Home Blog Page 313

पोलिसांच्या समस्या सोडवा : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0

 

उषा पानसरे मू.का. संपादक असदपूर मो.992140042

देगलूर, नांदेड : पोलीस विभागातील सर्व पोलीस बांधव जनतेच्या सुरक्षिततेसाठी सातत्याने आपले कर्तव्य बजावित असतात. दिवाळी आली पोलीस, होळी आली पोलीस, ईद आली पोलीस, राजकीय नेते आले पोलीस, हत्या झाली पोलीस, भांडण झाले पोलीस, अपघात झाला पोलीस, मतदान प्रक्रिया पोलीस, चोरी झाली पोलीस, मारामारी झाली पोलीस अशा विविध ठिकाणी पोलिसांना आपले कर्तव्य बजावावे लागते. काहीवेळा स्वतःच्या कुटुंबांसाठीही वेळ देता येत नाही. म्हणून पोलिसांच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली मा मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना उपजिल्हाधिकारी कार्यालय, देगलूर यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे देगलूर तालुका अध्यक्ष सुनील मदनूरे, तालुका संघटक मारोती देगावकर, मनोज बिरादार, तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत गज्जलवार, तालुका सचिव संतोष मनधरणे, तालुका कोषाध्यक्ष ईश्वर देशमुख, देगलूर शहर अध्यक्ष उमाकांत कोकणे, अनिल पवार, दादाराव वेळीकर, मल्लिकार्जुन कडलवार, अमित पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड व जिल्हा संपर्क प्रमुख विशाल पवार यांच्या नेतृत्वाखाली देगलूर तालुका अध्यक्ष सुनील मदनुरे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील तमाम पोलीस बांधवांच्या विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. मागण्या अशा : पोलिसांना सुंदर कॉर्टर बनवून देणे, पोलिसांना टी. ए. वाढवून देणे, पोलिसांची ड्युटी आठ तास करणे, पोलीस कर्मचाऱ्यांना पगार वाढवून देणे, एखादा पोलिस कर्मचारी ड्युटीवर शहीद झाला तर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करणे व त्यांच्या वारसाला तात्काळ नोकरीत समाविष्ट करणे, पोलीस कर्मचाऱ्यांना २००५ पासून बंद झालेले पेन्शन पूर्ववत करणे, महाराष्ट्रातील पोलीस ठाणेमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे, पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांना पोलीस नोकरी मध्ये पाच टक्के आरक्षण देणे अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
न्यूज रिपोर्टर उषा पानसरे अमरावती

शेगांव पंचायत समितीवर प्रहार

0

 

शेगाव प्रतिनिधी अर्जुन कराळे

शेगाव : गायगाव बु येथे भीषण पाणीटंचाई असल्यामुळे दिनांक 15 मार्च 22 राजी bdo साहेब पंचायत समिती शेगांव यांना समस्या निराकरण होण्या साठी ग्रामस्थ व प्रहार शाखा अध्यक्ष वव कार्यकर्ते यांनी दिले परंतु प्रशासनाने दाखल न घेतल्यामुळे प्रहार कार्यकर्ते तसेच गावकरी महिलां च्या वतीने पंचायत समिती कार्यालयात हांडे बजाव आंदोलन करून मागण्या मंजूर होईपर्यत ठिया दिला या आंदोलनात प्रहार जिल्हा उपाध्यक्ष निलेश घोंगे, दीपक ढगे, विलास वानखडे,महादेव सेलरकर, रेखा शेलरकर, वत्सला ढगे, सखुबाई सोनोने,रामा बोरसे,विलास शेलरकर,गजानन अडायकर, देवलाल ढगे,स्वप्नील सोनोने,संतोष निकडे,नावलसिंग पवार,शिवा अडायकर,गोपाळ शेलार

यावल तालुक्यात परप्रांतातुन आयात होणाऱ्या गुटका पानमसालाची सर्रास विक्री होत असुन ,अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाचे अर्थपुर्ण दुर्लक्ष

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यात मानवी आरोग्यास व जिवनास अत्यंत धोकादायक असा गुटका पानमसाला हा कुणाचीही भिती न बाळगता तालुक्यात सर्वत्र सार्वजनिक ठीकाणी सर्रासपणे विक्रीला जात असुन, या कडे संबधीत विभागाचे अर्थपुर्ण दुर्लक्ष होत असल्याची ओरड सर्वत्र करण्यात येत आहे . या विविध ठीकाणी सहज मिळणाऱ्या गुटक्याच्या सेवनामुळे अनेक तरूणांना कर्करोगासारखे गंभीर आजार होवुन त्यांचा दुदैवी मृत्यु होत असल्याचे ह्वदयविदारक चित्र पहावयास मिळत आहे . यावल तालुक्यातील पुर्व व पश्चिम आणी उत्तरे कडील क्षेत्र या भागाला लागुन मध्य प्रदेश व गुजरात राज्यांचे सिमा असुन , याच मार्गावरून अत्यंत छुप्या पद्धतीने तालुक्यात महीन्याला? सुमारे चाळीस ते पन्नास लाख रुपयांच्या विमल गुटक्याची आयात करण्यात येते व नंतर हा गुटका ईतर वाहनाव्दारे तालुक्यातील विविध ठीकाणी विक्रीला पहोचविला जातो व मग तो शहरातील पानटपरीधारक व किराणा व्यवसायीकांना विक्रीसाठी देण्यात येत असतो , कुठली ही रोकठोख न ठेवता खुल्या बाजारात हा गुटका बिनधास्तपणे विकण्यात येत असल्याने अल्पवयीन शाळकरी मुल ,मुली व महीला आणी तरूण या गुटक्याच्या आहारी जावुन आपले जिवन उद्धवस्थ करीत आहे . अन्न व भेसळ प्रतिबंधक खात्याची या गुटका विक्री करणाऱ्यांविरूद्ध मोठी कारवाई यावल शहरात होतांना आज पर्यंत दिसुन येत नसल्याने या गुटका विक्रीच्या परवानगीला त्यांचा देखील अप्रत्यक्ष पाठींबा आहे का असे सर्वसामान्य नागरीकांमध्ये बोलले जात, यावल तालुक्यास प्रथमच लाभलेले कार्यतत्पर आयपीएस अधिकारी आतिश कांबळे यांनी या विषयाकडे लक्ष दिल्यास तालुक्यातुन गुटका विक्रीचा गौरखधंदा हाद्दपार होईल अशी अपेक्षा सर्वसामान्य पालक व नागरीक व्यक्त करीत आहे .

वणा नदी वर बंधारा झाला पाहीजे या मागणीी साठी वर्धा जिल्हा विकास आघाङी चे धरने आदोलन

0

 

हिंगणघाट :- 11 मार्च उन्हाची हाक हळू हळू मोठा प्रमाणात जानवत आहे,
तस तसा पाण्याचा प्रश्न बिकट होताना दिसत आहे, व नगर परिषद शांत होऊन भडका घेण्याचि वाट पाहत आहे,
आम्ही वर्धा जिल्हा विकास आघाङी च्या वतीने 21 मार्च ला मोर्चा काढून या बाबत ची दाईकता नगर परिषद च्या लक्षात आणून दिली , परंतु नगर परिषद या वर लक्ष देण्यास तयार नाही, दुसरी कडे पाण्याचा प्रश्न गभीर होताना दिसत आहे,
शहरात 11 टाक्या शोभेच्या वास्तु बनताना दिसत आहे,
कारण नदिपात्रात पाणी नाही त्यामुळे
या टाक्या भरायच्या कशा व पाणी आण्याचे कुठून हा गंभीर प्रश्न आहे , त्या मुळे त्वरित बंधारा च्या प्रश्न मार्गि लागला तर 11 टाक्यात पाणी भरता येईल पाणी प्रश्न मार्गि लागू शकते ,अन्यथा जर बंधारा झाला नाही तर शहर भर आंदोलन करण्यात येईल अशे निवेदन कामगार नेते डॉ उमेश वावरे( वैज्ञानिक) यानच्या नेतृत्वात मा उपविभागीय अधिकारी व मुख्यधिकारी नगर परिषद या निवेदन देण्यात आले त्या प्रसंगी मनीष कांबळे. दिलीप कहूरके. चारू आटे .देवेन्द्र त्रिपल्लीवार .कैलाश झोडापे. सौ शिला अबरवेले. सौ पुजा अबरवेले. सुषमा खरपाडे .सौ सुमित्रा धोटे. वैशाली रघाटाटे. कान्ता पिपळशेंडे. इदिरा सेडमाके .शोभ फरकाडे. सविता पंढरी .आरती सातकर .सुनिता गाकवाड .सपना सातकर .वर्षा उमाटे
मिना सिरसागार. कोकीळादिवे .ईश्वर दिवे .चदा पाटील अरूण पाटील. प्रकाश येडे. विघा येडे क्रिष्णा वैरागडे. सुनिता राऊत. रजनी वैरागडे. अर्चना जिवतोडे. बैबी येणोरकर. चन्द्रकला ढोबरे. योगेश जंगले. श्याम मोहीजे .बैबीबाई मोहीजे शेख हमीया. मनीष बावणे .निर्मला कांबळे .मंदा डायगव्हाने. अर्चना पाटील. मुकुदाबाई .भट. गणेश भट कल्पना शेंद.रे कुसुम पानतावने. श्यामराव शेंदरे. पंकज खापणे टिकाराम जवादे. जिवन उरकुडे. प्रदीप माणिकपुरे .कवडू कांबळे इत्यादि उपस्थिति होते .
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

रामनवमी निमित्य राष्ट्रवादी चौकात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शोभायात्रेचे स्वागत व शरबत वाटप.

0

 

हिंगणघाट :- रामनवमी निमित्य राष्ट्रवादी चौक हिंगणघाट येथे प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्रतिमेचे पुजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री.अतुल वांंदिले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शरबत वाटपचा कार्यक्रम करण्यात आला.
तसेच शहरातील निघालेल्या पालखी शोभायात्रेचे अतुल वंदिले यांच्या नेतृत्वात दुपट्टा देऊन स्वागत केले.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अतुल वांदिले,जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे,अमोल बोरकर, सुनील भुते,अमोल मुडे,राजू मुडे, प्रवीण भुते, प्रवीण श्रीवास्तव,अनिल भुते, अजय परबत,राहुल जाधव, जावेद मिर्झा, गोमाजी मोरे,पंकज भट्ट,राजू मिसेकर, संजय गायधने,राहुल बोरकर, सागर बारई,मिथून चौहान, आशिष ठाकरे,निखिल शेळके, स्वप्नील पांडे, निखिल ठाकरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

क्रांतिसूर्य ज्योतीबा फुले यांची जयंती काँग्रेस कार्यालयात संपन्न

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस : आद्य समाजसुधारक ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जयंतीनिमित्त घुग्घुस शहर काँग्रेस कार्यलयात ज्योतिबांच्या प्रतिमेस काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह व समाजातील अनिष्ट प्रथा चाली – रीती विरोधात समाज जनजागृती करिता त्यांनी आपले उभे जीवन वेचले.
आज जयंती निमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात सैय्यद अनवर, सौ.पदमा त्रिवेणी, बालकिशन कुळसंगे, संजय कोवे,सुनील पाटील,अजय त्रिवेणी,साहिल सैय्यद,अंकुश सपाटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते

धार्मिक भावना दुखावणारा वीडियो वायरल केल्याप्रकरणी एका युवकास अटक

0

 

हिंगणघाट शहरातील एका युवकास पोलिसांनी काल रात्री ताब्यात घेतले.
समाजात तेढ निर्माण होऊन मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याची तक्रार साजिकअली इरफ़ानअली रा.गौतम वार्ड या २० वर्षीय मुलाने आपल्या मित्राचे मदतीने हिंगणघाट पोलिसांत काल शनिवारी केली,या तक्रारीवरुन पोलिसांनी शहरातील सिंधी कॉलोनी परिसरातील साहिल मोटवानी या युवकास ताब्यात घेतले.त्याने धार्मिक भावना दुखावणारा वीडियो इंस्टाग्रामवर पोस्ट केल्याने त्याचेवर गुन्हा नोंद करण्यात आला.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे

शंभर अनाथ मुलांची माऊली हस्ताक्षर कलावंत विनायक धांडे यांचे कार्य कौतुकास्पद

0

 

अनिलसिंग चव्हाण सह विकी वानखेडे

अकोला जिल्ह्यातील आकोट तालुका व एदलापुर गावचे सामाजिक कार्यकर्ते व संस्थापक अध्यक्ष आश्रय ध्यान फाउंडेशन एदलापुर येथील हस्ताक्षर कलावंत विनायक धांडे हे गेल्या आनेक वर्षापासून तांदूळ व तिळावर हस्तकला करत सामाजिक बांधिलकी म्हणून आदिवासी भागातील,आदिवासी,अनाथ, निराधार, दिव्यांग, वृद्ध,यांची सेवा करत आहे.
जित अनाथ तिथ शाळा हे ब्रीद वाक्य उराशी बाळगून ते गेल्या अनेक वर्षापासून गावोगावी,अतिदुर्गम डोंगरी भागात जाऊन अनाथ बालकंना तसेच आदिवासी समाजातील मुला-मुलींना शिक्षणाचे महत्त्व पटवुन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम ते करत आहेत व त्यांना शिक्षण देत आहेत.
हे कार्य करत असतात त्यांना अनेक दानशूर,तसेच समाजाप्रती आदर असणार्‍या व्यक्तींनी त्यांना मदत केली असता त्यांनी अनाथांच्या शिक्षण,कपडे,अन्न यावरती खर्च केला आहे.
त्यांच्या याच समाजा प्रती तळमळीच्या कार्याची दखल घेऊन मा.राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम व मा.राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यंनी दखल घेतली होती व त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल विनायक धांडे यांना गौरवण्यात आले होते.तसेच या वेळी मा. राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी त्यांच्या सर्व कार्याची माहिती जाणून घेऊन त्यांना सेवाभावी संस्था किंवा फाउंडेशन ची स्थापना करण्यास सांगितली होती,त्याचनुसार त्यांनी लगेच आश्रय ध्यान फाउंडेशनची स्थापना केली व त्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवून खास करून अनाथ,निराधारांसाठी अविरत कार्य करीत आहे.कोरोनाच्या जागतिक महामारी मध्ये सुद्धा त्यांनी आपल्या स्वतःच्या घराला कुलूप लावून जिवाची पर्वा न करता ज्या वस्तीवर, मुले असतील त्या ठिकाणी जाऊन त्यांना शिक्षणाचे ज्ञानदानाचे धडे दिले.
त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेऊन नाम फाउंडेशन चे सामाजिक कार्यकर्ते व सिने अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी त्यांचा सन्मान केला आहे.तसेच समाजसेवक विनायक काशीराम धांडे यांचे सिनेअभिनेते सयाजीराव
शिंदे यांनी कौतुक करीत,नुकत्याच पार पडलेल्या एका सामाजिक कार्यक्रमात भेटीदरम्यान धांडेच्या सर्वच सामाजिक कार्याचे अवलोकन करताना सामान्यांतून असामान्य कार्य करणारा आणि निराधार, निराश्रीत अनाथ बालकांसाठी ऊन, वारा आणि पावसातही जीवाची पर्वा न करता
अनाथ तिथेच शाळा भरवून अनाथांना शिक्षण देऊन पाढीवरून मायेचा हात फिरवणारे धांडे यांचे कौतुक केले आहे.
तसेच या आधीही स्वर्गीय अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांनी ही त्यांच्या कार्याबद्दल विनायक धांडे यांची प्रशांसना केली होती.
एवढेच नाही तर विनायक धांडे हे तांदूळ व तिळावरील कलाकृती बाबत हस्ताक्षर कलावंत असून त्यांनी एकाच तीळाच्या दाण्यावरती भारताचे संपूर्ण राष्ट्रगीत लिहिलेले आहे. त्याबद्दल मा.राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम व मा.राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले होते.
तसेच या कार्याची दखल पंतप्रधान कार्यालयानी घेतलेली असून येत्या मे २०२२ मध्ये विनायक धांडे यांची भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांची भेट होणार असून, त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे व त्यांनी केलेल्या तिळावरील व तांदळाच्या दाण्यावरील कलाकृती ते स्वतः पाहणार आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री शरदचंद्रजी पवार यांच्या घरावरील षडयंत्रकारी भ्याड हल्ल्या चा गोंदिया येथे तीव्र निषेध

0

 

राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा तथा देशातील ज्येष्ठ नेते मा.श्री शरद पवार जी यांच्या घरावरील षडयंत्रकारी भ्याड हल्ल्या च्या विरोधात गोंदिया येथे गांधी प्रतिमा चौकात निषेध निदर्शने करण्यात आली. यावेळी खासदार मा.श्री प्रफुल पटेल यांचा निर्देशानुसार व माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.
काल शेकडोच्या संख्येने एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा.श्री शरदचंद्र पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानात घुसून आंदोलन कर्त्यानी श्री मा.शरदचंद्र पवारांच्या घरावर चप्पल आणि दगडफेक करण्यात आली. उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत सेवेत रुजू होण्याचे आदेश दिले होते. तसेच, कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन आणि ग्रॅच्युएटी देण्यासह त्यांच्यावर कारवाई न करण्याची सूचना एस टी महामंडळाला केली होती. पण, तरीही पुन्हा एस टी कर्मचारी आक्रमक झाले. शेकडोच्या संख्येने एसटी कर्मचारी शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानात घुसले आणि घोषणाबाजी केली. हा न्यायालयाचा अवमान असून ज्येष्ठ नेते मा.श्री शरद पवार यांच्या विरोधातील षडयंत्र आहे. देशातील ज्येष्ठ व जनसेवेसाठी झटत आलेल्या नेत्याच्या घरावर असा भ्याड हल्ला करणे हे पुरोगामी व सामाजिक सुधारकांचा वारसा जपणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील ही अशोभनीय घटना असून अशा घटनांचा व षडयंत्रकारी प्रवृत्ती चा तीव्र निषेध करण्यात येत असल्याचे माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी म्हटले.

या वेळी सर्वश्री माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, माजी खासदार खुशाल बोपचे, देवेंद्रनाथ चौबे, नरेश माहेश्वरी, विनोद हरिणखेडे, प्रभाकर दोनोडे, केतन तुरकर, रफिक खान, योगेंद्र भगत, अशोक सहारे, बाळकृष्ण पटले, कुंदन कटारे, कमलबापू बहेकार, सी. के. बिसेन, अविनाश काशिवार, केवल बघेले, रविकांत बोपचे, तेजराम मळावी, सौ. वंदना डोंगरवार, गोपाल तिवारी, विष्णू शर्मा, किरण पारधी, सतीश देशमुख, विनित सहारे, हेमंत पंधरे, सुनील भालेराव, राजेश कापसे, नानू मुदलीयार, चुन्नीभाऊ बेंद्रे, राजू एन जैन, कैलास पटले, सुरेश हर्षे, डॉ संदीप मेश्राम, खालिद पठाण, भगत थकरानी, सौ. सुमन बिसेन, सौ. रजनी गौतम, अखिलेश शेठ, बाळा हलमारे, रवी पटले, सौ. दीक्षा भगत, सौ. रिता लांजेवार, दिलीप गभणे, धनवंत कोवे, मयूर दरबार, दिनेश अग्रवाल, मामा बन्सोड, नीरज उपवंशी, नितीन टेंभरे, इकबाल सय्यद, वाय टी कटरे, शंकरलाल टेभरें, गंगाराम बावनकर, प्रेम जैस्वाल, उमेंद्र भेलावे, लिंकेश चिखलोंडे, सौ. परबता चांदेवार, सौ. शर्मिला टेम्भूर्णीकर, सौ. उषा मेश्राम , नरेश भेंडारकर, चंद्रकुमार चुटे, एकनाथ वहिले, सौरभ रोकडे, विनायक खैरे, करण टेकाम, विनायक शर्मा, सोनल मेश्राम, सुनील पटले, शैलेश वासनिक, योगी येडे, लव माटे, दर्पण वानखेडे, रमण उके, जिम्मी गुप्ता, रमाकांत जैस्वाल, कालू चौहान, शिवलाल नेवारे, शौरभ जैस्वाल, सोमेश राहंगडाले आकाश नागपुरे, पंकज चौधरी , मदन चिखलोंडे, राजेश तुरकर, नागेंद्रनाथ चौबे, पावन धावडे, प्रमोद कोसरकर, रमेश कुरील, कपिल बावनथडे, कुणाल बावनथडे, नत्थू भाटिया, अनिल टेकाम, हर्षवर्धन मेश्राम, पुष्पलता माने, संदीप पटले, महेश करियार, राजेश दवे, शरभ मिश्रा, नागरत्न बन्सोड, सुरेंद्र रहांगडाले, नागो बन्सोड, रमेश गौतम, शब्बीर कुरेशी, वामन गेडाम, राजू येडे, चुन्नीलाल शहारे, गोविंद लिचडे, हितेश फतेह, प्रतीक पारधी, अमित अवस्थी, विजय भेंडारकर, प्रकाश बरैय्या, प्रेमलाल बरैय्या, भागवत झिंगरे, राहुल यावलकर, प्रशांत मेश्राम, सुरेंद्र नागपुरे, दिलीप डोंगरे, पंकज महादुळे, हेमराज डहाके, सतीश पारधी, प्रदीप ठवरे, लव्हली होरा, सुखराम वाढइ, कापगते जी, पियुष झा, संतोष लिल्हारे, सौरभ गौतम, अविनाश महावत, विक्की भाकरे, अहमद भाई, प्रवीण बैस, महेश रंगारी, कान्हा बघेलेयांचा सह सर्व तालुका अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगर परिषद सदस्य, नगर पंचायत अध्यक्ष व सदस्य, प्रमुख पदाधिकारी, सर्व सेलचे अध्यक्ष, पदाधीकारी, कार्यकर्ता व नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते .

यावल तहसील कार्यालयात शासनाच्या राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना धनादेश वाटप

0

 

यावल तालुका (प्रतिनिधी) विकी वानखेडे

यावल तहसील कार्यालयात शासनाच्या राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते धनादेश वितरीत करण्यात आले

यावल तालुका दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील कमावती व्यक्ती मरण पावल्याने निराधार झालेल्या कुटुंबास शासनाच्या राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना आर्थिक मदत करण्यात
येते यावलच्या तहसील कार्यालयातील सभागृहात रावेर यावल विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकर चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले व तालुका समन्वय समितीच्या पहिल्या बैठकीत आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते 22 लाभार्थ्यांना 20 हजार प्रमाणे 4 लाख 40 हजार रुपयांचा धनादेश वाटप करण्यात आले याप्रसंगी तहसीलदार महेश पवार, पोलीस निरीक्षक आतिश कांबळे ,संजय गांधी निराधार अध्यक्ष शेखर पाटील, समन्वय समितीचे तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे , समन्वय समितीचे सदस्य प्रा. मुकेश येवले ,रविंद्र सोनवणे ,लीलाधर चौधरी ,नितीन चौधरी सदस्य जयश्री पाटील ,ललिता चौधरी ,प्रेऱणा भंगाळे ,यावल खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अमोल भिरुड, नायब तहसीलदार आर के पवार ,नायब तहसीलदार आर डी पाटील ,हे सर्व उपस्थित होते