Home Blog Page 323

अप्पर पोलीस अधीक्षक साहेब श्री श्रावण दत्त यांच्या पथकाची पोस्ट जलंब येथे दारूची मोठी कारवाई मोठी कारवाई

0

 

शेगाव प्रतिनिधी अर्जुन कराळे

अप्पर पोलीस अधीक्षक श्रावण दत यांना गोपनीय माहिती मिळाली की होळीचा सण असल्याने शहरांमधून खेड्यापाड्यांमध्ये अवैधरित्या मोठ्या प्रमाणात दारू जाणार आहे अशा खात्रीलायक खबरे वरून पथकाला आदेशित करून रेड करण्यास सांगितले त्याप्रमाणे पथकाने पहूर्जिरा मोरखेड रस्त्यावर सापळा रचून ऑटो क्रमांक एम एच 28 T 1074 मध्ये आरोपी नामे परमेश्वर श्रीकृष्ण लाहोळकर यास देशी दारूचे 16 बॉक्स किमती 48 हजार रुपये ऑटो किंमत एक लाख रुपये आरोपीच्या ताब्यातील मोबाईल किंमत एक हजार रुपये असा एकूण 149000 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून पोस्ट जलब येते गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर देशी दारू बाबत अधिक तपास करून आरोपी वाढण्याची शक्यता आहे सदर कारवाई मध्ये पोहे का गजानन बोरसे नापोका गजानन आहेर संदीप टाकसाळ यांनी भाग घेतला

वेकोलीतील कामगार कॉलोनी मध्ये टाईल्स एवम मॉड्युलर दरवाजे, खिडक्या लावाव्या : ब्रिजेश कुमार सिंग

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

चंद्रपूर : जिल्हा हा कोळसा उत्पादनात अग्रगण्य आहे.
मात्र वेकोलीच्या उत्पादनात मोलाची भूमिका बजावणाऱ्या कामगारांना हवी ती सुविधा पुरविण्यात वेकोली ही टाळा – टाळ करीत असल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे.
घुग्घुस परिसरातील वेकोलीच्या रामनगर,सुभाष नगर,इंदिरा नगर,कैलास नगर,कामगार वसाहतीत टाईल्स व मॉड्युलर दरवाजे खिडक्या लावण्यात आलेले नाही.
मात्र अधिकाऱ्यांच्या क्वार्टर मध्ये टाईल्स, खिडक्या दरवाजे लावण्यात आलेले असून वेकोलीने हेतुपूर्वक कामगार व अधिकारी यांच्यात भेदभाव केलेला आहे.
याचा परिणाम कामगारांच्या मानसिकतेत होत असल्याने
कामगारात असंतोष निर्माण होत आहे.
उत्तर भारतीय काँग्रेस प्रदेश सचिव ब्रिजेश कुमार सिंग, व काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली वेकोली मुख्य महाप्रबंधक उदय कावले यांना निवेदन देऊन कामगार वसाहतीत सुविधा देण्याची मागणी करण्यात आली

मुलाच्या बस्त्यासाठी जाताना वडील व काकू अपघातात ठार

0

 

यावल तालुका (प्रतिनिधी) विकी वानखेडे

यावल तालुक्यातील भोरटेक जवळील दुर्घटना
यावल : मुलाच्या लग्नाच्या बस्त्यासाठीजाणारे नवरदेवाचे वडील आणि काकू रिक्षा अपघातात ठार झाले, तर तीन जण जखमी झाले.ही घटना भोरटेक, ता.यावलनजीक रविवारी दुपारी १२.३० वाजता घडली. दिलीप दिनकर तायडे (५०) आणि ज्योत्स्ना गोकूळ तायडे (४५) अशी मृत वडील आणि काकूची नावे आहेत.आंदलवाडी, ता. रावेर येथील शुभम दिलीप तायडे याचा बस्ता रविवारी भुसावळ येथे होणार होता.त्यासाठी कुटंबीय आणि नातेवाईक रिक्षाने भुसावळकडे निघाले होते. वाटेत भोरटेक, ता. यावल जवळ रस्त्यावरील खडे चुकवताना चालकाचा ताबा सुटला व अचानक रिक्षा उलटली.

