Home Blog Page 28

Dharashivnews /देशाची अखंडता टिकवण्यासाठी लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांच कार्य प्रेरणा देणारे आहे

उमरगा प्रतिनिधी ऋषिकेश सुरवसे

उमरगा : भारताच्या स्वातंत्र्यानंतर संस्थानांचे एकत्रीकरण करण्यात मोलाची भूमिका बजावणारे, भारतीय संघाची एकता टिकवून ठेवणारे भारताचे पाहिले गृहमंत्री आणि उपपंतप्रधान
“भारताचे एकीकरणकर्ता” असे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त पोलिस ठाणे उमरगा, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय करिअर कट्टा, एन सी सी, पोलिस पाटील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने एकता दौड रॅलीचे आयोजन करण्यात आले.

देशाची अखंडता टिकवण्यासाठी
एकता दौड मधून संदेश देताना सरदार वल्लभाई पटेल यांचे कार्य सर्वांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारी आहे असे आवाहन पोलिस उपअधीक्षक सदाशिव शेलार यांनी केले.

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय येथून या एकता दौडचा शुभारंभ पोलिस उपअधीक्षक सदाशिव शेलार , पोलिस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी, प्राचार्य डॉ संजय अस्वले, यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत भराटे, पोलिस उपनिरीक्षक रामहरी चाटे, गंगाधर पुजरवाड, पाडुरंग कन्हेरे, डॉ उदय मोरे, प्रशांत पाटील, बंडू पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी, प्राचार्य डॉ संजय अस्वले यांनी मनोगत आणि शुभेच्छा दिल्या.

Umrganews /या एकता दौडचा समारोप हुतात्मा स्मारक येथे करण्यात आला. या उपक्रमासाठी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील प्राध्यापक, पोलीस ठाणे उमरगा येथील सर्व पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील संघटनेचे प्रतिनिधी, दिशा अकॅडमी, करिअर कट्टा आणि एनसीसी चे विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Vaishalijadhav/वैशाली जाधव (गायकवाड) यांचे आमदार प्रवीण स्वामी व वडील गोविंद गायकवाड यांच्या हस्ते लेखी आश्वासनानंतर 3 ऱ्या दिवशी उपोषण स्थगित……

उमरगा प्रतिनिधी ऋषिकेश सुरवसे उमरगा

उमरगा : तालुक्यातील कदेर येथील ग्रामपंचायत कार्यालया समोरील गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेले अन्नत्याग उपोषण अखेर दि 29 रोजी सायंकाळी 6:00 तिसऱ्या दिवशी उशिरा संध्याकाळी मागे घेण्यात आले. करण्यात आलेल्या १० मागण्यांपैकी सर्व मागण्या पुढील १५ दिवसांच्या आत टप्प्याटप्याने पूर्ण करण्यात येतील,

असे आश्वासन उमरगा–लोहारा मतदारसंघाचे आमदार मा. प्रवीण स्वामी (गुरुजी) यांनी दिले. वैशाली जाधव यांचे वडील आणि आमदार साहेब यांच्या हस्ते पेय( लिंबू पाणी इ.)घेऊन थांबवण्यात आले.

प्रशासनावर आज विश्वास ठेवणे कठीण झाले आहे; पण आमदार साहेब हे गुरू असल्याने त्यांचा शब्द नक्कीच खरा ठरेल,” असा विश्वास उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला.
या वेळी तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते;

तथापि आमदार साहेब हे पूर्वी शिक्षक असल्याने त्यांना ‘गुरू’ म्हणून मानले जाते. गुरूंचा शब्द ओलांडता येत नाही, अशी श्रद्धा असल्याने त्यांच्या लेखी आश्वासनावर पूर्ण विश्वास ठेवून उपोषण सोडण्यात आले.

यावेळी आमदार प्रवीण स्वामी यांनी ग्रामपंचायतीने योग्य जागा दाखवल्यास स्थानिक आमदार व लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार निधीतून महिलांसाठी विशेष करून बस स्थानक बांधून देण्याचे व व जिल्हा परिषद शाळेत संडास बाथरूम व इतर सुविधा आमदार देण्याचे आश्वासन देण्यात आले.
व इतर मागण्या ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांनी पंधरा दिवसाच्या आत करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले.

सकाळी तालुक्याचे तहसीलदार गोविंद येरमे, नायब तहसीलदार बेलोरे, यांच्यासह पंचायत समिती विस्तार अधिकारी एस.एस.राऊत साहेब,व अजित भांगे साहेब व मंडळ अधिकारी जेवळीकर,प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे डॉक्टर शिवानंद पाटील,कृषी सहाय्यक अतुल गायकवाड,तलाठी बागवान मॅडम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता घोडके,जि.प. बांधकाम विभागाचे शाखा अभियंता सुरेश पाटील,बिडवे, मोरे ,साहेब यांच्यासह ग्राम विकास अधिकारी शिवानंद बिराजदार,सरपंच सतीश जाधव,उपसरपंच राणी राठोड, इतर लोकांनी भेटी दिले.

व आश्वासन स्थगित करण्याची विनंती केली त्यांच्या विनंतीला मान न देता त्यांनी सायंकाळी 6:00 वाजता स्थगित करण्यात आले.
यावेळी ग्रुप 07 च्या वतीने आमदार प्रवीण स्वामी यांना कदेर पार्टी ते कदेर रस्ता मंजुरी व दुरुस्ती करण्यात यावी याविषयीचे निवेदन देण्यात आले.

यावेळी शिवसेना शाखाप्रमुख अजित गायकवाड,जिल्हा परिषद गण प्रमुख जनार्दन बिराजदार, डॉक्टर मनोहर गायकवाड,क्रांती कांबळे, दाजी पाटील,भास्कर माजी.सरपंच विश्वनाथ शिंदे, संजय कलशेट्टी, माजी सरपंच राजेंद्र सामाने यांच्यासह इतर गावातील नागरिक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Goldnews/नातीनं केली आजी-आईच्या घरातील सोन्याची चोरी; तीन आरोपींना पोलिसांकडून अटक, फोर्ड कारसह माल जप्त

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्वतःच्या आजी आणि आईच्या घरातील सोन्याचे दागिने चोरून नेणाऱ्या नातीसह तिच्या दोन साथीदारांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली.

Policenews/असून, चोरी केलेले सोने विकून खरेदी केलेली फोर्ड फिगो कार, बजाज एनएस 200 दुचाकी आणि आयफोन पोलिसांनी जप्त केला आहे.पोर्णिमा इंद्रनील रंगारी (वय 69 वर्षे, रा. महात्मा फुले वार्ड, हिंगणघाट) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. 10 जानेवारी 2025 ते 24 ऑक्टोबर 2025 या काळात त्यांच्या घरातील कपाटातील लॉकरमधून दोन सोन्याच्या बांगड्या (60 ग्रॅम) व सुनेचे अंगठ्या, नथ व कानातील टॉप्स (20 ग्रॅम) असा एकूण 80 ग्रॅम वजनाचा, किंमत अंदाजे ₹49,200 चा ऐवज चोरीस गेल्याचे उघड झाले.

Breaking news/या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी फिर्यादीच्या नाती पूर्वा रंगारी (वय 18 वर्षे, शिक्षण बी.टेक., रा. बुटीबोरी) हिला चौकशीसाठी बोलावले असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिने सांगितले की, तिने आजी व आईच्या कपाटातून टप्प्याटप्याने सोने चोरी करून तिच्या मित्र वंश प्रमोद राऊत (रा. हिंगणघाट) याला विकण्यासाठी दिले. त्याने ते सोने त्याची आई रूपाली प्रमोद राऊत हिच्या माध्यमातून विकले.

जाहिरात 👆🏻👆🏻

सदर तिघांनी सोने विकून मिळालेले तब्बल ₹7,97,000 हॉटेलिंग व मौजमजा करण्यासाठी वापरले तसेच फोर्ड फिगो कार, बजाज एनएस 200 दुचाकी व आयफोन खरेदी केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. पोलिसांनी आरोपींकडून ही वाहने व मोबाईल जप्त केले असून सोनाराकडून विकलेले सुमारे 80 ग्रॅम सोनेही परत मिळवले आहे.

