Home Blog Page 328

राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांनी केली समीरच्या शस्त्रक्रियेस 14 लाखाची मदत

0

 

प्रहार रुग्ण सेवा समिती, मुंबई आली धाऊन,उमेश खापरे यांचा पुढाकार.

कारंजा( घा) :-प्रतिनिधी :पियुष रेवतकर.

कारंजा: तालुक्यातील परसोडी येथील मोलमजुरी करून आपल्या परिवाराचा गाडा चालविणारे नामदेव कामडी यांचा मुलगा समीर ४ ते ५ वर्षांपासून मणक्याच्या आजाराने त्रस्त होता त्यास नागपूर येथे उपचारार्थ भर्ती केले असता डॉक्टरांनी ९ ते १० लाख रुपये खर्च सांगितला परंतू येवढा मोठा पैसा कुठून आणणार. त्यावेळी त्यांना कोणत्याही योजनेची माहिती नव्हती किंवा कोणी सांगितली नाही आणि तो कोणत्याही योजनेत बसत नव्हता करीता समीरला गावी परत आणण्यात आले.
परंतु समीरला या आजाराचा खूपच त्रास वाढला, ही बाब गावातील माजी सरपंच श्री. दशरथजी पठाडे यांना माहीत पडताच त्यांनी प्रहारचे उमेश खापरे (प्रहार अपंग क्रांती आंदोलन, उपाध्यक्ष वर्धा जिल्हा) यांच्या कानावर टाकली उमेश खापरे यांनी लगेच बच्चुभाऊ कडू यांचेशी संपर्क साधून वरील बाब सांगितली भाऊंनी लगेच मुंबईला जा मी सर्व बघतो असे सांगितले. समीरला मुंबई येथील नामांकित कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल मध्ये भरती करुन समिरवर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या त्याचा खर्च १४ लाख रुपये आला असून संपूर्ण शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली.
समिरकरीता प्रहार रुग्ण कल्याण समिती मुंबई महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. प्रतापभाऊ तायडे तसेच गोपालभाऊ सुळे, वैभव कर्डीकर, उमेश खापरे हे धाऊन आले.
राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू तसेच प्रहार रुग्ण कल्याण समिती मुंबई हे देवाच्या रुपात येऊन माझा मुलगा समीर कामडी वय १८ वर्ष यास पाठीच्या मणक्याच्या आजार होता आजारावरील उपचाराचा खर्च लाखोच्या घरात असल्यामुळे जो मला कधीच शक्य झाला नसता पण ते बच्चुभाऊ कडु मुळे
शक्य झाले उपचारासाठी प्रहार रुग्ण कल्याण समिती मुंबई अध्यक्ष मा. प्रतापभाऊ तायडे आणि गोपाळभाऊ सुळे, वैभव कर्डीकर, उमेश खापरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

राजकीय नेत्यांच्या चमकोगिरीत चिमुकल्याचा जीव धोक्यात ?

0

 

प्लस पोलिओ राबविणाऱ्यावर कारवाईची मागणी

(घुग्घुस प्रतिनिधी)
रमेश सुध्दाला

घुग्घुस: शहरात नगरपरिषद निवडणुकीचे पडघम वाजले आहे.
निवडणूकिचा लाभ घेण्यासाठी राजकिय पक्षाचे नेते वेगवेगळ्या युक्त्या लढवीत आहे.
अश्यातच गेल्या काही महिन्यांपासून एका विशिष्ट राजकीय पक्षाचे नेते हे शासकीय योजना अथवा खाजगी उद्योग किंवा त्यांच्या माध्यमातून होत असलेल्या कामाचा श्रेय घेण्यासाठी तळफळत असल्याचे दिसून येत आहे.
घुग्गूस नगरपरिषदेत आग लागली असतांना प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या हातातून पाण्याचा बंब घेवून हे स्वतःच चमकोगिरी करत असल्याचे दिसले होते.
परत त्या घटनेची पुनरावृत्ती वेकोली वसाहतीत लागलेल्या आगीत यांनी केले.
आता तर हद्दच झाली प्लस पोलियो अभियानात वैद्यकीय अधिकारी परिचारिका यांच्या कडून पोलियो ड्रॉप घेऊन लहान – लहान मुलांना कुठल्याही प्रकारे मास्क अथवा सुरक्षितपणा न बाळगता यांनी आपली चमकोगिरी दाखवून चिमुकल्याच्या जीवाशी खेळ केला आहे.
यांच्या राजकिय चमकोगिरीत सहकार्य करणाऱ्या परिचारिका व सहकार्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांत तर्फे होत आहे.