 

भरधाव असल्याने रिक्षा तीन वेळा उलटली, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.यात नवरदेवचे वडील आणि काकु जागीच ठार झाले, तर ज्योती बुधाकर तायडे, ललिता संतोष तायडे आणि बुधाकर भास्कर तायडे हे जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच
फैजपूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना भुसावळ येथील
हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

मद्यधुंद अवस्थेत लहान भावाने मोठ्या भावाच्या शेतातील कांद्यावर फिरवला ट्रॅक्टर…

0

 

जगन पाटील लोणार

लोणार तालुक्यातील गुंधा येथे भावाने शेतातील कांदा ट्रॅक्टरने उठून तीन लाखाचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

गुंधा येथील नंदु काशीनाथ मानकर यांनी फिर्याद दिली की,गुंदा शिवारात गट क्रमांक 555 मध्ये अडीच एकर शेती असून शेतामध्ये एक एकर टोळ कांदा पेरला आहे लहान भाऊ गणेश काशिनाथ मानकर हा नेहमी वडलांनी नावावर केली शेती पाहिजे त्यावरून भांडण करत असतो. शेतापासून थोड्या अंतरावर विष्णुस्वामी यांची शेती बटाईने केली असल्यामुळे त्या शेतातील हरभरा काढणी साठी गेलो असताना,शेताकडे लोक जमलेली दिसली म्हणून शेतात जाऊन पाहले असता लहान भाऊ गणेश काशिनाथ मानकर हा दारू पिऊन आला व त्याने स्वराज कंपनीच्या ट्रॅक्टर ने शेतातील कांदा वखरला यामुळे तीन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. गणेश काशिनाथ मानकर यांनी शेतातील कांदा वखरुन लाख रुपयाचे नुकसान केल्याप्रकरणी लोणार पोलीस स्टेशनला अ.क्र.61/ 2022 कलम 447,427 भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत असल्याची माहिती 12 मार्च रोजी देण्यात आली आहे.

गोतस्करयांच्या दादागिरीला वचक बसविण्यासाठी बजरंग दल ची तक्रार

0

 

शेगाव प्रतिनिधी अर्जुन कराळे

आज दिनांक 12 मार्च रोजी विश्व हिंदू परिषद बजरंग दल तालुका व शहर यांच्या वतीने माननीय ठाणेदार साहेब यांना लेखी तक्रार देण्यात आली.
शेगाव शहरात मागील काही महिन्यांपासून गोवंश यांची निर्दयतेने वाहतूक होत असून त्यांची कत्तल होत आहे शहरात प्रवेश करणार्‍या मार्गाद्वारे खामगाव ,वरवट खंडेराव व इतर मार्गे गोवंशाची वाहतूक होऊन ते कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणात नेले जात आहे वाहतूक करणार्‍यांकडे त्यासंबंधी कुठलाच परवाना व त्याची विक्री व खरेदी याची कुठलीच नोंद उपलब्ध नसते असे आपल्या मागील काही प्रकरणातून निदर्शनास आले आहे गोमाता ही हिंदू समाजासाठी पूजनीय असून त्याची याप्रकारे होत असलेली विटंबना ही निंदनीय आहे महाराष्ट्रात गोवंश हत्या प्रतिबंधक कायदा असूनही त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. ही बाब अतिशय गंभीर असून आपण याकडे लक्ष द्यावे त्याचप्रमाणे वाहतूक करणारे वाहन कडे गोवंश वाहतुकीचा कुठलाच परवाना नसतो, त्यावर आळा घालण्यात यावा. काल परवाच घटनेमध्ये अशाच एका वाहनांमध्ये गोवंश कोंबून नेताना विहिंप पदाधिकारी यांनी त्यास थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या अंगावर सुद्धा गाडी नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांच्या अशा वाढत्या दादागिरीमुळे भविष्यात एखादी अप्रिय घटना घडू शकते. याचीही प्रशासनास माहिती असावी या सर्व घटनांवर आळा बसावा व या गोवंशाची वाहतूक करणारे व त्याच कत्तलीसाठी नेणारे यांना कारवाई करून कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रत्येक जिल्हा ठिकाणी शहर व तालुका ठिकाणी दामिनी पथक धरतीवर गो-स्कॉड निर्मिती करण्यात यावी. आम्हा गोरक्षकांना न्याय द्यावा अशी मागणी आम्ही याद्वारे आपणास करीत आहोत. शहरात मागील काही दिवसांपासून चोरीचे सुद्धा प्रमाण वाढले आहे व त्यांना अभय देणारे यांच्यावर सुद्धा कारवाई करून त्यांना खाकी हिसका दाखवावा , अशी तक्रार दाखल करण्यात आली यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री योगेश जी भारद्वाज, विहिंप तालुकाध्यक्ष विजय राठी, शहर अध्यक्ष प्रवीण मोरखडे, बजरंग दल तालुका संयोजक सोमेश कांबळे शहर संयोजक शुभम ढगे ,शहर उपाध्यक्ष मनीष नारणोलीया,जिल्हा सह गोरक्षा प्रमुख सचिन हिवरे, नगर गोरक्षा प्रमुख हरिओम तिव्हाने, पवन बघे, अमोल शेगोकार ऋषिकेश हिंगणे, आकाश पाटील, शुभम अजाडीवाल ,शुभम देशमुख, विशाल ठेंग, सागर गलवाडे, सुरज थोरात, गणेश सोळंके, विशाल भिसे ,कृष्णा तिवारी, सौरभ स्वामी ,योगेश कडू, योगेश ठाकरे , गोपाल लखाडे,आदित्य शशांक शेंडे, ऋग्वेद चत्तेरकार चंद्रकांत माने, राज वाधवानी, गजानन परियाल, सौरभ पहुरकर, आशिष सावळे, आशिष ददगाळ, विठ्ठल पाटील, विशाल वाघ, श्रीकांत टोंगळे, गौरव लांजुडकर आदी बजरंग दल कार्यकर्ते उपस्थित होते.*

आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांना अभिवादन

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

शनिवार 12 मार्च रोजी घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात स्वतंत्र सेनानी, 1857 च्या स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी वीर, चंद्रपूरचे सुपुत्र क्रांतिवीर नायक बाबुराव शेडमाके यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले तसेच त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला.
यावेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, आदिवासी समाजाचे नंदेश्वर पेंदोर, नकोड उपसरपंच मंगेश राजगडकर, ग्रामपंचायत सदस्य रजत तुराणकर, गणेश किन्नाके, अनिकेत गेडाम, प्रकाश नैताम, श्रीराम जेऊरकर, संगीता नन्नावरे, सुशील डांगे, लता आवारी, शीतल कामतवार, भारती परते, कुमकुम वर्मा, दुर्गा साहू, स्नेहा कुम्मरवार, खुशबू मेश्राम उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पत्रकार देशमुख यांच्या निववास्थानी सांत्वनपर भेट !

0

 

युसीएन चे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी पत्रकार फहीम देशमुख यांचे वडील हाजी अब्दुल रहीम देशमुख यांचे नुकतेच दु खद निधन झाले. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी आज शनिवारी त्यांच्या शेगाव येथील निवासस्थानी सांत्वनपर भेट देवुन त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस केली. यावेळी काँग्रेस नेते रामविजय बुरुंगले, स्वातीताई वाकेकर, जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषाताई पवार, ऍड जयश्री शेळके, काँग्रेस कमेटी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोन्द्रे, संजय राठोड सह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

शेगाव येथे नाभिक समाजाचे द्वितीय साहित्य संमेलन उत्साहात संपन्न.

0

 

शेगाव प्रतिनिधी अर्जुन कराळे

समाजाचा एकत्रित आवाज म्हणजे साहित्य संमेलन असतात. त्यामूळे समाजाची भूमिका ही साहित्यातून प्रतिबिंबित होते. म्हणूनच साहित्य हा समाजमनाचा आरसा ठरतो. त्यामूळे माणसाला साहित्याच्या आरशात स्वत:च्या जगण्याचं प्रतिबिंब दिसावं’, असं प्रतिपादन शेगाव येथे आयोजित नाभिक समाजाच्या द्वितीय साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉ. प्रदीप कदम यांनी व्यक्त केली. शेगावातील विघ्नहर्ता लॉन सभागृहातील ‘क्रांतीवीर हुतात्मा वीर भाई कोतवाल साहित्यनगरीत हे एकदिवसीय साहित्य संमेलन पार पडलं. या संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी पुणे येथील सुप्रसिद्ध साहित्यिक आणि व्याख्याते डॉ. प्रदीप कदम होते. कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून सातारा येथील सुप्रसिद्ध लेखक, कादंबरीकार आणि व्याख्याते कॅप्टन महेश गायकवाड उपस्थित होते. ‘महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघानं या साहित्य संमेलनाचं आयोजन केलं होतं. यावेळी व्यासपीठावर कलादर्पण संघाचे अध्यक्ष शरद ढोबळे, संमेलनाध्यक्ष डॉ. प्रदीप कदम, उद्घाटक कॅप्टन महेश गायकवाड, अमरावती येथील पहिल्या संमेलनाचे मावळते संमेलनाध्यक्ष गोपालकृष्ण मांडवकर, कलादर्पण संघाच्या सुनिता वरणकर, प्रा. अविनाश बेलाडकर आणि स्वागताध्यक्ष विलासराव वखरे उपस्थित होते.