Goldnews /ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक अनुराग जैन, मा. अप्पर पोलीस अधीक्षक सदाशीव वाघमारे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक व मा. अनिल राऊत, पोलीस निरीक्षक हिंगणघाट यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिपक वानखडे, सपोनि पद्माकर मुंडे तसेच डी.बी. पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना. राजेश शेंडे, पो.शि. आशिष नेवारे, मंगेश वाघमारे व रोहित साठे यांनी केली.
पुढील तपास हिंगणघाट पोलिसांकडून सुरू आहे.

Hingnghatnews/प्रगत पंचशील युवा मंचतर्फे समाजप्रबोधनात्मक कव्वाली कार्यक्रमाचे० आयोजन

 

प्रतिनिधी सचिन वाघे

समुद्रपूर :-६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त समुद्रपूर येथे प्रगत पंचशील युवा मंचतर्फे भव्य समाजप्रबोधनात्मक कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घघाटन आयु. रंगारी सचिन तुळणकर, प्रा. मेघश्याम ढाकरे, राजू गणवीर, शेखर तेलतुंबडे आणि अजय पाणेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून समाजातील ऐक्य, बंधुता आणि प्रबोधनाचा संदेश देण्यात आला.

जाहिरात 👆🏻👆🏻

‘भीम का संविधान’ फेम फेजान ताज (नागपूर) यांनी समाजजागृतीपर गीतांच्या सादरीकरणाने वातावरण भारावून टाकले. त्यांच्या प्रभावी आणि प्रेरणादायी सादरीकरणाने प्रेक्षकांच्या मनावर अमिट ठसा उमटवला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नंदु मुन, हर्षल उमरे, श्रीकांत पानेकर, प्रज्वल रंगारी, अक्षय गजभिये, पंकज अलोणे, सौरभ तुपे, प्रतिक गनविर, प्रशांत अंबागडे, विशाल ढोणे, यष रंगारी, सुभाष भगत, पाटिल, रामटेके, शिकु नगराळे, राकेश गजभिये, ईद्रपाल ढोरे आणि सोनकुवर यांनी अथक परिश्रम घेतले.

Hingnghatnews /या कार्यक्रमाला शहरातील मान्यवर नागरिक, युवक व बौद्ध अनुयायांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हा कार्यक्रम उत्साहात आणि सन्मानपूर्वक पार पडला

Banknews /अजब अर्बन बँकचा गजब कारभार..80 लाखांचा घोटाळा.

अनिलसिंग चव्हाण ( मुख्य संपादक)

ह्या अजब अर्बनने हा घोटाळा करताच. पैसे काढण्यासाठी ग्राहकांची तोबा गर्दी. ]

ह्या अजब अर्बनच्याच एका शाखेचा गजब प्रकार .
ग्राहकांच्या घामाच्या पैशावर हा 80 लाखांचा डल्ला या अजब अर्बनने मारल्याचे समजते . संबंधित झालेला प्रकार हा दोन वर्षा अगोदरचा जरी असला तरी आज सुद्धा लोक भयभीत आहेत. एक मोठी नामांकित पतसंस्था असे करेल यांवर जनता अनभिन्न होती.

हा प्रकार 17 /जुलै /2023 मधील असल्याचे समजते. संबंधित गुन्ह्यातील रक्कम वाढण्याचीच शक्यता होती. पण पुढील काय आहे हे अजुन समजलं नाही . यामध्ये काही आरोपीना विभागीय व्यवस्थापक यांच्या तक्रारीने अटक सुद्धा झाली होती.काही आरोपी फरार झाले होते.

विषय हा अजब गजब अर्बनचा…शेतकरी,कर्मचारी, गुंतवदार यांचा , आणि व्हिकल फायनान्स वाल्यांचा सुद्धा आहे. शिवाय या अजब अर्बनने किती ठिकाणी संकट काळात मदत केली?

