Home Blog Page 284

वाडेगावात १०० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व प्रेरणा वार्षिकांकाचे प्रकाशन संपन्न

0

 

योगेश नागोलकार
तालुका प्रतिनिधी पातूर

पातुर :-बाळापूर तालुक्यातील स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन व श्री जागेश्वर क्लासेस वाडेगाव च्या संयुक्त विद्यमाने इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व प्रेरणा वार्षिकांकाचे प्रकाशन कार्यक्रम २४ जुलै रविवार रोजी श्री जागेश्वर विद्यालयाच्या सभागृहात मोठ्या थाटात पार पडला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोषदादा मानकर(अध्यक्ष:-ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ,वाडेगाव),प्रमुख मार्गदर्शक संदीप मूर्तडकर(संचालक:-मेरिट मेकर प्रोजेक्ट,अमरावती),प्रमुख अतिथी डॉ. विनित हिंगणकर(संचालक:-ओझोन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, अकोला),सामाजिक कार्यकर्ते)
प्रा.डॉ.संतोष हुशे,पंकज इंडेन गॅस चे संचालक पंकज सहगल ,
घे भरारी स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्र चे संचालक
प्रा.गोपाल वांडे,लोकसेवा करिअर अकॅडमी,अकोला
प्रा.डॉ.गजानन वाकोडे,छत्रपती सेना जिल्हाध्यक्ष नितीन पाटिल मानकर, उपाध्यक्ष डॉ.वा.फाळके,
प्रा.नितीन मानकर उपस्थित होते. या कार्यक्रमात स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन व श्री जागेश्वर क्लासेस द्वारा अकोला जिल्ह्यातील इयत्ता १० वी व १२ वी च्याजवळपास १०० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच आजच्या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रा.नितीन मानकर,विजय गावंडे, सौ.प्रांजल जयस्वाल,प्रा. प्रमोद कौसकार, विकास जाधव,उद्धव भाकरे इ.५ व्यक्तींचा *सन्मान कर्तृत्ववाचा:-२०२२* हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.तसेच हुशे ज्वेलर्स च्या वतीने स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष राजेश पाटिल ताले यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश पाटिल ताले,आभारप्रदर्शन प्रतिक ताले,सुत्रसंचालन कोमल मते व कु.तन्वी खंडारे यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश पाटिल ताले,प्रतीक ताले,अक्षय लांडे,भूषण ताले,राहुल ताले,शिवहरी लाहुडकार,वैभव खंडारे, सोपान ताले,शिवम घोगरे,ज्ञानेश्वर सरप,आदित्य टोळे,ओम घोगरे,प्रसाद लाहुडकार,सुयोग उगले,श्रीकृष्ण हनवते,उद्धव भाकरे, विकास भाकरे,वैभव बंड, मयुर ताले,आयुष ताले,अभय ताले,आदित्य पुंडे,तुषार काळे, रोशन पुंडे इ.प्रयत्न केले.

दिग्रस खुर्द येथे विद्यार्थीनींनी केले ई-पीक पाहणीबाबत मार्गदर्शन

0

 

योगेश नागोलकार
तालुका प्रतिनिधी पातूर

पातुर:- तालुक्यात येथ असलेल्या दिग्रस खुर्द येथे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्नित शिर्ला अंधारे येथील श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालयाची जयश्री राजाभाऊ अंभोरे या विद्यार्थिनींनी दिग्रस खुर्द येथील शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीबाबत मार्गदर्शन केले आहे.
२०२१- २२ पासुन सातबारावर पिकांची नोंदणी मोबाईलमध्ये ई-पीक त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन स्वतःच्या मोबाईलमध्ये ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड करुन आपल्या पिकांची माहिती देणे अपेक्षित आहे. या ॲप मध्ये योग्यरीत्या अचुक माहिती , पिकांच्या फोटोसह कशी भरावयाची , पिकांची अचुक आकडेवारी मूळे उत्पन्नाबदल अंदाज बांधता येतो. याबाबत या विद्यार्थिनींनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यासाठी त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.खरडे , कार्यक्रम समन्वयक व कृषी विस्तार विषय तज्ञ प्रा.एस.टी.कव्हर, कार्यक्रम अधिकारी प्रा.पी.ए. देशमुख , कृषीशास्त्र विषय तज्ञ प्रा.एस.एम.गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

माजी नगर सेविका सौ डोंगरे नी निवेदन करूँ केली मागणी ,,

0

 

हिंगणघाट मलक नईम

आज दिनांक 26/7/2022 विधु्त महावितरण तर्फे उर्जा महोत्सव समारंभ आयोजित करण्यात आला त्या निमित्ताने महावितरण विभागाला माननिय भाजप नगरसेविका सौ.शुभांगी सुनिल डोंगरे यांनी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली महावितरण विभाग वर्धा जिल्हा विषय.. एक कर पावती असल्यास 2 दोन विधुुत कनेक्शन मिटर मिळने बाबद.महोदय सविनय निवेदन सादर करण्यात येते की हा विषय सगळ्या ग्रामीण तसेच शहरातील असून मोठ्या प्रमाणात कित्येक घरात संयुक्त कुटुंब राहतात तरी काही घरामध्ये मुले आणि आई वडील वेगळे राहतात अश्या वेळी त्यांना वेगळ्या मिटर ची / विधुतकनेशची गरज असते. पनं विधुुत विभाग टॅक्स पावती व घर एक असल्या कारणाने मिटर देने टाळते. या मुळे मोठ्या प्रमाणात वाद वाढुन गरीब कुटुंबातील लोकांना अंधारात राहवे लागतात. तरी या प्रकरणी लक्ष देवुन पुर्वी प्रमाने एका कर पावती वर दुसरे मिटर कनेक्शन देण्यात यावे .व ग्रामीण तसेच शहरातील जनतेला न्याय द्यावा.

वाडेगाव पातुर महामार्गावर साचले पाण्याचे डबके

0

 

@पाण्याच्या डबक्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता
@पदचार्‍यासह विद्यार्थ्यांना चालावे लागते जीव मुठीत धरून

वाडेगाव पातुर महामार्गावरील दोन्ही बाजूने पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नाल्या नसल्याने ठीक ठिकाणी पावसाच्या पाण्याचे मोठ मोठे डबके तयार झाले आहेत या डबक्यामुळे पदचाऱ्यासह  विद्यार्थ्यांना चालतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे

– वाडेगाव हे परिसरातील मुख्य बाजारपेठेचे ठिकाण असल्याने येथे परीसरातील  २५ ते ३० गावातील नागरिकांना  दैनंदिन जाणे येणे करावे लागते तसेच या रस्त्यावर महाविद्यालय असल्याने या रस्त्यावरुन नेहमी शेकडो विद्यार्थ्यांची वर्दळ असते मात्र या रस्त्याच्या कडेला पावसाचे पाणी वाहून जाण्याकरिता नाल्याच नसल्याने येथे पावसाच्या पाण्याचे मोठ मोठे डबके तयार झाले असल्यामुळे या रस्त्यावरून मार्गक्रमण करतांना पदचार्‍यासह विद्यार्थ्याच्या जीवित्वास  मोठा धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे संबंधित विभागांने याकडे तात्काळ लक्ष केंद्रित करून रस्त्याच्या दोन्ही बाजूने नाल्या काढून पाणी वाहते करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर  धरत आहे.

सूर्या न्यूज प्रतिनिधी संतोष काळे बाळापुर

हिंगणघाटचारोटरी क्लबचा पदग्रहण समारंभ संपन्न:

0

हिंगणघाट– मलक मो नईम रोटरी क्लब हिंगणघाटचा दत्तक समारंभ गिमेटेक्स सभागृह वाणी येथे संपन्न झाला. ज्यामध्ये अध्यक्ष पराग कोचर, सचिव शाकीर खान पठाण, डॉ.सतीश डांगरे यांची नियुक्ती करण्यात आली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब जळगाव पूर्वचे माजी अध्यक्ष गनीजी मेमन, उद्योगपती विनीतबाबू मोहता, रोटरी क्लब गांधी सिटी वर्धा येथील सहप्राचार्य राहुलजी सराफ, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशजी कदम, पोलीस निरीक्षक कैलासजी पुंडकर आदी उपस्थित होते. तेथे नवे अध्यक्ष व सचिव व मावळते अध्यक्ष व सचिव होते. सर्वप्रथम मुलांनी स्वागत नृत्य गीत सादर केले. त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम माजी अध्यक्ष प्रा जितेंद्र केदार यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या प्रकल्पांची व उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी नवीन अध्यक्षांसोबत रोटरी पिन केली. अदलाबदल त्यानंतर अध्यक्ष पराग कोचर यांनी स्वीकृतीपर भाषण करताना रोटरी क्लबने आपल्यावर विश्वास दाखविल्याबद्दल त्यांचे आभार मानत अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात करावयाच्या प्रकल्पांची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी आपली नवीन कार्यकारिणी जाहीर केली. संस्थापक अध्यक्ष डॉ.अशोक मुखी, निवडून आलेले अध्यक्ष प्रा.राजू निखाडे, क्लबचे प्रशिक्षक प्रा.केदार सर, अध्यक्ष पराग कोचर, सचिव शाकीर खान पठाण, डॉ.सतीश डांगरे, सहप्राचार्या माया मिहानी, उपाध्यक्ष निशा शर्मा, सहसचिव पीतांबरे. चांदणी, केदार जोगळेकर, कोषाध्यक्ष चेतन पारेख, सार्जंट राम कोटेवार, संचालक रितेश बुलानी, राजू गुलकरी, मंजुषा मुळ्ये, संजय बोथरा भूपेंद्र शहाणे, अशोक बोंगीरवार उपस्थित होते. या भागामध्ये नवीन सदस्य देखील जोडले गेले. यावेळी विनीत बाबू मोहता यांनी रोटरीच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. वर्ध्याहून आलेल्या राहुल सराफ यांनी प्रांतपाल डॉ. आनंद झुनझुनवाला यांचा संदेश वाचून दाखवला. डीवायएसपींनी रोटरी क्लबला शुभेच्छा दिल्या आणि पोलीस विभागाच्या सहकार्याची ग्वाही दिली. पोलीस निरीक्षक कैलास पुंडकरजी यांनी रोटरी क्लबच्या कार्याचे कौतुक करून अभिनंदन व सहकार्याचे आश्वासन दिले. शेवटी प्रमुख पाहुणे गनीजी मेमन यांनी आपल्या निवेदनात सांगितले की, जीवन कसे जगले पाहिजे कारण आपल्यासोबत सोबत घेण्यासारखे काही नाही. पैसा कमवावा लागतो पण प्रामाणिकपणे ज्यात स्वार्थ नसतो. इतरांचे भले करताना त्यांना आनंद द्यावा लागतो. त्यांनी सध्याच्या काही सामाजिक समस्यांचाही उल्लेख करून महिलांना जातीचा आदर केला पाहिजे आणि त्यात आईचा दर्जा सर्वोच्च असल्याचे सांगितले. नेहमी आईची सेवा करत रहा. ते म्हणाले की, ज्यांनी वृद्ध आई-वडिलांची सेवा केली नाही आणि इतरांना मदत करून त्यांना आनंद दिला नाही अशांची रोटरी पिन घालणे व्यर्थ आहे. शेवटी त्यांनी अध्यक्ष पराग कोचर आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन व अभिनंदन केले. पाहुण्यांना रोटरी क्लबतर्फे स्मृतीचिन्ह देण्यात आले.
संचालन किशोर चांदणी यांनी केले तर नवीन सदस्यांचा परिचय मंजुषा मुळ्ये यांनी केला तर आभार शाकीरखान पठाण यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुकुंद मुंधरा, मुरली लाहोटी, प्रणय डागा, राजू गुलकरी, केदार जोगळेकर, सुरेश चौधरी, प्रणय डागा, पंकज देशपांडे, संजय शेंडे, जितेंद्र वर्मा, पुंडलिक बकाणे, कैफखान पठाण, जैदखान पठाण आदींनी अथक परिश्रम घेतले.समारंभ गिमेटेक्स सभागृह वाणी येथे संपन्न झाला. ज्यामध्ये अध्यक्ष पराग कोचर, सचिव शाकीर खान पठाण, डॉ.सतीश डांगरे यांची नियुक्ती करण्यात आली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब जळगाव पूर्वचे माजी अध्यक्ष गनीजी मेमन, उद्योगपती विनीतबाबू मोहता, रोटरी क्लब गांधी सिटी वर्धा येथील सहप्राचार्य राहुलजी सराफ, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशजी कदम, पोलीस निरीक्षक कैलासजी पुंडकर आदी उपस्थित होते. तेथे नवे अध्यक्ष व सचिव व मावळते अध्यक्ष व सचिव होते. सर्वप्रथम मुलांनी स्वागत नृत्य गीत सादर केले. त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम माजी अध्यक्ष प्रा जितेंद्र केदार यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या प्रकल्पांची व उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी नवीन अध्यक्षांसोबत रोटरी पिन केली. अदलाबदल त्यानंतर अध्यक्ष पराग कोचर यांनी स्वीकृतीपर भाषण करताना रोटरी क्लबने आपल्यावर विश्वास दाखविल्याबद्दल त्यांचे आभार मानत अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात करावयाच्या प्रकल्पांची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी आपली नवीन कार्यकारिणी जाहीर केली. संस्थापक अध्यक्ष डॉ.अशोक मुखी, निवडून आलेले अध्यक्ष प्रा.राजू निखाडे, क्लबचे प्रशिक्षक प्रा.केदार सर, अध्यक्ष पराग कोचर, सचिव शाकीर खान पठाण, डॉ.सतीश डांगरे, सहप्राचार्या माया मिहानी, उपाध्यक्ष निशा शर्मा, सहसचिव पीतांबरे. चांदणी, केदार जोगळेकर, कोषाध्यक्ष चेतन पारेख, सार्जंट राम कोटेवार, संचालक रितेश बुलानी, राजू गुलकरी, मंजुषा मुळ्ये, संजय बोथरा भूपेंद्र शहाणे, अशोक बोंगीरवार उपस्थित होते. या भागामध्ये नवीन सदस्य देखील जोडले गेले. यावेळी विनीत बाबू मोहता यांनी रोटरीच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. वर्ध्याहून आलेल्या राहुल सराफ यांनी प्रांतपाल डॉ. आनंद झुनझुनवाला यांचा संदेश वाचून दाखवला. डीवायएसपींनी रोटरी क्लबला शुभेच्छा दिल्या आणि पोलीस विभागाच्या सहकार्याची ग्वाही दिली. पोलीस निरीक्षक कैलास पुंडकरजी यांनी रोटरी क्लबच्या कार्याचे कौतुक करून अभिनंदन व सहकार्याचे आश्वासन दिले. शेवटी प्रमुख पाहुणे गनीजी मेमन यांनी आपल्या निवेदनात सांगितले की, जीवन कसे जगले पाहिजे कारण आपल्यासोबत सोबत घेण्यासारखे काही नाही. पैसा कमवावा लागतो पण प्रामाणिकपणे ज्यात स्वार्थ नसतो. इतरांचे भले करताना त्यांना आनंद द्यावा लागतो. त्यांनी सध्याच्या काही सामाजिक समस्यांचाही उल्लेख करून महिलांना जातीचा आदर केला पाहिजे आणि त्यात आईचा दर्जा सर्वोच्च असल्याचे सांगितले. नेहमी आईची सेवा करत रहा. ते म्हणाले की, ज्यांनी वृद्ध आई-वडिलांची सेवा केली नाही आणि इतरांना मदत करून त्यांना आनंद दिला नाही अशांची रोटरी पिन घालणे व्यर्थ आहे. शेवटी त्यांनी अध्यक्ष पराग कोचर आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन व अभिनंदन केले. पाहुण्यांना रोटरी क्लबतर्फे स्मृतीचिन्ह देण्यात आले.
संचालन किशोर चांदणी यांनी केले तर नवीन सदस्यांचा परिचय मंजुषा मुळ्ये यांनी केला तर आभार शाकीरखान पठाण यांनी मानले.

हिंगणघाट ग्रमीण ,,दारोडा येथे करंट लागल्याने शेतकऱ्यांचा २ बैलाचा मृत्यु, व शेतकरी जखमी

0

 

रा. कॉ. पार्टीचे प्रदेश सरचिटणीस ‘अतुल वांदिले’ यांनी शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदद मिळण्याची तहसीलदारांकडे केली मागणी …

हिंगणघाट :- मलक मो नईम तालुक्यातील दारोडा येथील शेतकरी मधुकरावजी घवघवे यांच्या शेतात दोन बैंलाना करंट लागून मृत्यु झाल्याने शेतकऱ्यांचे दोन लाखाचे नुकसान झाले.याप्रसंगी शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस ‘अतुल वांदिले’ यांच्या नेतृत्वात तहसीलदार सतीश मसाळ यांना निवेदन देण्यात आले.
याआधी अतुल वांदिले यांनी दारोडा येथे शेतकरी मधुकर घवघवे यांची त्यांचा घरी जाऊन भेट घेत सांत्वन केले.

सतत 18 दिवसापासून मुसळधार पाऊस असल्याने सर्व सामन्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.जास्त पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.दोन वेळा पेरणी करून सुद्धा अति पावसाने त्याचे बियाणे वाहत गेले आहे.यातच शेतकरी घवघवें यांचा दोन बैलाचा करंट लागून मृत्यु झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

शेतकरी मधूकर मनोहर घवघवे यांच्या दोन बैल रोड नी जात असताना रोडच्या बाजूला असलेली डीपी च्या वायर ने करंट लागण्याने दोन बैलाचा जागीच मृत्यु झाला.या घटनेने शेतकऱ्यांना दोन लाख रुपयाचे आर्थिक नुकसान झाले.रा. कॉ. पार्टीचे सरचिटणीस अतुल वांदिले यांनी शेतकरी कुटूंबाची सांत्वन करून शासनाकडे आर्थिक नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

यावेळी निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, यांच्यासह माजी सरपंच प्रशांत घवघवें, मधुकर घवघवें, सुरज साठोने, धनराज लांबट, सोमदास संगतसाहेब, रमेश रघाटाटे, शिवाजी येळने, विकेश जौजाळ, प्रतीक चाफले, किशोर कुमरे, पिटु कारवटकर, किसना घवघवें, अंबादास देवढे, उमेश आत्राम, अनिल तोंडावट, अमोल पडोळे, भोजराज नेहारे, प्रवीण तडस, प्रफुल हुलके आदी उपस्थित होते..

हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश…

0

 

सुलतानपूर येथील माजी सरपंच रमेश भोयर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत अनेक कार्यकर्त्या सह पक्ष प्रवेश..
हिंगणघाट प्रतिनिधि मलक मो नईम
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अतुल भाऊ वांदीले यांच्या हस्ते झाला पक्ष प्रवेश …

 

हिंगणघाट :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मा.श्री.अतुल वांदिले यांच्या उपस्थित व प्रवीण श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखाली सुलतानपूर येथील माजी सरपंच रमेश भोयर यांच्या शेकडो कार्यकर्तेसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत पक्ष प्रवेश.
हिंगणघाट विधानसभा मतदारसंघामध्ये मागील तीन महिन्यापासून मोठी इन्कमिंग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू असून अनेक मतदार संघातील दिगग्ज नेते व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य प्रदेश सरचिटणीस मा.श्री.अतुलभाऊ वांदिले यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत हा प्रवेश घेण्यात आला.रा.का.चे प्रवीण श्रीवास्तव व रविकिरन कुटे यांच्या पुढाकाराने सुलतानपुर येथील माजी सरपंच रमेश भोयर यांनी दुपट्टा घालून रा.कॉ.पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या हस्ते आज हा पक्ष प्रवेश झाला.

सुलतानपुर येथील माजी सरपंच रमेश भोयर, विजय बुटले, गणेश सातपुते, विजय पवार, सुनिल येरेकर, नारायन सावळे ज्ञानेश्वर भोयर, अवकास भगत, अजय आटोळे, प्रनय घुगरुड, कुनाल नागठाणे, प्रज्वल भगत, भागवत भोयर, प्राजंल कुबडे, गोपाल निशाणे, गोविंद निखट आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत पक्ष प्रवेश केला.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमोल बोरकर, सुनील भुते,बच्चू कलोडे, राजू मुडे सह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

पातुर बाळापूर तालुका मंडप डेकोरेशनची कार्यकारणी गठीत

0

 

@अध्यक्षपदी प्रकाश निमकडे तर सचिवपदी राजेंद्र बावनथडे यांची निवड

संतोष काळे बाळापुर
पातूर अकोला टेन्ट अँन्ड डेकोरेटर असोसिएशनशी संलग्नित असलेल्या पातूर बाळापूर तालुका मंडप असोसिएशनची कार्यकारणीची बैठक नुकतीच पातुर येथे पार पडली या बैठकीत बाळापुर पातुर तालुक्याची मंडप असोसिएशनची कार्यकारणी एकमताने गठीत करण्यात आली.

या बैठकीला जिल्हाध्यक्ष दादासाहेब उजवणे, उपाध्यक्ष संजय शर्मा, प्रविण बोदडे, अनिल टिकार,गजेंद्र डाबरे मंगेश गिते संतोष अढाऊ रुपेश रुईकर बाबू बागडे यांच्या प्रमुख उपस्थीतीत पार पडलेल्या बैठकित बाळापूर-पातुर तालुका मंडप असोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रकाश निमकंडे, उपाध्यक्षपदी राजेश्वर पळसकार, शे.अमीर अ.अजीज, सचिवपदी राजेंद्र बावनथडे, सहसचिवपदी सै,फराण सै.फुरकान, कोषाध्यक्षपदी सुनील पाटील, सह कोषाध्यक्षपदी अनिल धनोकार, प्रसिध्दी प्रमुख अमोल जामोदे, सहप्रसिध्दी प्रमुख संजय गोतरकार, तर सदस्यपदी अलीखान युनुसखान, प्रविण इंगळे, संतोष लसनकार, गजानन घाटोळ, खालीद एकबाल अंकेश शाहु, मो.शारीक, नितीन वानखडे, आभिजीत गहिलोत,योगेश गेंदे,गजानन खंडारे, दत्ता घाटोळ, गणेश मुंडे, विशाल धोटे, यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी पातूर बाळापूर तालुक्यातील मंडपचे सर्व पदाधिकारी व सदस्याची उपस्थिती होती.सभेचे संचालन संजय गोतरकर यांनी तर आभार प्रदर्शन अमोल जामोदे यांनी केले.

बुलढाणा जिल्ह्यातील वन विभागात भ्रष्टाचार होत आहे. संबंधितांवर कारवाई व्हावी व आळा बसावा.

0

 

संग्रामपूरः- बुलढाणा जिल्ह्यातील वनविभागात फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून संबंधितांवर कारवाई व्हावी व भ्रष्टाचाराला आळा बसावा ह्याकरता देऊळघाट येथे भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष याकुब खान पठाण यांच्या फार्म हाऊस येथे समाजवादी जिल्हा संर्पक प्रमुख शेख सईद यांनी जिल्ह्यात होत असलेल्या वन विभागातील भ्रष्टाचार बाबत चर्चा केली. याबाबत संबधितावर कारवाई होऊन भ्रष्टाचारला आळा बसावा असे चर्चे दरम्यान सांगितले यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी सुर्या मराठी न्युजचे मुख्य संपादक अनिल सिंग चव्हाण व निलेश चिपडे व आझाद हिन्द शेतकरी संघटना जळगाव जामोद तालुका अध्यक्ष रसूल भाई ,आणि भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य उपस्थित होते.सदर भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई न झाल्यास भ्रष्टाचार निर्मुलन समिती व समाजवादीचे वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

शिंदे गटात गेल्याने ग्रामीण भागातील जनता नाराज.

0

 

दिपक देशमुख
मेहकर

मेहकर तालुक्यातील आमदार आणि खासदार शिंदे गटात गेल्याने अनेकांनी सोडली साथ.

मेहकर तालुक्यातील आमदार संजय रायमुलकर हे शिंदे गटात गेल्याने मतदार राजा यांना न सांगता शिंदें गटात गेल्याने काही शिवसैनिक यांनी फोन लावले कि आपण शिवसेना सोडुन जायायला पाहिजेत नव्हते तेव्हा त्यांनी स्थानिक मेहकर मध्ये नाराजी असल्याने गेलो मात्र नंतर सावरा सावर करुन माझी कामे होत नव्हती आम्हाला मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटु देत नव्हते म्हणून आम्ही शिवसेना सोडली असे कारणे नागरिक यांना सांगण्यात आली मात्र या अगोदर शिवसेनेत आपण दोन ते तीन टर्म आपण आमदार होते तेव्हा नाराजीचे सुर आले नाही मात्र या आडीच वर्षात काय झाले शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी सर्व आमदार यांना फोडुन मुख्यमंत्री पदावरुन त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि आपण त्यामध्ये शिवसैनिक यांनी निवडणू दिले होते आपण हि गेल्याने मेहकर तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील नागरिक नाराजीचे सूर काढत आहे
नंतर आमदार यांच्या पाठोपाठ खासदार प्रतापराव जाधव हे हि शिंदे गटात गेल्याने कार्यकर्ते आणि नागरिक यांच्या मुखातून नाराजीचे सूर निर्माण होत आहे भाजपाने एकनाथ शिंदे यांच्या मदतीने राज्यातील शिवसेनेतून फुट पाडुन राज्यातील सत्ता घडवुन आणली त्या मुळे अनेक शेकडो कार्यकर्ते यांचे लक्ष खासदार प्रतापराव जाधव यांच्या कडे होते मात्र तेही गेल्याने मेहकर मध्ये सभा घेऊन आपले म्हणोगत वक्त केले मात्र शिंदे गटात गेल्याने. मेहकर तालुक्यातील मतदार राजा हा शिवसेनेचा अनेक तालुक्यात आणि जिल्ह्यात शिवसेना बालिकिल्ला म्हणून ओळख आहे मात्र हे शिंदे गटात गेल्याने या बालिकिल्याला खिंडार पडण्याचे काम सुरू झाले आहे त्यामुळे अनेक जेष्ठ शिवसैनिक आणि नवयुवक नाराज आहेत