Home Blog Page 327

तालुक्यातील हबर्डी येथील नबाब सूपडू तडवी यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले.

0

 

यावल – प्रतिनिधी विकी वानखेडे

 

पंचायत यावल पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एच. एन. तडवी यांचे वडील व पंचायत समितीचे ग्रामसेवक राजू अन्‍वर तडवी ग्रामसेवक यांचे आजोबा नबाब सुपडू तडवी (वय-७५) वर्ष यांचे वृद्धपकाळाने ४ मार्च रोजी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा हंबर्डी तालुका यावल येथून त्यांच्या राहत्या घरापासुन दुपारी २ वाजता निघणार आहे. त्यांच्या मृत्यु पश्चात एक मुलगा, सुन, चार मुली, नातवंडे जावाई असा परिवार आहे.

फैजपूर रस्त्यावर सांगवी जवळील पेट्रोल पंप जवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

फैजपूर रस्त्यावर सांगवी जवळील पेट्रोल जवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असुन दोघांवरयावल ग्रामिण रूग्णालयात प्रथम उपचार करून त्यांना जळगाव हलविण्यात आले आहे

यावल – फैजपूर रस्त्यावर सांगवी जवळ पेट्रोल पंप आहे या पंपा जवळ गुरूवारी दुपारी दोन वाजेला दुचाकी क्रमांक एम. एच. 15 बी. बी. 88 33 द्वारे छोटू एकलोसिंग बारेला वय 32 रा. रावेर हा यावल कडून फैजपूर कडे जात होता तर दुचाकी क्रमांक एम. एच. 39 एक्स. 0576 द्वारे अब्दुल हफिस अब्दुल हमीद वय 45 रा.मन्यार गली चोपडा हे फैजपूर कडून यावल कडे येत होते दरम्यान दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली या दोघे गंभीर जखमी झाले.

घटनास्थळावरून मार्गस्थ होणार साकळी येथील मेश इंडस्ट्रीचे मालक युनूस मन्सुरी व त्याचे मित्र मंडळींनी तातडीने दोघा गंभीर जखमींना उपचाराकरिता यावल ग्रामिण रूग्णालयात दाखल केले रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.बी. बारेला, अधिपरीचारिका दिपाली किरंगे, शुभम पाटील, अमोल अडकमोल, सोनाली देशमुख, मानसी उंबरकर,मुराद तडवी,निरज झोपे,बापू महाजन, दुर्गेश पाटील, फारूक तडवी,प्रविण बारी आदींनी प्रथमोपचार केले यातील अब्दुल हाफिज यांची प्रकृती जास्तच गंभीर असल्याने त्यांना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच फैजपुर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या सूचनेवरून घटनास्थळावर हवालदार देविदास सुरदास, राजेश बऱ्हाटे, पोलीस नाईक महेंद्र महाजन यांनी भेट दिली दोघं वाहने त्यांनी ताब्यात घेतले असून घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील कारवाई पोलिस करीत आहे.

स्वतः सक्षम होऊन इतरांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करा–प्राचार्य डॉ.विनित मत्ते यांचे प्रशिक्षणात प्रतिपादन.

0

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक

गडचिरोली:-जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीच्या वतीने शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण दोन दिवसीय जिल्हास्तर प्रशिक्षण,स्थळ:-DIET GADCHIROLI येथे दिनांक:-३ व ४ मार्च-२०२२ ला जिल्हास्तर सुलभक ज्ञानेश्वर कापगते(अहेरी) व विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते(चामोर्शी) यांचे मार्गदर्शनात घेण्यात येत आहे.
प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी शाळा व्यवस्थापन समितची रचना,गुणवत्तापूर्ण शिक्षण व शाळा व्यवस्थापन समिती,बालकांचे हक्क व सुरक्षितता,निपुण भारत अभियान या विषयावर सविस्तर माहिती देण्यात आली.
प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीचे प्राचार्य डॉ विनित मत्ते हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अधिव्याख्याता पुनित मातकर,प्रशिक्षणाचे सुलभक ज्ञानेश्वर कापगते व चांगदेव सोरते हे होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश गिरडकर यांनी केले.
SMC ची कर्तव्य व जबाबदारी मध्ये शाळांच्या कामकाजावर संनियंत्रण,शासकिय योजनांची प्रभावी अंमलबजावणी,मुख्याध्यापक रजा व दिर्घ रजा शिफारस.पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सहाय्य करणे या मार्गदर्शन केले.
शाळा ही समाजाने निर्माण केलेले संस्कार केंद्र आहे.गावचे शाळेशी जिव्हाळ्याचे संबंध असतात.अनेक पिढ्यांना घडवणारी व सतत नवनवीन प्रयोग करणारी शाळा ही गावासाठी भूषण असते.तर शालेय विकासासाठी तत्पर असणारी शाळा व्यवस्थापन समिती ही शाळेसाठी खूप मोठा आधार असतो.शालेय गुणवत्ता वाढवणे आणि टिकवणे ही जबाबदारी शाळेतील सर्व घटकांची असते तसेच शाळा व्यवस्थापन समितीची सुद्धा आहे.

