Home Blog Page 265

Hingnghat:-Duplicate Police/पोलीस असल्याचे सांगून एका वृद्ध व्यक्तीस थांबविले व पन्नास हजार रुपये घेत दुचाकीने पळाले

0

 

हिंगणघाट :- बबन माधव जवादे (वय ६५) राहणार नारायणपूर तालुका समुद्रपूर हिंगणघाट येथे 15 सप्टेंबर गुरुवार ला प्रकृती खराब असल्याने ते हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात आले होते. पैसे काढण्यासाठी ते पोस्ट ऑफीस कार्यालयात गेले तेथून रुपये काढले. त्यानंतर ते पोस्टातून बाहेर पडत रस्त्याने चालत निघाले. महावीर भवन समोर आले असता सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी आम्ही पोलीस असल्याचे सांगून थांबवले. दोघांनी हातचलाखीने त्यांच्याजवळील पिशवीत असलेली ५० हजार रुपयांची रक्कम घेत दुचाकीने पळून गेले बबन जवादे यांनी पिशवी पाहिली असता त्यांना पैसे दिसून आले नाही त्यांच्या लक्षात आले पोलीस सांगून फसवणूक केली त्यामुळे त्यांनी हिंगणघाट पोलीस इथे तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला.

Jalna:-Kishan/कुंपणच शेत खाई ! दाद कुणाला मागावा !!

0

 

(तुकाराम राठोड,जालना)

प्रतिनिधी:(जालना)माझ्या जिवाभावाच्या मित्रांनो आज महाराष्ट्रात सुशिक्षित रोजगाराच्या संदर्भाने बघितले तर,महाराष्ट्रात प्रती वर्ष माहीती तंत्रज्ञानाचे शिक्षण घेऊन लाखो विद्यार्थी महाविद्यालयातून बाहेर पडतात.
त्या हाताला योग्य वेळेत पाहीजे ते काम निर्माण करून देण्याचे काम इथल्या सरकारचे आहे.पण आज आपण पहातो लाखो सुशिक्षित तरूण हे बेरोजगार आहे.

खऱ्या अर्थाने वेदांत आणि फाॅक्सकाॅन या उद्योगामुळे महाराष्ट्रातील तब्बल एक लाखापर्यंत तरूणाच्या हाताला काम मिळाले असते.ज्या अपेक्षा घेऊन आज मुलांचे आई-वडील मुलांना शिकवतात त्या अपेक्षा मुलाकडून शिकल्यानंतर कामा आभावी पूर्ण होत नाही.त्यामुळे तरूण हा मनात तणावाखाली वावरत असतो.मोठ-मोठ्या उद्योगात काम करणारे तरूण मुले हे आमदार-खासदारांची नसतात,तर सर्व सामान्य परस्थितीतील आसतात,आडाणी शेतकर्यांची आसतात.याचे नेहमी राजकीय नेतृत्ववाने भान ठेवायला हवे.

वेदांत आणि फॉक्स कॉन हा प्रकल्प गुजरातमध्ये जाण्यास राजकीय ईच्छाशक्ती कारणीभूत आहे.आज महाराष्ट्रातील शेतकरी हा दिवसेंदिवस नैसर्गिक संकटात सापडत आहे.महागाई गगनाला भिडली.शुसिक्षित तरूण बेरोजगार आहे.ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत नाही.आशा अनेक अडचणीत दिवसेंदिवस वाढत चालली आहे.आणि राजकीय मंडळीना आशा गोष्टीचे गाभिर्य हारपलेले दिसते,हे राजकारणी अधिवेशनात धक्काबुक्की करतांना आपल्याला पहायला मिळाले आहे.यासाठी यांना जनतेने निवडून दिले आहे का? राजकारण हे वयक्तीक हेवे -दाव्यावर आलय.यांना याची जाणीव करून देणे गरजेचे आहे.

आज महाराष्ट्रातील तमाम जनतेला विनंती आहे की,उद्याचा महाराष्ट्र घडवण्यासाठी या गोष्टीचा सारासार विचार करण्याची गरज आहे.

