Home Blog Page 318

WCL वणी क्षेत्राचे महाप्रबंधक मा. उदय कावले सर यांचे प्रमोशन झाल्याबद्दल मा. आ. किशोरभाऊ जोरगेवार तर्फे अभिनंदन आणि सत्कार

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

*आज दि. 17 मार्च ला, WCL वणी क्षेत्राचे महाप्रबंधक मा. उदय कावले साहेब यांचे महाप्रबंधक या पदावरून डायरेक्टर आँफ टेक्नीकल, धनबाद सबसीडीरी या ठिकाणी पदोन्नती झाल्याबद्दल चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. किशोरभाऊ जोरगेवार यांच्या माध्यमातून यंग चांदा ब्रिगेड चे प्रेम गंगाधरे, राजु नातर यांना मा. उदय कावले साहेब यांना वणी क्षेत्र महाप्रबंधक कार्यालय ताडाळी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट घेऊन शाँल-श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि मिठाई देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मा. उदय कावले साहेब यांनी आमदार साहेबांचे आभार व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, वणी क्षेत्रात काम करत असतांना सर्व WCL कर्मचाऱ्यांनी योग्य सहकार्य केल्याची भावना व्यक्त केली. तसेच माझे संपूर्ण श्रेय WCL कर्मचाऱ्यांना जाते, असे म्हटले*

सॅम्पलिंग न करताच कोळश्याचे महजेनकोला पुरवठा. उन्हाळ्यात वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता

0

कोटेनका सॅम्पलरचे ठिय्या आंदोलनाला सुरुवात

(चंद्रपूर घुग्घुस) प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस :वेतनवाढ व अन्य मागण्याच्या पुर्तते करिता 11 मार्च पासून सॅम्पलिंग कामगारांनी काम बंद पुकारला असून एक आठवडा होऊन ही सिम्फर व कोटनका, वेकोली या कंपन्यानी कामगारांची दखल घेतली नसल्याने आज दिनांक 17 मार्च पासून कामगारांनी सब एरिया कार्यलया समोर काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली अनशन मंडप टाकून आंदोलनाला सुरुवात केली असून येणाऱ्या दिवसात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा रेड्डी यांनी दिला आहे.
कोळशाचे उत्पादन करणारे कोल इंडिया आणि विद्युत निर्मिती करिता कोळशा खरेदी करणारे महाजेनको या कंपन्यांनी कोळशाचे गुणवत्ता (सॅम्पलिंग) तपासणीचे कंत्राट संयुक्तपणे सिम्फर या कंपनीला दिले आहेत.
आणि सिन्फर या कंपनीने कोटनका इंस्पेकॅशन प्रा. लि या कंपनीला कंत्राट दिले.
कोटेनका ही कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून सब एरिया कार्यालय परिसरातील कार्यालयातून घुग्घुस रेल्वे सायडिंग मधून कोळसा सॅम्पलिंगचे कार्य करीत
आहे.
याठिकाणी जवळपास चौवीस कामगारांचा शोषण केल्या जात आहे.
त्यांना वेकोलीच्या हाय पॉवर कमेटीने निर्धारित केलेले वेतन दिल्या जात नाही.
साप्ताहिक सुट्टीचे वेतन मिळत नाही, यासोबतच धूळ भत्ता,मेडिकल सह अन्य कुठल्याही प्रकारच्या सुविधा मिळत नसल्याने संतप्त कामगारांनी दिनांक 11 मार्च सकाळी 08 वाजताच्या पाळी पासून कामबंद आंदोलनाला सुरुवात केली आहे.
कोळशाची सॅम्पलिंग तपासणी बंद पडल्याने वेकोली सरसकट कोळशा ज्यात दगळ – धोंडे माती महजेनकोला पाठविल्या जात असल्याने वीज केंद्र बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली असून ऐन उन्हाळ्यात वीज खंडीत झाल्यास नागरिकांना प्रचंड त्रास भोगावा लागणार आहे.
या गंभीर प्रकाराकडे वेकोली व महाजेंनकोने तातळीने लक्ष देऊन
सिम्फर या कंपनीस कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी लक्ष देऊन कोटनका या कंपनीस कामगारांच्या वेतनात वाढ करण्यास बाध्य करावे अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
आज ठिय्या आंदोलनात
काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी, कामगार नेते सैय्यद अनवर,रोहित डाकूर,अनुप भंडारी,रफिक शेख,सचिन कोंडावार, प्रणय लिंगमपेल्ली,प्रेम कालापेल्ली,अशोक सोनटक्के,विशाल जंगम,रवी भगत,प्रमोद मांढरे,बाबा जीवन,लीलाधर आत्राम,सुशांत वाघमारे,कुमार अंबाला,योगेश आरपवल्ली,सुधाकर जुंघरे,राजू कांबळे,राजू पाटील,प्रशांत तोंगे,महादेव मांढरे,विजय नागपुरे,सचिन मांढरे,अमित कामतवार, व अन्य कामगार आंदोलनात सहभागी झाले आहेत.

लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव यांच्यासह विविध पदाधिकारी यांच्या हस्ते राज्यमार्ग २३६ ते भांबरी(बसवंतपूर) रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ

0

 

लातूर/निलंगा प्रतिनिधी
डी. एस. पिंगळे

राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव यांच्या हस्ते आज गुरुवार दि. १७ मार्च २०२२ रोजी दुपारी लातूर शहरानजीकच्या भांबरी चौक येथे राज्यमार्ग २३६ ते भांबरी (बसवंतपूर) रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी लातूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य समद पटेल, ट्वेंटीवन शुगर कारखान्याचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, जिल्हा परिषद सदस्य परमेश्वर वाघमारे, जिल्हा परिषद सदस्य पंडित ढमाले, लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, विलास सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनंत बारबोले, प्रताप पाटील, सोशल मीडिया काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे उपअभियंता जयंत जाधव, शाखा अभियंता प्रभाकर भवाळ, महेश काळे आदी उपस्थित होते,
यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव म्हणाले की राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी त्यांच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचा फायदा लातूर जिल्ह्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सह विविध रुग्णालयांना करून देऊन कोरूना काळात उत्कृष्ट आरोग्याच्या सोयीसुविधा मिळवून दिल्या पालकमंत्र्यांनी लातूरच्या विकासाचा आराखडा तयार केला असून लातूर चा विकासाचा पॅटर्न ते निर्माण करत आहेत विकासाची सर्व कामे पालकमंत्री देशमुख यांच्याकडे पाठपुरावा करून पूर्णत्वाला घेऊन जाऊ अशी ग्वाही त्यांनी दिली.
लातूर शहरानजीकच्या भांबरी चौक येथे राज्यमार्ग २३६ ते भांबरी (बसवंतपूर) रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ प्रसंगी भांबरी(बसवंतपूर) च्या सरपंच पंचशीला वाघमारे, उपसरपंच दिलीप चिकटे, ग्रामसेवक शंकर भोसले, दिगंबर माने, प्रबत पाटील, दिगंबर माने, बिरू सरवदे, मारुती चीगुरे, बसवेश्वर लांडगे आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते भांबरी (बसवंतपूर) ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक शंकर भोसले यांनी करून शेवटी उपस्थित मान्यवरांचे त्यांनी आभार मानले.

सुनगाव ग्रामपंचायत अंतर्गत होत असलेल्या वार्ड नंबर 1 मधील नाली बांधकाम निकृष्ट दर्जाचे

0

माजी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग गवई यांचा आरोप

गजानन सोनटक्के जळगाव जा

सुनगाव ग्रामपंचायत वार्ड नंबर 1 मधील रतन दामधर व लक्ष्मण धुळे यांच्या घरा जवळील नाली बांधकाम सुरू आहे व नाली बांधकाम करीत असताना बेसफाउंडेशन वरचेवर करून रेती ही गावच्या नदीतील वापरण्यात आली आहे तसेच सिमेंट सुद्धा वेगळेच वापरलेले दिसते वाळू ही माती मिश्रीत गावठी आढळून आहे तसेच फोंडीशन हे कोणत्या ही प्रकारे दबाई न करता वरचेवर कच्चे आहे.तसेच त्याची क्युरींग केली नाही, सिमेंटचे सुद्धा कमी प्रमाण वापरले आहे.यामुळे नाली बांधकाम हे निकूष्ठ दर्जाचे झाले असून सदर कामात भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येतो व खोदकाम केल्यानंतर खाली ८० mm टाकुन दबाई केली नाही अशी बरीच कामे अंदाज पत्रका प्रमाणे केली नसुन यामध्ये भरपूर प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे . या कामाची चौकशी करावी,जेनेकरुन होणार्या भ्रष्टाचाराला आळा बसावा असा आरोप पांडुरंग गवई यांनी केला आहे

मुरारका महाविद्यालयात कॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन

0

 

शेगाव प्रतिनिधी अर्जुन कराळे

शेगाव . सेठ ग. भी. मुरारका महाविद्यालय, शेगाव येथे आक्यूएसी, प्लेसमेंट सेल आणि एनआयआयटी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बी. ए. व बी. कॉम. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांकरीता प्लेसमेंट कॅम्पचे आयोजन करण्यात आले. सेठ संजय कुमारजी मुरारका संचालक, शेगाव शिक्षण संस्था शेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पस प्लेसमेंट २०२२ चे उद्घाटन करण्यात आले.
वैष्णवी शेजवाल सेंटर मॅनेजर एनआयआयटी पुणे आणि सूरज बनबुडे सीनियर काउन्सेलर पुणे यांनी आय सी आय सी आय बँक मध्ये नियुक्तीकरिता महाविद्यालयात उपस्थित राहून मुलाखती घेतल्यात. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एल राठोड होते. डॉ. आर. एम. शर्मा समन्वयक, डॉ. विनोद गायकवाड आणि प्रा. निलेश देवर सेलचे सदस्य यांनी नियोजन केले.
मुलाखतीकरिता महाविद्यालयातील आजी व माजी असे एकूण ९१ विद्यार्थी उपस्थित होते. त्यापैकी अंतिम मुलाखतीकरिता ४० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या कॅम्पस प्लेसमेंट मुळे विद्यार्थ्यांना मुलाखत कशा प्रकारची द्यावी लागते याचे ज्ञान मिळाले. तसेच एन आय टी पुणे यांच्यासोबत महाविद्यालयाचे एमओयु करण्यात आले.
डॉ. आर. एम. शर्मा समन्वयक यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक करताना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या भविष्याकरिता कॅम्पस प्लेसमेंट कॅम्प आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. या आयोजनामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. यावेळी प्रा. पी. बी. गायकवाड, प्रा. पी. बी. मेश्राम, प्रा.एस. व्ही. अग्रवाल, प्रदीप राठी उपस्थित होते. सत्यनारायण कचरे, संजय केळकर व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

हिगोणा येथील दलित वस्ती अंतर्गत ऑनलाईन टेंडरमध्ये हस्तक्षेप प्रकरणासंदर्भातील प्रश्न आमदार शिरीष चौधरी यांनी विधानसभेत मांडला

0

 

यावल तालुका (प्रतिनिधी) विकी वानखेडे

तालुक्यातील हिगोणा येथील दलित वस्ती अंतर्गत ऑनलाईन टेंडरमध्ये हस्तक्षेप प्रकरणासंदर्भातील प्रश्न आमदार शिरीष चौधरी यांनी विधानसभेत मांडला त्यावर ‘या प्रकरणात समावेश असलेल्या सर्वांची चौकशी करावी’ असे आदेश राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत.
हिगोणा येथील दलित वस्ती निधीचा गैरवापर व ऑनलाइन टेंडरमध्ये हस्तक्षेप करून आर्थिक व्यवहार व काळाबाजार करून दलित वस्तीच्या निधीचा अपहार करू पाहणारे सरपंच व ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य व त्यांचे नातेवाईक या सर्वांची चौकशीचे आदेश राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज बुधवार, दिनांक १६ रोजी विधानसभेत प्रश्न उत्तर देतांना सांगितले.
आमदार शिरीष चौधरी यांनी अधिवेशनामध्ये ग्रामविकास मंत्र्यांकडे प्रश्न केला उपस्थित ग्रामविकास अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई व चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे वृत्त आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, ‘हिगोणा येथे दलित वस्ती योजने अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करण्यासाठी दहा लक्ष तसेच महिला स्वच्छालय उभारणीसाठी सहा लक्ष एवढा निधी दलित वस्तीसाठी मंजूर झालेला होता. परंतु दहा लक्ष रुपये ई टेंडर काढून; ई निविदा काढून ग्रामपंचायतीने कुठल्याही वृत्तपत्रात नोटीस बोर्डावर किंवा दवडी न देता तसेच स्थानिक लोकांच्या वाद दाखवून ई-टेंडर निविदेला तूर्त स्थगिती दिली आणि आर्थिक लाभापोटी ई टेडर निविदा रिओपन न करता त्यांनी मासिक सभेमध्ये ऑफलाईन टेंडर विनायक अडकमोल यांना देण्यात आले. ग्रामपंचायत यांनी कुठलीही वर्क ऑर्डर न देता दहा लक्ष रुपयांचे काम परस्पर सुरू केले.

या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी गटविकास अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देऊन या दलित वस्तीच्या कामात गैरप्रकार व आर्थिक व्यवहार करून यांनी ही निविदा रद्द बाद करून आपल्या पद्धतीने काम सुरू केली असल्याचे शासनाच्या निदर्शनास आणून दिले आणि यावल येथील गटविकास अधिकारी यांनी तात्काळ ग्रामपंचायत सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.

दलित वस्ती अंतर्गत कामावरचे अवैधरित्या रेती साठा असून तलाठी यांनी तात्काळ पंचनामा करून तहसीलदार यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. आहे. यावल रावेर मतदार संघाचे आमदार शिरिष चौधरी यांनी हा ऑनलाइन टेंडर गैरप्रकार झाल्याचे व सरपंच, ग्राम विकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य यांच्या संगनमताने दलित वस्ती योजनेच्या कामांमध्ये गैरप्रकार झाला असल्याची माहिती विधानसभेत अधिवेशनात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या समोर मांडली.

त्यावर ग्राम विकास मंत्री यांनी तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून यावेळी कारभारात समाविष्ट असलेले सरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच अन्य अधिकारी यांच्या चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

शिवसेनेचा ‘हा’ आमदार खंडणी घेतो, पक्षातील नेत्याचेच गंभीर आरोप, चेंडू उद्धव ठाकरेंच्या कोर्टात!

0

 

 

अकोला : अकोला जिल्हा शिवसेनेतील वाद काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीय. एका लेटरबाँबने या आरोप-प्रत्यारोपांच्या दुसऱ्या अंकाला सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे अकोल्याचे सहसंपर्कप्रमुख श्रीरंग पिंजरकरांनी पक्षाचे आमदार आणि जिल्हाप्रमुख नितीन देशमुखांवर गंभीर आरोप लावले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात पिंजरकरांनी आमदार देशमुखांवर थेट खंडणीचे आरोप लावले आहेत. आमदार नितीन देशमुखांनी मात्र सहसंपर्कप्रमुखांचे आरोप फेटाळून लावले आहेत.

अकोला शिवसेना सहसंपर्कप्रमुख श्रीरंग पिंजरकरांचे आमदार नितीन देशमुखांवर गंभीर आरोप

शिवसेनेला मोठा धक्का, महिलेला मारहाण प्रकरणी आमदारावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
अकोला जिल्हा शिवसेनेत सध्या एका पत्राने मोठी खळबळ उडून दिली आहे. शिवसेनेचे सहाय्यक संपर्कप्रमुख श्रीरंग पिंजरकरांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना हे हे पत्र लिहिलंय. या पत्रात बाळापूरचे सेना आमदार आणि जिल्हाप्रमुख नितीन देशमुखांवर गंभीर आरोप लावण्यात आले आहे.

आमदार नितीन देशमुख हे खंडणीखोर आहेत. जिल्ह्यात खंडणी वसुलीत आमदार देशमुख सर्वात आघाडीवर असल्याचा पिंजरकरांनी पत्रात आरोप केलाय. जिल्ह्यात काम करणारे अधिकारी आणि कंत्राटदार नितीन देशमुखांना धास्तावले असल्याचा पिंजरकरांचा आरोप आहे. जिल्ह्यात शिवसेना संपवण्यासाठी आमदार देशमुख भाजपाशी संधान साधत असल्याचा सनसनाटी आरोप पिंजरकर यांनी केलाय. नितीन देशमुख यांच्या नेतृत्वातील जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करुन नव्याने नेमणुका करण्याची मागणी त्यांनी पत्रातून केलाय.
अकोला शिवसेनेतील वादाला किनार आहे, ती विधान परिषद निवडणुकीतील पक्षाच्या लाजिरवाण्या पराभवाची. आमदार नितीन देशमुखांच्या दगाफटक्यांनीच तीनदा आमदार राहिलेल्या गोपीकिशन बाजोरियांचा पराभव झाल्याचा बाजोरिया गटाचा आरोप आहे. आमदार देशमुख भाजपशी संधान सांधत जिल्ह्यात पक्ष संपविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा बाजोरिया गटाचा आरोप आहे.
जिल्ह्यातील बाजोरिया गटातील असंतुष्टांनी यासंदर्भात नुकतीच मुंबईत पक्षाचे सचिव अनिल देसाईंची भेट घेत पक्षप्रमुखांना हे पत्र दिलं. माजी आमदार गोपीकिशन बाजोरियांच्या नेतृत्वात ही भेट झाली. दरम्यान, या गंभीर आरोपांवर आमदार आणि जिल्हाप्रमुख नितीन देशमुखांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला आहे.

दरम्यान, अकोला शिवसेनेतील हे आरोप-प्रत्यारोप फार गंभीर आहे. यापेक्षाही गंभीर आहे ती पक्षानं यावर साधलेली चुप्पी. पक्ष या गंभीर आरोपांकडे गांभीर्यानं पाहत दूध का दूध, पाणी का पाणी करेल, ही अपेक्षा सेना कार्यकर्त्यांना आहे, आता चेंडू आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात….!

 

शेत रस्त्यासाठी दिला शेतकऱ्याने दिला आत्मदहनाचा इशारा

0

 

शहर प्रतिनिधी जगन पाटील

लोणार तालुक्यातील धायफळ या गावी दिलीप किसन राऊत यांनी प्रशासनाला शेतात ये जा करण्यासाठी रस्त्यासाठी दिला आत्मदहनाचा इशारा मौजे धायफळ येथील शेती गट क्रमांक 130 मध्ये जमीन असून जमिनी मध्ये जाण्यासाठी-येण्यासाठी रस्ता पूर्वीपासून वहीवाट असलेला रस्ता होता.परंतु गैरअर्जदार तान्हाजी यशवंत राऊत,श्रीराम टोपा राठोड यांनी हा रस्ता अडविला आहे याबाबत अर्जदार यांनी तहसीलदार लोणार यांच्याकडे 22/12/2021ला रस्ता खुला करून मिळावा यासाठी विनंती अर्ज केला होता,तरीसुद्धा आज पर्यंत मला(अर्जदार) शेतात जाण्या-येण्यासाठी रस्ता खुला करून दिला नाही.माझी पिके काढणीला आले असून मी ते पिके कसे काढावी ? असा प्रश्नही अर्जदाराने प्रशासनाला विचारलेला आहे यासंदर्भात नायब तहसीलदार यांनी स्वतः रस्त्याची पाहणी केली असून सुद्धा रस्ता खुला करून दिला नाही,त्यामुळे शेतात पीक काढणी जाणे-येणे करण्यासाठी त्रास होत आहे तरी माझा रस्ता खुला करून द्यावा अन्यथा मी आत्मदहन करणार आहे याची प्रशासनाने दखल घ्यावी व याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन आहे.

यावल येथे विनापरवाना दारूची वाहतूक करणारे चारचाकी वाहन पकडले; तीन जणांना अटक

0

 

यावल ( प्रतीनिधी ) विकी वानखेडे

येथील शहरातील बुरूज चौककडून विनापरवाना देशी दारूची वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनावर पोलीसांनी कारवाई केली. या कारवाई १ लाख ५२ हजार ८८० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत मंगळवार १५ मार्च रोजी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल शहरातून शिरपूरकडून मध्यप्रदेशात विनपरवाना देशी दारूची वाहतूक चार चाकी वाहनातून होत असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार सोमवारी १४ मार्च रोजी रात्री यावल पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार मुजफ्फर खान, सहायक फौजदार असलम खान, हवालदार बालक बाऱ्हे, सुशील घुगे, राहुल चौधरी, निलेश वाघ यांनी शहरातील बुरुज चौकात वाहन तपासणी करण्यात आली. यात शिरपूर कडून येणाऱ्या (एमएच ०१ बीडी ९१२४) या कारच्या डिक्कीत अवैधरित्या देशी दारू वाहतूक करतांना मिळून आली. वाहनात टँगो पंच या देशी दारूच्या ४८ बोटल मिळून आल्या. याप्रकरणी अतुल अरुण मानकर, शुभम नरेंद्र मावळे दोन्ही रा. पिंपळगाव ता. जळगाव जामोद व निलेश सुभाष बेलदार रा. दापोरा ता.जि. बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) या तीघांना पोलीसांनी ताब्यात घेतले. देशी दारू किंमत २ हजार ८८० व वाहन २ लाख ५० हजरात एकुण २ लाख ५२ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. याप्रकरणी मंगळवारी १६ मार्च रोजी यावल पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार असलम खान करीत आहे.

घुग्घुस येथील राजीव रतन चौकात 24 तास वाहतूक पोलीस तैनात करा

0

 

भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांची निवेदनातून मागणी

घुग्घुस येथील राजीव रतन चौकात चोवीस तास वाहतूक पोलीस तैनात करण्याची मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या सूचनेनुसार भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी ठाणेदार बबन पुसाटे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
सध्या राजीव रतन चौकातील रेल्वे फाटकावर नवीन उडान पुलाचे बांधकाम सुरु आहे. बांधकाम सुरु असल्याने वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. दररोज रेल्वेच्या कोळशाच्या वॅगन भरून जात असल्याने अर्ध्या ते एक तासाच्या अंतरात हे रेल्वे फाटक बंद असते त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात व रेल्वे फाटक सुरु होताच याठिकाणी वाहतूक विस्कळीत होते. वाहतूक विस्कळीत होत असल्याने अनेक अपघात घडले आहे. ही समस्या लक्षात घेत भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी शिष्टमंडळासह ठाणेदार बबन पुसाटे यांची पोलीस ठाण्यात भेट घेतली व चर्चा केली व राजीव रतन चौकात चोवीस तास वाहतूक पोलीस तैनात करण्याची मागणी निवेदनातून केली आहे.
निवेदन देतांना भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी सरपंच संतोष नुने, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप, माजी तंमुस अध्यक्ष मल्लेश बल्ला, भाजपाचे संजय जोगी, चिंचोळकर महाराज उपस्थित होते.