Home Blog Page 326

भाजप आमदाराने नाना पटोले यांना दिले थेट आव्हान

0

 

लातूर/निलंगा प्रतिनिधी
डी एस पिंगळे

निलंगा : हिम्मत असेल तर राज्यात नव्हे तर केळव लातूर जिल्ह्यात काॅंग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवून दाखवावी असे थेट आवाहन माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी काॅँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिले आहे.
निलंगा तालूक्यातील भाजप कार्यकर्त्यांचा काल मुंबई येथे काॅँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला. यावेळी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लातूरसह मराठवाडा भाजपा मुक्त करण्याचा पॅटर्न निर्माण करण्याचे आव्हान कार्यकर्त्यांना केले होते. एवढेच नाहीतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे जाहीर केले. पटोले यांच्या भाजप मुक्त पॅटर्न आणि स्वबळाच्या विधानावर माजी पालकमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी पलटवार केला असून नाना भाऊ तुम्ही राज्यात सोडा फक्त लातूर जिल्ह्यात तरी स्वबळावर निवडणूका लढवून दाखवा असे आव्हान केले असून भाजप आणि काँग्रेसचे नेते मंडळी आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकापूर्वी एकमेकावर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत.येणाऱ्या काळात कोण कोणावर भारी पडणार हे येणारा काळच सांगणार आहे.
पक्षांतर केलेल्या कार्यकर्त्यांनी नव्या घरी तरी सुखाने नांदावे त्यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल माझ्या शुभेच्छा आहेत. नव्या घरची सासू कडक असून नवऱ्याची भेट होणे मुश्कील होणे अवघड असल्याने संसार कसा थाटणार हे लवकरच जनतेला दिसणार असल्याची मिश्कील टिप्पणी त्यांनी यावेळी केली.राजकारणात हे तर होतच असते याला न जुमानता आपण पक्षाने दिलेली जबाबदारी व पक्षवाढ करणे हेच आमचे ध्येय आहे असे त्यानी शेवटी सांगितले.

भाजप आमदाराने काँग्रेसला दिले ‘हे’आव्हान

0

 

लातूर/निलंगा प्रतिनिधी
डी एस पिंगळे

निलंगा : हिम्मत असेल तर राज्यात नव्हे तर केळव लातूर जिल्ह्यात काॅंग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवून दाखवावी असे थेट आवाहन माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी काॅँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिले आहे.
निलंगा तालूक्यातील भाजप कार्यकर्त्यांचा काल मुंबई येथे काॅँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला. यावेळी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लातूरसह मराठवाडा भाजपा मुक्त करण्याचा पॅटर्न निर्माण करण्याचे आव्हान कार्यकर्त्यांना केले होते. एवढेच नाहीतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे जाहीर केले. पटोले यांच्या भाजप मुक्त पॅटर्न आणि स्वबळाच्या विधानावर माजी पालकमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी पलटवार केला असून नाना भाऊ तुम्ही राज्यात सोडा फक्त लातूर जिल्ह्यात तरी स्वबळावर निवडणूका लढवून दाखवा असे आव्हान केले असून भाजप आणि काँग्रेसचे नेते मंडळी आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकापूर्वी एकमेकावर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत.येणाऱ्या काळात कोण कोणावर भारी पडणार हे येणारा काळच सांगणार आहे.
पक्षांतर केलेल्या कार्यकर्त्यांनी नव्या घरी तरी सुखाने नांदावे त्यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल माझ्या शुभेच्छा आहेत. नव्या घरची सासू कडक असून नवऱ्याची भेट होणे मुश्कील होणे अवघड असल्याने संसार कसा थाटणार हे लवकरच जनतेला दिसणार असल्याची मिश्कील टिप्पणी त्यांनी यावेळी केली.राजकारणात हे तर होतच असते याला न जुमानता आपण पक्षाने दिलेली जबाबदारी व पक्षवाढ करणे हेच आमचे ध्येय आहे असे त्यानी शेवटी सांगितले.

