Home Blog Page 320

डोंगरकठोरा येथील शासकीय जमिनीवर भोगवटादार लावल्याप्रकरणी ग्रामविस्तार अधिकाऱ्यावर गुन्हा दाखलचे प्रांताधिकाऱ्यांचे आदेश

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील डोंगरकठोरा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील शासकीय जमीनीची रितसर गांवठाणची कार्यवाही न करता भोगवटादार लावून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी यावल येथील ग्रामविस्तार अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी भालोद मंडळाधिकारी यांना मंगळवारी २२ मार्च रोजी पत्राद्वारे दिले आहे.

याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील डोंगरकठोरा येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीतील शासकीय जमीन असलेल्या गावठाणाबाबत यावलचे ग्रामविस्तर अधिकारी यांनी वरिष्ठ कार्यालयाची रितसर परवानगी न घेतला भेगवटादार लावून गाव नमूना नंबर ८ (अ) तयार केल्याबाबत फैजपूर प्रांताधिकारी यांच्याकडे तक्रार आली होती. या तक्रारीची दखल घेत यावल ग्रामविस्तार अधिकारी यांना खुलासा सादर करण्याबाबत पहिली नोटीस बजावण्यात आली. पहिली नोटीस बजावून ४ महिन्याचा कालावधी होवूनही ग्रामविस्तार अधिकारी यांनी कोणताही लेखी खुलासा मुदतीत पाठविला नाही. त्यानंतर फैजपूर कार्यालयाने पुन्हा नोटीस बजावली होती. यात म्हटले होते की, ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय जमीन असलेल्या गावठाणाची भोगवटादार लावून गाव नमूना नं ८ (अ) तयार करतांना शासकीय महसूल भरण्यात आला आहे का ?, तसेच सक्षम प्राधिकारी यांच्याकडून जागा वितरणाबाबत आदेश घेतला आहे का ? महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ नुसार शिस्तभंगाची कार्यवाही व गुन्हा दाखल का करणेत येवू नये ? असे नमूद केले होते. तरी देखील यावल ग्रामविस्तार अधिकारी यांच्याकडून कोणाताही खुलासा प्राप्त झाला नाही. त्यामुळे फैजपूर उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी भालोदचे मंडळाधिकारी मिलींद देवरे यांना संबंधित ग्रामविस्तार अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे असे आदेश देण्यात आले आहे. या कारवाईमुळे यावल तालुक्यात व महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

मा. आ. श्री. किशोरभाऊ जोरगेवार यांच्या पुढाकाराने घुग्घूस शहर येथे भव्य मोफत नेत्रचिकित्सा शिबीर

0

 

(चंद्रपूर घुग्घूस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घूस शहर येथे मा. आ. श्री. किशोरभाऊ जोरगेवार यांच्या पुढाकाराने भव्य मोफत नेत्रचिकित्सा शिबीराचे आयोजन रविवार दि. 27 मार्च 2022 ला. वेळ सकाळी 10:00 ते दुपारी 3:00 वाजेपर्यंत विघ्या टाँकीज, ए.सी.सी. रोड जवळ, घुग्घूस येथे करण्यात आले आहे. या शिबीराकरिता नोंदणी करण्यासाठी दि. 23 मार्च ते 26 मार्च 2022 पर्यंत करायचे आहे. नोंदणी स्थळ – आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांचे जनसंपर्क कार्यालय घुग्घूस येथे करायचे आहे. विनीत – यंग चांदा ब्रिगेड, चंद्रपूर विधानसभा क्षेत्र. टिप – शिबीरात येणार्या प्रत्येक नागरिकांनी आपले आधार कार्ड सोबत घेऊन यावे. आणि भव्य मोफत नेत्र चिकित्सा शिबीराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

शाळापूर्व तयारी अभियान:-दोन दिवशीय “तालुका स्तरीय” प्रशिक्षण उत्साहात संपन्न.