शिक्षणाला धार्मिक रंग देऊ नका

0

 

कारंजा( घा )/प्रतिनिधी :-पियुष रेवतकर

कारंजा (घा ):-शिक्षण संस्थांना व शिक्षणाला धार्मिक रंग देऊन विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये ,अशी मागणी संभाजी ब्रिगेड कारंजा तालुका कमिटीच्यावतीने करण्यात आली .कर्नाटकातील घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला .कारंजा शहरातील शासकीय विश्रामगृह कार्यालयात पार पडलेल्या बैठकीला संभाजी ब्रिगेड चे स्थानीय नेते पियुष रेवतकर ,गौरव ढोले ,नितीन पाठे ,संभाजी ब्रिगेड कारंजा शहराध्यक्ष उमा राऊत ,सचिव गीता कळस्कर ,भाग्यश्री भगत ,मंजू मांडोकार व इतर संभाजी ब्रिगेड चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .शिक्षणाला धार्मिक रंग देऊ नका ,शिक्षणाचा कोणता धर्म नसतो ,कर्नाटकात घडलेल्या घटनेला संभाजी ब्रिगेड चा जाहीर विरोध आहे असे मत संभाजी ब्रिगेड चे स्थानीय नेते पियुष रेवतकर यांनी व्यक्त केले .या बैठकीला इतरही विषयावर चर्चा करण्यात आली .

गळफास घेत संपविले जीवन

0

 

कारंजा( घा )/प्रतिनिधी :-पियुष रेवतकर .

कारंजा (घाडगे ):तालुक्यातील मोर्शी येथील 30 वर्षीय व्यक्तीने गळफास घेत आत्महत्या केली .ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली .छत्रपती देविदास खवशी असे मृत व्यक्तीचे नाव आहे .छत्रपती खवशी हा मागील बारा वर्षांपासून नागपूर येथे पत्नी व तीन मुलांसह राहत होता .घर बांधकामाचे काम करणारा छत्रपती हा अधूनमधून आपल्या मोर्शी या मूळ गावी यायचा .नुकताच त्याने नागपूर येथे एक भूखंड खरेदी केला .याच भूखंडाचे पैसे जुळत नसल्याने मागील काही दिवसांपासून तो विवंचनेत होता .अशातच मोर्शी येथे आलेल्या छत्रपती ने नारा मार्गावरील एआरसी पब्लिक स्कूल जवळ झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली .याप्रकरणी कारंजा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून ,पुढील तपास सुरू आहे .

किराणा दुकानात वाइन विक्रीला विरोध (गुरुदेव सेवा मंडळाचे तहसीलदारांना निवेदन)

0

 