गोपनीय माहितीच्या आधारे ८ क्विंटल ७० किलो सालई गोंद जप्त

0

 

सोनाळा वन्यजीव विभागाची कारवाई

 

वाहन सोडून चालक फरार ,चार लाख दहा हजार किमतीचा मूद्देमाल जप्त

अनिलसिंग चव्हाण
संग्रामपूर:–छूप्या मार्गाने अवैधरित्या सालई गोंदाची तस्करी करणाऱ्यावर नाकाबंदी करून वन्यजीव विभागाने कारवाई केली आहे. हि कारवाई रात्री उशिरा ३:३० वाजे दरम्यान करण्यात आली असून वाहन चालक आरोपी फरार झाला आहे. सोनाळा परिक्षेत्र अधिकाऱ्यांना संग्रामपूर तालुक्यातील करमोडा येथे चारचाकी वाहनाने सालई गोंदाची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्यापुष्ठभूमीवर वन्यजीव विभागाने मध्यरात्री नंतर नाकाबंदी करून रात्री ३:३० वाजे दरम्यान भरधाव वेगाने येत असलेल्या एम एच २७ एक्स ६७८६ क्रमांकाच्या चार चाकी वाहनाला हात देऊन थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालक वाहन न थांबवता सूसाट वेगाने धामणगाव रस्त्याने निघाला. तात्काळ वन्यजीव विभागाचे अधिकारी व कर्मचाय्रांनी भरधाव वेगाने जात असलेल्या वाहनाचा पाठलाग केला. दरम्यान धामणगाव फाट्यावर वाहन सोडून चालक पसार झाला. वन्यजीव विभागाने वाहनावर ताबा मिळवत मुद्देमाल जप्त केला. त्यामध्ये सालई गोंदाने भरलेल्या २९ गोण्या आढळून आले. या गोंदाचे एकुण वजन ८ क्विंटल ७० किलो असून १ लाख ६० हजार रुपये किंमतीचे आहे. तसेच चार चाकी वाहनाची किंमत २ लाख ५० हजार असे ऐकून ४ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सोनाळा परिक्षेत्र कार्यालयात अज्ञात आरोपीविरुद्ध वन गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर कारवाई वन्यजीवचे सोनाळा वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील वाकोडे यांच्या नेतृत्वात वनपाल जि. टी. सोळंके, वनरक्षक एम. डी. गवळी, एस. आर. गलोले, के. एच. मोरे, वनमजूर अलीम केदार, नजीर पालकर यांनी केली आहे.

सरस्वती गावाजवळील शेतात आढळला तरुणाचा मृतदेह..

0

 

 

लोणार/सतीश मुलंगे

दिनांक 4 मार्च लोणार तालुक्यातील सरस्वती या गावी कैलास आश्रुबा इंगोले वय 38 वर्षे राहणार सरस्वती हा मृतावस्थेत संजय दिनकर कराडे यांच्या शेतात आढळला.सविस्तर वृत्त असे की फिर्यादी साहेबराव इंगोले सरस्वती यांना कैलास इंगोले हे दिनकर कराडे यांच्या शेतात सकाळी सात वाजता मृतावस्थेत आढळले त्यांनी तात्काळ ही माहिती लोणार पोलीस स्टेशनला दिली ही माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे सुरज काळे,गजानन सानप,विशाल धोंडगे सोबतच उप विभागीय अधिकारी निर्मला परदेशी यांनी घटनास्थळी जाऊन तपासाला सुरुवात केली व प्रेत ताब्यात घेऊन पोस्टमार्टम साठी ग्रामीण रुग्णालय लोणार येथे पाठवले,पुढील तपास ठाणेदार प्रदीप ठाकूर यांच्या देखरेखीखाली पोलीस स्टेशन लोणार करत आहे.

रेवतकर शिवाजी महाराज वक्तृत्व स्पर्धेत प्रथम

0

 

कारंजा (घा )/प्रतिनिधी

कारंजा (घा ):-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्य साथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य द्वारा आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कारंजा येथील पियुष रेवतकर प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला .दृतीय हर्ष बागडे तर तृतीय क्रमांक सेलू येथील वैभव झाडे यांनी पटकावला .एकूण 56 स्पर्धकांनी भाग घेतला होता .स्वराज्य ,छत्रपती शिवाजी महाराज ,महाराजांच्या स्वप्नातील भारत या विषयावर स्पर्धा आयोजित केली होती .स्पर्धेचे प्रथम बक्षीस 5ooo हजार ,दृतीय 3000 हजार व तृतीय बक्षीस 2000 होते .दिनांक 5 मार्च 2022 ला स्पर्धा समन्वयक आणि संयोजन समितीचे वरून जयस्वाल यांनी आभासी पद्धतीने निकाल जाहीर केला .स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी रोहन ठाकरे ,अथर्व शिंदे यांनी सहकार्य केले .

