Home Blog Page 291

रुग्णमित्र गजू कुबडे यांनी आमदार बच्चूभाऊ कडू यांचा जन्मदिवस बेवारस मनोरुग्णासोबत केला साजरा !

0

 

हिंगणघाट- नईम मलक

देखणे ते चेहरे
जे प्रांजळांचे आरसे !
गोरटे की सावळे
या मोल नाही फारसे !! या कविवर्य बा. भ.बोरकर यांच्या काव्य ओळी प्रमाणे जीवन जगणारे व तो आदर्श समाजा समोर ठेवणारे लोकनेते आमदार बच्चूभाऊ कडू यांचा जन्मदिवस येथील रुग्णमित्र गजू कुबडे यांनी दरवर्षी प्रमाणे
यंदाही बेवारस मनोरुग्णा सोबत साजरा करुन एक आगळा वेगळा पायंडा निर्माण केला आहे.

अनेक संतांनी सांगितलेले विचार प्रत्यक्षात आचरणात आणत त्या नुसार रंजल्या- गाजल्यांच्या जीवनात थोडे हास्य फुलविण्यासाठी शेतकरी नेते अपंगांचे कैवारी आमदार बच्चूभाऊ कडू यांचा वाढदिवसाचे निमित्त साधून येथील रुग्णमित्र गजू कुबडे या अवलियानेही बच्चूभाऊच्या जन्मदिनी स्वतःचे बॅनर पोष्टर न लावून कोणतीही जाहिरातबाजी न करता मनोरुग्णा सोबत संपूर्ण दिवस घालवून त्यांच्या असहाय जीवनात थोडे हास्य निर्माण करून संत तुकारामाच्या अभंगातील जे का रंजले गाजले,त्यासी म्हणे जो आपुले! ओळी सार्थ करण्याचा प्रयन्त केला.
जाम येथील चंद्रपूर रोड वरील मनोरुग्णासाठी प्रसिद्ध असलेले जाम येथील चावरा आश्रम येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे विदर्भ प्रमुख व वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख रुग्णमित्र- गजु कुबडे व सहकाऱ्यांनी ५४ मनोरुग्णा सोबत अनोख्या पद्धतीने साजरा केला.
संपूर्ण दिवस या ५० मनोरुग्णासोबत घालवून गजू कुबडे व त्यांच्या सहकारी यांनी एक वेगळाच आदर्श प्रस्थापित केला. यावेळी आश्रम येथील सर्व मनोरुग्णाना नवीन कपडे वाटप करण्यात आले.व या मनोरुग्णाना सन्मानाने ताट-वाटीने
पंगत करून जेवणाच्या कार्यक्रम करण्यात आले. यावेळी मनोरुणाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसून आली.
या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे राजेशभाऊ बोभाटे (उपजिल्हाप्रमुख )शहर प्रमुख अतुल जाधव,अजय खेडेकर (उपसरपंच जाम ग्रा.प.),राहुलभाऊ पाटील, माजी शहर प्रमुख अजय लढी,विष्णू घरत (माजी तालुका प्रमुख समुद्रपूर), सुरज कुबडे,अमितभाऊ गोजे, सतिषभाऊ गलांडे,अजयभाऊ ठाकरे,खोमलाल जगराह (माजी ग्रा.प सदस्य नंदोरी)रविभाऊ धोटे,अनंता वायसे दिपकभाऊ पावडे (शाखा प्रमुख सावली वाघ),राहुल चौधरी (शाखा प्रमुख गोविंदपूर),सौरभ धोबे,तुषार उरकांदे,रितेश गुडधे,प्रकाश मनने,अमोल वाघमारे,करण विटाळे,सागर रोशन बरबटकर,सुनील जगताप,प्रवीण बोरूटकर,जगदीश धुरने,नाना नागाठाणे व फादर वर्गीस इत्यादी उपस्थित होते

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण ग्रामीण रूग्णालय संग्रामपूरमध्ये करण्यात आले आहे

0

 

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश ,उर्फ बच्चू कडू ,पालकमंत्री तथा राज्यमंत्री अकोला यांचा ,वाढदिवस, निमित्त ग्रामीण रूग्णालय संग्रामपूर येथील रूग्णालयामध्ये प्रहार जनशक्ती च्या कार्यकर्त्यांनी निंबाचे व निलगिरीचे ,रोप टे,वेगवेगळ्या झाडांचे रोपटे लावण्यात आले आहेत या कार्यक्रमामध्ये ग्रामीण रूग्णालय संग्रामपूर येथील कर्मचारी मंडळींनि भाग घेतला आहे यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे संग्रामपुर तालुका ‘उपाध्यक्ष , तौसीफ जमदार व प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते पंकज पाटकर ,दीपक बोयाखे, ताबिश पटेल, राजू मुल्ला जि ,अक्षय अवचार, संदीप सोळंके ‘दिनेश इंगळे, प्रहार जनशक्ती ,चे सर्व कार्यकर्ते या वेळी तेथे उपस्थित होते व यांनी वृक्षारोपण चांगल्याप्रकारे या रुग्णालया मध्ये केले आहे

राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनाच्या राष्ट्रीय बैठा मधील पदाधिकारीची नियुक्ति। 1,संयोजकपदी बसवराज पाटील

0

 

2,गदाधर विद्रोही नवे संघटनमंत्री
3,हिंगणघाटचे प्रदीप नागपूरकर राष्ट्रीय सचिवपदी

हिंगणघाट : नईम मलक

गोविंदाचार्य यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनाचे राष्ट्रीय संयोजक पदी बसवराज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बंगलोर येथे नुकत्याच पार पडलेल्या आंदोलनाच्या दोन दिवसीय चिंतन बैठकीत गोविंदाचार्य यांनी ही घोषणा केली.
बंगलोर येथे पार पडलेल्या दोन दिवसीय चिंतन बैठकीत गोविंदाचार्य यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली झालेल्या विविध सत्रांमध्ये राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनाचे कार्य, घटना, आगामी कामाची दिशा, कामाचे‌ मुद्दे अशा विविध विषयांवर विस्तॄत चर्चा झाली. भारत व गरीबांसाठी अनुकूल अशा व्यवस्थेसाठी आवश्यक असलेले व्यवस्था परिवर्तन तसेच निसर्ग केंद्रीत विकासासंदर्भात या चिंतन बैठकीत विविध ठरावही पारीत करण्यात आले.
बसवराज पाटील हे यापूर्वी राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनाचे संघटनमंत्री राहिले आहेत. त्यांच्या जागी आता गदाधर विद्रोही राष्ट्रीय संघटनमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. गिरीराज गुप्त, माधवन हे सह संघटनमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. विनयचंद्र व महेन्द्र गर्ग यांची राष्ट्रीय सहसंयोजक असतील. हिंगणघाट येथील प्रदीप नागपूरकर यांची नवीन कार्यकारिणीत राष्ट्रीय सचिवपदी नियुक्त करण्यात आले आहे. गोवा येथील शैलेंद्र वेलणकर, अजय कुमार, चंद्रशेखर मिश्र हे अन्य सचिव असतील. राजाराम यादव, अरुण सत्यमूर्ती, नवरतन राजोरिया, विमलकुमार सिंह, आशीष गुप्ता, रवींद्र शर्मा हे नव्या कार्यकारिणीतील अन्य पदाधिकारी असतील.
विदर्भातून मुन्ना महाजन, भारती दोनावडे, हसीना राजू गोरडे, प्रा. राजू गोरडे, शरद शहारे आदी या बैठकीत सहभागी झालेत.

डोणगाव ग्रामपंचायत मध्ये संरपच मिळाला मात्र दुर्गंधी कायम.

0

 

दिपक देशमुख
मेहकर.

मेहकर तालुक्यातील डोणगाव हे मोठे शहर आहे आजुबाजुला पंधरा ते विस खेडे या शहराला जोडले आहे मात्र मुंबई नागपूर महामार्गावर रोड लगत घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहे ग्रामपंचायत कार्यालय मध्ये घंटा गाड्या आहेत मात्र शोभेचे माहेर घर आहे कि काय नुसत्या शासकीय म्हणी भिंतीवर लिहल्या आहे मात्र शासनाच्या अधिकारी आणि नागरिक यांना वाचण्यासाठी आहे अक्षरक्षा रोडव घाण साचलेली आहे नागरिक या रोडणे असंख्य गाड्या धावतात त्यांना खुप त्रास होतो ग्रामीण भागातील नागरिक ये जा करतात या घाणीने अतिशय दुर्गंधी असल्याने शाळेत विद्यार्थी येतात त्यांना किंवा सामान्य जनतेला या रोगराई पासुन धोका निर्माण होऊ शकतो पावसाळा सुरू झाल्याने खुप वास येतो तात्काळ रोड उपविभागीय अधिकारी मेहकर यांनी नोटीस जारी करुन डोणगाव ग्रामपंचायत कार्यालय सचिव.सरपंच यांना देऊन लवकरात लवकर रोडवरची टाकलेली घाण बाजुला करण्यात यावी अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिक करीत आहेत.

लसनपुर येथे स्नेहमीलन सोहळा मानव सेवा हिच खरी ईश्वर सेवा आहे-खा. तडस

0

 

हिंगणघाट नईम मलक

“धर्म हा कुठलाही असो मानवतार हा या धर्माचा गाभा असतो. अधात्म हे धर्माशी निगडित असून त्यातून सदविवेक, सदविचार, व समाजाची निर्मिती होत असते. सामाजिक जाणिवेतून माणुसकी चा धर्म शिकविणारे अधात्म हे एक सशक्त माध्यम आहे. समाज आणि मानव सेवा ही ईश्वरी सेवा या भावनेतुन आपल्या अगभुत कर्तुत्वाने समाजाला प्रेरक जाणीव करून देणारे आपले मोठेपण सिद्ध करते. असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी या प्रसंगी केले.
ते लसनपुर येथील हरी ओम गौ शाळा येथे आयोजित स्नेह मिलन सोहळ्यत बोलत होते.
यावेळी अड. सुधीर कोठारी, हरिओमगौशाला संचालक घनश्याम पुरोहित,ऑल इंडिया शास्त्री फोरम के राष्ट्रीय उपाध्यक्ष इम्रान राही, कृ.उ. बा.स. समुद्रपुर के संचालक, सरपंच एड. वर्षा गनवीर, नगर पंचायत अध्यक्ष योगिता, उपाध्यक्ष बाबाराव ठुसे, जयहिंद सेवाभावी संस्थेचे जिल्हाध्यक्ष राजू लभाने, निखील माकडे, चैतन्य कुमरे प्रमुख्याने उपस्थित होते.
या प्रसंगी खासदार रामदास तडस यांचा गौशाला आणि आई पेट्रोलियम द्वारे सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची प्रस्तावना विक्रम वानखेडे तर संचालन एड. इब्राहीम बख्श आज़ाद यांनी आणि आभार प्रदर्शन राम बोरकर ने केले.

यावल चोपडा मार्गावर वढोदे गावाजवळ मोटरसायकलवरून कोसळल्याने भिषण अपघात एकाचा मृत्यु

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

यावल चोपडा मार्गावरील वढोदे गावाजवळ मोटरसायकलचा अपघात होवुन एक जण गंभीर जख्मी झाल्याची घटना घडली असुन , गंभीर अवस्थेत जख्मी असलेल्या व्यक्तिस पुढील उपचारासाठी भुसावळ येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता ते मरण पावल्याचे वृत्त आहे . या संदर्भातीत वृत्त असे की आज दिनांक ४ जुलै रोजी सायंकाळी ६,३oते ७ वाजेच्या सुमारास अशोक पद्दमाकर नेवे ,वय ५४ वर्ष राहणार साकळी तालुका यावल हे यावल येथुन आपले व्यवसायीक काम आटोपुन आपल्या एमएच १९डी एक्स५४८२ या मोटरसायकलने साकळी गावी जात असतांना यावल चोपडा मार्गावरील वढोदे गावाजवळ अचानक त्यांच्या ताब्यातील मोटरसायकली वरून अशोक नेवे हे खाली कोसळल्याने झालेल्या अपघातात त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली असुन , नागरीकांच्या मदतीने अशोक नेवे यांना तात्काळ यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वेद्यकीय अधिक्षक डॉ बी बी बारेला त्यांच्या आरोग्य कर्मचारी यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले असता नेवे यांची प्रकृती ही अधिक गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी तात्काळ भुसावळ येथील एका खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले असता त्यांचा मृत्यु झाल्याचे वृत्त आहे . अशोक नेवे हे साकळी येथील देशदुतचे पत्रकार चंद्रकांत नेवे यांचे जेष्ठ बंधु होते .

यावल तहसील कार्यालयासमोर महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार परवानाधारक महासंघाचे आंदोलन.

0

 

यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे

2 ऑगस्टला दिल्ली येथे रामलीला मैदानावर आंदोलन.
यावल .

ऑल इंडिया फेयर प्राईज शॉप डीलर फेडरेशन व अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाच्या वतीने यावल तालुका सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानदारांतर्फे आज यावल तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
ऑल इंडीया फेअर प्राईज शॉप डिलर फेडरेशन नवी दिल्ली यांच्या वतीने दिल्ली येथे 8जुन 2022 रोजी व अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाच्या वतीने 31मे रोजी मुंबई येथे पदाधिकाऱ्याची एक बैठक संपन्न झाली.बैठकीमध्ये 22राज्यातील प्रतिनीधींनी दिल्लीत प्रतिनीधित्व
केले व मुंबई येथे संघटनेच्या 25 जिल्हाध्यक्षांनी प्रतिनिधीस्व केलेले आहे.देश पातळीवर वारंवार आंदोलन व मागण्यांची पुर्तता करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारकडे संघटनेचे
जनरल सेक्रेटरी विश्वभंर बसु यांनी केलेल्या पाठपुराव्या नुसार केंद्र सरकारने फक्त कमीशनमध्ये 20रू. विशेष दर्जा प्राप्त राज्यासाठी37 रू.कमीशनमध्ये वाढ केली.ही केलेली वाढ समाधानकारक नसुन सर्व राज्यातल्या प्रतिनिधींनी या केलेल्या वाढीला आपला विरोध दर्शविलेला आहे. देश पातळीवर अन्न सुरक्षा कायद्या अंतर्गत कोव्हिड-19 अतंर्गत कोरोना भीषण महामारीच्या काळात देश पातळीवरील स्वस्त धान्य दुकानदारांनी आपल्या जिवाची पर्वा न करता 80 करोड जनतेला
सरकारने कोणतेही साधन उपलब्ध करून दिलेले नसतानाही धान्याचे अविरीत वाटप केले. त्यामुळे महामारीच्या काळात कोणीही भुकबळी झाला नाही.याची दखल सरकारने न घेता परवाना धारकांना कोरोना योध्दा घोषित न करता तसेच कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या परवानाधारकांच्या परिवाराला कोणताही मोबदला दिला नाही, ही खेदाची बाब आहे.भारत सरकारच्या वित्त मंत्रायलाव्दारे गठीत केलेल्या विश्व कार्यक्रम त्यांच्या रिपोर्टवर 440 /- रू. कमिशन प्रति क्विंटल देण्यात यावे अशी शिफारस करण्यात आलेली आहे.यावर भारत सरकार व्दारा टोलवाटोलवी करण्यात येत आहे. भारत सरकारच्या वतीने हॅण्डलींग लॉस सर्व राज्यामध्ये लागु करण्यासंदर्भात केंद्र सरकारने राज्य सरकारला पत्र दिल्यावरही याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.या सर्व बाबी लक्षात घेता 8जुन 2022रोजी दिल्ली येथे झालेल्या बैठकीमध्ये देश पातळीवर आंदोलन करण्याचा
निर्णय घेण्यात आला असुन यास राष्ट्रीय कार्यकारणीने व सर्व राज्याच्या प्रतिनिधींनी सहमती
दर्शविली आहे.आंदोलन दरम्यान खालील प्रमुख मागण्या आहेत. राष्ट्रीय खाद्य सुरक्षा योजने अंतर्गत सर्व परवानाधारकांना वर्ल्ड फुड प्रोग्राम अंतर्गत 440रू. प्रति क्विंटल कमीशन देण्यात यावे किंवा दरमहा 50,000/- रु. निश्चित मानधन घोषित करावे.
फक्त गहु,तांदुळ अंत्योदय कार्डधारकांना साखर या खाद्य पदार्थावर 1 किलो प्रति क्विंटल
हॅण्डलींग लॉस (तुट) देण्यावर सर्व राज्यांनी तात्काळ निर्णय घेण्याबाबत कार्यवाही करण्यात
यावी.सर्व राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार गहु,तांदुळ व्यतिरीक्त खाद्यतेल व दाळी दरमहा देण्यात याव्यात.एल.पी.जी.गॅसच्या संदर्भात सर्व जिल्हाधिकारी यांनी आपल्या जिल्हयात कंपनीच्या
वितरकांकडून सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना त्यांच्या दुकाना अंर्तगत रेशन कार्डवर असलेल्या एल.पी.जी. गॅस सिलेंडरची विक्री नोंदणी करण्याची परवानगी देऊन त्याचा
निश्चित कमीशन ठरविण्यात यावे.
तांदुळ,गव्हाच्या गोण्या भरतांना ज्युटच्या बारदानमध्ये भरून देण्याबाबत व प्लास्टीकच्या
गोण्या बंद करण्याबाबत केंद्र सरकारने आदेश काढुन भारतीय खाद्य निगमला निर्देशीत
करावे.कोरोना महामारीमुळे मृत्युमुखी पडलेल्या परवानाधारकांच्या कुटुंबाला ठराविक स्वरूपात मदत देश पातळीवर घोषित करून त्यांना कोरोना योध्दा म्हणुन घोषित करण्यात यावे.
केंद्र सरकारने वाढविलेले 20 रू. व 37 रू.कमीशनची रक्कम सर्व राज्य सरकारने तात्काळ अंमलात आणावी. पश्चिम बंगालच्या अन्न नागरी पुरवठा विभागाकडून सर्वासाठी अन्न या योजने अंतर्गत सर्व
कार्डधारकांना मोफत धान्य देण्याची योजना आखण्यात यावी.
पुर्ण देशभरात ग्रामीण क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानदारांना डायरेक्ट प्रोक्रुमेंट एजंट म्हणजेच
सरकार व्दार,गहु,तांदुळ,भरड धान्य खरेदी करण्याची परवानगी देण्यात यावी.थकीत कमीशन तात्काळ मिळावे.सरकारी धान्य खरेदी करीता घेतलेल्या बारदानचे थकीत पेंमंट तात्काळ मिळावे.
अनियमीत होणारा धान्य पुरवठा दरमहा नियमीत करण्यात यावा.
वरील सर्व मागण्यांबाबत देश पातळीवरील संघटनेच्या कार्यकारणीने एकमुखाने मान्यता दिलेली असुन यानंतर देश पातळीवर आंदोलनाची रूपरेषा खालीलप्रमाणे ठरविण्यात आलेली आहे.
तालुका,जिल्हा,राज्य व देश पातळीवर सर्व परवानाधारकांनी या आंदोलनास आपली सहमती दर्शवुन एक दिवसीय धरणे आंदोलन करून आपणास निवेदन सादर करण्यात येत आहे. आंदोलनाचा कार्यक्रम 4 जुलै 2022 दि.11जुलै 2022 :
दि.18जुलै 2022म.तहसिलदार कार्यालय, यावल येथे धरणे आंदोलन.जिल्हाधिकारी कार्यालय,जळगांव येथे धरणे आंदोलन.राज्यातील राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी म्हणजेच मुंबई येथे आझाद मैदानावर,
एक दिवसीय धरणे आंदोलन व मोर्चाव्दारे राज्य सरकारला निवेदन सादर करणे. दि.2ऑगष्ट 2022 दिल्ली येथे रामलिला मैदानावर देशभरातील सर्व परवानाधारक आपल्या कुटुंब
व दुकानातील कर्मचाऱ्यांसह लाखोंच्या संख्येत एकत्रित येऊन संघटनेच्या राष्ट्रीय नेत्यांच्या नेतृत्वाखाली संसदेवर घेराव कार्यक्रम करण्यात येईल.
सदर निवेदनाची प्रत आपण राज्य सरकारकडे योग्य त्या माहितीसह पाठविण्यात यावी व सदर
आंदोलनात आपण उपस्थित राहुन पाठिंबा द्यावा व आमच्या न्याय मागण्यांसाठी राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा असे यावल तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात यावल तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटना तालुका अध्यक्ष सुनिल बाळकृष्ण नेवे, तालुका उपाध्यक्ष शेख अब्दुल्ला शेख रसूल, सचिव दिलीप प्रल्हाद मोरे अजय कुचेकर नितिन माहरकर . शेख तनवीर मुशताक खान . दिलीप नेवे . आशिक खान अशोक नेवे .आमद तडवी . नामदेव . कपील खान . यांनी नमूद केले आहे.

रोटरी क्लबचे न्यायालय परीसरात वृक्षारोपन

0

——————————————-
हिंगणघाट:-नईम मलक स्थानिक रोटरी क्लबचे वतिने हिगंणघाट न्यायालय परीसरात जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश, व्हि.बी.काकाटकर,आर.आर. मेंढे,सत्र न्यायाधीश जे.व्ही घुले, व्ही.एच. देशमुख, एन.पी.देशपांडे, डी.आर बोर्डे,बि.जी.पवार, यांचे हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.
न्यायालय परीसरात हिरवळ तयार करण्याच्या उद्देशाने परीसराच्या चाैहुबाजुने वृक्षारोपन करण्यात आले.पक्षाना उन्हाळ्या फळे खाता यावी या उद्देशाने वनफळाची वृक्ष लागवड करण्यात आली.या प्रसंगी दिगांबर खांडरे यांनी लावलेल्या वेगवेगळ्या वृक्षाची माहीती दिली.तसेच क्लबचे चार्टर प्रेसीडेंट डाॅ.अशोक मुखी,तसेच सचिव शाकिरखान पठाण यांनी वृक्षांची निगा राखुन निसर्गाचा समतोल राखावा असे आवाहन केले. आभार प्रदर्शन डाँ.सतिष डांगरे यांनी केले.कार्यक्रमाल प्रा.अशोक बोंगिरवार, प्रा.जितेंद्र केदार, मुरली लाहोटी, मुकुंद मुधंडा, केदार जोगलेकर, अॅड प्रणय डागा, पितांबर चंदानी, एडवोकेट रवी एडवोकेट. मधलवार एडवोकेट देवगिरकर, एडवोकेट अर्शी उपस्थित होते

लॉटरी लागल्याचे आमिष दाखवुन एका महीलेची ३ लाख८oहजार रूपयांची ऑनलाईन फसवणुक पोलीसात गुन्हा दाखल

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

लॉटरीचे आमिष दाखवत किनगाव येथील महिलेची ३ लाख ८० हजारात फसवणूक; यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

खासगी नोकरी करणाऱ्या किनगाव येथील ३८ वर्षीय महिलेला अज्ञात मोबाईल धारकाने लॉटरीचे आमिष दाखवत तीन दिवसात ३ लाख ८० हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील किनगाव येथील ३८ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. २९ जून रोजी सकाळी १० वाजता त्यांना त्यांच्या मोबाईलव अनोळखी व्यक्तीचा व्हॉटसॲपवर कॉल आला. त्याने सांगितले की आपल्याला २५ लाख रूपयांची लॉटरी लागली आहे. तुमचा खाते क्रमांक आणि फोटो पाठवा. तुमच्या खात्यात रक्कम पाठवायची आहे. त्यावर महिलेने आपल्याला पैसे नको आहेत असे सांगितले व फोन कट केला. दरम्यान, पुन्हा त्यांना फोन आला महिलेशी गोड बोलून विश्वास संपादन केला. त्यानंतर महिलेने त्यांच्या पतीचे बँकेचे डीटेल्स दिले. त्यानंतर बँक मॅनेजरला १ लाखसाठी १ हजार रूपये असे २५ लाखासाठी २५ हजार रूपये फोन-पेवर पाठवा. त्याने दिलेल्या मोबाईलनंबरच्या फोन-पे वर महिलेने सुरूवातीला २५ हजार रूपये पाठविले. त्यानंतर वारंवार काहीना काही कारण सांगून एकुण ३ लाख ८० हजार रूपये ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले. पैसे पाठवून देखील परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात मोबाईलधारकाविरोधात यावल पोलीस ठाण्यात शनिवार २ जुलै रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप भागवत करीत आहे.

हिंगणघाट शहरात गाय चोरी करणारे आरोपींना अटक

0
Illustration of a Farmer with ox

 

हिंगणघाट :- दि. 02 जुलै रोजी पोस्टे हिंगणघाट येथे फिर्यादिने रिपोर्ट दिली कि, दि. 25/06/2022 रोजी पासुन त्यांची मालकिची एक कोशा रंगाची गाय कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरून नेली आहे. हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण प्रथकाने हिंगणघाट शहर व लगतचे परिसरात सतत माहीती काढुन अनोळखी आरोपीतांचा शोध घेतला असता, सदर गुन्हयातील आरोपी नामे 1) अनिल बाळकृष्ण चटप वय 52 वर्षे 2) रामा संभाजी तराळे वय 47 वर्षे दोन्ही रा. माता मंदीर वार्ड, हिंगणघाट यांना ताब्यात घेवुन त्यांनी सखोल विचारपुस केली असता, त्यांनी नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली असुन, सदरची चोरी केलेली गाय हि यवतमाळ येथे रविवार बाजारात शेतकऱ्याला पाळण्या करीता विकली असल्याचे सांगितल्याने यवतमाळ येथुन फिर्यादीची चोरीस गेलेली गाय हि जप्त करून पोस्टे हिंगणघाट येथे सुरक्षीत पोहचवण्यात आली. आरोपीतांना गुन्हयात वापरलेले वाहन सुद्धा जप्त करण्यात आले असुन सदर गुन्हयात एकुण 3,20,000 रू. चा माल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी मा. श्री. प्रशांत होळकर, पोलीस अधीक्षक, मा. श्री. यशवंत सोळंके, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, मा. श्री. पियुश जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट, पो.नि. श्री. कैलास पुंडकर, पोलीस स्टेशन, हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात डि. बी. पथकाचे पो. हवा. शेखर डोंगरे, नापोशि. निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, सचिन भारशंकर यांनी केली आहे. तरी सदरची बातमी प्रसारीत होणेस विनंती आहे.
सूर्या मराठी न्यूज सचिन वाघे वर्धा