड केली कपाशी पिके चांगली तरारली असताना अचानक झालेल्या पावसानंतर ते गुरुवारी शेतात पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना चक्क कपाशी पिके कापुन फेकल्याचे दिसलें नविन फळधारणा झालेल्या कपाशी पिकावरील पिकांवर एक एक झाडांवर पन्नास ते साठ कैऱ्या पक्का झाल्या होत्या परंतु अज्ञातांनी या कपाशीच्या तब्बल पाव एकर जमीन क्षेत्रातील कपाशी कापणी करून नुकसान केले. शब्बीर खा आलफ खा पठाण यांनी पोलिसात याबाबत गुन्हा दाखल केला आहे याबाबत पुढील तपास पोलीस हवालदार संतोष चौधरी व पोलीस नाईक संदिप नारखेडे हे करीत आहे

 

Jalgaon Pik Nuksan

चेतना एज्युकेशन सोसायटी वर्धा व्दारा संचालीत चेतना औद्योगिक प्रशिक्षण संस्था वर्धा येथे दिक्षांत समारोह व निरोप समारोह संपन्न.

0

 

वर्धा : मलक नईम दि. १७ सप्टेंबर पासून सुरू झालेला सेवा पंधरवाडा व स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्याने -चेतना औद्योगिक

प्रशिक्षण संस्थेत दिक्षांत समारोह व निरोप समारोह आयोजित करण्यात आला होता. या समारोहाला लाभलेल्या अध्यक्ष संस्थेचे सचिवमा चेतना सवाई व प्रमुख अतिथी म्हणून चेतना आय स्थानी टि. आय चे प्रr प्राचार्य श्री. सलमान शेख सर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून आय. टि. आयच्या निदेशक कु· सुषमा श्रीखंडे उपस्थिती होते. 1. या दिक्षांत समारोहात विजतंत्री या व्यवसायाच्या द्वितीय सत्रातील हेमंत देव्हारे यांनी प्रथम क्रमांक (95.50%), विजय निमकर यांनी द्वितीय क्रमांक (89.33%) व गौरव काटेखाये यांनी तृतीय क्रमांक (88.83%) प्राप्त केले तसेच जोडारी या व्यवसायातील अमर • वालमांदरे यांनी प्रथम क्रमांक (82.32%), विक्रांत शंभरकर यांनी व्वितीय क्रमांक (79%) व सागर धनवटे यांनी तृतीय क्रमांक (78) प्राप्त केले आहे. उत्तीर्ण व प्राविण्यप्राप्त प्रशिक्षणार्थ्यांचा पुष्प व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच या कार्य समारोहाचे आयोजन कु· दिव्यलक्ष्मी नखाते निदेशक यांनी केले व समारोहाचे सुत्र संचालन – श्री. पराग नराजे व श्री. योगेश धोंगडे विजतंत्री निदेशक यांनी केले व आभार प्रदर्शन भावेश नेवारे यांनी केले. हा 1 समारोह यशस्वी होण्यासाठी संस्थेचे कर्मचारी सुनिता गायकवाड, व विजतंत्री व जोहारी प्रथम पब सत्र प्रशिक्षणार्थीनी सहकार्य केले.

सामरोद येथे प्रधानमंत्री फसल बिमा योजनेअंतर्गत फसल बिमा कार्य शाळा

0

 

सतीश बावस्कर बोदवड

प्रधानमंत्री फसल बिमा योजनेअंतर्गत सामरोद येथे फसल बिमा पाठशालेचे आयोजन करण्यात आले असुन मेरी पॉलिसी मेरे हाथ अभियान राबविण्यात आले. सदर पॉलिसी मेरे हाथ अभियान आणि फसल बिमा पाठशलेचे आयोजन जळगाव जिल्ह्यात शासकीय एग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी तर्फे हा उपक्रम जिल्ह्यातील सर्वत्र ठिकाणी राबविण्यात येत आहे.23 सप्टेंबर रोजी सामरोद येथे प्रधानमंत्री फसल बिमा योजनेअंतर्गत हा उपक्रम एग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी तालुका प्रतनिधी निलेश वाघ पंकज सपकाळे,नितीन राठोड तालुका प्रतिनिधी भूषण सपकाळे यांनी जामनेर तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी श्री अभिमन्यू चोपडे सर तसेच कृषी सहाय्यक एस. एस चीमंकरे सर, ऐ के तळवी राकेश पाटील व्हीं. टी. परखड, सामरोद येथिल सरपंच सौ.रूपाली श्रीकांत पाटील,उपसरपंच संजय कडू देसाई पोलिस पाटील कडू श्रावण बावस्कर यांच्या उपस्थितीत राबविण्यात आला तसेच गावातील सर्व शेतकरी बांधव या कार्यक्रमाला उपस्थित होते

अरे देवा!:सफरचंदाच्या पेट्या भरलेली ॲपे रीक्षाच बोदवड.मधून चोरट्यांनी लांबवली 

0

 

