Home Blog Page 295

किनगाव येथे एका तरूणाने केलेल्या चाकु हल्यात तिन तरूण गंभीर जख्मी .त्या हल्लेखोर तरुणाविरूद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील किनगाव गावात एका तरूणाचा तिन जणांवर चाकुहल्ला तिघ गंभीर जख्मी झाले असुन , जख्मींवर यावलच्या ग्रामीण रुग्णालयात या तिघ गंभीररित्या जख्मी झालेल्यांवर उपचार करण्यात आले असुन, रात्री उशीरा पर्यंत त्या चाकुहल्ला करणाऱ्या विरूद्ध पोलीसांकडुन गुन्हा दाखल करण्यात आलाय . या संदर्भात मिळालेली माहीती अशी की किनगाव तालुका यावल येथे दिनांक १५ जुनच्या रात्री १oते १० ,३oवाजेच्या सुमारास गावातील फॉरेस्ट जवळ उभे असतांना) गावात राहणाऱ्या शाह नामक तरूणाने तौसीफ समिर तडवी वय१९ वर्ष , शरीफ लुकमान तडवी वय१९ वर्ष आणी सद्दाम नवाज तडवी वय२० वर्ष यांच्यावर शस्त्राने प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीर जख्मी केल्याची घटना घडली असुन , तिघ जख्मींना उपचारासाठी यावलच्या ग्रामीण रुग्णातयात दाखल करण्यात आले असुन , जख्मींवर वैद्यकीय अधिकारी डॉ अमीत तडवी व त्यांच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रथम उपचार केले असुन , यातील दोन जणांना पुढील उपचारासाठी जळगाव वैद्यकीय विद्यालयात पाठवणार असल्याचे सांगण्यात आले आहे . या संदर्भात यावल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक सुदाम काकडे , पोलीस नाईक राजेन्द्र पवार यांनी या घटनेतील जखमींची माहीती घेतली असुन, त्या हल्ला करणाऱ्या तरूणा विरुद्ध रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे . दरम्यान हल्ला करणारा तरूण मात्र फरार असल्याचे वृत्त आहे . हल्ला तरूणाने या तिघ तरूणांवर अशा प्रकारे प्राणघातक हल्ला का केला याची मात्र माहीती अद्याप समोर आली नसल्याचे कळते मात्र गावात या उलटसुलट चर्चा होत असल्याचे कळते .

जमिनीचा मोबदला बाजार भावा प्रमाणे मिळावा यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

0

 

सूर्या मराठी न्यूज़ मध्ये आपल्या सगळयांचे स्वागत आहे. संपुर्ण महाराष्ट्राच्या,देशाचा तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्यूब चेनल द्वारे देत आहोत.शेतकरी,गरीब,सामान्य माणसांचे आवाज शासनापर्यंत पोहाचीविणे,अन्याय व

यावल शहरात सोशल मीडिया वरील समाज भावना दुखावणारी पोस्ट व्हायरल चे पडसाद शहरात काही काळ तणावाचे वातावरण

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

सोशल मीडियावरील पोस्टमुळे शहरात दोन समाजात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या वादाचे वादाचे पडसाद मंगळवारी रात्री जमावात रूपांतरित झाल्याने पोलिसांना जमावावर सौम्य लाठीमार करावा लागला. शहरात सध्या शांतता प्रस्थापित असून पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे .

यावल शहरात एका समाजाच्या भावना दुखावणारी पोस्ट, सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्याची तक्रार करीत असतांना मंगळवारी रात्री मोठ्या प्रमाणावर जमाव एकत्र होत पोलीस ठाण्याच्या दिशेने येत असताना पोलिसांनी शहरातील बुरूज चौकात जमावाला थांबवत परत जाण्याच्या सूचना केल्या मात्र जमाव पांगत नसल्याने अखेर पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. , यामुळे मंगळवारी रात्री शहरात दंगल सदृश्य स्थिती निर्माण झाली होती . घटनेची माहिती मिळताच फैजपूर विभागाचे डीवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे हे देखील शहरात दाखल झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत पोलीसांचा शहरातील विविध भागात बंदोबस्त , तैनात करण्यात आला . काल पासून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्ट बाबत वाद सुरू असल्याने याबाबतची एकाकडून एका गटाकडून तक्रारही करण्यात आली होती मंगळवारी रात्री हा वाद पुन्हा उफाळून आला आहे. नागरिकांनी अफवांना बळी पडू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने फैजपूर उपविभागीय पोलिस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस,, अधीक्षक IPS,अशित कांबळे यांनी केले आहे.

हिंगणघाट तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नंबर 1 वर येणार अतुल भाऊ वांदिले यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रशांत मेश्राम मित्र परिवारा तर्फे शुभेच्छा

0

 

हिंगणघाट. :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस पदी अतुल भाऊ वांदिले यांची नियुक्ती झाल्याबद्दल प्रशांत मेश्राम मित्र परिवार तर्फे शुभेच्छा देण्यात आले. तसेच हिंगणघाट नगरपालिका निवडणूक प्रभाग 8 मधून नगरसेवक पदासाठी इच्छुक असल्याची इच्छा जाहीर केली व हिंगणघाट तालुक्यात पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता येण्यासाठी प्रयत्न राहील असे प्रशांत मेश्राम मित्र परिवार तर्फे शुभेच्छा देतांना सांगितले.

यावल नगर परिषदच्या सार्वत्रीक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत पार पडली असुन यात १२ महीला व११ पुरुषांचा समावेश

0

 

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

येथील आगामी काळात होवु घातलेल्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीसाठीच्या ११ प्रभागासाठी प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत आज काढण्यात आली अमुन, यात१२ महीला व ११ पुरूष उमेदवारांचा समावेश करण्यात आले आहे . यावल येथील नगर परिषदच्या होवु घातलेल्या सार्वत्रीक पंचवार्षिक निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत ची बैठक यावल नगर परिषदच्या सभागृहात आज दिनांक १३ जुन रोजी सकाळी ११ वाजता यांच्या अध्यक्षतेखाली रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी प्रसाद मते यांच्या उपस्थिती पडली, यात यावल नगर परिषदेच्या प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत काढण्यात आली असुन , यात प्रभाग क्रमाक१साठी सर्वसाधारण महीला व पुरूष ,प्रभाग क्रमांक२साठी अनु . जातीची महीला , प्रभाग क्रमांक३साठी अनुसुचित जातीची महीला उमेदवारासाठी राखीव , प्रभाग क्रमांक४साठी प्रभाग क्रमांक६साठी सर्वसाधारण महीला व पुरूष , प्रभाग क्रमांक७साठी महिला व पुरूष , प्रभाग क्रमांक८साठी सर्वसाधारण महीला व पुरुष , प्रभाग क्रमांक९साठी सर्वसाधारण महीला व पुरूष , प्रभाग क्रमांक१oसाठी सर्वसाधारण महिला व पुरुष आणी प्रभाग क्रमांक११साठीच्या उमेदवारांचे आरक्षण हे पुरूष अनुसुचित जमातीसाठीचे व सर्वसाधारण महीला आणी पुरूषासाठी जाहीर करण्यात आले आहे . या आरक्षणावर हरकती स्विकारण्याची साठीची शेवटी मुदत १५ जुन असणार असल्याचे नगर परिषद प्रशासनाच्या जाहीर करण्यात आले आहे .

महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण पर्यटन मंत्री तथा युवासेनेचे प्रमुख शिवसेना नेते मा.ना.आदित्यजी ठाकरे साहेब यांचे वाढदिवसाच्या।। साजरा ,,,

0

 

नईम मलक वर्धा

जिल्हा संपर्क प्रमुख श्री.बाळाभाऊ राऊत तथा हिंगणघाट विधानसभा संपर्क प्रमुख श्री.रुपेशजी कांबळे साहेब यांच्या सुचनेप्रमाणे हिंगणघाट शिवसेना युवासेना च्या वतिने सामान्य रूग्णालयात फळे व बिस्किटे वाटप करण्यात आले. तसेच रुग्णालय परिसरातील वटवृक्ष लावुन वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी सर्वश्री उपजिल्हा प्रमुख श्री. राजेंद्रजी खुपसरे तसेच श्री. सतिशभाऊ ढोमणे शहर प्रमुख हिंगणघाट ,सामान्य रूग्णालयात मा.डाॅ. कोडापे साहेब व डाॅ. वासाडे साहेब प्रामुख्याने उपस्थितीत तसेच श्री. सतिशभाऊ धोबे तालुका प्रमुख हिंगणघाट, प्रकाश अनासाने हिंगणघाट उपतालुका प्रमुख, मनिष देवढे माजी नगरसेवक, शहर सघंटक श्री मुन्ना त्रिवेदी,मनोज वरघणे,शंकर मोहमारे, देवा पडोळे, युवासेनेचे जिल्हा समन्वयक रंजित राहाटे, युवासेना शहर प्रमुख भुषण कापकर, युवासेना माजी तालुका प्रमुख निखील वाघ,युवासेना उपशहर प्रमुख योगेश कामडी,उपशहर प्रमुख निखील झिबड, मोहन तुमराम, शिवसेनेचे विभाग प्रमुख रुपेश काटकार, दिलीप चौधरी,सुरेश चौधरी,जेष्ठ शिवसैनिक सुनील आष्टीकर ,बंटी वाघमारे ,देवा पडोळे,अनंत कोळसे ,प्रशांत आवारी,दिनेश धोबे,चंदू भुते,चेतन चौधरी,दत्ताजी चांदेकर,बलराज डेकाटे,हिरामण आवारी,अनंता सोरटे व सर्व शिव सैनिक उपस्थित होते.

काळ्या बाजारात विक्री करिता जात असलेल्या तांदुळाच्या ट्रक वर LCB ची कारवाई, अंदाजे 23,47,300 लाख रुपयांचा माल हस्तगत

0

 

उषा पानसरे अमरावती
दिनाक 12 जून

अकोला स्थानिक गुन्हे शाखेने अकोला जिल्यातील बाळापूर तालुक्यातील ग्राम व्याला येथे कारवाई करीत काळ्या बाजारात विक्री करिता जात असलेला ट्रक ताब्यात घेतला असून या प्रकरणात शासकीय तांदूळ काळ्या बाजारात विक्री करीता घेऊन जाणाऱ्या ट्रक चालक व क्लिनर ला ताब्यात घेत त्यांच्या जवळून अंदाजे 245 क्विंटल शासकीय तांदूळ जप्त केला, गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की एका ट्रक मध्ये शासकीय तांदूळ हा तस्करी करून विक्री करिता जात आहे या माहिती वरून गुन्हे शाखेच्या पथकाने रिधोरा जवळील व्याला शिवारात सापळा रचून सदर ट्रक जप्त केला, ट्रकची पाहणी केली असता त्या मध्ये शासकीय राशनच्या तांदुळाच्या मोठा साठा मिळून आल्याने सदर ट्रक हा बाळापूर पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आला, ट्रकची पाहिनी केली असता त्या मध्ये 245 क्विंटल शासकीय तांदूळ मिळून आल्याने पोलिसांनी राजाराम रघुबिर पाल वय 52 वर्ष रा.नागपूर व सरसपाल रामानंद पाल वय 54 वर्ष रा.प्रतापगढ उत्तर प्रदेश याना अटक केली असून त्यांच्या जवळून 5,36,800 किमतीचा ट्रक सह 23,47,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे,सदरची कारवाई पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मुकुंद देशमुख , पोहेका दत्ता ढोरे,नापोका विशाल मोरे, पोका संदीप ताले, रवी पालिवाल, श्रीकांत पातोंड यांनी केली.

