Home Blog Page 324

बीबी येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ता मेळावा संपन्न

0

 

प्रतिनिधी /जगन पाटील लोणार

तालुक्यातील येथे दिनांक 9 मार्च रोजी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला याबाबत सविस्तर वृत्त असे की

श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर, प्रदेश उपाध्यक्ष गोविंद भाऊ दळवी, प्रदेश उपाध्यक्ष ध्यैर्यवर्धन पुंडकर अशोक भाऊ सोनोने, प्रदेश महिला उपाध्यक्ष सविता ताई मुंढे, यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष निलेश भाऊ जाधव यांनी वंचित बहुजन आघाडी ने होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकी संदर्भात लोणार तालुका दौरा,
बिबी किनगाव जट्टू सर्कल मेळावा संपन्न.
या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सविता ताई मुंढे प्रदेश महिला उपाध्यक्षा, यांनी किनगाव जट्टू बीबी सर्कल हे भारिप बहुजन आघाडीचे मागील पाच वर्षात जिल्हा परिषद सदस्य निवडून दिल्याची माहिती दिली आणि सर्व समाजातील बांधवांना सोबत घेऊन आपण वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आणण्याचे आश्वासन दिले तसेच निलेश भाऊ जाधव, जिल्हाध्यक्ष यांनी या सर्कल ला ऐतिहासिक वारसा असल्याचे कबूल केले तसेच गावागावात शाखा बांधणी पंचायत समिती गटनिहाय जिल्हा परिषद गटनिहाय असे आदेश सर्व कार्यकर्त्यांना देण्यात आले दिलीप राठोड लोणार तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी नेते, महेंद्र पनाड जेष्ठ नेते, बळी भाऊ मोरे ता.महासचिव, सुनिल भाऊ इंगळे वंचित नेते, गौतम भाई गवई युवा नेते, संघपाल पनाड, के बी इंगळे सर, जितेंद्र डोंगरदिवे, माधव भाऊ हिवाळे, समाधान भाऊ मोरे,गजानन सरदार, आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पार पडला.

बिबि प्रतिनिधी भागवत आटोळे बिबि

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची पालघर जिल्हा कार्यकारिणी जाहीर

0

 