कारंजा घाडगे /प्रतिनिधी :-पियुष रेवतकर

कारंजा :-अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, कारंजा (घाडगे) च्या वतीने सोमवारी कारंजा (घा) तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले. शेतकरी हिताचे कारण पुढे करून राज्याचा महसूल वाढवा म्हणून सुपर मार्केट व किराणा दुकानात वाईन विक्रीच्या घेतलेल्या निर्णया विरोधात गुरुदेव सेवकांनी रोष व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेव्श्वर महाराज अशा विविध संतांनी समाज निर्व्यसनी व्हावा यासाठी हाल अपेष्ठा सहन करून अभंग व किर्तनातून समाज प्रबोधन केले. तेव्हा महाराष्ट्र राज्याला व्यसन मुक्त राज्य करण्यासाठी तरुणांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी विविध योजना व कार्यक्रम आखणे अपेक्षित होते. पण असे काहीही न करता या उलट शासनाचा महसूल वाढवण्याच्या हेतूने व काही वाईनरीज मालकाच्या हिताच्या दृष्टीने शेतकरी हिताचे कारण पुढे करून १०० चौ.फुटाचे सुपर मार्केट व किराणा दुकानात वाईन (मराठी अर्थ ‘दारू’) विक्रीचा निर्णय महाराष्ट्र मंत्री मंडळाने (बैठक क्रमांक ९८) दिनांक २७ जानेवारी २०२२ ला घेतलेला आहे.
सदर निर्णयामुळे रोजगार मागणाऱ्या वैफल्य ग्रस्त तरुणाच्या हातात वाईन (मराठी अर्थ ‘दारू’) सहजरीत्या उपलब्ध करून दिल्या जाईल. ज्यामुळे समाजात गुंडप्रवृत्ती वाढून अराजकता निर्माण होईल. या निर्णयामुळे शहर व ग्रामीण भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढून कायदा – सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते. त्यामुळे अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, कारंजा (घाडगे) च्या वतीने किराणा दुकान व सुपर मार्केट मध्ये वाईन (मराठी अर्थ ‘दारू’) विक्रीला मंत्रिमंडळाने दिलेले मंजुरी तत्काळ थांबवावी, अशी विंनती करण्यात आली आहे. सदरचा निर्णय परत न घेतल्यास जन आंदोलन करण्यात येईल असा, इशारा या निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना तहसीलदार मार्फत देण्यात आलेला आहे.
यावेळी तालुका सेवाधिकारी बाबाराव बारई,माजी ग्रामसेवाधिकारी जानराव लोखंडे, भीमराव बाळापुरे, देविदास चौधरी,रविकांत गाडरे, सागर बारई, अमर जसुतकर, अझहर शेख, दर्शन जाधव, प्रिया काळे, नंदा जसुतकर, ज्योती यावले, प्रज्ञा ढोले उपस्थित होते.

वाचनसंस्कृती टिकवण्यासाठी जेसिआय अमरावती गोल्डन प्रिन्सेस चे कौतुक – मा. एकनाथ आव्हाड

0

 

उषा पानसरे असदपूर मू.का. सपादक मो.992140042

दिनांक 3 मार्च

दिनांक २७ फेबुवारी रोजी जेसिआय अमरावती गोल्डन प्रिन्सेस व कैवल्य एज्युकेशन फौंडेशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने शब्द गंगा आपल्या घरी …लेखक आपल्या दारी व राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. शब्द गंगा आपल्या दारी या कार्यक्रमाला सकाळी १०. ३० वाजता सुरवात झाली या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मा.एकनाथ आढाव ,सुप्रसिद्ध लेखक, कवी मुंबई यांना आमंत्रित करण्यात होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन जेसी.सपना विधळे यांनी केले.जेसी. मा. दीपाली बाभुळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मा. एकनाथ अढाव सरांची मुलाखत जेसी. मा. सपना विधळे यांनी सुरवात केली. त्यांचे बालपण कसे राहिले? त्यांच्या बालपणातील काही आठवणीना उजाळा देत केली, लेखनाचे वेड कसे लागले? त्यांनी लिहिलेली पुस्तके,कविता , त्याना मिळालेले पुरस्कार इत्यादी वर प्रकाश टाकत बहारदार चर्चा घडवून आणली. त्यांची भाषेवर असणारी पकड व अनुभवाचे बोल त्यांच्या मुलाखतीतून दिसत होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जेसी. डाॅ. स्वाती टोंगळे यांनी केले.

