Home Blog Page 266

बोदवड तालुक्यात लंपी ग्रस्त गावांची पशुसंवर्धन विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची पाहणी उपचारासाठी खाजगी पशुचिकित्सकांची मदत घेऊन पथक तयार केले.

0

 

जिल्हा प्रतिनिधी-सतिष बावस्कर

बोदवड तालुक्यातील लंपीग्रस्त गावात १८ आक्टोंबर रोजी डाॅ समीर बोरकर उपायुक्त पशुसंवर्धन पुणे, डाॅ श्री सतिष चौधरी सहाय्यक आयुक्त पुणे ,डाॅ सदाशिव सिसोदे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जळगाव येथे संपूर्ण दिवस थांबून लंपी बाधित पशूंची गावोगावी जाऊन पाहणी तसेच मोफत उपचार व मार्गदर्शन केले.पशुपालकांशी संवाद साधुन योग्य त्या उपचारा बाबत पशुपालकांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. तालुक्यातील सर्व लंपी बाधित पशूंना मोफत औषधसाठा उपलब्ध करून दिला.तसेच तालुक्यातील सर्व अधिकारी,कर्मचारी व खाजगी पशुचिकित्सक यांना उपचाराबाबत व खबरदारीच्या उपाय योजनांबाबत सुचना दिल्यात.सर्व बाधित पशूंना पुरेसा औषधसाठा जि.प.जळगाव मार्फत उपलब्ध करून दिला.बाधित पशुंना उपचारासाठी खाजगी पर्यवेक्षकांना शासकीय यंत्रणेच्या सोबत उपचार करणेबाबत मार्गदर्शन केले आणि त्यांना सोबत घेऊन पथक निर्माण केले .गेल्या महीनाभरापासून तालुक्यातील ६ खाजगी पशुधन पर्यवेक्षक यांनी लंपी नियंत्रणाकामी लसीकरण,औषधोपचारासाठी योगदान दिलेले आहे व यापुढेही आजार पूर्ण नियंत्रणात येईपावेतो सहकार्याची तयारी दाखवली.
गेल्यामहीनाभरापासून खाजगी पशुधन पर्यवेक्षक तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील व त्यांचे सहकारी शासकीय यंत्रणेच्यामार्गदर्नाखाली दिवसरात्र सेवा देत आहेत.त्याबद्दल मा.डाॅ बोरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कौतुक करत धन्यवाद दिले.
यावेळी डाॅ जाधव रामदास, जळगाव, डाॅ साखरे बोदवड, खाजगी पशुधन पर्यवेक्षक संघटना तालुका अध्यक्ष श्री. प्रशांत पाटील, श्री.सुरज पाटील हे उपस्थित होते.दरम्यान आदल्या दिवशी मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी भेट देऊन पाहणी केल्यानंतर
लंपी नियंत्रणाकामी मोफत लस व औषधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे.

विद्यार्थ्यांना गरज असते ती जिद्द आणि धेय्य ठरून पुढे जाण्याची शेगाव ची शेरयू देशमुख सी ई टी मध्ये राज्यातून पहिली

0

 

विठ्ठल अवताडे बुलढाणा प्रतिनिधी

शेगाव शहरातील मध्यंम वर्गीय कुटुंबात असणारी शेरयू देशमुख शिक्षणात आणि अभ्यासात नेहमीच खूप हुशार होती तिने अकोला येथे पुढील शिक्षण घेत असताना आताच झालेल्या सी ई टी मध्ये फिजिक्स ,केमेस्ट्री ,आणि मॅथेमॅटीक्स मध्ये १०० पैकी १०० गुण मिळवत महाराष्ट्रात प्रथम स्थान मिळवले आहे ,या यशामुळे शेगाव शहराच्या शिरेपेचात मनाचा तुरा खोवला आहे , तिच्या यशाचे श्रेय तिने आई वडील शिक्षकांना दिले ,तर स्वतः मेहनत करत आपण मनात जिद्द ठेऊन धेयाच्या दिशेने परिस्थितीची जाणीव ठेऊन वाटचाल करत पुढे गेलो तर यशसवी होण्यासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही ,पाहिजे असते धेय्य आणि त्यासाठी जिद्द मग यश आपोआप मिळत असेते ,तर मी ही आठ तास अभ्यास करत होते सोबतच नेहमी मला माझे ध्येय डोळ्यासमोर दिसत असल्या मुळे येवढे मोठे यश मला सहज मिळवता आले असे तिने बोलताना सांगितले तर आई वडील शिक्षक नातेवाईक मित्रमैत्रिणी तथा अनेक सामाजिक वेक्तीनी तिचे कौतुक केले असून इतर विद्यार्थ्यांसाठी ती आदर्श ठरली आहे आज सर्वत्र तिचे कौतुक होत आहे यावेळी संभाजी ब्रिगेड शेगाव वतीने तसेच नागरिकांनी सत्कार केला यावेळी संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष विठ्ठल अवताडे , ज्ञानेश्वर निंबाळकर , सुधीर पोरे , महेश गावंडे ,उमेश अवचार , आकाश पवार सह इतर नागरिक उपस्थित होते

वाघीण व दोन पिल्लांची दहशत परिसरात 3 जनावर जखमी तर 1 ठार

0

 

समुद्रपूर :- 17 सप्टेंबर
गिरड परिसरातील धोंडगाव ,हिवरा, बोतली , सावरखेडा ,सुकळी या गावा च्या आजू-बाजूला वाघीण व दोन पिल्ले फिरत आहेत.दोन दिवसात 3 जनावराला जखमी तर एक जनावराला ठार केले त्यामुळे परिसरात दहशत पसरली आहे .

वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली बारेकर :-
:वनविभागाची टीम दाखल झाली आहे व परिसरात खैरगाव येथे 1 गाय मारली व 1 जखमी, सावरखेडा येथे 1 गाय जखमी, धोंडगाव येथे एक गाय गंभीर आहे सध्या वाघीण व दोन पिल्ले सावंगी परिसरात गेल्याचे माहिती आहे. सोबत कॅमेरे सुद्धा लावण्यात आले आहे . आमची दिवस रात्र पेट्रोलिंग सुरू राहणार आहे . जो पर्यंत वाघीण व पिल्लू जंगलात जात नाही तोपर्यंत आमची गस्त रात्रंदिवस सुरू राहणार आहे परस परिसरातील लोकांना सतर्क राहण्याचे आव्हान केले आहे.
(नोंद :- प्रत्यक्षात एकच वाघ दिसला वाघीण व पिल्ले नव्हते )

Jalna /सावंगी तलाव येथे २०० जनावरांना देण्यात आली लंम्पची मोफत लस:

0

 

प्रतिनिधी:(जालना)जालना तालुक्यातील सावंगी तलाव येथे २०० जनावरांना देण्यात आली लंम्पची मोफत लस.जालना जिल्ह्यामध्ये या चर्मरोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे.याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रामध्ये जनावरांना मोफत लसीकरण शिबिर आयोजित करावा असा आदेश वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आला होता,त्याच अनुषंगाने मानेगाव पशुवैद्यकीय दवाखाना अंतर्गत जालना तालुक्यातील गावोगावी जाऊन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यां मार्फत मोफत लसीकरण कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे.त्याच आधारे आज रविवारी दिनांक 18 सप्टेंबर रोजी सावंगी तलाव येथे मोफत लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तुकाराम राठोड,अनिल राठोड तसेच ग्रामपंचायत सावंगी तलाव येथील सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मंडळी तसेच वैद्यकीय अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

शहर आनी परिसर मधे हाडपक्या गणेश उत्सव परंपरा पूर्ण वातावरणात साजरा.

0

हिंगणघाट: मलक मो नईम

शहर व परिसरात दोन वर्षाच्या कालावधी नंतर यावर्षी हाडपक्या गणेशोत्सव परंपरागत रित्या साजरा करण्यात येत आहे. सामाजिक व स्वर्ण व्यापारी सुभाष यादव राव नीनावे हे मागील 40 वर्षों पासून आपल्या रहिते घरी श्री गणेश ची प्रतिमा ची इस्थापना करीत आहे
या गणेश उत्सव चे महत्व वेगळेच आहे. नवसाला पावणारा अशी श्रद्धा श्रद्धाळू ची आहे.
तसेस स्थानीय न्यु यशवंत नगर येथे न्यु चैतन्य गणेश मंडल द्वारा हाडपक्या गणेश उत्सव चे २१ वे व्या वर्षांत प्रवेश होत आहे.
या वर्षी मांडला द्वारे परिसरातील लोकां साठी स्वास्थ शिबीर चे आयोजन केले आहे. या शिबिरास साठी विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय ची टीम और मंडळ पदाधिकारि संयुक्त रित्या शिविर छा आयोजन केले आहे.
परिसर च्या लोंकाना स्वास्थ सुविधा देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात लोकांची तपासणी करून त्यांना काही आजार असल्यास उन्हे उपचारार्थ सावंगी त भरती केल्या जाईल.
हडपक्या गणेश उत्सव च एक वेगळेच महत्व आहे . पितृ पक्ष च्या पर्व पर साजरा होणाऱ्या गणेश उत्सव वर लोकांची श्रद्धा आहे. लोकांची मनोकामनाएं पूर्ण होन्याचा चास विश्वास आहे. याच श्रद्धा ने गणेश उत्सव साजरा केला जात आहे.

Jalgaon Rohini tai khadse/ रोहिणीताई खडसे यांनी केले नुकसानग्रस्त शेतीची पाहणी तहसीलदारांसोबत पंचनामे करण्याविषयी केली चर्चा

0

 

गेल्या आठवड्यापासून सतत सुरू असलेला संततधार पाऊस व त्यातच शुक्रवार (दि 16) रोजी

जिल्हा प्रतिनिधी सतीश बावस्कर

बोदवड तालुक्यातील येवती, रेवती, जामठी शिवारात पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असुन मका, कपाशी,सोयाबिन, तुरीचे पिक कोलमडून पडले असुन जमिनदोस्त झाले आहे कपाशीच्या कैऱ्या काळवंडून सडायला लागल्या आहेत त्यामुळे शेतकरी बांधवांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे
परंतु अद्याप प्रशासनाने त्याचे पंचनामे केले नाही आहेत
आज येवती, रेवती, जामठी शिवारात शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करताना माननीय.

Jalgaon Rohini tai khadse
Jalgaon Rohini tai khadse

रोहिनीताई खडसे,
तहसीलदार श्वेताताई संचेती यांच्या सोबत दूरध्वनीवरून संपर्क करून सोमवार पासून नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करून शासन दरबारी मदतीसाठी पाठपुरावा करावा याबाबत चर्चा केली
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आबाभाऊ पाटील,रामदासभाऊ पाटील,कैलासभाऊ चौधरी, भरत अप्पा पाटील,गणेशभाऊ पाटील,किशोरभाऊ गायकवाड,प्रदिपभाऊ बडगुजर, दिपकभाऊ झाबड,विजयभाऊ चौधरी, रामरावभाऊ पाटील, प्रमोदभाऊ धामोडे,सतिष पाटील, किरणभाऊ वंजारी, हकिमभाई बागवान,लतीफ भाईशेख,मुजमिल शहा,अक्षय चौधरी, राजेश जैस्वाल,मयुर खेवलकर,आनंदा माळी, प्रफुल पाटील उपस्थित होते
यावेळी रेवती येथील सुपडू राऊत, बाबुराव सत्रे, संदिप राऊत, अंकुश भगत, संजय कापसे, सुभाष राऊत, रामदास भुसारी, वैभव जंजाळ,
येवती येथिल शांताराम सावरीपगार,अनिल अहिर, समाधान श्रावणे, हनिफ खा पटेल, नवल माळी, रामदास श्रावणे, विनोद माळी, अंजना बाई श्रावणे, सोपान चौधरी
जामठी येथील ईश्वर महाजन, पवन महाजन, सचिन महाजन, देविदास पाटील, विशाल महाजन,भागवत पाटील, शे मुनाफ, जितेंद्र पारधी, राजु पाटील, भागवत पाटील आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.

 

Jalgaon Rohini tai khadse

लम्पी ग्रस्त गुराची विनामूल्य सेवा करणार्या डाॅक्टर गजानन चौधरी चा बोदवड नगराध्यक्ष आनंदा पाटील यानी केला सत्कार पशु सेवा हीच ईश्वर सेवा

0

 

जिल्हा प्रतिनिधी सतीश बावस्कर

बोदवड येथिल श्रीवर्धनी जिनीग मध्ये लम्पी ची लागवन झालेल्या पशूला काँरन टाईम ठेवण्यात येत आहे शहरातील गो सेवक रात्र दिवस सेवा देत आहे यात प्रतेक गुरानवर लांब लांब बाधुन उपचार सुरु आहे यात प्रामुख्याने बोदवड येथिल पशुवैद्यकीय डाँ गजानन चौधरी विनामुल्य सेवा देत आहे शहरात ज्या ज्या पशु वर लम्पी ची लागवण झाली त्यावर आेषधोपचार सुरु आहे

यात प्रामुख्याने सेवेकरी सामाजिक कार्यकर्ते गोलु बरडीया हरर्षल बडगुजर मनोज राजपुत परेश अग्रवाल अजय पाटील गणेश वंजारी भैया वाघ विशाल क्षिरसागर देवेश वर्मा प्रविन मगरे अशोक पाटील अक्षय अग्रवाल याचा सामावेश आहे तालुक्यात लसीकरण सुद्धा युद्ध पातळीवर सुरु आहे

बोदवड येथे संभाजी ब्रिगेड तर्फे ‘ लोक प्रबोधन दिन ‘ साजरा

0

 

जिल्हा प्रतिनिधी सतीश बावस्कर-

बोदवड येथे प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्मदिवस ‘लोक प्रबोधन दिन’ म्हणून संभाजी ब्रिगेड तर्फे साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगतात बोलतांना सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटील यांनी प्रबोधनामुळे माणसाची वैचारीक प्रगल्भता वाढते व बुद्धी प्रामाण्यवादी दृष्टीकोन निर्माण होतो. समाजात एक समतेची ,मानवतेची भावना निर्माण करते. असे मत व्यक्त केले. महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या परंपरेत केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांचे योगदान फार मोठे आहे. १६ आक्टोंबर १९२१ पासून सुरु केलेल्या ‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या माध्यमातून त्यांनी जी सामाजिक जागृती करण्यास सुरवात केली त्याचा प्रभाव जनमानसावर पडला होता.त्या मुळे त्यांना प्रबोधनकार म्हणून ओळखले जाऊ लागले.अंधश्रद्धा ,अनिष्ट रूढी, परंपरा, याचे विरुद्ध जनजागृती निर्माण करणे. या सारखे विचार प्रस्थापितांच्या विरोधास न जुमानता धाडसाने मांडले .आपल्या लेखनास व वैशिष्टपूर्ण वक्तृत्वास इतिहास संशोधनाची ते जोड देत असत. आज हा लोकप्रबोधन दिन साजरा होत आहे, या उपक्रमामुळे आजच्या काळात प्रबोधनाची समाजास जी फार गरज आहे त्याचे महत्व समजून घेत नवीन पिढीस प्रबोधनात्मक विचार, वाचणे, ऐकणे व त्यावर चिंतन करून सुजाण नागरिक होण्यास मदत मिळेल हे आपल्या मनोगतात व्यक्त होत पाटील यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवनकार्याचा परिचय थोडक्यात उपस्थितांसमोर मांडला.यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील ,जिल्हा उपाध्यक्ष अंनता वाघ, मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष विलास सटाले,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख निवृत्ती ढोले ,तालुका उपाध्यक्ष गजानन बेलदार, सचिव वैभव गांवडे ,शहर अध्यक्ष शैलेश वराडे ,विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष दिपक खराटे ,संघटक गणेश सोनवणे, माजी अध्यक्ष गणेश पाटील , चिखली चे उपसंरपच रामलाल ढगे ,धनराज पाटील ,गणेश मुलाडे, हेमंत चौधरी ,सोपान महाले, तालुक्यातील शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जामठी येथे पशुवैद्यकीय डॉक्टर बोराखेडे व संजय तायडे वर्णोपचारक यांनी जातीने लक्ष देत पशु वर येणाऱ्या लम्पी स्किन आजारावरती उपचार करून पशू सेवा हीच ईश्वर सेवा 

0

 

जिल्हा प्रतिनिधी सतीश बावस्कर

बोदवड तालुक्यातील जामठी येथे
पशुपालक शेतकऱ्यांना लम्पी स्कीन आजाराला घाबरू नका राज्यसह जिल्ह्यातही जनावरांना होणाऱ्या लम्पी स्कीन या आजाराने थैमान घातले आहे मात्र असे असले तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही गुरांना लम्पी स्कीन आजाराची लागण झाली आहे आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी पशुवैद्यकीय रुग्णालय डॉक्टर सूरज बोराखेडे व संजय तायडे वर्णोपचारक यांनी शेतकऱ्यांना माहिती देत सांगितले की लम्पी स्कीन हा विषाणू आजार आहे हा हजार देवी विषाणू गटातील गोट फ्रॉक्स लसीकरण प्रवर्गातील झालेले आहे हा संसर्गजन्य आजार असून याचा प्रचार चावणाऱ्या माशा गोचीड चिलटे बाधित जनावरांना स्पर्श दूषित पाणी चारा यामुळे होतो जनावरांच्या अंगावर दहा ते पन्नास मीमी व्यासाच्या गाठी तयार होतात सुरुवातीला जनावरांना भरपूर ताप येतो डोळे नाकातून चिकटसर सर्व्ह बाहेर येतो जनावरे पाणी कमी पितात पिने बंद करतात दूध उत्पादन घटते काही गुरांच्या पायावर सूज येऊन ते लघंळतात पशुपालकांनी गोठ्यात डास माशा गोचीड होणार नाहीत याची काळजी घ्यावी जनावरांवर उपचार करताना नवीन सूयांचा वापर करावा बाहेर व्यक्ती किंवा डॉक्टर गोठ्यात येत असल्यास त्या आधी गोट्याचे निर्जंतुकीकरण करावे आजार सुरू असेपर्यंत बाजारातून जनावरांची खरेदी विक्री थांबवावी बाधित गुरांचा ताबडतोब इतर गुरांपासून वेगळं ठेवावे गोठ्यात सोडियम आयपो क्लोराईड फवारणी करावी तसेच पशु सेवा यांची सेवा आहे तत्पर सेवा करू तरीही शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना टेटमेंट करुन घ्या पशुपालक यांना डॉक्टर यांनी सर्वांना माहिती दिली व
जामठी गावामधील गुरांची तपासणी करण्यात आली सर्व पशु पालक यांना डॉक्टरांनी सगीतल्या प्रमाणे गुरांवर कसे उपचार करावा समजून घेतले त्या वेळेस उपस्थित

उपरोक्त संदर्भीय विषयां न्वये सध्यस्थितीत राज्यातील जवळपास 19 जिल्ह्यामध्ये लंपी चर्म रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे सदर साथ रोगाचा फैलाव तीव्रतेने वाढत आहे यासाठी पशुसंवर्धन विभागाची संपूर्ण यंत्रणा लसीकरण व पशुधन उपचाराचे काम करीत आहे

सदर रोगाच्या प्रादुर्भावामुळे दुदैवाने पशुधन मयत झाल्यास पंचायत समिती स्तरावरील बांधकाम विभागाचे मृत जनावरांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे कामे जेसीबी मशीन उपलब्ध करून देऊन पशुधन विकास अधिकारी यांचे उपस्थितीत व सहकार्याने 8 फूट लांब 4 फूट रुंद व 7 फूट खोल खड्डा करावा

 

तसेच उपस्थित असलेले पशुपालक यांना माहिती देण्यात आली
देविदास पाटील संजय तायडे, ,गोविंदा दादा शेळके, विजय सिंग पाटील, विशाल ठाकूर,गजानन गुरव ,देवराम मालकर,नितीन मालकर ,कैलाश पाटील ,जितेंद्र पारधी वार्ताहर, ,सतिष पाटील ईश्वर वाणी G9 न्युज वार्ताहार, सुधाकर घ्यार ,

Buldhana /शेगांव पुनर्वसन बाधितांसाठी गाठलं राजभवन

0

 

शेगाव प्रतिनिधी अर्जुन कराळे

शेगावातील विकास आराखड़ा अंतर्गत झालेल्या खलवाड़ी परिसराचे पुनर्वसन व त्या पुनर्वसना पासून वंचित राहिलेल्या नागरिकांना न्याय मिळावा या करिता दि. 01/09/22 रोजी मंत्रालय मुंबई या ठिकानी प्रकरण (खटला) दाखल केले होते पण प्रकरण प्रलंबित असताना नगर परिषद शेगांव ने वंचितांची घरे तोड़ण्याची माहिती दिली असताना सामाजिक कार्यकर्ते विक्रमजी सौदे, दादारावजी वानखड़े, रामजी ढंढोरे यांनी घेतली महाराष्ट्र राज्या चे महामहिम राज्यपाल श्री भगतसिंगजी कौशारी यांची भेट व वंचिताना न्याय द्या अशे निवेदन दिले…
विक्रम सौदे यांनी महामहिम श्री भगतसिंग कौशारी यांना पुनर्वसनात एक न. प. करपावती आणि एक सदानिका असे पुनर्वसनाचे धोरन ठराविले असुन ही 26 टैक्स पावती धारक कुटुंब पुनर्वसना पासून वंचित आहे त्या पैकी आठ प्रकरण मा. विभागीय आयुक्त यानी मान्य केले आहे आणी त्यांना कोणताच मोबदला अद्यापही दिलेला नाही व त्यांचे ही घरे तोडण्याचा इशारा न.प. मूख्याधिकारी यांनी दिलेला आहे हे तर न्यायालयाचे आदेशाची अहवेलनाच आहे व 18 प्रकरणे मा. मंत्रालय मुंबई येथे प्रलंबित आहे आणी या सर्व खलवाड़ी परिसरातील वंचित नागरिकाना घरे मिळावी अशी विनंती केली.