Home Blog Page 281

महावितरण कार्यालया पुढे चालू असलेल्या सोनाळा सरपंच व पांडवसर यांचे उपोषणाची ३ दिवशी लेखी पत्राद्वारे उपोषणाची सांगता……

0

 

संग्रामपुर- श्याम उमरकर

 

सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा व तसेच परिसरातील इतर गावांमध्ये वीज समस्येने गावकरी त्रस्त होते याकरता सोनाळा ग्रामपंचायतचे सरपंच राजेश विश्वकर्मा व रामदास पांडव सर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गावकऱ्यांनी महावितरण कार्यालया समोर १ ऑगस्ट पासून बे मुदत आमरण उपोषणास सुरुवात केली. असता त्यामध्ये संपूर्ण गावाने तसेच परिसरातील इतर गावातील नागरिकांनी या उपोषणास भेटी देऊन आपला पाठिंबा जाहीर केला. यामध्ये विद्युत वितरण कंपनीचे अनेक अधिकारी यांनी भेटी देऊन उपोषणकर्त्याची मन धारणी केली तरी सुद्धा त्यांनी उपोषण सोडण्यास नकार दिला.

 

 

अखेर राष्ट्रवादी पक्षाचे प्रसन्नजीत पाटील यांनी उपोषण मंडपात भेट देऊन अधिकाऱ्यांना समस्या सोडवण्याकरता महावितरण चे अधिकारी मुळे व बोदळे यांनी लेखी पत्र द्यावे असे खडे बोल लावत उपोषण कर्त्याचे मागण्या पूर्ण केल्या. सायंकाळच्या सहा वाजता उपोषणाची लेखी पत्र देवुन मागणी पूर्ण करण्यात आल्या.उपोषणामध्ये गावाचे सरपंच तसेच पांडव सर यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील गजानन साबळे , मनोज अमनकर प्रमोद इंगळे ,गोविंद देशमुख व अनेक जणांनी उपोषणामध्ये सहभागी झाली होती यामध्ये ३ आगस्ट रोजी गोविंद देशमुख यांची परिस्थिती खालावल्यामुळे त्यांना दवाखान्यांमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले होते .या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये अनेक राजकीय व्यक्तींनी भेटी तसेच पाठिंबा नोंदविला होता. यामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतरावजी भोजने तालुका अध्यक्ष भाजपा लोकेश जी राठी तालुका काँग्रेस अध्यक्ष राजीव वानखडे मनसे अध्यक्ष शिवा भोन, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रशांत डीकर व
सोनाळा पोलिस स्टेशन चे ठाणेदार गुट्टे तालुका वैद्यकीय अधिकारी रोजतकार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रसन्नजीत पाटील यांनी भेट घेऊन उपोषणाची सांगता केली. या उपोषणाकरता गावातील अनेक गावकऱ्यांनी यामध्ये आपले सहकार्य नोंदवले गावातील प्रमोद खोडे, गोपाल केणेकर, पप्पू सुरळकर, मुन्ना शेंडे, पवन शेंडे, प्रकाश गोतमारे, शरद लव्हाळे, रमजान भारसाकडे , उमेश भारसाकळे,ललित सावळे, उपसरपंच व इतर लोकांनी यामध्ये आपले सहकार्य नोंदविले आहे.

 

पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा धरणात बुडून मृत्यू

0

 

जळगाव जामोद/पल्लवी कोकाटे

जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथून जवळच असलेल्या सोनबडी येथील धरणामध्ये आपल्या मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या लाडणापुर येथील करण मंगल शामस्कार २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ४ वाजताच्या सुमारास घडली.श्रावणातील पहिला सोमवार असल्याने करण मंगल शामस्कार आपल्या मित्रांसोबत जटाशंकर येथे गेला होता.तिथुन परत येत असताना सोनबडी येथील धरणावर पोहण्यासाठी गेला असता त्याच्या मित्रांनी त्याला पोहण्यास मनाई केली.तरीही मृतक करण पोहण्यासाठी धरणात उतरला.तो बाहेरच आला नाही.काही नागरिकांनी पाण्यामध्ये उतरुन पाहिले असता तो सापडला नाही २ ऑगस्ट रोजी जळगाव पोलिसांनी केलेल्या प्रयत्नानंतर मृतदेह शोधून काढला.मृतकाला अल्सरचा त्रास होतो.
घटनेची फिर्याद रवींद्र अहिर यांनी पोलिसात दिली.आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

आमोदा शिवारात अंगावर वीज कोसळल्याने वृध्द शेतकरी जागीच ठार

0

 

यावल (प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील आमोदा शिवारात शेतात काम असतांना अंगावर वीज कोसळल्याने वृध्द शेतकरी जागीच ठार झाल्याची घटना दुपारी घडली आहे. याप्रकरण फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ज्ञानदेव धनु चौधरी (वय ६०) रा. आमोदा ता. यावल जि.जळगाव असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, आमोदा येथील रहिवासी ज्ञानदेव धनु चौधरी हे आमोदा शिवारातील आपल्या शेतात बुधवार ३ ऑगस्ट रोजी दुपारी १ ते २ वाजेच्या सुमारास काम करत होते. दरम्‍यान अचानक ढगांचा व विजांचा कडकडाट होऊ लागला. त्यानंतर त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्‍यांचा जागीच ठार झाला. या शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील असा परिवार आहे. शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याने मुले उघड्यावर पडले आहे.

पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल सानप यांनी पंचनामा केला. शेतकऱ्याला व कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी परिसरातून होत आहे. फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हिंगणघाट बस स्टॅन्ड वर सोन्याचे दागिने चोरणारी महिला टोळी

0

 

हिंगणघाट :- बस स्टॅन्ड वरील सोन्याचे दागिणे चोरनारी नागपुर येथील अट्टल महिला टोळी हिंगणघाट येथील डी. बी पथकाने अटक करून त्यांचेकडुन (सोने 12तोळा बीलानुसार) 2,80,000 रू. चा सोन्याचे दागिणे जप्त करण्यात आले.
घटना :- दि. 31 जुलै रोजी फिर्यादी सौ. कान्ता ज्ञानेश्वर झोरे या त्यांचे नातेवाईकांचे वास्तुशांती करीता वर्धा येथे जात असता, हिंगणघाट बस स्टॅण्ड वर फिर्यादीने त्यांच्या पर्स मध्ये ठेवलेले 12 तोळे सोन्याचे दागिणे बस मध्ये बसत असतांना कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेले. फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरून पो.स्टे ला अपराध क्र. 0884 / 2022 कलम 379 भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्हा दाखल होताच पो.स्टे. हिंगणघाट येथील पोहवा शेखर डोंगरे यांच्या गुन्हे प्रकटीकरण प्रथकास सदर गुन्हयाचा तपास सोपविण्यात आला. त्यांनी हिंगणघाट शहर, यवतमाळ, वणी, वरोरा, पाढरकवडा व लगतचे परिसरात सतत माहीती काढुन अनोळखी आरोपीतांचा शोध घेतला असता. सदर गुन्हयातील आरोपी नामे 1) सौ. मालाबाई मनोहर मानकर वय 42 वर्षे 2) सौ. कविता जतन नाडे वय 40 वर्षे 3) कु. संगीता कन्ना नाडे सर्व रा. शताब्दी नगर, रामेश्वरी टोली, अजनी, नागपुर यांना ताब्यात घेवुन त्यांना अटक करून, त्यांचा पिसिआर घेण्यात आला. पिसिआर काळात सर्व महिला आरोपींता कडुन गुन्हयात चोरीस गेलेले संपुर्ण सोन्याचे दागिणे जु.कि. 2,80,000 रू. चा माल जप्त करण्यात आला.
सदरची कामगीरी मा. श्री. प्रशांत होळकर, पोलीस अधीक्षक, मा. श्री. यशवंत सोळंके, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, मा. श्री. दिनेश कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट, पो.नि. श्री. कैलास पुंडकर, पोलीस स्टेशन, हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात सपोनि प्रशांत पाटणकर, पोउपनि सोमनाथ टापरे. डि. बी. पथकाचे पो. हवा. शेखर डोंगरे, नापोशि. निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, सचिन भारशंकर, पोशि संग्राम मुंडे, मनापोशि प्रेमिला गुजरकर यांनी केली आहे.

नागपंचमीनिमित्तचे झोके, झिम्मा फुगडी झाली दुर्मीळ

0

 

योगेश नागोलकार

राहेर : श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीच्या दिवशी येणारा हिंदू धर्मामध्ये महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. या दिवशी घराघरातून नागदेवतेची पूजा केली जाते. महिला, मुली, नवविवाहिता यांच्यासाठी हा सण विशेष असतो; परंतु मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे ग्रामीण भागातील नागपंचमीनिमित्तचे झोके, झिम्मा फुगडी दुर्मीळ होत चालले आहेत.
पातुर तालुक्यातील राहेर परिसरासह आदी गावांत मोठमोठी निंबाची झाडे होती. त्या झाडांना गावांमध्ये सार्वजनिक झोके असायचे. नागपंचमीनिमित्त गावातील तरुण, पुरुष, महिला या झोक्याचा आनंद लुटत असत. ग्रामीण भागामध्ये नागपंचमीच्या काळामध्ये स्त्रिया एकत्र येऊन झिम्मा फुगडी, फेर धरणे असे खेळ खेळत; परंतु दोन वर्षांपासून कोरोना महामारी, आधुनिक जीवनशैलीमुळे अस्सल ग्रामीण खेळ कालबाह्य ठरत आहेत. त्यामुळे पंचक्रोशीत परिसरात झोका दुर्मीळ झाला आहे.
मोठमोठी चिंच, वड, लिंब, आंबा अशा झाडांना दिसणारे झोके आता घरातील बाल्कनी अथवा गच्चीत दिसू लागले आहेत. ग्रामीण भागात नागपंचमीच्या अगोदर आठ दिवसांपासूनच महिला एकत्र येऊन फेर धरणे, वेगवेगळी गाणी म्हणणे, असे खेळ हल्ली दुर्मीळ झाले आहेत. नवविवाहित मुलींसाठी नागपंचमी हा सण विशेष महत्त्वाचा असतो.

पंचनाम्यांची औपचारीकता न करता अतिवृष्टीग्रस्तांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या…

0

 

रविकांत तुपकर यांची मागणी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन मांडली नुकसानीची दाहकता

बुलडाणा :- पंकज थिगळे

*बुलडाणा :-* अतिपावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि अनेक ठिकाणी जमिनींचेही मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी दुबार पेरण्याकरुनही पिके पाण्याखाली गेली तर काही ठिकाणी जमिनीत पाणी साचल्याने दुबार पेरणी देखील करता आली नाही. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई म्हणून मदत करणे आवश्यक आहे. सध्याची परिस्थिती पाहता शासनाने पंचनामे करण्याची औपचारीकता न करता सरकट हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

रविकांत तुपकर यांनी आज २ ऑगस्ट रोजी मुंबई येथे मंत्रालयात राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना राज्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची दाहकता निदर्शनास आणून दिली. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत रविकांत तुपकर यांची ना.फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा देखील झाली. राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती ओढावली. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसले. लाखो हेक्टर जमीनीवरील पिके पाण्याखाली गेली आहेत, त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच शेतकऱ्यांना लिकिंग पद्धतीने जबरदस्ती जास्तीचे पैसे देवून खते घ्यावी लागली. खतांच्या वाढलेल्या किंमती आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे वाहतूक खर्च वाढला, पेरणीसाठी यावर्षी अधिक खर्च करावा लागला त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाल्याने शेतकरी आता आर्थिक अडचणीत आहेत. शिवाय लाखो शेतकऱ्यांना अद्यापही पीककर्ज मिळले नाही. त्यातच झालेल्या अतिपावसाने पेरणी उलटली आहे. काही ठिकाणी दुबार पेरणी करुनही पिके पाण्याखाली गेली तर काही ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पुन्हा पेरणी करणेही शक्य झाले नाही. त्यामुळे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. अशात राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदत मिळणे गरजेचे आहे. परंतु आतापर्यंत पंचनामे देखील करण्यात आले नाहीत, हे दुर्दैव आहे.

आता राज्य शासनाने पंचनाम्यांची औपचारिकता न करता सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी,अशी मागणी रविकांत तुपकर यांनी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. या मागण्यांचे लेखी निवेदनही त्यांनी दिले.

*मदतीसाठी सरकार सकारात्मक*

रविकांत तुपकर यांच्या मागण्या समजून घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले. लवकरच याबाबत निर्णय घेऊन शेतकऱ्यांना समाधानकारक मदत देणार असल्याची ग्वाही त्यांनी रविकांत तुपकर यांना दिली.

एका मनोरुग्णाची घेतली दखल दिनेश वर्मा याचे होत आहे सर्वत्र कौतुक

0

 

हिंगणघाट :- बाबुच्या पुनर्वसनासाठी प्रकाश राऊत माजी नगरसेवक यांच्या माध्यमातून हितज्योती आधार फाउंडेशन सावनेर जिल्हा नागपूर यांच्याशी संपर्क करून हिंगणघाट ला बोलवण्यात आले त्यानंतर संत तुकडोजी पुतळ्याजवळ अपोलो टायर च्या दुकाना मागे जाऊन हितेश बनसोड व मी त्याला पकडून दोरी ने बांधून ॲम्बुलन्स मध्ये घेऊन , हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे संबंधित प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर हितजोती आधार फाउंडेशन सावनेर जिल्हा नागपूर भंडारा व तिथून यवतमाळ नंददीप फाउंडेशन यवतमाळ संस्था कडे बाबुला दिले. (दिनेश वर्मा)

पांढुणाॅ येथे बौद्ध विहारा समोर करण्यात आले वृक्षारोपण

0

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गजानन पोटे यांची पोलिस उपनिरीक्षक पदी पदोनत्ती

योगेश नागोलकार

राहेर:-पातुर तालुक्यातील पांढुर्णा येथील बौद्ध विहारा समोरील पोलीस उपनिरीक्षक गजानन पोटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच चान्नी पोलिस स्टेशन अंतर्गत गजानन पोटे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक यांची पोलिस उपनिरीक्षक पदी पदोणत्ती झाल्या बदल त्यांचा गावकरी तर्फे निपक्षपणे आपली सेवा बजावत आहे. त्या करीता त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .

 

व त्यांचा हस्ते वृक्षारोपण सुध्हा करण्यात आले. गजानन पोटे पोलिस उपनिरीक्षक उमेश सांगळे,मुळे, नीलेश सोनोने अमोल सोनोने शैलेश सोनोने मंगेश सोनोने भाऊराव सोनोने राहुल सोनोने अजाब सोनोने पंडीत सोनोने राजु सोनोने तेजराव सोनोने साहेबराव सोनोने अशोक घटवत रवि आवचार गावांतील इत्यादि महीला गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

आडगाव फाट्यावर शिर्ला नेमाने येथे श्री. संत गजानन महाराज पालखीचे आगमन व भव्य स्वागत करण्यात आले

0

 

पंढरपूर येथून परतीचे मार्गक्रम करीत असताना गण गण गणात बोतेच्या गजरात अडगाव राहेर फाट्यावर
श्रींच्या पालखीचे आगमन झाले यावेळी श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.आज दिनांक ३१ रोज रविवार ला संध्याकाळी 5.30 ला विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे आडगाव राहेर फाट्यावर आगमन झाले होते यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने व परीसरातील शेतकरी वर्ग आज आपल्या शेतीतील कामधंदा बाजुला ठेवून आडगाव फाट्यावर हजर राहून श्री ची आगमनाची आतुरतेने वाट बघत होते वारकरी आपल्या खांद्यावर भगवी पताका घेऊन श्रीचा गजर करीत व सुमधुर आवाजात भंजन व गायन करीत आंनदात वीना टाळ मृदंग यांच्या तालात पावल्या खेळत खेळत दाखल झाले फाट्यावर आडगाव राहेर परिसरातील नागरिकांनी हार फुले व जागोजागी चहा पाणी नास्ता देऊन श्री चे स्वागत करण्यासाठी मोठ्या दिमाखात सजली होती.
जिल्हा परिषद शाळा शिर्ला नेमाने येथे श्रींच्या पालखी मुक्कामा साठी थांबली असुन वारकरी यांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली आज सकाळी 5:३० ला शिर्ला नेमाने मधुन श्रीं च्या पालखी चे प्रस्थान व दुपारी विहीगाव येथे विसावा व संध्याकाळी आवार येथे मुक्कामासाठी मार्गक्रम करीत आहे.

*सुर्या मराठी न्यूज करिता*
*योगेश नागोलकार प्रतिनिधी राहेर पातुर*

शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली..!

0

 

जळगाव- पल्लवी कोकाटे 

जळगांव जामोद तालुक्यातील ग्राम धानोरा महासिद्ध येथे राहत्या घरात अल्पभूधारक शेतकरी ओंकार ज्ञानदेव सोनोने वय 53 वर्षे यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 2 आगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली.
दि.1ऑगस्ट रोजी पती पत्नी शेतात कामा करिता गेले व्होते परंतु शेतातील पीक चांगले नसल्याची खंत ओंकार सोनोने याचे मनात व्होती तसे घरा समोरील चौकामध्ये काही शेतकऱ्यांजवळ बोलले सुद्धा व्होते संध्याकाळी शेतातून घरी आल्यावर ते नाराज व्होते त्यांनी रात्री नवरा बायकोने सोबत जेवण करून झोपी गेले पती पत्नी व नातू घरा मध्ये समोरच्या खोलीत झोपले व्होते.अचानक त्यांनी रात्री 1—1:30 दरम्यान मागच्या स्वयंपाक खोली मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली असावी सदर बाब सकळी 3 वाजता त्यांची पत्नी यांना समजली तशी त्यांनी त्यांचे घरच्या जवळ राहत असलेले मुलगी व जावई यांना सांगितली.
ह्या वर्षी पिकपरिस्थीती चागली नसल्याने व डोक्यावर असलेल्या बैंकेच्या कर्जाचा डोगर या कारणामुळे आत्महत्या केलेल्या चे समजते त्यांचे मागे पत्नी,मुलगा,सून व मुलगी असा आप्त परिवार आहे ओंकार सोनोने यांनी केलेल्या आत्महत्ये मुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात आहे.