संमेलनाचं प्रास्ताविक ”महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघा’चे अध्यक्ष शरद ढोबळे यांनी केलं. यावेळी संमेलनाचे उद्घाटक कॅप्टन महेश गायकवाडांनी संमेलनाचं उद्घाटन केलं. यावेळी बोलतांना त्यांनी संत सेना महाराजांची खरी ओळख समाजाला आतापर्यंत करून न दिल्या गेल्याची खंत व्यक्त केली. ते ताकदीचे विचारवंत होते, परंतू त्यांचा वैचारिक वारसा साहित्यातून दिसत नसल्याचं गायकवाड म्हणालेत. महामानव डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांना डोक्यात साठवून समाज घडवा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली.
अमरावती येथे झालेल्या पहिल्या नाभिक साहित्य संमेलनाचे मावळते संमेलनाध्यक्ष गोपालकृष्ण मांडवकर यांच्याकडून नवे संमेलनाध्यक्ष डॉ. प्रदीप कदम यांनी यावेळी संमेलनाध्यक्षपदाची सुत्रे स्विकारलीत. यावेळी बोलतांना मांडवकर म्हणालेत की, ‘साहित्य जगण्याचं बळ देतं, नवा विचार देतं, जगण्याचं बळ देतं. त्यामूळेच समाजाच्या जगण्याचं सार नाभिक साहित्यातून उमटायला हवं, अशी अपेक्षा मावळते संमेलनाध्यक्ष गोपालकृष्ण मांडवकर यांनी व्यक्त केली. संमेलनात नाभिक समाजातील साहित्यिकांना व्यासपीठ निर्माण करून देणाऱ्या ‘विशेष स्मरणिका कलादर्पण’चे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच नाभिक समाजातील लेखक आणि कवींच्या अनेक पुस्तकांचे प्रकाशनही यावेळी करण्यात आलं. उद्घाटन सत्राचं संचलन नांदेडच्या अशोक कुबडे आणि अश्विनी अतकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. अविनाश बेलाडकर यांनी केले.
संमेलनाच्या दुसर्या सत्रात ‘नाभिकांच्या जीवनातील नव्या विकास वाटा साहित्यातून विस्तारल्या जाव्यात’, या विषयावर परिसंवाद झाला. प्रा.यशवंत घुमे यांच्या अध्यक्षतेखालील परीसंवादात पुण्याचे चंद्रशेखर जगताप, सोलापूरचे दत्ता पारपल्लीवार, वर्धेच्या अर्चना धानोरकर सहभागी झालेत. यानंतर श्रीधर राजनकर आणि नितेश राऊत यांच्या कथाकथनानं संमेलनात रंगत आणली. यानंतर निमंत्रितांच्या कवी संमेलनातील कवींच्या रचनांनी उपस्थितांच्या हृदयाचा ठाव घेतला. संमेलनाचा समारोप बक्षिस वितरण आणि पुण्याचे मारूती यादव यांच्या ‘हास्यजत्रा’ कार्यक्रमाने झाला. या संमेलनासाठी राज्यभरातील नाभिकबांधव संतनगरीत आले होते. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी ‘महाराष्ट्र नाभिक कलादर्पण संघ’ आणि शेगावच्या स्थानिक आयोजन समितीने अथक परिश्रम घेतलेत.
आजच्या संमेलनात कोकणातील रत्नागिरीच्या नाभिक समाजातील ८५ वर्षीय ‘युट्युबर’ आज्जी गुलाबबाई पवार यांचा विशेष सत्कार आला. या आजीने युट्युबर ‘आपली मुलगी गौरी’ नावानं स्वत:चं ‘यट्युब चॅनेल’ सुरू केलं. तिचे यावर लाखो फालोअर्स आहे. ती या ‘चॅनल’च्या माध्यमातून मनोरंजन आणि कोकणातील खाद्य संस्कृतीची माहिती देणारे व्हिडीओ प्रसारित करते. या सळसळत्या उत्साहाच्या ‘युट्युबर आज्जी’चा यावेळी समाजाच्या वतीनं भावपूर्ण सत्कार करण्यात आला.

