Home Blog Page 319

शाळा पूर्वतयारी अभियान प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत–प्राचार्य डॉ विनित मत्ते यांचे आवाहन.

0

 

दिनांक २१ व २२ मार्चला चार केंद्रांवर प्रशिक्षणाचे आयोजन.

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक

गडचिरोली:-दिनांक २१ व २२ मार्च-२०२२ ला गडचिरोली जिल्ह्यातील चार प्रशिक्षण केंद्रावर शाळा पूर्वतयारी अभियान या उपक्रमाच्या अनुषंगाने प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.वडसा प्रशिक्षण केंद्रावर कोरची आणि कुरखेडा तालुक्यातील शिक्षक, गडचिरोली प्रशिक्षण केंद्रावर आरमोरी आणि धानोरा तालुक्यातील शिक्षक,चामोर्शी प्रशिक्षण केंद्रावर एटापल्ली आणि मुलचेरा तालुक्यातील शिक्षक व अहेरी प्रशिक्षण केंद्रावर सिरोंचा आणि भामरागड तालुक्यातील शिक्षक सहभागी होणार आहेत.दिनांक २४ मार्चला गडचिरोली जिल्ह्यातील सर्व म्हणजे १०३ केंद्रांवर प्रशिक्षण घेतले जाणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून सदर उपक्रम मोठ्या उत्साहात सुरू झालेले आहेत.
या उपक्रमांतर्गत विभागस्तरीय प्रशिक्षण चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील कार्यरत घटकांचे चंद्रपूर येथे दिनांक ९ व १० मार्च रोजी घेण्यात आले.
या प्रशिक्षणातील महत्वाचा भाग म्हणजे “शाळापूर्व तयारी मेळावा” होय,कोरोणा कालावधीत ग्रामीण भागांतील इयत्ता पहिली मध्ये नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना मागील दोन वर्षापासून कोणतीही शिक्षणाची पार्श्वभूमी नसल्याने ते अंगणवाडी मध्ये किंवा बालवाडी मध्ये जाऊ शकली नाहीत.या मुलांना पुढे जाऊन वाचन,लेखन व गणनपूर्व क्रिया शिकताना कोणताही प्रकारचा अडथळा येणार नाही आणि ते व्यवस्थित शिकू शकतील यासाठी हे या अभियानांतर्गत गावागावात उपक्रम राबवून शिक्षणात माता-पालक,युवक,अंगणवाडी सेविका,सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत,स्वयंसेवकांचा सहभाग घ्यावयाचा आहे.
सोबतच या उपक्रमाला प्रथम संस्थेच्या माध्यमातून कृतीयुक सहभाग लाभणार आहे.
जागतिक महामारीमुळे लहान मुलांचे शैक्षणिक जीवन बंदिस्त करून टाकले याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर झाल्याचे चित्र दिसून येत आहे.या मुलांना शाळेमध्ये येण्यापूर्वी घरी माता-पालक यांच्या मदतीने विविध साहित्याच्या माध्यमातून शैक्षणिक कृती करून घ्यावयाच्या आहेत.
जनजागृतीसाठी मेळावे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व शाळा सुरू होण्याच्या दहा दिवस अगोदर शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन केले जाईल.
या मेळाव्यामध्ये नाव नोंदणी,शारीरिक विकास,बौद्धिक विकास, सामाजिक व भावनिक विकास,भाषा विकास व गणन पूर्व तयारी,साहित्य वितरण अशा प्रकारचे विविध स्टॉल लावून त्या स्टॉल मधील साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विकासाचे मूल्यमापन केल्या जाणार आहे.
त्यानंतर माता पालकांना त्यांच्या मुलाच्या नावाचे विकास पत्र देण्यात येईल व मुलगा कुठे कमी आहे?त्यासाठी त्याला कोणत्या कृतींची गरज आहे?याविषयीचे सविस्तर मार्गदर्शन सदर मेळाव्यातच केल्या जाणार आहे.
त्यानंतर गावातील मातांचे गट बांधणी करून या गटाच्या माध्यमातून व गावातील स्वयंसेवकांच्या मदतीने सदर मुलाला कसे मार्गदर्शन करावे? यासाठी माता पालकांना सहकार्य केल्या जाईल. उन्हाळ्यातील दोन महिन्यांमध्ये मातापालकांनी आपल्या मुलांसाठी काही कृती घेणे गरजेचे आहे त्यासाठी त्यांना साहित्यही उपलब्ध करून दिल्या जाणार आहे.
गावागावात आता शिक्षणाचा जागर माता पालकांच्या व गावातील शिक्षणप्रेमी च्या मदतीने शाळेच्या व्यतिरिक्त घरात, समाज मंदिरात व वाड्या वस्तीवर सुरू होणार आहे.
या अभियानामुळे मुलांमध्ये व मातांमध्ये आत्मविश्वास निर्माण होणार आहे.माझा मुलगा आता उत्तम प्रकारे शिक्षण घेऊ शकेल.त्याची एक प्रकारची शिक्षणाची बैठक तयार होणार आहे.
शाळापूर्वतयारी अभियानाचे टप्पे म्हणजे तालुकास्तरीय प्रशिक्षण व केंद्रस्तरीय प्रशिक्षण व प्रत्यक्ष शाळास्तरावर मिळावे हे सर्व प्रशिक्षण लवकरच नियोजनानुसार पुर्ण केले जाणार आहेत.
शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने उचललेले हे पाऊल अतिशय अभिनंदनीय आहे.या उपक्रमाचे
सर्व स्तरावर त्याचे कौतुक होत आहे.आपल्या मुलाच्या शिक्षणात आई म्हणून माझी भूमिका समजून घेणे व त्याला सहकार्य करणे यावर अधिक भर असणार आहे.शाळा-शाळांमध्ये शाळापूर्व तयारी मेळावे “उत्सवाप्रमाणे” साजरे होणार आहेत आणि गावातील वातावरण हे
“शिक्षणमय” होणार आहेत हे विशेष…..!

तु माझ्या सोबत मैत्री कर तु मला आवडली आहे. एका विरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल

0

 

यावल तालुका ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

सांगवी बुद्रुक ता. यावल येथील पिडीत 20 वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादी नुसार ती व तिची नणंद मंगळवारी सकाळी 11 वाजेला गावातील हौदावर धुणे धुत असतांना जहांगीर तडवी रा. बोरखेडा ता. यावल हा तिच्याजवळ आला व तिला दम देवुन तिचा मोबाईल नंबर घेवुन हौदापासुन ते घरापावेतो पाठलाग केला व तु माझ्या सोबत मैत्री कर तु मला आवडली आहे. मी तुला खुश ठेवीन असे बोलुन मोबाईलवर फोन करुन तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे तेव्हा हा प्रकार पिडीतने आपल्या पतीसह कुटुंबास सांगीतला व रात्री उशीरा यावल पोलिसात जहांगीर तडवी यांच्या विरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास हवालदार अशोक जवरे करीत आहे.

पातृर्डा बु पाणीप्रश्न पेटणार;संगितराव भोंगळ यांनी दिला गर्भित इशारा!

0

 

पाण्याच्या ऐतिहासिक लढ्यात सहभागी व्हा संगितरावांची गावकर्यांना हाक!

भरसभेत पाणिदार नेतृत्वाला अश्रृ अनावर गावकर्यांचे पाण्यासाठी लढा!
– संगितरांवांच्या आव्हानानंतर गावकरी एकवटले!

पातृर्डा बु ता संग्रामपुर ग्रामस्थांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला पाणिप्रश्न मागिल ५-६ वर्षांच्या संघर्षानंतर अखेर निकाली लागला व तब्बल २ कोटी ३१ लाख ८१ हजारांचा निधी मंजुर झाला.
मात्र, पाण्यासाठी चा लढा यशस्वी होवुन संबधित विभागाचे अधिकारी निविदा काढण्यात दिरंगाई करत असतांना त्यासाठी रात्र-दिवस विनविण्या करुन अखेर निविदा काढण्यासाठी प्रयत्न केलेत त्यानंतर ही एका पत्राचे कारण देत अधिकार्यांनी निविदा अडकवुन ठेवल्याचे सांगत भरसभेत माजी.जि.प.उपाध्यक्ष संगितराव भोंगळ यांनी अश्रुंना मोकळ करत टाहो फोडला…!
या वेळी सभेला उपस्थित असलेल्यांचे देखील डोळे पाणावले होते…
आज दि.१५ मार्च रोजी संध्याकाळी ८ वाजता स्थानिक आठवडी बाजार येथे उपरोक्त विषयाला अनुसरुन सभेचे आयोजन केले होते.
पाणीपुरवठा योजना मंजुर असतांना देखील अधिकार्यांनी निविदा थांबवुन पातृर्डा वासियांवर अन्याय केल्याने व हा पाण्यासाठी संघर्ष आपल्याला अधिक ज्वलंत करण्यासाठी गावकर्यांना संबोधित करुन नेमकं पाणीपुरवठा योजनेचे पाणी कुठ मुरलं हे गावकर्यांना समजावं यासाठी ही सभा आयोजित केल्याचे राजु पाटिल यांनी स्पष्ट केले.
मागिल ५-६ वर्षापासुन पाणीसंघर्ष सुरु असतांना अखेर कोट्यावधीचा निधी मंजुर झाला. हा लढा माझा एकट्याचा नाही .यात सर्व गावकरी सहभागी होते. मात्र, योजना मंजुर होवुनही अधिकारी अडेटट्टुपणे निविदा थांबविण्याचे काम करत आहेत व अशा अधिकार्यांना धडा शिकविण्यासाठी लोकशाही मार्गाने पाण्याचा लढा उभारत आहोत व या लढ्यात मला गावकर्यांची सोबत हवी असे सांगताना, आज पासुन हा पाणीप्रश्न बुलढाणा ते मुंबई पर्यंत ज्वलंत करु असा इशारा यावेळी संगितराव भोंगळ यांनी दिला.
महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलढाणा जिल्हाचे पालकमंत्री ना.राजेंद्र शिंगणे यांनी सातत्याने सहकार्य करुन स्पष्ट शब्दात या योजनेच्या मंजुरातीसाठी पत्र दिलेले आहे. व ती योजना मंजुर सुध्दा झाली परंतु संबधित विभागाचे अधिकारी योजनेबाबत स्वातंत्र्य पध्दतीने भुमिका न घेता या योजनेचे काम सार्वजनिक स्वरुपातुन व्हावे अशी मानसिकता ठेवुन निविदा मंजुर करण्यात आडकाठी धोरण अवलंबवित आहेत. ही निविदा मंजुर व्हावी याकरिता मागिल पंधरा दिवसापासुन संबधित विभागाला जाब विचारत आहे. मात्र, मला अनभिज्ञ ठेवुन पातृर्डा गावासाठी मँजुर झालेल्या पाणीपुरवठा योजने वर पाणी फिरविण्याचा अधिकार्यांचा मनसुबा यशस्वी होवु द्यायचा नाही आणी म्हणुन आज पासुन या पाण्यासाठीच्या लढ्यात गावकर्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन मा.जि.प.उपाध्यक्ष संगितराव उपाख्य राजु पाटिल भोंगळ यांनी केले.
या सभेला बहुसंख्य गावकरी उपस्थित होते.
यावेळी संगितराव भोंगळ यांचे भाषण संपल्यावर गावकर्यांनी या आंदोलनात आम्ही सर्व सोबत असल्याचे सांगत संगितराव आप आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या.
(संगीतराव भोंगळ यांनी पार्तृडा बु गावासाठी मंजुर केलेली पाणीपुरवठा योजना स्वातंत्र मंजुर झालेली आहे.त्यामुळे या योजनेचे काम देखील स्वतंत्रच व्हायला हवे असा सूर सर्वत्र गावकऱ्यांचा होता हे)
मात्र, संबधित अधिकारी निविदा काढण्यास विलंब लावत असतील कींवा रद्द करण्याचा प्रयत्न करित असतील तर पातृर्डा ग्रामस्थ तिव्र स्वरुपाचे आंदोलन उभारुन प्रशासनाल जरिस आणल्या शिवाय राहणार नाही असा सुर सभेतुन व्यक्त झाला

अवैध रेती तस्करांनी खोदून ठेवलेल्या खड्ड्यात बुडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू.

0

 

शेगाव प्रतिनिधी अर्जुन कराळे

नातेयवाईकांचा पोलीस स्थानकात हंगामा , पोलीस प्रशासन हाय हाय चे नारे.
गुन्हा दाखल करा अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही , नातीवाईकांची भूमिका
दोन दिवसांपूर्वी शेगाव तालुक्यातील ज्या परिसरात तहसीलदारांची गाडी फोडून मारहाण झाली होती त्याच परिसरात आज पूर्णा नदी पात्रातील अवैध वाळू उपसा करणाऱ्यानी रातोरात जेसीबीच्या साहाय्याने खोदून ठेवलेल्या खड्डयात बुडून एका बारा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी घडली आहे….यामुळे संतप्त गावकऱ्यानी मुलाचा मृतदेह शासकीय रुग्णालयात आणून शेगाव पोलीस स्थानकात चांगलाच हंगामा केलाय….जो पर्यंत गुन्हा दाखल न नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेत पोलीस स्थानकात ठिय्या दिलाय.बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध वाळू तस्करांची मुजोरी इतकी वाढली आहे की काल सायंकाळी वाळू तस्करांनी तहसीलदांची गाडी फोडत चालकाला बेदम मारहाण केली होती…..आज त्याच परिसरात पूर्णा नदी पात्रातीलरात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसा करणाऱ्या तस्करांनी रातोरात नदीपात्रात मोठा खड्डा खोदून त्यातील वाळू चोरून नेल्याने आज दुपारी नेहमी प्रमाणे नदीत पोहायला जाणाऱ्या भोंनगाव येथील लहान मुलांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या खड्ड्यात बुडून अर्जुन भारसाकळे या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला…..याची तक्रार पोलीसात देण्यासाठी मुलाचे नातेवाईक गेले असता पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याने नागरिकांनी व नातेवाईकांनी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन समोरच पोलीस प्रशासन हाय हाय…चे नारे देत मोठा गोंधळ घातला….जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत मृतदेह स्वीकारणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे…. तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशनला आलेल्या मृतकाच्या नातेवाईकांना उद्धटपना ची वागणूक देत ठाणेदाराच्या उद्दामपणा मुळे रात्री हे प्रकरण चिघळले होते.

हत्ता येथील 10 लक्ष रुपयांचे सिमेंट रस्त्याचे काम नामंजूर करण्यासाठी निवेदन

0

 

शहर प्रतिनिधी जगन पाटील

लोणार हत्ता येथे अनुसुचीत जाती – नवबौध्द घटकाच्या वस्तीचा विकास करण्यासाठी ( सिमेंट रस्त्याची कामे ) जागाच नसल्यामुळे मंजूर असलेली १० लक्ष रुपयांची कामे रद्द करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या कडे ग्रामपंचायत सदस्य तथा माजी सरपंच विनोद जनार्धन गावंडे, दादाराव ग्यानु आनंदे यांनी केली आहे.
निवेदनात नमूद केले की हत्ता येथील अनुसुचीत जाती नवबौध्द या घटकांच्या वस्तीचा विकास करणे ( दलितवस्ती ) अंतर्गत संदर्भीय प्रशासकिस मान्यतेच्या आदेशामध्ये लोणार तालुक्यातील मंजुर कामाच्या यादी मध्ये हत्ता येथील आंबेडकर नगर येथे सिमेंट रस्ता रूपये ५ लक्ष व आंबेडकर नगर वस्ती मध्ये काँक्रेट रस्ता अनुक्रमांक १४ वर ५ लक्ष किंमतीचे असे एकुन १० लक्ष रूपयाचे काम मंजुर करण्यात आले आहे . परंतु मोजे हत्ता येथे ५ ते ६ वर्ष अगोदरच २५-१५ या शासनाच्या लेखाशिर्षा खाली दलित वस्तीतील रस्त्याचे कामे पूर्ण झाले असून सदरील रस्ता आजरोजी अतिशय चांगल्या प्रकारचा असून वापरात आहे त्यामुळे या रस्त्यावर वर पुन्हा रस्त्या करण्यात येऊ नये अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या कडे ग्रामपंचायत सदस्य तथा माजी सरपंच विनोद जनार्धन गावंडे, दादाराव ग्यानु आनंदे यांनी केली असल्याची माहिती 15 मार्च रोजी झाली

ग्रामविकास अधिकारी बि के पारधी यांची व्हाईसचेअरमन पदी बिनविरोध निवड

0

 

यावल तालुका प्रतिनिधी। विकी वानखेडे

मारुळ ता. यावल जळगाव जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेच्या व्हाईसचेअरमन पदी अटॢऻवल/मारुळ ता. यावल येथील ग्रामविकास अधिकारी बि के पारधी यांची बिनविरोध निवड झाल्या बद्दल ग्रामपंचायत कार्यालय मारुळ येथे त्यांचे सत्कारपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारुळ गावचे तरुण तडफदार कर्तव्यदक्ष सरपंच असद सैय्यद होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद जळगाव चे गटनेते जि. प. सदस्य तथा कॉग्रेस पक्षाचे यावल तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे, कॉग्रेस नेते व संजय गांधी समितीचे सदस्य जावेद अली सैय्यद, मल्टी परपज सह. सोसायटीचे चेअरमन जियाउलहक सैय्यद उपसरपंच पती सलामत अली सैय्यद व सर्व ग्रा. प. सदस्य होते यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते ग्रामविकास अधिकारी बि के पारधी यांचा शाल व गुच्छ देऊन सन्मानित करून सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामरोजगार सेवक संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बाळू तायडे, मतिउर रहेमान पिरजादे, कबीर उद्दीन फारुकी ख्खाजा मोईनुद्दीन युवराज इंगळे, संतोष तायडे, संजय तायडे, कारकुन परवेझ सैय्यद व सर्व कर्मचारी उपस्थित होते

पाळधी येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षण 2 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन.

0

 

उषा पानसरे मू.का. संपादक मो.9921400542 असदपूर

पाळधी येथील जिल्हा परिषद शाळेत पाळधी केंद्रा अंतर्गत येणाऱ्या शाळेंचे शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेला शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य यांना शालेय व्यवस्थापन समिती अंतर्गत येणारे रचना, कर्तव्य, जबाबदाऱ्या तसेच गुणवत्ता पूर्ण शिक्षण याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून आपल्या गावातील शाळेत आपण कशा प्रकारे बदल करून उच्च व गुणवत्ता पूर्ण शिक्षण विद्यार्थी यांना देऊ शकतो, तसेच शाळेच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत व इतर ठिकाणाहून कशा प्रकारे निधी मंजूर करून घेऊ शकतो याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यशाळेला केंद्रप्रमुख बाबुराव धुंदाळे, पदवीधर शिक्षक हरीश पाटील, आकोष कोळी, यांनी मार्गदर्शक केले. तसेच या कार्यशाळेला ग्रे,मू. संजय ठाकरे, सुकदेव पाटील यांच्यासह पाळधी, सोनाला, सूनसगाव बु, व खु, कुंभारी सिम, गोंडखेळ, देवपिंप्री, माळपिंप्री, सवतखेडा या शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यावेळी कार्यशाळेला उपस्थित होते.
न्यूज रिपोर्टर उषा पानसरे

वेकोली वसाहतीच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही लावा : काँग्रेस

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस : शहर हा मिनी इंडिया असल्याने या ठिकाणी देशातील प्रत्येक राज्यातील नागरिक वास्तव्यास आहे.
शहरात सध्या खून,चोरी,डकेती, गुंडागर्दी मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

वेकोलीच्या वसाहती या शहराला लागलेल्या असून वेकोलीच्या वसाहतीत तर चोरीचे सत्रच शुरू असल्याने वेकोलीच्या रामनगर,सुभाष नगर,गांधी नगर, शास्त्री नगर,इंदिरा नगर, या वसाहती मध्ये सिव्हिटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी घुग्घुस काँग्रेस तर्फे वेकोलीच्या मुख्य महाप्रबंधक उदय कावले यांची भेट घेवून निवेदनाच्या माध्यमातून घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी, उत्तर भारतीय विभाग सचिव ब्रिजेश कुमार सिंग यांनी केली आहे

अप्पर पोलीस अधीक्षक साहेब श्री श्रावण दत्त यांच्या पथकाची पोस्ट जलंब येथे दारूची मोठी कारवाई मोठी कारवाई

0

 

शेगाव प्रतिनिधी अर्जुन कराळे

अप्पर पोलीस अधीक्षक श्रावण दत यांना गोपनीय माहिती मिळाली की होळीचा सण असल्याने शहरांमधून खेड्यापाड्यांमध्ये अवैधरित्या मोठ्या प्रमाणात दारू जाणार आहे अशा खात्रीलायक खबरे वरून पथकाला आदेशित करून रेड करण्यास सांगितले त्याप्रमाणे पथकाने पहूर्जिरा मोरखेड रस्त्यावर सापळा रचून ऑटो क्रमांक एम एच 28 T 1074 मध्ये आरोपी नामे परमेश्वर श्रीकृष्ण लाहोळकर यास देशी दारूचे 16 बॉक्स किमती 48 हजार रुपये ऑटो किंमत एक लाख रुपये आरोपीच्या ताब्यातील मोबाईल किंमत एक हजार रुपये असा एकूण 149000 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून पोस्ट जलब येते गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर देशी दारू बाबत अधिक तपास करून आरोपी वाढण्याची शक्यता आहे सदर कारवाई मध्ये पोहे का गजानन बोरसे नापोका गजानन आहेर संदीप टाकसाळ यांनी भाग घेतला

वेकोलीतील कामगार कॉलोनी मध्ये टाईल्स एवम मॉड्युलर दरवाजे, खिडक्या लावाव्या : ब्रिजेश कुमार सिंग

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

चंद्रपूर : जिल्हा हा कोळसा उत्पादनात अग्रगण्य आहे.
मात्र वेकोलीच्या उत्पादनात मोलाची भूमिका बजावणाऱ्या कामगारांना हवी ती सुविधा पुरविण्यात वेकोली ही टाळा – टाळ करीत असल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे.
घुग्घुस परिसरातील वेकोलीच्या रामनगर,सुभाष नगर,इंदिरा नगर,कैलास नगर,कामगार वसाहतीत टाईल्स व मॉड्युलर दरवाजे खिडक्या लावण्यात आलेले नाही.
मात्र अधिकाऱ्यांच्या क्वार्टर मध्ये टाईल्स, खिडक्या दरवाजे लावण्यात आलेले असून वेकोलीने हेतुपूर्वक कामगार व अधिकारी यांच्यात भेदभाव केलेला आहे.
याचा परिणाम कामगारांच्या मानसिकतेत होत असल्याने
कामगारात असंतोष निर्माण होत आहे.
उत्तर भारतीय काँग्रेस प्रदेश सचिव ब्रिजेश कुमार सिंग, व काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली वेकोली मुख्य महाप्रबंधक उदय कावले यांना निवेदन देऊन कामगार वसाहतीत सुविधा देण्याची मागणी करण्यात आली