Home Blog Page 325

शेगावात नाभिक समाजाचे द्वितीय साहित्य संमेलन.

0

 

अध्यक्षस्थानी डॉ. प्रदीप कदम; उद्घाटक कॅप्टन महेश गायकवाड ; दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल

अर्जुन कराळे शेगाव

शेगाव, दि. ७ : महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघाच्या वतीने नाभिक समाजाचे एक दिवसीय द्वितीय साहित्य संमेलन बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील विघ्नहर्ता हॉल मध्ये दि. १२ मार्च २०२२ ला संपन्न होणार आहे.

या संमेलनाच्या संमेलनाध्यस्थानी पुणे येथील सुप्रसिद्ध साहित्यिक आणि व्याख्याते डॉ. प्रदीप कदम असतील. ते अमरावती येथे झालेल्या पहिल्या नाभिक साहित्य संमेलनाचे मावळते संमेलनाध्यक्ष गोपालकृष्ण मांडवकर यांच्याकडून संमेलनाध्यक्षपदाची सूत्रे स्विकारतील. सातारा येथील सुप्रसिद्ध लेखक, कादंबरीकार आणि व्याख्याते कॅप्टन महेश गायकवाड हे या संमेलनाचे उद्घघाटन करतील. नाभिक समाजातील साहित्यिकांना व्यासपीठ निर्माण करून देणाऱ्या ‘विशेष स्मरणिकेचे विमोचन या संमेलनात होईल. तसेच समाजातील लेखक आणि कवींच्या अनेक पुस्तकांचे प्रकाशनही यावेळी करण्यात येईल.

नाभिक समाजाची संस्कृती, समस्या आणि भविष्याच्या वाटचाली’वर चर्चा अपेक्षित असणाऱ्या या संमेलनात समाजाला दिशादर्शक ठरलेल्या आंतरराष्ट्रीय हेअर डिझायनर उदय टके, स्पर्धा परिक्षा पुस्तकांचे यशस्वी लेखक ‘के सागर’ सामाजिक कार्यकर्त्या सुमनताई पवार, अलिबागचे सुप्रसिद्ध हेअर डिझायनर सुशील भोसले, अहमदनगरचे अशोक औटी, अखिल भारतीय जेष्ठ नागरिक समाजाचे भालचंद्र गोरे, क्रांतीकारक विचारांचे कार्यकर्ते गोविंद दळवी, सुधाकर सनसे, अखिल भारतीय सेन समाजाचे पुखराज राठोड, नाशिकचे समाधान निकम, समाजातील जळगावचे प्रथम आयएएस सौरभ सोनावणे, व-हाडी शब्दकोशकार शिवलिंग काटेकर, नागपूरच्या मराठी वाडमयाच्या अभ्यासक रिता धांडेकर यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात येईल.

दि. १२ मार्च ला सकाळी ९ वाजता प्रतिनिधींची नोंदणी होईल. १० वाजता संमेलनाचे उद्घाटन होईल. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार व स्मरणिकेचे विमोचन होईल. दुपारी साडेबारा वाजता नाभिकांच्या जीवनातील नव्या विकास वाटा साहित्यातून विस्तारल्या जाव्यात, या विषयावरील प्रा. यशवंत घुमे यांच्या अध्यक्षतेखालील परीसंवादात पुण्याचे चंद्रशेखर जगताप, सोलापूरचे दत्ता पारपल्लीवार, वर्धेच्या अर्चना धानोरकर सहभागी होतील.

दीड वाजता श्रीधर राजनकर व नितेश राऊत यांचे कथाकथन होईल. अडीच वाजता निमंत्रीतांचे कविसंमेलन होईल. संध्याकाळी ४ वाजता बक्षीस वितरण, साडेचारला संमेलनाचा समारोप होईल. पुण्याचे मारूती यादव यांची हास्यजत्रा ५ वाजता सादर होईल.

संमेलनाच्या यशस्वीतेसीठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. शेगावची स्थानिक आयोजन समिती संमेलन यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे. या संमेलनाला राज्यभरातील समाजबांधवांनी उपस्थित राहून साहित्याचा आस्वाद घेण्याचे आवाहन महाराष्ट्र नाभिक कलादर्पण संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

नांदरून ग्रामपंचायत कार्यालया समोर छावा क्रांतीविर संघटनेचे आमरण उपोषण!

0

 

उषा पानसरे असदपूर मू.का. सपादक मो,9921400542

दिनांक 8 मार्च दर्यापूर

विविध मागण्यांसाठी विद्याधर श्रीरंग रायबोले बसले उपोषणाला

दर्यापूर -तालुक्यातील नांदरून ग्रामपंचायत कार्यालयासमोर येथील छावा क्रांतीविर संघटनेचे ग्रामपंचायत सदस्य विद्याधर श्रीरंग रायबोले हे आपल्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसले आहे. गावात झाडे कमी असून कामावर मजूर जास्त असल्याबद्दल व आम्ही पाच सदस्य असून काम मागण्याचा अर्ज करून सुद्धा एकही काम मंजूर न करून घेतल्याबद्दल
गावातील छावा क्रांतीवीर सेनेच्या पाच ग्रामपंचायत सदस्यांनी काम मागणीचा अर्ज करून सुद्धा एकही काम मंजूर न करुन घेतल्याबद्दल ग्रामपंचायत विरोधात आमरण उपोषण करण्यात येत आहे.यामध्ये ग्रामपंचायत सदस्य विद्याधर श्रीरंग रायबोले,उमा सागर पवार, जयश्री विशाल बगाडे, गणेश सोलंकी,सुजाता रूपेश तेलंग यांचा समावेश आहे.
या उपोषणाला छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुरज बाप्पु देशमुख व दर्यापूर तालुका अध्यक्ष विशाल बगाडे उपस्थित होते

कारंजा येथे जिल्हाध्यक्ष प्रफुल क्षीरसागर यांची भेट

0

 

कारंजा (घा )/प्रतिनिधी

कारंजा( घा ):-लवकरच होऊ घातलेल्या पंचायत समिती ,जिल्हापरिषद निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून सर्वच राजकीय पक्ष व कार्यकर्ते कामाला लागल्याचे दिसून येत आहे .संभाजी ब्रिगेड चे नेते तथा वर्धा जिल्हाध्यक्ष प्रफुल क्षीरसागर यांनी सुद्धा काल शहरास भेट देऊन संभाजी ब्रिगेड पक्षाच्यावतीने पंचायत समिती, जिल्हापरिषद लढविण्यासंदर्भात स्थानिक कार्यकर्त्यांची काय रणनीती राहील हे जाणून घेतले .यासंदर्भात शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली .येत्या पंचायत समिती, जिल्हापरिषद निवडणुकीत संभाजी ब्रिगेड चे युवा नेतृत्व स्थानीक नेते पियुष रेवतकर यांच्या नेतृत्वात संभाजी ब्रिगेड पक्ष आपले उमेदवार योग्य त्या जागांवर आपल्या पूर्ण ताकदीने लढवेल असा निर्धार सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी केला .

कारंजात रंगला कीर्तन सोहळा

0

 

कारंजा (घा )/प्रतिनिधी :-पियुष रेवतकर .

कारंजा (घा ):-येथील प्राचीन तथा जागृत महादेव मंदिरात भागवतकर विलास कोरडे महाराज नागपूर यांच्या ओजस्वी वाणीतून सात दिवस शिवपुराण ग्रंथाचे पूजन करून कोरडे महाराजांनी केले .त्यांना तबला वादक म्हणून सुरेश गायकवाड ,पेटी वादक म्हणून रमेश जेवडे तर गायक म्हणून नरेंद्र जयसिंगपुरे यांनी उत्तम साथ दिली .सती खंड ,पार्वती खंड ,कार्तिकी जन्म ,श्रीगणेश जन्म ,तारकासुर वध व शिवशंकरच्या पराक्रमाच्या कथा सांगून शंकरांनी केलेल्या धर्मरक्षण कार्यावर प्रकाश टाकला .समारोप दिनी टाळ मृदंगचे गजरात ,शिवग्रंथ दिंडी व पालखी काढण्यात आली .त्यानंतर कोरडे महाराजांचे काल्याचे कीर्तन झाले .महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नरेंद्र मानकर ,मारोतराव कुरमती ,आयुष्य सातपुरे ,रोशन नांदेकर ,सचिन नानोटकर ,देविदास विरुळकर ,सुधाकर चौधरी ,प्रमोद नानोटकर ,प्रतीक चाफले ,नाना मानकर ,प्रकाश मानकर आदींनी परिश्रम घेतले .