उषा पानसरे मू.का. संपादक मो. 9921400542 असदपूर

पालघर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या नेतृत्वाखाली व पालघर जिल्हाध्यक्ष प्रा. राजेश संखे यांच्या मार्गदर्शनानुसार पालघर जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
पालघर जिल्हा कार्यकारिणी अशी : जिल्हाध्यक्ष प्रा. राजेश संखे, जिल्हा संपर्कप्रमुख श्री.अमेय पिंपळे, जिल्हा समन्वयक श्री.अतुल वझे, जिल्हा उपाध्यक्ष श्री. संतोष कोरे, जिल्हा कोषाध्यक्ष श्री. जितेंद्र सावे, जिल्हा सरचिटणीस श्री. मुकेश सिंह, जिल्हा प्रसिध्दीप्रमुख श्री.परेश संखे, जिल्हा सहसचिव श्री.संजोग संखे, पालघर तालुका महिलाध्यक्षा सौ.उज्वला जगताप यांची निवड करण्यात आली आहे.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, पालघर जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने गेल्या दोन वर्षात विविध उपक्रम राबवून पत्रकार व सामान्य कुटुंबांना मदत केली आहे. सन २०२२-२३ मध्ये पत्रकारिता, शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, गोर गरीब जनतेचे प्रश्न सोडवणे, सामान्य कुटुंबांना मदत करणे, वृक्षारोपण, पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणे आदी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रा. राजेश संखे यांनी सांगितले.
पालघर जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य संपर्कप्रमुख रमेश मोपकर, राज्य संघटक नरेंद्र जमादार, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते- पाटील राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य महिला संपर्क प्रमुख विजयाताई काचावार, राज्य महिला संघटक रिद्धी बत्रा, राज्य सांस्कृतिक प्रमुख प्रशांत विलणकर, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, व्यंकटराव पनाळे, नंदकुमार नामदास, जालिंदर शिंदे, अजय सुर्यवंशी, विनायक सोळसे, महेश जाधव, राजन नायर, श्रीकांत चौधरी, शेख मौला शेख उस्मान, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ अडसूळ, अशोक इंगवले, नवनाथ गायकर, संजय भैरे, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य सहसंघटक मनीष नेरुळकर, राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, युवा प्रदेशाध्यक्ष प्रशांत राजगुरू ,युवा संघटक सागर पाटील, कार्याध्यक्ष प्रवीण राठोड, राज्य युवा संपर्क प्रमुख गणेश पवार, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पोरे, संपर्क प्रमुख जय कराडे, संघटक श्रीनिवास माने, महिलाध्यक्षा उषाताई लोखंडे, मराठवाडा अध्यक्ष विष्णू आष्टीकर, कार्याध्यक्ष हुकूमत मुलाणी, संपर्क प्रमुख सुर्यकांत ताद लापूरकर, संघटक साहेबराव कोळंबिकर, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, संघटक संजय लांडगे, महिलाध्यक्षा दीपिकाताई चिपळूणकर, विदर्भ अध्यक्ष विजयकुमार बुंदेला, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख साहेबराव बाबर, कोकण उपाध्यक्ष, योगेश भामरे, इल्यास पठाण, कोकण सरचिटणीस महेश महाजन, पंडित फंगाळ, कायदेविषयक सल्लागार ॲड. अमोल सकट, ॲड. गजेंद्र चंद्रे, ॲड. रत्नाकर पाटील, ॲड. जितेंद्र पाटील, ॲड. देवराव तायडे, ज्येष्ठ सल्लागार डॉ. संजय भिडे, विठ्ठल शिंदे, सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी व पत्रकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

यावल तालुका ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची निवड

0

 

यावल ( प्रतिनिधी)विकी वानखेडे

यावल ता.येथील पंचायत समिती च्या सभागृहामध्ये ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली तत्कालीन यावल तालुका अध्यक्ष खुशाल पाटील यांची ग्राम रोजगार सेवक संघटना महाराष्ट्र राज्य संघटक प्रसिद्ध प्रमुख पदी निवड झाल्याने तसेच यावल तालुका ग्रामरोजगार सेवक संघटनेचे तत्कालीन उपाध्यक्ष श्री बाळू तायडे मारुळ यांची ग्राम रोजगार सेवक संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी  निवड झाल्याने रिक्त झालेल्या पदाकरिता आज ग्राम रोजगार सेवक संघटनेची बैठक महाराष्ट्र ग्राम रोजगार सेवक संघटना  महाराष्ट्र राज्य संघटक प्रसिद्धीप्रमुख खुशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री बाळू तायडे मारुळ हे उपस्थितीत होते सदरचा कार्यक्रम हा यावल पंचायत समितीच्या सभागृहात घेण्यात आला . यावेळी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांनी आपल्या मनोगतामध्ये संघटनेचे रजिस्ट्रेशन , व सभासद नोंदणी प्रक्रिये बाबतीत राज्य अध्यक्ष विलास जोगदंडे महासचिव राजेंद्र जिचकार कोषाध्यक्ष वासुदेव गोतमारे कार्यध्यक्ष देवदत्त साळवे त्यांच्या मार्गदर्शना नुसार संघटनेचे महत्व संघटनेची कार्यप्रणाली विषद करुन संघटन ही काळाची गरज असुन संघटना ही अन्यायाला वाच्या फोडणारे प्रभावी माध्यम असल्याचे आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले यावेळी नुतन तालुका कार्यकारिणी निवड करण्यात आली तिला पुढील प्रमाणे तालुका अध्यक्ष म्हणून चुंचाळे येथील ग्राम रोजगार सेवक दीपक कोळी ,उपाध्यक्ष विरोदा येथील वसीम पिंजारी ,मोहराळा येथील अनिल अडकमोल तालुका सचिव पदी वडोदा प्रया येथील सरफराज तडवी सहसचिवपदी वनोली येथील सुनील सोनवणे कोषाध्यक्षपदी शिरागड येथील कैलास साळुंके सहकोषाध्यक्ष मालोद येथील मेहरबान तडवी कार्याध्यक्ष सातोद येथील अनिल ढाके सहकार्य अध्यक्ष कठोरा येथील दिगंबर खडसे प्रसिद्धीप्रमुख कासवा येथील ईश्वर सपकाळे सह प्रसिद्धीप्रमुख वडोदा प्र सावदा येथील मुकेश सोनवणे तसेच सल्लागारपदी लूकमान तडवी, फकिरा तडवी, विजय सपकाळे,लक्ष्मण कोळी,विलास पाटील, शरीफ तडवी यांची निवड सर्वानुमते करण्यात आली नवनिर्वाचित महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बाळू तायडे मारुळ महाराष्ट्र राज्य संघटक व प्रसिध्द प्रमुख खुशाल दादा पाटील व नुतनकार्यकारणीच्या पदाधिकारीची मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच संघटनेच्या कामात मारुळचे कर्तव्यदक्ष तरुण तडफदार सरपंच तथा महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे यावल ता. उपाध्यक्ष सैय्यद असद अहमद यांचा ही सत्कार करण्यात आला यावेळी सुखदेव साळुंखे, संजय कोळी, ईश्वर अडकमोल, दिगंबर पाटील, राजेंद्र पाटील, निलेश तायडे आदी तालुक्यातील ग्राम रोजगार सेवक उपस्थित होते

भाजपा महिला आघाडी व प्रयास सखी मंच घुग्घुसतर्फे “सन्मान स्त्रिशक्तीचा” कार्यक्रम संपन्न

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

मंगळवार 8 मार्च रोजी येथील प्रयास सभागृहात भाजपा महिला आघाडी घुग्घुस व प्रयास सखी मंच घुग्घुस यांच्या संयुक्तविद्यमाने जागतिक महिला दिना निमित्त प्रतिभावंत महिलांचा सत्कार “सन्मान स्त्रिशक्तीचा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी भारत माता, राजमाता जिजाऊ व माता रमाई यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अमर शेट्टीवार, माजी जिप सभापती नितुताई चौधरी,माजी उपसरपंच संजय तिवारी, डॉ. अंक्षिता कुंडू, डॉ. वृषाली नांदे, भाजपाचे विनोद चौधरी, साजन गोहने, पोलीस महिला कर्मचारी समीक्षा भोंगळे, वर्षा बावणे, वर्षा जाधव, मंजुषा काकडे, रंजना नैताम उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आले.
याप्रसंगी बोलतांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले स्त्रिचा समानार्थी शब्द सेवा होय. या जगामध्ये शुश्रुषा म्हणजे सेवा हे जर कोणी करत असेल तर ती स्त्रि आहे. पुरुषांपेक्षाही जास्त स्त्रि सेवा करते. कोरोना संकटात डॉक्टर, नर्स, महिला पोलीस यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता सेवा केली. समाजात सेवेचे काम स्त्रियांच्या माध्यमातून होते.
प्रास्ताविक घुग्घुस प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरणताई बोढे यांनी केले.
याप्रसंगी गायन, नृत्य असे कार्यक्रम घेण्यात आले
यावेळी घुग्घुस ग्रामपंचायत माजी सदस्या कुसुमताई सातपुते, नंदा कांबळे, पुजाताई दुर्गम, प्रयास सखी मंचच्या मार्गदर्शिका अर्चनाताई भोंगळे, पुष्पाताई रामटेके, चंदाताई गेडाम, सुनीता पाटील, किरण जुनघरे, सौभाग्या तांड्रा, चंद्रकला मन्ने, शारदा गोडसेलवार, नाझिमा कुरेशी, सुनीता वर्मा, कीर्तीताई चरडे, अनिता लालसरे, सारिका भोंगळे व मोठया संख्येत महिला उपस्थित होत्या.
संचालन माजी ग्रामपंचायत सदस्या सुचिता लुटे यांनी केले तर आभार वैशाली ढवस यांनी मानले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जळगाव जिल्हा प्रवक्तेपदी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांची निवड

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

 

येथील नगर परिषद यावलचे माजी नगराध्यक्ष तथा आपल्या अभ्यासु वक्तव्याने जाहीर सभा व बैठकांमध्ये लक्ष वेधणारे अतुल वसंत पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे . यावल येथे आज दिनांक ९ मार्च रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अॅड रविन्द्र भैय्या पाटील आणी पक्षाचे जिल्हा निरिक्षक अविनाश आदीक यांच्या प्रमुख उपस्थित पक्षाच्या झालेल्या बैठकीत त्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवुन अतुल वसंत पाटील यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या जळगाव जिल्हा प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे . अतुल पाटील यांच्या निवडी बद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा निरिक्षक अविनाश आदीक, तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले , ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष उमेश नेमाडे , चोपडा विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिल साठे , राष्ट्रवादी आदीवासी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष एम बी तडवी सर , विजय प्रेमचंद पाटील , माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते यांच्यासह पक्षातील विविध पदाधिकारी यांनी त्यांचे स्वागत केले .

यावलच्या शिक्षण विभागाला दहावी व बारावीच्या परिक्षा केन्द्रावर कुठलेही प्रकारचे भेटीचे आदेश नसतांना भेटी कशासाठी ? पं .स .मासिक सभेत चर्चा

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

आज येथील पंचायत समिती सदस्यांची अखेरची मासिक सभा पंचायत समितीच्या सभापती सौ .पल्लवी पुरुजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या सभेत शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारावर विशेष करून लक्ष वेधणारी चर्चा करण्यात आली . या सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नात आदेश नसतांना तालुक्यातील बारावी परीक्षा केंद्रांना भेटी देण्यात आल्याचे दिसून येत आहे . शिक्षण विभागाच्या भरारी पथकाचे कुठलेही आदेश नसताना परीक्षा केंद्रांना भेटी का दिल्यात ? आपली बीट सोडून दुसऱ्या बिट मध्ये शाळा तपासणी चा उद्देश काय ?आपल्याकडे गटसमन्वयकचा पदभार आहे परंतु गटसमन्वयकाचे कार्य हे एसएसए बाबत असताना आणि एसएसए मध्ये पैसा येत नाही त्याबाबत काम न करता आपण शाळा भेटी कोणत्या उद्देशाने करीत आहात गटसमन्वयक यांनी सोमवार व शुक्रवार या दिवशी कार्यालयात हजर राहायचे असते आपण कार्यालयात हजर राहत नाहीत याबाबत बी आर सी कर्मचारी व शिक्षण विभाग लिपिक यांना बोलावून विचारणा केली असता ते कार्यालयात येतच नाहीत असे सांगण्यात आले ,भरारी पथकामध्ये आपणास आदेश नसताना केंद्रांना भेटी देणे चुकीचे असल्याचे आज झालेल्या पंचायत समितीच्या शेवटच्या मासिक सभेत पंचायत समितीचे विरोधीगटनेते शेखर सोपान पाटील व गटनेते दीपक अण्णा पाटील यांनी या बाबतीत शिक्षण विस्तार अधिकारी नईम शेख यांच्याशी विचारणा करीत त्यांच्या विभागाअंतर्गत होत असलेल्या अनधिकृत कारभाराविषयी विषयी विचारणा करीत कानउघाडणी केली . या विषयाची केंद्र शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रार पंचायत समितीच्या सदस्य यांच्याकडे केली होती. शिक्षण विभागाच्या वतीने केंद्र तपासणीचे अधिकार आदेश नसून . असे असतांना सुद्धा यावल तालुक्यात शिक्षण विभागाचा कोणता अधिकारी शाळा शाळांमध्ये फिरत आहे असून तपासणीच्या नावाखाली केंद्र संचालकांना त्रास देऊन पिळवणूक करीत आहे असे करण्यामागे त्या अधिकाऱ्यांचा काय उद्देश आहे असे प्रश्न उपस्थित होत आहेत . असे असुन, ही शिक्षण विभागातील संबंधित अधिकारी एवढे मुजोर कसे आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे . सदर यावल पंचायत समितीच्या शेवटच्या मासिक सभेत लोकप्रतिनिधी यांनी शिक्षण विभागाच्या अशा प्रकारच्या कारभारा विषयी प्रश्न उपस्थित केल्याने या बाबत जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी व गटशिक्षणाधिकारी काय कार्यवाही करणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहणार आहे .

स्त्री ही कुटुंबाचा पाया ! स्त्री शिवाय कुटुंब नाही : प्रकाश देवतळे

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस : स्त्री ही कुटूंबाचा पाया आहे स्त्री शिवाय कुटुंब नाही व कुटुंबा शिवाय समाज नाही असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमेटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी केले आहे.
घुग्घुस शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने 08 मार्च रोजी शहर अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या तर्फे महिला दिनाचे कार्यक्रम काँग्रेस कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी शहर अध्यक्ष राजूरेड्डी यांनी महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रकाश टाकला 08 मार्च 1908 रोजी अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथील वस्त्रोद्योगातील काम करणाऱ्या महिलांनी सामूहिकपणे मोठी ऐतिहासिक निर्दशने केली.
सदर निदर्शने कामाचे तास कमी करणे, महिला सुरक्षितता इत्यादी मागण्यांना घेऊन करण्यात आले.
याची फलश्रुती 1910 मध्ये विविध देशातील महिला प्रतिनिधीनी 8 मार्च हा महिला दिवस साजरा करण्याचा ठराव पास केला.
आज भारतात सरपंचा पासून ते राष्ट्रपती,पंतप्रधान,वैद्यकीय अधिकारी,पोलीस अधिकारी, सायकली पासून ते विमाना पर्यंत प्रत्येक क्षेत्रात महिलांनी प्रगती केली आहे.
मात्र अजूनही महिलांन मध्ये अंधश्रद्धा,अशिक्षितपणा हे दूर करणे गरजेचे असून हुंडाबळी,
महिला अत्याचारा पासून लढा देण्यासाठी महिलांनी एकत्रित रित्या संघर्ष करणे गरजेचे आहे.
असे आवाहन रेड्डी यांनी केले.
काँग्रेस तालुकाध्यक्ष श्यामकांत थेरे यांनी स्त्री ही दोन कुटुंब सासर व माहेर जोडणारा सेतू असल्याचे भावना व्यक्त केल्या.
किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोशन पचारे यांनी महिलांनी राजकारणात पुढे येऊन देशाला महागाईच्या खाईत लोटणाऱ्या मोदी शासनाला धडा शिकविण्याचा आवाहन केले.
याप्रसंगी मंचावर सौ.संगीता बोबडे, सौ.पुष्पा नक्षिणे, सौ.पदमा त्रिवेणी, दुर्गा पाटील,अमिना बेगम,संध्या मंडल, सौ.पुष्पा कणकम,सौ.दीपा बोकडे,
उत्तर भारतीय सेल सचिव ब्रिजेश सिंग,अल्पसंख्याक सचिव किरण झुंजीपल्लीवार,पर्यावरण तालुकाध्यक्ष महेश किण्णाके,शामरावजी बोबडे, अनिरुद्ध आवळे,अलीम शेख,मोसीम शेख,किशोर बोबडे,भैय्या भाई,स्टीवन गुंडेटी,श्रीहरी शेंगारप,गणेश उईके, रिषभ दुपारे,लखन हिकरे, हे होते
कार्यक्रमाचे संचालन साहिल सैय्यद यांनी केले
आभार प्रदर्शन कामगार नेते सैय्यद अनवर यांनी केले तर
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोशन दंतलवार, विशाल मादर, इर्शाद कुरेशी, सुकमार गुंडेटी,रोहित डाकूर,अनुप भंडारी,देव भंडारी,कुमार रुद्रारप,रमेश रुद्रारप, सुनील पाटील, रफिक शेख,बालकिशन कुळसंगे,संजय कोवे,अंकुश सपाटे,अविनाश गोगुर्ले, यांनी केले
याप्रसंगी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