जिल्हा प्रतिनिधी सतीश बावस्कर

बोदवड येथे सफरचंदाच्या पेट्यांनी भरलेली ॲपे रिक्षा चोरट्याने शहरातील गांधी चौकातील डॉक्टर कांजळे यांच्या दवाखान्याजवळून लांबवल्याने शहरात ऐकच खळबळ उडाली या प्रकरणी बोदवड पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला सीसीटीव्ही द्वारे चोरट्यांचा शोध तक्रारदार शेख जाकीर शेख मसुद (जुना गाव परिसर सागवन जिल्हा बुलढाणा) यांनी गांधी चौकात ॲपेरिक्षा ( एम एच 28 टी .1977) ही बुधवारी 21 रोजी गांधी चौकात उभी केली होती या वाहनात २० हजार रुपये किमतीच्या 17 सफरचंदाच्या पेट्या ठेवण्यात आल्या होत्या मात्र चोरट्याने बुधवारी चार ते साडेपाच दरम्यान ॲपेरीक्षा लांबवली या प्रकरणी तपास पो नाईक शशिकांत शिंदे करीत आहे

JAlgaon Chandrkant Patil /आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्त साधुन भानखेडा येथे शालेय साहित्य वाटप 

0

 

जिल्हा प्रतिनिधी सतीश बावस्कर

बोदवड – तालुक्यातील भानखेडा येथेिल जिल्हा परिषद शाळेत आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचिित्त साधुन जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्य वाटपकरण्यात आले आमदार श्री.चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चंद्रकांत भाऊ पाटील जवळचे श्री.अमोल पाटील व चंद्रकांत पाटील समर्थक भानखेडा यांच्या कडून आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भानखेडा येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य (पाटी,कंपास पेटी, पाणी बाॅटल इतर शालेय साहित्य ) वाटप करण्यात आले. सोबत शाळेसाठी 2 पाण्याचे जार भेट देण्यात आले.
तसेच हिमजल अॅक्वा चे संचालक श्री.घनश्याम इंगळे यांची मुलगी प्रिक्षा हिचा आज पहीला वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेत वर्षभर 2 जार पाणी दररोज देण्याचे घनश्याम इंगळे यांनी जाहीर केले.
आज शाळेसाठी मदत करणारे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील मित्र परिवाराचे प्रमुख श्री.अमोल पाटील यांचे आभार जिल्हा परिषद शाळेच्या वतिने व नागरिकांच्या वतिने करण्यात आले.

प्रसंगी अमोल पाटील, राहुल मतकर ,मोहन दोडके ,घनशाम इंगळे ,नामदेव मिसाळ ,देवराम निकम ,मंगेश मतकर ,विनोद पाटील ,योगेश पाटील ,पवन पाटील ,योगेश ढसाळ ,अतुल दोडके ,लोकेश पाटील ,गोरखनाथ गायकवाड ,तुषार पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते..

रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्या पुढाकाराने आज नवीन आष्टी -अहमदनगर नवीन लाईनचे उद्घाटन आणि नवीन आष्टी-अहमदनगर डेमू सेवेचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ:

0

 

तुकाराम राठोड,जालना

प्रतिनिधी:(जालना) दि.22 सप्टेंबर 2022 रोजी
भारत सरकारचे रेल्वे,कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या पुढाकाराने आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या नवीन आष्टी-अहमदनगर नवीन रेल्वे मार्गाचे उद्घाटन होणार आहे. तसेच नवीन आष्टी-अहमदनगर डेमू सेवेच्या उद्घाटनाच्या सेवेला हे मान्यवर दि.23.09.2022 रोजी हिरवा झेंडा दाखवतील.

या प्रसंगी ना.राधाकृष्ण विखे पाटील,श्रीमती पंकजा मुंडे,श्रीमती रोहिणी शेंडगे,डॉ. प्रीतम मुंडे,डॉ.सुजय विखे पाटील,श्रीमती रजनी पाटील यांच्यासह आ.धनंजय मुंडे,बाळासाहेब आजबे,संग्राम जगताप,नमिता मुंदडा,संदिप क्षीरसागर,प्रकाश सोळंके,लक्ष्मण पवार,सुरेश धस,विक्रम काळे,सतीश चव्हाण,पल्लवी धोंडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत,तसेच इतर मान्यवरांना ही निमंत्रित करण्यात आले आहे.

पार्श्वभूमी आणि फायदे:

*66 किमी नवीन आष्टी-अहमदनगर ब्रॉडगेज लाईन 261 किमी अहमदनगर – बीड- परळी वैजनाथ नवीन ब्रॉडगेज लाईन प्रकल्पाचा एक भाग आहे. ज्यामध्ये भारत सरकार आणि राज्य सरकार यांच्यात 50-50 खर्चाचा वाटा आहे.

• डेमू सेवा नवीन आष्टी – अहमदनगर पट्ट्यातील रहिवाशांना आणि जवळपासच्या भागातील रहिवाशांना उत्तम कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करेल.

• यामुळे स्थानिक व्यापार आणि उद्योगांना चालना मिळेल आणि त्यामुळे मराठवाडा क्षेत्राच्या सामाजिक – आर्थिक विकासाला चालना मिळेल.

• डेमू ट्रेन अहमदनगरहून सकाळी 07.45 वाजता सुटेल आणि न्यू आष्टीला सकाळी 10.30 वाजता पोहोचेल आणि परतीच्या प्रवासात न्यू आष्टी येथून सकाळी 11.00 वाजता सुटेल आणि दुपारी 1.55 वाजता अहमदनगर येथे पोहोचेल.ही गाडी रविवार वगळता दररोज धावणार आहे.

• कडा,नवीन धानोरा,सोलापूरवाडी,नवीन लोणी आणि नारायणडोहो येथे थांबेल.