0

 

चामोर्शी,मुलचेरा आणि एटापल्ली तालुक्यातील शिक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद.

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक

चामोर्शी:- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे द्वारा,स्टार्स प्रकल्प,अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीच्या वतीने दिनांक २१ व २२ मार्च २०२२ ला गट साधन केंद्र चामोर्शी येथे चामोर्शी,मुलचेरा,एटापल्ली तालुक्यातील ५८ शिक्षण व अंगणवाडी सेविकांचा शाळा पूर्व तयारी अभियान तालुका स्तरीय प्रशिक्षण मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
दरम्यान तालुका सुलभक म्हणून विनायक लिंगायत,अमर पालारपवार,किशोर खोब्रागडे,कन्हैया भांडारकर,चांगदेव सोरते,कु सरलक्ष्मी यामसनी यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले.
दिनांक २१ मार्चला उद्घाटनप्रसंगी नरेंद्र कोत्तावार,शिला सोमनकर,प्रथम संस्थेचे जिल्हा समन्वयक श्रीकांत पावडे, विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते,अमर पालारपवार, किशोर खोब्रागडे,कन्हैया भांडारकर,विनायक लिंगायत, घनश्याम वांढरे उपस्थित होते.
दोन दिवस चाललेल्या प्रशिक्षणात शाळापूर्व तयारी अभियानाची उद्दिष्टे,मागील दोन वर्षात झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढणे,
इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची तयारी करून घेणे.मुलांना शिकवण्यासाठी प्रेरीत करण्याकरिता स्वतः साक्षर असले पाहिजे हे गरजेचे नाही हे पालकांना समजावणे यावर भर देण्यात आला.
प्रशिक्षणात चर्चिले गेलेले घटक हे प्रशिक्षण कार्यशाळेची औपचारिक सुरुवात, परिचय-प्रार्थना-अपेक्षा-नियम.
आता शाळा पुन्हा सुरू झालेल्या आहेत,मुलांच्या शिक्षणाविषयी आता तुम्हाला काय जाणवते आणि काय दिसते आहे?(माईंड मॅप द्वारा सामुहिक मत).शाळा पूर्व तयारी अभियान संकल्पना,मोठ्या गटात चर्चा.
शाळा पूर्व तयारी मेळावा:-स्वरूप आणि पूर्वतयारी,मेळाव्याची पूर्वतयारी चर्चा.
Feedback व उद्याच्या Session संदर्भात सूचना,
वैशिष्ट्येपुर्ण बाबी म्हणजे प्रशिक्षणार्थी यांचा कृतीशील सहभाग,गटामध्ये चर्चा व सादरीकरण,सांघिक भावना.
‘शाळापूर्व तयारी अभियान’ : का?COVID19 मुळे मार्च 2020 पासून शाळा अचानक बंद झाल्या… आता हळू-हळू शाळा पुन्हा सुरु झालेल्या आहेत.या पार्श्वभूमीवर आपण शाळा पुन्हा नव्याने सुरु करताना विशेष काहीतरी केले पाहिजे,म्हणून प्रथम संस्था, MSCERT,समग्र शिक्षा आणि शिक्षण विभाग यांनी एकत्र येऊन मार्च ते जून २०२२ या दरम्यान शाळापूर्व तयारी अभियान चालविण्याचे योजिले आहे.प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी विविध प्रकारच्या सात स्टाल वर प्रत्यक्ष प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
मुलांच्या शालेय शिक्षणाची सुरूवात चांगली झाली तर पुढील शिक्षण प्राप्त करणे त्यांना सहज शक्य होऊ शकेल.
अनेक अहवालातून आणि अनुभवातून असे आढळले आहे कि मुलं शाळापूर्व तयारी अभावी इयत्ता पहिलीत येतात आणि त्यांना औपचारिक शिक्षण प्राप्त करताना अनेक अडचणी येतात.परिणामतः पुढे वाचन-गणिताच्या पायभूत क्षमता देखील पूर्णपणे विकसित होत नाहीत.अशी मुलं पुढे जाऊन अभ्यासात मागेच पडतात.शिवाय यावर्षी इयत्ता १-२ री मधील मुलांनी नीट अंगणवाडी आणि शाळा सुद्धा अनुभवलेली नाही.
शाळा पुन्हा सुरु होत असताना गावस्तरावर पालक,शिक्षक, अंगणवाडी,तरुण स्वयंसेवक, ग्रामस्थ व शासन यांच्या संयुक्त प्रयत्नांनी इयत्ता पहिलीत आलेल्या मुलांच्या ‘शाळापूर्व तयारी साठी राज्यव्यापी मोहिम घेण्याचे आखले आहे.सर्वांनी सदर मोहिमेत कृतीशील सहभागी होऊन दाखल पात्र मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी जनजागृतीसह प्रत्यक्ष सहभाग नोंदवावा हिच अपेक्षा वर्तविण्यात आली आहे.

आजाराने हिरावले ऐन तारुण्यात महिलेचे दोन्ही पाय

0

व्हीलचेअर आणि अन्य मदत दिली काँग्रेस अध्यक्ष*: राजू रेड्डी

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस : नियतीचा खेळ ही निराळाच असतो कोणती वेळ कशी येईल हे सांगता येत नाही
बँक ऑफ इंडिया परिसरात राहणाऱ्या 36 वर्षीय नीता विनोद झाडे यांच्या पायांना संक्रमण झाल्यामुळे दोन्ही पाय कापावे लागल्याने त्यांच्यावर दुःखांचा डोंगरच कोसळला ऐन तारुण्यात दोन्ही पाय गमावल्याने नीता ताई प्रचंड नैराश्यातेत गेले आहे.
सदर बाब काँग्रेस महिला नेत्या पदमा त्रिवेणी यांना माहीत होताच त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या सह पीडितेच्या घरी भेट देऊन आस्थेने विचारपूस केली त्यांना धीर दिला.
त्यांच्या आवश्यकते नुसार व्हील चेअर अन्न – धान्य व नगद स्वरूपात आर्थिक मदद दिली याप्रसंगी इर्शाद कुरेशी,सुकुमार गुंडेटी,सुनील पाटील व अन्य उपस्थित होते.

सांगवी बुद्रुक येथील विवाहिता तीन दिवसांपासून बेपत्ता; यावल पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील २८ वर्षीय विवाहिता ही तीन दिवसांपासून आपल्या माहेरी जात असल्याचे सांगून बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी सोमवारी २१ मार्च रोजी सकाळी यावल पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांकडुन मिळालेली सविस्तर माहिती अशी की, यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील रहिवाशी प्रिती योगेश नेमाडे (वय-२८) या विवाहिता पती व दोन मुलांसह वास्तव्याला आहे. शनिवारी १९ मार्च रोजी सकाळी ८ वाजता अंजाळे ता. यावल येथे माहेरी जाते असे सांगून घरातून गेल्या. सायंकाळ पर्यंत त्या माहरी घरी न पोहचल्याने पती योगेश नेमाडे यांनी आपल्या गाव परिसरात शोधाशोध केली. मात्र, ती महिला कुठेच मिळून आल्या नाहीत. दरम्यान, पती योगेश नेमाडे यांनी सोमवारी २१ मार्च रोजी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून खबर दिली. त्यांच्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात आपली पत्नी प्रिती नेमाडे या हरविल्याची नोंद करण्यात आली . या घटनेचा पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर परदेशी हे करीत आहे.

डांभुर्णीच्या जिल्हा परिषद शाळेची शासनाच्या १६ कलमी कार्यक्रमा अंतर्गत उत्कृष्ठ कामगीरी म्हणुन यावल तालुक्यात प्रथम

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील डांभुर्णी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने १६ कलमी कार्यक्रमांतर्गत यावल तालुक्यात अव्वल येण्याचा बहुमान मिळवला आहे, तालुक्यात डांभुर्णी येथील जिल्हा परिषदची शाळा प्रथम आली ..या निमित्ताने दिनांक २३ मार्च रोजी ग्रामस्थ व सामाजीक संस्थांच्या माध्यमातुन संबंधितांचा सत्कार व पत्रकार परिषद घेण्याचे योजले आहे.

आता या पुढचं उद्दिष्ट जळगाव जिल्ह्यात जिल्हा परिषदच्या शाळामंध्ये प्रथम येण्याचं संकल्प डोळ्यासंमोर ठरवून शिक्षक आणि संबंधित यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत. त्यासाठी त्यांचा उत्साह वाढावा व इतर शाळांना ही त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळावी या विचारातून अगोदर मिळवलेल्या यशाचं कौतुक आणि अभिनंदन झालं पाहिजे आणि म्हणूनच शाळेच्या या सर्वांगीण सुधारणे कामी ज्या ग्रामस्थांनी, शिक्षकांनी ,राजकीय सामाजिक क्षेत्रातल्या मान्यवरांनी योगदान दिले आहे त्यांचे यथोचित सन्मान होणं क्रमप्राप्त आहे
विशेषतः ज्यांच्या आर्थिक योगदाना शिवाय हे शक्य नव्हतं असे सर्व गावातील दानशूर मान्यवरांचा देखील सत्काराचा कार्यक्रम दिनांक २३ मार्च रोजी स्वयंदीप प्रतिष्ठानने या ठिकाणी आयोजित केलेला आहे . तरी या शैक्षणिक कार्यात उल्लेखनिय कार्याचे कौत्तुक करण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी विद्यार्थी पाल्यांनी मा कार्यंक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे .

पूर्णा नगर येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक उर्दू शाळेत व्यवास्थापन समितिचे गठन

0

 

उषा पानसरे असदपूर
दिनांक 21 मार्च

पूर्णा नगर येथिल जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक उर्दू शाळेत व्यवास्थापन समिती नूकतिच गठीत करण्यात आली
करण्यात आले असून यामधे अध्यक्ष व उपाध्यक्ष ची निवड करण्यात आली सलंग तीसऱ्यान्दा अब्दुल अलीम अब्दुल तमीज यांची पालक समितिच्या अध्यक्ष पदी सर्वनुमते निवड करण्यात आली तर उपध्यक्ष पदी शाहीन परवीन नियाज अहमद यांची निवड करण्यात आली, तसेच सदयस्ता मनुन अब्दुल सलीम अब्दुल जब्बार, शाइस्ता परवीन फारूक खान, छोटू शाह बशीर शाह, शगुफ्ता परवीन अब्दुल अकील, शेख साबीर शेख जाफर नाजमीन परवीन सै, कय्यूम, उजमा परवीन अहमद खा, मो, इक़बाल अ, खालिक काजी, मो, शैजाद अलीमोहमद, साजिदा तबसुम निसार खा, नगमा नाज अ, नौशाद काजी, यांची निवड करण्यात आली, यावेळी सचिव मनुन शाळेचे मुख्यधायपाक मो, अशफाक अब्दुल रज्जाक यांनी काम पाहिले, आसेगावचे थानेदार यांच्या मार्गदर्शन खाली पोलिसनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता बहु संख्या ने पालक वर्ग यावेळी उपस्थिति होते,

हिंगणघाट नेहरू वार्ड येथे 413600 रुपयाचा विदेशी दारूसाठा जप्त .