घुग्घुस रेल्वे क्रॉसिंग येथे बांधकाम सुरू असलेल्या नवीन पुलीया जवळ दोन सुरक्षा रक्षक नियुक्त करा

0

 

यंग चांदा ब्रिगेड तर्फे प्रेम गंगाधरे यांची मागणी

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आर .के. कन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे घुग्गुस येथे रेल्वे क्रॉसिंग जवळ फुलीयाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याने तेथील अवागमन करणाऱ्या नागरिकांना व वाहतूककिना नाहक त्रास सहन करावा लागत आहे व वारंवार वाहतूक कळंबोली जाते. तसेच वाहतुकीमुळे या ठिकाणी अपघात सुद्धा गळत आहे.

 

व बांधकाम करण्याचे मटेरियल सुद्धा खूप जास्त प्रमाणात येत असून. त्याची पाहणी करण्याकरिता सिक्युरिटी गार्ड नसल्याने ट्रॅफिक जाम निर्माण होत आहे. नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आपण आर. के. कंपनी कन्स्ट्रक्शन तर्फे त्या ठिकाणी दोन सिक्युरिटी गार्ड उपलब्ध करून द्यावे. अशी मागणी यंग चांदा ब्रिगेड तर्फे करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्याचे माननीय आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांच्या मार्गदर्शनात यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे( प्रेम गंगाधरे, राजू नातर, मंगेश भोयर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.

सूर्या मराठी न्यूज रमेश सुध्दाला घुग्घुस)

मराठी आरक्षणाचा प्रश्न पेटला..संभाजीराजेंच्या उपोषणाला पाठींबा देत मंत्र्यांचा ताफा अडवल

0

 

अर्जुन कराळे शेगांव

शेगाव : छत्रपती संभाजी महाराज यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून आज मराठा मावळा अजित अमित जाधव याने ऊर्जा मंत्री नितीनजी राऊत यांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी निवेदन देण्याचा प्रयत्न केला पण नितीन राऊत साहेबांनी निवेदन न घेता मार्गस्थ झाले.
लोकशाही च्या मार्गाने व कोरोना प्रोटोकॉल पालन करून सुद्दा बाळ मराठा मावळ्या चे निवेदन न स्वीकारणाऱ्या मंत्र्यांचा जाहीर निषेध
यावेळी अमित वसंतराव जाधव,गणेश जाधव यांची उपस्थिती होती.

पत्नीकडुन अपमानास्पद वागणुक मिळत असल्याच्या कारणावरून पतीने केला लाकडी दांडाने खुन

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

कौटुंबिक वादातून संतापाच्या भरात पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडा मारून खून केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील थोरगव्हाण येथे सायंकाळी घडली. खून करणारा संशयित पती हा स्वत:हून पोलीसात जमा झाला आहे. रात्री उशीरापर्यंत पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

 

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, इंदूबाई प्रकाश पाटील (वय-५८) रा. थोरगव्हाण ता. यावल जि.जळगाव ह्या पती प्रकाश पांडूरंग पाटील, विवाहित मुले आनंद आणि मुकेश यांच्यासह वास्तव्याला आहे. इंदूबाई पाटील आणि प्रकाश पाटील यांच्या गेल्या अनेक दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. रविवार २७ फेब्रुवारी रोजी मुलगा आनंद हा जळगाव येथे कामासाठी गेला होता. तर लहान मुलगा एका गल्लीत वेगळा राहतो. त्यामुळे घरात प्रकार पाटील आणि पत्नी इंदूबाई पाटील हे दोन्ही एकटेच होते.सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पती पत्नी यांच्या कौटूबिक कारणावरून तीव्र वाद झाला. यात संतापाच्या भरात प्रकाश पाटील यांनी पत्नी इंदूबाई पाटील यांच्या डोक्यात लाकडी दांडका टाकला. यात इंदूबाई पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना शेजारच्यानी तातडीने जळगाव जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ नेण्यात असतांना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. संशयित आरोपी पती प्रकाश पाटील याने खून केल्यानंतर स्वत:हून यावल पोलीस ठाण्यात जमा झाला आहे.

 

जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला असून रात्री उशीरापर्यंत संशयित आरोपी पती प्रकाश पांडूरंग पाटील याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. मयत महिलेच्या पती, दोन मुले आणि विवाहित मुलगी असा परिवार आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे व पोलीस करीत आहे.