महापुरुषांचे विचार आत्मसात करून गुण्यागोविंदाने रहावे – भाजपा प्रदेश प्रवक्ते विनोद भाऊ वाघ

0

 

लोणार/जगन पाटील

लोणार तालुक्यातील शिंदी या गावी मागील काही वर्षापासून दोन समाजातील जातीय तेढ निर्माण झाली होती त्यामध्ये अधुन मधून दोन समाजांमधील वाद नेहमीच होत असत 2009 पासून या वादाची ठिणगी पडली होती गावाच्या मध्यभागी असलेली सहा गुंठे जागा या वादाचा प्रमुख मुद्दा आहे या सहा गुंठे जागा वर जागेवर महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी सदरील जागाही महामानवांच्या स्मारकासाठी आरक्षित करून ठेवली होती परंतु गावातील मराठा समाजाने यावर आक्षेप घेतला आणि सदरील जागा ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी आहे या दोन वेगवेगळ्या विचार प्रवाहातून सदरील दोन समाजातील वाद हा पेटला होता या वादाच्या पोलीस स्टेशन ते न्यायालय असा या वादाचा प्रवास पूर्ण झालेला असतानाही हा वाद मिटवण्याचे नाव घेत नव्हता‌.
शेवटी दोन्ही समाजातील नेत्यांनी हा वाद सामंजस्याने मिटवण्यासाठी गावकऱ्यांना सोबत घेऊन गाव विकासासाठी व हितासाठी दोन जाती मधला वाद हा योग्य नाही त्या अनुषंगाने या वादावर तोडगा काढण्यासाठी पोलिस प्रशासन नेतेमंडळी पंचायत समिती या सर्वांच्या पुढाकाराने हा वाद मिटविण्यात आला व शेवटी 70 टक्के जागा ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी तर उर्वरित 30 टक्के जागा ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी अशी विभागणी केली गेली गावकऱ्यांच्या दृष्टीने हा वाद संपविण्यात आला.दोन महापुरुषांच्या स्मारकासाठी वाद न घालता त्यांचे विचार आत्मसात करून गुण्यागोविंदाने राहून गावाचा विकास करावा.
हा वाद मिटवीसाठी प्रमुख्याने भाजपा प्रदेश प्रवक्ते विनोद भाऊ वाघ,शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.बळीरामजी मापारी,कृषी उत्पन्न बाजार �

नवाब नव्हे, हा तर दाऊदचा गुलाम; त्याला वाचवण्यासाठी ठाकरे सरकारवर दबाव..संभाजीराव पाटील निलंगेकर

0

 

लातूर /निलंगा प्रतिनिधी
डी. एस. पिंगळे

महाराष्ट्रातील ठाकरे सरकारमध्ये नवाबाचा मुखवटा घेऊन वावरणारा मलिक नावाचा मंत्री प्रत्यक्षात मात्र, कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी आणि देशद्रोही दाऊद इब्राहीमचा गुलाम आहे.
ईडीच्या आरोपपत्रातंतून हे आता स्पष्ट होत असतानाही संपूर्ण ठाकरे सरकार त्या मंत्र्याच्या सरबराईसाठी जीव तोडून सज्ज झाले आहे. देशद्रोही दाऊदच्या हस्तकाची पाठराखण करणारे ठाकरे सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या जिवाशी खेळत असून दाऊदच्या हातचे बाहुले झाले आहे, अशी टीका माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केली.
लातूर येथे पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. निलंगेकर म्हणाले, सत्तेच्या सुरक्षेसाठी जनतेच्या सुरक्षेला मूठमाती देण्याचा खेळ ठाकरे सरकारने ताबडतोब थांबवावा आणि दाऊदचा हस्तक नवाब मलिकची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून महाराष्ट्र वाचवावा. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता म्हणून मिरविणाऱ्या नवाब मलिक याचा खरा चेहरा आता ईडीच्या कारवाईनंतर समोर येऊ लागला असून तपासानंतर आणखीही अनेक कारवाया उजेडात येण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रासह संपूर्ण देश अस्थिर करण्यासाठीच दाऊद इब्राहीमने बॉम्बस्फोट घडविले होते. या कटाच्या अंमलबजावणीकरिता स्थानिक पातळीवर पैसा उभा करण्याच्या योजनेचाच एक भाग म्हणून बेनामी मालमत्ता मातीमोल भावाने विकत घेऊन मोठ्या प्रमाणावर काळा पैसा गोळा करण्याचे षडयंत्र आता उघडकीस येऊ लागले आहे. नवाब मलिकने केलेला व्यवहार हा त्या षडयंत्राचाच एक भाग होता, हे ईडीच्या आरोपावरून स्पष्ट होत असून पुढील तपासात आणखीही काही बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
असे असतानाही, नवाब मलिक याचे मंत्रिपद वाचविण्यासाठी खुद्द शरद पवारच ठाकरे सरकारवर दबाव आणत असून मुख्यमंत्रीपद वाचविण्यासाठी उद्धव ठाकरे या दबावापुढे झुकून दाऊदच्या या हस्तकास संरक्षण देत आहेत, असा आरोपही निलंगेकर यांनी केला. संपूर्ण ठाकरे सरकारच दाऊदचे गुलाम झाले आहे काय, असा सवाल करतांनाच महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सुरक्षिततेस धोका ठरणाऱ्या नवाब मलिकची केवळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणे पुरेसे नाही, तर या कामी ईडीकडून केल्या जाणाऱ्या तपासातही ठाकरे सरकारने संपूर्ण सहकार्य केले पाहिजे, असेही निलंगकेर म्हणाले.
नवाब मलिक यास वाचविण्याकरिता आणि सत्ता टिकविण्याकरिता आपण महाराष्ट्राचा अपमान करत असून देशद्रोह्याची तरफदारी करत आहोत, याची ठाकरे सरकारला जाणीव नसावी हे दुर्दैवी आहे. आघाडी सरकारच्या या लाळघोटेपणामुळेच महाराष्ट्राची नामुष्की होत असून, मुख्यमंत्री ठाकरे यांच्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र कणाहीन नाही, हे दाखविण्यासाठी भाजपतर्फे तीव्र आंदोलन पुकारले गेले आहे. नवाब मलिक यांची हकालपट्टी आणि कठोर कारवाई करून दहशतवादास हातभार लावणाऱ्या देशद्रोह्याच्या पाठीराख्यांची महाराष्ट्र गय करणार नाही. दाऊदच्या गुलामाचे गुलाम होण्याएवजी जनतेच्या मनातील नवाब व्हा, असा सल्लाही निलंगेकर यांनी ठाकरे सरकारला दिला.