0

20बमार्चला रात्री हिंगणघाट येथे दारूची वाहतूक होणार आहे अशी माहिती खबरी यांनी हिंगणघाट येथील पोहवा शेखर डोंगरे यांच्या डीबी पथकास दिली. मुखबीरचे खबरे वरून पंच व पोस्टॉप सह आरोपीवर प्रो-रेड केला असता आरोपीच्या ताब्यातील रेनॉल्ट क्वीड कंपनीची फोर व्हीलर क्र.MH 32/Y – 5086 मध्ये विदेशी दारू ने भरलेल्या 11 पेट्या असा दारू व जप्त वाहनाची किंमत सह 413600विनापास परवाना वाहतूक करताना मिळून आल्याने आरोपी मनोज भारतलाल जय जयस्वाल वय 54 वर्ष राहणार नेहरू वार्ड हिंगणघाट याच्याविरुद्ध पोलीस स्टेशनला दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली गुन्ह्याचा पुढील तपास डीबी पथक करीत आहे सदरची कामगिरी मा. श्री प्रशांत होळकर पोलीस अधीक्षक वर्धा मा. श्री यशवंत साळुंखे अप्पर , सचिन घेवंदे, सचिन भारशंकर विशाल बंगाले ,यांनी केली आहे .
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

खामगाव पथकाची सोनाळा व टूनकी वरली मटका जुगारावर धाड,6 जणाविरुद्ध कारवाई ,14 हजराचा मुद्देमाल जप्त …!

0

 

संग्रामपूर – अप्पर पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यांना गुप्त बातमीदार माहिती मिळाली की,संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा पोलीस स्टेशन हद्दित सोनाळा व टूनकी येथे सर्रासपणे वरली मटका जुगार चालू आहे. वरून अप्पर पोलीस अधीक्षक साहेब खामगाव यांनी त्यांचे विशेष पथकाला पोलीस स्टेशन सोनाला हद्दीमध्ये जुगार रे ड करण्याबाबत आदेशित केले आज दिनांक 19.3.2022 रोजी विशेष पथकाने पोलीस स्टेशन सोनाला हद्दीमध्ये ग्राम टुणकी व सोनाळा येथे दोन वरली मटका जुगार रेड केल्या दोन्ही रेट मध्ये सहा आरोपीतान विरुद्ध कारवाई करण्यात आली असून त्यांचे कब्जातून वरळी मटका साहित्य सह 14,630 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

आंदोलनात सक्रीय सहभागी असलेल्या बडतर्फ एस. टी. कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

0

 

लातूर/निलंगा प्रतिनिधी
डी.एस. पिंगळे

मागील चार महिण्यापासून एस.टी.महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाकडे यांच्या विविध मागण्या व विलणीकरण यासाठी बेमुदत संप पुकारला आहे. अजूनही काही कर्मचारी कामावर रूजू न होता त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामध्येच निलंगा आगारातील कामावर रूजू न झालेल्या सतीश मधूकरराव चपटे वय ४० या निलंगा आगारातील यांत्रिकी कर्मचा-यालाही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ लातूर विभाग यांच्याकडून एकतर्फी चौकशीअंती ८ जानेवारी रोजी बडतर्फ (डिसमिस) केले होते त्यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने शनिवारी ता. 19 रोजी मृत्यू झाला असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे.
हा कर्मचारी विविध मागण्यासाठीच्या काम बंद आंदोलनात सक्रीय सहभागी होता. त्यामुळे बडतर्फ कर्मचाऱ्यांना मागील चार महिण्यापासून कोणताही पगार नव्हता म्हणून निर्माण झालेल्या आर्थिक विवंचना व ताणतणावामुळे त्यांचा शनिवारी दिनांक १९ रोजी हृदयविकाराच्या
झटक्याने मृत्यू झाला असून त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी दोन मुले असा परिवार आहे.
निलंगा आगारातील अशा एकून ६८ कर्मचाऱ्यांवर बडतर्फची कारवाई करण्यात आली असल्याने बहूतांश कर्मचारी हे सध्या तणावग्रस्त जीवन जगत असून त्यांच्या कुटुंबियावर उपासमारीची वेळ आली आहे.असे किती बळी जाण्याची वाट हे राज्य शासन बघणार आहे असा संतप्त सवाल नातेवाईकाकडून उपस्थित केला जात आहे.