राजकीय गुन्हेगारीला अटकाव घालणे आवश्यक अमरावतीत अतिरिक्त ठाणे व सीसीटीव्ही ची मागणी

0

 

उषा पानसरे मू.का. सपादच मो. 9921400542 अमरावती

गृहविभागाच्या मागण्यांवर विधानसभेत आ. सौ. सुलभाताई खोडके यांची चर्चा*.

मुंबई ८ मार्च : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या मंगळवारच्या सत्रामध्ये सभागृहात राज्याच्या गृहविभागाच्या विषयांवरील पुरवणी मागणींवर चर्चा घडवून आली . या चर्चेमध्ये अमरावतीच्या आ. सौ . सुलभाताई खोडके यांची सहभागी घेतला . अमरावती मतदार संघात निवडणुकीच्या काळात राजकीय गुन्हेगार सक्रिय राहत असून नेत्यांच्या राजकीय संरक्षणाने ते मोकाट फिरत आहे. दरम्यान मागील विधानसभा निवडणुकीच्या काळात गुन्हेगारी प्रवृतींद्वारा आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न केल्या गेला . कार्यकर्त्यांना धमक्या देऊन त्यांची अडवणूक केल्या गेली . अशा परिस्थितीत आपण निवडणूक जिंकली .आगामी मनपा निवडणूक काळात सुद्धा हे राजकीय गुन्हेगार सक्रिय राहून शांतता व्यवस्थेला धोका निर्माण करण्याची शक्यता आहे. याला नेत्यांचे संरक्षण असल्याने ते मोकाट फिरत आहेत . शहरातील दंगलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी राजकीय गुन्हेगारांच्या घरी धाडी टाकल्या असता , त्यांच्या घरातून बंदूक सारखे घातक शस्त्र साठे आढळून आले, या कुणालाही अटक झाली नाही , उलट बेल मिळाली अशी परिसथितीच अमरावतीत वातावरण आहे, हि बाब फार गंभीर आहे. याची चौकशी करून राजकीय गुन्हेगारावर कारवाईची मागणी आ. सुलभाताई खोडके यांनी सभागृहात केली . शहरात . त्यामुळे अशा राजकीय गुन्हेगारावर अंकुश लावण्याकरिता गृह विभागाने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी सभागृहात गृहविभागाच्या विषयांवर चर्चा करतांना स्पष्ट केले . अमरावती मध्ये वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी व वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर सद्याचे पोलीस ठाणे कमी पडत आहे. त्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा म्हणून अमरावती मध्ये अतिरिक्त पोलीस ठाणे स्थापन करण्याची गरज व पोलिसांचे अधिक मनुष्यबळ वाढविण्याची गरज आहे., असे सांगीत शहर सुरक्षेच्या दृष्टीने विविध भागात सीसीटीवी कॅमेरे बंसविण्यात यावे , अशी मागणी करीत आमदार महोदयांनी सभागृहाचे लक्ष वेधले . यासाठी आपण गृह विभागाकडे प्रस्ताव दिला असून यावर त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली . गेल्या नोव्हेंबर २०२१ मध्ये अमरावती मध्ये दंगल सदृश परिस्थिती उद्भवली असता अमरावती पोलिसांनी चोख भूमिका घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली . त्याबद्दल अमरावती पोलीस व गृह विभागाचे अभिनंदन सुद्धा आ. सुलभाताई खोडके यांच्या वतीने अधिवेशना दरम्यान बोलतांना करण्यात आले. .. दरम्यान अमरावती शहरातील पोलीस विभागाच्या अनेक बाबींविषयी सभागृहाला अवगत करतांना पोलीस वसाहतींचा प्रश्न निकाली काढण्यात यावा. मागील ३०ते ३५ वर्षांपासून पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न निर्माण झाला गृह विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी आमदार महोदयांच्या वतीने करण्यात आली . दरम्यान अधिवेशनात गृह विभागाच्या कोरोना संकट काळात चोख भूमिका तसेच रस्त्यावर तैनात राहून योध्यांप्रमाणे काम करणाऱ्या पोलीस शिपायांना शिपायांना पदोन्नती देण्याचा शासनाचा निर्णय निर्णय स्वागतार्ह असल्याचे सांगून आमदार महोदयांनी सरकारचे अभिनंदन केले. महिला अत्याचार रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने शक्ती कायदा पारित केला याबद्दल सुद्धा आमदार महोदयांनी आभार मानीत अभिनंदन केले आहे.
न्यूज रिपोर्टर उषा पानसरे असदपूर

प्रियदर्शनी शाळा ते बेलोरा पर्यत मुख्य मार्गाची स्वच्छता करा :राजू रेड्डी

0

 

(ivrcl)आय व्ही. आर.सी.एल कंपनीला काँग्रेसची तंबी

(चंद्रपूर घुग्घुस) प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस : चंद्रपूर ते वणी मुख्य मार्गाच्या दोन्ही बाजूला धुळाचे ढीग निर्माण झाले असून यावरून जडवाहन जाताच धुळामूळे रस्त्यावर सर्वत्र धुळच – धूळ उडते याप्रदूषणाने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.
रस्त्या वरील धूळ नियमितपणे स्वच्छ करण्यात यावी याकरिता काँग्रेसच्या शिष्टमंडळाने धानोरा टोल येथे जाऊन रस्ता स्वच्छता,रस्ता द्विभाजक स्वछता बाबतव अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
नियमितपणे स्वच्छता न केल्यास टोल विरोधात आंदोलनाचा इशारा दिला याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी, कामगार नेते सैय्यद अनवर,रोशन दंतलवार, विशाल मादर,इर्शाद कुरेशी,सुकुमार गुंडेटी,बालकिशन कूळसंगे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

ग्रामसेवक संघटनेच्या वतीने जागतिक महिला दिन महीला अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी यांचा गौरव करण्यात आला.

0

 

 

यावल – प्रतिनिधी विकी वानखेडे

यावल पंचायत समितीच्या कार्यालयात यावल तालुका ग्रामसेवक संघटनेच्या DNE 136 शाखेच्या वतीने जागतिक महिला दिन कर्तृत्ववान माहिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यालयातील महीला अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी यांचा गौरव करण्यात आला.

 

कार्यक्रमात पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. श्रीमती मंजुश्री गायकवाड-बोरसे, पंचायत समितीच्या लोकप्रतिनिधी सदस्या कलीमा सायबु तडवी, पंचायत समिती सदस्या लक्ष्मी विजय मोरे, पंचायत समितीच्या कार्यालयीन कर्मचारी म्हणुन कार्यरत असलेल्या वरिष्ट सहाय्यक अंजनी लोहारो, कनिष्ठ सहाय्यक सुनिता सोनवणे, कनिष्ठ सहाय्यक वर्षा राऊत, भारती चौधरी, किर्ति चौधरी, डाटा एंट्री ऑपरेटर मनिषा खाचणे, कार्यालयीन शिपाई फुलवंती भादले, शिपाई अपशान तडवी, ऑपरेटर तनुजा तडवी यांचा सन्मान करण्यात आला. शासकीय सेवेने आर्दश निर्माण करणाऱ्या कर्तृत्वान महीलांचे यावल तालुका ग्रामसेवक संघटनेच्या वतीने हा गौरव करण्यात आला. याप्रसंगी तालुकाध्यक्ष रुबाब तडवी, हितू महाजन, ग्रामसेवक राजू तडवी यांच्यासह आदी उपस्थित होते.