हणमंतवाडी मुगाव येथे हमी भावाने हरभरा खरेदीचा शुभारंभ.. !

0

 

लातुर/निलंगा प्रतिनिधी
डी. एस. पिंगळे

निलंगा तालुक्यातील हणमंतवाडी मुगाव येथील रानबण ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या वतीने शासनाने हरभऱ्याला ठरवून दिलेल्या 5230 प्रमाणे हरभरा खरेदीचा शुभारंभ पत्रकार राजकुमार सोनी निटुरकर यांच्या हस्ते दि. 1 मार्च 2022 रोजी पहिल्या पोत्याचे पुजन करून व नारळ फोडून करण्यात आले. तसेच या कार्यक्रमात रानबन ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन दासराव पाटील यांच्यासह नाफेड च्या अधिकाऱ्यांनी ऑनलाईन सहभाग घेतला होता. रानबन कंपनीकडे हरभरा विक्रीसाठी अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाईन केले असून ऑनलाईन केलेल्या अनुक्रमे शेतकऱ्यांकडून हरभरा खरेदी केला जाणार आहे. निटूर परिसर व निलंगा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम रानबन कंपनी ने केले असून या हमीभाव खरेदी केंद्राचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.

यावेळी कुमार पाटील, सोनेराव जाधव, विठ्ठल मोगरगे, संदिपान कावळे, युवराज पाटील, प्रताप झरे, दिगंबर सावंत, महमद गस्ते, सिध्देश्वर सोमवंशी, विजय जाधव, खुदबुदिन शेख, विठ्ठल कावळे, हणमंत माने, दत्ता शिरमाळे, तुकाराम घारोळे, हंसराज पाटील, शाहुराज पाटील, योगेश कावळे, व्यंकट कावळे, उमाकांत देशमुख, हणमंत पाटील, विठ्ठल जाधव, रामकिशन जाधव, तुकाराम बोरोळे व पत्रकार नामदेव तेलंगे, माधवराव शिंदे, रमेश शिंदे, रविकिरण सुर्यवंशी आदीसह मसलगा, मुगाव, हणमंतवाडी, आंबेगाव, अंबुलगा मेन, गौर, ताजपुर, शेंद व निटुर येथील हरभरा उत्पादक शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.