Home Blog Page 290

रोटरी क्लब अकोला ऍग्रोसिटी च्या वतीने श्री समर्थ पब्लिक स्कूल येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

0

 

अकोला प्रतिनिधी अशोक भाकरे

वृक्षारोपण पर्यावरणाचे संवर्धन व समतोल राखण्याकरिता समाजाचे दायित्व- प्रा नितीन बाठे

रोटरी क्लब ऑफ अकोला ऍग्रोसिटी च्या वतीने श्री समर्थ पब्लिक स्कूल,रिधोरा रोड येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्री समर्थ पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक नितीन बाठे हे होते सोबत रोटरी क्लब ऑफ अकोला ऍग्रोसिटीचे अध्यक्ष एडवोकेट देवाशिष काकड, सचिव नीरज देशमुख व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत आयुर्वेदात उपयोगी असलेल्या विविध वृक्षांची लागवड या वृक्षारोपण कार्यक्रमात करण्यात आली.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्राध्यापक नितीन बाठे यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्याची जबाबदारी ही आपल्या पिढीवर असून येणाऱ्या पिढीला आपण एक स्वच्छ व निर्मळ वातावरण देणे हे आपले कर्तव्य असून या कार्यात नव्या पिढीने उत्साहाने भाग घ्यावा असे प्रतिपादन केले

रोटरी क्लब ऑफ अकोला ऍग्रोसिटीचे अध्यक्ष एडवोकेट देवाशीष काकड यांनी “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी” या तुकोबा रायांच्या अभंगाला स्मरून वृक्ष हे मनुष्याचे मित्र असून पर्यावरणाचा रास रोखण्याकरिता वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे व रोटरी क्लब ऑफ अकोला ऍग्रोसिटीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्याचा मानस व्यक्त केला व नव्या पिढीला पर्यावरण संवर्धनाची शपथ देण्याचा कार्यक्रम प्रत्येक शाळेमध्ये घेणार असल्याचे कळवले.

रोटरी क्लबचे सदस्य मयूर देशमुख यांनी सर्व उपस्थितांना वृक्षांच्या विविध प्रजाती व वनौषधी संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.

रोटरी क्लब ऑफ अकोला ऍग्रोसिटीचे पर्यावरण समितीचे अध्यक्ष विवेक झापर्डे यांनी क्लबच्यावतीने दुर्गम भागात व जिल्हा परिषद च्या शाळांमध्ये जाऊन वृक्षारोपण करण्याचा व वृक्ष संवर्धनाकरिता विद्यार्थ्यांना सोबत जोडण्याचा मानस व्यक्त केला.

याप्रसंगी क्लबचे चार्टर प्रेसिडेंट अतुल चौधरी, एडवोकेट आनंद गोदे,डॉ ज्ञानसागर भोकरे ,गुणवंत देशपांडे, सुनील घोडके , एडवोकेट राजेश अकोटकर ,नारायण कळमकर, सोमेश्वर रत्नपारखी, एडवोकेट संतोष पाटील, राजेश राऊत, शशांक जोशी, आशिष धाडे ,अमित कोल्हटकर, संगीता चौधरी, अर्चना पाटील, अश्विनी भोकरे, संपदा जोशी, दिपाली रत्नपारखी, सुनीता देशपांडे, प्रेरणा घोडके, संध्या अकोटकर, ज्योती कळमकर,मुक्ता धाडे, अभिजीत कडू, अभिजीत आखरे आनंद थोटांगे, आशिष वानखडे, सागर जोशी, विधीश साकरकार, मंदार वखरे ,अमोल बोचे, डॉ पार्थ गवात्रे, गणेश सारसे, श्रीकांत हांडे, जितेंद्र देशमुख, कौशल वानखडे, राहुल केकान ,डॉ सौरभ बोराखडे, वैभव मेहरे, विवेक झापर्डे ,वसंत खराडे, राज ईश्वरकर, दीपक वानखडे, दिलीप देशमुख,अनंता ठाकरे, मयूर देशमुख, तुषार मुर्हेकर,श्रीकांत देशमुख, प्रसाद देशमुख हे सर्व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते

या कार्यक्रमाला श्री समर्थ पब्लिक स्कूलच्या सर्व कर्मचारी वृंद व विद्यार्थी यांचा विशेष सहयोग लाभला

कार्यक्रमाचे संचालन सचिव नीरज देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन कौशल वानखडे, जितेंद्र देशमुख यांनी केले.

यावल शहर मोठ्या मारोती व धनगरवाडा परिसरातील गटारीचे ढाफे रस्ते काँक्रीटी करावे भाजपाची मागणी

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

येथील नगर परिषदच्या कार्यक्षेत्रातील धनगरवाडा परिसरातील काही ठीकाणी अद्याप प्रशासनाच्या वतीने रस्ते कॉंक्रटीकरणाचे झाले नसल्याने या परिसरात राहणाऱ्या नागरीकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असुन, यासंदर्भात प्रशासनाने तात्काळ योग्य ते पाउल उचलुन रस्ते काँक्रटीकरण करावे अशा मागणीचे लिखित निवेदन मुख्यधिकारी यांना भारतीय जनता पक्षाच्या वसुले गल्ली शाखा अध्यक्ष ललीत परमार्थी यांनी केली आहे . या संदर्भात लतीत परमार्थी यांनी मुख्यधिकारी मनोज म्हसे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , यावल नगर परिषदच्या कार्यक्षेत्रातील ठेंगे सोसायटी ते धनगरवाडा उर्वरीत भाग व धनगरवाडयातुन मोठया मारोती कडे जाणारा रस्ता हा बऱ्याच वर्षांपासुन रस्ता काँन्क्रीटीकरण आणि गटारीवरील ढाप्याचे अद्याप झाले नसल्याने या मार्गावरून ये जा करणाऱ्या पादचारी व नागरीकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे . या विषयी परिसरातील रहिवाशी नागरीकांनी या समस्या संदर्भात वारंवार तक्रारी करण्यात आल्या असुन देखिल नागरीकांशी निगडीत प्रश्नाकडे प्रशासन गांर्भीयांने लक्ष देत नसुन , रस्ते नसल्याने व गटारींवर ढापे नसल्याकारणाने लहान मुले या गटारीत पडत असुन, मोटरसायकल व छोटे वाहनधारकांना उघडयावर असलेल्या गटारीमध्ये पडत असल्याचे प्रकार घडत आहे . तरी नगर परिषद प्रशासनाने तात्काळ या रस्त्यांच्या व उघडयावर असलेल्या गटारीचे ढाप्यांची कामे त्वरीत करावी अशी मागणी ललीत परमार्थीयांनी केली असुन यावेळी मुख्याधिकारी मनोज म्हसे , नगर परिषदचे बांधकाम अभियंता योगेश मदने व आदी यावेळी उपास्थित होते .

पिंपळगाव येथील रहिवासी याचा पाण्यात वाहून मृत्यू

0

 

पिंपळगाव ग्रामपंचायत कडून योग्य वेळी कारवाई केली असती तर अमेश रवींद्र लिहितकर पुरात वाहून गेला असता का ? मौजा पिंपळगाव नाल्याला लागून ओमकार नगर १६ सर्व्हे.न.५५/१अ ले आऊट मालकाने येथून येणारी सरकारी नाली बंद केल्याबाबत तक्रार दाखल केली असता नाली बंद करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच त्यांनी नाली बंद करतांना ग्रामपंचायत ची कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही. गावातून तक्रार प्राप्त झाल्यानंतर ग्रामपंचायत ने त्यांना नाली पूर्ववत सुरू करून देणे बाबत जा.क्रं.५३/२०२१-२२ दि. २१/०१/२०२२ ला पत्र सुद्धा दिलेले आहे. परंतु लेआउट मालकाकडून सरकारी नाली पूर्ववत सुरू करण्यात आली नाही त्यामुळे पुराचे पाणी हे ले आउट धारकाकडून वळविण्यास सक्षम ठरले नाही त्याचा परिणाम लेआउट मध्ये गावातील पूर्ण पाणी जमा झाले . ग्रामपंचायत पिंपळगाव कडून याची अगोदरच दखल घेतली असती तर कदाचित आज २९ वर्षीय युवक अमेश रवींद्र लिहितकर, हा या पुरात वाहून गेला नसता !

वड्री आसराबारी या आदीवासी वस्ती परीसरात पुर्व वनविभागाच्या वतीने बहुमुल्य वृक्षांची लागवड

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या आसराबारी या गावपाडयावर वनविभागाच्या विविध वृक्षांची लागवड करण्यात आली आहे . यावल वनविभाग जळगांव, वनक्षेत्र यावल पुर्व मधील यांच्या वतीने आज दिनांक ७ जुलै रोजी मौजे आसराबारी (वड्री खु. ) ता. यावल जि. जळगांव या ८० ते ९० झोपड्या असलेले आदीवासी वस्तीवर मागील वर्षी १२ जुलै रोजी आढकुन आलेल्या कुपोषित बालकाचे जळगाव येथे सामान्य रुग्णालयात उपचारा दरम्यान दुदैवी निधन झाले होते याच पार्श्वभूमीवर कुपोषणाचे गांर्मीय लक्षात घेता या वर्षी त्या वस्तीवर जंगलात वास्तव्यास राहणारे आदीवासी महिला व चिमकुल्या बाळांना पोषक घटक मिळणारे शेवगा, आंबा, सिताफळ, आवळा, जांभूळ, रामफळ व इतर फळझाडांची रोपांचे वनविभाग यांचेकडून वन महोत्सवच्या निमित्ताने दि. 01जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत वृक्ष लागवड करिता 01जुलै ते 07 जुलै 2022 वन महोत्सव सप्ताह साजरा करण्यात येत असल्याने या कार्यक्रमानिमित्ताने वस्तीवरील सर्व कुटुंबांना यावलचे तहसीलदार महेश पवार पुर्व क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर , वड्री गावाचे सरपंच अजय भालेराव , उपसरपंच पंकज चौधरी , ललित चौधरी अध्यक्ष वन संरक्षण समिती,यांचे हस्ते रोपे वाटप करून,रोप लागवड करून कार्यक्रम साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात विक्रम पदमोर वनपरिक्षेत्र अधिकारी यावल यांनी उपस्थितीतांना वन महोत्सव कार्यक्रमाचे आणि कुपोषण मुक्त करिता वृक्ष लागवडीचे महत्त्व सांगितले.या कार्यक्रमास रविंद्र तायडे वनपाल, गोवर्धन डोंगरे वनरक्षक, कृष्णा शेळके वनरक्षक, भैय्यासाहेब गायकवाड वनरक्षक, संदीप चौधरी, फकिरा तडवी, जवानसिंग पावरा, देवीसिंग पावरा, गुड्ड पावरा उपस्थितीत होते.

श्रीसंत तुकाराम महाराज बहुउद्देशीय संस्था पंढरपूर येथे भाविकांनसाठी भजन किर्तनाचा कार्येक्रम.

0

 

यावल (प्रतिनीधी )विकी वानखेडे

तालुक्यातील
किनगाव येथील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल चे चेअरमन व महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि औषधे प्रशासन विभागाचे सेवानिवृत्त उपायुक्त विजयकुमार देवचंद पाटील यांनी श्री संत तुकाराम महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी भोजनासह निवासस्थानाचीही व्यवस्था केली असून, दरवर्षी मोठ्या संख्येने जळगाव जिल्ह्यातील व परिसरातील भाविक मोठया संख्येने या निवासस्थानात आसरा घेतात तसेच सकाळ संध्याकाळ येथे भजन व कीर्तनाचे भक्तीमय कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येते तर संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार देवचंद पाटील हे स्वतः येथे येणाऱ्या भावीकांची विचारपूस करण्यासह त्यांची निवास व भोजनाची व्यवस्था करूण देतात येथे जळगाव जिल्ह्यातील बहुतेक वारकरी भावीक येतात येथे बांधण्यात आलेले निवासस्थान हे भावीकांनसाठी वर्षभर सेवा देते.भाविकांच्या सेवेसाठी नेहमीच अग्रेसर राहणारे अध्यक्ष विजयकुमार पाटील, ह.भ.प.लिलाधर महाराज,प्रमोद महाजन यांच्यासह त्यांचे सहकारी उपस्थीत असतात यावेळी किर्तनाच्या कार्यक्रमात मोठया संख्येत भाविकांनी सहभाग घेतला .

फोटो- श्री संत तुकाराम महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पंढरपूर येथे किर्तनाचा आनंद घेताना भाविक.

यावल तहसील कार्यालयात चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेद्वारे संचलीत उपहारगृहाचे उदघाटन उत्साहात संपन्न_

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील तहसील कार्यालयात जळगांव जिल्हा चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेव्दारे संचलीत उपहारगृह उदघाटन फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग यांच्या हस्ते करण्यात आले.
यावल येथील महसुल प्रशासनाच्या सातोद मार्गावरील नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या मोकळ्या जागेत उपविभागीय अधिकारी फैजपूर विभागाचे फैजपूर .कैलास कडलग यांचे हस्ते उदघाटन करण्यात आले तर दीपप्रज्वलन यावलचे तहसीलदार महेश पवार , नायब तहसीदार.आर,डी, पाटील,रशीद तडवी (प्रांत कार्यालयाचे अव्वल कारकून फैजपूर),रविंद्र तायडे (जिल्हाध्यक्ष कास्टाईब कर्मचारी महासंघ ) यांचे हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी स्वागत कैलास कडलग यांचे स्वागत डी. एम.अडकमोल जिल्हाध्यक्ष महसूल चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना,
महेश पवार तहसीलदार यांचे स्वागत सुरेश महाले अध्यक्ष उपहारगृह , नायब तहसीलदार आर.डी. पाटील यांचे स्वागत युनूस खान यावल तालुका सरचिटणीस महसूल संघटना यांनी केले रशीद तडवी यांचे स्वागत शेख नूर ( जिल्हा सरचिटणीस ) यांनी स्वागत केले तर रहेमान तडवी (तालुकाध्यक्ष यावल महसूल संघटना )डी. एम.अडकमोल यांचे स्वागत रामलाल कोळी यांनी केले . या कार्यक्रमास सुरेश महाले बी.के. पाटील.पुलकेशी केदारी , बापू साळुंखे , संजय तायडे, यावल तालुका पंचायत समितीचे शिक्षणाधिकारी नईम शेख ,यांच्यासह संतोष विनंते ( निवासी नायब तहसीलदार यावल )
पुरवठा निरिक्षक अंकिता वाघमुळे,
सखावत तडवी, दीपक बाविस्कर, सुरज जाधव व सर्व महसुल कर्मचारी याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते

युनायटेड नेशन्स पब्लिक सर्व्हिस डे निमित्त खाकी वर्दीचा सन्मान

0

 

————————————————————————–
अर्बन प्लेटरचे शुद्ध पौष्टिक नारळाचे पाणी बाजारात दाखल-पोलिसांमध्ये केले वाटप

 

युनायटेड नेशन्स पब्लिक सर्व्हिस डे निमित्ताने “समुदायातील सार्वजनिक सेवेचे मूल्य आणि सद्गुण” आणि लोकशाही आणि यशस्वी शासन सक्षम नागरी सुविधेचा सन्मान म्हणून हा दिवस ओळखला जातो आणि साजराही केला जातो. २५ जून रोजीचे औचित्य साधून यंदा खाकी वर्दीचा सन्मान करण्यात आलेला आहे.

पोलीस दल दिवसरात्र सर्वसामान्यांच्या सेवेसाठी ऊन, वर, पाऊस, थंडी याची तम न बाळगता कार्यरत राहतात. त्या सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे आभार आणि त्यांच्या कार्याचा गौरव युनायटेड नेशन्स पब्लिक सर्व्हिस डे निमित्ताने करण्यात आला. सर्वसामान्यांचे रक्षण करणाऱ्या पोलीस दलाला मदत, सहकार्य आणि त्यांचे आरोग्य अबाधित राहावे म्हणून तामिळनाडूच्या अर्बन प्लेटरद्वारे एक शुद्ध आणि शाश्वत नारळाच्या पाण्याचे वाटप करण्यात आलेले आहे. एक स्वादिष्ट, ताजेतवाने आणि पौष्टिक नारळाचे पाणी जे वर्षभर चवीत सुसंगत असते, अर्बन प्लेटरचे नारळाचे पाणी शाकाहारी, ग्लूटेन-मुक्त आणि पूर्णपणे नॉन-जीएमओ आहे. व्हिटॅमिन सी सह फोर्टिफाइड, शून्य-कचरा धोरणासह, 100% सौर उर्जेच्या सुविधेवर बनवलेले आहे. उन्हाळ्यात कठोर परिश्रम करून वाहतुकीचा ताण सांभाळून वाहतुकीच्या रहदारीचे नियोजन करणाऱ्या वाहतूक पोलिसांना देखील अर्बन प्लेटरचे नवीन लाँच केलेले नारळ पाणी देण्याची गरज आहे. तसेच संयुक्त राष्ट्रांनी साजऱ्या केलेल्या सार्वजनिक सेवा दिनाच्या निमित्ताने वाहतूक पोलिसांना अर्बन प्लेटर कोकोनट वॉटर देण्याची इच्छा आणि गरज असल्याची प्रतिक्रिया अर्बन प्लेटरचे संस्थापक चिराग केनिया यांनी व्यक्त केली

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जनसंपर्क अभियानाला सुरुवात…..

0

 

राजू खान यांची वर्धा (काँझुमर) उपभोक्ता सोसायटी च्या डायरेक्टर पदी नियुक्ती झाल्याबद्दल रा.कॉ.पार्टीचे प्रदेश सरचिटणीस ‘अतुल वांदिले’ यांनी सन्मान चिन्ह देऊन केला सत्कार……

हिंगणघाट :- मलक नईम

आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या संकल्पनेतून प्रत्येक लोकांपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार पोहचविण्याच्या दृष्टीकोनातून ”जनसंपर्क अभियानाची” सुरुवात महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे सरचिटणीस ‘अतुल वांदिले’ यांच्या द्वारे हिंगणघाट शहरातून करण्यात आली. यावेळी हिंगणघाट शहरातील प्रभाग क्रमांक १९ शास्त्री वॉर्ड येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून कार्यकर्त्यांच्या अनेक समस्या समजुन घेतल्या. तसेच प्रभागातील प्रमुख सद्यस्यांना व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रभागातील स्थानिक नागरिकांच्या समस्या देखील जाणून घेतल्या. तसेच येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे नगरसेवक कसे निवडून येतील यावर जास्तीत जास्त भर देत नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. फक्त निवडूण येण्यासाठी म्हणून नाही तर वॉर्डातील स्थानिक नागरिकांच्या समस्या जास्तीत जास्त कश्या सोडविता येईल यावर जास्तीत जास्त भर देण्याचे ‘अतुल वांदिले’ यांनी यावेळी बैठकी मध्ये सर्व कार्यकर्त्यांना सांगितलें.
या बैठकी मध्ये वर्धा उपभोक्ता सोसायटी च्या डिरेक्टर पदी श्री. राजू खान यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा रा.कॉ.पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी शाल-श्रीफळ व सन्माम चिन्ह देऊन सत्कार केला.
याप्रसंगी रा.कॉ. पार्टीचे जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, अमोल बोरकर, नाझीर भाई, जावेद मिर्झा, सुनील भुते, नितेश नवरखेडे, अजय परबत, किशोर चांभारे, गोमाजी मोरे, बच्चु कलोडे,जगदीश वंदिले,अनिल भुते, राजू मुडे आकाश बोरीकर,इरफान सय्यद,वालीद शेख,अकबर शेख,फैजान पठाण, फरहान कुरेशी, नादिम अली, अरबाज खान,अलिब बेग,नौशाफ शेख, अखिल खान, राजू खान, अखतर खान, मोहसीन खान, जगदीश किरपाल यांच्यासह वॉर्डातील सर्व नागरिक उपस्थित होते.

यावल येथे बकरी ईद व आषाढी एकादशी या निमित्ताने शांतता समिती सदस्यांची बैठक संपन्न

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

दोन वर्षानंतर कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विविध धर्मीयांची सण उत्साह सुरू झाले आहे मुस्लिम बांधवांची बकरी ईद तर हिंदू बांधवांची आषाढी एकादशी एकाच दिवशी येत असल्याने एकमेकांच्या भावना दुखावल्या जाऊ नये व शहरात शांतता प्रस्थापित करावी असे आवाहन येथील पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी बुधवारी सायंकाळी येथील पोलीस ठाण्याच्या आवारात आयोजित शांतता समिती सदस्यांच्या सभेत केले आहे.

मुस्लिम बांधवांची बकरी ईद व हिंदू बांधवांची आषाढी एकादशी एकाच दिवशी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर येथील पोलीस ठाण्याच्या वतीने बुधवारी सायंकाळी शांतता समिती सदस्यांची बैठक आयोजित केली होती. याप्रसंगी पोलीस ठाण्याच्या आवारात संपन्न झालेल्या बैठकीत पोलीस निरीक्षक भागवत म्हणाले दोन वर्षाच्या कोरोना संसर्ग नंतर विविध धर्मांचे सण उत्सव सुरू करण्यात आले आहेत दोन वर्षानंतर विविध व्यवसाय वृद्धिंगत होत आहेत अशा प्रसंगी येणाऱ्या विविध धर्मीयांच्या सणांमध्ये सर्व धर्मीयांनी शांतता ठेवण्यास सहकार्य करावे. दोन्ही सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून कोठे ही अशांतता असल्यास अशा परिस्थित नागरीकांनी आपले सामाजिक कर्तव्य पार पाडीत तात्काळ पोलिसांची संपर्क करावा असे आवाहन ही यावेळी पोलीस निरिक्षक दिलीप भागवत यांनी केले, अफवा पसरवुन अशांतता निर्माण करणाऱ्या व्यक्ति विरुद्ध कडक कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले. शांतता समिती बैठकीस जेष्ठ शांतता समिती सदस्य हाजी शब्बीर खान मोहम्मद खान , माजी नगराध्यक्ष शशांक देशपांडे, माजी नगराध्यक्ष दिपक बेहडे भाजपा शहराध्यक्ष डॉ. निलेश गडे, माजी नगरसेवक सय्यद युनूस सय्यद युसुफ, शिवसेना शहराध्यक्ष जगदीश कवडीवाले , शिवसेना तालुका उपप्रमुख शरद कोळी , शिवसेना शहर उपप्रमुव संतोष धोबी ,पप्पू जोशी, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष कदिरखान , माजी नगरसेवक मनोहर सोनवणे, भगतसिंग पाटील ,शेख ताहेर शेख चांद, खरेदी विक्री संघा चेअरमन अमोल भिरुड प्रमोद नेमाडे , नितीन सोनार, करीम मन्यार ,हबीब मंजर, यांच्यासह शांतता समितीचे सदस्य व शहरातील प्रतिष्ठीत नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी पोलीस ठाण्याचे सपोनि विनोद कुमार गोसावी, पोलीस उप निरिक्षक विनोद खांडबहाले उपस्थित होते, बैठकीस उपस्थितांचे आभार सपोनि विनोदकुमार गोसावी यांनी मांनले.

पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण काळाची गरज – प्रेरणा देशभ्रतार जिल्हाधिकारी वर्धा

0

आधार फाउंडेशन द्वारा वृक्षारोपण मोहिमेच्या शुभारंभ

हिंगणघाट:- नईम मलक

 

दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल बिघडत आहे, त्यामुळे निसर्गाला वाचवण्यासाठी झाडे लावणे व ती जगवणे, पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण काळाची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी बस स्थानक येथे वृक्षारोपण करतांनी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले.
आधार फाउंडेशन हिंगणघाट च्या वतीने दरवर्षी वृक्षारोपण मोहिम राबविली जाते दि.०६ जुलै रोज बुधवार ला स्थानिक बस स्टॉप परिसरात भव्य स्वरूपात वृक्षारोपन मोहिमेच्या शुभारंभ संपन्न झाला वृक्षारोपण कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून
उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, तहसीलदार सतिश मसाळ, आगार प्रमुख सतीश नेवारे, आधार फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष अतुल वांदिले, कार्यकारी अध्यक्ष लक्ष्मीकांत धार्मिक, सचिव गजानन जुमडे,, पर्यावरण समितीचे प्रमुख सुरेश गुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी देशभ्रतार यांनी आधार फाउंडेशनच्या विविध उपक्रमाचे कौतुक करून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.सोबतच या कार्यक्रमासाठी पत्रकार संघाच्या वतीने सतिश वखरे,राजेश कोचर व सी.सी. टी. एफ. एम.असोशिएन चे सदस्य ,संतोष ठाकूर आदीची उपस्थिती होती प्रास्तविक सौ.माधुरी विहीरकर यांनी तर आभार पराग मुडे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ,डॉ.शरद मद्दलवार,डॉ. प्रा.शरद विहीरकर,राजेश कासवा, डॉ.संजय हिवरकर, चंद्रशेखर निमट प्रा.पोहाणे,प्रा.गिरीधर काचोळे,प्रा.डॉ.राजू निखाडे,गिरधर कोठेकर, अमोल बोरकर,सूनिल भूते,बच्चू कलोडे,राजू गंधारे, प्रवीण श्रीवास्तव,सुभाष शेंडे ,मनोहर ढगे,सुनिल डांगरे,जगदीश वांदीले,तुषार लांजेवार महिला समितीच्या मायाताई चाफले, विरश्री मुडे,अनिता गुंडे, ज्योती धार्मिक,रूपाली मिटकर,शुभांगी वासनिक,निता गजबे, आशा कोसुरकर,अनुराधा मोटवाणी,मंगला शेंडे,जयश्री काचोळे,सिमा तिवारी ज्योती कोहचाडे आदींनी परिश्रम घेतले.