बिबी येथे नांफेडच्या हरभरा खरेदीला सुरुवात

0

 

जिल्ह्यात रब्बी हंगाम 2021- 22 मध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने हरभरा खरेदी हमीदर 5230 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे खरेदीला बिबी येथे विदर्भ एग्रीकल्चरल अँड अलाईड प्रोडूसर कंपनी लिमिटेड नागपूर अंतर्गत शासन मान्य आधारभूत हमीभाव खरेदी नाफेड अंतर्गत शेती सेवा ऍग्रो प्रोडूसर कंपनी यांच्यामार्फत या खरेदीला 4 मार्च रोजी बिबी येथे सुरुवात झाली आहे
हरभरा खरेदी नोंदणी करण्याकरिता शेतकऱ्यांनी आधार कार्ड, सातबारा, ऑनलाईन पीक पेरा सह बँक पासबुकासी आधार लिंक केलेली झेरॉक्स मोबाईल क्रमांक आदी कागदपत्रासह संबंधित खरेदी केंद्रावर जाऊन खरेदी करिता नोंदणी करावी असे आवाहन गोपाल काबरा यांनी केले यावेळी रमेश काबरा यांच्या हस्ते काटा पुजन करण्यात आले संचालक गोपाल काबरा यांनी प्रथम आलेल्या शेतकऱ्यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार केलायावेळी बद्रीनारायण काळुसे,रामदास खंदारे,अशोक फड,भुजंगराव,घोडके,अंबरसिंग,बुरकुल,शेख फयुम सह अनेक शेतकरी उपस्थित होते

ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य सुरक्षित असेल : आ.निलंगेकर

0

 

लातूर/ निलंगा प्रतिनिधी
डी. एस. पिंगळे

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळे भारतातील हजारो वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांना स्वदेशी परतावे लागले आहे. त्यांना शिक्षण अर्धवट सोडून यावे लागले असल्याने त्यांना आता भवितव्याची काळजी असेल मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य सुरक्षीत करण्याच्या दृष्टीकोनातून पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. लवकरच भारतीय शैक्षणिक प्रणालीमध्ये त्यांना सहभागी करून त्यांचे शिक्षण पुर्ण करून त्यांचे भवितव्य सुरक्षित करण्यात येईल अशी ग्वाही माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे.
वेदांत शिंदे, मोक्षदा कदम, तुषार म्हेत्रे, पल्लवी म्हेत्रे, ऋतुजा देशमाने या विद्यार्थ्यांसह त्यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी संवाद साधून सुरक्षित स्वदेशी परत आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला.
युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरु झालेल्या युद्धामुळे युक्रेनमधून भारतातील जे विद्यार्थी वैद्यकीय
शिक्षण घेण्यासाठी तेथे गेले होते त्यांना सुरक्षीत परत आणने याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने प्राधान्य दिले असल्याचे सांगत माजी मंत्री आ. निलंगेकरांनी ऑपरेशन गंगा अंतर्गत भारतातील सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षीत परत आणण्यात येईल असा विश्वास व्यक्त करून देशातील प्रत्येक जिल्ह्यातील जे विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते त्यांना परत आणण्याकरीता केंद्र सरकारने जी मोहिम उघडली होती त्या मोहिमेत भाजपच्या मंत्र्यांसह लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेतले होते. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारेच विद्यार्थी सुखरुप परत येऊ लागले असून लातूर जिल्ह्यातील कांही विद्यार्थी आतापर्यंत परत आलेले असले तरी उर्वरित विद्यार्थी लवकरच परततील अशी माहितीही आ. निलंगेकरांनी यावेळी दिली. युद्ध परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना आपले शिक्षण अर्धवट सोडून यावे लागले असले तरी त्यांचे शैक्षणिक भवितव्य सुरक्षित रहावे याकरीता केंद्र सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या विद्यार्थ्यांना भारतीय शैक्षणिक प्रणालीमध्ये कशा पद्धतीने सहभागी करून घेता येईल आणि त्यांचा उर्वरीत वैद्यकीय अभ्यासक्रम कसा पुर्ण करता येईल या दृष्टीनेही केंद्र सरकारने कार्यवाही सुरु केले असल्याचे सांगत या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य सुरक्षीत असेल असा विश्वास माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांनी आपले अनुभव सांगत युक्रेनमध्ये भारतासह अनेक देशातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारनेच भारतातील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी मोहिम राबविली असल्याचे सांगितले. इतर देशानी मात्र याबाबत कोणतीच जबाबदारी उचलली नाही. त्यामुळेच आम्ही भारतीय असल्याचा आम्हाला अभिमान असून आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याने आम्ही सुखरुप परत आलो असल्याची प्रतिक्रिया या विद्यार्थ्यांनी यावेळी दिली. यावेळी प्रदेश भाजयुमोच्या सरचिटणीस प्रेरणा होनराव, लातूर भाजयुमोचे सरचिटणीस तानाजी बिराजदार आदीची उपस्थिती होती.

इतर राजकीय पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा संभाजी ब्रिगेड मध्ये प्रवेश

0

 

कारंजा (घा )/प्रतिनिधी

कारंजा( घा ):-गेल्या एक वर्षा अगोदर कारंजा मध्ये संभाजी ब्रिगेड ची शाखा स्थापन करण्यात आली .सतत एक वर्ष सामाजिक कार्य करून जनतेच्या समस्यांसाठी लढा देत संभाजी ब्रिगेड ने तालुक्यात एक मजबूत राजकीय अस्तित्व निर्माण केलेल आहे .शंभर टक्के राजकारण व शंभर टक्के समाजकारण या धोरणावर चालत असलेल्या संभाजी ब्रिगेड कडे तालुक्यातील जनतेचा कौल पाहायला मिळत आहे .संभाजी ब्रिगेड चे नेते पियुष रेवतकर यांच्या नेतृत्वावर विश्वास करून कारंजा तालुक्यातील ढाबा या गावातील 100 वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा संभाजी ब्रिगेड मध्ये जाहीर प्रवेश झाला व कारंजा शहरातील अनेक महिला कार्यकर्त्यांचा संभाजी ब्रिगेड मध्ये प्रवेश झाला .संभाजी ब्रिगेडच्या वेगवेगळ्या पदावर अनेक कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली .तालुक्यात सर्वात जास्त गतीने वाढणारा पक्ष संभाजी ब्रिगेड आहे व येणाऱ्या पंचायत समिती ,जिल्हापरिषद निवडणुकीत संभाजी ब्रिगेड यश प्राप्ती करणार असल्याचे संभाजी ब्रिगेड चे नेते पियुष रेवतकर म्हणाले .तालुक्यात संभाजी ब्रिगेड ला मिळत असलेल्या जनतेच्या प्रतिसादाला पाहून येणाऱ्या काळात तालुक्यातील राजकीय वातावरण त्रिकोनिय पाहायला मिळणार .

