Home Blog Page 287

संघटनेच्या माध्यमातून पूरग्रस्तांना लवकरात लवकर आर्थिक मदत देण्याची मागणी

0

 

हिंगणघाट : -(प्रतिनिधी )
22 जुलै अखिल भारतीय गोंधळी समाज संघटना, श्री संत भिकाराम फाउंडेशन, सुरक्षा फाउंडेशन इंडिया यांच्या कडून हिंगणघाट तालुक्यातील पुरग्रस्त जनतेला तात्काळ आर्थिक स्वरूपात मदत करण्यात यावी यासाठी हिंगणघाट उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
हिंगणघाट तालुक्यात १५ दिवसापासुन सतत पावसाच्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांचे शेतजमीन, शेतातील पिक, घर व घरातील उपयोगी वस्तु हे सर्व पावसाच्या पाणी मुळे आलेल्या पुरात कुटूंब उदवस्त व विसकळीत झालेले आहे.
तरी महाराष्ट्र शासनाव्दारे हिंगणघाट तालुक्यातील पुरग्रस्त जनतेला लवकरात लवकर आर्थिक स्वरूपाची मदत करण्यात यावी अशी मागणी अविनाश नवरखेले (अखिल भारतीय गोंधळी समाज संघटना वर्धा जिल्हाध्यक्ष), राजू हिंगमिरे ( श्री संत तुकाराम फाउंडेशन अध्यक्ष), रोहित राऊत(सुरक्षा फाउंडेशन इंडिया अध्यक्ष), सुरज साळुंकी, गौरव खिराळे, प्रलय पाटील, बुद्धभूषण वाठोरे, चेतन दहिवलकर, यश इताडे, रवी चौधरी, कैलास ठाकूर, निखिल काटकर, गुड्डू मोरया, ओम प्रकाश पंडित, गुड्डू ठाकूर, धीरज साळवे, श्रवण वाट, पदाधिकारी यांनी केली

पाणीपुरी खाणाऱ्यांनो सावधान …़ अन्यथा होऊ शकतो हा धोकादायक आजार …..

0

 

हिंगणघाट मलकनईम …

.भारतातील प्रत्येक शहराच्या प्रत्येक नाक्यावर तुम्हाला पाणीपुरी विकणारे दिसत असतील.पाणीपुरी… नुसतं नाव जरी काढल तरी अनेकांचा तोंडाला पाणी सुटत असा हा पदार्थ.पण पावसाळ्यात ही पाणीपुरी खाणे आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकते.सध्या तेलंगणात टायफाईडने धुमाकूळ घातला असून यासाठी आरोग्य विभागाने पाणीपुरीला कारणीभूत ठरले आहे. तेलंगणात मे महिन्यात टाइफाईडचे 2700 रुग्ण आढळले. त्याच्या वेळी जून मध्ये 2752 प्रकरणे नोंदवली गेली। त्यामुळे सरकारतर्फे नागरिकांना पावसाळ्याचा काळात स्टीट फूडपासून विशेषतः पाणीपुरी विक्रेत्यांनी स्वच्छतेची काही घेत, शुद्ध पाण्याचाच वापर केला पाहिजे, असेही डॉक्टर आणि नमूद केले आहे.दूषित पाणी, अन्न आणि डायरियाचा 6000 _हून अधिक केसेसची नोंद करण्यात आली डेंग्यूचेही रुग्ण वाढताना दिसत आहेत. टाइफाइड ची लक्षणे। टायफॉइडची हा आजार म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे,जो दूषित पाणी आणि अन्नातील साऌमानोला टाईफी बॅक्टेरिया मुळे पसरतो.या आजाराच्या सुरवातीच्या काळात ताप,पोटदुखी,डोकेदुखी, जुलाम,कमी भूक लागने,अशी अनेक लक्षणे दिसून येतात.त्या वेळेवर उपाय न केल्यास ही लक्षणे रक्ताची उलटी, शरीराच्या अंतर्गत बिल्डिंग होणे आणि त्वचा पिवळी पडणे, असा त्रास सहन करावा लागू शकते. पावसाळ्यातील आजार। भारतात सध्या मानसून सीजन जोरात आहे. या काळात घाणेरडे,दूषित पाणी व अन्नामुळे टायफाईड सारख्या बॅक्टेरियल आजारांचा सामना करावा लागू शकतो.तसेच या काळात डासांमुळे पसरणारे आजारही वाढतात, ज्या मध्ये डेंग्यू व मलेरियाचा समावेश आहे. या कारणया गोष्टीची घ्या खास काळजी स्वच्छता। पावसाळ्यात शरीर स्वच्छ राहणे अतिशय आवश्यक आहे. जेवण्यापूर्वी तसेच बाथरूम चा वापर केल्यावर हात-पाय स्वच्छ धुवावेत.तसेच बाहेरून आल्यावर ही आल्यावरही विसरू नये.खोकलताना किंवा शिंकताना नाका-तोंडावर रुमाल जरूर ठेवावा
सतत डोळ्यांना अथवा नाकाला हात लावू नये. स्वच्छ ,शुद्ध पाणी प्यावे। पावसाळ्यात बरेच वेळा पाणी अशुद्ध येऊ शकते.त्यामुळे पिण्याचे पाणी नीट उकळू,गार करून प्यावे.बाहेर गेल्यावर कधीही उघड्यावरील पाणी पिऊ नये.नेहमी घरातून बाहेर निघताना पाण्याची बाटली सोबत बाळगावी, ती नसेल तर पॅक बंद बाटलीतील पाणी विकत घेऊन प्यावे.दूषित पाणी पिहिल्यामुळे डायरिया होऊ शकते.रस्त्यावरील पदार्थ खाणे टाळा पावसाळ्यात नेहमी चमचमीत पदार्थ खायची इच्छा होते.मात्र या काळात रस्त्यावरील चमचमीत पदार्थ खाणे टाळा.खूप इच्छा झाली तर सरळ घरी बनवून त्या पदार्थाचा आस्वाद घ्या बाहेरील पदार्थामुळे पोट बिघडण्याचा धोकाअसतो.

गट ग्रामपंचायत मोरगाव भाकरे येथील पिण्याच्या पाण्यासाठी गावातील नागरिक त्रस्त झाले आहे.

0

 

प्रतिनिधी अशोक भाकरे

गट ग्रामपंचायत मोरगाव भाकरे पिण्याच्या पाण्यासाठी समस्यांचे निवारण केव्हा करेल. गावातील नागरिक बोलत आहेत की ग्रामपंचायत मध्ये चालले तरी काय कुंभकर्णाची झोप अजून झालीच नाही का नागरिक अशे म्हणत आहे. व तसेच गावातील नळ पाच दिवसांनी सोडण्यात येत असून ते पण अर्धा पाऊण तास सोडण्यात येत आहेत. नळ आल्या नंतर 15 मिनिटे नळाचे पाणी गढूळ येत आहे पिण्यास अयोग्य येत आहे. कारण गावातील सर्व नळाचे वॉल खराब आहेत, वॉल जवळ पाणी साचले आहे. त्यामुळे पाईपलाईन मधून गढूळ पाणी येते. या गढूळ पाण्याने लहान मुलांना तसेच वयोवृद्धाच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. कित्येक दिवसा पासुन ब्लीचींग पावडर टाकणे बंद आहे. वारंवार सांगून पण सरपंच व सचिव या कडे दुर्लक्ष करीत आहेत. पाच दिवसानी नळ सोडन्यात येत आहेत. गोरगरीब नागरिकांनी येवढी पाण्याची साठवणूक कशी करावी अशा प्रश्न नागरिकांन समोर आलेला आहे. आता पावसाळ्याच्या दिवसांत नळाचे पाणी मिळत नाही असे गावातील नागरिक चर्चेत बोलत आहे. अशा भरपूर गावातील समस्या आहेत तरी शासनाने त्वरित या गावाकडे लक्ष देऊन समस्या दूर कराव्या असे सर्व गावातील नागरिकांचे म्हणणे आहे.

पिंपळखुटा येथे शॉक लागून तरुण शेतकरी पुत्राचा मृत्यू

0

 

गावात पसरले दुःखाचे डोंगर

योगेश नागोलकार
ता. प्रतिनिधी पातूर

राहेर: पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत पिंपळखुटा येथे शॉक लागून तरुण शेतकरी पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार दि. २० जुलै रोजीच्या सायंकाळी घडली, त्यामुळे गावासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शेख बरकत शेख सुलेमान, असे मृतक तरुनाचे नाव आहे, शेख बरकत बुधवार रोजी शेतात पिकावर फवारणी करण्यासाठी गेला होता, दिवसभर फवारणी केली, फवारणीचे काम अंतिम टप्प्यात सुरू असताना कृषीपंपाच्या केबलचा जबर शॉप लागल्याने ते गंभीर झाला, सदर घटनेची माहिती मिळतात शेजारी शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी तत्काळ धाव घेऊन त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेले तेथे प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला अकोला येथे हलविण्यात आले, परंतु त्याच दरम्यान रस्त्यात मृत्यू झाला, बरकतच्या मृत्यूमुळे गावात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात लहान एक वर्षाची मुलगी आहे.

_वी. जे. आर. रेस्कीव टीम ने कोब्रा सापाला जीवदान._

0

 

योगेश नागोलकार
ता.प्रतिनिधी पातूर

राहेर:- पातुर तालुक्यामध्ये असणाऱ्या सायवणी गावामध्ये स्नेहल धनंजय पाटील यांच्या घरामध्ये अतिविषारी जातीचा कोब्रा साप, दिसताच तिथे असलेले ऋतिक कांबळे, त्यांनी जवळच असलेल्या (वी. जे. आर.रेस्क्यू टीम, चे सर्पमित्र सर्पमित्र पंकज काठोळे सर्प मित्र उदय हरमकार सहकारी मित्र, शिवा नागोलकार, सौरभ ठोसर, शुभम राठोड, गोपाल बरडे, वैभव डवंगे, ऋषिकेश पिसोडे, यांना कॉल करून सर्प मित्रांनी बोलविले , व घरामध्ये घुसलेल्या कोब्रा सापाचा शोध घेतला, साप दिसताच सापाला रेस्क्यू केले, व तिथे उपस्थित असलेले नागरिकांन सोबत सापा विषयी चर्चा केली , तिथे असलेल्या माजी सरपंच स्नेहल पाटील यांनी सर्प मित्रांचे आभार व्यक्त केले, कारण साप म्हटले की प्रत्येक जण भीती युक्त दहशती मध्ये असतो त्यामुळे सर्पमीत्र हे नुसते सापाचांच जीव वाचवीत नाही तर लोकांना दहशतीतूनही बाहेर काढतात. त्यामुळे कुठलाही मोबदला न घेता फोन केल्याबरोबर साप नीघाला त्या ठीकाणी येवून कीतीही अडचण असो त्या सापाला पकडून नेवून जंगलात सोडतात.त्यामुळे सापाचे जीव तर वाचतोच त्याच बरोबर निर्सगाचे सुध्दां संवर्धन होवून लोकांचे सापाबद्दल असलेल्या गैरसमज दूर करुन त्यांना भीतीमधून मुक्त करतात .या सर्व गोष्टी सोप्या नसतात कारण सर्प मीत्र पण जीवावर उदार होवून वरील कर्तव्य करीत असते.
म्हणुन शासनाने पण सर्पमीत्रांच्या नोदंणी शासन दरबारी करुन त्यांना संरक्षणात्मक वस्तु, मानधन व जीवनवीमा सारख्या सुरक्षा द्याव्याव जवळ असलेले फॉरेस्ट विभाग सावरगाव, येथे जंगलाच्या सान्निध्यात रिलीज केले,

*_सर्पमित्रांनी गावकर्‍यांना दिले आव्हान_*
पावसाळ्याचे दिवस चालू आहे साप कधीही घरामध्ये येऊ शकतो, आणि साप हा घरांमध्ये त्याची भूक भागवण्यासाठी येतो, घरामध्ये असलेल्या लहान मुले यांची काळजी घ्या, आणि अचानक साप घरामध्ये जरी आला तरी तो विनाकारण कोणालाही चावत नाही, कृपया करून त्याला मारू नका .
कुठेही साप किंवा जखमी पशु पक्षी दिसल्यास संपर्क करा,
कॉन्टॅक्ट नंबर :
सर्प मित्र पंकज :9373830591
सर्प मित्र उदय :9579700065
सर्प मित्र सौरभ :9529282258
सर्प मित्र शुभम :9067911027

सर्प मीत्र पण जीवावर उदार होवून वरील कर्तव्य करीत असते.
म्हणुन शासनाने पण सर्पमीत्रांच्या नोदंणी शासन दरबारी करुन त्यांना संरक्षणात्मक वस्तु, मानधन व जीवनवीमा सारख्या सुरक्षा द्याव्या

स्नेहल धनंजय ताले
माजी सरपंच सायवणी

शहरातील पूरग्रस्त (पुरपीडीत) कुटुंबांना दहा हजार रुपय आर्थिक मदद तात्काळ द्यावी…

0

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस ‘अतुल वांदिले’ यांची उपविभागीय अधिकारी यांना मागणी…

हिंगणघाट :- मलक नईम

हिंगणघाट हे शहर वणा नदीच्या काठावर वसलेले मोठ्या प्रमाणात झालेल्या मुसळधार पावसामुळे वणा नदीला पूर आला आणि संपूर्ण हिंगणघाट शहर पुराच्या पाण्यानी वेढलेले आहे पुराच्या पाण्याने शहरातील काही भागातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे या पुराचा पाण्यामुळे निशांनपूरा वॉर्ड, गाडगेबाबा वॉर्ड, शितला माता मंदिर, पिवळी मस्जिद, तेली पुरा चौक, भाकरा नाला परिसरात पाणी साचलेले होते, अनेक लोकांचा घरात पाणी शिरले आणि ते कुटुंब विस्कळीत झाले. तसेच घरातील गहू, तांदूळ, किराणा सामुग्री पाण्यात वाहत गेली तरी *अशा कुटुंबांना दहा हजार रुपये आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावी व त्याची घरे पडली त्यांना एक लाख रुपये देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी उपविभागीय अधिकारी यांना केली.

यावेळी निवेदन देतांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्यासह जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, अमोल बोरकर, अमोल मुडे, उमेश नेवारे, राजू मुडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

स्मशानभूमी नसल्याने भरपावसात वृद्ध महिलेवर अंत्यसंस्कार

0

 

चांगेफळ येथील प्रकार; स्मशानभूमी उभारण्याची ग्रामस्थांची मागणी

मागणी न झाल्यास अन्यथा आम्ही गावकरी आमरण उपोषणाला बसू

योगेश नागोलकार
ता.प्रतिनिधी पातूर

पातूर तालुक्यातील चांगेफळ या गाव मध्ये स्मशानभूमीच नसल्याने भर पावसात खुल्या जागेवर अंत्यसंस्कार करावे लागल्याची बाप समोर आली आहे. चांगेफळ येथील वृद्ध महिला मथुराबाई अमृता सदार 75 यांचे वृद्ध काळाने 19 जुलै रोजी रात्री निधन झाले .चांगेफळ परिसरासह सर्व तालुक्यात पाऊस सुरू असल्याने रात्रीच्या वेळेस कसा अत्यंत विधी करावा असे संकट कुटुंबावर आले.तेव्हा पाऊस बंद होण्याची हे कुटुंब वाट बघत होते. सात दिवसांपासून पाऊसाची सततधार सुरू असल्याने भरपावसात प्रेत कशे न्यायाचे हा प्रश्न ग्रामस्थान समोर उभा होता. चक्क ताडपत्रीचा आधार घेऊन कसे सरण रसयाचे व चिंतेला मुखाग्नी कसा द्यायचा हा प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा राहिला. चक्क प्लॅस्टिक ताडपत्रीचा आधार घेऊन अंत्यविधी उरकण्याची वेळ चांगेफळ ग्रामवाशीयावर आली. स्मशानभूमीत शेड व रस्ते उभारावे व प्रेतांची होणारी अवहेलना आता तरी थांबवावी अशी मागणी चांगेफळ येथील नागरिक करीत आहेत. तसेच मागील सात ते आठ वर्षांपूर्वी गावात चांगेफळ येथील कौताबाई वानखेडे या महिलेचे आणि वसंता शिराम बघे या पुरुषांचे पाऊस सुरू असल्याने या दोघांचे मृतदेहाचा अंत्यविधी नदीकाठी करण्यात आला होता. अंत्यविधी झाल्यानंतर काही तासानंतर नदीला पूर आल्यामुळे या दोघांचे प्रेत तसेच पुरामध्ये वाहून गेले तेव्हा सुद्धा गावकऱ्यांनी स्मशानभूमीची मागणी केली होती. तरीसुद्धा आजपर्यंत गावात एकही स्मशानभूमी नाही ही लाजीरवाणी गोष्ट असल्याची टीका चांगेफळ येथील गावकरी करीत आहेत.

चौ
जिल्ह्यातील बहुतांश गावात हीच स्थिती
ग्रामीण विकासाच्या अनेक योजना राबविल्या जातात. त्यानंतरही बहुतांश गावात अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीच नाही. पावसाळ्यात तर अनेक बिकट परिस्थितीला ग्रामस्थांना सामोरे जावे लागते. असा जनक्षोभ इतरही ठिकाणी उठण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया
आम्ही आमच्या स्तरांवरून तातडीने स्मशानभूमीचा अहवाल जिल्हा नियोजन समितीकडे पाठवून लवकरात लवकर स्मशानभूमीचे काम चांगेफळ येथे सुरू करण्याची विनंती करण्यात येणार आहे.

-एसडीओ पातूर

चांगेफळ येथे स्मशानभूमी नसल्याचा प्रस्ताव पंचायत समीती मध्ये आला असेल तर त्या विभागाला कळवून ताबडतोड कार्यवाही करण्यात येईल.

-तहसिलदार पातूर

प्रतिक्रिया
चांगेफळ गावातील स्मशानभूमीचे काम आजपर्यंत झालेले नाही. त्यामुळे आम्हाला अंत्यविधी करण्याची मोठी अडचण होत आहे.तरी संबंधित विभागाने ताबडतोड स्मशानभूमीचे काम सुरू करावे .अन्यथा आम्ही गावकरी आमरण उपोषणाला बसू.

-गणेश सदार समाजसेवक चांगेफळ

आम्ही आमच्या स्तरावरून ठराव दिला असून जागा सुद्धा उपलब्ध करून दिली आहे. तरीसुद्धा स्मशानभूमी चांगेफळ येथे व्हायला का उशीर होतोय याला जबाबदार संबंधी विभाग आहे.

-किरण काळे उप सरपंच चांगेफळ

पटेल समाज कब्रस्तान कमेटीच्या अध्यक्षपदी अय्युब पटेल तर उपाध्यक्षपदी ईकबाल पटेल सचिवपदी हाजी तुकमान पटेल

0

 

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील पटेल समाज कब्रस्तान कमेटीच्या अध्यक्षपदी अय्युब गफुर पटेल व सचिवपदी हाजी लुकमान बिस्मिल्ला पटेल यांची फेरनिवड तर उपाध्यक्षपदी ईकबाल ईसा पटेल, हिलाल हमीद पटेल यांची निवड करण्यात आली आहे.

यावल येथे शहरातील आयशानगर येथे कमेटीचे अध्यक्ष अय्युब पटेल यांच्या अध्यक्षतेखाली कमेटी विश्र्वतांची वार्षीक बैठक संपन्न झाली , या बैठकीत पटेल समाज बांधवांच्या कब्रस्तानातील विविध समस्या अडीअडचणी समाजकंटकाकडून कब्रस्तान परिसरातुन वारंवार होत असलेली वृक्षांची तोड थांबविण्यासाठी योग्य तो निर्णय संदर्भात व याशिवाय विविध विषयी सखोल चर्चा करण्यात आली .

यावेळी कब्रस्तान कमेटीच्या २०२२ते २०२३या वर्षा करीता ची कार्यकारणी जाहीर करण्यात आली ती पुढील प्रमाणे अध्यक्ष अय्युब जी पटेल , उपाध्यक्ष ईकबाल ईसा पटेल व हिलाल हमीद पटेल , सचिव हाजी लुकमान बिस्मिल्ला पटेल , खजिनदार राजु अय्युब पटेल , सदस्य हाजी समद हुसैन पटेल , हाजी ईसा गुलझार पटेल , कमरोद्दीन निजामोद्दीन देशमुख , राजु हाजी अजीज पटेल , मुक्तार ईब्राहीम पटेल , आमंत्रीत सदस्य शकील सफदर पटेल यांची निवड जाहीर करण्यात आली आहे . नुतन पदाधिकाऱ्यांचे व सदस्यांचे कमेटीचे अध्यक्ष अय्युब पटेल यांनी कमेटीच्या वतीने स्वागत केले आहे .

पुरामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण पुर्ण करुन शासनास अहवाल सादर करा -: आमदार समीरभाऊ कुणावार यांचे प्रशासनाला निर्देश

0

 

_आमदार समीर कुणावार यांनी स्वतः घरोघरी जाऊन केले नुकसानीच्या सर्वे_

हिंगणघाट मलक नईम

पुरामुळे हिंगणघाट शहरातील काही भागातील परिस्थिती अत्यंत भीषण झालेली आहे मा.उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रशासनाला दिलेल्या आदेशानुसार तातडीने सर्वांना राज्य शासनामार्फत आर्थिक मदत देण्यात येणार आहे
आज सकाळीच आमदार समीर कुणावार यांनी महसूल व नगरपरिषद प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन शहरातील विठ्ठल मंदिर वार्ड भागातील पिली मजिद येथे नुकसानीचे सर्वेक्षण केले व संबंधित उपस्थित असलेल्या अधिका-यांना तात्काळ शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिलेत तसेच शहरातील इतर भागात व ग्रामीण भागातील सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्यात. यावेळी तहसीलदार तथा नपा प्रशासक सर्वश्री.सतीश मसाळ, भाजयुमो प्रदेश सचिव अंकुश ठाकुर नायब तहसीलदार समशेर पठाण , जिल्हा उपाध्यक्ष सुभाष कुंटेवार,शहराध्यक्ष आशिष पर्बत, माजी नगर सेवक देवा कुबडे,,नरेश युवनाथे,अमोल खंदार, अज्जू भाई ,,कवी इंगोले,नप अभियंता मावळे,नासरे,पटवारी, मंडळ अधिकारी, नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी भारतीय जनता पक्ष व भारतीय युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मेहकर तालुक्या मध्ये पावसाचा कहर.

0

 

दिपक देशमुख-मेहकर तालुका

मेहकर तालुक्यातील जवळपास खरीप हंगामातील पेरणी होऊन एक महिना संपत आला आहे मात्र अद्यापही पाऊस थांबवण्याचे नाव हि घेत नाही जवळपास तुर आणि सोयाबीन खुप प्रमाणात नुकसान झाले आहे पावसामुळे शेतात पाणी साचले आहे त्यामुळे शेतकरी हा आपल्या दोन ते तीन बार पेरणी करुनही शेत काळेच आहे अती पावसा मूळे सोयाबीनचे बि जमिनीत सडले आहे आणि अद्यापही कोणी कुषी अधिकारी तलाठी किंवा किंवा विधायक फिरकले नाही आताच्या पक्षात शिंदे गटात जाण्यासाठी विधायक आपला मतदार संघाकडे दुर्लक्ष करत आहे त्यांना सध्या शेतकरी यांच्या पिकाकडे लक्ष केंद्रित झाले नाही सध्या जो तो आपली खुर्ची आणि सत्ता टिकवण्यासाठी आपली धुरा सांभाळत आहेत मात्र एकिकडे शेतकरी हा आपल्या मशागतीसाठी लागणार खर्च बॅंकेचे कर्ज काढून शेती करत आहे मात्र शेतकरी यांच्या कडे कोणतीही शासकिय अधिकारी किंवा यंत्रणा पोहचली नाही जो तो पदासाठी शिंदे गटात जात आहे त्यामुळे शेतकरी यांचा वाली सध्या कोण नाही त्यामुळे मतदार राजा आणि शेतकरी यांनी जागुत व्हावे असा सल्ला सध्या ग्रामीण भागातील नवयुवक करीत आहे