Banknews /आणि मागास वर्गासाठी किती उपक्रम राबविले हे पण अधिकृत स्पष्ट होत नाही. जरा विचार करावा की, ही सात खंडातील नामांकित सहपत संस्था आहे. 80 लाखांच्या लुटीचा प्रकार दोन वर्षा अगोदर कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात घडला हे सविस्तर हे ब्रेक नंतर पुढील भागामध्ये सविस्तर…

Bacchukadu/“शेतकर्याच्या – कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात रॅली; राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) कडून पाठिंबा

 

प्रतिनिधी सचिन वाघे

वर्धा :-शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रमुख मागणीसाठी प्रहार जनशक्ति पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री मा. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात “चलो नागपूर महाएल्गार” या ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली २८ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे भव्य प्रमाणावर होणार असून शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार यांचा मोठ्या संख्येने सहभाग अपेक्षित आहे.

या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) ने देखील जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणे ही काळाची गरज आहे.

Bachhukadu/कर्जमाफीशिवाय शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारू शकत नाही.”रॅलीत प्रहार जनशक्ति पक्षाचे कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि शेतकरी मोठ्या उत्साहात सहभागी होणार असून नागपूर येथे होणारा हा ‘महाएल्गार’ राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहण्याचा इशारा देणारा ठरणार आहे.

Farmernews /नापिकीने खचलेल्या शेतकऱ्याने केली आत्महत्या

 

प्रतिनिधी. गुड्डू कुरेशी

सिंदीरेल्वे— यंदाच्या खरीप हंगामात १४ एकरात दीड क्विंटल सोयाबीन हाती लागलेल्या ज्ञानेश्वर वाघमारे नामक शेतकऱ्याने विष प्राशन करुन शनिवारी आत्महत्या केली. हरदुलालपुरा भागात राहणारे ज्ञानेश्वर वामन वाघमारे(६३) यांना 14 एकरात दीड पोते सोयाबीन झाले. डोक्यावर कर्जाच्या डोंगर असल्यामुळे व्यथित ज्ञानेश्वरने शनिवारी सायंकाळी घरी विष प्राशन केले.

माहिती मिळताच त्यांना सेवाग्रामला हलवण्यात आले पण उपचारा दरम्यान वैद्यकीय मंडळींनी त्यांना मृत घोषित केले.

Farmernews /त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले,एक मुलगी ,सुना, नातवंड आणि मोठा परिवार आहे.

Rainnews/अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा ‘सोने’सारखा शेतमाल ओला – हिंगणघाट बाजार समितीत दुर्दैवी चित्र

 

प्रतिनिधी :- सचिन वाघे

हिंगणघाट –
आज दिनांक २४ ऑक्टोबर रोजी हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात एक हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळाले. शेतकरी आपला कष्टाचा शेतमाल — सोयाबीनसह इतर धान्य — दोन पैसे मिळावेत या आशेने बाजार समितीत विक्रीसाठी घेऊन आले होते. मात्र, अवकाळी पावसाने या सर्वांची आशा अक्षरशः पाण्यात गेली.

पावसाच्या जोरदार सरींनी बाजार समितीच्या खुल्या आवारात ठेवलेला शेतमाल पूर्णपणे ओला झाला. शेतकऱ्यांनी डोळ्यांत अश्रू घेऊन आपला माल वाचविण्याचा प्रयत्न केला, पण पावसाच्या धारांमध्ये त्यांचा कष्टाचा घाम आणि अश्रू दोन्ही वाहून गेले.
बाजार समितीकडून कोणतीही योग्य सुविधा किंवा तात्पुरती संरक्षणाची सोय उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

नावाजलेल्या हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होणे ही शासन आणि प्रशासन दोघांसाठीच चिंतेची बाब ठरत आहे.
शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे की, “आमचा माल ओला झाला, मेहनत वाया गेली – आता नुकसान भरपाई कोण देणार?”

