Home Blog Page 314

राजू रेड्डी हे राजकारणातले समाजसेवी : नामदार विजयभाऊ वड्डेटीवार

0

 

काँग्रेस अध्यक्ष वाढदिवस निमित्त आशाताई,सफाईकर्मी सत्कार कार्यक्रम संपन्न

(चंद्रपूर घुग्घुस) प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस : नामदार विजयभाऊ वड्डेटीवार म्हणाले की गेली पाच वर्षे सत्तेत असणाऱ्या विकास पुरुषांनी या शहराला विकासा पासून वंचित ठेवले मात्र आज या शहरात राजु रेड्डी चा नेतृत्वाखाली काँग्रेसचे कार्य हे खरंच कौतुकास्पद आहे.
राजकारणा पलीकडे जाऊन केवळ समाजकारणाचे असल्याने मी माझ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असून या शहराच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही.
या घुग्गुस शहरात लोक संख्या जास्त असून या गावात अग्निशमन वाहन नव्हते आज या गावा करिता अग्निशमन दिले आहेत असे प्रतिपादन केले.
किशोर भाऊ जोरगेवार म्हणाले
पक्ष भावना बाजूला ठेवून काँग्रेस नेत्यांच्या वाढदिवसाला या मंचावर उपस्थित झालो हे केवळ रेड्डी करिताच आज ही अर्ध्या रात्री याचा फोन येतो तो केवळ कुठल्या तरी रुग्णाला शासकीय रुग्णालयात उपचार मिळवून देण्यासाठी येथे आपल्या खाजगी कामासाठी या माणसाने कधीच फोन केला नाही. असे अपले मत सांगितले.
गेल्या अनेक वर्षांपासून शहराला मोफत पाणी पुरवठा करण्याचे कार्य हे प्रशंसनीय असल्याचे मत आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केले.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी राजूरेड्डी यांचा चाळीस वा वाढदिवस मोठ्या जल्लोषात सेवा दिन म्हणून साजरा केला.
कोरोना काळात आपल्या जीवाची कुटूंबाची ना बाळगता दिवस रात्र सेवा देणाऱ्या ‘आशा’ सेविका,अंगणवाडी सेविका यासोबतच समाजात तिरस्कारांच्या दृष्टीने बघितल्या जाणाऱ्या नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांना उचित सन्मान देण्यासाठी राज्याचे बहुजन विकास मंत्री नामदार विजय वड्डेटीवार, आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व साडी देऊन सत्कार करण्यात आला व दिव्यांग बांधवाला तीन चाकी सायकलचे वितरण करण्यात आले.
सदर कार्यक्रमात सौ.पुष्पा नक्षिणे,सौ.पदमा त्रिवेणी,सौ.पुष्पा कणकम यांच्या माध्यमातून शेकडो महिलांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
अरविंद चंहादे,सुकुमार गुंडेटी,अनुप भंडारी, अविनाश गॉगुर्ले ,संदीप चटकी,यांच्या माध्यमातून शेकडो युवक पुरुषांनी काँग्रेस मध्ये प्रवेश घेतला.
पालकमंत्री यांच्या उपस्थितीत रेड्डी यांचा सह परिवार केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला
याप्रसंगी मंचावर ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे,सेवा दल सूर्यकांत खणके, नगराध्यक्ष सुरेश माकुलकर,श्यामकांथ थेरे,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामगार नेते सैय्यद अनवर यांनी केले तर सूत्र संचालन सुनील माहुरे यांनी केले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोशन दंतलवार,रोहित डाकूर,अनुप भंडारी,बालकिशन कुळसंगे,देव भंडारी,कपिल गोगला,कुमार रुद्रारप,संजय कोवे,बल्ली भाई,आकाश चिलका,शाहरुख शेख, सचिन नागपुरे,रफिक शेख,दीपक पेंदोर,सुनील पाटील,अंकुश सपाटे,रंजित राखुंडे, अय्यूब कुरेशी, विजय रेड्डी, नागेश कुचनकर,राहुल पंधरे,प्रदीप आसेकर,जाफर शेख,प्रणय लिंगांपेल्ली,विशाल नागपुरे,विशाल लोणगाडगे, सुबोध आवळे,राकेश डाकूर, यांनी अथक परिश्रम घेतले.

सौ.गिताबाई गावंडे यांचे दुःखद निधन.

0

 

 

संग्रामपूर .- संग्रामपूर शहरातील पळशी पुरा भागातील ग्रा.प.चे माजी सदस्य अरुण गावंडे व स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे ता.सरचिटणीस गोकुल गावंडे यांच्या मातोश्री विणेकरी ,तथा श्री विठ्ठल रुख्मीणी भजन मंडळाच्या अध्यक्ष सौ.गिताबाई मनोहर गावंडे गिताई वय ६८वर्षे यांचे घरीच सकाळी स्टुल वरुन पडून डोक्याला मार लागल्याने त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नेले असता एकाच दिवसात उपचारा दरम्यान दि.२९/३/२०२२रोजी निधन झाले.त्यांचेवर आज दि.३०/मार्च रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी सर्व जाती धर्माचे नागरिक ,युवक आणि महिला भजन मंडळ, किर्तनकार,वारकरी यांनी दुःखाश्रु नयनांनी अखेरचा निरोप दिला.त्यांचे पश्चात पती,२ मुले, १ मुलगी,सुना,नातवंड आप्त परिवार आहे.

कोरपावली विकास सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राकेश फेगडे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलचा विजय

0

 

यावल, ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील कोरपावली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत कोरपावली विकास संस्थेचे मावळते चेअरमन तथा यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राकेश वसंत फेगडे यांचे नेतृत्वात संपूर्ण पॅनल दणदणीत विजय मिळवले आहे . या संपुर्ण तालुक्याचे लक्ष वेधणाऱ्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी पॅनलचे नेतृत्व करणारे कोरपावली ग्राम पंचायत चे माजी सरपंच जलील सत्तार पटेल यांच्या “शेतकरी पॅनलचा ” या निवडणुकीत पॅनलचे सर्व उमेदवार पराभुत झाल्याने दारुण पराभव पत्कारावा लागला आहे. यावेळी राकेश फेगडे यांचे समर्थक कार्यकर्त्यांनी रात्री उशिरा निवडणूकीचे निकाल जाहीर होताच आनंदोत्सव साजरा केला. नवनिर्वाचीत उमेदवारांनी मतदारांचे घरोघरी जावुन प्रत्यक्ष भेटुन त्यांचे आशीर्वाद घेतलेत .
यावल तालुक्यातील कोरपावली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीत भाजयुवा मोर्चाचे पदाधिकारी व मावळते चेअरमन राकेश वसंत फेगडे यांच्या ‘ शेतकरी विकास पॅनलच्या” सर्वच्या सर्व १२ जागा निवडून आल्या.
त्यात सर्वसाधारण कर्जदार मतदारसंघातून राकेश वसंत फेगडे हे सर्वाधिक ( ३१० )मते मिळवुन विजयी झालेत तर ललित देविदास महाजन ( २७६) ,सुधाकर प्रल्हाद नेहेते ( २७४),यशवंत निंबा फेगडे ( २६५),वसंत नामदेव महाजन ( २६४), दत्तात्रेय लीलाधर महाजन ( २५४),इम्रान शकील पटेल (२४५) शरद अभिमान पाटील ( २३७ ), महिला राखीव मतदारसंघात जयश्री वासुदेव नेहेते ( २८३), सुलोचना रवींद्र जावळे ( २४६ ) इतर मागास प्रवर्ग गटात महिंद्र दिनकर नेहते ( २८२ ) मते मिळवून सर्व उमेदवार विजयी झाले.
या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत निवडणुक अधिकारी म्हणून एम. पी. भारंबे यांनी काम पाहिले.या सोसायटीचे ४६७ मतदारांपैक्की त्यापैकी ४३५मतदारांनी निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

राज्यपालांचा घेतला समाचार; राज्यपाल होता म्हणून सोडलं नाहीतर… – नाना पटोले

0

 

शेगाव प्रतिनिधी अर्जुन कराळे

राज्याचा राज्यपाल आपल्या सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या विषयी बेताल वक्तव्य करून अपमानित करणाऱ्या राज्यपालाला केंद्राने तात्काळ काढून टाकल असत .. राज्यपाल होता म्हणून… नाहीतर… अस म्हणत पुन्हा एकदा नाना पटोलेंनी राज्यपालांचा समाचार घेतला आहे. केंद्रांच सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत आहे.. असेही नाना पटोले म्हणाले..
राज्यपालांवर छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांची टीका..

महात्मा फुले दाम्पत्यांवर टीका करण्यापूर्वी राज्यपालांनी पदाची गरिमा राखावी अन्यथा त्यांच्यावरही टीका होणार- भुपेश बघेल, मुख्यमंत्री महात्मा फुले दाम्पत्यांवर टीका करण्यापूर्वी राज्यपालांनी त्यांच्या पदाची गरिमा राखावी अन्यथा त्यांच्यावरही टीका होईल. असे वक्तव्य छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी केली आहे. ते बुलडाणा जिल्ह्यात शेगावात आयोजित ओबीसी समाज अधिकार संमेलनात बोलत होते. राज्यपालांनी केवळ महात्मा फुलें दाम्पत्यांचा अपमान केला नाही तर त्यांच्या आई वडिलांचा देखील अपमान केला असल्याची टीका बघेल यांनी केली.

मनसे पदाधिकारी यांचा भंडारा व गोंदिया जिल्ह्याचा दौरा संपन्न

0

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब यांनी भंडारा जिल्हा संपर्क अध्यक्ष म्हणून श्री मंदिप रोडे तर गोंदिया जिल्हा संपर्क अध्यक्ष म्हणून राहुल बालमवार यांची नियुक्ती केली, त्यानंतर पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व या भागातील एक जवाबदार पदाधिकारी म्हणून *हेमंतभाऊ गडकरी* यांनी नवीन जवाबदारी स्वीकारलेल्या श्री मंदिप रोडे व श्री राहुल बालमवार या सहकाऱ्यांना घेऊन नुकताच भंडारा व गोंदिया जिल्ह्याचा दौरा केला, दोन्ही ठिकाणी विश्रामगृहात झालेल्या बैठकीत श्री रोडे व श्री बालमवार यांनी स्थानिक पदाधिकारी यांचा सन्मान ठेवत पक्ष बांधणीच्या अतिशय उत्तम सूचना उपस्थिताना केल्या ,यावेळी काहींनी मनसेत प्रवेश घेतला तर तेथील जिल्हाअध्यक्षाच्या सूचनेनुसार काहींना पदाची जवाबदारी देण्यात आली, यात महिलांचा सुद्धा समावेश होता भंडारा येथील बैठकीत जिल्हा अध्यक्ष नितीन वानखेडे, शहर अध्यक्ष नितीन खेडीकर, उपजिल्हाअध्यक्ष शैलेश गजभिये, तालुका अध्यक्ष रवी मानकर,दिनेश व हर्षल भजनकर, अतुल उके, भोजराज कांबळी,शुभम डहाके*,व इतर पदाधिकारी उपस्थित होते तर गोंदिया येथील बैठकीत जिल्हा अध्यक्ष मनीष चौरागडे व हेमंत लिल्हारे,उपजिल्हाअध्यक्ष मुकेश मिश्रा व मुन्ना गवळी,तालुका अध्यक्ष ब्रजभूषन बैस, रजत बागडे, शुभम चोपडे, बाळू वंजारी, राजेश सोनवणे,सौ किरणताई बोपचे, कु योगिता वघारे, सौ लांजेवार, सौ चुटे* व इतर उपस्थित होते, सर्व पदाधिकारी यांनी हेमंतभाऊ गडकरी व दोन्ही संपर्क अध्यक्षानी केलेल्या पक्ष बांधणीच्या सूचना नक्कीच कृतीत आणू व 2 एप्रिल रोजी शिवाजी पार्क मुंबईत होणाऱ्या गुडीपाडवा मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने येऊ असा आशावाद व्यक्त केला…..श्याम पुनियानी, पूर्व विदर्भ विभागीय कार्यालय

आशा” ताई, अंगणवाडी सेविका,नगरपंचायत सफाईकर्मी यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

0

 

राजूरेड्डी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

( चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस : घुग्घुस शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या वाढदिवसानिमित् कोरोना काळात दिवसरात्र जीवाची कुटुंबाची तमा न बाळगता सेवा देणाऱ्या आशा वर्कर,आंगणवाडी सेविका,मददनीस व शहराची घाण आपल्या खांद्यावर वाहणाऱ्या नगरपरिषदेच्या सफाईकर्मी यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात येत असून
सदर सत्कार पालकमंत्री विजय वड्डेटीवार,ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळेजी यांच्या हस्ते करण्यात येत असून अपंग बांधवाला तीन चाकी सायकल व मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा प्रवेश मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रमात नागरिकांनी तसेच काँग्रेस पक्षाचे सर्व आजी – माजी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन कामगार नेते सैय्यद अनवर यांनी केले आहे.

पत्रकारांवर हल्ला केल्यास तीन वर्षे कारावास –

0

 

उषा पानसरे मू. का. सपादक मो, 9921400542 असदपूर
दिनाक 28 मार्च

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची माणगाव व महाड तालुका कार्यकारिणी जाहीर

माणगाव (रायगड) : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाची माणगाव व महाड तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांनी पत्रकार संरक्षण कायद्याबद्दल मार्गदर्शन केले.
याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे कोकण उपाध्यक्ष योगेश भामरे, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख दत्तात्रय दळवी, रायगड जिल्हा संघाटक प्रसाद गोरेगावकर, कोकण युवा संपर्क प्रमुख सागर पवार, माणगाव तालुका अध्यक्ष रिजवान मुकादम, महाड तालुका अध्यक्ष किशोर किर्वे, महिला अध्यक्षा रेश्मा माने, अभिजित ढाणीपकर, राकेश देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अध्यक्षस्थानावरून डी. टी. आंबेगावे म्हणाले की, पत्रकारांवर हल्ला केल्यास, हिंसाचाराचे कोणतेही कृत्य करील किंवा करण्याचा प्रयत्न करील, हिंसा करण्यास अपप्रेरणा, चिथावणी किंवा त्यास प्रक्षोभित करील अशा कोणत्याही अपराध्यास तीन वर्षे कारावासाची शिक्षा होईल तसेच पत्रकारांच्या मालमत्तेचे नुकसान केल्यास सदर व्यक्तीने वैद्यकीय खर्च आणि नुकसानभरपाई दिली नसेल तर ती रक्कम जणू काही ती जमीन महसुलाची थकबाकी होती असे समजून वसूल करण्यात येईल. महाराष्ट्र प्रसारमाध्यमातील व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसक कृत्य व मालमत्तेचे नुकसान किंवा हानी यांना प्रतिबंध) अधिनियम, २०१७ याबाबत त्यांनी माहिती दिली. संघाचे कोकण उपाध्यक्ष योगेश भामरे, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख दत्तात्रेय दळवी यांनी संकटकाळी आम्ही तुमच्या सोबत असल्याचा विश्वास दिला.
याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या रायगड जिल्हा संघटकपदी प्रसाद गोरेगावकर, माणगाव तालुका अध्यक्षपदी रिजवान मुकादम, तालुका कार्याध्यक्षपदी सचिन पवार, तालुका संपर्क प्रमुखपदी मंगेश मेस्त्री, माणगाव तालुका कार्यकारिणी सदस्य मानसी महाडिक, विवेक काटोळकर, दत्ता नाईक, राजेंद्र बुंबळे आदी पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे निवेदन माणगाव तालुका अध्यक्ष रिजवान मुकादम यांनी तर आभार कार्याध्यक्ष सचिन पवार यांनी मानले. यावेळी माणगाव व महाड तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
न्यूज रिपोर्टर उषा पानसरे अमरावती

उद्योगांनी सामाजिक निधीतून शहरात वॉटर टँकरने पाणी पुरवठा करावा:राजू रेड्डी

0

काँग्रेसचे न.प मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस : हा औद्योगिक शहर असून याठिकाणी एसीसी, लोयड्स मेंटल्स,कोळसा खाणी,गुप्ता कोल वॉशरीज सारखे अनेक उद्योग असून
या उद्योगांना शहरात प्रत्येकी दोन वॉटर टॅंकरने टंचाईग्रस्त भागात मोफत पाणी पुरवठा करण्यास बाध्य करावे अशी मागणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सौ.अर्शिया जुही यांना काँग्रेसच्या शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेट निवेदनातुन केली आहे.
शहरात पाण्याची भीषण टंचाई असून शहरातील लुम्बिनी नगर,बैरम बाबा नगर,राम नगर,शिव नगर,यासह अन्य भागात नागरिकांच्या नळाला पाणीच येत नाही.
पाण्यासाठी भीषण उन्हात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या दोन खाजगी टॅंकरने संपूर्ण शहरात मागेल त्याला मोफत पाणी पुरवठा गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे.
मात्र भीषण उन्हाळ्यात वाढत्या गर्मी पासून रक्षणासाठी कूलर शुरू करण्यात येते यामुळे पाण्याची प्रचंड मागणी होत असल्याने दोन टॅंकर हे अपुरे पडत आहे.
करिता उद्योगांच्या सामाजिक निधीतून शहरात पाणी पुरवठा करावा अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी,कामगार नेते सैय्यद अनवर, अलीम शेख,रोशन दंतलवार ,इर्शाद कुरेशी,अनुप भंडारी, आकाश चिलका,रफिक शेख व अन्य पदाधिकारी उपस्थित होते

कालव्यात तरंगताना आढळला महिलेचा मृतदेह

0

 

आमगाव,दि.27ःतालुक्यातील अंजोरा रामाटोला परिसरातील मुख्य कालव्यात 65 वर्षीय महिलेचा मृतदेह Deadbody found 26 मार्च शनिवारला आढळला असून तेजनबाई दाजी वरखडे रा. रामाटोला असे मृतकाचे नाव आहे.पोलीस सूत्रात्राच्या माहितीनुसार मृतक ही काल रात्री आपल्या पतीसोबत लग्नसमारंभात जवळील कवडी या गावात गेले होते. पण लग्नसमारंभ आटोपल्यानंतर मृतका ने आपल्या पतीला म्हटले की तुम्ही गावाला जा मी नंतर गावातील बायांसोबत येतो पण ती रात्री घरी आली नाही,तेव्हा मृतकाच्या पतीने इकडे तिकडे शोधाशोध केली पण ती दिसली नाही शेवटी अंजोरा गावातील नागरिकांना अंजोरा रामाटोला परिसरातील एका मुख्य कालव्यात तिच्या मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला तेव्हा नागरिकांनी त्याची माहिती स्थानिक पोलिस पाटलांना दिली.पोलीस पाटील यांनी पोलीस स्टेशन आमगावला माहिती दिल्यानंतर आमगाव पोलिस घटनास्थळावर पोचून कालव्यातून मृतदेह बाहेर काढून पंचनामा करून शविच्छेदनना करिता ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे पाठविले.पुढील तपास पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार एच.सी.रहांगडाले व कोरोंडे करीत आहे.

शेत धुऱ्याच्या वादावरून हत्या

0

 

वडनेर :- दि.27 मार्च
शेत खरेदी केलेल्या शेताचे वादातून मोठ्या लाडी- गोडीने शेतकऱ्याला गाडीवर बसवून शेतात नेऊन डोळ्यात तिखट घालून दगडाने ठेचून जिवानिशी ठार केले. हि घटना दुपारी १ वा.चे सुमारास घडली. घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून आरोपीस वडनेर पोलिसांनी अटक केली.
प्राप्त माहितीनुसार, वडनेर येथील रहिवासी दिनेश मारोती महाजन, वय ४० याने गावातील प्रमोद दादाजी भाके, वय ६० याचे पाच एकर शेत विकत घेतले.मात्र, शेतातील धुऱ्यावरुन वाद अलीकडे उफाळून आला. आरोपी प्रमोद भाके याने दिनेशला आज सकाळी मोठ्या लाडीगोडीने गाडीवर बसवून शेतात नेले आणि त्याचा काटा काढला.शेतशिवारात असलेल्या बंधाऱ्याच्या बाजूला प्रमोदने दिनेशच्या डोळ्यात तिखट फेकून दगडाने घाव घातला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर अक्षरशा दगडाने डोक्यावर ठेचून त्याला जिवानिशी ठार केले.
याप्रकरणी वडनेर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद.
सचिन वाघे वर्धा