Home Blog Page 285

निंबादेवी धरण प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत,पर्यटकांना धरण परिसरात प्रवेश बंद

0

 

यावल तालुका (प्रतिनिधी) विकी वानखेडे

 

यावल : तालुक्यातील चुंचाळे जवळील निंबादेवी धरण हे प्रशासना कडुन प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत करण्यात आले आहे.या धरणावर रविवारी मोठी गर्दी झाली होती व सद्या पाऊस सुरू असल्याने सतर्कता म्हणुन धरण परिसरात पर्यटकांना प्रवेश बंद करीत पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
सातपुड्याच्या पायथ्याशी चुंचाळे जवळ निंबादेवी धरण आहे सद्या हे धरण पुर्ण क्षेतेने भरले असुन मोठ्या प्रमाणात सांडव्याव्दारे पाणी वाहत आहे तेव्हा या वाहत्या पाण्यात अंघोळ करीता रविवारी येथे प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती त्यातच सातपुड्याच्या वनक्षेत्रात पाऊस सुरू असल्याने या धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून सांडव्याद्वारे प्रचंड मोठ्या वेगात पाणी वाहत होत. तेव्हा या धरणावर कुठली दुर्घटना घडू नये यासाठी दक्षता म्हणून प्रशासनाच्या वतीने धरण क्षेत्र हे प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर केले आहे या संर्दभातील बैठक सोमवारी येथील तहसिल कार्यालयात घेण्यात आली या बैठकीत तहसीलदार महेश पवार, पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, प्रादेशिक वनविभाग पश्चिमचे वनक्षेत्रपाल उपस्थित होते या बैठकीत दक्षता म्हणुन निर्णय घेण्यात आला व यावल पोलिसांच्या वतीने धरण परिसरात चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे

हिंगणघाट माजी पालकमंत्री सुनील केदार ने केली पुरग्रस्त भागाची पाहणी ,, हिंगणघाट प्रतिनिधि मलक मो नईम आज दि. 25 जुलै 2022 रोजी वर्धा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी मा. नामदार सुनीलजी केदार, माजी पालकमंत्री तथा मंत्री (म. रा.) यांच्यातर्फे करण्यात आली.

0

यामध्ये समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव, मांडगाव, समुद्रपूर, सावंगी (झाडे). डोंगरगाव,

हिंगणघाट तालुक्यातील हिंगणघाट मधील महाकाली नगर, लोटन चौक, विठ्ठल मंदिर वॉर्ड, जुनीवस्ती ,
आजनसरा, टाकळी, निधा, सिरसगव
इत्यादी गावांचा दौरा करून तेथील पूरग्रस्त रहिवाशी व ग्रामीण भागातील शेतकरी यांच्या व्यथा जाणून घेतल्या
तसेच हिंगणघाट येथे मा. उपविभागीय अधिकारी मार्फत मा. मुख्यमंत्री (म. रा.) यांना पूरग्रस्तांना त्वरित भरघोस मदत देण्यात यावी व शेतकऱ्यांना हेक्ट्री 50,000 रु. मदत त्वरित रब्बी हंगामा अगोदर देण्यात यावी, या मागणीचे निवेदन दिले. याप्रसंगी मा. पंढरीनाथ कापसे, शहर अध्यक्ष, यांनी उपस्थित जन समूहास मार्गदर्शन केले.

याप्रसंगी मा. रणजित दादा कांबळे, आमदार देवळी, मा अशोकभाऊ शिंदे, माजी राज्यमंत्री, मा. झिया पटेलजी, मा. मनोजभाऊ चांदूरकर, अध्यक्ष, वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी, मा. प्रविणभाऊ उपासे, अध्यक्ष, किसान , काँग्रेस, मा. पंढरीनाथजी कापसे, माजी नगराध्यक्ष, मा बालुभाऊं महाजन, हिंगणघाट तालुका अध्यक्ष, काँग्रेस , मा संदीप देरकर, समुदपूर शहर काँग्रेस अध्यक्ष , डॉ. रामकृष्ण खुजे, श्याम देशमुख, राजू भाऊ मंगेकर, सरपंच, सिरासगव

तसेच हिंगणघाट समुदपूर तालुक्यातील व वर्धा जिल्ह्यातील अनेक कांग्रेस कार्यकर्ते, महिला काँग्रेस पदाधिकारी, युवक काँग्रेस चे पदाधिकारी, अल्पसंख्याक सेल चे पदाधिकारी तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

जिल्हा संपर्कप्रमुखपदी खासदार प्रतापराव जाधवचं मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आदेश…..

0

 

जिल्हयातील सर्व नियुक्त्यांचे अधिकार संपर्कप्रमुखांकडे…

बुलडाणा : – जिल्हा शिवेसना संपर्कप्रमुख खासदार प्रतापराव जाधव यांची पुनश्चनियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हि नियुक्ती केली आहे. महत्वाचे म्हणजे जिल्हयातील सर्व पदाधिकारी नियुक्तीचे अधिकारी संपर्क प्रमुख खासदार प्रतापराव जाधव यांना देण्यात आले आहेत.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत जिल्हयातील दोन शिवसेना आमदार डॉ. संजय रायमुलकर, संजय गायकवाड हे नविन भाजप सेना सरकार स्थापनेमध्ये सामील झाले. सोबतच दिल्लीत बारा खासदारांनी एकत्र येत शिंदेना समर्थन देत एन.डी.ए. मध्ये सहभागी झाले. बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचाही यात समावेश आहे. आपण शिवसेना सोडलेली नाही. हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेवुन आपण पुढे जात आहोत. अशि भुमिका खासदार प्रतापराव जाधव यांनी या आधिच जाहीर केली आहे. आज महाराष्ट्र सदन दिल्ली येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडेच बुलडाणा जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख पदी पुनश्च नियुक्ती केली आहे. तसेच जिल्हयातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे अधिकार त्यांनाच बहाल केले आहेत. याप्रसंगी खासदार प्रतापराव जाधव यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रसंगी सत्कार केला. यावेळी लोकसभेतील गटनेते खा. डॉ. राहुल शेवाळे, खा. हेमंत पाटील, खा. कृपाल तुमाने, खा. धैर्यशिल माने, खा. सदाशिव लोखंडे उपस्थित होते.

हातात तलवार घेऊन फिरत असलेला युवक ताब्यात

0

 

प्रतिनिधि अशोक भाकरे

शहरातील पंचमुखी हनुमान मंदिर हरिहर पेठ येथे एक इसम हातात तलवार घेऊन आरडा ओरडा करीत असल्याच्या माहिती वरूण विशेष पथकाने जावुन पाहणी केली असता राहुल हौसिलाप्रसाद यादव वय 22 रा नया फाईल रामदास मठ हा युवक तलवार घेऊन दहशत फसरवण्याचा प्रयत्न करत होता या वरूण पोलीसानी त्याला ताब्यात घेतले त्याच्या जवळून एक तलवार हस्तगत केली व जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

साधनव्यक्ती चांगदेव सोरते यांची शिक्षक सन्मान अभियानाच्या “राज्य समन्वयक” पदी निवड.

0

 

अनिलसिंग चव्हाण मुख्य संपादक.

गडचिरोली:-गडचिरोली सारख्या आदिवासी,दुर्गम व नक्षलग्रस्त जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील गट साधन केंद्रात कार्यरत असलेले उपक्रमशील विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक सन्मान अभियानाच्या राज्य समन्वयक पदी निवड करण्यात आली आहे.
चांगदेव सोरते यांनी कोरोना कालावधीत स्थलांतरित कुटुंबातील पालकांना त्यांच्या कुटुंबापर्यत पोहचवण्यासाठी प्रयत्न केले आहेत.तसेच शाळा बाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी प्रभावी आणि परिणामकारक कार्य केले आहे.नियमित विद्यार्थी-शिक्षक यांना सातत्याने शैक्षणिक सहाय्य करण्याचे मौलिक कार्य केले आहे.आतापर्यत अनेक शिक्षक प्रशिक्षणात उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.महाराष्टातील जवळपास बारा जिल्ह्यातील शिक्षण परिषदांना त्यांनी जवळपास सत्तर ते ऐंशी हजार शिक्षकांना मार्गदर्शन केले आहे.त्यामुळे त्यांना आतापर्यंत अनेक संस्था व संघटनांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहेत.त्यामध्ये गुरू गौरव,भामरागड भुषण,आयकाॅन ऑफ साऊथ गडचिरोली,प्रेरक अधिकारी,गुणवत्तेचे शिलेदार, आदर्श साधनव्यक्ती,राज्य स्तरीय अध्यापक पुरस्कार,बालरक्षक, इंटरनॅशनल आयडॉल अवार्ड, समाजभूषण सारखे इत्यादी पुरस्कार देऊन सोरते यांचा गौरव केल्या गेला आहे.
त्यांनी आपल्या सन्मानाचे श्रेय शिक्षक सन्मान अभियानाचे सर्व पदाधिकारी,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली,विद्यार्थी शिक्षक पालक,अधिकारीगण, सामाजिक संस्था,आप्तेष्ट व मित्रपरिवार यांना दिले आहे.

अतिपावसामुळे राज्यातील परिस्थिती गंभीर असतांना जनता वाऱ्यावर तर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे दिल्लीच्या वारीवर : आ .एकनाथराव खडसे

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

संपुर्ण राज्यात अति पावसाने पूरस्थिती तसेच शेतीची परिस्थिती गंभीर होत चालली असतांना त्यात मुख्यमंत्री– उपमुख्यमंत्री हे दिल्ली वारी करण्यात व्यस्त आहेत तर राज्यातील जनता ही वाऱ्यावर असल्याचे चित्र प्रथम पहावयास मिळत आहे . राज्यात पंचविस दिवस झालीत राज्याचे मंत्रीमंडळ झालेले नाही या ठिकाणी जर मंत्रिमंडळ असते तर लोकांचे समस्या सुटण्यास मदत झाली असती शासनाकडुन नुकसान जनतेला काही मदत करता आली असती तसे न होणे हे आपल्या राज्याचे दुदैव आहे . लोकप्रतिनिधी ही राज्याची परिस्थिती प्रभावीपणे मांडु शकतो पण राज्यात मंत्रीमंडळच नसल्याने प्रशासनाची जबाबदारी ही शासकीय अधिकारी यांचे कडे देण्यात आलेली असुन अधिकारी हे आपले काम त्यांच्या चाकोरीत राहुन काम करतात असे मत माजी महसुल मंत्री राष्ट्रवादीचे नेते व आमदार एकनाथराव खडसे यांनी यावल येथे व्यक्त केले .

तालुक्यातील दहिगाव येथील उपसरपंच किशोर महाजन व येथील माजी नगराध्यक्ष राकेश कोलते यांचे वडीलाचे निधना निमित्ताने माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे व्दार-दर्शनासाठी येथे आले असता येथील स्वामी कृषी केंद्रात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला याप्रसंगी ते बोलत होते.
या प्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की सध्या महाराष्ट्रामध्ये अति पावसाने पूरस्थिती पूरस्थिती निर्माण झाली तसेच शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले मात्र अजूनही मंत्रिमंडळ विस्तार नसल्याने त्यांचे कडे दुर्लक्ष होत आहे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीवारी करण्यात व्यस्त आहेत सरकार त्यांच्या चाकोरीतून काम करते लोकप्रतिनिधी असले तर समस्या सुटतात असे मत त्यांनी व्यक्त केले.
आगामी निवडणुका स्वबळावर
आगामी नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका संदर्भात त्यांना भूमिका विचारली असता त्यांनी कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्यासाठी तयारी करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले मात्र वरिष्ठ पातळीवर महाविकास आघाडीचा एकत्र लढण्याचा प्रस्ताव आल्यास त्या संदर्भात एकत्रित बसून विचार करता येईल आणि ठरल्या नुसार निवडणूक लढता येईल अर्थात तो नंतरचा भाग आहे. निवडणुकी या लागल्या आहेतच त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोणत्याही तयारीत तयार राहावे अशा सुचना दिल्याचे त्यांनी सांगितले .याप्रसंगी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठकही घेतली. या प्रसंगी पक्षाचे जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष अतुल पाटील , तालुकाध्यक्ष प्रा . मुकेश येवले, राष्ट्रवादी आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष एम.बी.तडवी डॉ. हेमंत येवले . माजी नगरसेवक अताउल्लाखान,राष्ट्रवादीचे कार्यध्यक्ष मोहसीन खान, बापु जासुद , युवक राष्ट्रवादीचे गोलु माळी आदी कार्यकर्ते उपास्थित होते . याप्रसंगी काँग्रेसचे माजी नगरसेवक समीर शेख मोमीन, माजी नगरसेवक अस्लम शेख नबी यांनी माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांचे स्वागत केले .

हिंगणघाट शहरात मल निसारण च्या योजनेच्या चेंबरपासून सावधान !

0

 

हिंगणघाट शहरात मलनिसारण योजने अंतर्गत जमिनीच्या आतून पाईपलाईन टाकण्यात आली , यामध्ये अनेक ठिकाणी चेंबर बनवण्यात आले त्यावर झाकण लावण्यात आलेले आहे, हिंगणघाट नगरपालिका अंतर्गत मोठ्या प्रमाणात ठेकेदाराकडून बिल पास करण्यात येते , वेळेच्या आत कामे होत नाही ,, उलट यामध्ये वाढ करून पुन्हा याच कामावर बिल काढण्यात येते यातील कामे अजूनही पूर्ण झालेले नाही, मात्र जे झाले ते सुद्धा चांगल्या पद्धतीने झाले नाही हिंगणघाट शहरात अनेक चेंबर फुटले आहे व सध्या पावसामुळे रोड पाण्याने भरून असतात अशा वेळेस चेंबरचे गड्डे दिसत नाही , हिंगणघाट शहरातील जनते च्या जीवाला जास्त धोका निर्माण झाला आहे .

ओबीसी समाजाला आरक्षण मंजूर केल्याबद्दल बीड येथे धनगर समाज बांधवांकडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा

0

 

दि 24 ओबीसी समाजाचे रद्द झालेले आरक्षण पुन्हा लागू व्हावे यासाठी राज्यभर ओबीसी समाजातील संघटनेचा व ओबीसी नेत्यांचा संघर्ष चालूच होता ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे ओबीसी समाजाचे मोठे नुकसान झाले होते. समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले जात होते काही निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाला संधी मिळत नव्हती ओबीसी समाजाचा राज्यभर मोठमोठाले आंदोलन, मोठमोठे मोर्चे ,मोठ मोठाले रस्ता रोको, करून सुद्धा या ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी व न्याय मिळवण्यासाठी सरकारकडे वेळोवेळी मागणी निवेदन ओबीसी नेते करत होते‌‌. परंतु या समाजाकडे दुर्लक्ष केले जात होते.
राज्यात सत्ता परिवर्तन झाल्याच्या नंतर शिंदे- फडवणीस सरकारने काटेकोर पणे या ओबीसी समाजाकडे लक्ष देण्याचे काम केले व ओबीसी समाजाला न्याय मिळवण्यासाठी लक्ष दिले‌‌.
आज बीड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्यासमोर प्रकाश भैय्या सोनसळे ओबीसी नेते यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजाला आरक्षण मंजूर झाल्याबद्दल प्रकाश भैय्या सोनसळे यांनी पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला यामध्ये सर्व समाज बांधव नेते कार्यकर्ते यांनी सहभागी होऊन आनंद साजरा करण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय घेऊन ओबीसी समाजाला न्याय दिला या निर्णयाचा धनगर समाजाचे नेते प्रकाश भैय्या सोनसळे यांनी शिंदे व फडणवीस सरकारचे अभिनंदन केले व असेच सहकार्य असेच प्रेम व धनगर आरक्षणाचा लवकर प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन यांना निवेदन देणार आहे असेही प्रकाश भैया सोनसळे यांनी म्हटले आहे.
यावेळी हनुमंतरावजी काळे साहेब, नारायणजी भोंडवे सरपंच, भारत गाडे, ओंकार काळे, कैलास पांढरे ,अशोकराव पांढरे, शुभम भोंडवे सुदर्शन दादा भोंडवे , माऊली मारकड,मारकड ताई ,रोहन काळे, सरपंच बंगाल, आण्णा निर्मळ, प्रमोद गाडे,निलेश अडाले,पाराजी अडाले,मारकड भैय्या,हानुमंत राहींज, भोंडवे भैय्या आदी उपस्थित होते

खा. प्रतापराव जाधव यांची जिल्हा संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी

0

 

पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे अन्य सात जणांवर कारवाई…

बुलडाणा :- जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख पदावरून खासदार प्रतापराव जाधव यांनी पक्षविरोधी कारवाई केल्या मुळे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवेसना जिल्हा संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातुन प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. या बाबत चे वृत्त आज रविवार दिनांक 24 जुलै 2022 रोजी शिवसेनेचे अधिकृत मुखपत्र असलेल्या दैनिक सामना मधून प्रसिद्ध करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक 19 जुलै 2022 रोजी शिवसेनेच्या 12 खासदाररांनी गट तयार करून 12 खासदाराचें पत्र लोकसभा सभापतींना देऊन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठींबा दिला होता.
त्यांनी शिंदे गटाला पाठींबा जिल्ह्यातील घाटाखालील काही शिवसेना पदाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्हा प्रमुख शांताराम दाणे यांनी आम्ही खासदार प्रतापराव जाधव यांच्या सोबत असल्याचे जाहीर केले होते. सामना मध्यवर्ती कार्यालयातुन प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जिल्हा संपर्क प्रमुख खासदार प्रतापराव जाधव यांची जिल्हा संपर्क प्रमुख पदावरून तर जिल्हा प्रमुख शांताराम दाणे (मलकापूर जळगांव जामोद विधानसभा) उपजिल्हा प्रमुख राजु मिरगे, उपजिल्हा प्रमुख संजय अवताडे, तालुका प्रमुख नांदुरा संतोष डीवरे, तालुका प्रमुख मलकापूर विजय साठे, तालुका प्रमुख शेगांव रामा थारकार यांची पक्ष विरोधी कारवाई केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेतुन हकालपट्टी केली आहे.

१५८ मुलांना केले पालकांच्या स्वाधीन .केशवस्मूर्ति प्रतिष्ठान समतोल प्रकल्पाची कामगिरी.

0

 

बुलडाणा :- पंकज थिगळे

जळगाव : केशवस्मूर्ती प्रतिष्ठान संचलित समतोल प्रकल्पाच्या माध्यमातून गेल्या १ जानेवारी २०२२ ते ३० जून २०२२ या सहा महिन्यांच्या कालावधीत १५८ मुलांना वाचवण्यात यश आले आहे . मध्य रेल्वे अंतर्गत जळगाव रेल्वे स्टेशन, प्लॅट फोमवरील १५८ मुलांची सुटका केली आहे .या मध्ये १२७ मुले आणि 31 मुलींचा समावेश आहे .त्यांना समतोल प्रकल्पाच्या मदतीने पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे . भांडणामुळे , कौटुंबिक समस्यांमुळे , रागाने , संतापाने , शहराच्या आकर्षणाने, बालभिकारी, भंगार वेचणारी मुल , नश्या करणारी मुल , व्यसन वा गुन्हेगारीकडे वळू पाहणारी मुल किंवा वेगवेगळ्या कारणांनी कुटुंबियांना न सांगता रेल्वे स्थानकावर येणारी मुले , समतोल प्रकल्पाची टीम रेल्वे स्टेशनवर आउटरिच करीत असते , त्या दरम्यान प्रशिक्षित मुले समतोल कर्मचाऱ्यांना आढळतात .हे टीम त्या मुलांशी जवळीक साधतात , त्यांच्या समस्या समजून घेतात. आणि त्यांना त्यांच्या पालकांकडे परत जाण्याचा सल्ला देतात . रेल्वे प्रशासन रेल्वे पोलीस , जीआरपी , जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी बाल कल्याण समिती , बालगृह जिल्हा सामान्य रुग्णालय वैदयकीय अधिकारी प्रशासन यंत्रणा आदींचे सहकार्य समतोल च्या कार्याला होत आहे . मुले पालकांच्या स्वाधीन केल्याचा वेगळाच आनंद मिळतो , अशी प्रतिक्रिया समतोल प्रकल्पाचे प्रदिप पाटील , व विश्वजीत सपकाळे यांनी दिली .