Rainnews /सरकार आणि प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

revenuenews/रेती माफियावर उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांची धडक कारवाई — ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट, दि. २४ ऑक्टोबर २०२५
लाडकी नदीच्या पात्रातून अवैधरित्या रेती चोरी करून वाहतूक करणाऱ्या रेती माफियांवर हिंगणघाट उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने धडक कारवाई केली. या कारवाईत एक ट्रॅक्टर, ट्रॉली व सुमारे १ ब्रास काळी रेती असा एकूण ८ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मुखबीरकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, आरोपी प्रवीण प्रोफेश्वर मरापे (रा. पिंपळगाव) हा ट्रॅक्टर मालक योगेश देवराव सातपुते (रा. संत तुकडोजी वॉर्ड, हिंगणघाट) यांच्या सांगण्यावरून लाल रंगाच्या महिंद्रा ट्रॅक्टर (क्र. MH 32 P 545) मधून लाडकी नदी घाटातून काळी रेती चोरी करून मौजा बुरकोणीकडे वाहतूक करीत होता.

ही माहिती मिळताच, उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकाने तत्काळ कारवाई करत सदर ट्रॅक्टरला थांबवून तपासणी केली असता, रॉयल्टीविना रेतीची वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले. पंचांच्या उपस्थितीत घटनास्थळीच सविस्तर मौक्का पंचनामा करून रेती, ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त करण्यात आले.

सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक अनुराग जैन, मा. अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या निर्देशानुसार करण्यात आली.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट कार्यालयातील पोलीस हवालदार अश्विन सुखदेवे, चेतन पिसे, उमेश लडके, राहुल साठे, सतीश घवघवे तसेच पोलीस नाईक रवींद्र घाटुर्ले यांनी केली.
सदर प्रकरणात हिंगणघाट पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Sivshenanews /शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हिंगणघाटतर्फे नगराध्यक्ष पदासाठी नीता सतीश धोबे उमेदवार निवड

 

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट (दि. २३ ऑक्टोबर २०२५) :

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे हिंगणघाट नगरपरिषदेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदासाठी (महिला सर्वसाधारण) उमेदवार निवड करण्याकरिता आढावा बैठक आज पक्ष कार्यालयात दुपारी ३ वाजता संपन्न झाली.

या बैठकीस माजी उद्योगराज्यमंत्री तथा माजी आमदार आणि हिंगणघाट विधानसभा संपर्कप्रमुख मा. अशोक शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे, उपजिल्हाप्रमुख सतीश धोबे, तालुकाप्रमुख मनीष देवडे, तालुका संघटक लक्ष्मण डंभारे, शहरप्रमुख चंदू भुते यांच्यासह ज्येष्ठ शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या वेळी सर्व शिवसैनिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसेच हिंगणघाट विधानसभा संपर्कप्रमुख म्हणून नियुक्त झाल्याबद्दल अशोक शिंदे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

बैठकीत तालुकाप्रमुख मनीष देवडे यांनी पक्षाकडून लोकशाही मार्गाने उमेदवार निवड करण्याचे आवाहन केले. उपजिल्हाप्रमुख सतीश धोबे यांनी येणाऱ्या निवडणुकीत एकजुटीने काम करून नगरपरिषदेत भगवा फडकवण्याचे आवाहन केले.

जिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे यांनी हिंगणघाट नगरपरिषद भगव्या ध्वजाखाली आणण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी रक्ताचे पाणी करावे, असे सांगत पक्षनिष्ठेचे महत्त्व अधोरेखित केले.

बैठकीत उपस्थित सर्व शिवसैनिकांच्या एकमताने निता सतीश धोबे (माजी नगरसेविका) यांची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून निवड करण्यात आली असून त्यांचे नाव वरिष्ठांकडे शिफारसीसाठी पाठविण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात अशोक शिंदे यांनी सांगितले की, “आपण सारे शिवसैनिक एकत्र राहिलो तर विजय निश्चित आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालत सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हीच खरी शिवसेना आहे.”

या बैठकीस अनेक मान्यवर पदाधिकारी व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते