Home Blog Page 317

शाळापूर्व तयारी अभियान:-दोन दिवशीय “तालुका स्तरीय” प्रशिक्षण उत्साहात संपन्न.

0

 

चामोर्शी,मुलचेरा आणि एटापल्ली तालुक्यातील शिक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद.

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक

चामोर्शी:- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे द्वारा,स्टार्स प्रकल्प,अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीच्या वतीने दिनांक २१ व २२ मार्च २०२२ ला गट साधन केंद्र चामोर्शी येथे चामोर्शी,मुलचेरा,एटापल्ली तालुक्यातील ५८ शिक्षण व अंगणवाडी सेविकांचा शाळा पूर्व तयारी अभियान तालुका स्तरीय प्रशिक्षण मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
दरम्यान तालुका सुलभक म्हणून विनायक लिंगायत,अमर पालारपवार,किशोर खोब्रागडे,कन्हैया भांडारकर,चांगदेव सोरते,कु सरलक्ष्मी यामसनी यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले.
दिनांक २१ मार्चला उद्घाटनप्रसंगी नरेंद्र कोत्तावार,शिला सोमनकर,प्रथम संस्थेचे जिल्हा समन्वयक श्रीकांत पावडे, विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते,अमर पालारपवार, किशोर खोब्रागडे,कन्हैया भांडारकर,विनायक लिंगायत, घनश्याम वांढरे उपस्थित होते.
दोन दिवस चाललेल्या प्रशिक्षणात शाळापूर्व तयारी अभियानाची उद्दिष्टे,मागील दोन वर्षात झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढणे,
इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची तयारी करून घेणे.मुलांना शिकवण्यासाठी प्रेरीत करण्याकरिता स्वतः साक्षर असले पाहिजे हे गरजेचे नाही हे पालकांना समजावणे यावर भर देण्यात आला.
प्रशिक्षणात चर्चिले गेलेले घटक हे प्रशिक्षण कार्यशाळेची औपचारिक सुरुवात, परिचय-प्रार्थना-अपेक्षा-नियम.
आता शाळा पुन्हा सुरू झालेल्या आहेत,मुलांच्या शिक्षणाविषयी आता तुम्हाला काय जाणवते आणि काय दिसते आहे?(माईंड मॅप द्वारा सामुहिक मत).शाळा पूर्व तयारी अभियान संकल्पना,मोठ्या गटात चर्चा.
शाळा पूर्व तयारी मेळावा:-स्वरूप आणि पूर्वतयारी,मेळाव्याची पूर्वतयारी चर्चा.
Feedback व उद्याच्या Session संदर्भात सूचना,
वैशिष्ट्येपुर्ण बाबी म्हणजे प्रशिक्षणार्थी यांचा कृतीशील सहभाग,गटामध्ये चर्चा व सादरीकरण,सांघिक भावना.
‘शाळापूर्व तयारी अभियान’ : का?COVID19 मुळे मार्च 2020 पासून शाळा अचानक बंद झाल्या… आता हळू-हळू शाळा पुन्हा सुरु झालेल्या आहेत.या पार्श्वभूमीवर आपण शाळा पुन्हा नव्याने सुरु करताना विशेष काहीतरी केले पाहिजे,म्हणून प्रथम संस्था, MSCERT,समग्र शिक्षा आणि शिक्षण विभाग यांनी एकत्र येऊन मार्च ते जून २०२२ या दरम्यान शाळापूर्व तयारी अभियान चालविण्याचे योजिले आहे.प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी विविध प्रकारच्या सात स्टाल वर प्रत्यक्ष प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
मुलांच्या शालेय शिक्षणाची सुरूवात चांगली झाली तर पुढील शिक्षण प्राप्त करणे त्यांना सहज शक्य होऊ शकेल.
अनेक अहवालातून आणि अनुभवातून असे आढळले आहे कि मुलं शाळापूर्व तयारी अभावी इयत्ता पहिलीत येतात आणि त्यांना औपचारिक शिक्षण प्राप्त करताना अनेक अडचणी येतात.परिणामतः पुढे वाचन-गणिताच्या पायभूत क्षमता देखील पूर्णपणे विकसित होत नाहीत.अशी मुलं पुढे जाऊन अभ्यासात मागेच पडतात.शिवाय यावर्षी इयत्ता १-२ री मधील मुलांनी नीट अंगणवाडी आणि शाळा सुद्धा अनुभवलेली नाही.
शाळा पुन्हा सुरु होत असताना गावस्तरावर पालक,शिक्षक, अंगणवाडी,तरुण स्वयंसेवक, ग्रामस्थ व शासन यांच्या संयुक्त प्रयत्नांनी इयत्ता पहिलीत आलेल्या मुलांच्या ‘शाळापूर्व तयारी साठी राज्यव्यापी मोहिम घेण्याचे आखले आहे.सर्वांनी सदर मोहिमेत कृतीशील सहभागी होऊन दाखल पात्र मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी जनजागृतीसह प्रत्यक्ष सहभाग नोंदवावा हिच अपेक्षा वर्तविण्यात आली आहे.