व्याख्याते,कृष्णा गाडेकर
मो.7350773253

 

Jalna:-Kishan

AbhaySingh/हे काम केल्याने सरपंच पदाला खरा न्याय दिल्यागत वाटलं!-अभयसिंह

0

 

आपलं गावचं नाही का तिर्थ। बाबा रिकामा कशाला फिरतं।।
आपल्या गावची शाळा मोडली।

धर्मशाळा तीर्थाशी बांधली ही जानच नाही का व्यर्थ।।
या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीता ओवीला समजून घेऊन. आपल्या गावातील शाळेला कसं उन्नतीकडे नेता येईल किंवा तिचा दर्जा कसा उंचावता येईल यावर काम करण्याचा विचार ग्रामपंचायत मध्ये आम्ही केला. आणि तो विचार करण्यासाठी सर्व दोन्ही पॅनलच्या सदस्यांनी त्यावर संमती दर्शवली.

Abhay singh
Abhay singh

आणि मग शाळेवर काम करण्यास ठरवलं,कारण गावातील शाळा ही का जर सर्व बाबतीत समृद्ध झाली तर गावातील शाळेच्या शिक्षणा दर्जा उंचावतो आणि त्यात शिक्षण घेणारे मुले आणि त्यातही जर त्या मुलांना चांगल्या वातावरण शिक्षण मिळालं तर त्या सर्वसामान्य कुटुंबातील मुलांचे शिक्षणात लागलेलं मन आणि अशा प्रसन्न वातावरणात घेतलेले शिक्षण निश्चितच मुलांच्या शिक्षणाच्या प्रगतीचा एक भाग असू शकतो. आणि अशा प्रसन्न वातावरणात आणि सर्व सुख सोयी असल्यावर शिकवण हे त्या शाळेतील शिक्षकांसाठी सुद्धा सोयीचं होतं. आणि म्हणून च *ग्रामपंचायतच्या 15 वित्त आयोगातून शाळेला सोलर पॅनल, मुलांना शूज उच्च प्रतीच्या स्कूल बॅग आणि सुंदर असं आय कार्ड* वाटण्याचा मानस आमचा होता. आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व मंडळींच्या मदतीने पूर्णत्वास पण नेला. आम्ही जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी *शाळा पळशी झाशी येथे शिकत असलेल्या 258* विद्यार्थ्यांना आम्ही या साहित्याचे वाटप केले. आणि या जिल्हा परिषद मध्ये शिकणाऱ्या मुलांना खाजगी संस्था सारख्याच दर्जेदार वातावरण कसे मिळेल किंवा त्यापेक्षाही चांगलं वातावरण कसे निर्माण करता येईल. या अनुषंगाने त्या मुलांची काळजी घेण्याचे काम आम्ही करत आहोत.आणि मला वाटते सर्व सरपंच बांधवांनी गावातील जिल्हा परिषद शाळेचे उदात्तीकरण करून त्यात सर्व सुख सुविधा उपलब्ध करून दिल्या तर आपल्या गावातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलं मुली निश्चितच चांगले शिक्षण घेऊन आपली शैक्षणिक प्रगती साधतील यात तीळ मात्र शंका नाही.
मला यात साथ देण्याऱ्या आमच्या उपसरपंच, सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य यांचे मनःपूर्वक आभार.

आपल्या गावची शाळा
आपला स्वाभिमान.

 

Lampi/लम्पी आजाराची लस उपलब्ध करून, मोफत लसीकरण मोहीम राबवावी-हर्षल फदाट(बापू) ना.राधाकृष्ण विखे पाटील (पशुसंवर्धनमंत्री )यांच्याकडे हर्षल फदाट पाटील यांची मागणी

0

 

राज्यात सध्या धुमाकूळ घातलेल्या लम्पी स्किन आजाराने आता सर्वच जिल्ह्यात शिरकाव केला आहे. गाई, बैल यासारख्या पाळीव प्राण्यांमध्ये लम्पी स्कीन या रोगाची साथ आल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये लसांचा साठा उपलब्ध करून, मोफत लसीकरण मोहीम राबवावी अशी मागणी हर्षल पाटील फदाट यांनी राधाकृष्ण विखे पाटील पशुसंवर्धन मंत्री यांच्याकडे तहसील कार्यालय जाफ्राबाद यांच्या मार्फत निवेदन सादर केले आहे.

Lampi
Lampi

लॉकडाऊनमुळे प्रचंड नुकसान शेतकरी वर्गाचे झाले. तर कधी कमी पाऊस, कधी जास्त पाऊस तर कधी दुष्काळ,तर कधी अतिवृष्टी तर अशा अनेक संकटांचा सामना शेतकरी नेहमी करत असतो खरीप हंगामाची पेरणी शेतकऱ्यांनी उसनवारी केली. पण आता लम्पी स्किन आजार निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
गाई,म्हशी,आणि बैलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे जनावरांच्या किंमती प्रचंड वाढलेल्या असताना शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे जवळपास शेतकऱ्यांकडे लाखो रुपयांचे जनावरे आहेत.त्यामुळे लम्पी आजाराला आवर घालण्यासाठी मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी हर्षल पाटील फदाट यांनी राधाकृष्ण विखे पाटील (पशुसंवर्धन मंत्री) यांच्याकडे केली आहे.

 

Lampi

Shiv senik/ शिव सैनिका ची रोज बुधवारला सायंकाळी ठीक पाच वाजता हिंगणघाट शिवसेना पदाधिकारी, माजी नगरसेवक व शिवसैनिक यांची संयुक्त बैठक सांम्पन

0

 

हिंगणघाट मलक नईम।

वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख मा. बाळाभाऊ राऊत तथा जिल्हाप्रमुख श्री. अनिल भाऊ देवतारे यांच्या दिलेल्या सूचनेप्रमाणे तथा वर्धा हिंगणघाट जिल्हा समन्वयक मा. श्री. डॉ. उमेश तुळसकर तथा उपजिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे व शहर प्रमुख सतीश ढोमणे यांच्या नेतृत्वात मातोश्री महिला महाविद्यालय ,नंदोरी रोड, हिंगणघाट येथे घेण्यात आली. बैठकीचे प्रमुख मुद्दे येणाऱ्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2022 करिता पक्षांचे ध्येय- धोरण,संघटन मजबूत करणे, निवडणुकीचा कार्यक्रम आखण्यात यावा व निवडणुकीची तयारी करणे या संदर्भात चर्चा करण्यात आली. —–बैठकीची सुरुवात राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बैठकीत प्रास्ताविक माजी नगरसेवक श्रीधर कोटकर यांनी मार्गदर्शन केले .त्यांनी बैठकीत शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना आता सुरू असलेल्या राज्यात व देशात पक्षाच्या घडामोडी बद्दल सांगितले . इथे शिवसैनिक बैठकीला उपस्थित आहे ते सर्व निष्ठावान शिवसैनिकाची आहे .आपण शिवसेनेच्या जन्मा पासूनच हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सध्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे साहेबांसोबत आहो असे त्या ठिकाणी कळविले. त्यानंतर वैद्यकीय सेलचे डॉ. आदर्श गुजर यांनी बैठकीत शिवसैनिकांना नेतृत्वाबद्दल महत्व पटवून दिले. त्यांनी सांगितले की आपले नेतृत्व आपले पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आहेत. ते मजबूत आहे त्यामुळे आपल्याला न डगमगता येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड देऊन समोर जायचे आहे असे त्यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. तसेच बैठकीत हिंगणघाट तालुक्याचे शिवसेना तालुकाप्रमुख सतीश धोबे यांनी पक्ष संघटन मजबुती करिता प्रत्येक वार्डात आपल्या ज्या शाखा आहे ते नूतनीकरण करून पुन्हा शाखा बांधणी करावी. तसेच वार्डात सभा -बैठका घेण्यात यावे असे सर्व शाखाप्रमुखांना निर्देश दिले. नगरपरिषद येथे भाजपा सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराबाबत जसे अमृत योजनेचे पाणीपुरवठा योजना तथा मल्लनिसारण हे दोन्ही योजनेतील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळे कसा नागरिकांना त्रास झाला आणि त्या त्रासाला आजही जनता भोगत आहे.या साठी स्थानिक आमदार व नगराध्यक्ष पूर्ण पणे जवाबदार, तसेच नगरपरिषदेतील भाजप सरकार हे पूर्णतः अपयशी ठरले. त्यांना नगर परिषद प्रशासनवर नियंत्रण नव्हते ठेवता आले नाही ,या दोघांनी मोठया प्रमाणात भ्रष्टाचार केला तो जनते समोर आना व वार्डातील जनतेला पटवून द्यावे.त्यांच्या पक्षातील नगरसेवक मनातून नाराज आहे काही त्यातील जास्तीतजास्त लोक आमच्या लोकांच्या संपर्कात आहे. शेवटी ते हि नगर सेवक आहे गडी नाही, त्यांना सुद्धा मानसम्मान आहे त्यांची सहन करण्याची शक्ती संपली असे दबल्या आवाजात ते बोलत आहे. तसेच महिला आघाडी, युवासेना तथा शिवसैनिक यांनी एकत्र येऊन घरोघरी जाऊन शिवसेनेचे महत्त्व पटवून देणे व त्यांना आपल्या पक्षाला नगर परिषद मध्ये संधी द्याल अशी विनंती करा.वार्डात घरोघरी शिवसैनिक तयार केले जावे. माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी राज्य पातळीवर संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघ सोबत युती केल्यामुळे आपले येथील संभाजी ब्रिगेडचे श्री राजूभाऊ धोटे व त्यांच्या पदाधिकारी सोबत बैठक घेऊन चर्चा करण्यात आली होती. ते सर्वजण आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. निवडणूक कालावधी मध्ये ते आपल्याला मदत करतील असे त्यांनी सांगितले. त्यानंतर शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री .राजेंद्र खूपसरे यांनी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित केले त्यांनी येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका जसे नगरपरिषद, जिल्हा परिषद तथा पंचायत समिती या सर्व निवडणुकीकरिता शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक कार्यकर्त्यांनी कामाला लागावे व पक्ष मजबूत करण्याकरिता “गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक” ही संकल्पना राबवावी. तथा सरकारमध्ये असलेल्या देशात राज्यात व शहरात भाजपाने मागील आठ वर्षात केलेल्या भ्रष्टाचाराचा परिपाठ वाचला व हा परिपाठ जनतेपर्यंत पोहोचवावा असे कार्यकर्त्यांना सांगितले. भाजपाच्या सरकार मध्ये देशात महागाई ,बेरोजगारीचा मोठा प्रश्न जनतेसमोर येऊन ठाकला आहे . शासन प्रशासन कुठेही दिसत नाही त्यामुळे सर्वीकडे भाजप पासून जनता त्रस्त आहे. फक्त पुढे कोणी येऊन बोलत नाही शिवसेना या विरुद्ध बोलत असते. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी सर्व शिवसेना, महिला आघाडी तथा युवासेना च्या पदाधिकारी व शिवसैनिकांना एक संघ राहण्याचे आवाहन केले. सभेकरिता प्रमुख शिवसेना पदाधिकारी म्हणून या वर्धा -हिंगणघाट जिल्ह्याचे समन्वयक मा. श्री. डॉ. उमेश तुळसकर यांनी सांगितले की हिंगणघाट येथे प्रत्येक पक्षाचे मेळावे झाले व त्या मेळाव्यात त्यांच्या त्यांच्या पक्षाचे मोठे नेते बोलाविले .तसेच आपण सुद्धा नगरपरिषद निवडणुकी करीता युवासेना प्रमुख मा. आमदार श्री .आदित्यजी ठाकरे साहेब ,यांना बोलावून घेवू असे आश्वासन शिवसैनिकांना केले. मी नगरपरिषद निवडणूक लढणार नाही असे त्यांनी घोषित केले. पक्षाचा सर्व निवडणूक यंत्रणे वर लक्ष ठेवून या नगरपरिषद वर जास्तीत जास्त सदस्य निवडून आणून भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही असे कार्यकर्त्यांना आश्वासित केले.आपल्या पक्षाला मजबूत करणे व या शहर, तालुक्यातून भ्रष्टाचारी पक्षाला तडीपार केल्या शिवाय मि शांत बसणार नाही.तसेच बैठकीत महिला जिल्हा संघटिका सौ. संगीताताई कडू , शहर प्रमुख सतीश ढोमणे ,युवासेना जिल्हाधिकारी अभिनंदन मनोत, उपतालुकाप्रमुख प्रकाश अणासाने ,शहर संघटक मुन्ना त्रिवेदी, युवा सेनेचे शहर प्रमुख भूषण कापकर, माजी नगरसेवक मनीष जेवढे, निताताई धोबे, माधुरीताई खडसे ,मनोज वरघणे, भास्कर ठवरे,देवेंद्र पडोळे, नारायण जाधव,संगीताताई वाघमारे, प्राची प्रसापाचखेडे,नीलिमा शंकर मोहमारे, स्वाती संजय पिंपळकर,रजनीगंधा मोहन तुमराम,प्रियंका अविनाश धोटे,रेश्मा बाकरे,ज्योती रवी रंगारी,उपशहर प्रमुख गजानन काटोले,जयकुमार रोहनकार, संजय पिंपळकर, शंकर झाडे ,लक्ष्मण बकाने ,विभाग प्रमुख -रुपेश काटकर, मोहन तुमराम,अविनाश धोटे,सचिन मुडे, शाम सातपुते ,नितीन वैद्य, महेश खडसे, ज्येष्ठ शिवसैनिक सुनील आष्टीकर,सुरेश चौधरी,बंटी वाघमारे, दिनेश धोबे, अनिल लालटेंनवार,प्रकाश घोडे, मारुती अराडे,किशोर इंगोले, दिलीप चौधरी, प्रकाश भुसारी,प्रफुल क्षिरसागर,आशिष जैस्वाल, आशिष भांडे,भास्कर मानकर, अनंता गलांडे,मनोज मिसाळ, योगेश गोडमारे,विवेक भोयर,सुरेश किंनेकर, नरेश भजभूजे,मनोज जुमडे, हरदिप काळे,संदीप चावरे, चंदू भुते, देवा शेंडे,नरेश खुरपडे,गोपाल चौधरी,गौरव गडेकर,संतोष चौधरी,गजानन डोंगरे,रवींद्र काळे, मुरलीधर घाटे,विशाल नागापुरे, प्रकाश भोयर,सुरज रंगारी, नितीन तायडे,हिरामण आवारी,बलराज डेकाटे,निखिल झिबल,पप्पू इटनकर,

 

Shiv senik

Hindi divas/स्कूल ऑफ स्कॉलर्स या शाळेने ‘हिंदी दिवस’ साजरा केला।

0

 

हिंगणघाट। मलक मो नईम

स्कूल ऑफ स्कॉलर्सने 14 सप्टेंबरचा दिवस हिंदी दिवस म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला. संपूर्ण भारतात हिंदी भाषेचे महत्त्व म्हणून हिंदी दिवस साजरा करण्यासाठी स्कूल ऑफ स्कॉलर्सने पुढे पाऊल टाकले. कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक डॉ. उषा साजापूरकर, प्रमुख अतिथि भारतीय युवा संस्कार परीषदेचे प्रदीपकुमार नागपुरकर प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी साहित्य शिरोमणी पुरस्कार यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. इयत्ता सातवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी हिंदी गाण्यांद्वारे मधुर वातावरण निर्माण केले. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी भारतातील सर्व राज्यांमध्ये हिंदीचे महत्त्व सांगणारे, भारतातील संस्कृती आणि संस्कारांचे सादरीकरण करणारे नाटक सादर केले. पाहुण्या उषा साजापूरकर यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या भाषेचे महत्त्व मांडले, त्यासोबतच ऑनलाइन शिक्षणाचे स्त्रोत बनलेली हिंदी भाषा इंग्रजीपेक्षा कमी महत्त्वाची नाही, असे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. . प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी झाशी की राणी लक्ष्मीबाईच्या भूमिकेत आरोही हेमके, सरोजिनी नायडूच्या भूमिकेत नेहा उदासी, मुन्शी प्रेमचंदच्या भूमिकेत कनिका लोधी, हरिवंशराय बच्चनच्या भूमिकेत अनुज नौकरकर, मीराबाईच्या भूमिकेत आकांक्षा चाफले, डॉ बाबासाहेबांच्या भुमिकेत गुरुराज डोंगरे यांनी आपल्या कला सादर केल्या. इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी हिंदी भाषेवर आधारित नृत्य सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्याला मेडल व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका शिल्पा चव्हाण यांनी या दिवसाचे महत्त्व सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या. इयत्ता सहावीच्या स्वरा थूल यांनी आभार मानले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

 

Hindi divas

Maratha Morcha/मराठा मोर्चा आक्रमक, संपूर्ण महाराष्ट्रातून संतापजनक प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक बकाले याची बडतर्फिची मागणी

0

 

यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे

 

जळगाव स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांनी मराठा समाजाविरुद्ध अश्लील भाषेत संभाषण समस्त मराठा समाजाची मानहानी केल्याने तालुक्यातील मराठा समाजामध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे .गुरुवारी यावल तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने येथील तहसीलदार महेश पवार व पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांना बकाले यांना बडतर्फ करण्याच्या मागणीचे निवेदन देत समाजाच्या वतीने तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत .बडतर्फ करण्याची कारवाई न केल्यास समाजाच्या वतीने राज्यस्तरीय तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनात दिला आहे.

येथील तालुका मराठा समाजाच्या वतीने भुसावळ रस्त्यावरील तहसीलदार कार्यालय व पोलीस स्टेशन पर्यंत भर पावसात शेकडोच्या संख्येने मोर्चा नेत तहसीलदार महेश पवार व पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांना निवेदन सादर केले .याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, जि. प. माजी शिक्षण सभापती रवींद्र पाटील ,मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अजय पाटील यांनी तीव्र भावना व्यक्त करत समाजाच्या वतीने बडतर्फ करण्याची मागणी केली आहे बडतर्फ न केल्यास समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही दिला आहे आंदोलनात किनगाव चे विजयकुमार देवचंद पाटील, दहिगाव चे उपसरपंच देविदास धांगो पाटील, देवकांत पाटील, वसंत पाटील ,प्रा.संजय पाटील ,प्रा.संजय कदम ,छाया अतुल पाटील ,वर्षा अजय पाटील ,मनीषा अनिल गावडे ,डी.सी .पाटील, एड. डी .आर.बाविस्कर, दिनकर क्षीरसागर, सुनील गावडे , दत्तात्रय पाटील, डी.जे . पाटील, गणेश महाजन, ए .एन.यादव ,एम.ए .पाटील, किरण शिंदे, बापू जासूद ,तुषार येवले ,दिलीप इंगळे, विलास येवले ,हेमंत येवले ,प्रा .मुकेश येवले, एकनाथ शितोळे ,समाधान पाटील ,दौलत मराठे, यशवंत जासूद ,रवींद्र टोंगळे ,यशवंत भोईटे, निलेश पवार, प्रकाश पवार ,भूषण पवार ,अशोक पाटील, शैलेश पवार ,पप्पू पाटील ,विजय यादव, गोपाल जासूद ,विजय पाटील ,समीर पवार ,सुनील येवले, महेश पाटील, प्रवीण पाटील ,अमोल खैरनार, एन.पी .चव्हाण ,योगेश चव्हाण, अनिल सोनवणे, अक्षीत जासूद ,संजय पाटील, राकेश शिर्के ,विलास पवार, नरेंद्र पाटील, गणेश येवले, गोकुळ भोईटे ,यांचे सह तालुक्यातून अनेक समाज बांधव उपस्थित होते

सामाजिक तेढ निर्माण करणारे अधिकारी कलंक

माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी मत व्यक्त करताना सांगितले की राज्यात मराठा समाज पालकत्वाची भूमिका निभावत असून सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जात असताना पोलीस विभागातील एका जबाबदार पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने समाजाविषयी असं संभाषण करणे म्हणजे पोलीस विभागाला कलंक असल्याचे म्हटले याप्रसंगी माझी जि. प. सभापती रवींद्र पाटील अजय पाटील यांनीही आक्रमक भूमिका

 

Maratha Morcha

Jigaon praklap /जिगाव प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली काढा….

0

 

शेगाव :- गेली काही वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेल्या जिगाव प्रकल्पाचे काम चालू आहे.

या प्रकल्पामध्ये अनेक गावातील शेतकऱ्यांची शेती ही जात असून त्यामध्ये काही गावातील शेतकऱ्यांना शेतीचा मोबदला मिळून झाला तर अनेक गावातील शेतकरी हे अद्याप पर्यंत आपल्या जमिनीचा मोबदला मिळत नसल्यामुळे चिंतेत पडलेले आहे.

तसेच अनेक गावातील पुनर्वसन गावठाण चे प्रश्न सुद्धा जैसे थे असल्यामुळे ही सुद्धा प्रकल्पग्रस्त लोकांची डोकेदुखी ठरत आहे.

हे सर्व प्रश्न आज सातळी येथील ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी विदर्भ विकास पाटबंधारे कार्यालय शेगाव येथे जाऊन कार्यकारी अभियंता हजारे साहेब यांची भेट घेतली.

त्या भेटी प्रसंगी गावातील बहुसंख्य शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Jigaon praklap

 

Nuskasan bharpae / अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाचे नुकसानीचे पंचनामे करावे यासाठी राष्ट्रीय बंजारा परिषद जालनाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन सादर:

0

 

प्रतिनिधी:(जालना)जालना तालुक्यातील मौजे साळेगाव,नेर,मोहाडी,पाहेगाव,मोतीगव्हाण,सावंगी तलाव,दहिफळ,मानेगाव,पारेगाव, मौजपुरी,बाजीउंब्रद,वखारी,राठोड नगर(शिवनी),शेवली,पाथरूड, उखळी,शिवनगर,काकडा,शंभू सावरगाव सह आदी गावांमध्ये मागील सात ते आठ दिवसापासून सतत रिमझिम व मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे मुग,उडीद,सोयाबीन,कापूस,मका या पिकाचे मोठ्या प्रमाणात Nuksan bharpae झालेली आहे.सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतीमालाचे नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झाला आहे.तसेच मागील काही दिवसांपूर्वी नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाचे तात्काळ पंचनामे करून सदरील झालेल्या नुकसानी बाबत शासन-प्रशासना मार्फत नुकसान भरपाई देण्यात यावी

Nuksan bharpae

याबाबत राष्ट्रीय बंजारा परिषद जालनाच्या वतीने मागणी करीत आहे.सदर या निवेदनावर जिल्हाध्यक्ष शाम राठोड,जिल्हा प्रसिद्ध प्रमुख तुकाराम राठोड,पंकज राठोड,संजय रंधवे,राजू राठोड,लक्ष्मण राठोड,नितीन पवार,शिवाजी राठोड,श्याम पवार,गजानन चव्हाण,मधुकर मस्के,विष्णू राठोड,सचिन चव्हाण,कृष्णा राठोड,माकोडे मामा सह अनेक पदाधिकाऱ्यांच्या व शेतकऱ्यांच्या या निवेदनावर स्वाक्षरी आहे.

Nuksan bharpae

शेलवडच्या माझी सरपंचास गैर व्यवहारपप्रकणी अटक

0

बोदवड प्रतिनिधी सतीश बावस्कर

बोदवड तालुक्यातील शेलवड ग्रामपंचायत येथील चौदाव्या आणि पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीत वेळोवेळी गैरव्यवहार केल्याचा आरोपाखाली गुन्हा दाखल असलेल्या फरारी संशयित माजी प्रभारी सरपंच निलेश माळी यास अटक करण्यात आले आहे शेलवड मुक्तळ विचवा सुरवाडे बुद्रुक ग्रामपंचायतीत 30 डिसेंबर २०१८ ते १७ फेब्रुवारी 2021 दरम्यान लाखोच्या गैरव्यवहार झाल्याची बाब उघड झाली होती या प्रकरणी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) रमेश भास्कर सपकाळे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार तत्कालीन ग्रामसेवक संदीप चंद्रभान निकम आणि शेलवड चे तत्कालीन प्रभारी सरपंच निलेश शांताराम माळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता या 52 लाख 94 हजार 180 रुपयाच्या गैरव्यवहाराचा ठपका दोघा संशयितावर होता त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा जळगाव कडे वर्ग करण्यात आला होता संशयित ग्रामसेवक निकम यांनी उच्च न्यायालयातून अंतरीम जामीन मिळण्याचे समजते तर संशयित निलेश माळी यांनी सुद्धा अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न केल्याचे समजते दरम्यान फरार असलेले संशयित निलेश माळी हे रात्रीच्या वेळी घरी येत असल्याची माहिती बोदवड पोलिसांना मिळाली त्यामुळे पोलिसांनी पाळत ठेवून 12 तारखेस माळी यास अटक केली निलेश माळी यास न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे