Home Blog Page 293

व्यसन पासुन युवा पीढ़ी ला वाचवीने आज ची गरज।”- न्यायाधीश पवार

0

 

हिंगणघाट-“व्यसन केवळ व्यक्ति ला नव्हे, तर सम्पूर्ण समाजा ला लागलेला रोग आहे. व्यसनाधीन व्यक्ति समाज आणि देशा साठी घातक है। आज च्या पीढ़ी ने संतों आणि महापुरुषों च्या आदर्श वर चालण्याची गरज आहे. आणि स्वतःला व्यासना पासून दूर ठेवण्याची आवश्यकता आहे. असे प्रतिपादन 2 रे सह दीवानी न्यायाधीश बी. जी. पवार ने व्यक्त केले।
ते स्थानीय भारत शाळेत मध्ये तालुका विधि सेवा समिति द्वारा व्यसन मुक्ति वर आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष पदा वरून बोलत होते.
या कार्यक्रम चे उद्घाटन 4 थे सह दीवानी न्यायाधीश दीपक बोर्डे ने केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता व अतिथि म्हणून प्रोग्रेसिव एजुकेशन संस्था सचिव रमेश धारकर, एड. अभिलाषा चंद्रेश गुप्ता आणि एड. अश्लेषा येरलेकर उपस्थित होते. सर्वांनी यावेळी विद्यार्थि ना योग्य मार्गदर्शन केले.
कार्यक्रमा ची प्रस्तावना आणि संचालन एड. इब्राहिम बख्श ने आपल्या विशिष्ठ शैलित केले. आणि मुख्याध्यापक चव्हाण ने आभार व्यक्त केले.
कार्यक्रमात शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्या मधे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दीवानी कोर्ट चे अधीक्षक कृष्णा दूधबले, दामिनी पंडित ने विशेष प्रयत्न केले—-.हिंगणघाट नईम मलक

इडा पिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे.महाविकास आघाडीचं लुटारूंचं राज्य जाऊ दे…!!

0

 

 

याकरिता आज रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. सदाभाऊ खोत यांच्या आदेशानुसार रयत क्रांती संघटना संग्रामपूर तालुका बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने व पक्षाच्या वतीने बैल बळीराजाला साकड घालण्यात आले . इडा पिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे…!
महाविकास आघाडीचं लुटारूंचं राज्य जाऊ आशा घोषणा देण्यात आल्या
या वेळी रयत क्रांती संघटनेचे जिल्हासहप्रमुख विठ्ठल पाटील जिल्हाध्यक्ष नाना पाटील तालुकाध्यक्ष गणेश मानखैर जळगाव तालुकाध्यक्ष प्रवीण गिरी रशीत शेख राजुभाऊ असलम शेख अजय खीरोळकार महादेवराव मानखैर ईतर शेतकरी सहभागी होते..
आज आमदार सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या वतीने “इडा पिडा टळु दे बळीराजाचं राज्य येऊ दे” महाविकास आघाडीचं लुटारुंचं राज्य जाऊ दे याकरिता राज्यभर आज बळीराजाला साकडं घालण्यात आलं.

सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण हे शेतकऱ्यांवर आणि कष्टकरी जनतेवर आजवर अन्याय करणाऱ्या महाविकास आघाडीला चोख उत्तर आहे.

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं कधीच पूर्ण केली गेली नाहीत किंवा शेतकरी हितासाठी कोणतीही ठोस पावलं उचलली गेली नाहीत. आणि फक्त जनतेची लुटमार सध्याच्या आघाडी सरकारने केली. उपेक्षित वर्गातील लोकांसाठी रयत क्रांती संघटना नेहमीच आपला बुलंद आवाज सरकार समोर मांडत आलेली आहे.

म्हणूनच या सरकारला कंटाळून महाराष्ट्रातील शेतकरी आणि कष्टकरी वर्ग लुटारूंचं हे सरकार जाऊन कधी एकदा बळीराजाचं राज्य येईल आणि त्या राज्यात शेतकरी कष्टकरी सुखी असतील अशी इच्छा व्यक्त करत आहेत.

याच पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी हितासाठी लढणाऱ्या रयत क्रांती संघटना ह्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून चौकाचौकात तर ह्या सरकारच्या भकासकामांना कंटाळलेल्या शेतकऱ्यांकडून बांधा बांधावर “इडा पिडा टळु दे बळीचं राज्य येऊ दे” महाविकास आघाडी सरकारचं लुटारूंचं राज्य जाऊ दे याकरता बळीराजाला साकडं घालण्यात आलं.

रोटरी क्लबच्या शिवणकला प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन

0

——————————————-
हिंगणघाट:- नईम मलक

स्थानिक रोटरी क्लब हिगंणघाट आणी सिंगर ईंडिया क.च्या संयुक्त विद्यामाने लोढा हाॅस्पिटलचे बाजुला माजी नगराध्यक्ष मा प्रेमबाबु बसंतानी यांचे हस्ते व डा. लोढा , ममता पाखराणी ,पी. एस.आय मुंढे साहेब, कार्यक्रम संयोजक सहप्रांतपाल मुरली लाहोटी , रोटरी क्लब चे अध्यक्ष प्रा जितेंद्र केदार , ड़ा अशोक मुखी यांचे उपस्थितीत दिप प्रज्वलित व फित कापुन उदघाटन करण्यात आले.
या प्रशिक्षणचा कालावधी तिन महिण्याचा असुन तसेच हा कोर्श नविन बॅचसह पुढेही चालु राहिल.
यात शिवनयंत्र चालविण्यापासुन तर ड्रेस डिझायनिंग पर्यतची कला शिकवण्यात येईल.
या प्रसंगी प्रेमबाबु बसंतानी यानी महिलांसाठी नगर परीषद मधे असनार्‍या अनेक योजनाची माहीती दिली तसेच अशा प्रशिक्षाणामुळे महिलांना रोजगार मिळने सोपे जाईल तसेच रेडीमेड कापडाची प्रचंड मागनी असल्यामुळे जॉब वर्कसाठी शिलाई कर्मचार्‍यांची मोठी गरज आहे त्यामुळे या प्रशिक्षणाला विशेष महत्व आहे. प्रशिक्षणातुन शिक्षण झालेल्या महिलांच्या कुटुंबाला आर्थीक मदतही मिळेल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लबचे अध्यक्ष प्राध्यापक जितेंद्र केदार यांनी केले . प्रास्ताविकात त्यांनी वर्षभरात केलेल्या कार्याचा आढवा सादर केला.
कार्यक्रमाचे संचालन प्रा अशोक बोंगिरवार यांनी तर आभार प्रदर्शन सचिव पुंडलिकजी बकाने यांनी केले.
कार्यक्रमाला ड़ा .रमेश रांका, ड़ा .प्रकाश लाहोटी,ड़ा.अशोक मुखी ,पिताबंर चंदानी,शाकीरखा पठाण, सुरेश चौधरी ,प्रा माया मिहानी, सौ मंजुशा मुळे ,जितेंद्र वर्मा,मुकुंद मुधंडा , सतीश डांगरे ,पंकज देशपांडे,राजेंद्र गुलकरी यांची विशेष उपस्थिती होती.

बंड खोरआमदार वीरुध शिवसेनी चे आंदोलन हिंगणघाट

0

 

आज दिनांक 26 जून 2022 रोज रविवार ला सकाळी 11:00 वाजता शिवसेना हिंगणघाट विधान सभा क्षेत्र -46 च्या वतीने कारंजा चौक येथे वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख श्री बाळाभाऊ राऊत यांच्या आदेशाने तथा विधानसभा संपर्कप्रमुख रुपेश जी कांबळे यांच्या सूचनेप्रमाणे हिंदुहदय सम्राट सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र पक्ष प्रमुख तथा या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या समर्थननार्थ तसेच बंडखोर आमदार यांचे विरोधात निदर्शने करण्यात आले आहे. या मतदार संघातील सर्व प्रमुख पदाधिकारी तथा शिवसैनिक युवा सैनिक व महिला आघाडी यांनी एकजुटीने शपथ घेऊन माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी व शिवसेनेशी काल आज आणि उद्या ही आम्ही सोबत राहू अशी शपथ घेतली . तदनंतर बंडखोर आमदारांचा निषेध करून त्यांच्याविरुद्ध सर्व शिवसैनिकांनी घोषणा देवून निदर्शने केली. या बंडखोर आमदारांना रसद पुरवण्याचे काम या राज्यातील व देशातील राष्ट्रीय पक्ष म्हणून भाजपने शिवसेनेला तोडण्याचं पाप केलेलं आहे. या महाराष्ट्रातील जनता भाजपला कधीही माफ करणार नाही असेच यांना सत्तेपासून दूर ठेवले जाईल अशी हमी शिवसैनिकांनी याठिकाणी घेतली. तसेच माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या समर्थनार्थ सभे करिता उपस्थित हिंगणघाट तालुक्याचे उप जिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे, सोबत उप जिल्हाप्रमुख समुद्रपूर श्री प्रमोद भटे ,सभेत सर्वस्वी सतीश धोबे तालुका प्रमुख, सतीश ढोमणे शहर प्रमुख,चंद्रकांत घुसे माजी अध्यक्ष न प हि, डॉ.तुळसकर माजी नगरसेवक, प्रकाश अनासानेे, बाबाराव थुटे उपाध्यक्ष नगर पंचायत समुद्रपूर,महिला जिल्हा संघटिका संगीता ताई कडू, तालुका संघटिका माधुरीताई खडसे, शहर संघटिका सीमा ताई गलांडे ,माजी नगरसेविका नीता ताई धोबे,जिल्हा युवा सेना प्रमुख अभिनंदन मुनोत, मनीष देवडे नगर सेवक, श्रीधर कोटकर,भारत चौधरी माजी जि. प सदस्य,अमोल गायकवाड माजी उप सभापती प स हि,मुन्ना त्रिवेदी शहर संघटन, सुधाकर डंभारे, मनोज वरघणे नगर सेवक,शंकर मोहमारे माजी न सेवक, गजानन पारखी तालुका प्रमुख, रवी ठोंबरे संघटक,प्रकाश घोडे,भूषण कापकर शहर युवा प्रमुख, रणजित रहाटे जिल्हा समन्वयक,देवेंद्र पडोळे माजी नगरसेवक, शंकर झाडे,अभिलाष गिरडकर युवा सेना तालुका प्रमुख, गजानन काटवले,निकील वाघ माजी युवा सेना तालुका प्रमुख, किरणताई खूरपुढे,अजय महाजन, मोहन पडवे,दिगांबर उगे, बंटी वाघमारे,अनंता गलांडे, देवा शेंडे, मन्ना काशीनिवास,अविनाश धोटे, रुपेश काटकर,पवन तिवारी,योगेश कामडी,शीतल चौधरी, संजय पिंपळकर, अजय वानखेडे,तुळशीराम हिंगे, सुनील आष्टीकर, राजू तपासे, मारुती भराडे, नरेश गुडकरी, निखिल झिबल, नितीन वैद्य, राहुल मोहितकर, मोहन तुमराम, संतोष चौधरी, दिलीप चौधरी, गजानन ठाकरे,प्रशांत सुपारे, छोटू सोरटे, बबलू शाहू, जयंत कातरकर,दुर्योधन कोल्हे,मंगेश भोयर, नारायण वर्मा,महेश खडसे, सौ.नीलिमा मोहमारे, प्रियांका धोटे,वर्षा बेले, सौ. रेश्मा बाकरे,सौ. किरण खुरपुढे,उर्मिला धार्मिक, सविता मेश्राम, वंदना सातघरे, मिना पराते, झोलब उपरे,दिनेश धोबे, अमोल मानकर,पुरुषोत्तम सालवटकर,जयकुमार रोहनकार,मारुती महाजन, सचिन मुडे,हिरामण आवारी, बलराज डेकाटे,उमेश धोबे,सौ. स्वाती पिंपलकर, महादेव लांबडे, नितीन सरोदे, विलास वैद्य, संजय गिरडकर, प्रमोद चाफले,शंकर भोंमले,सुमित भिषेकार,निलेश फलके,आकाश बोकदे व असंख्या कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.,,नईम मलक हिंगणघाट

पळशी झाशी येथील वीज पडून मृत्यू झालेल्या वारसांना प्रत्येकी चार लाखाची आर्थिक मदत, तहसीलदार यांच्या हस्ते धनादेश

0

 

अनिलसिंग चव्हाण मुख्य संपादक

संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथे दिनांक 23 जून रोजी शिवारात वीज पडल्यामुळे त्या दोघांचा मृत्यू झाला त्यांच्या वारसास शासनाकडून प्रत्येकी चार लाखांची आर्थिक मदत म्हणून तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांच्या हस्ते 24 तासाच्या आत आज दिनांक 24 जून रोजी मृतकाचे कुटुंबाच्या घरी जाऊन धनादेश देण्यात आला.

संग्रामपूर तालुक्यातील पळशी शिवारात विहिरीचे खोदकाम करीत असताना अचानक सुरू झालेल्या पावसामुळे खोदकाम करणारे चार मजूर निंबाच्या झाडाखाली आश्रयास गेले असता त्याच झाडावर वीज पडल्याने त्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले संजय उत्तम मारोडे व रवी संजय भालतीडक दोन्ही रा. पळशी झाशी ह्या मजुरांचा मृत्यू झाल्याने मृतकाच्या घरी जाऊन नैसर्गिक आपत्ती सानुग्रह अनुदान अंतर्गत दोन्ही मृतकांचे वारसांना त्यांची पत्नी १) मंदा संजय मारोडे, २)शितल रवि भालतडक यांना त्यांचे घरी जावून प्रत्येकी चार लाख रुपयांचा दोन्ही कुटुंबांना शासकीय आर्थिक सहाय्य सानुग्रह अनुदानाचा धनादेश २४ तासाच्या आत तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांच्या हस्ते देण्यात आला., यावेळी सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, मंडळ अधिकारी ,सामाजिक कार्यकर्ते व गावातील नागरिक आणि मृतकांचे कुटुंब उपस्थित होते.

मधुकर सहकारी साखर कारखाना विक्रीच्या विरोधात २९ जुन रोजी सभासदांची व कामगारांची महत्वाची बैठक

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

जिल्ह्यात साखर उत्पादन क्षमतेत क्रमांक एकवर असलेला व सद्या आर्थिक संकटात ओढवलेल्या तालुक्यातील फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखाना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके कडून विक्रीस काढण्यास येणार असल्याने कारखान्याची विक्री न करता तो भाडेतत्त्वावर चालविण्यास द्यावा या मागणीसाठी मधुकर सहकारी साखर कारखाना साइटवर 29 जून रोजी सकाळी अकरा वाजेला कारखाना सभासदांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

कर्जाच्या थकबाकी पोटी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ताब्यात असलेला यावल तालुक्यातील मधुकर सहकारी साखर कारखाना विक्री केला जाणार असल्याचे वृत्त येत असल्याने कारखान्याच्या सर्व सभासदांमध्ये कमालीची अवस्थता व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कारखाना ताब्यात घेण्यापूर्वी कारखाना भाडेतत्त्वावर देण्यात येणार असल्याचे, जिल्हा सहकारी बँकेकडून सभासदांना आश्वासित केले होते मात्र सध्या बँक भाडेतत्वावर देणे ऐवजी विक्री काढणार असल्याचे , वृत्त असल्याने कारखान्याचे माजी कामगार प्रतिनिधी गिरीश भास्कर कोळंबे व कारखाना सभासद विजय प्रेमचंद पाटील यांनी दिनांक 29 जून रोजी कारखाना साइटवर सभासदांची बैठक आयोजित केली आहे .तरी शेतकरी बांधव आणी कामगार यांच्या हिताच्या दृष्टीकोणातुन योग्य मार्ग काढण्यासाठी या अत्यंत महत्वाच्या बैठकीस सर्व सभासदांनी व कामगारांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे .

वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेती गेली खरडून शेतीला आले नदीचे स्वरूप

0

 

पिंपळखुटा परिसरातील चित्र : शेतकरी आर्थिक संकटात

योगेश नागोलकार
प्रतिनिधी राहेर पातूर

राहेर: पातुर तालुक्यातील पिंपळखुटा परिसरात गुरुवार दि. २३ जून रोजीच्या दुपारी अचानक आलेल्या विजेच्या गडगडासह वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती खरडून गेली, गावातील अनेकांची टीन पत्रे उडाली, विद्युत खांब वाकले, तसेच विद्युत तारा लोंबकळले, आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यंदा पावसाळा सुरुवात होताच शेतकऱ्यांनी बँक व सावकाराकडून कर्ज घेऊन नुकतेच विविध पिकांची पेरणी केली आहे. आधीच सतत नापिकीमुळे चार ते पाच वर्षांपासून शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील वर्षाची कर्जाची परतफेड होईल या आशेने शेतकऱ्यांनी यंदाही सावकार व बँकेकडून कर्ज घेऊन विविध पिकांची पेरणी केली होती. परंतु गुरुवार रोजीच्या दुपारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला, यात पिंपळखुटा येथील सुभाषराव गोविंदराव देशमुख, नाजुकराव गोविंदराव देशमुख, प्रभाताई वामनराव देशमुख, अशोकराव आनंदराव देशमुख, श्रीकृष्ण बुंदे, सह आदी शेतकऱ्यांची शेती खरडून गेल्याने त्यांच्यासमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. शासनाने दखल घेऊन पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडून होत आहे.

चौ
शेतकऱ्यावर चौफेर संकट
आधीच गेल्या चार ते पाच वर्षांपासून सतत नापिकीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस पडला त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते परंतु वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेती खरडून गेल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

प्रतिक्रिया
बॅंकेकडून दीड लाख रुपये कर्ज घेऊन यंदा सात एकरामध्ये सोयाबीन व कपाशी पिकांची पेरणी केली आहे. परंतु अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेती खरडून गेली आहे. शासनाने पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी
-नाजुकराव गोविंदराव देशमुख शेतकरी पिंपळखुटा

दुर्देवी! वीज पडून बैलाचा मृत्यू; ऐन पेरणीच्या तोंडावर बैल गमावल्याने शेतकरी हतबल

0

 

पातुर तालुक्यातील वाहळा बु.येथील घटना; नुकसानभरपाई मागणी

योगेश नागोलकार
प्रतिनिधी राहेर पातुर

राहेर/ पातुर तहसील अंतर्गत येत असलेल्या वाहाळा बु येथील शेत शिवारातील बाबुराव लक्ष्मण पुंडे या अल्पभूधारक शेतकऱ्याचा शेतात निंबाच्या झाडाला बांधलेल्या 2 बैलावर वीज पडल्याने बैल जागीच ठार झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांचे ऐन पेरणीच्या तोंडावर बैल गमावल्याने शेतकरी हतबल झाला आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्याचे अंदाजे १ लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.
शिवाय अल्पभूधारक शेतकरी बाबुराव लक्ष्मण पुंडे व त्यांची फॅमिली अंतरावर बसले होते त्यामुळे सुदैवाने त्याचे प्राण वाचले आहेत. खरीप हंगामाच्या पेरणीच्या आधीच वीज पडून बैलाचा मृत्यू झाल्याने शेतकरी हतबल झाला असून प्रशासनाने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी अल्पभूधारक शेतकरी यांनी केली आहे.
पावसाचे प्रमाण कमी असले तरी वीज पडून जीवितहानी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहीती गावातील नागरिकांनी तहसीलदारांना कळवली त्यानंतर तलाठी व काही साथीदार यांनी वरिष्ठांना कळवून या घटनेचा तलाठी यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला व डॉक्टर वैद्यकीय अधिकारी राऊत यांना माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी भेट देऊन जागेवरच पोस्टमार्टम करण्यात आले. व दोन्ही बैलांना दफन करण्यात आले.

नावरे येथील रीना सुनील मेंढे या महिलेचा शेत काम करीत असतांना अंगावर वीज पडून जागीच मृत्यू

0

 

 

यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे

यावल तालुका नावरे. येथील रीना सुनील मेंढे या ३९ वर्षीय महिलेचा विरावली शिवारात शेत काम करीत असतांना अंगावर वीज पडून जागीच मृत्यू

विषयी अधिक वृत असे की, आज गुरुवार दिनांक 23 जून रोजी येथील रिना सुनील मेढे या ३९.वर्षे महिला विरावली शिवारात शेती काम करीत होत्या दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पाऊस सुरू असताना अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली त्यांना यावल.च्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असताना यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ बी. बी.बारेला यांनी त्यास मृत घोषित केले.

यासंदर्भात उत्तम भोजु मेढे यांनी दिलेल्या खबरी वरून यावल पोलीस स्टेशनला अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मयत महिला यांनी एक १८आणि एक १६ वर्षाचा मुलगा असून ६ महिन्यांपूर्वी सुनिल भोजू मेढे हे यांचा देखील अपघाती मृत्यू झाला होता .वडील आणि आई दोघही जग सोडून गेल्यामुळे त्यांच्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे

वयोवृद्ध महिलेस दिवसाढवळ्या लुटले दागीण्यासह ३ चोरट्यांना केले पोलिसांनी जेरबंद

0

 

हिंगणघाट प्रतिनिधी दि.22
स्थानिक कोचर वार्ड परिसरातील वृद्ध महिलेचे कानातील सोन्याच्या बाळ्या व नाकातील नथनी जबरदस्तीने लुटल्याप्रकरणी शहरातील तीन आरोपीस पोलिसांनीअटक केली.
अधिक माहितीनुसार स्थानिक कोचर वार्ड येथील महिला श्रीमती अंगुरीबाई गुलाबसिंग चितोडिया(63) ही काल मंगळवारी सकाळी शौचाला गेल्यानंतर घरी परतत होती.
यावेळी या आरोपींनी सदर महिलेस रस्त्यावरती अडवून जबरदस्ती करीत महिलेचे कानातील सोन्याच्या बाळ्या तसेच नाकातील नथ असे एकूण 13 ग्राम सोन्याचा ऐवज लुटला.
सदर महिलेने हिंगणघाट पोलिस ठाण्यात तक्रार देताच हिंगणघाट पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपास करीत प्रज्वल सुनिल कडु वय 18 वर्ष, रा. तेलंगखेडी, तहसील कार्यालयाचे मागे, हिंगणघाट, अभिषेक भैय्याजी वरभे, वय 19 वर्ष, रा. चिमटेबाबा ग्राऊन्ड, कोचर वार्ड, हिंगणघाट व आकाश धनजी गोडकिया, वय 19 वर्ष, रा. चिमटेबाबा ग्राऊन्ड, कोचर वार्ड, हिंगणघाट यांस मुद्देमालासह अटक केली. आरोपींनी नमुद गुन्हा केल्याची कबुलीसुद्धा दिली आहे.
सदरची कामगीरी प्रशांत होळकर, पोलीस अधीक्षक, यशवंत सोळंके, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, दिनेश कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट, पो.नि. कैलास पुंडकर, पोलीस स्टेशन, हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात पोउपनि पपीन रामटेके, डि. बी. पथकाचे पो.हवा. शेखर डोंगरे, नापोशि. निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, सचिन भारशंकर, पोशि. भारत बुटलेकर यांनी केली.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा