Home Blog Page 289

१४ वर्षाय अल्पवयीन गतीमंद मुलीवर अत्याचार; नराधमाला अटक

0

 

यावल – ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

गतीमंद असल्याचा फायदा घेत गावातील नराधमाकडून चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक घटना घडली. नराधमाला पोलीसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. अल्पवयीन मुलगी ही गतीमंद असल्याने ती घरीच असते. १३ जुलै रोजी सकाळी मुलीचे कुटुंबाचे सदस्य कामानिमित्त शेतात निघून गेले. दरम्यान, गावातील शांतारा मधनसिंग गायकवाड याने मुलीचा गतीमंद असल्याचा गैर फायदा घेत तिला गावातील बकऱ्यांच्या वाड्यात घेवून गेला. तिथे तिचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. दुपारी कुटुंबिय घरी आले तेव्हा हा प्रकार लक्षात आला. त्यांनी पीडीतेला घेवून यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून नराधम शांतारा गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर करीत आहे.

सांडपाण्याने भाजी धुण्याचा व्हिडिओ व्हायरल हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल

0

 

हिंगणघाट :- मनसे चौक येथील नाल्यामध्ये भाजीपाला धुवून विक्री केल्या बाबत संबंधीत विक्रेत्यावर गुन्हा दाखल करून दंडात्मक कार्यवाही करण्याबाबत, अन्न व नागरी औषधी पुरवठा विभाग हिंगणघाट नगरपालिका कडून पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल
गैरअर्जदार :- श्री. शुभम टामटे, रा. डांगरी वार्ड, हिंगणघाट
संदर्भ
सोशल मेडीया तसेच विविध न्युज चॅनल मध्ये दाखविण्यात आलेली बातमी 14.07.2022
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, हिंगणघाट शहरातील मनसे चौक येथे नालीच्या सांडपाण्यामध्ये भाजीविक्रेता भाजी धुतानाचा व्हिडीओ सोशल मेडीया • तसेच विविध न्युज चॅनलवर दाखविण्यात येत होती. सदर घटनेची सखोल चौकशी केली असता संबंधीत भाजी विक्रेताचे नाव श्री. शुभम टामटे असून तो डांगरी वार्ड हिंगणघाट येथील रहिवासी आहे. सदर प्रकार अत्यंत निंदनीय असून त्यामुळे शहरातील नागरीकांमध्ये शहरातील आठवडी बाजार परीसरामधुन भाजी घेण्या बाबत संमभ्र निर्माण झाला आहे.
सद्यस्थितीमध्ये हिंगणघाट शहरामध्ये मागील 5 ते 7 दिवसा पासुन पाऊस सुरु असून त्यामुळे विविध प्रकारच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. सांडपाण्यामध्ये भाजीपाला घेवून विक्री केल्यामुळे नागरीकांना डायरीया, कॉलरा या सारखे आजार होण्याची शक्यता नाकारता येत
नाही.
तरी गैरअर्जदार श्री. शुभम टामटे यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करुन दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी जेणे करुन अन्य विक्रेते अश्या प्रकारचे कृत्य करणार नाही..

हिंगणघाट शहरात विदर्भ स्तरीय ताक्वांडो स्पर्धेर्चे आयोजन

0

 

भव्य विदर्भ स्तरीय तायक्वांडो युथ चॅम्पयनशिप 2022 स्पर्धेर्चे  आयोजन हिंगणघाट शहरात पहिल्यांदाच दिनांक 16 ते 17  जुलै दरम्यान शहराच्या शिव सुमन मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आले आहे.  यामध्ये विदर्भातील नामांकित खेळाडूंचा सहभाग असणार आहे यामध्ये विदर्भातील विविध गटाती खेळाडुचा भाग घेणार आहे .यामध्ये मुला मुलींचा सहभाग असणार आहे. या स्पर्धेचे आयोजन वीरा वॉरियर्स ग्रुप यांच्याकडून करण्यात आली आहे यामध्ये विजेत्या खेळाडूंना मेडल तसेच समान चिन्ह देऊन आणि प्रमाणपत्र देऊन गौरवित करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून आमदार समीर कुणावार, सहकार महर्षी सुधीर कोठारी, अनिल जवादे प्रेम बसंतानी माजी नगराध्यक्ष ,राष्ट्रवादीचे सरचिटणीस अतुल वांदिले, विदर्भवादी नेते, अंकुश ठाकुर माजी नगसेवक ,सतीश ढोमणे ,विठ्ठल गुळघाणे ,दिगांबर खांडरे अभिनंदन मुनोत, अविनाश भाऊ नवरखेले , प्रशांत चंदनखेडे ,अनिकेत कांबळे आदी मान्यवर स्पर्धेदरम्यान उपस्थित राहणार आहे..या स्पर्धेकरिता विरा वॉरियर्स ग्रुप चे खेळाडू पदाधिकारी अथक परिश्रम घेत आहे तरी सर्व सन्माननीय नागरिकांनी मोठ्या प्रमाणात स्पर्धेकरिता हजर राहण्याची आव्हान आयोजका कडून करण्यात आले आहे   .

संस्कार विद्या मंदिर विद्यार्थीची मेडशी येथे वृक्ष दिंडी

0

 

मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे ९ जुलै शनिवारी रोजी सकाळी दहा वाजता संस्कार विद्या मंदिर येथील विद्यार्थी यांनी मेडशी गावामधून वृक्ष दिंडी काढली. या वेळी विठ्ठल – रखुमाईचे वेशभूषा करून व वारकरी वेशभूषा परिधान करून गावा मध्ये दिंडी काढण्यात आली. या वेळी गांधी चौक येथे विद्यार्थीनी झाडे वाचवा झाडे जगवा या वर एक नाटिका सादर केली. मेडशी सारख्या ग्रामीण भागा मध्ये अशा प्रकारची वृक्ष दिंडी प्रथमच काढल्याने गावातील लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला तर काही ठिकाणी विद्यार्थीना फराळाचे तसेच चाॅकलेट पिण्याचे पाणी या वेळी देण्यात आले तर गावातील नागरीकांनी या संस्कार विद्या मंदिर शाळेचे कौतुक केले आसुन विद्यार्थीनी विठ्ठल रुक्मिणीचे वेशभूषा व वारकरऱ्याच्या वेशभूषा मध्ये विद्यार्थीचे कौतुक केले आहे
तर या वेळी. संस्कार विद्या मंदिर शाळेचे अध्यक्ष मा डॉ श्रीराम घुगे उपस्थित होते तर शाळेच्या मुख्याध्यापिका रूपाली पोधाडे मॅडम, शिक्षिका सौ ज्योती टिकायत मॅडम सौ नेहा कोलाड मॅडम सौ नेहा सोनुने मॅडम सौ श्रध्दा घुगे मॅडम, सौ. स्वाती इंगळे सुरडकर मॅडम, सौ. अयोध्या चतरकर मॅडम, सौ. निकिता गुट्टे मॅडम, पायल दायमा मॅडम, अपर्णा घुगे मॅडम, अंजुम मॅडम, पुजा साठे व शिक्षक, कर्मचारी फाजल भाऊ, प्रणय चोथमल, सौ. मिरा कांबळे, यक्ष घुगे आणि या शाळेतील सर्व विद्यार्थ्यां या वेळी वृक्ष दिंडी मध्ये सहभाग घेतला होता

वाशिम जिल्हा प्रतिनिधी प्रकाश भुरे मालेगाव वाशिम

तण नाशक फवारणी करुनही तण कायम शेतकरी अडचणीत..

0

 

कृषी विभाग पंचायत समिती अधिकार्याणे लक्ष देण्याची गरज..

दिपक देशमुख
मेहकर तालुका

मेहकर:तालुक्यातील 86हजार हेक्टर पैकी आत्तापर्यंत तब्बल 67 हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे.सोयाबीन पेरा मोठ्याप्रमाणावर होत असल्याने शेतकऱ्यांना खुरपणी साठी मजुर भेटत नसल्याने शेतकरी आता तण नाशकाकडे वळले असुन पेरणी झाल्यावर लगेच ४८/७२तासाच्या आत फवारणी करावी लागते आणि पेरणी झाल्यानंतर पिक १८ते २१ दिवसांनी असे दोन प्रकारचे तणनाशक शेतकरी फवारत असतो.यावर्षी मात्र तणनाशक फवारणी करुन देखील तण मेले नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तणनाशक कंपनीमुळे झाले आहे.
कपाशी पेरा मेहकर तालुक्यात कमी होत असुन सोयाबीन पिकाकडे शेतकरी नगदी पिक म्हणुन पहात आहे.त्यामुळे आता सोयाबीनचा पेरा वाढलेला आहे लहान मोठे शेतकरी देखील आता मुंग उडीदाचा पेरा कमी करून केवळ सोयाबीन पिकालाच प्राधान्य देत आहे.कमी मशागतीत चांगले उत्पन्न आणि भावही चांगले मिळत असल्यानेच शेतकऱ्यांनी दुसऱ्या पिंकाचा पेरा कमी केला आहे. हलक्या मध्यम जमीनीवर ही सोयाबीन पिकाची वाढ चांगली होते परंतु त्यामध्ये तणाचे प्रमाण कमी करण्यासाठी बैलाच्या साह्याने कोळपणी (डवरणपाळी) पिकातील तणनियंत्रण करण्यासाठी
एक किंवा दोन वेळेस करत होते. नंतर शेतकरी खुरपणी करत करत होते.तेव्हा बोलले जायचे खुरप्याची आणी…..अमृताचे पाणी परंतु आता मात्र बाजारात शेकडो तणनाशक कंपन्या उतरल्या आणि शेतकऱ्यांचे काम सोईचे झाले।काही तणनाशक तर सोयाबीनची पेरणी झाल्याबरोबर फवारले तर तण उगतच नाही एवढी शक्ती ह्या औषधात आहे.दुसरे जर पेरणी झाल्याबरोबर फवारणी करता नाही आली तरी पेरणी झाल्यावर पिक १८ ते २१ दिवसांनी तणनाशक फवारणी करावी लागते. मजुर मिळत नाही आणि मिळाले तर खुरपणी साठी मोठ्या प्रमाणावर मजुरी द्यावी लागते.त्यामुळे शेतकरी बाजारात मिळणारे तणनाशक नेऊन त्याची फवारणी करतात त्यासाठी एकरी एक हजार पाचशे रुपये खर्च येतो तर मजुर मिळाले तर खुरपणी साडी एकरी दोन ते तीन हजार रुपये लागतात. मजुर मिळत नसल्याने शेतकरी सर्रासपणे तणनाशकाचीच फवारणी करतात यावर्षी देखील शेतकऱ्यांनी तणनाशकाचीच फवारणी केली. बाजारातुन नामांकित कंपनीचे महागड्या औषधाची फवारणी करुन देखील तण जळले नाही.काही शेतकऱ्यांनी तर दोन दोन फवारण्या घेतल्या तरी तण कायम आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता कोळपणी नंतर खुरपणी करणे गरजेचे झाले आहे.पेरणीसाठीच कर्जबाजारी झालेला शेतकरी आता परत मशागती साठी देखील कर्जाच्या ओझ्याखाली दबल्या जाणार आहे.
नामांकित कंपनीचे तणनाशक फवारणी करुन देखील काहीच फायदा न झाल्याने शेतकरी हताश झाला आहे.काही शेतकरी अजुनही तण जळणारच या आशेवर आहे.
……बनावट तणनाशक बाजारात आल्याची चर्चा
तणनाशकाची फवारणी केल्या नंतर तण जळतेच हा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.त्यामुळेच शेतकरी सर्रासपणे तणनाशकाची फवारणी करत असतात यावर्षी मात्र तणनाशकाची फवारणी करुन देखील काहीच फायदा झाला नाही.तणनाशकाची मागणी वाढल्याने नामांकित कंपण्याच्या औषधीचा खप मोठ्याप्रमाणावर वाढला होता याचाच गैरफायदा घेत बनावट तणनाशकाची विक्री होत असल्याची शेतकऱ्यां मधे चर्चा आहे.शेतकर्याची मागणी आहे. सध्या मार्केटमध्ये शेकडो कंपन्या चे खत किटकनाशक व बुरूषी नाशक सुक्ष्म अन्नद्रव्ये टाॅनिक इत्यादी उपलब्ध असुन सदर उत्पादनांची रासायनिक चाचणी साठी नमुना घेऊन त्यामध्ये दर्शवलेले घटक उपलब्ध आहे किंवा नाही याची शहानिशा करावी. सदर कंपनीचे
कीटक नाशक तणनाशक बुरूषी नाशक खत इत्यादी यांच्या विक्रीस बंदी आणुन बोगस कंपन्या वर गुन्हे नोंदविण्यात यावे.शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तालुका कृषी अधिकारी व कृषी विकास अधिकारी पंचायत समिती जिल्हा नियंत्रण अधिकारी यांनी प्रयत्न करावे कारण आजपर्यंत मागिल काही वर्षांची माहिती घेतल्यास विशिष्ट कंपनी चे श्याम्पल घेतल्या जातात बाकी विशिष्ट कालावधी साठी असलेल्या श्याम्पल चे नमुने घेतले जात नाही अशी चर्चा आहे तरी अधिकार्याणि उपलब्ध असलेल्या सर्व कंपन्यांच्या श्याम्पल चे नमुने घेऊन पाठवण्यात यावे अशी मागणी शेतकर्याच्या वतीने सतिश मवाळ
करत आहे.

सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या चुंचाळे येथे आज गुरु पौर्णिमा निमित्त विविध कार्यक्रम

0

 

 

यावल ( प्रतिनिधी)विकी वानखेडे

 

तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या चुंचाळे येथे ,श्री समर्थ सुकनाथ बाबा तपोभूमी, श्री समर्थ रघुनाथ बाबा जन्मभूमी,श्री समर्थ वासुदेव बाबा यांच्या कर्मभूमि मध्ये गुरुपौर्णिमे निमित्त त्यांच्या शिष्यगण परिवारातर्फे विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. देशभरातून हजारो भावीक सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या चुंचाळे येथील वासुदेव बाबा,रघुनाथ बाबा,सुकनाथ बाबा यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेण्यासाठी येतात चुंचाळे सह परिसरातून अध्यात्मिकतेची गंगा प्रगट करणारे वासुदेव बाबा यांचे शिष्यगण गुरु शिष्यातील नाते अखंडीत रहावे या हेतुने गुरुपोर्णीमेचा पर्व साजरा करतात याबाबत सविस्तर असे
बुधवार (दिनांक १३/७/२०२२) गुरुपौर्णिमेनिमित्त येथे यात्रोउत्सव व महाप्रसादाचे आयोजन केले जाते. वासुदेव बाबा मंदिरात हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असते. भाविकांच्या सेवेसाठी काही रिक्षाचालक भाविकांना मोफत मंदिरा पर्यंत आणून सोडतात. श्री समर्थ वासुदेव बाबा मंदिराच्या सुशोभिकरणासह भाविकांच्या निवास्थानासाठी व्यवस्था करण्याचे कार्य हाती घेतले आहे.यातील बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. हजारो भाविक रघुनाथ बाबा,वासुदेव बाबांचे दर्शन घेण्यासाठी येतात.

असा होईल कार्यक्रम
पहाटे पाच वाजता मूर्ती अभिषेक, सहा वाजता मारुती अभिषेक, दुपारी साडेबाराला महाआरती,सायंकाळी सातला आरती, सकाळी आठ पासून आरतीची वेळ सोडून भजन, भारुडे सुरू राहतील. दुपारी एक वाजेपासून ते सायंकाळपर्यंत महाप्रसादाचे वाटप होईल. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावें असे आवाहन करण्यात आले आहे सायंकाळी पाच गावात वाजेपासून पालखी मिरवणूक निघेल रात्री आठ वाजेल दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम होईल.शिरपूर येथील पायी दिंडी चे आगमन आज दिनांक १२/७/२०२२ ला होणार आहे त्यात तालुक्यातील नायगाव, किंनगाव, दहिगाव, सौखेडा,गिरडगाव, वाघोदा, मानवेल सकाळी या भागांतील भाविक येथे दर्शनासाठी येत असतात.

बेघर निवारा आश्रमात रोटरी क्लबतर्फे आरोग्य तपासणी शिबीर

0

हिंगणघाट— मलक नईम

रोटरी नववर्षाच्या पहिल्या महिन्यात रोटरी क्लब हिंगणघाटतर्फे बेघर निवारा आश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
रोटरी क्लबचे अध्यक्ष पराग कोचर म्हणाले की, सुमारे दोन वर्षांपासून रोटरी निवारा आश्रमात राहणाऱ्या बेघर ज्येष्ठ नागरिकांना सुविधा देत आहे आणि त्यांच्यासाठी दर महिन्याला आरोग्य तपासणी शिबिरेही आयोजित करत आहे. या महिन्यात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यात डॉ.अशोक मुखी यांनी रक्तातील साखर, बीपी व इतर आजारांची तपासणी केली व त्यांना औषधेही देण्यात आली. डॉ.अशोक मुखी म्हणाले की, या वयात ज्येष्ठ नागरिकांना काही किरकोळ शारीरिक समस्या असतात.त्यासाठी महिन्यातून एकदा आरोग्य तपासणी शिबीर घेणे आवश्यक आहे.त्यांच्या हातपायांची हालचाल असणे आवश्यक आहे, यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. आरोग्य तपासणीनंतर डॉ.मुखी, मुरली लाहोटी आणि माया मिहाणी यांनी ज्येष्ठ नागरिकांना व्यायाम व योगासने करून त्यांना प्रार्थना व राष्ट्रगीत शिकवले. त्यांनी हाताशी भेटत राहावे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक दालिया, दिनेश वर्मा, मनीषा घोडे, डॉ.सतीश डांगरे, शाकीर खान पठाण आदींनी प्रयत्न केले.

जळगाव किनगाव मार्गावर अज्ञात डंपरने ॲप रिक्शाला धडक दिलेल्या रिक्षा चालक जागेस ठार

0

 

अपघातात किनगावचा अल्पवयीन मुलाचा मृत्यू

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

किनगाव जळगाव मार्गावर एका भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने प्रवाशी ॲपे रिक्षाला जोरदार धडक दिल्याची घटना घडली असुन,या भिषणअपघातात किनगाव येथील १७ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सकाळी ५ ते ५.३० वाजेला घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तेजस प्रकाश तायडे (वय-१७) रा. किनगाव ता. यावल हा अल्पवयीन मुलगा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होता. गेल्या काही दिवसांपासून तो पंढरपूर येथ गेले होता. पंढरपूरहून परल्यानंतर तो मंगळवारी १२ जुलै रोजी सकाळी जळगाव येथून घरी किनगाव येथे येण्यासाठी ॲपेरिक्षाने बसला. धामणगाव फाट्याजवळ पेट्रोलपंपासमोरून प्रवाशी रिक्षा जात असतांना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात डंपरने प्रवाशी ॲपेरिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात तेजस तायडे हा जागीच ठार आला. तर इतर प्रवाशी देखील जखमी झाले. त्यांचे नावे अद्याप समजू शकले नाही. मयतावर जळगाव येथे जिल्हा सामान्य रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले किनगाव येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात या अपघातात मरण पावलेल्या अल्पवयीन मुलाचे अंत्यसंस्कार ळरण्यात आले.

लहान भावाचा खून करणारा कुख्यात आरोपी उरळ पोलिसांनी ताब्यात घेतला.

0

 

प्रतिनिधी.अशोक भाकरे

दिनांक ०७/०५/२२ रोजी फिर्यादी नामे महादेव पांडुरंग घोडसकार वय ५४ वर्ष व्यवसाय पोलीस पाटील यांनी पोलिस स्टेशन रिपोर्ट दिला की, यातील फिर्यादी यांना तंटामुक्ती अध्यक्ष भारत रतन वान खडे यांनी फोन करून माहिती दिली की,गावातील पवन सहदेव वानख डे
वय ३२ वर्ष जात बौद्ध रा. उरळ ता.बाळापूर जि.अकोला हा उरलं बौद्ध विहारात पडलेला आहे आशी माहिती मिळाल्यावरून फिर्यादी यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता पवन सहदेव वानख डे हा बौद्ध विहारामधे हॉल. मध्ये पडलेला दिसला त्याच्या तोंडातून नाकातून रक्त निघालेले होते त्याचे बाजूला लाकडी बल्ली तुटलेली पडलेली व एक लाकडी पटली ( राफ्टर ) पडलेली होती पटलीला एका टोकाला रक्त लागलेले होते . तिथे मृतक ची आई आली व तिने फिर्यादी ला सांगितले की मी पवन ला उठवण्याचा प्रयत्न केला असता तो उठला नाही तो कडकं पडलेला असून तो मरण पावलेला आहे असे सांगितले असता वरून कोणीतरी अज्ञात करणाकरिता त्याचे डोक्यावर वार करून जिवानिशी ठार केले अशा फिर्यदीचे जबानी रिपोर्टवरून पो. स्टे. ला अप. क्र.१३२/२२ कलम ३०२ भा. दं. वि. अन्वये सदरचा गुन्हा दाखल करून तपासात घेतला.
सदरचा. गुन्हा घडल्यापासून आरोपी नामे नत्थु सहदेव वान खडे वय ३८ वर्ष रा. उरलं हा फरार होता तसेच मागील दोन महिन्यांपासून आरोपीचा शोध घेणे सुरू होते. दी. ११/०७/२२ रोजी सदर आरोपीचे शोध दरम्यान मा. ठाणेदार सा. पो.स्टे.उरलं जि.अकोला यांना गुप्त बतमिमार्फत गुप्त बात मी मिळाली की, सदर गुन्ह्यातील आरोपी नामे नत्थु सहदेव वान खडे हा उरलं शेत शिवर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली त्या वरून स पो नि अनंतराव वडत कार यांनी पोलिस पथकासह जाऊन उरलं शेत शिवार उरलं निमकर्दा रोड वर सापळा रचून त्याचा पाठलाग करून सदर गुन्ह्यातील आरोपी नामे नत्थु सहदेव वान खडे वय ३८ वर्ष रा उरलं यास उत्यंत शिताफीने ताब्यात घेतले . सदर गुन्ह्यातील आरोपीला पोलिस स्टेशन ला आणून कसून चौकशी केली असता आरोपी नामे नत्थु सहदेव वान खडे वय ३८ वर्ष रा उरलं , ता.बाळापूर जि.अकोला याने सदर गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
सदरची कार्यवाही ही मा. श्री.जी.श्रीधर ,पोलीस अधीक्षक अकोला, मा श्रीमती मोनिका राऊत , अप्पर पोलिस अधीक्षक अकोला मा.श्रीमती रितु खोकर उपविभागीय पोलिस अधिकारी सा.बाळापुर यांचे मार्गदर्शनाखाली सोपी अनंतराव के. वडतकर ठाणेदार साहेब उरळ पो.उ.नि सागर गोमासे पोलिस हवालदार संतोष भोजने पो.हवा अनिल येन्नेवार राजाराम राउत पो.का.विकास राठोड गजानन ठोंबरे शैलेशभाऊ घुगे रवि भाऊ हिंगणे हरिहर इंगळे सुनिल सपकाळ ASI पंजाबराव इंगळे होमगार्ड अमरदीप मुंदाले विनायक पकदाने पंकज वाकोडे मोहन राऊत यांनी केली आहे.

ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका रद्द करा………. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

0

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उपविभागीय अधिकारी मार्फत जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी…..

हिंगणघाट :- मलक नईम

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ९२ नगर परिषद व ४ नगरपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेणे म्हणजे बहुसंख्य ओबीसी समाजावर घोर अन्याय होत आहे म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांना उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनोले यांच्या मार्फत निवेदन सादर केले. राज्यात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका घेऊ नयेत अशा भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाम आहे.
ओबीसी ला आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वोतोपरीने प्रयत्न करत आहे व जातीने लक्ष घालत आहे. ओबीसी समाजाला आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक घेण्याचा अठ्ठहास या सरकारने करू नये तसेच ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय येत नाही तो पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका टाळायला हव्या असे अतुल वांदिले यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले , माजी नगरसेवक प्रलय तेलंग, कामगार नेते आफताब खान, शहर अद्यक्ष विठ्ठल गुळघाणे, जिल्हा उपाध्यक्ष दिनकरराव घोरपडे, जिल्हा सरचिटणीस दशरथजी ठाकरे, अमोल बोरकर,ओबीसी सेल जिल्हाद्यक्ष हरीश काळे, जितेंद्र सेजवल, सुनील भुते, महिला शहराध्यक्ष सौ मृणालताई रिटे, निताताई गजभे, सीमाताई तिवारी, मिनाताई ढाकणे, माजी नगरसेवक विनोद झाडे, माजी नगरसेवक संजय चव्हाण, माजी नगरसेवक बालाजी गहलोद, पंकज काकडे, विजयभाऊ तामगाडगे, नितेश नवरखेडे, विक्की वाघमारे, पंकज पाके, जावेदभाई मिर्झा, गोविंद पुरोहित, संजयभाऊ सयाम, पुरुषोत्तम कांबळे, किशोर चांभारे, राजू गंधारे, सचिन पाराशर, गुडु साखरकर, नितीन भुते, विलास बोरकर, पंकज भट, अमोल मुडे, अनिल भुते,नरेश चिरकुटे, प्रफुल मेश्राम, मनोज मुरार, गजानन महाकळकर, सुशील घोडे, गोपाल पुरोहित,पपु आष्टीकर,गोलू भुते,विक्रात भगत,कुणाल एसबरे,नाजीर अली,राजेश धनरेल,आशिष मंडलवार,गजानन कालवडे ,राजू मुडे, निखिल शेळके, सागर बारई, मनीष मुडे, कुणाल भुते,निखिल ठाकरे,आकाश बोरीकर, दिनेश नगराळे, विपुल वाढई, किशोर भजभूजे असंख्य पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

*प्रतिक्रिया :- यापूर्वीचे विरोधक जे होते त्यांनी आम्ही सत्तेत आल्यानंतर ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षण देऊ परंतु आज सत्तेत बीजेपी सरकार आहे आणि या बीजेपी सरकारला आता संधी मिळाली आहे तर त्यांनी ओबीसी समाजाला आरक्षण द्यावं आरक्षणाशिवाय जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लावल्या तर आम्ही त्याचा निषेध करू …….अतुल वांदिले– प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.