चंद्रपूर काँग्रेस पर्यावरण तालुका अध्यक्षपदी महेश किन्नाके यांची नियुक्ती

0

 

काँग्रेस पर्यावरण विभाग तळमळीने कार्य करेल :शहर अध्यक्ष राजू रेड्डी

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्गूस : चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटी अंतर्गत कार्यरत काँग्रेस कमिटीचे पर्यावरण विभागाच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शहर काँग्रेस कमेटी तर्फे जनसंपर्क कार्यलयात शहर अध्यक्ष राजूरेड्डी,कामगार नेते सैय्यद अनवर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

चंद्रपूर तालुक्यात प्रदूषणाची गंभीर समस्या असून पर्यावरण संवर्धनासाठी काँग्रेस पर्यावरण विभाग तळमळीने कार्य करेल असा आशावाद शहर अध्यक्ष राजूरेड्डी यांनी व्यक्त केला

जागतिक महिला दिनानिमित्त अंजनी खुर्द येथे निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या किर्तनाचे आयोजन

0

 

लोणार प्रतिनिधी जगन पाटील

जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिना निमित्त ह.भ.प.श्री.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा हरीकिर्तन सोहळा दि. 9 मार्च 2022 रोज बुधवार ला जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंजनी खुर्द ता.लोणार जि.बुलढाणा येथे रात्री 8 ते 11 वाजेपर्यंत समाज कार्यात सदैव अग्रेसर असणारे मुळे अण्णा सोशल फाउंडेशन संभाजीनगर औरंगाबादचे संस्थापक अध्यक्ष रमेश अण्णा मुळे यांच्या सौजन्याने तसेच ह.भ.प.दामू अण्णा महाराज शिंगणे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ बुलढाणा यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे.
सदर कीर्तनाच्या कार्यक्रमाचा परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आव्हान रमेश अण्णा मुळे यांनी ५ मार्च रोजी केले आहे

गुणवत्तेच्या शिखर संस्थेतील अधिकारी-कर्मचारी नियमित पगारापासून पाच महिन्यांपासून वंचित—!

0

 

अधिकारी-कर्मचारी उपाशी,सरकार मात्र तुपाशी…..!

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.

गडचिरोली:-महाराष्ट्र शासनाच्या कला व क्रीडा विभाग अंतर्गत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आणि या मातृत्व संस्थेच्या अधिनस्त जिल्हा स्तरांवर शैक्षणिक गुणवत्ता, विविध प्रशिक्षणे,नियोजन व संशोधन,मूल्यमापन,अनुधावन,विविध आराखडे,दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्थानासाठी अविरत प्रयत्न,केंद्र प्रमुख,विषय साधनव्यक्ती यांचे सक्षमीकरणासाठी कार्यरत
असलेल्या संस्था म्हणजे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था या आहेत.
मात्र उपरोक्त महत्वाची कामे करणाऱ्या संस्थेतील अधिकारी-कर्मचारी यांच्या वर उपासमारीची पाळी येते तेव्हा शासन गुणवत्तेच्या प्रति किती संवेदनशील आहे?असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भारतीय संविधानाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कोणत्याही शाखेतील अधिकारी आणि कर्मचारी असो केलेल्या सेवेचा त्यांना योग्य मोबदला देऊन त्यांना प्रोत्साहित करणे अभिप्रेत आहे.मात्र असेही दिवस पुरोगामी महाराष्ट्रात पहायला मिळतील अशी कल्पना सुद्धा कुणी केली नसावी.
“एकच निर्धार,नियमित पगार” या मागणीसाठी सदर संस्थेतील अधिकारी-कर्मचारी राज्यस्तरावर साखळी उपोषणास बसले आहेत.परंतू अजूनही शासनाच्या संवेदना जागृत झाल्याचे चित्र दिसून आले नाही.
कुटुंबातील सदस्यांचे उदर निर्वाह,गृहकर्ज,मुलांचे संगोपन आणि शैक्षणिक खर्चाची तरतूद,विविध विमे,किराणा दुकानाची उधारी,पेट्रोल-डिझेल खर्च,गृहभाडे इत्यादी महत्वपूर्ण आणि मुलभूत गरजांची पूर्तता करावी कशी?जगावे की मरावे?अशी स्थिती निर्माण झाली आहे.
त्यामुळे शासन या महत्वपूर्ण अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या न्यायीक समस्या कधी सोडवेल?या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.