Home Blog Page 280

उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांचा उत्कृष्ट अधिकारी म्हणून सन्मान …

0

 

हिंगणघाट :- मलक नईम महसूल दिनाच्या दिवशी हिंगणघाट शहरातील उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाली यांचा उत्कृष्ट अधिकारी म्हणुन प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांनी 18 व 19 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीच्या पावसात उल्लेखनीय कामगिरी करत हिंगणघाट उपविभागातील लोकांना पूर परिस्थितीत रेस्क्यू करत सुरक्षित स्थळी हलविले त्यामुळे तालुक्यात कुठलीही जिवित हानी झाली नाही,त्याचबरोबर अनेक कामात उल्लेखनीय कामगिरी करत लोकांच्या प्रश्नांना अल्पवेळात न्याय देत लोकांची मने जिंकली.

याचा सन्मान म्हणून महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी वर्धा यांच्या द्वारे उत्कृष्ट अधिकारी म्हणून प्रमाणपत्र देत सन्मान करण्यात आला आहे हिंगणघाट उपविभागीय अधिकारी यांना मिळालेल्या या सन्माना बद्दल अनेक स्तरातुन शुभेच्छा दिल्या जात आहे.
हा सन्मान सोहळा जिल्हा अधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता त्यावेळी जिल्हाधिकारीसह जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.

महागाई,जीएसटी आणि बेरोजगारी विरोधात काँग्रेसने तहसील चौकात केंद्र शासनाचा निषेध करून केले जेल भरो आंदोलन

0

 

जळगाव जामोद/पल्लवी कोकाटे

देशातील जनता महागाईने त्रस्त असताना केंद्रशासनाने जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावून गोरगरिबांचा तोंडातला घास हिरावून घेतला आहे.केंद्रसरकारला मात्र महागाई दिसत नाही बेरोजगारी वाढली असून अग्निपथ योजना आणून कोरोनाचा जखमेवर केंद्र शासनाने मीठ चोळले आहे महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा विविध विषयांवरील जनतेचा या प्रश्नावर जाब विचारण्यासाठी आज दिनांक ५ ऑगस्ट रोजी बुलढाणा जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांचा नेतृत्वात जिल्हाभर निषेध आंदोलन व जेल भरो आंदोलन करण्यात आले.
त्याच पार्श्वभूमीचा माध्यमातून जळगाव जामोद कॉंग्रेसचा वतीने तहसील चौकात केंद्रशासनाचा निषेध करण्यात आला व जेल भरो आंदोलन करण्यात आले.

भूषण पिसे यांनी कार्यकर्ते सहित राष्ट्रवादी पक्षाला राम राम करून भाजपमध्ये प्रवेश केला

0

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी शहर अध्यक्ष हिंगणघाट नगरपालिका निवडणूक जवळ असताना कार्यकर्त्यासहित पक्षप्रवेश केल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे वजन वाढणार शहरात चर्चा

भूषण पिसे :- भाजपकडून नगरसेवकपदा साठी निवडणूक लढण्याची माझी इच्छा नाही . मी निवडणूक लढणार नाही व आपली तशी इच्छा नाही आमदार समीर कुणावर यांचे विधानसभा क्षेत्रातील काम चांगले वाटल्यामुळे आपण त्यांच्या नेतृत्वात पक्ष प्रवेश केला .

महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेस आंदोलन, पुन्हा एकदा काँग्रेस केंद्र सरकारवर हल्लाबोल

0

 

अर्जुन कराळे शेगाव प्रतिनिधी

शेगावात रास्ता रोको आणि निदर्शने महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून काँग्रेस सतत केंद्र सरकराचा घेराव करत आली आहे. अशातच पुन्हा एकदा काँग्रेस केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. महागाई आणि बेरोजगारीच्या निषेधार्थ काँग्रेस आज शुक्रवारी देशव्यापी आंदोलन पार पडले. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात रस्ता रोको करीत निदर्शने करण्यात आली.
महागाई, बेरोजगारी आणि जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी वाढीविरोधात काँग्रेसने आज शुक्रवारी देशभरात मोठ्या आंदोलनाची योजना आखली असून त्यामध्ये पक्ष राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढणार आहे. तर सकाळी बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव रामविजय बुरुंगले यांच्या नेतृत्वात खामगाव-अकोट या राज्यमहामार्गवर केंद्र सरकार विरोधात निदर्शने करीत रास्ता रोको करण्यात आला. शहर व तालुका काँग्रेस च्या वतीने आयोजित या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र पाटील, कैलाशबाप्पू देशमुख शहराध्यक्ष किरणबाप्पू देशमुख, केशवराव हिंगणे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

मळसूर येथील यात्रेत वेगवेगळ्या जुगार अड्ड्यावर धाड

0

 

चान्नी पोसीसांची कारवाई; १० आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल

२ मोटर सायकलसह ०१,३५,३२०रू मुद्देमाल जप्त

राहेर .: पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मळसूर येथे दि‌.२ ऑगस्ट रोजी यात्रेत मध्यरात्री पो.काॅ दत्तात्रय हिंगणे यांच्या गुप्त बातमीदारामार्फत खात्री लायक माहीती मिळाली की मळसूर गावात यात्रा परिसरात यात्रेच्या रात्री काही इसम जुगार खेळत आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाणेदार योगेश वाघमारे यांनी त्यांच्या पथकासह सदर ठिकाणी जावुन सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कारवाई छापा टाकला.मळसूर ते पाडसिंगी रोडवर जुगार आरोपी सुरेश शामराव देवकते,दिनेश सुपाजी बघे,दिनकर वामन कंकाळ, संतोष नारायण कंकाळ,हे आरोपी मळसूर प्रदीप लक्ष्मण चव्हाण पाडसिंगी,दिलीप वामन डाखोरे पाडसिंगी, तसेच मळसूर ते आलेगाव रोडवर कॅनॉलजवळ आरोपी नंदकीशोर देवानंद गव्हाळे, आत्माराम तुळशिराम राठोड, मिलिंद जयराम पायघन,सुनिल गणेश करे ,असे एकूण १० इसम जुगार खेळतांना मिळून आल्याने त्यांच्यावर पोलीस स्टेशन चान्नी येथे जुगार प्रतिबंधक कायदा अन्वये वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून गुन्हयात २ मोटरसायकल ७ मोबाईल व रोख रक्कम असा एकूण ०१,३५,३२०/-रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक जी.श्रीधर,मा. अप्पर पोलीस अधीक्षिका मोनिका राऊत ,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी रितु खोकर, यांच्या मार्गदर्शनाखाली चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश वाघमारे,ना.पो.काॅ देवेंद्र चव्हाण,पो.काॅ सुनिल भाकरे, पो.काॅ दत्तात्रय हिंगणे, यांनी केली आहे.

गायगाव ते मोरगाव भाकरे रोडवर लाकडी सेंटिंगने भरलेले वाहन पलटी होवुन झाला अपघात :कुठलीही जीवित हानी नाही.

0

 

प्रतिनिधी
अशोक भाकरे

अकोला -: तालुक्यातील गायगाव ते मोरगाव भाकरे रोडवर लाकडी सेंटिंगने भरलेले वाहन जात असताना वाहन क्रमांक MH 28 9783 रोडच्या बाजूला तिन ते चार फुट खड्डात पलटी झाले असून सदर गाडी मालक विलाल खान यांच्या मालकीचा आहे. असे त्यांनी सांगितले तसेच हा खड्डा दोन वर्षापासून पडलेला आहे,
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, गायगाव ते मोरगाव या गावातील नागरिकांना ये जा करण्यासाठी हा सोयीचा रस्ता आहे.परंतु खड्डे यामुळे मार्गांवर वर वाहतूक करणे अडचणीनी चे ठरत आहे. खड्ड्यांमुळे या मार्गांवर अडचणीचे ठरत आहे.
खड्ड्यांमुळे दर दिवशी मोटारसायकल घसरून अपघात होत आहे.
हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
संबंधित ठेकेदाराला रस्ता दुरुस्तीचे आदेश पंचायत समितीने देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
या मार्गावरून दररोज शाळेत जाण्यात साठी विद्यार्थी पालक शिक्षक शेतकरी वर्दळ असते. यातून त्यांची वाहने खड्ड्यात पडून शरीराला दुखापत होते होते. तसेच नियोजित जागांवर पोहोचण्यास नेहमी उशीर होत असतो.
दरम्यान हा रस्ता जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येत असल्याची माहिती देण्यात आली आहे मार्गाची देखभाल दुरुस्तीचे काम जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे आहे परंतु त्यांच्याकडून लक्ष देण्यात आलेले नाही.

शिक्षक वाटणार पाच हजार राष्ट्रध्वज

0

 

जळगाव जामोद/पल्लवी कोकाटे

जळगाव जामोद येथे स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्यामुळे देशात सर्वच स्तरावर आजादी का अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.यानिमि-ताने पंचायत समिती चे गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्रप्रमुख याच्या योगदानातून पाच हजार तिरंगा ध्वज नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

यावल पोलिस ठाण्याच्या प्रभारी निरीक्षकपदी राकेश मानगावकर यांची नियुक्ती करण्यात आली.

0

 

विकी वानखेड़े  यावल-जळगाव

गुरुवारी जिल्हा पोलिस डॉ.प्रवीण मुंढे यांनी याबाबतचे आदेश काढले. यावल पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक तथा आयपीएस आशीत कांबळे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांच्या रीक्त जागी नियंत्रण कक्षातील निरीक्षक दिलीप भागवत यांची तात्पुरता बदली करण्यात आली होती मात्र गुरुवारी पोलिस अधीक्षकांनी मानगावकर यांच्या नियुक्तीचे आदेश काढले असून मानगावकर यांनी गुरुवारी सायंकाळी भागवत यांच्याकडून पदभार स्वीकारला. शहर व तालुक्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्यास प्रथम प्राधान्य राहणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

जळगाव जामोद येथे विहिरीत उडी घेऊन २२वर्षीय तरुणाने केली आत्महत्या

0

 

जळगाव जामोद/पल्लवी कोकाटे

जळगाव जामोद येथील नगरपरिषदेच्या पाठीमागील वस्तीमध्ये राहणाऱ्या बावीस वर्षीय करण अजबराव तायडे या तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल दिनांक ३ऑगस्ट रोजी एक वाजे दरम्यान उघडकीस आली.सदर युवक दिनांक एक ऑगस्ट पासून घरातून निघून गेला होता.तो घरी आलाच नाही.सदर हा तरूण मनोरुग्ण व दारू पिण्याच्या सवयीचा असल्यामुळे त्यांनी याच कारणामुळे आत्महत्या केल्याचे समजते.मृतक करण चे वडील अत्यंत गरीब असून मोल मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.सदर घटनेची माहिती विनोद झाडे यांनी मृतक करण तायडे यांच्या वडिलांना सांगितली असता अजाबराव तायडे यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला सदर घटनेची फिर्याद दिली.घटनेची माहिती मिळताच जळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक घोडेस्वार सुनील वावगे तसेच बालकृष्ण पवार सचिन राजपूत निलेश पुंडे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेहाला विहिरीतून बाहेर काढले व ग्रामीण रुग्णालयातील राजू बुटे यांच्या जय भवानी रुग्णवाहिकेने सदर मृतदेहाला शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले.सदर जय भवानी रुग्णवाहिकेचे चालक दिपक तायडे यांनी तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध केल्याने त्यांची नागरिकांनी आभार मानले.शव विच्छेदनानंतर सदर मृतकाचे शव त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले अत्यंत शोकाकुल वातावरणात कुटुंबीयांनी मृतक करण याचा दफनविधी केला.सदर मृतकाने व्यसनाधीनतेने हे पाऊल उचलल्याचे समजते.पोलिसांनी फिर्यादी मृतकाचे वडील अजबराव तायडे यांच्या रिपोर्टवरून मर्ग दाखल केला.पुढील तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक किशोर घोडेस्वार , पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद वानखडे पोलीस शिपाई योगेश निबोंळकर करत आहेत.

महिंद्रा बोलेरो गाडीला अपघात गाडी पलटी

0

 

पल्लवी कोकाटे:- जळगाव जामोद

जामोद कडुन सुनगाव कडे येत असताना महिंद्रा बोलेरो गाडीला क्रमांक एम पी 12 एफ 1 4 7 2 अपघात झाल्याची घटना आज दुपारी चार वाजताच्या सुमारास जामोद सुनगाव रोडवर सुनगाव नजीक घडली त्यामध्ये बोलेरो गाडीमध्ये पाच ते सहा महिला व तीन ते चार पुरुष असल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले गाडी ही जामोद वरून सूनगावकडे येत असताना भरधाव वेगात चालकाचे नियंत्रण सुटल्या मुळे गाडी रोडच्या बाजूला पलटी होऊन चाके पूर्ण वर झालेली आढळून आले त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या प्रत्यक्ष दर्शनी हा अपघात पाहिल्याने सदर लोकांना गाडीतून काढण्यास मदत केली व त्यांना जळगाव सामान्य रुग्णालय येथे नेण्यात आले गाडी ही भरधाव वेगाने असल्यामुळे गाडीला दोन ते तीन पलट्या होऊन गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले परंतु कोणत्याही प्रकारचे सुदैवाने जीवित हानी झाली नाही