चंद्रपूरचे 1857 स्वतंत्रता सेनानी बाबुराव शेडमाके यांना काँग्रेसचे अभिवादन

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस ; ब्रिटिशां विरोधात 1857 स्वतंत्रता संग्रामात चंद्रपूर जिल्ह्याचे तरुणांनी देशाखातर हसत – हसत प्राणाचे बलिदान दिले आहे.
आदिवासी समाजातील शहीद क्रांतिसूर्य बाबुराव शेडमाके यांच्या बलिदानाला विशेष महत्त्व आहे.
शेडमाके यांनी जंगोम सेनेची निर्मिती करून ब्रिटिशा विरोधात तगडी झुंज दिली.
इंग्रजांनी कट कारस्थान रचुन अटक केली व चंद्रपूर येथील जेल मध्ये 21 ऑक्टोबर 1858 रोजी फाशी दिली
आज काँग्रेस कार्यलयात क्रांतिवीर बाबुराव शेळमाके यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी,कामगार नेते सैय्यद अनवर, बालकिशन कुळसंगे, संजय कोवे, रोशन दंतालवार,इर्शाद कुरेशी, सुकुमार गुंडेटी,अनुप भंडारी,सचिन कोंडावार,रफिक शेख,प्रणय लिंगमपेल्ली,प्रेम कालेपेल्ली व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

कोळसा सॅम्पलरचे कामबंद आंदोलनाला सुरुवात

0

 

वेकोलीतर्फे निकृष्ट दर्जाचे कोळश्याचे महजेनकोला पुरवठा

वीजपुरवठ्यावर होईल वाईट परिणाम

(चंद्रपूर घुग्घुस) प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस :कोळशाचे उत्पादन करणारे कोल इंडिया आणि विद्युत निर्मिती करिता कोळशा खरेदी करणारे महाजेनको या कंपन्यांनी नियमानुसार कोळशाचे गुणवत्ता तपासणीचे कंत्राट संयुक्तपणे सिम्फर या कंपनीला दिले आहेत.
आणि सिन्फर या कंपनीने कोटनका इंस्पेकॅशन प्रा. लि या कंपनीला कंत्राट दिले.
कोटेनका ही कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून सब एरिया कार्यालय परिसरातील कार्यालयातून घुग्घुस रेल्वे सायडिंग मधून कोळसा सॅम्पलिंगचे कार्य करीत
आहे.
याठिकाणी जवळपास चौवीस कामगारांचा शोषण केल्या जात आहे.
त्यांना वेकोलीच्या हाय पॉवर कमेटीने निर्धारित केलेले वेतन दिल्या जात नाही.
साप्ताहिक सुट्टीचे वेतन मिळत नाही, यासोबतच धूळ भत्ता,मेडिकल सह अन्य कुठल्याही प्रकारच्या सुविधा मिळत नसल्याने संतप्त कामगारांनी आज दिनांक 11 मार्च सकाळी 08 वाजताच्या पाळी पासून कामबंद आंदोलनाला सुरुवात केली आहे.
सदर आंदोलन काँग्रेस शहराध्यक्ष राजूरेड्डी व कामगार नेते सैय्यद अनवर यांच्या नेतृत्वाखाली शुरू करण्यात आले आहे.
कोळशाची चाचणी तपासणी बंद पडल्याने वेकोली गुणवत्ता तपासणी न करता कोळशाच्या नावावर दगळ – धोंडे माती मिक्स करून महजेनकोला पाठविल्या जात असल्याने वीज केंद्र बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली असून ऐन उन्हाळ्यात वीज खंडीत झाल्यास नागरिकांना प्रचंड त्रास भोगावा लागणार आहे.
या गंभीर प्रकाराकडे वेकोली व महाजेंनकोने तातळीने लक्ष देऊन
सिम्फर या कंपनीस कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी लक्ष देऊन कोटनका या कंपनीस कामगारांच्या वेतनात वाढ करण्यास बाध्य करावे अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
आज कामबंद आंदोलनात सचिन कोंडावार, प्रणय लिंगमपेल्ली,प्रेम कालापेल्ली,अशोक सोनटक्के,विशाल जंगम,रवी भगत,प्रमोद मांढरे,बाबा जीवन,लीलाधर आत्राम,सुशांत वाघमारे,कुमार अंबाला,योगेश आरपवल्ली,सुधाकर जुंघरे,राजू कांबळे,राजू पाटील,प्रशांत तोंगे,महादेव मांढरे,विजय नागपुरे,सचिन मांढरे,अमित कामतवार, यांनी आंदोलनात सहभागी झाले आहेत.