Home Blog Page 279

आता यापुढे राज्यातील या नागरीकांना मिळणार नाही रेशनधान्य

0

 

राज्य सरकारचा मोठा निर्णय

संतोष काळे बाळापूर

आता राज्यातील ज्या नागरिकांचे उत्पन्न वाढले आहे अश्या नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातुन मिळणार रेशनधान्य मिळणार नसल्याची मोठी बातमी समोर आली आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी राज्य सरकारकडुन १ सप्टेंबर पासुन रेशनकार्डाची पडताळणी करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील अनेक नागरिकांना रेशनधान्यापासुन मुकावे लागणार आहे .

शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की राज्यातील ज्या नागरिकांचे आर्थिक उत्पन्न वाढले आहे ,असे नागरिक देखिल स्वस्त किंमतील रेशनधान्याचा लाभ घेत आहेत. अश्या नागरिकांकडुन सदर रेशनधान्य जास्त किंमतीत विकण्यात येते. तसेच असे रेशनधान्य जनावरांसाठी भरडा म्हणुन वापर होत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे .यामुळे राज्यातील ज्या नागरिकांना खरच रास्त किंमतीत रेशनधान्याची आवश्यकता आहे अश्या नागरिकांपर्यंत रेशनधान्य मिळत नाही . शिवाय दारिद्रय रेषेखालील कार्ड धारकांना विशेष सवलत दरांमध्ये,रेशनधान्य दिले जाते . परंतु जे नागरिक खरच दारिद्रय रेषा खाली आहेत.अश्या नागरिकांकडे दारिद्रय रेषेचे कार्ड नसल्याची बाब समोर आली आहे .उत्पन्न वाढुन देखिल नागरिक रास्त भावामध्ये रेशनधान्य घेवून,जास्त किंमतीमध्ये धान्य विकत असल्याने अशा नागरिकांवर कायदेशीर कारवाई करणेबाबत राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे.यासाठी ज्या नागरिकांचे उत्पन्‍न वाढुनही रास्त भावामध्ये रेशनधान्याचा लाभ घेत असतील अश्या नागरिकांचे रेशनकार्डाची पडताळणी दि १ सप्टेंबरपासुन सुरु होणार आहे .

वाडेगाव तंटामुक्त अध्यक्षपदी मो.अफ्तार यांची निवड

0

 

संतोष काळे बाळापुर

वाडेगांव ग्राम पंचायतची ग्रामसभा श्री जागेश्वर मंदीराच्या सभागृह मध्ये नुकतीच संपन्न झाली या ग्रामसभेमध्ये सर्वांनुमते वाडेगाव तंटामुक्त अध्यक्षपदी मोहम्मद अफ्तार यांची एक मताने निवड करण्यात आली

यावेळी ग्रामसभेचे अध्यक्ष अँड सुबोध डोंगरे हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये सरपंच मेजर मंगेश तायडे उपस्थीत होते. ग्रामविकास अधिकारी सुनिल इंगळे यांनी मागील सभेचे इतीवृत्त वाचुन दाखविले तसेच शासन परिपत्रकाचे ,माहीती अधिकार अर्जाचे वाचन केले आणि शासनाच्या विविध योजने बद्दल माहीती देवुन अजेंड्या वरील सर्व विषय वाचवून दाखविले तसेच वेळेवर आलेल्या विषयावर चर्चा करण्यात आली.अजेंडयावरील व वेळेवर आलेल्या सर्व विषयायांना ग्रामसभेत सर्व ठराव मंजुर करण्यात आले.यावेळी तंटामुक्ती अध्यक्षाची निवड करण्यासाठी ग्राम सभेत विषय घेण्यात आला असता वाडेगाव तंटामुक्ती अध्यक्षस्थपदी हाजी मो.अफ्तार ऊर्फ बब्बु भाई ठेकेदार यांची मतदान फ्ध्दतीने हात वर करून बहुमताने निवड करण्यात आली. यावेळी ग्राम पंचायतचे सर्व सदस्यगन गावातील नागरिक,पत्रकार बाधव तसेच ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थीत होते. वाडेगाव पोलिस चौकीचे उपनिरीक्षक गजानन राहटे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या कडून समुद्रपूर च्या पुरग्रस्तांना किराणा किट चे वाटप

0

 

“मदत नव्हे कर्तव्य “*पोळा च्या निमित्ताने पुरग्रस्त।ना भेट
मलक मो नईम
हिंगणघाट ग्रमीण समुद्रपूर शहरात आलेल्या महापुरामध्ये अनेक कुटुंबियांना प्रचंड त्रास सोसावा लागला धन,धान्य पासून तर घरातील प्रत्येक वस्तू ही पाण्याखाली होती तेव्हा आमदार कुणावार याची दखल यांनी तलाठ्यांच्य माध्यमातून प्रत्येकांच्या घरी जाऊन नुकसानीची पाहणी करत नुकसानग्रस्त कुटुंबांना सर्व्हे केला शासनामार्फत एकुण परिस्थिती बघता आमदार समीरभाऊ कुणावार यांनी पुरग्रस्त कुटुंबाला मदत करण्याचा संकल्प केला होता व त्याप्रमाणे त्यांनी नियोजन करून महामंत्री किशोर दिघे तालुका अध्यक्ष संजय डेहणे, माजी नगराध्यक्ष गजानन राऊत ,विकी बारेकर सह युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत नियोजनबद्ध पद्धतीने दीपाली मंगल कार्यलयात येथे आजच्या किराणा किट वितरण कार्यक्रचे नियोजन केले व आज जवळपास 215 पुरग्रस्ताना दोन महीने पुरेल इतके किराणा कीट चे वाटप करण्यात आले..
यावेळी कार्यक्रमाला भाजपा जिल्हा महामंत्री किशोरभाऊ दिघे,जिप वर्धा चे माजी अध्यक्ष नितीन मडावी तालुका अध्यक्ष संजय डेहणे,पंचायत समितीचे माजी उपसभापती योगेश फुसे, युवा मोर्चा चे प्रदेश सचिवअंकुश ठाकुर,‍ नगरसेवक प्रा मेघश्याम ढाकरे, माजी नगराध्यक्ष गजानन राऊत,तालुका महामंत्री वामन चदनखेडे,माजी नगराध्यक्ष शीला सोनारे, माजी उपाध्यक्ष वर्षाताई बाभूळकर , महिला आघाडीच्या समीक्षा मांडवकर , नगरसेविका आरती कुडे,मोनिका काळे सिमा काळे,वनिता झाडे माजी नगरसेविका ताराबाई अडवे, इंदूबाई झाडे, सुषमा चिताडे, वनिता कांबळे,आशिष
अंन्डरस्कर,शर अध्यक्ष राम काळे युवा मोर्चा चे विकी बारेकर , रजत भुरे,अनुराग चौधरी, अतुल बावणे,बालुभाऊ इंगोले,संजय वरटकर, शेषराव तुळणकर मडकं।म आदी मान्यवर उपस्थित होते
संचालन गजानन राउत यांनी केले तर प्रास्तविक प्रा मेघश्याम ढाकरे यांनी केले तर आभार संजय डेहने यांनी मानले

आदी पदाधिकारी व मंगेश राऊत, मुकेश गोठे,नरेश आरसे वृषभ झाडे,नितीन मोरे, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

समुद्रपूर येथे अनेक वर्षापासून 100 रुपयांच्या स्टॅम्प ११० रुपयात शासन प्रशासन व इतरांचे दुर्लक्ष

0

 

सचिन वाघे प्रतिनिधी

समुद्रपूर :-जोशना अनिल कामडी यांचे अनेक वर्षापासून इंडियन गॅस एजन्सी येथे स्टॅम्प विक्रीसाठी उपलब्ध आहे. या ठिकाणी जोशना कामडी या स्वतः स्टॅम्प खतवत नसून इतर कोणीच दुसरा व्यक्ती स्टॅम्प खतवतात व येथील सर्वांना हे खुलेआम दिसत आहे तरीसुद्धा येथील शासन प्रशासन व इतरांचे दुर्लक्ष. आज सर्व ठिकाणी खुलेआम भ्रष्टाचार वाढत आहे कोणतीही कारवाई होत नाही . व हे सर्व अनेक वर्षापासून सुरू आहे समुद्रपूर तहसील कार्यालय ,दिवाणी न्यायालय येथे सरकारी कामासाठी स्टॅम्प पेपरची आवश्यकता असते जोशना कामडी या ठिकाणी शंभर रुपयाचा स्टॅम्प 110 रुपयांमध्ये विकतात . 110 रुपये घेतल्यानंतरच स्टॅम्प पेपर देण्यात येते . आपण हिंगणघाट तहसील कार्यालय येथे 100 रुपयात स्टॅम्प मग इथे 110 रुपये का ? स्टॅम्प घेणाऱ्याने असे विचारल्यास त्याला सांगण्यात येते की स्टॅम्प घेण्याच्या अगोदरच 110 रुपये सांगितले होते. पटलं तर घ्यायचं नाही तर नाही घ्यायचं बाहेर गाऊन येणाऱ्यांना मजबुरीने शंभर रुपयाची स्टॅम्प 110 रुपये द्यावे लागते . समुद्रपूर येथील शासन प्रशासनाचे डोळे बंद आहे. हेच लक्षात येते याबद्दल अनेक तक्रारी पेपरच्या माध्यमातून प्रशासनास माहिती असताना सुद्धा कोणतीही कारवाई होत नाही. याचं आश्चर्य होत आहे.

चितोडा येथील एका व्यक्तिचा अत्यंत निघृणपणे खून पोलीस यंत्रणा दाखल परिसरात एकच खळबळ

0

 

डोंगर कठोरा शिवारात एका व्यक्तिचा अत्यंत निघृणपणे खून पोलीस यंत्रणा दाखल परिसरात एकच खळबळ

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील चितोडा येथील राहणारे मनोज संतोष भंगाळे या वय ४० वर्ष व्यक्तिचा अत्यंत निर्घूणपणे खून करून त्यांचा मृतदेह सांगवी बुद्रुक शिवारातील चंद्रकांत निंबा चौधरी यांचे शेतात सोमवारी सकाळच्या सुमारास काही शेतकऱ्यांना आढळून आला आहे या घटनेमुळे परिसरात सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे . रविवारी दिनांक २१ ऑगस्टच्या रात्री मनोज भंगाळे हे जेवण करून मनोज भंगाळे हे आपली मोटर सायकल क्रमांक एमएच १९डी आर ९५९८या गाडी करून बाहेर पडले सांगितले जात आहे. सोमवारी सकाळी लगतच्या शेतातील शेतकऱ्यास भंगाळे यांचा मृतदेह दिसल्यानंतर घटनेची खबर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे घटनास्थळी फैजपूर उपविभागीय पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, उप पोलीस निरीक्षक विनोद खांडबहाले सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले असून घटनास्थळी डॉग स्काॅट,सह प्रयोगशाळा तंत्रज्ञ घटनास्थळी पोहचले आहेत.

तालुक्यातील चितोडा येथील मनोज संतोष भंगाळे वय 40 वर्ष यांचा मृतदेह त्यांच्या मोटरसायकल क्रमांक एमएच १९डी आर ९५९८ सह तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील चंद्रकांत निंबा चौधरी यांच्या डोंगर कठोरा फाट्याजवळील चितोडा डोंगर कठोरा मधल्या रस्त्या वरील शेतात आढळून आला आहे मृतदेहावर पोटावर तसेच मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार केले असून मृतदेह पालथे अवस्थेत होता घटनेचे वृत्त परिसरात कळताच चितोडा सांगवी बुद्रुक डोंगरकठोरासह परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली होती
भंगाळे यांची मोटर सायकल मृतदेहापासून पाच-सहा फुटाचे अंतरावर मिळून आली आहे. पंचनामा करण्याचे काम सुरू आहे

चितोडा येथील युवकाची खून एका तरूणाचा अतिशय क्रूर पध्दतीत खून झाल्याचे आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली

0

 

यावल तालुका (प्रतिनिध) विकी वानखेडे

तालुक्यात आज पहाटेच एका तरूणाचा अतिशय क्रूर पध्दतीत खून झाल्याचे आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, यावल तालुक्यातील सांगवी फाटा ते डोंगरकठोरा रस्त्यावर आज पहाटे एका तरूणाचा छिन्नविछीन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. ग्रामस्थांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यात मृत व्यक्ती हा मनोज संतोष भंगाळे (वय ४०) असून तो चितोडा येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. मनोज भंगाळे हे कुणाच्या अध्यात-मध्यात पडत नसून ते शेती आणि प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली आहे.

मारेकर्‍यांनी अतिशय क्रूर पध्दतीत मनोज भंगाळे यांना संपविले आहे. त्यांच्या गळ्यात फास टाकून कोणत्या तरी वाहनाने त्यांना ओढून आणत रस्त्याला लागून असणार्‍या शेतात त्यांचा मृतदेह टाकण्यात आला आहे. तसेच, त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने अनेक वार करण्यात आल्याचेही आढळून आले आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरिक्षक राकेश मानेगावकर, उपनिरिक्षक विनोद खांडबहाले आणि त्यांच्या सहकार्‍यांनी दुर्घटना स्थळी धाव घेऊन पंचनामा करत या क्रूर घटनेचा तपास सुरू केला आहे. परिसरातील ग्रामस्थांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मयत मनोज भंगाळे याचा मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रूग्णालयात पाठविण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून चर्चेला उधाण आले आहे.

सातपुडा वाघझीरा वनक्षेत्रात मोल्यवान सागवानची वृक्षतोड थांबविण्यात अकार्यक्षम ठरलेल्या वनपाल , वनसंरक्षक व वन मजुर निलंबीत

0

 

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

पश्चीम वन विभागातील तीन कर्मचारी हे सातपुडा जंगलातील होणारी वृक्षतोड थांबविण्यात अकार्यक्षम निलंबित
ठरल्याने त्यांना निलंबीत करण्यात आले असल्याची घटना घडली आहे, वाघझिरा वन क्षेत्रातील वृक्षतोडी संदर्भात मागील पंधरवाडयात विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातुन माहीती देण्यात आली होती .

यावलच्या सातपुडा जंगलातील पश्चिम वनविभागाच्या वाघझिरा परिमंडळात गेल्या दोन महिन्यात मोत्यवान वृक्षतोड रोखण्यात अकार्यक्षम ठरलेल्याच्या कारणावरून वाघझिरा बीटचे वनपाल वनरक्षक व एकावन मजुरास अशा तीन जणांना वनविभागाने निलंबित केले आहे.

येथील पश्चिम वनविभागांतर्गत सातपुड्यातील मोल्यवान सागवानी वृक्षासह अन्य वृक्षतोड रोखण्यास अकार्यक्षम ठरल्याचे कारणावरून वनविभागाने वाघझिरा बिट चे वनपाल राजेश शिंदे, वनरक्षक डी वाय नलावडे वनमजूर काशिनाथ बेलदार अशा तिघांना तडकाफडकी निलंबनांची कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती पश्चिम वनक्षेत्राची वनपरिक्षेत्रपाल एस.टी . भिलावे यांनी दिली आहे

यावलच्या सातपुडाजंगलातील वन विभागातील कार्यक्षेत्रात मागील काही महिन्यापासून सागवानी वृक्षासह इतर मौल्यवान वृक्षाची वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे, तसेच सागवानी लाकडाचा, अवैध व्यवसाय वन, विभागाच्या आशीर्वादाने जोमात सुरू असल्याची तालुक्यात चर्चा होत आहे .

अल्लीपूर शोध पथकाने टँकर चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांना केली अटक

0

 

अल्लीपूर :- मौजा कानगाव ते मोझरी या गावाच्या दरम्यान असलेले सार्वजनिक रस्त्यावरील पुलाचे दुरूस्तीचे काम सुरू होते त्या साईडवर त्यांनी पाण्याची व्यवस्था करण्याकरिता वॉटर टँकर आनुन ठेवला होता तो टँकर कोणी तरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याबाबत पारस हेमंतराव माळोदे रा. वर्धा शासकीय कॉन्ट्रॅक्टदार यांनी दि . 19/08/2022 रोजी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारी वरुन अप. क्र. 480 / 2022 कलम 379 भा. दं. वि. चा गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेवुन लागलीच आरोपी शोधकामी दोन पथके रवाना करण्यात आलेली होती शोध घेत असतांना मुखबीरकडुन माहीती मिळाली कि राळेगाव येथे राहणारे आरोपी क्र. 1) गौरव किशोर महाजन वय 22 वर्ष 2) प्रविन सुर्यभान कोरंगे वय 38 वर्ष है संशईतरित्या ट्रॅक्टर व टँकर फिरवतांना दिसल्याने त्यांना शिताफिने ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन गुन्हा करतेवेळी वापरलेला एक विना क्रमांकाचा मँसी कंपनीचा ट्रॅक्टर कि. 5,00,000/- रु. व वॉटर टैंकर कि.1,00,000/-रु. असा एकुन 6,00,000/- रु. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी ही मा. पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत होळकर सा. वर्धा, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. यशवंत सोळके सा. वर्धा, तसेच मा. उपविभागीय पोलीस अधीकारी, पुलगाव गोकुळसिंह पाटील, व पोलीस निरीक्षक श्री. सुनिल गाडे पो. स्टे. अल्लीपुर यांच्या मार्गदर्शनात सफौ.संजय रिठे, अशोक चहांदे, प्रविन भोयर, नापोशि. अभय वानखेडे, पोशि. संजय वानखेडे, पोशि निलेश नुगुरवार, पोशि. अनुप नाईक केली असुन पुढील तपास सफौ. संजय रिठे करित आहे.

दिपनगर प्रकल्प २१०/५५०/६६० विजनिर्मितीकेन्द्रांतील मनमानी व हुकुमशाही प्रशासनाविरोधात युवा आधार प्रतिष्ठाण (महाराष्ट्रराज्य) संघटना आता रस्त्यावर उतरणार

0

 

विकी वानखेडे कार्यकारी संपादक

हुकुमशाही प्रशासनाविरोधात आणी बेरोजगार युवकांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी युवा आधार प्रतिष्ठाण (महाराष्ट्रराज्य) संघटना आता रस्त्यावर उतरणार आहे ….
लढा आपल्या हक्काचा
दिपनगर प्रकल्प २१०/५५०/६६० विजनिर्मितीकेन्द्रांतील मनमानी व हुकुमशाही प्रशासनाविरोधात आणी बेरोजगार युवकांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी युवा आधार प्रतिष्ठाण (महाराष्ट्रराज्य) संघटना आता रस्त्यावर उतरणार आहे ….*
दिनांक १९/०८/२०२२ रोजी दिपनगर प्रकल्पात मुख्यअभियंता श्री.विजय राठोड साहेब यांची भेट घेतली व मागील काही दिवसांपासून सदरील प्रकल्पात पत्रव्यवहार सुरू होता परंतु आमच्या असे निदर्शनास आले की संबंधित प्रशासन वेळ काढु पणा करत आहे आणी फक्त आश्वासन देण्याचे काम करत आहेत तरी सदरील प्रकार हा खुप निंदनीय आहे व स्थानिक कंत्राटदार सुद्धा बेरोजगार युवकांना सहकार्य करतांना दिसत नाही संबंधित प्रशासन हे गरजु व स्थानिक नागरिकांना कशा प्रकारची वागणूक देत आहेत आणी आम्ही युवा आधार प्रतिष्ठाण (महाराष्ट्रराज्य) संघटने तर्फे जाहीर निषेध करतो व संबंधित बेरोजगार युवकांना त्वरित कामावर घेण्यात यावे अशी मागणी केली व सदरील प्रश्न येत्या ०८ दिवसात मार्गी लावावा अन्यथा युवा आधार प्रतिष्ठाण (महाराष्ट्रराज्य) संघटना आंदोलनाच्या तयारीत आहे याची आपण दखल घ्यावी असा इशारा संस्थापक अध्यक्ष – श्री रितेश भाऊ नायके यांनी दिला व या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी
श्री.शुभम शशिकांत सोयंके (महाराष्ट्र राज्य प्रवक्ते),
,श्री.लव वामन झाडगे (महा.संपर्क प्रमुख) , श्री.अरुण विश्वनाथ इंगळ (जळगाव जिल्हाअध्यक्ष), रोहित यशवंत तायडे, अक्षय किशोर तायडे
,मयुर राजु केदारे, अजय विकास तायडे,सिद्धार्थ लिलाधर तायडे अमोल कडु निकम आदी कार्यकर्ते उपस्थित होते

कोरपावली गावातील त्या मुन्नाभाई एमबीबीएसचे पुन्हा आगमन बोगस दवाखाना सुरू आरोग्य यंत्रणा कुचकामी

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

 

तालुक्यातील आदीवासी गाव म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या कोरपावली गावात तो मुन्नाभाई एमबीबीएस बोगस डॉक्टर पुनश्च सक्रीय झाला असुन , उपचाराच्या नांवाखाली सुरू असलेल्या कारभारास गावातील काही तथा कथित पुढारी व स्थानिक आरोग्य प्रशासनाचे पाठबळ या बोगस डॉक्टरला मिळत असल्याची ग्रामस्थांनी ओरड असुन , वरिष्ठ पातळीवरील आरोग्य प्रशासनाने या प्रश्नाकडे तात्काळ लक्ष देवुन कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे . यावल तालुक्यातील कोरपावली गाव हे आदीवासी गाव म्हणुन ओळखले जाते या गावात गेल्या काही दिवसा पासुन एका बिहारी बोगस डॉक्टराने गेल्या दोन वर्षा पासुन आपला उपचाराचा कारभार सुरू केला असून , उपचाराच्या नावाखाली ग्रामीण क्षेत्रातील गरजु रूग्णाच्या जिवाशी खेळ खेळला जात असुन , या संदर्भात यावल तालुका डॉक्टर असोसिएशनच्या माध्यमातुन अशा बोगस व्यवसायीक डॉक्टरांबद्दल तक्रारी करण्यात आल्या होत्या यानंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ गफूर तडवी यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातुन कार्यवाही करीत त्याच्या कडील असलेली कागदपत्रे चौकशी कामी जमा केली होती . त्या बोगस डॉक्टरास चौकशी अहवाल मिळे पर्यंत आपला दवाखाना बंद ठेवावा अशा सुचना देण्यात आल्या होत्या . सदरच्या या बोगस डॉक्टरचा दवाखाना बंद पाडला होता , मात्र काही दिवस हा बोगस डॉक्टर बाहेरगावी निघुन गेल्यानंतर तो पुन्हा कोरपावली गावात दाखल झाला असुन , त्याने पुनश्च आपला दवाखाना सुरू केला असुन , अशा बोगस डॉक्टरांवर आरोग्य यंत्रणेचे नियंत्रण नसल्याचे दिसुन येत असुन, अशा प्रकारे बोगस डॉक्टरांच्या चुकीच्या उपचार पद्दतीने रुग्णांच्या संदर्भात काही अप्रीय घटना घडल्यास व रुग्ण दगावल्यास यास जबाबदार कोण असा प्रश्न सुज्ञ ग्रामस्थामध्ये उपस्थित होत आहे . या संदर्भात सावखेडा सिम तालुका यावल प्राथमिक आरोग्य केन्द्र आणी ग्रामपंचायतीने तात्काळ संयुक्त कार्यवाही करून त्या बोगस डॉक्टरला पाठींबा देणाऱ्यांना समज देवुन त्या बोगस डॉक्टरचे दुकान कायमचे बंद करावीत अशी मागणी करण्यात येत आहे .