Home Blog Page 282

शाळा द्या। नाहीतर दाखले द्या।गोळेगाव बुद्रुक येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांचा शेगाव पंचायत समितीवर एल्गार ।

0

 

शेगांव-अर्जुन कराळे

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने कलम २१ अ नुसार शिक्षणाचा हक्क दिला त्यामुळे सर्वत्र सर्व शिक्षा अभियान राबविण्यात आले त्या अभियाना अंतर्गत शाळांना अनुदान देत इमारती वर्गखोल्या शैक्षणिक साहित्य सर्व भौतिक सुविधा दिल्या गेल्या हेतू एकच होता की कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये आणि सर्वांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे परंतु येथील स्थानिक प्रशासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ग्रामीण भागातील शिक्षणाचे तीन तेरा वाजले आहेत याच कारणामुळे येथील जिल्हा परिषद शाळा या बंद पडण्याच्या मार्गावर आलेले आहेत, शिक्षण वाचवा देश वाचवा या उद्देशाने आज
देशाचे भवितव्य असलेल्या विद्यार्थ्यांचा आज शाळा खोली अभावी शेगाव येथे शिवाजी चौकातून पंचायत समिती कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शाळा द्या नाहीतर दाखले द्या, पंचायत समिती प्रशासन मुर्दाबाद, जिल्हा प्रशासन मुर्दाबाद, शिक्षण वाचवा देश वाचवा, अशा आक्रोशात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी शासनाप्रती रोष व्यक्त करीत हा मोर्चा काढून पंचायत समिती कार्यालयावर बीडिओच्या केबिन समोर ठिय्या आंदोलन केले।
सविस्तर वृत्त असे आहे की शेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गोळेगाव बुद्रुक येथील जि, प ,शाळा वर्ग खोली आणि अंगणवाडी ही गेल्या तीन-चार वर्षांपासून अतिशय शिकस्त झालेली आहे मुख्याध्यापक एस एस पीलात्रे आणि अंगणवाडी सेविका माया गव्हाळे यांनी तीन-चार वर्षांपासून खोली शिकस्त असून नवीन खोली मिळणे करिता कागदोपत्री पाठपुरवठा केलेला आहे परंतु अद्यापही खोली मंजूर झाली नाही सदर शाळा खोली संदर्भात वेळोवेळी दैनिक सकाळमध्ये वृत्त प्रकाशित झालेले आहे परंतु झोपेचे सोंग घेत असलेले कर्मचारी अधिकारी यांच्या वेळ काढून धोरणामुळे आज रोजी गोळेगाव बुद्रुक येथील शिक्षणाचे तीन तेरा वाजले आहेत गोळेगाव बुद्रुक येथील जि प शाळा वर्ग खोली मंजुरात झाली होती १0 ऑक्टोंबर २०२१ रोजी जि प सदस्य राजाभाऊ भोजने यांनी सदर कामाचे भूमिपूजन सुद्धा केले होते परंतु ही वर्गखोली गोळेगाव बुद्रुक ऐवजी येथील कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे गोळेगाव खुर्द झाल्याने ती मंजुरात रद्द झाली आहे शाळा बांधकाम मिळण्यासाठी पालकांनी १२मार्च २०२२ रोजी शाळेला दहा दिवस कुलूप ठोकले होते परंतु गटशिक्षणाधिकारी यांच्या मदतीने त्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर शाळापूर्वरत चालू करण्यात आली परंतु आज रोजी पालकांनी प,स,शेगाव येथे संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांना विचारणा केली असता फाईल सिओच्या टेबलवर असल्याचे गेल्या पंधरा दिवसापासून सांगत आहेत त्यामुळे या बांधकाम मंजुरातीचे गोड बंगाल कुठे दडलेले आहे याचा प्रश्न निर्माण झालेला आहे गोळेगाव बुद्रुक येथे आज रोजी चार वर्ग आणि एकाच खोलीत भरत आहेत तसेच अंगणवाडी ही गेल्या दोन वर्षापासून भाड्याच्या दहा बाय दहा रूम मध्ये २२ विद्यार्थ्यांसह भरत आहे शाळेला वॉल कंपाऊंड नाही शाळेच्या अवतीभवती जनावरांचे वास्तव्य घाण, कचरा आहे शाळेला मुताऱ्या नाहीत संडास नाहीत अशी दयनीय अवस्था शाळेची झालेली आहे।
विद्यार्थी देशाचे भवितव्य आहेत आणि त्यांचीच अशी दयनीय अवस्था काय असेल उद्याचे देशाचे भवितव्य असा प्रश्न आता ग्रामस्थ करीत आहेत।

आज दिनांक एक १ ऑगस्ट २०२२ च्या या आंदोलनात गोळेगाव बुद्रुक येथील जि प शाळेच्या वर्ग खोलीची मंजुरात १५ ऑगस्ट पर्यन्त न झाल्यास विद्यार्थ्यासह आम्ही सर्व पालक जिल्हा परिषद कार्यालय बुलढाणा येथे आमरण उपोषण करणार।

*धम्मपाल समदूर*
अध्यक्ष शाळा समिती जि प शाळा गोळेगाव

मालोद येथे घराचे कुलूप तोडून अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याची दागीने लंपास पोलीसात गुन्हा दाखल

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील मालोद येथील शेतकऱ्यांच्या घराचे कुलूप तोडून २ लाख १९ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, मुरलीधर वना पाटील (वय-६३) रा. मालोद ता. यावल जि.जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. ३१ जुलै रोजी रात्री १० ते ११.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी स्वयंपाक घराचे लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून घरातील लोखंडी पेटीत ठेवलेले २ लाख १९ हजार रूपये किंमतीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी मुरलीधर पाटील यांनी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकडे करीत आहे.

पिक विमा मुदतवाढ आणि नुकसानभरपाई मिळण्याच्या मागणी करीता नितीन अग्रवाल यांचें थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन

0

 

दिपक देशमुख
मेहकर
राज्यात सध्या सर्व दुर मोठ्या प्रमाणावर जोरदार पाऊस पडतोय व या पावसामुळे बर्याच शेतकऱ्यांना दुबार तिबार पेरणी ला सामोरे जावे लागले आहे.शेतकर्यांच्या शेतातील सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे तर कित्येक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचून तलावामध्ये रुपांतर झाले आहे तर कित्येक ठिकाणी शेतजमीन खराळल्याचे चित्र दिसत आहे.अशातच शेतकऱ्यांना फुल नाही फुलांची पाकळी मिळावी या आशेने शेतकरी पिकविमा भरतात पण पहिलेच दुबार तिबार पेरणी मध्ये वेळ गेला आणि सततच्या पावसामुळे नेटवर्क कनेक्टिव्हिटी च्या अडचणी यात वेळ गेला आणि आता पिकविमा भरण्यासाठीची मुदत संपत आली आहे.मागच्या वर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोयाबीन कापसाला भाव मिळण्यासोबतच पिकविण्यासाठी ही रान उठवले होते ज्याचा फायदा शेतकऱ्यांना भाववाढी सोबतचपिक विमा मिळण्याकरिता हा झाला.मागच्या वर्षीची पिकविण्याची मिळालेली मदत पाहता यावर्षी शेतकर्यांनी पिकविमा भरण्यासाठीची मानसिकता दाखविली परंतु मुदत संपत असल्याने बर्याच शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून पिकविमा मुदत वाढवून भेटण्यासाठी आपण प्रयत्न करावे अशी विनंती केली . त्यानुसार कोणताही शेतकरी पिकविमा भरण्यापासून वंचित राहू नये सोबतच ज्या ज्या भागामध्ये अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे त्या त्या भागातील पंचनामे करून शेतकऱ्यांना ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती नुसार मदत देण्यात यावी याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने, कृषी मंत्री पद रिकामे असल्याने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या कामामुळे शेतकर्यांच्या समस्या दुर्लक्षित राहू नये या करीता निवेदनाद्वारे पिक विमा मुदतवाढ आणि नुकसानभरपाई मिळण्याची मागणी केली आहे.

अमिता कदम यांनी पत्रकारिता क्षेत्रात घवघवीत यश मिळविल्याने त्यांचा झाला सत्कार.

0

 

दिपक देशमुख
मेहकर

ठाण्यातील अमिता कदम पत्रकारीता मध्ये काम करुन पत्रकारिता मध्ये परिक्षा देऊन ७८.२५% गुणांनी उत्तीर्ण झाल्या पत्रकारिता मध्ये महिलांची संख्या फार कमी आहे अमिता कदम यांनी आपल्या लिखनातून अनेक गरजु नागरिक यांना आपल्या पत्रकारिता माध्यमातून कामे करुन यश मिळवुन दिले अमिता कदम ह्या जरी महिला असल्या मात्र आपल्या कार्यातून अनेक सामाजिक कार्य बजावले आपल्या लिखनातून अनेक गरजुना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले लहान पणापासून त्यांना पत्रकार होण्याचा छंद होता आणि तो त्यानी आपले शिक्षण पूर्ण करुन त्यां पत्रकारिता मध्ये उतल्या आपले शिक्षण २०१८ साली आई वडिलांच्या मुत्यु नंतर सुध्दा त्या खचल्या नाही आयुष्यात अनेक चांगले आणि वाईट प्रसंग त्यांच्या आयुष्यात आले पण त्या न डगमगता तोंड दिले त्यांचे शिक्षण एम ए बीएड ते पत्रकारिता क्षेत्रात मिळविलेली पदवी असा अमिता कदम यांचा शैक्षणिक प्रवास सुरू होता महिला क्षेत्रात फार कमी पत्रकारिता मध्ये काम करतात यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील अखिल भारतीय पत्रकार संघटना तर्फे शुभेच्छा देण्यात येते.

पन्नास रुपयासाठी मित्रानेच केला मित्राचा खून

0

 

 

हिंगणघाट शहरातील बिडकर वार्ड येथे पैशाचे देवान-घेवानीवरुन मित्रानेच मित्राचा निरघुन खून केल्याची घटना काल शनिवार रोजी रात्री ९ वाजताचे दरम्यान घडली.
मृतक सतीश प्रभाकर वरुलकर(४२) याने त्याचा मित्र आरोपी सचिन प्रभाकर पेंदाम(३२ )याचे पत्नीकडून ५० रुपये उधार घेतले होते,अनेकवेळा मागूनसुद्धा सतीश याने पैसे परत न केल्याने रागावलेल्या आरोपीने काल रात्री ९ वाजताचे दरम्यान लाकडी राफ्टरने जोरदार प्रहार करुन गंभीर जखमी केले.
जखमी सतीश यास रक्तबंबाळ परिस्थितित स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले,त्याला पुढील उपचारार्थ सेवाग्राम येथे नेत असतांना त्याचा मृत्यु झाला.
मृतक गेल्या १ वर्ष्यापासून बिडकर वार्ड येथे राहुल काळपांडे यांचेकडे भाडयाने राहत होता,पोलिसांना घटनेची माहिती मिळताच आरोपी
सचिन पेंदाम यास पोलिसांनी अटक केली असून भादंवीच्या कलम ३०७,३०२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

मेहकर नागपूर मुंबई महामार्गावर मोठ मोठ्या प्रमाणात खड्डे.

0

 

दिपक देशमुख
मेहकर

अतिपावसामुळे नागरिक यांचा जिव जाऊ शकतो अधिकारी यांनी लकक्ष देण्याची गरज.

मेहकर ते मालेगाव महामार्गावर कडेला आणि रोडच्या मधोमत मोठ मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या आणि वाहनांचे नुकसान होऊ शकतो या रोडवर असंख्य वाहने धावतात पावसामुळे पाण्याणी खड्डे तुडुंब भरले आहेत त्यामुळे आवजड वाहण त्या गडयात गेल्याने वाहणाचा तोल जाऊ शकतो किंवा सामान्य माणसाच्या जिवाला हाणी पोहचु शकते त्यामुळे रुग्णालयात पेन्शट न्यायचा असेल तर रुग्ण वाहतूकिला अडचण निर्माण होऊ शकते त्यामुळे मेहकर चे उपअभियंता यांनी सावधान बाळगुन कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तात्काळ खड्डे बुजविण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिक व प्रवासी करीत आहे

कोंबडी खाल्ल्यामुळे जिवंत कुत्र्याला जीवाने तीन व्यक्तीने मारले व्हिडिओ व्हायरल

0

 

हिंगणघाट :- जुनी वस्ती येथे निर्दयपणे कृत्य घडले एका जिवंत कुत्र्याला तीन व्यक्ती मिळून काठीने जिव्हाने मारून टाकले व त्याला दोरी ने बांधून त्याची वॉर्डांत धिंड काढली लोकांनी त्याला विचारले असता तुम्ही या मुक्या प्राण्याला का मारले तर त्यानी सांगितले यांनी आमची कोंबडी खाल्ली कृत्र्याने कोंबडी खाल्ली म्हणून त्याला जिवंत मारून टाकले या प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे .

हिशोब घेणारे नगरसेवक निवडून आले तर योग्य अंमलबजावणी होईल नाहीतर भ्रष्टाचारच दिसेल

0

 

हिंगणघाट शहरात अमृत योजनेअंतर्गत कामे हे 2019 ला पूर्ण करणे आवश्यक होते परंतु सत्ताधारी यांनी आपले कर्तव्य व विरोधी पक्ष यांनी आपली भूमिका योग्य पद्धतीने पार पाडली नाही त्यामुळे हिंगणघाट शहराला पाण्याची समस्या राहील (त्याला जबाबदार आम्हीच आहो) आजही हिंगणघाट शहरात अनेक योजनेतून अर्धवट कामे नियमाच्या आत झाले नाही व ते बाकी आहे .कामे अर्धवट राहिल्यामुळे पुन्हा यावर वाढीव रक्कम बिल काढेल व हे सर्व पैसे जनतेच्या कराच्या माध्यमातून वसूल करण्यात येणार आहे अमृत योजनेतील कामे हे नियमाच्या आत झाले का ?
सत्ताधारी व विरोधक यांनी याबद्दल जनतेला सांगितले का ? केंद्र शासन पुरस्कृत अमृत पाणी पुरवठा योजनेअंतर्गत हिंगणघाट नागरी पाणी पुरवठा योजना
प्रशासकीय मंजुरी (16/5/2016 )
:- 61 कोटी 58 लाख 60 हजार 88 रुपये
करारनामा दि.12/4/17 ते 12/4/19 (24 महिने )
ठेकेदाराचे नाव :- संतोष कंट्रक्शन अँड इन्फ्रा नांदेड
अंमलबजावणी करून घेण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

नांदगाव खंडेश्वर पंचायत समिती चे आरक्षण सोडत

0

————————
नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीतील आठ गणांसाठी आरक्षण सोडत आज २८/७/२०२२जाहिर करण्यात आले असुन अनुक्रमे लोणी पंचायत समिती गणासाठी अनुसूचित जाती स्त्री करिता राखीव असे आरक्षण निघालेले आहे तसेच धानोरा फसी गणासाठी सर्वसाधारण जनुना सर्वसाधारण फुबगाव सर्वसाधारण स्त्री धानोरा गुरुव नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री मंगरुळ चव्हाळा सर्वसाधारण स्त्री वाढोणा रामनाथ अनुसूचित जाती सालोड नागरिकांचा मागास प्रवर्ग अशी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली असून या आरक्षण निरिक्षक अधिकारी उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी आरक्षण सोडत अधिकारी म्हणून नांदगाव खंडेश्वर चे तहसिलदार पुरुषोत्तम भुसारी हे होते व तसेच नायब तहसीलदार राठोड व निवडणूक लिपीक मंगेश गावनेर यांनी सोडतीच्या कार्यक्रमाचा पदभार सांभाळला होता अशी माहिती सुमित ढवळे यांनी दिली यावेळी तालुक्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती…

जानेफळ पोलीस स्टेशनचा अनोखा उपक्रम. पत्रकार दिपक देशमुख यांनी केला राहुल गोंधे यांचा उपक्रम पाहुण फुल गुछ देऊन केला सत्कार.

0

 

दिपक देशमुख
मेहकर.

जानेफळ पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस राहुल य
गोंथे यांनी आपल्या उपक्रमाच्या माध्यमातून केलें जानेफळ नागरिकांचे संरक्षण.

मेहकर तालुक्यातील जानेफळ पोलीस स्टेशन मध्ये गेल्या नंतर नागरिक यांचे म्हण प्रसन्न होते योग्य स्वच्छता अभियान आणि आपल्या माध्यमातून जवळ पास एक नाही तर ३० ३२ सी.सी.टिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आणि प्रत्येक चौका चौकात बसविण्यात आले योग्य शाळेच्या ठिकाणी आणि आठवडी बाजार रहदारी रस्त्यावर बसविण्यात आले उद्या विदर्भाचा राजा श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे आगमन होत आहे पत्रकार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पत्रकार यांना बोलावून नियोजन केले व उद्या नागरिक यांच्या कढुन कोणताही अनाथ प्रसंग घडु नये म्हणून आपण सर्व प्रथम कोणतेही कुत करतानी आपण जानेफळ पोलीस स्टेशनऱच्या निगराणी मध्ये आहे यावेळी.आखिल भारतीय पत्रकार संघटनेचे अध्यक्ष श्रीकृष्ण काकडे.तालुका अध्यक्ष.संतोष अवसरमोल.मेहकर कार्यकारणीचे पत्रकार.अनिल.मंजुळकर पत्रकार.नरवाडे.सतिश मवाळ. पत्रकार.प्रमोद मिश्रा .सागर गव्हाड तसेच पत्रकार दिपक देशमुख.व संपुर्ण जानेफळ चे पोलिस कर्मचारी उपस्थित होते.