Home Blog Page 30

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन (sameerkunawar)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- शहराच्या हृदयस्थानी उभा असलेला विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा अधिक भव्य, आकर्षक आणि देखणे व्हावा, तसेच परिसराचा सर्वांगीण विकास घडावा, यासाठी जिल्हा वार्षिक योजना (नाविन्यपूर्ण योजना) २०२४-२५ अंतर्गत १ कोटी रुपयांच्या निधीतून सुशोभीकरण कामाचा भूमिपूजन शुभारंभ आमदार समीर कुणावार यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

या उपक्रमासाठी आमदार समीर कुणावार यांनी स्वतः पुढाकार घेत जिल्हाधिकारी वर्धा यांच्याशी बैठक घेऊन नागपूर येथील VNIT संस्थेच्या तज्ज्ञ पथकाची पाहणी आयोजित केली. या पाहणी अहवालात पुतळ्याच्या तातडीच्या दुरुस्तीची शिफारस करण्यात आली.

वना नदीतून अवैध रेती उपसा वर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक.(hingnghat)

त्यानंतर आमदार कुणावार यांनी माजी पालकमंत्री मा. सुधीर मुनगंटीवार यांच्या सहकार्याने प्रस्ताव शासनाकडे सादर केला आणि निधी मंजुरीसाठी प्रभावी पाठपुरावा केला. शासनस्तरावर मंजुरी मिळवून हा प्रस्ताव यशस्वीरीत्या मार्गी लावण्यात आला.

यानंतर नवीन DPDC समितीच्या बैठकीत विद्यमान पालकमंत्री मा. पंकज भोयर यांनी या विकासकामाला गती देत निधीच्या अंमलबजावणीत सकारात्मक भूमिका बजावली. त्यांच्या सहकार्याबद्दल आमदार कुणावार यांनी कृतज्ञता व्यक्त केली.sameerkunawar

या भूमिपूजन कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, हिंगणघाट यांच्यावतीने आमदार कुणावार यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची सांस्कृतिक रंगत वाढवण्यासाठी सुप्रसिद्ध ‘जाधव सिस्टर्स’ – विनया, विजया, वैभव जाधव आणि त्यांच्या संगीतमय संचाने “भीमगीतांचा सुफी नजराणा” सादर केला, ज्यामुळे संपूर्ण परिसर भारावून गेला.

sameerkunawar:या भव्य कार्यक्रमाला हिंगणघाट नगरपालिकेचे मुख्याधिकारी, विविध शासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

वना नदीतून अवैध रेती उपसा वर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक.(hingnghat)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट:- हिंगणघाट शहरातील डंकीन येथील बंधारा बांधकामासाठी वणा नदी पात्रातून करण्यात आलेल्या अवैध रेती उपशावर कार्यवाही करून दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी रा.कॉ.पक्ष शरदचंद्र पवार आक्रमक असून आज तहसिल कार्यालयात प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

शहरातील डंकीन परिसरात सध्या सुरू असलेल्या बंधारा बांधकामासाठी औरंगाबाद येथील एका कंपनीला ठेका देण्यात आलेला आहे. परंतु, या बांधकामासाठी वापरण्यात येणारी रेती ही वणा नदीच्या पात्रातून बेकायदेशीररित्या आणि कोणतीही वैध परवानगी न घेता उपसली गेली आहे,

लोकलेखा समितीवर समीर कुणावार(आमदार) यांची नियुक्ती (samirkunavar)

हे धक्कादायक वास्तव नुकतेच समोर आले आहे. पियुष इन्फ्रा कंपनी नावाच्या ठेकेदाराने मोठ्या प्रमाणावर रेती उपसा करून साठा केला असून, यासंदर्भात महसूल विभागाचे नायब तहसीलदार श्री. सागर कांबळे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन रेती साठ्यावर जप्तीची कारवाई केली आहे. आम्ही महसूल विभागाच्या या तत्परतेचे स्वागत करतो.

मात्र, वणा नदी ही आमच्या जीवनरेषेसारखी असून तिचे संरक्षण हे आमचे कर्तव्य आहे. या प्रकारामुळे नदीपात्रातील पर्यावरणीय समतोल बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. नदीवरील बेकायदेशीर रेती उपसा केवळ कायद्याचे उल्लंघन नाही, तर भविष्यातील जलसंकटाचे बीज आहे. त्या अनुषगाने आम्ही खालील मागण्या करीत आहोतः

या प्रकरणाची सखोल व स्वतंत्र चौकशी करण्यात यावी.दोषी ठेकेदार व नागपूर पाटबंधारे विभागाच्या (दक्षिण) कार्यकारी अभियंता प्रांजली टोंगसे तसेच पाटबंधारे विभागीयनाचे हिंगणघाटचे उपविभागीय अभियंता अशोक घुमडे या जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा पूर्वीच्या बंधाऱ्याप्रमाणेच याही बंधाऱ्याच्या कामात गडबड होऊन शासनाचा पैसा वाया जाईल.जिल्ह्यातील सर्व बांधकाम प्रकल्पांवर नदी पात्रातील रेती उपशावर नियंत्रणासाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करण्यात यावी.वणा नदीच्या संपूर्ण परिसरात नदी संवर्धनासाठी स्पष्ट मार्गदर्शक नियमावली तयार करून अंमलात आणण्यात यावी.

सदर बंधाऱ्याचे काम यापूर्वी मुख्य अभियंता जलसंपदा विभाग नागपूर याचे द्वारा वर्धा पाटबंधारे विभाग वर्धा यांचेकडे देण्यात आले होते. परंतु नंतर हा निर्णय बदलून नागपूर पाटबंधारे विभाग (दक्षिण) यांच्याकडे देण्यात आले. या मागचा काय उद्देश असावा? याची चौकशी करण्यात यावी. तरी सदर काम पूर्ववत वर्धा पाटबंधारे विभागाकडे देण्यात यावे कारण वर्धा येथून हिंगणघाटचे अंतर नागपूर पेक्षा जवळ असून त्यांना सदर कामावर लक्ष देणे सोयीचे आहे.असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा द्वारे उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.

hingnghat:यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, रफिक पत्रकार, समाजसेवक सुनिल डोंगरे, माजी नगरसेवक अशोक पराते, माजी नगरसेवक राजेश भाईमारे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, शहराध्यक्ष बालु वानखेडे,दिव्यांग सेलचे प्रदेश सचिव मारोती महाकाळकर, अमोल बोरकर, अल्पसंख्याक सेल प्रदेश सरचिटणीस हिमायू मिर्झा बेग,वाहतूक सेल जिल्हाध्यक्ष शेखर जाधव, जगदीश वांदिले,पुरुषोत्तम कांबळे,किशोर चांभारे, समीर बाळसराफ,उमेश नेवारे,नितीन भुते, सुनिल भुते,अमित रंगारी, सुशील घोडे,सुनिल ठाकरे, हुकेश ढोकपांडे,रवी मेसेकर,आकाश हुरले आदी उपस्थित होते.

लोकलेखा समितीवर समीर कुणावार(आमदार) यांची नियुक्ती (samirkunavar)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

samirkunavar:हिंगणघाट :-महाराष्ट्रजनतेच्या हिशोबावर वचक ठेवणाऱ्या महाराष्ट्र विधानमंडळातील अत्यंत महत्त्वाच्या लोकलेखा समितीवर वरिष्ठ आमदार समीर कुणावार यांची प्रभावी नियुक्ती!महाराष्ट्र विधानमंडळाच्या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या लोकलेखा समितीवर आमदार समीर कुणावार यांची प्रतिष्ठेची नामनियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र विधानसभा नियम २०६ व विधानपरिषद नियम २०७ नुसार सन २०२४-२५ या वर्षासाठी समितीचे नवे सदस्य निश्चित करण्यात आले. या समितीचे अध्यक्षपद काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी विरोधी पक्षनेते मा. विजय वडेट्टीवार यांच्याकडे सोपवण्यात आले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली हिंगणघाट-समुद्रपूर-सिंदी (रेल्वे) विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय व अभ्यासू आमदार समीर कुणावार यांची समिती सदस्य म्हणून नियुक्ती ही त्यांच्या कारभारातील पारदर्शकता, अभ्यासू दृष्टिकोन आणि विकासाभिमुख कार्यपद्धतीची पावती आहे.

छगन भुजबळ यांची मंत्री पदी नियुक्ती हिंगणघाट मध्ये जल्लोष (chhaganbhujbal)

विधानमंडळाच्या लोकलेखा समितीला “जनतेच्या पैशाचा पहारेकरी” म्हणून ओळखले जाते. हि समिती शासकीय खर्चावर बारकाईने लक्ष ठेवते, नियंत्रक व महालेखापाल (CAG) यांच्या अहवालांवर चर्चा करते व शासकीय यंत्रणांची जबाबदारी निश्चित करते व अनियमितता उघड करते. २५ सदस्यांची ही समिती (२० विधानसभा व ५ विधानपरिषद सदस्य) ही अर्थसंकल्पानंतरची एक अत्यंत प्रभावशाली

संसदीय यंत्रणा मानली जाते.समीर कुणावार हे गेल्या अनेक वर्षांपासून मतदारसंघात सातत्याने विकासकामे राबवणारे, नियोजनबद्ध, तळमळीने काम करणारे व पारदर्शकतेवर विश्वास असलेले आमदार म्हणून परिचित आहेत. विकासाभिमुख दृष्टिकोन, मजबूत जनसंपर्क, आणि शिस्तबद्ध नेतृत्वशैली यांच्या जोरावर त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

samirkunavar:या नियुक्तीद्वारे विधानमंडळात त्यांच्या वरिष्ठतेला, निःपक्ष अभ्यासाला आणि प्रामाणिक कार्यक्षमतेला शासनाने दिलेली मान्यता स्पष्ट होते. लोकशाहीतील वित्तीय शिस्त व उत्तरदायित्वासाठी ही नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात असून, लोकलेखा समितीच्या कामकाजात आमदार कुणावार यांचा अनुभव व दृष्टीकोन निश्चितच मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वास राजकीय व प्रशासकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.

छगन भुजबळ यांची मंत्री पदी नियुक्ती हिंगणघाट मध्ये जल्लोष (chhaganbhujbal)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदचे संस्थापक. छगन भुजबळ यांची अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल वर्धा जिल्हा हिंगणघाट येथे टिळक चौक महात्मा फुले पुतळ्या जवळ पेढे वाटून फटाके फोडून उत्साह साजरा करण्यात आला.

काँग्रेसच्या तिरंगा रॅली साठी मोठ्यप्रमाणावर उपस्थित रहा मा. नगर सेवक शेख करामत (Congressnews )

 

यावेळी कविता मुगले, वर्धा महिला महिला जिल्हाध्यक्ष
केशव तितरे,जयंत मानकर, आर्यन मुगले, ऋषिकेश मेश्राम, सुनीता

chhaganbhujbal:तळवेकर , विद्या बहेकार नागपूर जिल्हाध्यक्ष , साधना आंबुलकर नागपूर कार्याध्यक्ष इत्यादी समता सैनिक, कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेसच्या तिरंगा रॅली साठी मोठ्यप्रमाणावर उपस्थित रहा मा. नगर सेवक शेख करामत (Congressnews )

0

 

सय्यद जहीर लोणार /बुलढाणा

Congressnews:ऑपरेशन सिंदूरद्वारे पेहेलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याला भारताच्या तिन्ही सैन्य दलानी जश्यास तसे उत्तर देऊन पाकिस्तानी अतिरेक्यांचे अड्डे उध्वस्त केले व मोठा धडा शिकवला.

भारतीय सैन्य दलाने केलेल्या कारवाईचा समस्त भारतीयांना अभिमान आहे, या ऑपरेशन सिंदूर मध्ये आपल्या जीविताची आहुती देणाऱ्या व मोठी झुंज देणाऱ्या भारतीय सैन्याप्रती अभिमान व्यक्त करण्यासाठी, त्यांनी दाखविलेल्या शौर्याबद्दल मानवंदना देण्यासाठी,त्यांचे कौतुक करण्यासाठी 21मे 2025

दाभाडीत चोरी लाखोंचे ऐवज लंपास (Crimenews)

ला सकाळी 10 वाजता काँग्रेस प्रदेश अध्यक्ष मा.आमदार हर्षवर्धन सपकाळ( बंटी दादा) यांच्या आदेशान्वये जिल्हा अध्यक्ष (कार्यवाहक) प्रकाश पाटील यांच्या सूचनेनुसार प्रदेश सरचिटणीस श्याम ऊमाळकर, माजी जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव

घुमरे, पक्ष निरीक्षक वसंत देशमुख तालुका अध्यक्ष राजेश मापारी, गट नेते भुषान मापारी, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष मो.तोफिक कुरेशी, इतर सर्व काँग्रेस पद अधिकारी यांच्या नेतृत्वात लोणार शहरातून भव्य तिरंगा रॅली बुधवार दि 21 मे 2025 रोजी सकाळी 10:00 वाजता स्थळ:- लोणार बस स्टॅन्ड ला सुरवात ते हुतात्मा स्मारक, पंचायत समिती लोणार पर्यंत काढण्यात येत आहे.

Congressnews:तरी तिरंगा रॅली मध्ये माजी सैनिक, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील ,पक्षातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत राहावे अशी विनंती..

दाभाडीत चोरी लाखोंचे ऐवज लंपास (Crimenews)

0

 

मोताळा तालुक्यातील असलेल्या बोराखेडी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दाभाडी गावामध्ये काल रात्रीच्या सुमारास मलकापूर ते दाभाडी रस्त्यावरती असल्या दोन घरामध्ये चोरट्यांनी चोरी केली असून त्यामध्ये लाखो रुपयाचे मौल्यवान दागिने व रोख रक्कम लंपास केली आहे

मोताळा तालुक्यातील दाभाडी येथील विष्णू पांडुरंग टेकाळे हे आपल्या पत्नीसह राहतात मलकापूर ते दाभाडी रस्तावर त्यांचे घर असून काल रात्रीच्या सुमारास ते आपल्या घराच्या अंगणातच झोपले होते.

Ravikant tupkar Car Accdent/शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वाहनाला मध्यरात्री वाशीजवळ अपघात – मद्यधुंद ट्रक चालकाकडून गंभीर धडक, सुदैवाने तुपकरांसहित सर्वजण सुखरूप

सकाळी उठून पाहता तर त्यांच्या घरातील सर्वसामान अस्ताव्यस्त पडलेले होते व घरातील असलेले सोन्याचे मौल्यवान दागिने चोरले त्यांना निदर्शनास आले तर दुसरीकडे त्याच घरापासून काही अंतरावर असलेले किशोर पंढरी तळोले त्यांच्या घरात सुद्धा या ठिकाणी चोरी झाली.

Crimenews /असून त्यांच्या घरातील असलेले रोख रक्कम अंदाजे 50 ते 60 हजार रुपये घेऊन चोरटे पसार झाले आहे या घटनेमुळे दाभाडी परिसरामध्ये एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी बोरखेळी पोलीस दाखल झाले आहे

न्यायाची प्रतीक्षा दिव्यांग शाळा अधीक्षक समान वेतनश्रेणी पासून वंचित अजब अधिकाऱ्यांची गजब भूमिका (buldhana )

0

 

 

लोणार प्रतिनिधी सय्यद जहीर

दिव्यांगाच्या कल्यानार्थ समाज सेवि संस्थान मार्फत दिव्यांगाच्या विशेष निवासी शाळा, निवासी कर्मशाळा कार्यरत आहेत. यात दिव्यांग मुलांची वसतिगृहावर सर्व प्रकारची अत्यंत महत्वाची जबाबदारी हि वसतिगृह अधीक्षक / गृहपाल यांची असते यात 24 तास त्यांना शाळा स्तरावर मुख्यालयी हजर राहणे व आपल्या सामान्य मुलांपेक्षा या विशेष मुलांची काळजी घ्यावी लागते. असे करित असतांना या वसतिगृह अधीक्षक व गृहपाल यांनी शासनाकडे जेव्हा आम्ही विशेष पदवीका धारक आहोत तसेच आम्हच्या जबाबदारी चा कालावधी व जोखीम याच शाळेत कार्यरत विशेष शिक्षकांच्या तुलनेत जास्त असल्याने विशेष शिक्षकांना मिळणाऱ्या वेतन श्रेणीनुसार वेतन मिळावे याची मागणी होऊ लागली. अनेक वेळा दिव्यांग कल्याण, आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत वसतिगृह अधीक्षक व गृहपाल या पदाची वेतन श्रेणी सुधारणा करणे योग्य आहे.

जलजीवन मिशनमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यास त्याची जागा दाखवून देऊ डॉ. गोपाल बछिरे(lonarnews )

असे मत व्यक्त करण्यात आले आहे. परंतु वेळोवेळी पाठविलेल्या अहवाल त्रोतक स्वरूपाचे असल्याने परिपूर्ण प्रस्ताव वेतन त्रुटी निवारन समिती 2024 अन्वये गठीत समितीने पाठवावा असे दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय मुंबई यांनी मा. उच्च न्यायालय यांच्या आदेशानव्ये सादर करावयाच्या पत्रात नमूद केले.

सदर अहवाल पाठविण्यास दिरंगाई चीं परिसिमा ओलांडून झाल्यानंतर पण अहवाल शासनास प्राप्त होतं नसल्याने वेळोवेळी शासन स्तरावरून एकूण 12 स्मरण पत्र आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांना या प्रकरणी देण्यात आल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थिती मध्ये या कार्यरत वसतिगृह अधीक्षक व गृहपाल यांनी आपल्याला न्याय मिळावा व त्रुटी निवारण समितीचा अहवाल तात्काळ शासनाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवावा याकरिता मा. राज्यमंत्री ऍड. आशिष जयस्वाल यांच्याकडे मागणी धरून लावली त्यांनी पण या विषयावर सतत पाठपुरवठा केल्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांनां दप्ततर दिरंगाई करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यावर कठोर कार्यवाही व्हावी या करिता मा. मुख्यसचिव महाराष्ट्र राज्य यांना पत्र दिले. तसेच या प्रकरणी श्रीमती संगीता डावखरे सहाय्यक आयुक्त तथा अतिरिक्त कार्यभार

उपायुक्त, दिव्यांग कल्याण आयुक्तालंय पुणे यांनी मिळालेल्या अतिरिक्त कार्यभार चे सोने करत तसेच गठीत त्रुटी निवारण समिती अध्यक्ष असल्या कारणाने कोणत्याही समिती सदस्यांचे मत विचारात न घेता व अहवालावर स्वाक्षरी न घेता आपली मनमानी करत अहवाल आयुक्त दिव्यांग कल्याण यांची साथ घेत शासनाकडे पाठविला. हा अहवाल पाठवितांनी सामान्य मुलांच्या विविध विभागाच्या वसतिगृहावर काम करणाऱ्या अधीक्षकांपेक्षा दिव्यांग शाळेतील अधीक्षकांची जबाबदारी कामे कमी आहेत असे स्पष्टीकरण करून अहवाल असकारात्मक पाठविला.

मग काय? खरंच दिव्यांग शाळेतील वसतिगृहावर कार्यरत अधीक्षक व गृहपाल यांच्या जबाबदारी कमी? असा प्रश्न पडला… कदाचित श्रीमती डावखरं वेगळ्या विचारांनी ग्रस्त असेल त्यामुळे दिव्यांग मुलांची तुलना सामान्य मुलांप्रमाणे केली.?

सामान्य मुले अनेक कार्य स्वतः करतात तर दिव्यांग मुलांना हे करता येत नाही.. यावर जास्त सांगायचे झाले तर ज्या घरात दिव्यांग मुलं जन्माला येते त्या घरात किती मुलांचा सांभाळ करण्याच्या अडचणी येतात हे जावे त्यांच्या वंसा तेव्हाच कळे…! यावरून समजविणे चुकीचे होणार नाही. मुळात जर

दिव्यांग शाळाची आवश्यकता नसती तर एवढ्या कमी शाळांकरिता स्वतंत्र दिव्यांग कल्याण आयुक्तालंय वं त्यात श्रीमती डावखर यांच्या सारख्या अधिकारी यांना पण शिक्षण विभागात जेवढ्या शाळा आहेत तेवढ्या शाळा दिव्यांग कल्याण ला नसल्यामुळे यांची राज्यस्तरावर जबाबदारी कमी आहे.

त्यामुळे यांचा बेसिक इतर सहाय्यक आयुक्त च्या तुलनेत कमी व्हावा हे उचित होईल अशी दिव्यांग शाळा वसतिगृह अधीक्षक व कार्यरत गृहपाल यांची धारणा आहे. राज्य शासनाने दिव्यांग कल्याण विभाग वेगळं करून काहीही तिर मारलेला नसून या विभागाची प्रगती व विस्तारिकरणं करण्यात अशाच लालची वं सूडबुद्धीने काम करणाऱ्या लोकांमुळे राज्यात खालच्या स्तराला नेवून ठेवलेले आहे.

या विभागाला स्वतंत्र मंत्री वं राज्यमंत्री पण नाही अनेक वर्षांपासून या विभागाला मुख्यमंत्री महोदय स्वतःकडे ठेवतात या विभागाला न्याय देण्यासाठी वं अडचण दूर करण्याच्या दृष्टीने सतत पत्रव्यवहार हा कचऱ्याच्या ढीगाऱ्यात पडलेला दिसतो… मग न्याय कसे मिळणार…

महाराष्ट्र राज्य दिव्याग शाळा / कर्मशाळा संलग्न वसतिगृह अधिक्षक महासंघ.प्रवीण अवसरमोल महाराष्ट्र राज्य अपंग शाळा कर्मशाळा व अधीक्षक संघटना जिल्हा प्रतिनिधी..

जलजीवन मिशनमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यास त्याची जागा दाखवून देऊ डॉ. गोपाल बछिरे(lonarnews )

0

 

जनसामान्यांच्या तोंडाचा पाण्याचा घोट हिरावुन घेनार्यास सोडणार नाही

जनसामान्यस पिण्याच्या पाण्यापासुन वंचित ठेवणार्यास धडा शिकवणार :-डॉ.गोपाल बछिरे

प्रतिनिधि सैय्यद जहीर

Lonarnews:जनसामान्यांच्या हक्काच्या पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या व त्यांच्या तोंडाचा घोट हिरावून घेणाऱ्या भ्रष्टाचारी ठेकेदार व त्यांची पाठराखण करणाऱ्या अधिकाऱ्यास त्यांची जागा दाखविन्या करिता शिवसेना उबाठा चे जिल्हा संघटक डॉ.गोपाल बछिरे यांनी पंचायत समिती लोणार येथे आंदोलन करून निवेदन दिले.

Ravikant tupkar Car Accdent/शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वाहनाला मध्यरात्री वाशीजवळ अपघात – मद्यधुंद ट्रक चालकाकडून गंभीर धडक, सुदैवाने तुपकरांसहित सर्वजण सुखरूप

केंद्र सरकारने घर घर नल, नल मे जल, ही जल जीवन मिशन नावाची योजना प्रत्येक गावोगावी पूर्ण करण्यासाठी 2023 ची मुदत देण्यात आली होती आज 2025 हे वर्ष अर्ध्यावर आले परंतु ही योजना एकाही गावात पूर्णत्वास गेलेली नाही या योजनेत कोट्यावधीचा भ्रष्टाचार झालेला आहे, एकही काम पूर्ण झालेली नाही तरीपण त्या योजनेचे 70 ते 90% बिल काढून घेण्यात आलेले आहे.

यामध्ये ठेकेदार तथा त्यांची पाठ राखण करणारे अधिकारी सामील आहेत जनसामान्यांच्या हक्काच्या पाण्याचा घोट या लोकांनी हिरावून घेतला आहे व जन सामान्यांना जल जीवन मिशनच्या अंतर्गत पाणी उपलब्ध करून देण्यासाठी व त्या कामातील भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी पंचायत समिती लोणार येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे तालुकाप्रमुख ऍड दीपक मापारी, शहर प्रमुख गजानन जाधव शहर उपप्रमुख लूकमान कुरेशी शहर संघटक तानाजी मापारी, विभाग प्रमुख अशोक

Lonarnews / सरदार, वार्ड प्रमुख अमोल पसरटे, विभाग प्रमुख रामा मोरे विभाग प्रमुख तानाजी अंभोरे अशफाक खान यांनी आंदोलन करून जल जीवन मिशनची आजपर्यंतच्या संपूर्ण कामाची माहिती द्या, जलजीवन मिशनचे काम पूर्ण का झाले नाही याचे कारण द्या, अशा प्रकारची मागणी जिल्हा परिषद पाणीपुरवठा अभियंता लोणार यांना निवेदन देऊन करण्यात आली

Ravikant tupkar Car Accdent/शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वाहनाला मध्यरात्री वाशीजवळ अपघात – मद्यधुंद ट्रक चालकाकडून गंभीर धडक, सुदैवाने तुपकरांसहित सर्वजण सुखरूप

0

 

लातूरवरून जालन्याकडे निघाले होते तुपकर..

अपघात की घातपाताचा प्रयत्न..??पोलिसांकडून दोन्ही बाजूने तपास सुरु..

Ravikant tupkar Car Accdent:वाशी (धाराशिव) – सध्या कर्जमुक्तीच्या मागणीवर राज्यभरात आक्रमक आंदोलन सुरू केलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वाहनाला रविवारी (दि. १८ मे) रात्री १२.३० -१ वाजेच्या दरम्यान वाशी तालुक्यातील पारगाव टोलनाक्यावर अपघात झाला.मद्यधुंद अवस्थेतील ट्रक ड्राइव्हर ने भरधाव ट्रकची इनोव्हा ला मागून धडक दिली. सुदैवाने यात कुणाला जीवितहानी व गंभीर दुखापत झाली नाही.गाडीतील दोघांना किरकोळ मार लागला आहे.

रविकांत तुपकर यांना लोकवर्गणी तुन लोकांनी दिलेली ‘लोकरथ’ नामक इनोव्हा (क्रमांक MH 28 BQ 9999) पारगाव टोल नाक्यावर थांबलेली असताना मागून भरधाव वेगात आलेल्या साखरेने भरलेल्या ट्रकने (MH 44 U 1444) गाडीला जोरदार धडक दिली. ट्रक चालक अत्यंत मद्यधुंद अवस्थेत होता. या धडकेचा आवाज इतका जबरदस्त होता की स्फोट झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. गाडीतील मागील सीटवर बसलेले लोक अक्षरशः समोर फेकले गेले.

Devendrafadnvis / माझ्या वाढदिवसाच्या निमीत्ताने लावलेल्या संञाची फळ खाण्यास मी नक्की येईल मुख्यमंत्री देवाभाऊ यांचं आश्वासन

या अपघातात सुदैवाने रविकांत तुपकर यांना कोणतीही दुखापत झाली नसून ते पूर्णतः सुरक्षित आहेत. मात्र गाडीत त्यांच्यासोबत असलेले पीए कार्तिक सवडतकर व राजाराम जाधव यांना सौम्य मार लागला आहे. तर चालक अजय मालगे व तुपकरांचे सहकारी गजानन नाईकवाडे यांना कोणतीही दुखापत नाही.Ravikant tupkar Car Accdent

ट्रक चालक हा दारूच्या नशेत होता, अपघातानंतर तो सारखे खोटे बोलत होता व माहिती लपवण्याचा प्रयत्न करत होता.अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, परिस्थिती चे गांभीर्य ओळखून चालकासह ट्रकमधील किनर ला पोलिसांनी ताब्यात घेतले असून साखरेने भरलेला ट्रकही जप्त करण्यात आला आहे.

हा अपघात होता की घातपाताचा प्रयत्न, याबाबत अनेक शंका उपस्थित होत असून पोलिसांकडून दोन्ही बाजूंनी सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संग्राम थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

रविकांत तुपकर हे राज्यात कर्जमुक्तीच्या प्रश्नावर दौऱ्यावर आहेत. नुकतेच त्यांनी नाशिक, परभणी, बीड येथील दौरे पूर्ण केले असून आज अंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथे ‘कर्जमुक्ती एल्गार सभेला संबोधित केले. सभा आटोपून त्यांनी लातूर जिल्ह्यातील तांदुळजा येथे कार्यकर्त्यांसोबत स्नेहभोजन घेतले व त्यानंतर रात्री ११ वाजता जालन्याच्या ते दिशेने मार्गस्थ झाले असताना वाशी जवळ हा अपघात घडला.

Ravikant tupkar Car Accdent / या अपघातामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राज्यभर मोठी खळबळ उडाली होती. मात्र तुपकर हे पूर्णतः सुरक्षित असल्याचे समजताच सर्व कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास घेतला. या अपघाताचे गांभीर्य लक्षात घेता संबंधित यंत्रणांकडून सखोल व सर्व बाजुनी चौकशी व्हावी अशी मागणी क्रांतिकारी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. ट्रक चालक संभाजी डोंगरे (पंढरपूर )याचेवर वाशी पोलीस स्टेशन ला कलम 281,कलम 185 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कायदेशीर प्रक्रिया सकाळी 5 वाजेपर्यंत चालू होती.

युवकाच्या अंगावर वीज पडून मृत्यू (brekingnews )

0

 

प्रतिनिधी सय्यद जहीर

brekingnews:लोणार तालुक्यातील हिवराखंड येथे दिनांक 17 .5 .2025 रोजी संध्याकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान युवक शंकर प्रभू खंड वय पंधरा वर्षे याच्यावर वीज पडून मृत्यू झाला याबाबत सविस्तर असे की बिबि परिसरामध्ये संध्याकाळी पाच वाजल्यापासून सुसाट हवा,पाऊस आणि विजाचा करकाडात होत होता त्यादरम्यान हिवराखंड येथील शंकर खंड व त्याच्या मामाचा मुलगा शेतामध्ये दूध काढण्यासाठी गेला होता.

Devendrafadnvis / माझ्या वाढदिवसाच्या निमीत्ताने लावलेल्या संञाची फळ खाण्यास मी नक्की येईल मुख्यमंत्री देवाभाऊ यांचं आश्वासन

परंतु गोट्याजवळच वीज पडल्यामुळे त्या विजेमध्ये शंकर प्रभू खंड हा जागीच ठार झाला व त्यांचा मामाचा मुलगा ओम अंबादास लबडे राहणार लेंडी पिंपळगाव वय सोळा वर्ष तालुका सिंदखेडराजा याच्या हाताला किरकोळ दुखापत झाल्याचे समजते.

brekingnews:हि घटना घडली त्या वेळी बाजुला युवकाचे वडील प्रभुराव खंड होते एकुलत्या एका पोराचा बापिने डोळयात देखत पाहीला मुत्यु