Home Blog Page 267

Wardha police/हिंगणघाट शहरात लॉजिंग मध्ये कॉलेज शिकणारे मुला मुलींना एन्ट्री मध्ये वाढ ?

0

 

हिंगणघाट :- मिळालेल्या माहितीच्या आधारे शहरात अनेक लॉजिंग व्यवसाय करणारे हे शाळेतील ड्रेस वर असलेल्या मुला मुलींना सुद्धा एन्ट्री देते . कारण कॉलेजमध्ये असणारी मुलगी ही अठरा वर्षाच्या वर असल्यामुळे नियमात आहे. आम्ही मुला मुलींचे आधार कार्ड घेतो व एन्ट्री करतो. खबरीने पोलीस स्टेशन येथे अशीच माहिती पोलिसांना दिली होती, पोलीस सुद्धा तिथे गेले होते. तेव्हा पोलिसांनी मुलांच्या आई वडिलांना फोन केला व विचारले तर त्यांनी सांगितले त्यांचे साक्षगंध झाले आहे.भेटायला आले असेल . पोलिसांनी लॉजिंग मालकाला यानंतर कॉलेज शाळेचा ड्रेस वरील कोणालाही प्रवेश देऊ नये नाहीतर कारवाई करण्यात येईल . सध्या शहरात अनेक लॉजिंग मध्ये कॉलेज ड्रेसवर एन्ट्री घेतल्या जात आहे .

Wardha/प्रहारचे रुग्णमित्र गजू कुबडे यांचा संकल्प

0

 

रुग्णालयातील कोरड्या रक्तपेढी जन्मदिवसाचे निमित्त साधून रक्तदान शिबिरातून भरण्याचा उपक्रम

हिंगणघाट
दिवसेंदिवस विविध आजारांनी डोकेवर काढायला सुरुवात केलेली असून अनेक रुग्णालयातील रक्तपेढ्या या रिकाम्या असल्याने अनेक गरजू रुग्णांची हेळसांड होत असल्याचे पाहून प्रहारचे नेते रुग्णमित्र गजू कुबडे यांनी एक अनोखा उपक्रम सुरू केलेला आहे. प्रहार कार्यकर्त्याच्या जन्मदिनी रक्तदान शिबीराचे आयोजन करून या रक्तपेंढीला रक्त पुरवठा करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे.या मुळे ग्रामीण भागातील गरजू गोरगरीब रुग्णांची गैरसोय दूर होणार आहे गजू कुबडे यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्रहारचे कार्यकर्ते पवन वाघमारे यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने दि 13 सप्टेंबरला संतोषी माता मंदिर हिंगणघाट येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .
या शिबिराचे उदघाटन येथील माजी नगरसेवक ज्येष्ठ पंतजलीचे कार्यकर्ते श्री वसंतराव पाल गुरुजी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी रुग्ण मित्र गजुभाऊ कुबडे हे होते.प्रमुख अतिथी म्हणून प्रहारचे शहर प्रमुख अतुल जाधव, अजय लढी,अजय खेडेकर उपसरपंच जाम ग्रा.प.,राहुलभाऊ पाटील सदस्य ग्रा.प.जाम,अमित गोजे,अजय ठाकरे,सूरज कुबडे हे उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरासाठी कस्तुरबा हॉस्पिटल येथील चमू उपस्थित होती.या शिबिरात एकूण 35 रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रहार तर्फे कार्यकर्त्यांचे जन्मदिवस रक्तदान शिबिराचे आयोजन करून साजरे करण्याची संकल्पना रुग्णमित्र गजू कुबडे यांनी कार्यकर्त्यात रुजविलेली आहे.यापूर्वी दि 2 सप्टेंबरला सावली ( वाघ) येथे श्री अनता वायसे या कार्यकर्त्या वाढदिवसही रक्तदान करून साजरा करण्यात आला होता.या प्रहार च्या उपक्रमामुळे त अतिशय सकारात्मक प्रतिसाद जनतेतून मिळत आहे.रक्तदानाची कमतरता काही प्रमाणात दूर होत आहे.
या अनोख्या उपक्रमा बाबत बोलतांना रुग्णमित्र गजू कुबडे म्हणाले,मी रुग्णसेवेच्या निमित्तने अनेक रुग्णालयात जात असतो या सर्वच ठिकाणी रक्ताची कमतरता आढळून आलेली आहे.याचा त्रास गोरगरीब रुग्णांच्या नातेवाईकांना होतो.त्यामुळे ही गरज ओळखून कार्यकर्त्यांच्या जन्मदिनी रक्त दान शिबीर घेण्याबाबत कार्यकर्त्याशी विचार विनिमय केला व सर्व कार्यकर्त्यांनी सकरात्मक प्रतिसाद दिल्याने हा अभिनव उपक्रम राबविण्याचा मी निर्धार व्यक्त केला.
कार्यकर्ते व जनतेच्या उदंड प्रतिसाद पाहाता यात आम्ही यशस्वी होऊ हा मला विश्वास आहे असे मत रुग्ण मित्र गजू कुबडे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन परंडा ग्रा प सदस्य नितेश महाकाळकर यांनीं
या शिबिराच्या आयोजनासाठी शाखा प्रमुख महेश नरड, मनोज जिकार, सूरज कुबडे,धीरज नंदरे,पवन वाघमारे,अमोल रामुदंडे अमोल वाघमारे,अमित गोहणे,सौरभ लोण कर,दिनकर कुबडे,प्रवीण चरडे, रुपेश खडसे, प्रफुल धानोरकर, अमोल धानोरकर,भूषण डाखोरे,सूरज भोपळे,प्रवीण दरवेकर आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

PM Modi च्या वाढदिवसाला  नवजात मुलांना मिळणार सोन्याच्या अंगठ्या, 

0

 

PM Narendra Modi Birthday: 17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रम होणार आहेत. कुठे रक्तदान तर कुठे सेवा पंधरवडा चालवला जाईल. पण तामिळनाडूमध्ये काही वेगळे केले जात आहे. येथे 17 सप्टेंबर रोजी भारतीय जनता पक्षाचे राज्य युनिट नवजात बालकांना सोन्याच्या अंगठ्या देणार आहे. या दिवशी जन्मलेल्या मुलांना सुमारे 2 ग्रॅमची अंगठी दिली जाईल.

यासोबतच 720 किलो मासळीचेही वाटप करण्यात येणार आहे. मत्स्यव्यवसाय आणि माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन म्हणाले, ‘आम्ही चेन्नईतील सरकारी RSRM रुग्णालयाची निवड केली आहे जिथे पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाला जन्मलेल्या सर्व मुलांना सोन्याच्या अंगठ्या दिल्या जातील.’ प्रत्येक अंगठी सुमारे 2 ग्रॅम सोन्याची असेल, ज्याची किंमत सुमारे 5000 रुपये असू शकते. ते म्हणाले की ही रेवाडी मोफत दिली जात नाही. त्यापेक्षा या माध्यमातून पंतप्रधानांच्या वाढदिवसाला जन्मलेल्यांचे स्वागत करायचे आहे. 17 सप्टेंबर रोजी या रुग्णालयात 10-15 बाळांचा जन्म होऊ शकतो, असा भाजपच्या स्थानिक युनिटचा अंदाज आहे.
दिल्लीतील एका रेस्टॉरंटद्वारे खास थाळी दिली जाईल
दिल्लीतील एक रेस्टॉरंट मालक देखील दिवस खास बनवण्यासाठी खास ‘थाली’ लाँच करण्याच्या तयारीत आहे. कनॉट प्लेस येथील ARDOR 2.0 रेस्टॉरंटमध्ये 56 वस्तू असलेली थाळी उपलब्ध आहे. ग्राहकांना व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पर्याय असतील. कॅनॉट प्लेस, दिल्ली येथे स्थित ARDOR 2.0 रेस्टॉरंटने ही अनोखी कल्पना आणली आहे. रेस्टॉरंटचे मालक सुमित कलारा म्हणाले, ‘मला पंतप्रधान मोदींबद्दल खूप आदर आहे. ते आपल्या देशाचे अभिमान आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला काहीतरी अनोखे गिफ्ट द्यायचे आहे. आम्ही ही थाळी लॉन्च करण्याचा निर्णय घेतला. आम्ही त्याचे नाव ठेवले. ’56’ ठेवले आहे. इंच मोदीजी’.
ते पुढे म्हणाले, ‘आम्हाला ही प्लेट त्याला भेटवस्तू द्यायची आहे. त्याने इथे येऊन जेवायला हवे आहे. पण, सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही हे करू शकत नाही. त्यामुळे हे त्याच्या चाहत्यांसाठी आहे जे त्याच्यावर मनापासून प्रेम करतात

PM Narendra Modi Birthday

Buldhana / जुने पोलीस कॉटर,तहसील आणि नगर पालिका जुगाराचा अड्डा

0

 

लोणार प्रतिनिधी – प्रणव वराडे 

लोणार शहरात पुतळा बाई शाळेजवळ असलेले पोलीस कॉटर मधे लोक सर्रास पणे दारू पीत आहे त्याच प्रमाणे पत्ते खेळत आहेत या कळे प्रशासनाचे संपूर्ण दुर्लक्ष आहे त्यातच जवळ पास चे लोक शौचालयास जात असतात या कडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे त्याच प्रमाणे जुने तहसील कार्यालय हे स्थलानतरित केल्या पासून तिथे खूप झाड झुडप वाढलेले आहेत आणि पोलीस कॉटर प्रमाणेच जुन्या तहसील मध्येही लोक पत्ते खेळत असतात दारू पिण्यासाठी जुने तहसील हे दरुद्यांचा अड्डा ठरलेला आहे जुन्या तहसील ला पाडून तेथे शुशोभीकरन करण्यात यावे असे लोणार वासियांचे मत व्यक्त होत आहे तिथले वाढलेले झाडे कापून टाकण्यात यावे अशी मागणी लोणार वसियानी केली आहे

Buldhana
त्याच प्रमाणे जुनी नगर पालिकेची इमारत ही जुगाराचा अड्डा ठरलेला आहे जुनी नगर पालिका स्थलांतरित झाल्या पासून तिथल्या खिडक्या चोरीला गेल्या त्या कुठे गेल्या याची कल्पना कोणाला ही नाही त्याच प्रमाणे जुनी नगर पालिका इमारत ही प्रेम युगलांचा अड्डा ठरला आहे या कडे लवकरच प्रशासनाने लक्ष देण्यात यावे अशी मागणी लोणार शहर वासियाणी केली आहे

Buldhana

BuldhanaAndolan/VJNT जिल्हा अध्यक्ष बुलढाणा तथा युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष मेहेकर -लोणार यांनी केले चक्का जॅम आंदोलन…………

0

 

 

आज लोणार येथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेवर बस नसल्यामुळे वारंवार वाहतूक नियंत्रक बुलढाणा यांना निवेदन देऊन सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.. शाळेतील मुले व मुलींना घेऊन लोणार येथे बस आडवा आंदोलन करण्यात आले… या प्रकरणाची तीव्रता बगता डेपो मॅनेजर कोळपे साहेब यांना लोणार बस स्टॅन्ड वर येण्यास भाग पाडले… युवक काँग्रेस मेहेकर -लोणार विधानसभा अध्यक्ष भारत भाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले…. विद्यार्थासाठी युवक काँग्रेस नेहेमी अग्रेसर असल्याचे दिसून आले… त्या वेळेस शिवसेना तालुका प्रमुख संदीप भाऊ मापारी, भाजपा तालुका अध्यक्ष भगवानराव सानप खुरामपूर येथील युवा नेते राहुल भाऊ राठोड, गोविंद भाऊ राठोड, समाधान चव्हाण, अविनाश चव्हाण, जनार्धन,राहुल चव्हाण, सुरेश भाऊ राठोड, चव्हाण, सुरेश भाऊ राठोड, राजू चव्हाण, सोनाजी टेकाळे, तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी, पालक वर्ग व महिला मोठ्या संख्येने उपस्तीत होते…. तीन दिवसात शाळेतील मुलांचे बस चा प्रॉब्लेम सोडवण्याची ग्यावी डेपो मॅनेजर यांनी VJNT जिल्हा अध्यक्ष काँग्रेस तथा युवक काँग्रेस चे विधानसभा अध्यक्ष भारत भाऊ राठोड यांना दिली….

BuldhanaAndolan

Buldhana/वनविभागाची चौकी धूळखात लाखो रुपायाचा खर्च ..

0

 

लोणार-वनविभागाच्या वतीने सांडपाणी प्रकल्पा जवळ लाखो रुपये खर्च करुन चौकी बांधली पण मागील तीन वर्षापासून ती धूळखात व कुलूबंद असल्याचे निर्देशणास येत आहे.

वनविभागाच्या वतीने किन्ही रोडवर व सांडपाणी प्रकल्पा जवळ वनचौकी बांधण्यात आली या ठिकाणी कर्मचारी ही तैनात करण्यात आले परंतू सांडपाणी प्रकल्पा जवळील चौकी कायमस्वरुपी बंद रहात असल्याने या ठिकाणी आजूबाजूला झाडे वाढल्याने घानकचरा साचल्याने याकडे वनविभागाचे जाणीवपूर्वक दूर्लक्ष होताना दिसून येते.एककीकडे लोणार विकास आराखड्या अंतर्गत करोडो रुपायाचा निधी मंजूर केल्या जात असताना दूसरीकडे माञ लाखो रुपायाचा चूराडा करुन बांधण्यात आलेली चौकी धूळखात पडल्याने या विकासत्मक निधीचा फायदा होताना दिसून येत नाही.पर्यटकांच्या व सरोवर संवर्तधन व जतनासाठी बांधण्यात आलेली चौकी सूरु करावी अशी मागणी सरोवर प्रेमी नागरींकां कडून होत आहे

 

Buldhana

KISHAN PIK NUKSAN/ नुकबोदवड परिसरातील येवतीगाव येथे वादळ पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे पीकजमीन दोस्त

0

जिल्हा प्रतिनिधी सतिष बावस्कर

सविस्तर वृत्त सर्वत्र निसर्ग दमदार बरसत असल्याने शेतकरी व सर्व आनंदाचे वातावरण व निसर्ग बहरला असता निसर्गचे असे काही चक्र फिरले कि वादळ वारा पाऊस सह पिक जमीन दोस्त होतील असे कुठं ठाऊक असे झाल्याने शेतकरी खुप मोठा संकटात सापडला असुन सर्व शेतकरी बाधवांना चिंत ग्रस्त झालेलाआहे आपल्या शेतात गेल्यावर त्याला आस्वस्त होत आहे आपल्या हातात येणारा हगाम आपल्या हातुन गेल्याने हातात काही मिळणार नसल्याचे चित्र डोळ समोर स्पष्ट झाले आहे सर्वच कडे ही परिस्थिती निर्माण होत असता महाराष्ट्र शासन कडून शेतकरी शांताराम सावरीपगार यांचे शेतातील मका पीक पहानी करुन पंच नामे करावे आणि शासन दरबारी यांना काही मोबदला ध्यावा यावर तरी येवती येथील वादळात नुकसान झालेला पिंक मका ज्वारी व विविध होणारे नुकसानांचे पंचनामे कृषी अधिकारी तसेच तलाठी व कोतवाल यांनी शेतात जाऊन प्रतेक्ष प हानी करुन पंचनामा करावा शेतकर्याना नुकसान भरपाई मिळण्यांचे अपेक्षा पल्लवीत आहे

त्याकडे सवीचे लक्ष लागुन आहे.

 

KISHAN PIK NUKSAN

Jalgaon-Yaval/मोफत आरोग्य तपासणी, नाडी परीक्षण शिबिर सुरू नागरिकांचा मोठा प्रतिसाद, सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अँड मेडिकल ट्रस्ट त्रंबकेश्वर आणि स्वामी समर्थ सेवा केंद्र यांचा उपक्रम

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

यावल तालुक्यात विविध ठिकाणी सदगुरू मोरेदादा चॅरीटेबल हॉस्पीटल अॅण्ड मेडीकल ट्रस्ट, त्र्यंबकेश्र्वर जिल्हा नाशिक प्रणित  स्वामी समर्थ  सेवा केन्द्र ( दिंडोरी प्रणीत ) यावल यांच्या संयुक्त विद्यमाने यावल तालुक्यातील रोज मोफत आरोग्य तपासणीव नाडी परिक्षण शिबीरास सुरूवात झाली असून या शिबीरांना नागरीकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे . माधवनगर टेलिफोन ऑफिस भुसावळ रोड  यावल येथे

स्वामी समर्थ केंद्र येथे तपासणी शिबीराची सुरूवात दीप प्रज्वलन करून माजी नगरसेवक उमेश फेगडे व केंद्राचे प्रमुख व सेवेकरी यांनी केले या शिबिरास विविध आजारांवर साडेपाचशे (550) नागरिकांनी सहभाग नोंदवला नाडी परीक्षण करून  तज्ञांनी मार्गदर्शन व औषधी उपचार केले.

Jalgaon-Yaval
Jalgaon-Yaval

तसेच , तसेच दिनांक १२ सप्टेंबर किनगाव येथील कौशल्यदास महाराज मठ येथे , दिनांक १३ सप्टेंबर रोजी दहिगाव तालुका यावल येथील श्री मारोती मंदीर, दिनांक १४ सप्टेंबर रोजी डोंगर कठोरा येथे मंदीरात , शिबिर पार पडले येथेही नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला

दिनांक १६ सप्टेंबर रोजी भालोद येथील पंचवटी मंदीर तर दिनांक १७ सप्टेंबर रोजी सांगवी येथे श्री स्वामी समर्थ केन्द्र ,भास्कर नगर या ठिकाणी आयोजीत करण्यात आले असुन, या आरोग्य शिबीराच्या माध्यमातुन तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली हृदयविकार, मधुमेह , ब्लडप्रेशर, कावीळ , पोटाचे विकार , अॅनिमिया,संधीवात , मनोविकार , मुतखडा , स्त्रियांचे आजार , त्वचा विकार , मुळ्व्याध, लहान मुलांचे आजार , कॅन्सर आदी आजारांवर मोफत उपचार केले जात आहे . अजून काही दिवस हे शिबिर तालुक्यात विविध ठिकाणी चालू आहे

या संधीचा तालुक्यातील सेवेकरी व नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ केन्द्र ( दिंडोरी प्रणीत ) यावल यांच्या वतीने करण्यात आले आहे .

 

Jalgaon-Yaval

Yaval/यावल येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

0

 

अनुलोम सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम

यावल तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी सुरेश भाऊ नेटके, भूषण चव्हाण सर ,युवराज मोरे उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुंदन फेगडे यांच्या हस्ते उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर
डॉ. कुंदन फेगडे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार मांडले.

दीड दिवसाच्या शालेय शिक्षणावर 35 कादंबऱ्या, 8 पटकथा,3 नाटके 13 कथासंग्रह, 14 लोकनाट्य, 1 प्रवासवर्णन, 12 उपहासात्मक लेख लिहून इथल्या सर्वसामान्य माणसांच्या व्यथा वेदना आणि अश्रू यांना अण्णांनी वाचा फोडली आणि न्याय मिळवून दिला. रशियाच्या लाल चौकात जाऊन शिवरायांचे पोवाडे गाऊन शिवरायांचा इतिहास व स्टॅलिन चा पोवाडा गायला. त्याच रशियात दि 14 सप्टेंबर 2022 रोजी मॉस्को शहरात अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे व तैलचित्राचे अनावरण राज्याचे उपमुख्यामंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.हा एक ऐतिहासिक क्षण महाराष्ट्राच्या इतिहासात नोंदविला गेला.त्यानिमित्ताने सामाजिक संस्था अनुलोमच्या माध्यमातून महाराष्ट्रभर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यावर कार्यक्रम घेण्यात येत आहेत, म्हणुन संस्थेचे विशेष आभार.
तसेच रशिया येथिल
“लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळाच्या ऐतिहासिक क्षणाची कायम स्मृती राहील ” असे मनोगत डॉ कुंदन फेगडे यांनी व्यक्त केले. प्रत्येक व्यक्तीच्या घरात ह्या अद्वितीय घटनेची चिरकाल आठवण राहावी म्हणून चित्ररूपी फ्रेम प्रत्येक कुटुंबाला सप्रेम भेट देण्यात आली.या वेळी अनुलोम संस्थेचे तुषार महाजन,सुरेश नेटके, भूषण चव्हाण सर, युवराज मोरे,प्रदीप पारधे, विकास मोरे, प्रकाश चंदनशिव, प्रेम मोरे,विजय निकाळजे आदी उपस्थित होते

Yaval

Hingnghat:-Duplicate Police/पोलीस असल्याचे सांगून एका वृद्ध व्यक्तीस थांबविले व पन्नास हजार रुपये घेत दुचाकीने पळाले

0

 

हिंगणघाट :- बबन माधव जवादे (वय ६५) राहणार नारायणपूर तालुका समुद्रपूर हिंगणघाट येथे 15 सप्टेंबर गुरुवार ला प्रकृती खराब असल्याने ते हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात आले होते. पैसे काढण्यासाठी ते पोस्ट ऑफीस कार्यालयात गेले तेथून रुपये काढले. त्यानंतर ते पोस्टातून बाहेर पडत रस्त्याने चालत निघाले. महावीर भवन समोर आले असता सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी आम्ही पोलीस असल्याचे सांगून थांबवले. दोघांनी हातचलाखीने त्यांच्याजवळील पिशवीत असलेली ५० हजार रुपयांची रक्कम घेत दुचाकीने पळून गेले बबन जवादे यांनी पिशवी पाहिली असता त्यांना पैसे दिसून आले नाही त्यांच्या लक्षात आले पोलीस सांगून फसवणूक केली त्यामुळे त्यांनी हिंगणघाट पोलीस इथे तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला.