Home Blog Page 283

दहिगाव येथे अज्ञात चोरट्यांकडून एसबीआय बँकेचे एटीएम फोडुन लुटण्याचा प्रयत्न पोलीसांनी केले एका संयशीताला अटक

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील दहिगाव मधील स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न घटनास्थळी डीवायएसपी, पोलीस निरीक्षक आपल्या सहकाऱ्यांसह हजर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची केली तपासणी दहिगाव ता यावल येथील प्रमुख चौकात असलेले स्टेट बँक चे एटीएम आज रात्री अज्ञात इसमाने फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र तो असफल झाला हा प्रकार 27 चे रात्री घडला दहिगाव येथील प्रमुख चौकात असलेले एटीएम फोडले असल्याचे सकाळी स्टेट बँक ग्राहकांच्या लक्षात आल्यानुसार तत्काळ त्यांनी पोलीस पाटील संतोष जीवराम पाटील यांना व सरपंच अजय-अकमल यांना कळविले त्यानुसार त्वरित दोघांनी यावल पोलिसात पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना कळवल्यानुसार पोलीस निरीक्षक व विभागीय पोलीस अधिकारी डॉ . कृणाल सोनवणे यांनी भेटी देऊन ग्रामपंचायततिने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली त्यानुसार एका संशियतास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. एटीएम च्या कक्षात कुठलीही बेल किंवा कुठलीही सुरक्षा नसल्यामुळे या संधीचा फायदा चोरट्याने घेतल्याचे दिसुन येत आहे. एटीएमचे पत्रा तोडून लॉक व पैसे काढण्याचा पट्टा तो तोडलेला आहे सुमारे एटीएम मधील 60 ते 70 हजार रुपयांचे नुकसान चोरट्याने तोडफोड करून केलेले आहेत पोलिसांनी ग्रामपंचायत कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरे व मार्ग सर्व तपासणी केली त्यानुसार एकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात येणार आहे घटनास्थळीचा पंचनामा फौजदार सुदाम काकडे सहाय्यक फोजदार नितीन चव्हाण यांनी केला गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे दरवाजाचे कुलूपही गेल्या आठवड्यामध्ये अन्यायधीस्मानी तोडलेले असल्याचे वृत्त आहे त्याचप्रमाणे आदर्श विद्यालयात चार ते पाच वर्षांपूर्वी संगणक कक्ष तोडून फेकण्यात आलेले होते तर जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेत दोन वर्षात दोन वेळा एटीएम रूम फोडून नुकसान करण्यात आलेले आहे हे चोरटे नेमके कुठले व काय याची चौकशी व्हावी अशी मागणी परिसरातून होत आहे तसेच गावातील पोलीस चौकीत कायमस्वरूपी एक तरी कर्मचारी रहिवासी व्हावा अशी जोरदार मागणी ग्रामस्थांमधून होत आहे दहिगावात अनेक वेळा रात्रीच्या वेळेस घटना घडत असतात एखाद्या वेळेस फार मोठा अनर्थ होऊ शकतो याला जबाबदार कोण राहणार असा प्रश्न ग्रामस्थ करीत आहेत घटनेची फिर्याद एटीएम वेंडर दीपक दौलत तिवारी यांनी यावल पोलिसात दिल्यावरून गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे पोलीस अधिकारी कृणाल सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप भागवत व सहकारी करीत आहेत

तामशी शेत शिवारातील ७५ एकरावर फुलणार सुर्यफुल

0

 

@ पर्यायी पिक म्हणुन शेतकरी करणार सुर्यफुल पिकाची पेरणी.

संतोष काळे बाळापूर

सुर्यफुल हे बहुगुणी कमी कालावधीत येणारे पिक आहे. त्याच बरोबर कोणत्याही हंगामात कमी पाण्यात येणारे अत्यंत उपयुक्त पिक असल्याने. शेतकऱ्यांनी सुर्यफुलाची शेती केल्यास फायदेशीर ठरु शकतो या बाबत पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तेलबिया विभागाच्या प्रमुखांनी सविस्तर मार्गदर्शन केल्याने येथिल शेतकऱ्यांनी सुर्यफुल पिक घेण्यास अनुमती दर्शविली आहे. त्यामुळे आता तामशी येथिल शेतकऱ्यांनी शिवारात ७५ एकरांवर सुर्यफुल पिक फुलणार आहे.

सूर्यफूल हे सुर्यप्रकाशात संवेदनशील नसल्याने खरीप, रब्बी व उन्हाळी या तिनीही हंगामात घेता येणारे महत्वपूर्ण तेलबिया पीक आहे. पाण्याअभावी जर खरिपाची पेरणी लांबली तर खरिपातील मुख्य पिकाला पर्याय म्हणून सूर्यफुलाची पेरणी केली जाऊ शकते. अल्प पाण्यात येणारे तसेच कमी उत्पादन खर्च यासारख्या वैशिष्ट्यामुळे सामान्य शेतकऱ्यांना परवडणारे पीक आहे. त्याचप्रमाणे सूर्यफुलाच्या तेलाला बाजारात मोठी मागणीही आहे. शेतकऱ्यांनी अल्प खर्चात मोठे उत्पन्न देणाऱ्या या सूर्यफुल पिकाची लागवड केल्यास शेतकऱ्यांसाठी एक पर्वणीच ठरू शकते या बाबत डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील तेलबिया संशोधन विभागाचे विभाग प्रमुख डॉ.संतोष गहुकर यांनी तामसी येथे आयोजित कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंञणा (आत्मा) अतंर्गत एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केल्यानतंर येथील शेतकऱ्यांनी सूर्यफूल पीक घेण्यास अनुमती दर्शविली आहे त्यामुळे आता तामसी येथील जवळपास ७५ एकरावर सूर्यफूल पीक फुलणार आहे. सूर्यफुल हे एक बहुगुणी, कमी कालावधीत येणारे तसेच तिनीही हंगामात हे पीक घेता येत असल्याने कोणत्याही ठिकाणी या पिकाची उगवण क्षमता चांगली असणार आहे. कमी पाण्यात तयार होणारे असे अत्यंत उपयुक्‍त पीक आहे. या पिकाचे रब्बी हंगामात अपेक्षित उत्पादन मिळवायचे असल्यास पेरणी, आणि बिजप्रक्रिया व्यवस्थित होणे गरजेचे असल्याचेही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले त्यानतंर आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व्हि.एम.शेगोकार यांनी खरीप हंगामातील सोयाबीन,तूर,या पिकाचे एकात्मीक पध्दतीने व्यवस्थापन या बाबत तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना वाचन साहित्य,माहीती पुस्तके देण्यात आली.यावेळी कृषी सहाय्यक उध्दव धुमाळे, प्रगतशील शेतकरी गणेश काळे, अजय काळे, सुधाकर केनेकर, मुकिंदा काळे, वैभव तामसकर, गणेश काळे, राष्ट्रपाल पातोडे, भास्कर काळे,विनोद भांबेरे, शंकर काळे, शुभम काळे, मिथुन काळे, सचिन तामसकर, दत्ता गिल्ले, रामदास बोरसे आदी शेतकरी बांधव बहुसंख्यने उपस्थित होते.

प्रधाममंत्री उज्वला गॅस योजने अंतर्गत जुने शहरातील ३७ महिलांना उज्वला गॅस सिलिंडर सह संचाचे पुरुषोत्तम चंद्रभान हाडोळे मा नगरसेवक तथा भाजपा सरचिटणीस तथा शक्त्ती केंद्र प्रमुख यांचे हस्ते वाटप संपन्न झाले .

0

 

 

सबका साथ सबका विश्वास ह्या बिदवाक्यानुसार देशातील शोषीत, पिडीत, दलित आदिवासी, ओबीसी सह तथा मुस्लीम तथा मराठा पाटील सर्व समाजाच्या एकूण ३७ महिलाना उज्वला गॅस वाटप करण्यात आले . त्याप्रसंगी बोलतांना पुरुषोतम हाडोळे मा नगरसेवक म्हणाले की नरेंद्र मोदी सरकार देशात सर्वसामान्य माणसाला न्याय देवुन सर्वांना शासकीय योजनाचा लाभ देण्यात आला . आपल्या मतदार संघाचे आमदार तथा मा . मंत्री डॉ. संजय कुटे यांचे मार्गदर्शना खाली शेगांवात सुध्दा मा नगराध्यक्ष शरदसेठ अग्रवाल तथा मा.नगराध्यक्षा सौ. शंकुतला बुच , मा नगराध्यक्ष पुरुषोत्तम शेगोकार तथा ज्ञानेश्वर साखरे शहराध्यक्ष भाजपा राजु शेगोकार पाटील, विजय बाप्पु देशमुख यांचे नेतृत्वाखाली विकास झाला . भारती प्रमोद फुंडकर रा .गणेशनगर, रेखाताई पुरुषोतम देशमुख रा.देशमुख पुरा, राधाताई सचिन खेडकर रा . दसरानगर , दिपाली प्रमोद कुकडे रा. भोईपुरा, अर्चनाताई गजानन ठोसर रा.दसरानगर, ताईबाई विक्रम तायडे रा. तिनपुतळा परिसर, दुर्गा श्रीकृष्ण गणोरकार, आशाबाई संजय देशमुख रा देशमुख पुरा, चैताली सुशांत लोंखडे रा. खिडकीवेस, राधाताई महादेवराव वेरुळकर पाटिल रा . दसरानगर, देवकाबाई रामचंद्र गणगणे रा. खिडकीवेस, मनिषा अमोल मेतकर राः दसरानगर, ज्योतीताई गजेंद शेगोकार मिस्त्री, रा. सुतारगल्ली,.लक्ष्मीताई पंकज काठोळे रा . देशमुखपुरा , मंदा गजानन खरप रा. दसरानगर , पुजा अंनता कलोरे, पुजा स ज्ञानेश्वर पेसोडे रा .दसरानगर रुक्मिणाबाई विश्वनाथ वाघमारे रा भोईपुरा रुक्माबाई रामहरी लिप्ते रा. देशमुख पुरा दसरानगर, प्रिया विजय गव्हाळे रा. धनगर पुरा, नाजमिन बानो सलिमखान रा .फरशी जामा मस्जिद, नाजिमा बी साबीरखाँन रा . जामा मस्जिंद, , गायत्री गणेश गणगणे रा सावता चौक, शांताबाई सोहनलाल जाधव रा .दसरानगर , जया उमेश नावकार जुने महादेव मंदिरा जवळ , जयश्री संतोष खेर्डे महात्मा फुलें बॅन्के जवळ ,शारदा वासुदेव घुले रा . धनगरपुरा, शारदा शिवशंकर खडकपुरा, शितल अमित पुंडे रा धनगर पुरा , रविना प्रविण मसने रा त्रिमृती चौक, रेखा योगेश पोटदुखे रा जुने महादेव मंदिराजवळ, मनिषा उमेश गणगणे रा ताडपुरा, वैशाली गणेश गायगोळ रा तरोडा -डी , शितल विजय हाडोळे रा. जवळा बु . हया सर्व महिलांना पुरुषोत्तम चंद्रभान हाडोळे मा नगरसेवक यांचे हस्ते ३७ महिलांना गॅस वाटप दि 28/7/2022 रोजी ११ .०० वा वाटप करण्यात आले हया प्रसंगी बोलताना हाडोळे ज्या महिला भगिना ना अजुन उज्वला गॅस मिळाला नाही त्यांनी संपर्क साधण्याचे सांगीतले .

पारडी येथील गुरे चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर रानडुकराचा हल्ला

0

 

बुलढाणा :- पंकज थिगळे

मेहकर तालुक्यामधील पार्रडी येथील शेतकरी शेतामध्ये गुरे चारत असताना ,रानडुकराने शेतकऱ्यावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याने, जानेफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून बुलढाणा येथे उपचारासाठी पाठवण्यात आले.
पारडी येथील हिरालाल दासू राठोड वय 55 वर्ष हा शेतकरी त्यांच्या हिवरा खुर्द शिवारातील स्वतःच्या शेतामधील धुऱ्यावर गुरे चालत असताना, शेतामधून रानडुकरांचा कळप धावत आल्याने गुरे सैरावैरा पळाली, परंतु उभ्या असलेल्या शेतकऱ्यावर दोन डुकराने हल्ला चढवून, डोक्यावर कपाळावर उजव्या डोळ्यावर नाकामधील मध्यभागी पाठीवर नखाने हल्ला करून जखमी केले, त्यांना उपचारासाठी जानेफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता ,.वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केला गंभीर दुखापत असल्याने पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे त्यांना पाठविण्यात आले. मौजे पारडी येथील पोलीस पाटील अमोल शिलार यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना माहिती दिली असता
वनरक्षक के बी धनगर यांनी शेतकऱ्यावरील रानडुकराच्या हल्ल्याची माहिती करतात जानेफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सदर शेतकऱ्याची असणे चौकशी करून पंचनामा केला त्याचे प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी बुलढाण्याला पाठवण्यासाठी सहकार्य केले. सदर अहवाल वनविभाग यांना पाठवून वन विभाग या शेतकऱ्याला तात्काळ मदत करतील अशी अपेक्षा जनता करीत आहे.
एम.सी.एन. न्यूज साठी
प्रमोद मिश्रा मेहकर

संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी संपन्न,,

0

हिंगणघाट मलक नईम

श्री संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्ताने संत सावता महाराज मंदिर, शहालांगडी रोड विठ्ठल गुळघाणे लेआउट, सावता नगर, हिंगणघाट येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे नियोजन श्री संत सावता माळी ट्रस्ट द्वारा आयोजित करण्यात आला. पहाटे पाच वाजता काकड आरती व घट स्थापना करण्यात आली. त्या नंतर कीर्तनकार ह भ प जगन महाराज नेहारे, सेलू मुरपाड, साथकरी व विणेकरी शुभम महाराज थुटे, ऋषिकेश महाराज बेदी, मृदंग वादक सेवादास महाराज राठोड, यवतमाळ, संवेदिनी वादक व गायनाचार्य रुपेश महाराज तळवेकर, सेलू काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल्याचे कीर्तन पार पडले. यावेळी साथकरी म्हणून यशवंत महाराज तपासे, कुणाल महाराज हरणे, रुपेश महाराज डोंगरे, देविदास महाराज लाकडे, मोहन महाराज गंडाईत, वैभव महाराज हरणे, समीर महाराज भजभूजे, यश महाराज सहारे उपस्थित होते. त्याच प्रमाणे या कार्यक्रमाला हेमराज हरणे, ज्ञानेश्वरराव वाळके, कृष्णा मुंगले, शंकर झाडे, देवीदासजी मोहूरले, नरेश खर्डे, मनोज घंगारे, केशव तितरे, जयंत मानकर, चंद्रशेखर सहारे, विनोद फाटे, दिलीप भोंगाडे, सुरेश वाळके, अंकुश सोनकुसरे, जनार्दन निखाडे, रमेश साबळे, अभिषेक आंबटकर, नर्मदाबाई झाडे, शकुंतला वाघ, ताराबाई कपाटे, बेबीबाई महाजन, ज्योतीबाई सहारे, छायाबाई पाटील, कमलाबाई धोटे व समाज बांधव व भगिनी उपस्थित होते.कार्यक्रमा चा समारोप काला प्रसाद वाटप करूण करण्यात आला

यावल पंचायात सामितीच्या सार्वत्रीक निवडणुकी चे आरक्षण जाहीर

0

यावल( प्रतिनिधी)विकी वानखेडे

यावल तालुक्यातील पंचायत समितीच्या १२ गणांसाठी आरक्षण सोडत आज सकाळी जाहीर करण्यात आले आहे.

 

यावल पंचायत समितीच्या निवडणूक जाहीर करण्यात आले आहे. या संदर्भात नुकतेच निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार आज यावल तहसील कार्यालयात यावल पंचायत समितीच्या १२ गणांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

 

असे असतील १२ गणांचे आरक्षण

नायगाव- एसटी महिला

किनगाव बुद्रुक – एसटी जनरल

सावखेडे सिम – एसटी जनरल

दहिगाव – जनरल,

मारूळ – जनरल,

न्हावी प्र – जनरल,

बामणोद-एससी,

हिंगोली- जनरल महिला,

डांभुर्णी – एसटी महिला,

साखळी – जनरल महिला

भालोद – जनरल महिला आणि

पाडळसा -बीसीसी महिला

 

याप्रकरणे १२ गणांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. याप्रकरणे १२ गणांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यावेळी तहसीलदार महेश पवार, नायब तहसीलदार आर.डी.पाटील उपस्थित होते . या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमास सर्व पक्षाचे प्रमुख पदधिकारी उपस्थित होते .

हिंगणघाट माजी मुख्यमंत्री ठाकरे जन्मदिन निमित रुग्नला फलवाटप

0

 

हिंगणघाट मलक नईम ,,,,

आज दिनांक २७ जुलै २०२२ रोज बुधवार ला पक्ष प्रमुख माननीय श्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री बाळाभाऊ राऊत जिल्हा संपर्क प्रमुख तसेच श्री रुपेशजी कांबळे हिंगणघाट विधानसभा संपर्क प्रमुख, यांच्या सूचनेनुसार तसेच जिल्हा प्रमुख श्री अनिलजी देवतारे, डॉ श्री उमेश तुळसकर जिल्हा समन्वयक आणि राजेंद्र खुपसरे उप जिल्हा प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगणघाट शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन हिंगणघाट विधानसभा-४६ शिव सेने तर्फे करण्यात आले.सकाळी शाहालंगडी देवस्थान येथे वृक्षरोपण,तसेच हिंगणघाट येथील सामान्य रुग्णालयात रूग्णांना फळ वाटप, त्या नंतर कारंजा चौक येथील शिव सेना कार्यालयात हिंगणघाट येथील पूर ग्रस्त भागातील गरजू व गरीब विद्यार्थ्यांना गणवेश तथा पाठ्य पुस्तके वाटपाचा कार्यक्रम आणि नंतर शिव सेना सदस्य नोंदणी अभियानाचा कार्यक्रम करण्यात आला.या कार्यक्रमात डॉ श्री उमेश तुळसकर जिल्हा समन्वयक, श्री राजेंद्र खुपसरे उप जिल्हा प्रमुख, माजी उपाध्यक्ष श्री चंद्रकांत घुसे, जिल्हा महिला संघटिका सौ. संगीता कडू, तालुका प्रमुख श्री सतीश धोबे, शहर प्रमुख श्री सतीश ढोमने, उप तालुका प्रमुख श्री प्रकाश अनासाने, युवा सेना शहर प्रमुख श्री भूषण कापकर, युवा सेना समन्वयक श्री प्रकाश घोडे,तालुका संघटिका सौ. माधुरी खडसे, शहर संघटिका सौ. सिमा गलांडे, नगर सेविका सौ. निता धोबे, नगर सेवक श्री श्रीधर कोटकर, शहर संघटक श्री मुन्ना त्रिवेदी,उप शहर प्रमुख श्री गजानन काटवले,श्री जयकुमार रोहनकार, संजय पिंपळकर,माजी नगर सेवक श्री शंकर मोहमारे, देवेंद्र पडोळे, नगर सेवक मनोज वरघणे, भास्कर ठवरे, शहर विभागीय प्रमुख श्री रुपेश काटकर, मोहन तुमराम, अमोल मानकर, सचिन मुडे, बंटी वाघमारे, संतोष चौधरी, दिलीप चौधरी, नितीन वैद्य, निखिल झिबल, अनंता गलांडे, शुभम भांडे, दिनेश धोबे, बलराज डेकाटे,लक्ष्मीकांत भगत, नरेंद्र गुळकरी,देवा शेंडे,शंकर भोमले,सुरेश चौधरी,उमेश धोबे,भास्कर मानकर, अनिल लालटेनवार,मुरली उजवणे,केशव खुरपुढे,मुन्ना शेख, राजू माडेवार,भूषण सातघरे,रवी रंगारी,प्रफुल क्षीरसागर, सौ. नीलिमा मोहमारे, सौ स्वाती पिंपळकर, सौ. पल्लवी शेंडे,सौ माया खंदार,सौ ज्योती रंगारी, सौ. रेश्मा बाकरे,प्रशांत ठाकरे,अनिल कावळकर, शंकर देशमुख,व असंख्य शिव सैनिक उपस्थित राहून कार्यक्रमला यशस्वी केले.सर्व शिव सैनिक पदाधिकारी तसेच सामान्य शिव सैनिकांनी शपथ घेहून साहेबांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून असे सर्वानुमते वचन दिले

पळशी सुपो सावता माळी पुण्यतिथी साजरी

0

 

जळगाव जामोद/पल्लवी कोकाटे

जळगाव जामोद तालुक्यातील पळशी सुपो येथे कांदा‌ मुळा भाजी अवघी विठाई माझी। लसूण मिरची कोथिंबीर,अवघा झाला माझा हरी
सावता माळी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. व यावेळी श्रीकृष्ण राखोंडे, सुभाष तायडे, ज्ञानेश्वर राखोंडे, गोपाळ घाटे,वसंता वानखेडे,भिका वानेरे, ज्ञानेश्वर वानेरे, डॉ अजय घाटे,बाळू बोंबटकर, शंकर सातव, मधुकर पान्हेकर,यांचे सह समाज बांधव उपस्थित होते.

हिंगणघाट शहरात स्वस्त धान्य दुकानात निकृष्ट दर्जाचे धान्य

0

 

हिंगणघाट शहरात स्वस्त धान्य दुकानात धान्य निकृष्ट दर्जाचे आहे. संबंधित तक्रारी नागरिकांनी प्रेम बसंतानी(माजी नगराध्यक्ष) यांच्याकडे केली .
या प्रकरणाची दखल घेत प्रेम बसंतानी(माजी नगराध्यक्ष) यांनी हिंगणघाट अन्नपुरवठा अधिकारी सुहास टोंग भेट घेऊन शासकीय धान्य गोदामातील धान्य हे निकृष्ट दर्जाचे असल्यामूळे तो खाण्यास योग्य नाही या धान्याचा पंचनामा करण्यास सांगितले अन्न पुरवठा अधिकारी यांच्याशी चर्चा केली.

सुहास टोंग (पुरवठा अधिकारी )
अन्न धान्यचा पुरवठा हा शासनाने नेमून दिलेल्या प्रतिनिधी केमिकल टेस्ट व दर्जा तपासून ते आमच्याकडे धान्य पाठवतात त्यामुळे ते धान्य योग्य आहे. अजून पर्यंत आमच्या कडे कोणत्याही प्रकारची तक्रार धान्य दुकानदाराकडून आली नाही . हिंगणघाट शासकीय धान्य गोदाम मध्ये स्टोर कीपर याला कोणतेही ट्रेनिंग नाही . धान्य हे हातावर घेऊन धान्य तपासतात व नंतर ते गोडाऊनमध्ये शिफ्ट करतात . तक्रार करते हे धान्य निकृष्ट दर्जाचा आहे सांगतात . वरिष्ठ कडून या संबंधित चौकशी आली तर त्याला आम्ही प्रतिसाद देऊन योग्य तो निर्णय घेऊ असे सांगितले .

प्रेम बसंतानी (माजी नगराध्यक्ष ):- हिंगणघाट शहरात निकृष्ट धान्याचा पुरवठा दुकानदाराचे नाव सांगा ? ते माहित नाही परंतु नागरिकांनी आम्हाला सांगितले की तांदूळ निकृष्ट दर्जाचे आहे.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

खामगाव येथील जयस्तंभ चौकात शांततापूर्ण आंदोलन

0

 

खामगाव ( प्रतिनिधी राजेंद्र मुंडे )

केंद्रातील मोदी सरकार राजकीय सूडबुद्धीने आपल्या नेत्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष सोनियाजी गांधी यांना लक्ष करिता असल्याचे आज संपूर्ण देशात पाहत आहे. भाजपा सरकारने घेतली चुकीचे निर्णय व धोरण यावरून सर्वसामान्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी काँग्रेस नेत्यांना नाहक त्रास देण्यात येत आहे. हे हुकूमशाही शासन केंद्रीय तपास यंत्रणेचा करीत असलेल्या गैरवापर विरुद्ध काँग्रेस पक्षाचे सर्व नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने एक जुटीने आदरणीय सोनिया गांधी यांच्या पाठीशी उभे आहेत. आपले नेत्या यांना पाठिंबा दर्शविण्याकरीता हुकूमशाही सरकारचा विरोध करण्याकरिता मंगळवार 26 जुलाई 2022 सकाळी दहा वाजता खामगाव येथील जयस्तंभ चौकात शांती पूर्वक करण्यात आला.