Home Blog Page 292

वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ द्वारा नवीन कानून लागू करण्याच्या विरोधात धरणे प्रदर्शन

0

 

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघटना द्वारा महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये तसेच वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकाच वेळेस श्रम कानून, ठेकेदारी प्रथा, कर्मचारी बोनस, नवीन श्रम कानून मध्ये 8 घंट्याचा बदल्यात 12 घंटे काम आणि ओव्हर टाईम करण्यास परवानगी (बिन पगारी), महिलांना रात्रीला काम करण्याची अनुमती, फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट नुसार नियमित नोकरी समाप्त व न्यायालयाचे दरवाजे बंद, सुरक्षा आणि बोनसची मांग करता येणार नाही इत्यादी कानून केंद्र सरकारने १ जुलैपासून लागू केलेले आहे, त्या विरोधात राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघटने द्वारा महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात तसेच वर्धा जिल्ह्यात या संघटनेचे जिल्हाध्यक्ष शुद्धोधन धनवीज यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यामध्ये बामसेफचे जिल्हाध्यक्ष संजय कुंभारे, कार्याध्यक्ष बंटीभाऊ अंबादे, मनोज लोवे, विठ्ठल दांडगे, लक्ष्मीकांत जवादे, सुनील मसाने, चंद्रकांत शिंगणापुरे, नानाजी कोल्हे, सुशीला जिंदे, श्रेया राऊत, पल्लवी चौधरी, प्रांजल लोहकरे, नंदकिशोर पाढेन, प्रतीक गायकवाड, शितम मंद्रेले, डॉ.रत्तू निमजे, संजय बावणे, हर्षपाल मेंढे, प्रफुल कांबळे, संजय कांबळे, धर्मपाल आगलावे,राहुल वाहने, नागसेन पाटणकर, दामोदर म्हात्रे, राहुल बदडे, मनसज्जन मोटघरे, चंद्रशेखर वासनिक,सचिन फुलके, दीपक मेंढे, यश निमजे, राहुल बर्डे, निलेश वाळके, बंडू वानखेडे, अशोक बुटले, हर्षवर्धन मेंढे, अरुण वाघमारे शुद्धोधन अलोणे व राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष गेमदेव मस्के इत्यादींनी आंदोलनास साथ- सहयोग केला.,, नईम मलक हिंगणघाट

यावल पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी पोलीस निरिक्षक दिलीप भागवत रुजू कार्यभार सांभाळले

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी म्हणून यावल पोलीस ठाण्यातील रिक्त पदावर पोलीस निरीक्षक दिलीप भागवत हे रुजु झाले असुन त्यांनी शुक्रवार पासून कार्यभार हाती घेतला आहे . यावल पोलीस ठाण्यात मागील तिन महीन्यांपासुन कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस अधीक्षक आशित कांबळे (आयपीएस) यांच्या प्रशिक्षणाचा कार्यकाल संपल्याने आशित कांबळे यांनी प्रभारी अधिकारी पदाचा पदभार सोडला असुन त्यांच्या रिक्त झालेल्या पोलीस निरिक्षक पदावर जळगाव येथील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी यावल पोलीस स्टेशनचा कार्यभार आज हे आज पासुन घेतले आहे . पोलीस निरिक्षक दिलीप भागवत यांनी पदभार स्विकारल्यावर यावल पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले , पोलीस उपनिरिक्षक सुदाम काकडे यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी यांनी त्यांचे स्वागत केले.

अनधिकृत ७७ झोपड्या हटवण्यात आल्या असून वन जमीन ताब्यात घेण्यात आली आहे.

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील यावल अभयारण्यातील जामण्या वन क्षेत्रातील लंगडा आंबा परिमंडळ आणि करंजपाणी मधील अनधिकृत ७७ झोपड्या हटवण्यात आल्या असून वन जमीन ताब्यात घेण्यात आली आहे.

येथील अभयारण्य सहाय्यक वनसंरक्षक अश्विनी खोपडे यांच्या आदेशानुसार वनपरिक्षेत्र अधिकार पाल अमोल चव्हाण यांच्या नेतृत्वात यावल अभयारण्यातील जामण्या वन क्षेत्रातील लंगडा आंबा परिमंडळ आणि करंजपाणी मधील अनधिकृत ७७ झोपड्या हटवण्यात आल्या आहेत. या कारवाईतून १६६ अनधिकृत अधिक्रमणधारकांचे २६४.३६ हेक्टर वन जमीनीवरील अतिक्रमण निष्काशन करून नियमानुसार वन जमीन ताब्यात घेण्यात आली.

या कारवाईप्रसंगी पोलीस महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचं सहकार्य लाभलं. जळगाव पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे, यावल पोलीस निरीक्षक आशित कांबळे यांनी मनुष्यबळ आणि संरक्षण उपलब्ध करून दिलं. या कारवाईच्या वेळी यावल अभयारण्य यावल वन विभागमधील वनपाल वनरक्षक तसेच राज्य राखीव दलाचे जवान उपस्थित होते.

या वन क्षेत्रात खोल सलग समतोल चर घेऊन पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेण्यात आली; असल्याची माहिती यावल सहाय्यक वनसंरक्षक अश्विनी खोपडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

चिचगड जवळ झालेला मोटरसायकलअपघातात एक मृत

0

 

चिचगड-१—चिचगड वरून पिडंकेपारला गावाकडे जात असलेल्या हिरो होंडा साईन MH.40-S.5631मोटारयाकलस्वारापैकी सिरपुर फाट्याजवळ झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली.

मृतकाचे नाव ईश्वर वाघमारे वय२२राहणार पिडंकेपार असे आहे. गाडी चालवणारा संदीप बागडेहरिया हा गाडीवर चौबल सीट जाताना गाडीचा संतुलन बिघडल्याने. रस्त्याच्या कडेला असलेल्या पळसाच्या झाडाला मोटारसायकल आढळली हा अपघात इतका जबरदस्त होता की त्यात एक जागेवर मरण पावला. संदीप बागडेहरिया याला डोक्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे.आणि विशेष म्हणजे जो सर्वात शेवटी बसला होता त्याला कुठलाच मार लागलेला नाही. या अपघाताची नोंद पोलीस स्टेशन चिचगडला झाली असून पोलीस हवालदार कमलेश शहारे पुढील तपास करीत आहेत.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चान्नी येथे शेतकऱ्यांना पीक कर्ज कसे घ्यावे याबाबत देण्यात आली माहिती

0

 

योगेश नागोलकार

राहेर/डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय, शिर्ला (अंधारे) येथील विद्यार्थिनी आदित्य नप्ते व कलेश्वर नप्ते यानी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ,अकोला शाखा-चान्नी येथे शेतकऱ्यासोबत जाऊन पीक कर्ज बाबत पीक कर्ज कसे घ्यावे यासाठी मदत केली. शेतकऱ्याला पीक पेरणीपासून काढणीपर्यंत भरपूर खर्च लागतो. तो भागवण्यासाठी सर्वच शेतकऱ्यांकडे पैसे नसतात. त्यांना पीककर्जाची साथ असते. मोठा आर्थिक आधार असतो. याच साठी पीक कर्जा साठी माहिती घेत असताना बँक व्यवस्थापक व तेथील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. तसेच पीक कर्ज ची माहिती घेण्यासाठी मळसुर गावातील शेतकरी उपस्थित होते. श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. पी. खरडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. एस. टी. कव्हर, कार्यक्रम अधिकारी प्रा. पी. ए. देशमुख, विषयतज्ञ प्रा. के. एम. वानखडे पीककर्जाची माहिती घेण्यासाठी यांचे मार्गदर्शन लाभले.

शेतकऱ्याने तणनाशक फवारल्याने सहा एकरातील सोयाबीन करपले

0

 

उमरा शिवारातील प्रकार; कंपनीने नुकसान भरपाई देण्याची मागणी

सोयाबीनवर केलेला खर्च गेला वाया : शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

योगेश नागोलकार
प्रतिनिधी/राहेर

पिकांतील तणावर नियंत्रण मिळविण्यासाठी फवारणी केलेल्या तणनाशक औषधांमुळे पिक करपल्याची घटना पातुर तालुक्यातील उमरा येथील शेतकऱ्याला बसली असून या शेतकºयाने तणनाशक फवारल्यामुळे त्यांच्या सहा एकरावरील सोयाबीन व तुरीचे पीक करपले आहे.तालुक्यातील उमरा येथील शेतकरी पंडीत पांडुरंग इंगळे, यांनी गावातीलच कृषी केंद्रातून २७ जून रोजी weedblock व axisuper कंपनीच्या नामक तणनाशक औषध विकत घेतले होते. ही औषधी त्यांनी २७ जून रोजी आपल्या पाच एकरामध्ये योग्य प्रमाण वापरून फवारली. परंतू या औषधीचा विपरीत परीणाम झाल्याने शेतकºयाचे ६ एकरातील सोयाबीन व तूर पीक करपले आहे. या शेतातील पिकाचे पाने व मुळ काळे पडत असून पिकाने माना टाकायला सुरूवात केल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, याबाबत शेतकरी पंडीत इंगळे यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. सततच्या दुष्काळामुळे शेतकरी आधिच त्रस्त आहे. त्यात सदरचे औषध फवारल्यामुळे मोठे नुकसान झाले असल्याने शेताचे स्थळ निरीक्षण व पंचनामा करण्यात यावा व तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.नुकतेच पेरलेले सोयाबीन, तूर पीक जळाल्याने शेतकºयासमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. दरम्यान, कृषी सहाय्यक शरद पवार यांनी २९ जून रोजी या पिकाची पाहणी केली व पंचनामा केला.यावेळी कृषी सहाय्यक यांनी वरिष्ठांना अहवाल सादर केला जाणार असल्याचे शेतकऱ्यांंना सांगीतले लवकरच जिल्हा कृषी अधिकारी,व शास्त्रज्ञ येऊन सविस्तर पंचनामा करून पुढील कारवाई करतील. यावेळी सरपंच केशव इंगळे , रेणुका कृषी केंद्राचे मालक गजानन अल्हाट ,पंकज पवार ,राहुल पवार, शुभम इंगळे , यांच्यासह शेतकरी उपस्थीत होते.

हिंगणघाट वडनेर – येरणगाव येथे मोठ्या भावाने लहान भावाच्या घरातील साहित्याची तोडफोड करुन केले मोठ्या प्रमाणात नुकसान

0

 

नईम मलक

हिंगणघाट तालुक्यातील येरणगाव येथे भावाच्या घरी कोणी नसताना आज सोमवारी मोठा भाऊ त्याची पत्नी व जावयासह अन्य एका इसमाने लहान घरातील साहित्याची तोडफोड करुन मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याची घटना घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार येरणगाव मोठ्या भावाने ३ दिवसा आधीच त्यांच्या लहान भावाच्या कपाशीच्या शेतातील शिविगाळ कर त्यांच्या पत्नीस सब्बल मारहाण केली या संबंधी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. लहान भाऊ पुरुषोन्नाम नगराळे हे व त्याची पत्नी बाहेर गेली होती.यावेळी यत्यांची मुलगी होती. मोठा भाऊ त्याची पत्नी त्यांचा जावई व अन्य १ व्यक्तीने कमांडो आहे असे म्हणत घरात प्रवेश करुन तोडफोड करुन मुलीला शिवीगाळ करत मारण्यास प्रयत्न केला यावेळी घरात असलेले गहु, कपडे कपाट इलेक्ट्रीकल वस्तू फेरकून दिल्या पावसामुळे खुप मोठे नुकसान झाले.त्यांची मुलगी पोलिस स्टेशनमध्ये गेल्यावर घरी कुणी नव्हते. आई आणी भाऊजा यवतमाळ वरुन आले घरी पोहचले तेव्हा घरी सगळे सामान अस्ताव्यस्त करून दिसले ते यांचे कपाटातले २० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने सुध्दा दिसत नव्हते या संबंधी वडनेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.,,नईम मलक हिंगणघाट

शहरातील पत्रकार प्रमोद जुमडे यांचा वाढदिवस वृक्षारोपण,व वृद्ध मायबाप सोबत केक कापून साजरा

0

 

हिंगणघाट शहरातील पत्रकार प्रमोद जुमडे यांचे वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.यावेळी आश्रय वृध्दाश्रम येथे वृद्ध मायबाप ज्यांचे कोणी नाही त्यांच्या सोबत केक कापून जन्मदिवसाचा हा आगळा वेगळा आणि अदभूत कार्यक्रम हिंगणघाट येथे पार पडला.या प्रसंगी माझे उद्योग मंत्री श्री अशोक भाऊ शिंदे, माजी नगरसेविका रवीलाताई आखाडे, सुरेश गायकवाड, विशाल जयराज, रोहित बसंतानी, संदीप वेलके, अश्विन तावडे, मयूर पाटील, राहुल दारूनकर, दिनेश वर्मा, सुखदेव कुबडे, अंकुश ससाने, गुणवंत वानखेडे दिलीप हिवंज, गोलू राऊत, कुणाल थूल, अनुराग जुमडे, व आदी मित्र ह्या मंडळी या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होते. गेल्या वीस वर्षापासून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर भूमिका घेऊन समाजामध्ये विविध क्षेत्रात सामाजिक कामात नेहमी वावरणारे. त्यानंतर पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी आता अथक प्रयत्न करीत सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, यामध्ये सतत प्रत्येक क्षेत्रांमधील आगळ्यावेगळ्या बातम्या छापून समाजाला एक नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला.महसूल विभागाचा कोट्यवधीचा फायदा करून देण्यात त्याची महत्वाची भूमिका नेहमीच राहिली आहे त्या माध्यमातून त्यांनी त्यांची एक वेगळी छबी पत्रकार क्षेत्रात स्थापन केली. आता त्यांनी स्वतःचा मालकीचा साप्ताहिक सत्यअमृत असा पेपर ही चालू केला आहे.

उद्धव साहेब या संजय राऊतांना आवरा पवारांचा राऊतांच्या हाताने शिवसेना संम्पवण्याचा डाव

0

 

उद्धवसाहेब या संजय राऊतांना आवरा

 

चिखली – दि.२८ जून रोजी रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी प्रसारमाध्यमांसमोर वाचाळविर संजय राऊत यांचा जाहीर निषेध केला आहे.
संजय राऊत यांनी सामन्याच्या अग्रलेखातुन शेतकरी नेते माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या विरोधात अपमानास्पद शब्द वापरल्या बद्दल रयत क्रांती पक्षाच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला आहे, गेल्या काही दिवसांपासून वाचाळविर संजय राऊत हे मनात येईल ती बडबड करत असतात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या साध्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेत पवारांच्या आशीर्वादाने राऊतांच्या तोंडाने शिवसेना सँम्पवण्याचा डाव सुरू असल्याचे रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत पाटील यांनी म्हटले असून राऊतांना कंटाळून शिवसेनेचे पन्नासच्या वर बाळासाहेबांचे ओरिजन शिवसैनिक आमदार महाराष्ट्राचे खरे वाघ संघटना सोडण्याच्या तयारीत असून,आजवरच्या राजकारणातील सर्वात खालची पातळी गाठल्या जात असल्याचे संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून वारंवार दिसत असते,सुरक्षेच्या मुद्द्यावरून त्यांनी कंगना राणावत असेल ,किरीट सोमय्या असतील त्यांनतर शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आलेली आहे व रौउतांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे गोवाहटी येथे गेलेल्या आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाल्याने त्यांना देखील केंद्रा कडून वाय व झेड दर्जाची सुरक्षा देण्यात येणार असल्याने हे महाशय प्रसारमाध्यमांद्वारे वाट्टेल ते बरळत असून त्यांनी त्यांच्याच आमदारांसह शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांना देखील तमाशातील नाचे असे सँम्बोधून महाराष्ट्रातील लोककलेचा देखील अपमान त्यांनी केलेला आहे म्हणून आदरणीय उद्धव साहेब या राऊतांना आवरा अन्यथा महाराष्ट्रभर तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रयत क्रांती पक्षाचे प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी दिला आहे,

भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पार्टी हिंगणघाट विधानसभा तर्फे अग्निपथ योजना रद्द करण्यात यावी यासाठी देण्यात आले निवेदन…

0

 

माननीय उपविभागीय अधिकारी हिंगणघाट. यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपतीजी भारत सरकार दिल्ली, यांना भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पार्टी हिंगणघाट व समुद्रपूर तालुका, जिल्हा वर्धा यांच्यातर्फे आज दि. 27/6/22 ला निवेदन देण्यात आले. देशात कार्यरत असलेल्या भाजपा प्रणीत केंद्र सरकारने अलीकडील काळात देशाच्या अतिमहत्त्वाच्या अशा संरक्षण क्षेत्रात अग्नीपथ नावाने योजना आणली आहे. ज्यामुळे देशाच्या सर्वांगीण तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने ही योजना योग्य नाही तसेच देशातील तरुणांच्या भविष्यासाठी सुद्धा अयोग्य आहे. असे काँग्रेसचे नागरिकांच्या वतीने मत आहे. भारताची एकूणच समाज रचना लोकशाही ह्या गोष्टी जगातील इतर देशांपेक्षा वेगळ्या आहे त्यामुळे इजराइल किंवा इतर देशातील नीती या ठिकाणी संयुक्तिक होत नाही. हाच आमचा इतिहास, वर्तमान व भविष्य आहे. ही योजना राबवित असताना ना संसदेत चर्चा,ना जनतेशी चर्चा,ना सेनेशी चर्चा अशा पद्धतीने लोकशाही संस्था वर हुकूमशाही प्रमाणे भूमिका थोपवणे याचा आम्ही सर्वार्थाने निषेध करतो. व तात्काळ हे योजना रद्द करण्यात यावी. व देशातील तरुणांना, सेनेला व जनतेला दिलासा द्यावा अन्यथा याचे गंभीर परिणाम देशासमोर येईल. असा इशारा काँग्रेस पार्टी हिंगणघाट तर्फे निवेदनाद्वारे देण्यात आला.या निवेदन देताना माजी उद्योगमंत्री अशोक शिंदे, काँग्रेस शहराध्यक्ष पंढरीभाऊ कापसे, अमित चाफले, नकुल भाईमारे, सुरेश गायकवाड, अखिल धाबरडे, प्रशांत राऊत, नरेंद्र चाफले, विनोद हिवंज, सुधा शिंदे, करूना वाडकर, प्रमिला हीवंज, लता गलांडे, अनिता गौतम, प्रमिला झिंगरे, ई.मोठ्या संख्येने उपस्थित होते.–हिंगणघाट नईम मलक