Home Blog Page 306

विकास सहयोग प्रतिष्ठान संस्थेला भारतीय सेवा रत्न बेस्ट एन जी ओ अवार्ड प्रदान

0

 

 

ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशन तर्फे देण्यात येणारा भारतीय सेवा रत्न बेस्ट एन जी ओ अवार्ड या वर्षी विकास सहयोग प्रतिष्ठान या संस्थेला पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा यांच्या हस्ते संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन सुर्वे यांना सन्मानित करण्यात आले.

या सोहळ्याच्या निमित्ताने विशेषत्वाने विदर्भा सारख्या दुष्काळी पट्ट्यामध्ये सात हजार परिसर पोषण बाग तयार करून हि संकल्पना सर्वत्र राबवण्यात येत आहे. या संकल्पनेतून महिलांना लघु उद्योगासाठी सहकार्य व मार्गदर्शन संस्था करत आहे. बुलढाणा, अमरावती येथील शेतकरी यांना शेतीची अवजारे आणि शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री व महिला बचत गटांना शेळी पालन व्यवसाय उभे करण्यास वेगवेगळ्या देणगीदार यांच्या कडून आर्थिक सहकार्य उपलब्ध करून देण्यात आले.बुलढाणा मधील मेहकर शेगाव संग्रामपूर जळगाव सारख्या तालुक्यामध्ये पाण्याच्या दुष्काळी परिस्थितीत टँकरने पाणी वाटप करून गावकऱ्यांची तहान भागविली, तसेच मेहकर मधील डोंगरिभागात ३री ते ५वि च्या मुलांसाठी गुणवत्तापूर्ण वर्ग चालवून मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवले, धारणी येथील डोमा या गावातील आरोग्य केंद्र दुरुस्त करून दिले. शेतीच्या नव नवीन संकल्पनेतून शेंद्रीय शेतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष केंद्रित करून त्यांचे प्रशिक्षण व मातीची तपासणी करून पाचशे शेतकऱ्यांना निसर्ग शेती करण्यास मदत केली. या कामाचे विशेष कौतुक करण्यात आले.

या कार्यक्रमाला भारतातील जम्मू कश्मीर, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, बेंगळूरु, पच्छिम बंगाल,पंजाब, हरियाना या राज्या मधून सामाजिक प्रश्नावर काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था प्रतिनिधी, प्रत्रकार व लेखक मंडळीनी या सोहळ्यात सहभाग घेतला होता.

निराधारांचा त्रास आणखी वाढविला हयातीच्या प्रमाणपत्रा सोबत निराधारांना उत्पन्नाचे प्रमाणपत्र देणे अनिवार्य

0

 

हिंगणघाट: -5 मे दुपारी 12 वाजता तहसील कार्यालयात पटवारी कार्यालय हिंगणघाट येथे म्हाताऱ्या , अपंग निराधार लोकांची गर्दी झाली होती आणि पटवारी कार्यालय बंद करून वर्धा येथे गेले होते . आज कार्यालय बंद राहणार हे माहीत असूनही पटवारी यांनी त्यांना आज बोलावले होते . आणि ही अपंग निराधार लोकांची गर्दी आजच नाही तर गेल्या दीड , दोन महिन्यापासून सतत लोक पटवारी कार्यालय ला गर्दी करत आहे . आज मे महिन्यातील उन 47,48 डिग्री उन्हाचा तडाखा 4 महिन्या पासून निराधारांच्या मानधन अडवल्या गेले आणि सरकारने म्हातार्या निराधार अपंग विधवा लोकाना तहसील चे चकरा मारण्यास मजबूर केले आहे कारण दरवर्षी लागणाऱ्या हयतीच्या प्रमाणपत्र सोबत आता 21000 चे उत्पन्न प्रमाणपत्र ही त्यांना मागितल्या जाते आणि थंब घेण्यासाठी त्यांना बोलल्या जाते.
व पटवारी साहेब चौकशी करतो म्हणून टाळाटाळ करतात बिचारे निराधार रोज पटवारी कार्यालय ला उन्हा तानात पायदळ येतात . यावर आमदार समीर कुणावर व तहसीलदार यांना वारंवार सांगितले एवढेच नव्हे तर मंत्रालायात विशेष सहाय्य विभागाची भेटही घेतली पण सरकार आणि प्रशासना चे या कडे लक्ष देण्याचा काही हेतू दिसत नाही या म्हातार्या निराधारांना भर उन्हाच्या तडाख्यात काही झाले तर सरकार आणि प्रशासनच जबाबदार राहतील ?
निराधारांना आधीच 1000 रू तुटपुंजे मासीक अनुदान देवून त्यांची क्रूर थटा केली जाते .व 4, 5 महिने रेगुलर मानधन दिल्या जात नाही अडविल्या जाते . आमदार ,खासदार , नगरसेवक , सरपंचांनी आप आपल्या गावातील एरियात निराधारांना त्रास होऊ नये यासाठी ही लक्ष घातले पाहिजे कारण निराधारांच्या वाली कोणीच नाही . 21000 उत्पन्न दाखला नाही मिळाला तर त्यांचे येत असलेले निराधार मानधन बंद पडेल आणि निराधार वर्ग पुन्हा रस्त्यावर येईल अशी चिंता निराधार संघटनेचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मंगला ताई ठक यांनी दर्शविली आहे.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

दोन समाजामध्ये अफवा पसरवुन गैरसमज निर्माण करण्याचा जर कुणी प्रयत्न केला तर अशा व्याक्तीवर कायद्याशीर कारवाई होणार

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

सोशल मिडियाच्या माध्यमातुन अफवा पसरवुन गैरसमज निर्माण करून दोन समाजात तेढ निर्माण करीत शांतता बिघडवण्याचा व समाज एकोप्याला जर कुणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर ती कुणी ही आणी किती ही मोठी व्याक्ति असो त्याच्यावर कायद्याशीर कारवाई करण्याचा सुचक ईशारा यावल येथील शांतता समितीच्या बैठकीत फैजपुर विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी डॉ . कुणाल सोनवणे यांनी पोलीस प्रशासनाच्या वतीने दिला. यावल येथील पोलीस ठाण्याच्या आवारात आज दिनांक ४ मे२०२२ रोजी फैजपुर विभागाचे विभागीय पोलिस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आणी सहाय्यक पोलीस अधिक्षक अतिश कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता समितीची बैठक संपन्न झाली या बैठकीला शांतता समितीचे जेष्ठ सदस्य हाजी शब्बीर खान मोहम्मद खान , प्रमोद यशवंत नेमाडे, माजी नगरसेवक दिपक बेहडे , राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले , शिवसेनेचे शहरप्रमुख जगदीश कवडीवाले , हाजी गफ्फार शाह, गोपाळसिंग पाटील , भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे , शिवसेनेचे तालुका उपप्रमुख शरद कोळी , माजी नगरसेवक गुलाम रसुल मेंबर , भाजपा शहराध्यक्ष निलेश गडे, तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन अमोल भिरूड . शिवसेनेचे पप्पु जोशी, राष्ट्रवादीचे सईद शेख रशीद , हबीब शेख मंजर यांच्यासह आदी मान्यवर मंडळी या बैठकीस उपस्थित होते .सद्या काही असामाजीक विघ्नसंतोषी मंडळी कडुन अफवा फसरवुन शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात येत असुन, सर्व जातीधर्माच्या नागरीकांनी असा कुठल्याही अफवांना बळी न पडता आपल्या शहराची व परिसराची शांतता राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी विभागीय पोलीस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे व सहाय्यक पोलीस अधिक्षक IPS अतिश कांबळे यांनी उपस्थित नागरीकांना केले .

भेंडवड भाकिते म्हणजे विज्ञान युगातील थोतांड

0

 

जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथे अक्षय तृतीयेच्या दिवशी गावाबाहेर शेतात घटमांडणी करून जे काय भाकीत वर्तविण्याची ची प्रथा परंपरा आहे हे भाकीत केवळ एक थोतांड आहे. संभाव्यतेच्या नियमावर आधारित असं भाकित कोणीही शिकलेला किंवा न शिकलेला निरक्षर व्यक्ती देखील परिस्थितीजन्य तार्किक विचार करून एकंदरित पर्जन्यमानाचा, हवामानाचा,पर्यावरणाचा शासकीय कार्यालयात वर्तवलेल्या अंदाजांचा अभ्यास करुन असे भाकिते वर्तवले जाऊ शकतो.असे म्हटल्या जातं की चंद्रभान वाघ या व्यक्तीला निलवंती नावाची विद्या प्राप्त होती आणि आता जे पुंजाजी रामदास वाघ भाकित करतात ते त्यांचेच वंशज आहेत .खरंच या कुटुंबामध्ये जर अशी निलवंती किंवा कुठलीही अलौकिक शक्ती किंवा अतिंद्रिय शक्ती जर अस्तित्वात असेल तर यांनी ते सिद्ध करण्यासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे 25 लाखाचे आव्हान स्वीकारावे. देशातील अर्थव्यवस्था, शासन व्यवस्था, संरक्षण व्यवस्था, पर्जन्यमान आणि पीक पाणी इत्यादी वेगवेगळ्या विषयावर हे भविष्य वर्तवतात. खरच हे भविष्य संपूर्णपणे खरे ठरतात का ? संभाव्यतेच्या नियमानुसार शंभर भाकिते जर कोणी सांगितली तर त्यातली 50% भाकिते खरी ठरण्याचा संभव हा निश्चितच असतो. त्याचप्रमाणे असं म्हटलं जातं की तीनशे ते साडेतीनशे वर्षाची भाकिते वर्तवण्याची परंपरा या घराला लाभलेली आहे . परंतु प्रत्यक्ष चौकशी केली असता यांच्याकडे 300 वर्षाचे कुठलेही पुरावे नाहीत.भाकिते वर्तवण्याचे पुरावे तर नाहीतच परंतु तीनशे वर्षांपासून आम्ही वर्तवलेलं भाकित हे खरे ठरतात हे देखील पुरावे त्यांच्याकडे उपलब्ध नाहीत. आता या घराण्यातील वारस पुंजाजी वाघ हे अत्यंत साधे भोळे व्यक्ती आहेत. परंतु त्यांच्या भावबंदकितील जे सारंगधर वाघ आहेत हेच तार्किक विचार करून भाकित वर्तवण्याचे लुडबूड करताना दिसून येतात. ही फक्त एक अंधश्रद्धा आहे असे शेतकऱ्यांनी आणि या शेतकऱ्याच्या भावी पिढीतील युवकांनी अशा थोतांडावर विश्वास न ठेवता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपली शेती करावी बळीराजानी अशा अंधश्रद्धेला बळी पडू नये ही विनंती करत आहोत. 25 लाखाचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अवाहन आहेच. यांनी सांगितलेले भाकिते खरच तपासून पाहिले तर अलीकडच्या 20-25 वर्षातील भाकिते पूर्णपणे खरे ठरल्याचे दिसून येत नाही. मागील वर्षीचे जर यांचे भाकीत तपासले तर यांनी असं म्हटलं होतं की कपाशीचे पीक उत्तम येईल पण कपाशी नाममात्र पीक आले.हरभरा पीक साधारण सांगितले होते पण सर्वत्र ते पीक उत्कृष्ट आले. उडीद मुगाचे पिके साधारण राहील परंतु उडीद मुगाचे पीक हे त्यांच्या तालुक्यामध्ये शून्य होते. घटमांडणी मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धान्य ठेवतात परंतु कपाशीनंतर सोयाबीनचा पेरा असतो तरी घटमांडणी मध्ये सोयाबीनला मात्र थारा नाही. कारण सोयाबीनचे पीक हे या भागांमध्ये आलीकडे म्हणजे जवळ जवळ 30 वर्षापासून जास्त प्रमाणात घेतल्या जात आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या घटामध्ये कुरडई, करंजी ,पुरी या सारख्या पदार्थांचा वापर करतात किंवा यासारखे पदार्थ तिथे त्या साहित्यामध्ये मांडतात वास्तविक हे पदार्थ तर महिलाच बनवतात परंतु या ही घटमांडणी जेव्हा चालते त्या परंपरेमध्ये त्या कुठेही महिला समाविष्ट झालेली दिसून येत नाही .वास्तविक त्यांना तिथे प्रवेश दिला जात नाही. आणि हे घटमांडणी गावाबाहेर शेतामध्ये केल्या जाते आणि आतापर्यंत तिथे कुठेच महिला उपस्थित दिसत नाही म्हणजे तिथे स्त्री-पुरुष असमानता देखील जोपासल्या जात नाही. अशा भाकितांवर विश्वास ठेवून जर बळीराजा आपले निर्णय घेत असेल तर जग चालले पूर्वेकडे आणि आम्ही चाललो पश्चिमेकडे अशी आपली दुर्दशा होण्यास वेळ लागणार नाही. जादूटोणा विरोधी कायद्या 2013 नुसार असे अंधश्रद्धा युक्त कार्यक्रम पसरवणे अंधश्रद्धेचे भाकिते करणे ,आमच्यामध्ये किंवा आमच्या वारसाकडे किंवा आमच्या कुटुंबाकडे काहीतरी अलौकिक ,अद्वितीय शक्ती आहे असे म्हणणे हे गुन्हा पात्र कृतीमध्ये मोडते. अशा गुन्हा पात्र कृती केल्यास या कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊ शकतो.
—- प्रतिभा भुतेकर ,आखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती ,महिला अध्यक्ष जिल्हा बुलडाणा. जादुटोणा प्रतिबंध कायदा (PIMC govt.of maha.) अशासकिय सदस्य बुलडाणा

टिपू सुल्तान शहीद दीनानिमित्त ग्रामपंचायत ला प्रतिमा भेट

0

 

संग्रामपूर प्रतिनिधी
आज दि. 4 मे रोजी टिपू सुल्तान शहीद दिनानिमित्त वरवट बकाल येथील मुस्लिम युवकांनी ग्रामपंचायत ला टिपू सुल्तान यांची प्रतिमा भेट देऊन एक आदर्श निर्माण केला.
टिपू सुलतान त्या मोजक्या राज्यकर्त्यांमधून आहे जो इंग्रजांसमोर एक शूर योद्धा म्हणून उभा राहीला,निडरतेने इंग्रजांविरुद्ध लढला आणि लढता लढता शहीद झाला!
टिपू सुल्तान ने स्वतःहा पुढाकार घेऊन मराठ्यांना व निजामला पत्रव्यवहार करून हे सांगितल. टिपूने स्वतःहा इंग्रजांच्या विरुद्ध युद्ध केले, इंग्रजांच्या नाकी नऊ आणले. भूमीसाठी अन्यायाविरुद्ध लढता लढता रणांगणात शहीद झाले मात्र माघार घेतली नाही, इंग्रजांसमोर झुकले नाही!
टिपू सुलतान म्हणजे एक आदर्श प्रजाहितवादी,प्रचंड दूरदृष्टी असणारा राज्यकर्ता होता. शेतकऱ्यांसाठी त्या काळी नवनवीन व शेतकरी हिताचे धोरण त्यांनी त्याच्या राज्यात राबवले.अस्पृश्यते विरुद्ध लढला,जातीधर्माच्या नावाने कधी भेद केला नाही. मंदिरांना देणग्या ते द्यायचे. गोरगरिबांसाठी कल्याणकारी योजना ते राबवायचे त्याच्या राज्यात त्यांनी सविस्तर सर्वेक्षण आणि वर्गीकरणावर आधारित भू-महसूल यंत्रणा तयार केली, ज्यामुळे कर पद्धत सुधारली गेली ज्याने राज्याच्या संसाधनाचा मार्ग विस्तृत झाला. त्यांनी शेतीचे आधुनिकीकरण केले, पडीक जमीन विकसित करण्यासाठी कर खंडित केला, सिंचन पायाभूत सुविधा बांधल्या आणि जुनी धरणे दुरुस्त केली,कृषी उत्पादन व रेशीम संवर्धनास चालना दिली.
त्यांनी व्यापाराला आधार देण्यासाठी नौदल बांधले आणि कारखाने उभारण्यासाठी “राज्य कमर्शियल कॉर्पोरेशन” ची स्थापना केली. म्हैसूरचे चंदन, रेशीम, मसाले, तांदूळ आणि गंधक यांचा व्यापार केल्यामुळे टिपूच्या राजवटीत व परदेशातही जवळपास 30 व्यापार चौकी उभारण्यात आल्या होत्या.
टिपूने आपल्या सैन्याची पुनर्रचना केली, नवीन तंत्रज्ञान वापरले,युद्ध मैदानावरील ते उत्कृष्ट स्टॅटर्जी मेकर होते.टिपू सुलतानने युद्धात रॉकेट तंत्रज्ञानाचा मोठा वापर केला.म्हणूनच टिपूचा मिसाईलमॅन म्हणून देखील गौरव केला जातो. प्रतिमा भेट देऊन सरपंच प्रतिभा इंगळे यांनी टिपू सुलतान यांच्या फोटोला हारार्पण करून वंदन केले. ह्यावेळी सरपंच प्रतिभा इंगळे, ग्रा प सदस्य संतोष टाकळकर, विशाल बकाल पाटील, राजू राठोड, पंकज इंगळे, शेख रहीम भाई, शेख कारीस. जलील, शे. नईम, शेख सलीम, शेख जावेद, शे. झाकीर, शे. इद्रिस, शे. सिद्दीक, शे. रेहान, नारायण, गणेश माकोडे, विजय वानेरे, राजू टाकळकर, प्रल्हाद धुर्डे, संदीप ढगे सह आदी उपस्थित होते.

घुग्घुस राजीव रतन चौक ते म्हातारदेवी लॉयड मेटल वसतिगृहा पर्यंत रोड त्वरित बनवा

0

 

यंग चांदा ब्रिगेड ची निवेदनातुन मागणी

घुग्घुस राजीवरतन चौक ते म्हातारदेवी लॉयड मेटल वसतिगृहा पर्यंत. रोड वर खूप मोठ-मोठे खड्डे पडलेले व दुर्दैवी अवस्था झालेली आहे. हा रोड चंद्रपूर नागपूर हायवे ला जोडणारा आहे. या मार्गांवर खूप मोठ्या प्रमाणात ये-जा असते व रस्त्यावर अपघात होन्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर बनवा अन्यथा 3 दिवसात तीव्र रस्ता रोको आंदोलन.

करण्यात येणार व लॉयड मेटल आणि गुप्ता कोलवाशरी ची संपूर्ण जडवाहतूक रोकन्यात येणार. हा रस्ता लॉयड मेटल आणि गुप्ता कोलवाश नी बनवून देण्याकरिता या दोन्ही कंपन्याना निवेदन देण्यात आले.यावेळी यंग चांदा ब्रिगेड चे नेते इमरान खान,स्वप्नील वाढई,नागेश तुरानकर,पराग आकूलवार,मंगेश हिरादेवे,अनुपम पाटील,अमन लिपटे उपस्थित होते.

जंगलात फिरायला गेलेल्या प्रेमीयुगुलांवर वाघाचा हल्ला

0

 

गडचिरोली:- गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाघांचे माणसांवर हल्ले करण्याच्या घटना वारंवार घडत आहे. वाघाच्या हल्ल्यात अनेकांचा हकनाक बळी गेला आहे. अशीच एक घटना गडचिरोलीमध्ये घडली आहे. मैत्रिणीसोबत फिरण्यासाठी आलेल्या तरुणावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील उसेगावच्या जंगलात ही घटना घडली आहे. अजित नाकाडे असं मृत तरुणाचे नाव आहे. देसाईगंज तालुक्यात कोरेगाव चोप इथं राहणार अजित नाकाडे हा आपल्या मैत्रिणीसोबत उसेगावच्या जंगलात फिरण्यासाठी आला होता. जंगलात फिरत असताना त्यांना काही स्थानिकांनी पाहिले आणि हे वाघाचे क्षेत्र आहे, पुढे जाऊ नका असा सल्ला दिला होता.

पण, ग्रामस्थांना सल्ला झुगारून अजित आपल्या मैत्रिणीसोबत जंगलात फिरण्यासाठी गेला. जंगलात एका ठिकाणी बसलेले असताना अचानक वाघाने दोघांवर हल्ला केला. वाघाने अचानक हल्ला केल्यामुळे दोघांचा एकच गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी दोघांनी प्रयत्न केला.

पण, वाघाने तोपर्यंत अजितचा पडशा पाडला होता. तर त्याची मैत्रीण जखमी झाली जंगलात आरडाओरडा ऐकू आल्यामुळे ग्रामस्थांनी धाव घेतली. त्यामुळे वाघाने जंगलात धूम ठोकली.

घटनेची माहिती तातडीने वनअधिकाऱ्यांना देण्यात आली. वनअधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत अजितचा मृतदेह जंगलातून आणण्यात आला आहे, तर जखमी तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे

मनोज मानतकर याने केली तरुणीला मूग्गीचे औषध देवून फसवणुक

0

 

उषा पानसरे मू.का. सपादक मो. 9921400542 असदपूर

गुंगीचे औषध देऊन केले जबरीने लग्न फक्त मुन्ना उर्फ मनोज नानाजी मानतकर या नराधमाने केली तरुणी मुलीची फसवणूक
पंजाबराव देशमुख स्पोर्टिंग क्लबचे सचिव मनोज मानतकर याने शिवणी रसुलापूर येथील एका मुलीशी खोटं आश्वासन देऊन व स्पोर्टचे प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे देण्याचे सांगून सदर मुलीला फुबगाव येथून एका लग्न समारंभातुन स्वतःच्या गाडीने अमरावती येथे नेऊन गाडीतच कोल्ड्रिंक्स मध्ये गुंगीचे औषध देऊन माझ्या लग्नाच्या कागदपत्रांवर सह्या घेतल्या आणि सदर मुलगी सह्या करत नहोती म्हणून तिला जीवे मारण्याची धमकी दिली असे पोलिसांत झालेल्या तक्रारीत नमूद आहे मुलीच्या तक्रारी वरून पोलिसांनी गंभीर गुन्हे दाखल केले आहे त्यात ३२८,३६६,४९४,५०१,५०६,३४ कलमा दाखल आहेत मात्र यात आरोपी मनोज मानतकर फरार असून पुढील तपास पोलीस करीत आहे शी चर्चा जोर धरत आहे विशेष बाब सदर आरोपीचे लग्न झालेले असून त्याला एक मुलगा सुद्धा आहे यापूर्वी सुद्धा मानतकर यांचे विरुद्ध फसवणुकीचे ४२० या सारखे अनेक गुन्हे दाखल आहे

घुग्घुस एआयएमआयएम पार्टीतर्फे शेवयी वाटप

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

मंगळवार 3 मे रोजी सकाळी 9:30 वाजता येथील एआयएमआयएम पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयासमोर “रमजान ईद” निमित्त नागरिकांना शेवयी वाटप करण्यात आली व सर्वांना रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी शहराध्यक्ष सानू सिद्दीकी, इस्लाम शेख, फैजान शेख, मोईन खान, अनिस भाई, माशुक सिद्दीकी, इमरान शेख, फैजान सिद्दीकी, सोनू किंग, सोहराब खान, सोनू किंग मोशिम सिद्दीकी व कार्यकर्ते उपस्थित होते.

विश्वशांती व राष्ट्रीय एकात्मतेसाठी सामुहिक नमाज पठणात प्रार्थना करून पवित्र रमजान महीन्याची सांगता झाली

0

 

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

जगात व आपल्या देशात राष्ट्रीय एकात्मता आणी सर्वधर्मीय समाज बांधवांमध्ये अमन शांती आणी भाईचारा कायम राहावा यासाठी ईदगाह मैदानावर मुस्लीम बांधवांच्या वतीने रमजान ईदच्या सामुहीक नमाज पठणा नंतर मौलाना सैय्यद समीउल्ला कादरी यांच्या वतीने प्रार्थना करण्यात आली व नमाज पठणानंतर पवित्र रमजान महीन्याची सांगता झाली . यावल येथील ईदगाह मैदानावर आज दिनांक ३ मे मंगळवार रोजी सकाळी ८ , ४५ वाजता मुस्तीम बांधवांच्या पवित्र रमजानच्या पार्श्वभुमीवर संपुर्ण महीनाभर ठेवण्यात येणाऱ्या रोजे ( उपवासा ) ची सामुहीक नमाज पठणानंतर सांगता झाली . कोरोना संसर्गाच्या प्रार्दुभावामुळे मागील दोन वर्षाच्या कार्यकाळात नंतर ईदगाह च्या मैदानावर सामुहीक नमाज पठण करण्यात आल्याने मुस्लीम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण होते , मौलाना सेय्यद समीउल्ला कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली ईदगाह मैदानावर हजारो मुस्लीम बांधवांनी नमाज पठण केले . याप्रसंगी ईदगाह मैदानावर मुस्लीम कांधवांना शुभेच्छा देण्यासाठी यावल तहसीलचे निवासी नायब तहसीलदार आर के पवार , सहाय्यक पोलीस अधिक्षक आयपीएस अधिकारी आतिश कांबळे , माजी आमदार रमेश चौधरी , काँग्रेस कमेटीचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान कॉंग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष प्रमाकर अप्पा सोनवणे , राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले, ईदगाह कमेटीचे अध्यक्ष हबीब शेख नसीर, उपाध्यक्ष शेख करीम शेख रज्जाक,सचीव अस्लम शेख नबी ,खजिनदार हाजी हकीम शेख अल्लाऊदीन , नरईस शेख, हाजी गफ्फार शाह , हाजी फारूख शेख , युसुफ खान , रशीद खान , शेख ईमाम, शेख अल्ताफ , रशीद खान, अन्सार सर यांच्यासह कॉंग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष कदीर खान , राष्ट्रवादीचे शेख सईद रशीद, मोहसीन खान , युवक काँग्रेसचे फैजान शाह, पुंडलीक बारी आदी मान्यवर उपस्थित होते .