गिरड सर्कल मधिल पाच गावातील अनेकांच्या हातावर घडी..

0

 

 

.नईम मलक हिंगनघाट

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अतुल भाऊ वांदीले यांच्या हस्ते झाला पक्ष प्रवेश …*

समुद्रपूर/ हिंगणघाट

अतुल भाऊ वांदिले यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशानंतर आता हिंगणघाट विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबुत करण्याच्या दृष्टीकोनातून पक्षात इन्कमिंग सूरु झाली आहे. समुद्रपूर तालुक्यातील गिरड सर्कल येथील पाच गावातील अनेक महिला ,पुरुषांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.
गिरड सर्कल मधील गिरड, साखरा, तावी, तळोदी, शिवनफळ येथील ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गावा गावात मजबुत करण्याचा यावेळी निर्धार केला. *राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य प्रदेश सरचिटणीस* *मा.श्री.अतुलभाऊ वांदिले यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत हा प्रवेश घेण्यात आला.
रा.का.चे गिरड येथील उपसरपंच मंगेशभाऊ गिरडे, सुभाषभाऊ चौधरी, राजू झिंगरे यांच्या पुढाकाराने आज हा पक्ष प्रवेश झाला.*
याप्रसंगी श्री दशरथजी ठाकरे वर्धा जिल्हा सरचिटणीस, सुनील भुते, राजू मुडे सह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

एक नई खोज संघटनेच्या माध्यमातून साई वर्मा यांनी घेतली केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांची भेट

0

 

 

हिंगणघाट एक नई खोज या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून साई वर्मा यांनी नुकतीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक नई खोज संघटनेच्या माध्यमातून होणाऱ्या समाज कार्याची माहिती साई वर्मा यांच्याकडून मोठ्या उत्सुकतेने जाणून घेतली. यावेळी साई वर्मा यांच्या संघटने विषयी |आणि कार्य विषयी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आनंद व्यक्त
करीत संघटनेच्या कामासाठी मद्दत करण्याचे आश्वासन यावेळी
संघटनेच्या अध्यक्ष साई वर्मा यांना दिली . एक नाई खोज या सामाजिक संघटने विषयी नितीन गडकरी यांना आपुलकी वाटली आणि सोबत त्यांनी आपले अनुभव सांगितले. कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत यावेळी

नाही तर त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो. असा संदेश देऊन विविध विषयांवर चर्चा केल्याची ( नईम मलक.)

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या विरुद्ध सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्यावर कार्यवाही करा : शिवसेनेची मागणी

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

 

मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना यावल तालुका प्रमुख रवींद्र सोनवणे यांनी आयपीएस पोलीस निरीक्षक आशित कांबळे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

महाराष्ट्रा राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्या साकळीच्या एका संशयित विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी. हि आक्षेपार्ह पोस्ट व्हाटसअप या सोशल मिडिया माध्यमातून व्हायरल केल्यामुळे शांततेचा भंग होण्याची शक्यता आहे. यामुळे अशा प्रवृत्ती विरुध्द कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना यावल तालुका प्रमुख रवींद्र सोनवणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख कडु पाटील , उपशहर प्रमुख संतोष धोबी, युवा सेना शहराधिकारी सागर देवांग, शिवसेना आदिवासी आघाडी तालुका प्रमुख हुसेन तडवी, अजहर खाटिक, सारंग बेहेरे, सुनील जोशी, तालुका उपप्रमुख शरद कोळी, महेंद्र चौधरी आदींची स्वाक्षरी आहे. दरम्यान यावल पोलीसांनी अशा प्रकारची पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल करणाऱ्या तरुणास ताब्यात घेतले आहे .