प्रवेशद्वारावरील नावामुळे स्व.गजाननदादांचे कार्य कायम स्मरणात राहील – हभप तुकाराम महाराज

0

 

शेगाव प्रतिनिधी अर्जुन कराळे

स्व.गजाननदादा पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती “प्रवेशद्वार लोकार्पण” सोहळा
अर्जुन कराळे
शेगाव:बाजार समितीने उभारलेल्या प्रवेशद्वाराला स्व.गजाननदादा पाटील यांचे नाव दिल्याने याठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला त्याने नेहमी स्मरण होत राहील व त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळेल असे उदगार हभप तुकाराम महाराज इलोरा यांनी येथे काढले.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्व गजाननदादा पाटील प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा 3 मार्च रोजी
हभप तुकाराम महाराज यांचे शुभहस्ते फित कापून व नामफलकाचे अनावरनाने पार पडला.या कार्यक्रमाला सहकार नेते पांडुरंगदादा पाटील,काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रकाशबापू देशमुख,दयारामभाऊ वानखडे,माजी नगराध्यक्ष साहेबराव कलोरे,अरुण चांडक,काँग्रेसचे प्रदेश सचिव रामविजय बुरुंगले, खामगाव विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस पक्षनेते ज्ञानेश्वरदादा पाटील,शेगाव चे माजी नगराध्यक्ष अभयसिंह मोहता,शैलेंद्रदादा पाटील,शिवसेनेचे रमेश पाटील,खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष रघुनाथ भांबेरे,युवराज देशमुख,वंचितचे शहराध्यक्ष राजेंद्र शेगोकार,हमीद सेठ ,विठ्ठल गजाननदादा पाटील,व्यापारी असोसिएशन अध्यक्ष संजयसेठ टीबडेवाल, पं स चे बीडीओ सतीश देशमुख, सहाय्यक बिडीओ चव्हाण, यांच्यासह बाजार समितीचे सभापती शेषराव पहूरकार, उपसभापती पुंडलिक भिवटे,आदींची प्रमुख उपस्थिती होती.
हभप तुकाराम महाराज व मान्यवरांचे हस्ते श्रीं चे प्रतिमपूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.प्रास्तविकात बाजार समितीचे कार्याचा थोडक्यात आढावा सचिव विलासराव पुंडकर यांनी सांगितला.यावेळी अरुण चांडक,दयारामभाऊ वानखडे,प्रकाशबापू देशमुख, व ज्ञानेश्वरदादा पाटील यांनी स्व.गजाननदादाच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमाला बाजार समितीचे संचालक श्रीधरराव उन्हाळे,निलेश राठी,रामरतन पुंडकर,सुरेश पाटील कराळे,संचालिका सौ नंदाताई रमेश पाटील,श्रीमती पंचफुलाबाई जवंजाळ,खरेदी विक्री संघाचे संचालक,शेगाव शहर व तालुक्यातील शेतकरी बांधव ,अडते व्यापारी,हमाल मापारी,परिसरातील कृषी केंद्राचे संचालक आणि व्यवसायिक तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मंडळी,प्रतिष्ठित नागरिक,खरेदी विक्रीचे व्यवस्थापक मनोहर ताठे, कर्मचारी प्रदीप ताथोड बाजार समिती कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काँग्रेस शहराध्यक्ष किरणबापू देशमुख यांनी तर आभारप्रदर्शन बाजार समितीचे संचालक श्रीधर पांडुरंग पाटील यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाजार समितीचे सचिव विलास पुंडकर,लेखापाल विनोद पुंडकर, कुळकर्णीभाऊ व अन्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

अखेर चुंचाळे विकासोच्या निवडणूकीचा बिगुल वाजला ३ एप्रिल ला होणार निवडणूक

0

 

यावल तालुका (प्रतिनिधी)
विकी वानखेडे

 

तालुक्यातील चुंचाळे येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी या संस्थेची सन २०२१/२२ ते २०२६/२७ या कालावधीसाठी पंचवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झालेला असून दि.३ एप्रिल २०२२ रोजी मतदान होणार आहे. मागील वर्षी कोरोना महामारीचा संसर्ग पाहता प्रतिबंधक उपाययोजना म्हणून निवडणूक कार्यक्रम न घेता मागील कार्यकारिणीला संबंधित विभागाकडून वाढीव कालावधी देण्यात आलेला होता.त्यामुळे निवडणूक लांबणीवर पडली होती. दि २ मार्च २०२२ पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली असून तेरा जागांसाठी निवडणूक होणार आहे या संस्थेच्या निवडणुकीकडे सर्वांची लक्ष वेधले गेले आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणुका समिती नियम २०१४ चा (नियम १९)प्रमाणे राज्य सहकारी निवडणुक प्रधिकरण व जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांच्याकडून विविध टप्प्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. त्यानुसार दि.२ ते ८ मार्च २०२२ पर्यंत उमेदवारी दाखल करता येणार आहे तर दि.९ मार्च २०२२ रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. दि. १० मार्च २०२२ रोजी छाननी झालेल्या उमेदवारी अर्जांची अंतिम यादी जाहीर होणार आहे.त्याचप्रमाणे दि.१०/३/२०२२ ते दि. २४ मार्च २०२२ पर्यंत उमेदवारी अर्ज माघारीची मुदत आहे त्यानंतर दि.२५ मार्च २०२२ रोजी चिन्ह वाटप करण्यात येणार आहे.यानंतर
दि.३ एप्रिल २०२२ रोजी मतदान होऊन लागलीच मतमोजणी होणार आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्धी पर्यंतचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक कार्यालय (यावल) येथे होणार आहे तर उर्वरित कार्यक्रमाच्या ठिकाणाबाबत नंतर जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी २९७ सभासद मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम.बी.गाढे(सहकार अधिकारी) हे कामकाज पाहणार आहेत.
सदर निवडणूक ही १३ जागांसाठी होणार असून यात कर्जदार खातेदार प्रतिनिधी मतदारसंघ आठ ,महिला राखीव दोन , इमाव राखीव एक ,अनुसूचित जाती- जमाती राखीव एक तर विजा/भज व विमाप्र राखीव एक यानुसार उमेदवार निवडणूक रिंगणात असणार आहे.
गेल्या कार्यकाळात या संस्थेवर शेतकरी पॅनलची सत्ता होती व त्यावेळीही निवडणुकी अगोदर बिनविरोध होण्यासाठी गावातून मोठे प्रयत्न झालेले होते.मात्र दुदैवाने त्या प्रयत्नांना अपयश आले होते.आता ही निवडणूक ही प्रत्यक्षात होणार की बिनविरोध होणार हे काळवेळ ठरवणार आहे तथापि संस्थेचे हित पाहता व गाव राजकीय मतभेदांपासून दुर रहावे व गावात ऐकोपा नांदवा याकरता यंदाची निवडणुकही बिनविरोध होण्याची नितांत गरज आहे.अशी गावात चर्चा आहे

ग्रामविकासातून राष्ट्राचा विकास साध्य होईल’ – आमदार दादाराव केचे 

0

 

नितिन मनवर आर्वी

आमदार दादाराव केचे यांच्या हस्ते नेरी मिर्झापुर येथे विकासात्मक कामांचे भूमिपूजन संपन्न 

आर्वी तालुक्यातील नेरी मिर्झापुर येथे आमदार दादाराव केचे यांनी
महीला बचत गटाच्या उद्योगा करीता उद्योग भवन बांधकाम किंमत १४,८०,३६७ रूपये व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत बौद्ध विहार किंमत १० लक्ष रुपये या कामांचे भूमिपूजने केली.

आमदार दादाराव केचे यांनी मार्गदर्शन करते वेळी सांगितले की, नेरी मिर्झापुर ग्रामपंचायतचा नाविन्यपूर्ण विकास कामे करण्यात आघाडीवर आहे याची प्रचिती वेळोवेळी आली आहे. महिलांचे सक्षमीकरणासाठी बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेले उत्पादनाची प्रदर्शनी तथा विक्री करण्यासाठी महिला उद्योग भवन निश्चितच उपयोगी ठरेल. त्यामुळे महिलांच्या गृहउद्योकांना चालना मिळेल. यातून महिलांचे सक्षमीकरण घडेल असा आशावाद व्यक्त केला. तसेच बौद्ध विहारामुळे बौद्ध धर्मियांच्या अनुयायांना धार्मिक व सामाजिक कार्य करण्यासाठी उपयुक्त ठरेल.

यावेळी विनय डोळे, सचिंन्द्र उर्फ राजूभाऊ कदम, धर्मेंद्र राऊत, अशोकबाबू भट्टड, अशोक तुमडाम, माजी सरपंच पदमाताई मुंद्रे, बाळाभाऊ सोनटक्के, राजाभाऊ वानखेडे, रविन्द्र शिरभाते, निलेश देशमुख, अफसर खान, दत्तुजी लवनकर, सुधीर जाधव, रामू निघोट, रंगरावजी वाळके, त्रिशूल काळपांडे, नरेंद्र कोल्हे, प्रशांत कडू, बाबाराव जाधव, बाबारावजी नागदेवते, सुधीर जाधव, आशिष पाटील, विशाल अरसड, बंटी कोल्हे, मनीषभाऊ उभाड, उकंडराव भांगे, सविता कठाणे, लता दांडेकर, वैशाली सोनटक्के, जोती नासरे, विजया काळपांडे, शोभा वाटकर, शुभांगी तुमस्कर, सिमा तुमस्कर, शशिकला सोनटक्के, जयश्री भांगे, कल्पना कठाणे, ग्रामपंचायत कर्मचारी शामराव अट्टेल, प्रल्हाद ठाकरे, पद्माकर बनसोड, लीलाधर काळकर, सागर ठाकरे, निखिल खोंडे, रोशन राऊत यांच्यासह महिला व पुरुषांची लक्षणीय उपस्थिती होती.

घुग्घुस येथील प्रा.आ.केंद्रात मधुमेहाच्या गोळ्या तत्काळ उपलब्ध करून द्या

0

 

घुग्घुस प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा सौ. किरणताई बोढे यांची मागणी

( चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील तीन महिन्यापासून मधुमेहाच्या गोळ्या उपलब्ध नाही ही समस्या लक्षात घेत घुग्घुस प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा सौ. किरणताई बोढे यांनी शिष्टमंडळासह प्रा. आ. केंद्रात जाऊन वैद्यकीय अधिकऱ्यांची भेट घेतली व या संदर्भात चर्चा केली तसेच निवेदन देऊन प्रा.आ.केंद्रात तत्काळ मधुमेहाच्या गोळ्या उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
घुग्घुस हे औद्योगिक शहर असल्याने या शहराची लोकसंख्या पन्नास हजारांच्या जवळपास आहे तसेच घुग्घुस येथील प्रा.आ. केंद्रास परिसरातील पंधरा गावे जोडलेली आहे त्यामुळे दररोज मोठया संख्येत गोर गरीब मधुमेहाचे रुग्ण प्रा. आ. केंद्रात तपासणी करिता येतात परंतु या केंद्रात मधुमेहाच्या गोळ्या उपलब्ध नसल्याने येणाऱ्या गोर गरीब रुग्णांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे मधुमेहाच्या रुग्णांना दररोज मधुमेहाच्या गोळ्यांचे सेवन करावे लागते त्यामुळे घुग्घुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तत्काळ मधुमेहाच्या गोळ्या उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देतांना घुग्घुस प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा सौ. किरणताई बोढे, माजी जि.प. सभापती नितु चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्य पूजा दुर्गम, सुचिता लुटे, वैशाली ढवस, लक्ष्मी नलभोगा, पुष्पा रामटेके, वंदना मुळेवार, विना घोरपडे, वंदना गणफाडे, अर्चना लेंडे, नंदा चिमुरकर, अनिता परचाके, कांचन डांगे, सुनीता पाटील, सुनीता घिवे, दुर्गा जुमनाके, प्रतिमा बहादे, अंकिता बहादे, सुनंदा लिहीतकर व लता आवारी उपस्थित होत्या.

राष्ट्रवादी आणि भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

0

लातुर/निलंगा प्रतिनिधी
डी. एस. पिंगळे

आज गांधी भवन मुंबई येथे निलंगा मतदार संघाचे नेते तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मा.श्री. अशोकरावजी पाटील निलंगेकर साहेब या नेतृत्वाला प्रेरित होऊन निलंगा पंचायत समितीचे माजी सभापती श्री.अजित माने , माजी नगराध्यक्ष श्री.हमीद शेख ,श्री विलास लोभे, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चक्रधर शेळके, भाजपच्या महिला सरचिटणीस सौ. स्वाती जाधव व राष्ट्रवादी आणि भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला, यावेळी मा.श्री.नानाभाऊ पटोले (प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी)मा.ना.श्री.अमित विलासराव देशमुख(पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री),मा.ना.श्री.सूनिलजी केदार(पशु संवर्धन मंत्री महाराष्ट्र राज्य) मा.श्री.अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर(सरचिटणीस,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी),मा.श्री.धीरज विलासराव देशमुख(आमदार,लातूर ग्रामीण), श्रीशैल्य उटगे आदी मान्यवर उपस्थित होते