वृक्षारोपण करून पाचपोहर यांचा जन्मदिवस साजरा

0

 

कारंजा( घा )/प्रतिनिधी :पियुष रेवतकर

कारंजा घा – काल दिनांक 27 /2/2022 संभाजी ब्रिगेड चे नेते माजी कारंजा तालुकाध्यक्ष उमेश पाचपोहर यांचा जन्मदिवस होता .त्यांच्या जन्मदिवसां निमित्य वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे संभाजी ब्रिगेड कमिटी तर्फे झाडे लावण्यात आले …१५ झाडे या वेळीं कारंजा येथील स्मशान भूमी मध्ये लावण्यात आले . वाढदिवस केक कापून आणि नाचून नाही तर झाडे लाऊन किंवा पुस्तके वाटून साजरा करावा असं मत अखिल भारतीय पार्टी चे महाराष्ट्र अध्यक्ष श्री.अरविंद सुरूषे सर यांनी व्यक्त केले व सर्व उपस्थित असलेले यांनी झाडे जगविण्याची शपथ घेतली .या वेळी अखिल भारतीय पार्टी चे महाराष्ट्र अध्यक्ष श्री. अरविंद सुरूषे , संभाजी ब्रिगेड चे कारंजा तालुका उपाध्यक्ष पियूष रेवतकर ,संभाजी ब्रिगेड चे माजी तालुका उपाध्यक्ष राजेंद्र जी इंगळे ,संभाजी ब्रिगेड चे माजी तालुकाध्यक्ष उमेश पाचपोहर , दशरथ डांगोरे , जय बारंगे , हर्ष भिसे , आदी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तांबोळा उपकेंद्र अंतर्गत 423 बालकांना पाजण्यात आला पोलिओ डोस…

0

 

लोणार/जगन पाटील

आज दिनांक 27/2/ 2022 रोजी वार रविवार लोणार तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र हिरडव उपकेंद्र तांबोळा अंतर्गत 423 बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आले ,यामध्ये 0 ते 5 वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आले,यामध्ये यापूर्वी डोस पाजण्यात आला असेल तरी पण,बाळ आजारी असेल तरी पण, बाळ नुकतेच जन्मले असेल तरी पण पोलिओ ला हद्दपार करण्यासाठी 27 फेब्रुवारी रोजी राबविली गेली.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.रेखा नागरे वैद्यकीय अधिकारी,डॉ.प्रशांत तेजनकर (वैद्यकीयअधिकारी)तसेच समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण काळे,आरोग्य सहायक जे डी वायाळ,आरोग्य सेविका टी टी शिंदे आणि आरोग्य सेवक रिझवान अहमद आणि सर्व आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यामध्ये  सरस्वती सुजाता कडाळे,आशा कडाळे,किन्ही येथे गोदावरी लाकडे,संगीता मोरे पिपळखुटा येथे हर्षा घायाळ,वर्षा मापारी,मातमळ येथे वैष्णवी शिंदे,लता शिंदे तांबोळा येथे बेबी जाधव,अनिता आटोळे येथील सर्व आशा,अंगणवाडी सेविका व मदतनीस इ.आपला सहभाग नोंदवत पोलिओ मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

तलवाडा परिसरातील चोरीचे प्रमाण कमी होता ,होईना?

0

 

गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील अंबिका नगर येथील एस बी मेडिकल व किरण मेडिकल बाजार रोड तलवाडा काल रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सेटर तोडून आत प्रवेश केला ,व त्यातून अंदाजे दोन ते तीन हजार रुपये रोख रक्कम व केमिस्ट्री साहित्य चोरी करून लंपास करण्यात आलेले असे एस के मेडिकलच्या कॅमेरा मध्ये दिसून आल्याचे दिसुन येत तर किरण मेडिकल बाजार रोड या दुकानातील काही महत्त्वाची कागदपत्रे चोरट्यांनी पळवलाह्या ची माहिती मिळत आहे ,
तर दुसरीकडे मागिल आठ दिवसा मध्ये दोन मोटारसायकल चोरीला गेल्याची कुजबुज नागरिकांतून बोलले जात आहे,

बँकिंग क्षेत्रात भारतात ग्रामीण भागातून बावनबीर चे नाव प्रथम क्रमांकावर

0

 

बावनबीर येथील बँक ऑफ महाराष्ट्र काम आणि बँके संबंधी तील प्रगती आणि कर्ज प्रकरणे वसुली व नियमितता आणि ग्राहकाशी वागणूक या सर्व बाबतीत बँक ऑफ महाराष्ट्र बावनबिर चा ग्रामीण भागातून भारतात प्रथम क्रमांक आला आहे त्यानिमित्त एका छोटे खाणी कार्यक्रमामध्ये बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संजय भाऊ ढगे यांनी बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखा व्यवस्थापक श्री विशाल बेलदार आणि सर्व स्टाफ चे हार शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले . याप्रसंगी संजय गांधी निराधार चे सदस्य शेख सलाम. गजानन नागळे राजेश ढगे व्यवस्थापक विशाल बेलदार सहाय्यक व्यवस्थापक श्री धीरज भुरे कॅशियर दीपक फुंडकर गोपाल पांडे अशोक भाकरे संतोष काळपाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

निशांत दिवाळी अंकास राज्यस्तरीय मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा पुरस्कार प्रदान

0

 

 

मराठी भाषा कशी जगेल याची चिंता हवी – डॉ.प्रा.दीपक पवार
नगर – मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई शाखेच्यावतीने 46 व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत निशांत दिवाळी अंकास उल्लेखनिय दिवाळी अंक म्हणून पुरस्कार नुकताच मुंबई येथील शानदान कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. यावेळी मराठी अभ्यास कक्षाचे प्रमुख प्रा.डॉ.दीपक पवार, शिवसेना आरोग्य कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, तरुण भारतचे नागपुर आवृत्तीचे संपादक गजानन निमदेव, शुभा कामथे, जळगाव जिल्हा अर्बन बँकेचे संचालक नगरसेवक अमोल पाटील,ज्येष्ठ पत्रकार रिंगणकार सचिन परब आदि मान्यवरांच्या उपस्थितीत निशांत दिवाळी अंकाचे संपादक निशांत दातीर यांनी स्विकारला. यावेळी नगरमधून सौ.शोभा दातीर, प्रा.वर्षा दातीर, दिलीप लावरे, डॉ.गंगाराम जोरी, स्वानंद पिंपुटकर, अमोल खैरे आदि उपस्थित होते.
यावेळी मराठी अभ्यास कक्षाचे प्रमुख प्रा.डॉ.दीपक पवार म्हणाले, मराठी भाषा ही 2300 वर्षेजुनी आहे याचा मला खूप आनंद वाटत नाही,परंतु मराठी भाषा 2,300 वर्षे कशी टिकेल याची मला खंत आहे. दिवाळी अंक हे आपल्याकरिता मोठे इंधन आहे. दिवाळी अंक मराठी माणसाला विचार करायला लावणारे आहेत. त्यातून होणार्या सृजनाच्या आधारे मराठी संस्कृती बहरत असते.त्यामुळे दिवाळी अंकांची परंपरा ही मराठी माणसासाठी महत्वाची असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. प्रमुख कार्यवाहक प्रशांत घाडीगावकर, प्रशांत भाटकर यांनी सूत्रसंचालन केले; तर आभार अरुण खटावकर यांनी मानले.
निशांत दिवाळी अंकास नुकताच 6 जानेवारी 2022 रोजी प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार मिळाला असून, पूर्वीही महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण, नंदा फौंडेशन मुंबई, शब्दगंध साहित्य परिषद, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, इंदिरा प्रतिष्ठान व अहमदनगर प्रेस क्लबचा बेस्ट रिपोर्टर असे मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.
यावेळी ‘सकाळ’च्या ‘अवतरण’ दिवाळी अंकाला ‘गणेश केळकर स्मृती सर्वोत्कृष्ट साहित्यिक दिवाळी अंक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे;तर ‘सकाळ’च्या दिवाळी अंकासह तरुण भारत (नागपूर), निशांत दिवाळी अंकास मनोरंजनकर का.र. मित्र स्मृती सर्वोत्कृष्ट अंक, प्रसाद (पुणे), ऋतुरंग (मुंबई), समास (गोवा), चिकू पीक (पुणे), आनंद तरंग (पुणे), पुढारी दीपस्तंभ (कोल्हापूर), ऋतुपर्ण (पुणे), या दिवाळी अंकांनाही पुरस्कार देण्यात आला आहे.
———
कृपया प्रसिद्धीसाठी ऋतुजा प्रेस सर्व्हीस

फोटो – मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई शाखेचा राज्यस्तरीय उल्लेखनिय दिवाळी अंक पुरस्कार निशांत दिवाळी अंकाचे संपादक निशांत दातीर यांना मुंबई येथील शानदान कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. यावेळी मराठी अभ्यास कक्षाचे प्रमुख प्रा.डॉ.दीपक पवार, शिवसेना आरोग्य कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, शुभा कामथे, जळगाव जिल्हा अर्बन बँकेचे संचालक नगरसेवक अमोल पाटील,ज्येष्ठ पत्रकार रिंगणकार सचिन परब, तरुण भारतचे गजानन निमदेव आदि उपस्थित होते.