आजाराने हिरावले ऐन तारुण्यात महिलेचे दोन्ही पाय

0

व्हीलचेअर आणि अन्य मदत दिली काँग्रेस अध्यक्ष*: राजू रेड्डी

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस : नियतीचा खेळ ही निराळाच असतो कोणती वेळ कशी येईल हे सांगता येत नाही
बँक ऑफ इंडिया परिसरात राहणाऱ्या 36 वर्षीय नीता विनोद झाडे यांच्या पायांना संक्रमण झाल्यामुळे दोन्ही पाय कापावे लागल्याने त्यांच्यावर दुःखांचा डोंगरच कोसळला ऐन तारुण्यात दोन्ही पाय गमावल्याने नीता ताई प्रचंड नैराश्यातेत गेले आहे.
सदर बाब काँग्रेस महिला नेत्या पदमा त्रिवेणी यांना माहीत होताच त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या सह पीडितेच्या घरी भेट देऊन आस्थेने विचारपूस केली त्यांना धीर दिला.
त्यांच्या आवश्यकते नुसार व्हील चेअर अन्न – धान्य व नगद स्वरूपात आर्थिक मदद दिली याप्रसंगी इर्शाद कुरेशी,सुकुमार गुंडेटी,सुनील पाटील व अन्य उपस्थित होते.

सांगवी बुद्रुक येथील विवाहिता तीन दिवसांपासून बेपत्ता; यावल पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील २८ वर्षीय विवाहिता ही तीन दिवसांपासून आपल्या माहेरी जात असल्याचे सांगून बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी सोमवारी २१ मार्च रोजी सकाळी यावल पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांकडुन मिळालेली सविस्तर माहिती अशी की, यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील रहिवाशी प्रिती योगेश नेमाडे (वय-२८) या विवाहिता पती व दोन मुलांसह वास्तव्याला आहे. शनिवारी १९ मार्च रोजी सकाळी ८ वाजता अंजाळे ता. यावल येथे माहेरी जाते असे सांगून घरातून गेल्या. सायंकाळ पर्यंत त्या माहरी घरी न पोहचल्याने पती योगेश नेमाडे यांनी आपल्या गाव परिसरात शोधाशोध केली. मात्र, ती महिला कुठेच मिळून आल्या नाहीत. दरम्यान, पती योगेश नेमाडे यांनी सोमवारी २१ मार्च रोजी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून खबर दिली. त्यांच्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात आपली पत्नी प्रिती नेमाडे या हरविल्याची नोंद करण्यात आली . या घटनेचा पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर परदेशी हे करीत आहे.

डांभुर्णीच्या जिल्हा परिषद शाळेची शासनाच्या १६ कलमी कार्यक्रमा अंतर्गत उत्कृष्ठ कामगीरी म्हणुन यावल तालुक्यात प्रथम

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील डांभुर्णी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने १६ कलमी कार्यक्रमांतर्गत यावल तालुक्यात अव्वल येण्याचा बहुमान मिळवला आहे, तालुक्यात डांभुर्णी येथील जिल्हा परिषदची शाळा प्रथम आली ..या निमित्ताने दिनांक २३ मार्च रोजी ग्रामस्थ व सामाजीक संस्थांच्या माध्यमातुन संबंधितांचा सत्कार व पत्रकार परिषद घेण्याचे योजले आहे.

आता या पुढचं उद्दिष्ट जळगाव जिल्ह्यात जिल्हा परिषदच्या शाळामंध्ये प्रथम येण्याचं संकल्प डोळ्यासंमोर ठरवून शिक्षक आणि संबंधित यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत. त्यासाठी त्यांचा उत्साह वाढावा व इतर शाळांना ही त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळावी या विचारातून अगोदर मिळवलेल्या यशाचं कौतुक आणि अभिनंदन झालं पाहिजे आणि म्हणूनच शाळेच्या या सर्वांगीण सुधारणे कामी ज्या ग्रामस्थांनी, शिक्षकांनी ,राजकीय सामाजिक क्षेत्रातल्या मान्यवरांनी योगदान दिले आहे त्यांचे यथोचित सन्मान होणं क्रमप्राप्त आहे
विशेषतः ज्यांच्या आर्थिक योगदाना शिवाय हे शक्य नव्हतं असे सर्व गावातील दानशूर मान्यवरांचा देखील सत्काराचा कार्यक्रम दिनांक २३ मार्च रोजी स्वयंदीप प्रतिष्ठानने या ठिकाणी आयोजित केलेला आहे . तरी या शैक्षणिक कार्यात उल्लेखनिय कार्याचे कौत्तुक करण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी विद्यार्थी पाल्यांनी मा कार्यंक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे .

पूर्णा नगर येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक उर्दू शाळेत व्यवास्थापन समितिचे गठन

0

 

उषा पानसरे असदपूर
दिनांक 21 मार्च

पूर्णा नगर येथिल जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक उर्दू शाळेत व्यवास्थापन समिती नूकतिच गठीत करण्यात आली
करण्यात आले असून यामधे अध्यक्ष व उपाध्यक्ष ची निवड करण्यात आली सलंग तीसऱ्यान्दा अब्दुल अलीम अब्दुल तमीज यांची पालक समितिच्या अध्यक्ष पदी सर्वनुमते निवड करण्यात आली तर उपध्यक्ष पदी शाहीन परवीन नियाज अहमद यांची निवड करण्यात आली, तसेच सदयस्ता मनुन अब्दुल सलीम अब्दुल जब्बार, शाइस्ता परवीन फारूक खान, छोटू शाह बशीर शाह, शगुफ्ता परवीन अब्दुल अकील, शेख साबीर शेख जाफर नाजमीन परवीन सै, कय्यूम, उजमा परवीन अहमद खा, मो, इक़बाल अ, खालिक काजी, मो, शैजाद अलीमोहमद, साजिदा तबसुम निसार खा, नगमा नाज अ, नौशाद काजी, यांची निवड करण्यात आली, यावेळी सचिव मनुन शाळेचे मुख्यधायपाक मो, अशफाक अब्दुल रज्जाक यांनी काम पाहिले, आसेगावचे थानेदार यांच्या मार्गदर्शन खाली पोलिसनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता बहु संख्या ने पालक वर्ग यावेळी उपस्थिति होते,

हिंगणघाट नेहरू वार्ड येथे 413600 रुपयाचा विदेशी दारूसाठा जप्त .

0

20बमार्चला रात्री हिंगणघाट येथे दारूची वाहतूक होणार आहे अशी माहिती खबरी यांनी हिंगणघाट येथील पोहवा शेखर डोंगरे यांच्या डीबी पथकास दिली. मुखबीरचे खबरे वरून पंच व पोस्टॉप सह आरोपीवर प्रो-रेड केला असता आरोपीच्या ताब्यातील रेनॉल्ट क्वीड कंपनीची फोर व्हीलर क्र.MH 32/Y – 5086 मध्ये विदेशी दारू ने भरलेल्या 11 पेट्या असा दारू व जप्त वाहनाची किंमत सह 413600विनापास परवाना वाहतूक करताना मिळून आल्याने आरोपी मनोज भारतलाल जय जयस्वाल वय 54 वर्ष राहणार नेहरू वार्ड हिंगणघाट याच्याविरुद्ध पोलीस स्टेशनला दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली गुन्ह्याचा पुढील तपास डीबी पथक करीत आहे सदरची कामगिरी मा. श्री प्रशांत होळकर पोलीस अधीक्षक वर्धा मा. श्री यशवंत साळुंखे अप्पर , सचिन घेवंदे, सचिन भारशंकर विशाल बंगाले ,यांनी केली आहे .
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

खामगाव पथकाची सोनाळा व टूनकी वरली मटका जुगारावर धाड,6 जणाविरुद्ध कारवाई ,14 हजराचा मुद्देमाल जप्त …!

0

 

संग्रामपूर – अप्पर पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यांना गुप्त बातमीदार माहिती मिळाली की,संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा पोलीस स्टेशन हद्दित सोनाळा व टूनकी येथे सर्रासपणे वरली मटका जुगार चालू आहे. वरून अप्पर पोलीस अधीक्षक साहेब खामगाव यांनी त्यांचे विशेष पथकाला पोलीस स्टेशन सोनाला हद्दीमध्ये जुगार रे ड करण्याबाबत आदेशित केले आज दिनांक 19.3.2022 रोजी विशेष पथकाने पोलीस स्टेशन सोनाला हद्दीमध्ये ग्राम टुणकी व सोनाळा येथे दोन वरली मटका जुगार रेड केल्या दोन्ही रेट मध्ये सहा आरोपीतान विरुद्ध कारवाई करण्यात आली असून त्यांचे कब्जातून वरळी मटका साहित्य सह 14,630 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

आंदोलनात सक्रीय सहभागी असलेल्या बडतर्फ एस. टी. कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

0

 

लातूर/निलंगा प्रतिनिधी
डी.एस. पिंगळे

मागील चार महिण्यापासून एस.टी.महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाकडे यांच्या विविध मागण्या व विलणीकरण यासाठी बेमुदत संप पुकारला आहे. अजूनही काही कर्मचारी कामावर रूजू न होता त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामध्येच निलंगा आगारातील कामावर रूजू न झालेल्या सतीश मधूकरराव चपटे वय ४० या निलंगा आगारातील यांत्रिकी कर्मचा-यालाही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ लातूर विभाग यांच्याकडून एकतर्फी चौकशीअंती ८ जानेवारी रोजी बडतर्फ (डिसमिस) केले होते त्यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने शनिवारी ता. 19 रोजी मृत्यू झाला असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे.
हा कर्मचारी विविध मागण्यासाठीच्या काम बंद आंदोलनात सक्रीय सहभागी होता. त्यामुळे बडतर्फ कर्मचाऱ्यांना मागील चार महिण्यापासून कोणताही पगार नव्हता म्हणून निर्माण झालेल्या आर्थिक विवंचना व ताणतणावामुळे त्यांचा शनिवारी दिनांक १९ रोजी हृदयविकाराच्या
झटक्याने मृत्यू झाला असून त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी दोन मुले असा परिवार आहे.
निलंगा आगारातील अशा एकून ६८ कर्मचाऱ्यांवर बडतर्फची कारवाई करण्यात आली असल्याने बहूतांश कर्मचारी हे सध्या तणावग्रस्त जीवन जगत असून त्यांच्या कुटुंबियावर उपासमारीची वेळ आली आहे.असे किती बळी जाण्याची वाट हे राज्य शासन बघणार आहे असा संतप्त सवाल नातेवाईकाकडून उपस्थित केला जात आहे.

धुलीवंदनाच्या दिवशी लेआऊट व्यवसाय धारकांचा जमीन प्रॉपर्टी च्या वादातून जीवघेणा हल्ला

0

 

हिंगणघाट दि. 18 मार्च भारत भाउराव येनुरकर माता मंदीर वार्ड हिंगणघाट येथे राहतात. व ते लेआउटचा व्यवसाय करतात व मौजा रिमडोह शिवारात हिंगणघाट नागपूर हायवे रोडचे बाजूला रायगड नावाचे हॉटेल चालवितात .भारत येनुरकर हे प्लॉट खरेदी विक्रीचे काम करीत असता त्यांचे सोबत त्यांचे पार्टनर हरिश शेंडे, प्रविण घुरडे, विक्की शाहू सर्व रा. हिंगणघाट हे सन 2012, 2013 पासून काम करित होते. सन 2017 मध्ये त्यांचे पैशाच्या कारणावरून न पटल्याने आपसी मतभेद होवुन भारत येनुरकर हे त्यांचे पासून वेगळे होवून प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय करित आज दि. 18/03/2022 रोजी शहालगडी रोड येथील वसत लॉन मध्ये भारत येनुरकर, अक्षय कामडी, विकास रघाटाटे, महेश घुमडे, जगदीश पिसे, वैभव इंगळे, धिरज इखार, सचिन निखाड़े, दिपक हाळके, उमेश हाळके, गोलु भोंग, अमित तेलंग, अशोक गुळघाणे, अनंता गुळघाणे, अनंता गलांडे, नरेंद्र गलांडे, चेतन तपासे, मयुर तपासे, रोहन मुळे, गौरव सहारे, व इतर लोक कुटुंबासह जेवण करीत असता सायंकाळी 04.30 वा दरम्यान जुने पार्टनर हरिश शेंडे यांचा भारत यांना दोन तिन वेळा फोन आला. मला बोलायचे नाही, असे म्हणून फोन काटला. परत थोड्याच वेळाने हरिश शेंडे याचा फोन आला असता भारत जेवण सोडुन बाहेर जायला निघाले तर त्याचे मागेच मी अक्षय कामडी माझे मामा भारत येनूरकर याच्यामागे, गेलो. वसंत लॉन समोर रोडच्या टर्निंगवर थांबुन आपसात बोलत असता तेथे एक पाढ-या रंगाची मारोती वैगनर व काळ्या रंगाची महेंद्रा एक्स यु व्ही असे दोन फोरव्हीलर गाडी वसंत लॉन समोर येवुन थाबल्या व वॅगनर गाडीतुन हरिश शेंडे हा उतरला व मामाला बाजुला बोलाविले, ते बोलत असता दोन्ही गाडीतून विक्की शाहु, प्रविण घुरडे, आशिष परबत, सोनु आर्या सर्व रा. हिंगणघाट व एक अनोळखी इसम उतरले. विक्की शाहूने त्याचे व्हॅगनर गाडीतून बेस बॉल लाकडी बॅट व एक काडी काढून बेस बॉलची लाकडी बॅट हरिश शेंडे च्या हातात दिली. व हरिश शेंडे याने भारतच्या डोक्यावर वार केला. त्यामुळे भारतचे डोके फुटुन रक्त निघाले व विक्की शाहु हा काडीने व इतर लोक त्यांना हाथाबुक्याने मारहान करू लागले त्यामुळे मामा खाली पडले असता त्यांना वाचविण्यास मधात गेलो तेंव्हा त्यांचे सोबत असलेल्या अनोळखी इसमाने मला पकडुन रोडच्या कॉर्नरवर असलेल्या पुलावर ढकलले. व तो मला हाथाबुक्याने मारत असता प्रविण घुरडे याने त्याला म्हटले की, ताजु उसको छोड़ इधर आ ताजु नावाचा इसम तिकडे गेला. व मी लगेच उठलो पाहिले तर, हरिश शेंडे सोबत आलेले सर्व इसम भारतला घेरून हाथाबुक्याने व हरिश शेंडे याने बेस बॉलच्या लाकडी बॅट ने व विक्की शाहु काडीने मारहान करित होते. आशिष परबत व सोनु आर्य त्यांना मारो उसको मारो उसको असे म्हणत असता मी त्यांच्या घोळक्यात जावुन हरिश शेंडे याच्या हातातील बेस बॉलची लाकडी बैट पकडुन हिंसकली दूर फेकली. व त्याचवेळी सोबत असलेले जगदीश पिसे, महेश घुमडे व इतर लोक ऐथे आले असता विक्की शाहूने त्याच्या हातीतील काडी बाजुला फेकून ते सर्व लोक त्यांच्या दोन्ही गाडीत बसुन निघुन गेले, भारत येनुरकर यांना हरिश शेंडे याने लाकडी बेस बॉलच्या लाकड़ी बॅटने व विवकी शाहुने काडीने व इतर लोकांनी हाथाबुक्यांनी मारहान केल्यामुळे भारतच्या डोक्याला ,डाव्या हाताला मार लागुन रक्त निघत होते. आम्ही त्यांना उचलून वसंत लॉन चे भवन मध्ये नेले व त्यांच्या जखमेवर दुपट्टा बांधला संबंधित माहिती पोलीस स्टेशनला फोन करून माहीती देवून गंभीर मारहाण केल्यामुळे भारत येनुरकर याला त्यांचे इनोव्हा गाडीत घेवून मी अक्षय कामडी महेश घुमडे, वैभव इंगळे विकास रघाटाटे असे सरकारी दवाखाना हिंगणघाट येथे उपचारा करीता नेले तेथे डॉ . नी त्यांचेवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारा करिता रेफर केल्याने खाजगी अॅम्बुलन्स ने नागपुर येथे सीम्स दवाखाना येथे उपचारा करीता रवाना केले . संबंधित माहिती हिंगणघाट पोलिस स्टेशनला दिली . त्यावरून हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे आरोपी हरीश शेंडे ,प्रवीण घुरडे, विकी शाहू, सोनू आर्या, आशिष परबत ,ताजू यांच्या वर 326, 323, 143 ,147 ,148 149 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

रक्षक ही झाले भकक्षक तर … कायद्याच्या रक्षणाची जबाबदारी कोणावर?

0

 

लातूर /निलंगा प्रतिनिधी
डी. एस. पिंगळे

जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील गौर येथील एका शेतीच्या हक्क सिध्द करण्याचा वाद सुरू असताना ज्यांना न्यायालयाने मनाई हुकूम दिला त्याच लोकावर निलंगा पोलीस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हे दाखल झाल्याने न्यायालयाच्या आदेशाची आणि कायद्याच्या रक्षणाची जबाबदारी कोणावर असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दगडू रघुनाथ बारबीले यांनी लातूर विमानतळासाठी संपादीत झालेल्या जमिनीच्या मिळालेल्या मावेजातून गौर ता. निलंगा येथे 1999 मध्ये सर्वेनंबर 223 मध्ये दोन हेक्टर 60 आर जमीन खरेदी केली होती. त्या काळापासून ती जमीन मालकी या नात्याने कसत होते. सन 2020 मध्ये दगडू बारबीले यांनी सुनीता माधव पाटील रा. तुपडी यांना एक हेक्टर 60 आर जमीन विक्री केली. त्यावेळीच विठ्ठल हरिचंद्र पाटील, माधव हरिचंद्र पाटील, विलास पाटील, सुधाकर पाटील हे जमिनीमध्ये अडथळा करीत असल्याबाबत येथील न्यायालयात दगडू बारबीले यांनी दावा दाखल करून मनाई हुकूम मागितला.
दगडू यांची बाजू ग्राह्य धरून येथील सह दिवानी न्यायाधीश वरिष्ठ स्तर निलंगा यांनी 27 जानेवारी 2021 रोजी तात्पुरता मनाई हुकूम दिला. त्यामध्येच विठ्ठल हरिशचंद्र पाटील व ईतर यांनी मुळ मालक दगडू बारबीले यांच्याकडून ठरावपत्र करून जमीन आम्हास विक्री केली म्हणून न्यायालयात तात्पुरता मनाई हुकूम मागितला होता न्यायालयाने हे ठरावपत्र नोंदणीकृत नसल्यामुळे तात्पुरता मनाई हुकूम फेटाळला तरीही त्यांनी या जमिनीच्या शेतातील मशागती, विविध पीकाच्या राशी करीत असताना अडथळे निर्माण केले. त्यावरून निलंगा पोलिस ठाण्यात विठ्ठल हरिशचंद्र पाटील व ईतर जणाविरूध्द गुन्हे दाखल झाले.
त्या काळातच दगडू बारबीले यांनी सुनीता पाटील यांना विक्री केलेल्या एक हेक्टर 60 आर या क्षेत्रात विठ्ठल पाटील व ईतर 15 जण अडथळा करीत आहेत म्हणून सुनीता पाटील यांनी मनाई हुकूम मागितला होता हि मागणी ग्राह्य धरून येथील दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर निलंगा यांनी 23 फेब्रुवारी 2022 रोजी मनाई हुकूम दिला याबाबत दगडू बारबीले व सुनीता पाटील यांनी शेतातील रास करण्यासाठी पोलिस संरक्षणाची मागणी केली पोलिस अधिक्षक कार्यालयाने पोलिस बंदोबस्ताचा अर्ज फेटाळला होता.
मात्र न्यायालयाचा आदेश आपल्या बाजूने आहे म्हणून 13 मार्च 2022 रोजी शेतातील हरभरा पीक काढणी अभावी वाया जात असल्यामुळे दगडू बारबीले व सुनीता पाटील मजूरामार्फत पीक काढत असताना विठ्ठल हरिशचंद्र पाटील व त्यांच्या घरातील लोकांनी मनाई हुकूम असतानाही बेकायदा शेतामध्ये येऊन दगडू बारबीले, माधव पाटील, यादव पाटील यांना मारहाण करून दिवसा ढवळ्या पेट्रोल टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न केला तरीही निलंगा पोलिसांकडून दोन्ही गटाच्या परस्पराविरोधात एकमेकांच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
न्यायालयाचा मनाई हुकूम असताना बेकायदा शेतामध्ये येऊन जिवे मारण्याचा प्रयत्न होतो व न्याय मिळालेल्या लोकावरच पोलिसांकडून 307 सारखे गुन्हे दाखल होतात. त्यातील आरोपी पोलिसाच्या डोळ्यांसमोर फिरता असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे न्यायालयाचा न्याय मिळून तरी काय उपयोग असा हताश सवाल उपस्थित होत असून ज्यांच्यावर कायद्याच्या रक्षणाची जबाबदारी आहे त्यांच्याकडूनही खर्या लोकांना संरक्षण मिळत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक न्याय मिळाल्यानंतरही आपल्या मालमत्तेचे रक्षण करू शकत नाही तर न्यायालयाच्या ‘त्या’ न्यायाचा काय उपयोग असा सवाल अॕड जयंत देशपांडे यांनी उपस्थित होत आहे.