Home Blog Page 329

राष्ट्रीय पल्स पोलिओ कार्यकम मध्ये जी बालके वंचित राहिले त्यांनी घरी येणार्या टीमला सहकार्य करावे असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनिषा महाजन यांनी केले आहे.

0

 

तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे

आज दि.27 फेब्रुवारी 2022 रविवार निमीत्त राष्ट्रीय पल्स पोलिओ कार्यकम चे उदघाटन पंचायत समिती सभापती सौ.पल्लवी ताई,यांच्या हस्ते डांभुर्णी उपकेंद्रात करण्यात आले .उपस्थीत मान्यवर श्री.पुरोजीत चौधरी जिल्हा अध्यक्ष.अ.भा.सरपंच परिवार ,भरत सोनवणे सरपंच डांभुणी.तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनिषा महाजन,समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.सोनल भंगाळे,आरोग्य सहय्यिका उषा पाटील,आरोग्य सेविका मंगला सोनवणे,आशावर्कर,मदतनीस.
जनाबाई ठाकरे हजर होते.

 

 


तसेच सर्व प्रा आ केंद्र येथे एक दिवस अगोदर पल्स पोलिओ प्रशिक्षण देण्यात आले होते.या मोहिमेत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनिषा महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात पोलिओ मोहिम यशश्वी रित्या पार पाडली.सकाळी 3.30 वाजेपासुन लस साठा वाटप करण्यात आला. आज एकूण 16390 बालकांना पोलिओ डोस पाजून एकूण 99.99 टक्के काम झाले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनिषा महाजन यानी तालुक्यातील सर्व प्रा.आ.केंद्र व उपकेंद्राना भेटी दिल्या.तसेच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय येथील आरोग्य विस्तार अधिकारी डी.सी.पाटील.नरेंद्र तायडे,मिलिंद राणे,प्रशांत शिंपी यानी पल्स पोलिओ मोहिमेस सहकार्य केले.आज या मोहिमेत जी बालके वंचित राहिले असतील त्यांनी घरी येणार्या टीमला सहकार्य करावे असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनिषा महाजन यांनी केले आहे.

जिल्हा परिषद चंद्रपूरतर्फे चष्मे वाटप व भव्य नेत्र तपासणी शिबीर संपन्न

0

 

घुग्घुस परिसरातील जनतेपर्यंत आरोग्य सेवा पोहचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध ! – भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

शुक्रवार 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता घुग्घुस येथील प्रयास सभागृहात जिल्हा परिषद चंद्रपूरतर्फे मोफत चष्मे वाटप व भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उदघाटन भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
मनोगत व्यक्त करतांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले आरोग्याची सेवा गोरगरीब जनतेपर्यंत पोहचविणे हा आमचा सेवाव्रत आहे. आणि त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र घुग्घुसतर्फे गोर गरीब, गरजू व जेष्ठ नागरिकांना आरोग्याच्या विविध सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे आता पर्यंत जेष्ठ नागरिकांच्या 8 तुकडया सेवाग्राम येथे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आल्या आहेत नरसेवा हीच ईश्वर सेवा होय आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी सेवेचा संदेश दिला आहे त्यामुळे आरोग्य सेवेचे कार्य आम्ही निरंतरपणे करित आहोत आतापर्यंत आरोग्य सेवा समितीच्या माध्यमातून परिसरातील अनेक गोरगरीब गरजू लोकांची मोफत हृदयविकाराची शस्त्रक्रिया, कर्करोगाची शस्त्रक्रिया करून देण्यात आली आहे.
याप्रसंगी घुग्घुस परिसरातील शेकडो जेष्ठ नागरिकांची नेत्र तपासणी तज्ञ डॉक्टरामार्फत करण्यात आली तसेच त्यांना चष्म्याचे मोफत वाटपही करण्यात आले.
यावेळी नकोडा जि. प. सदस्य ब्रिजभूषण पाझारे, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी जि. प सभापती नितूताई चौधरी, जि. प. आरोग्य विभागाचे डॉ. साठे, माजी पं. स. उपसभापती निरीक्षण तांड्रा, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिगांडे, माजी उपसरपंच संजय तिवारी, विनोद चौधरी, साजन गोहने, वैशाली ढवस, मल्लेश बल्ला, गुरूदास तग्रपवार, बबलू सातपुते, राजेश मोरपाका, शरद गेडाम, प्रवीण सोदारी, विनोद जंजर्ला, संजय भोंगळे, मधुकर मालेकर, राजाजी रेड्डी, विवेक तिवारी, विक्की सारसर, वमशी महाकाली, सिनू कोत्तूर, तुलसीदास ढवस, सुनीता पाटील यांसह आदी मंडळी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत लोणार मध्ये आगमन होणार….

0

 

लोणार प्रतिनिधी सतीश मुलंगे

महाराष्ट्र राज्याचे मुख्य मंत्री नितीन राऊत हे 1 मार्च रोजी लोणार येथे येत आहेत त्यानिमित्त काँग्रेस पार्टीच्या व लोणार परिषद व तिच्या वतीने 25 फेब्रुवारी रोजी सामाजिक नगर परिषदेत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्र काँग्रेस उपाध्यक्ष विजय अंभोरे यांनी सांगितले की एक मार्च रोजी ऊर्जा मंत्री नितीन राऊत हे लोणार दौऱ्यावर येत आहेत त्यांची व माझी सामाजिक मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय विदर्भ विदर्भ मातंग समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विजय अंभोरे यांनी केले आहे तसेच नगराध्यक्ष सौ. पुनम ताई पाटोळे यांनी सांगितले की नगराध्यक्षच्या वतीने 5 कोटी रुपयांचा खर्च करून बांधण्यात आलेल्या आठवडी बाजार व श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचा लोकार्पण सोहळा ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या शुभहस्ते ठेवण्यात आला आहे तरी या लोकर्पण सोहळ्याला नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे आव्हान पत्रकार परिषदेत नगर अध्यक्ष सौ पुनम ताई पाटोळे यांनी केले आहे पुढे बोलताना विजय अंभोरे म्हटले की मागील दोन वर्षापासून कोरोणामुळे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करताना आली नाही त्यामुळे 1 मार्च रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे फोरमच्या राज्याशाखेच्या वतीने राज्यस्तरीय साहित्य लेखन स्पर्धा बक्षीस वितरण समारंभाचे तसेच विदर्भ स्तरीय मातंग समाज मेळाव्याचे आयोजन पंचायत समिती समोरील यात्री निवास करण्यात आला आहे व मंत्री नितीन राऊत यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे तरी सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे आव्हान महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विजय अंभोरे यांनी केले. यावेळी नगराध्यक्ष सौ, पुनम ताई पाटोळे, नप गटनेते भूषण भाऊ मापारी, काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष नितीन शिंदे , साहेबरावजी पाटोळे नगरसेवक आबेदखान.शेख रहूफभाई,संतोष मापारी छगनराव कंकाळ डॉ, अनिल मापारी , मनिष पाटोळे यांची उपस्थिती होती

सरस्वती येथे जागेच्या वादावरुन मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0

 

 

लोणार तालुक्यातील सरस्वती येथे जागेच्या वादावरुन मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सरस्वती येथील चंद्रभागा भुजंग अंभोरे या महिलेने पोलिस स्टेशनला फिर्याद दिली की जागेच्या वादावरुन भांडण झाले असता पतीने भावकीतील लोकांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला होता या जुन्या वादाच्या कारणावरून शीलवंत अंभोरे, रतन अंभोरे, चंद्रमुखी अंभोरे, रेखा अंभोरे, सोनू अंभोरे ,अर्चना अंभोरे, तेजराव अंभोरे यांनी पतीला घराच्या दारात येऊन शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व हातात वीट घेऊन बरगडीवर पाठीवर, काठीने पोटावर पाठीवर मारहाण करून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली महिलेच्या तक्रारीवरून सरस्वती येथील ७ जणांविरुद्ध लोणार पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 47/ 2022 कलम 143, 147, 148, 149 ,323, 324, 504, 506 भादवी नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस गजानन सानप करीत असल्याची माहिती 25 फेब्रुवारी रोजी देण्यात आली आहे.

कोकर्डा ग्रामपंचायत कार्यालय आणि ब्राम्हणवाडा सोसायटी चौक येथे शिवजयंती निमित्य शिवरायांना अभिवादन

0

 

उषा पानसरे मू,का. सपादक मो.9921400542 असदपूर

कोकर्डा येथे शिवजयंती दिनानिमित्त गावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच सौं. पुष्पाताई ज्ञानेश्वर बारब्दे यांच्या हस्ते शिवरायांचा पुतळ्याला पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथे सुद्धा जयंती चा कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी गावच्या सरपंच सौं. पुष्पाताई ज्ञानेश्वर बारब्दे ह्या होत्या. त्याचं बरोबर उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच श्रीकृष्ण पाटील सावरकर, ,ग्रामविकास अधिकारी विलास वडतकर,ज्ञानेश्वर बारब्दे,निवृत्ती पाटील बारब्दे, उद्धव पाटील बारब्दे, राधेश्याम कुले, गोवर्धन गव्हाळे, नितीन सावरकर,सुनील सावरकर, सौरव माहोरे, मिनू भाऊ काकड, प्रा. सावरकर,गोपाल सावरकर, गजानन पाटील सावरकर, भाष्कर पा. सावरकर ,दादाराव गावंडे, विलास तूरखडे, लक्ष्मण भोपळे, दौलतराव डाखोडे तसेच गावातील सर्व पक्ष्याचे पदाधिकारी,ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस विभागाचे नायडू साहेब, ठाणेदार लंबे साहेब, पोलीस कर्मचारी, गावचे पोलीस पाटील यांच्यासह गणमान्य नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन तंटामुक्ती अध्यक्ष श्रीकृष्ण पाटील सावरकर यांनी केले.
न्यूज रिपोर्टर उषा पानसरे असदपुर अमरावती

उपजिल्हा रूग्णालय मोर्शी येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ .श्याम सुंदर निकम यांना निरोप समारंभ

0

 

उषा पानसरे असदपूर मू.का, सपादक मो.9921400542

दिनाक 26 फेब्रूवारी

अमरावती जिल्ह्यात उत्कृष्ट आरोग्य सेवा प्रदान करणारे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ .श्यामसुंदर निकम यांचा उपजिल्हा रूग्णालय मोर्शीच्या वतीने सपत्नीक सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला . जिल्हा शल्यचिकित्सक डॉ .श्यामसुंदर निकम हे २८ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त होत आहे .मोर्शी उपजिल्हा रूग्णालय चे वैधकिय अधीक्षक डॉ .विनोद चव्हाण सर यांचे मार्गदर्शनाखाली सत्कार व निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ .श्यामसुंदर निकम यांनी मोर्शी उपजिल्हा रूग्णालय येथे जवळपास १५ वर्ष अधीक्षक म्हणून सेवा दिली असून सूत्र संचलन श्रीकांत गोहाड यांनी केले , यावेळी डॉ .सचिन कोरडे , डॉ .विवेक साबळे , डॉ .रावलानी डॉ .सांगोले , डॉ .गजानन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले तसेच आरोग्य कर्मचारी विनय शेलूरे , मनीष अग्रवाल , रितेश कुकडे , आशिष पाटील , सुजित वानखेडे , विजय गाढवे , चेतन देशमुख , प्रकाश मंगळे,अमोल राजस,सुनील लेंडे, तुषार पोहोकार,श्री.महल्ले, आशिष नेरकर , अधीपरीचरीका शहाणे , वगारे तसेच उपजिल्हा रुग्णालयात कर्मचारी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

शिवजयंती निमित्त शिवकालीन मर्दानी खेळांच्या जिल्हास्तरीय स्पर्धा – २०२२.

0

 

शिवजयंती निमित्त एक नवीन संकल्पना म्हणून मर्दानी खेळ असोसिएशन पिंपरी चिंचवड यांच्या वतीने शिवकालीन मर्दानी खेळांच्या स्पर्धा केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल आकुर्डी येथे आयोजित करण्यात आल्या.
या स्पर्धेमध्ये देहुगावा, चिखली, चिंचवड, वडगाव, जाधववाडी, चर्होली, कान्हेगाव, मावळ येथील खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेमध्ये वडगाव मावळ या संघाने प्रथम क्रमांक, अभंग स्पोर्ट्स अकॅडमी देहुगाव संघाने द्वितीय क्रमांक तसेच जाधववाडी आणि चर्होली संघ यांनी संयुक्त पणे त्रितीय क्रमांक पटकावला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक श्री. नानासाहेब काळभोर, श्री. राम रैना डायरेक्टर – केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल, समाजसेविका सौ. शितल ताई वर्णेकर, अध्यक्ष प्रांत पोलिस राष्ट्रीय संघटना श्री. गोपाल बिरारी, राष्ट्रीय सैनिक संस्था अध्यक्ष श्री. प्रतापराव भोसले, सौ. श्रीया गोजमगुंडे, प्रांत पोलिस संघ महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री. संदिपजी पोलकम, मर्दानी खेळ असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री. संजय बनसोडे, सचिव श्री किरन अडागळे हे उपस्थित होते.
पंच म्हणून स्मिता धिवार मॅडम, अर्चना अडागळे मॅडम, सुदर्शन सुर्यवंशी, रविराज चखाले, केतन नवले, अंजली बर्वे, गणेश चखाले, श्रेया दंडे, रुपाली चखाले यांनी उत्तम कामगिरी केली.

दहीगाव येथील विवाहितेला पैश्यांची मागणी करून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत शुक्रवार २५ फेब्रुवारी रोजी यावल पोलीस ठाण्यात पतीसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

0

 

यावल तालुका (प्रतिनिधी) विकी वानखेडे

तालुक्यातील दहीगाव येथील विवाहितेला पैश्यांची मागणी करून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत शुक्रवार २५ फेब्रुवारी रोजी यावल पोलीस ठाण्यात पतीसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, यावल तालुक्यातील दहीगाव येथील माहेर असलेल्या कांचन भुषण जंजाळकर (वय-२६) यांचा विवाह रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथील रहिवाशी भूषण जगन्नाथ जंजाळकर यांच्याशी २०१९ मध्ये रितीरिवाजानुसार झाला. लग्नाच्या एक महिन्यानंतर पती भूषण जंजाळकर याने काहीही कारण नसतांना पैश्यांची मागणी करण्यास सुरूवात केली. त्यानंतर पैसे न दिल्याने विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यासोबत सासू, सासरे, ननंद, चुलत सासरे, चुलत सासू यांनी देखील पैश्यांसाठी गाजंपाठ केला. हा छळ व त्रास सहन न झाल्याने विवाहिता ह्या माहेरी निघून आल्यात. याबाबत विवाहिता कांचन जंजाळकर यांनी यावल शुक्रवार २५ फेब्रुवारी रोजी धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती भूषण जगन्नाथ जंजाळकर, सासू लिलाबाई जगन्नाथ जंजाळकर, सासरे जगन्नाथ डिगंबर जंजाळकर, ननंद संगिता निलेश जाधव, ननंद सुवर्णा प्रमोद रूल्हे, चुलत सासरे सदाशिव डिगंबर जंजाळकर, चुलतसासू मंगलाबाई सदाशिव जंजाळकर, सोपान सदाशिव जंजाळकर सर्व रा. तांदलवाडी ता. रावेर यांच्याविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय देवरे करीत आहे.

नवाब मलिक यांच्या अटकेचा महाविकास आघाडी तर्फे निषेध

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्गूस : राज्याचे अल्पसंख्याक विभागाचे मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी सख्तवसुली संचालनालय तर्फे अटक करण्यात आली या अटकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गांधी चौक येथे निषेध व्यक्त करीत
” मोदी शासन मुर्दाबाद” च्या घोषणा दिल्या केंद्रातील भाजप प्रणित मोदी शासन हे लोकशाही संपविण्याचा घाट रचत असून ज्या राज्यात भाजप शासन सत्तेत नाही तेथील विरोधी नेत्यांवर सूडबुद्धीने ईडी,सी.बी.आई. सारख्या शासकीय यंत्रणेचा गैरवापर करीत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला.
सदर आंदोलन काँग्रेस शहर अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार नेते सैय्यद अनवर, शिवसेना शहर प्रमुख सतीश बोंडे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष दिलीप पिट्ट्लवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले याप्रसंगी शिवसेनेचे युवा सेना प्रमुख चेतन बोबडे,उप – शहर प्रमुख पंकज राजपूत, सतीश गोहोकार,सागर डोहे,राजू बॉंडे,सुनील निकुरे,चेतन धांडे
राष्ट्रवादी काँग्रेसचे भानेश शेट्टी,ज्येष्ठ नेते सत्यनारायण,साहिल सैय्यद, डकरे,सतीश जैस्वाल, विशेष गुंडेटी,सचिन दासरी,विशाल कलवल, शरद कुमार तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शामराव बोबडे,विजय माटला,रोशन दंतलवार,इर्शाद कुरेशी,देव भंडारी,युवक नेते निखील पुनघंटी,सचिन कोंडावार,अय्यूब कुरेशी,कपिल गोगला,संजय कोवे,सुनील पाटील,समीर शेख,अंकुश सपाटे,व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते

संत नरहरी महाराज सभामंडपाचे आ रणधीर सावरकर यांचेहस्ते भूमिपूजन राज्यातील पत्रकारांचाही केला सन्मान

0

 

शेगाव प्रतिनिधी अर्जुन कराळे

अकोला शहरातील मोठी उमरी गुडधी भागातील संत नरहरी महाराज मंदिरात संत नरहरी महाराज पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून आमदार रणधीर सावरकर यांचे हस्ते सभामंडपाचे भुमीपूजन करण्यात आले.
तसेच श्री संत नरहरी महाराज सेवा समिती,अखिल माळवी सोनार समाज महासंघ अकोला ,श्री द्वारकाधीश प्रतिष्ठान नागपूर व आॕल इंडिया सोनार फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील ठिकठिकाणीच्या पत्रकारांचा सन्मान सोहळा पार पडला.
यावेळी अकोला मनपाच्या महापौर सौ अर्चनाताई मसने ,माजी सभापती जयंतराव मसने यांची उपस्थिती होती. तत्पूर्वी आमदार गोवर्धन शर्मा,शेगावचे माजी नगराध्यक्ष शैलेंद्रदादा पाटील यांचेहस्ते श्री संत नरहरी महाराज ,छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले. .
यावेळी अखिल माळवी सोनार महासंघाचे अध्यक्ष विलासराव अनासाने,आॅल इंडिया सोनार फेडरेशन चे अध्यक्ष मोहनसेठ हिवरकर,द्वारकाधीश प्रतिष्ठान च्या अध्यक्षा सौ अंजलीताई अनासाने,सहसचिव अनंतराव उंबरकर, संत नरहरी महाराज सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत हिरूळकर, अशोकदादा मुंडगावकर,अशोकराव हिरूळकर अकोट,अकोला सराफा असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश खरोटे,श्री द्वारकाधीश प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सुरेशराव अनासने,भारतीय सुवर्णकार समाज नागपूर चे कार्याध्यक्ष ओंकारेश्वर गुरव ,शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीरंगदादा पिंजरकर, सोनार महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश टकोरे,माजी नगरसेवक संतोषराव अनासने, केशवराव तळोकर,अकोटचे नगरसेवक गजाननराव लोणकर, अनिल काटोले, प्रविण मांडळे,भारतीय सुवर्णकार समाजचे धनराज उज्जैनकर,श्री संत नरहरी महाराज सेवा समितीचे माजी अध्यक्ष श्रीकृष्ण धरमकर,नगरसेवक शेगोकार,मिलिद राऊत,अनिल नावकार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
तदनंतर महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून आलेल्या ‘पत्रकार बांधवांना मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने श्रीकांत पाचकवडे अकोला, भगवानराव शहाणे औरंगाबाद ,आत्माराम ढेकळे पुणे,राजेंद्र माळवे नाशिक,ललीतकुमार पांडे ठाणे, दिनेश येवले,विवेक डुमरे नागपूर,शरद कुलथे परभणी,गजानन ठोसर मलकापूर, गजानन ईटनारे अमरावती, संजय प्रांजळे नांदुरा,
अनिल शिराळकर सोलापूर, प्रशांत उंबरकर उमाळी,अंकित करे कारंजा,नारायण दाभाडे,
अनिल उंबरकर शेगाव आदी पत्रकारांचा समावेश होता.
सुत्रसंचलन संदिप गुहे व अनिल उंबरकर यांनी केले. तर आभार अखिल माळवी सोनार महासंघाचे अध्यक्ष विलासराव अनासाने यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी “श्री संत नरहरी महाराज सेवा समिती”चे पदाधिकारी चंद्रकांत हिरुडकर(अध्यक्ष ) ,गोपालराव लोणकर (कार्याध्यक्ष),जयकृष्णराव माळोकर(उपाध्यक्ष),ओमप्रकाश मानेकर(उपाध्यक्ष),प्रमोद बुटे(कोषाध्यक्ष),अरविंद तळोकर(सचिव),रमेश प्रांजळे(सहसचिव),रमेश बानुबाकडे (सहसचिव),गजानन उज्जैनकर(सदस्य),पुरुषोत्तम चेडे(सदस्य),गजाननराव माळोकर(सदस्य ),तपेश्वर शेरेकर (सदस्य),संजय बानुबाकडे(सदस्य) आदींसह समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

●दोन विद्यार्थीनी व एक विद्यार्थी अशा तिघांना घेतले दत्तक :
शैक्षणिक खर्च देणार …..
दरम्यान याच कार्यक्रमात संत नरहरी सेवा समिती व अखिल भारतीय माळवी सोनार महासंघाचे वतीने कु.कांचन सुरेश अनासाने अकोला हिला युपीएससी पुर्व परीक्षा तयारीसाठी पुस्तकांचा संच भेट दिला.
तसेच 10 चा विद्यार्थी अथर्व खानपासोडे नागपूर व आठव्या वर्गात शिकत असलेल्या कु.धनश्री अनिल उंबरकर शेगाव यांच्या शिक्षणाचा खर्च दत्तक स्वरुपात द्वारकाधीश प्रतिष्ठान नागपूर अंतर्गत अध्यक्षा सौ.अंजलीताई अनासने यांनी करण्याचे जाहीर केले.

●आयुष्यमान कार्ड व ई-श्रम कार्ड चे निशुल्क वितरण…..
शासनाच्या योजनांचा लाभ समाज बांधवांना मिळवून देण्याचे दृष्टीने कार्यक्रम स्थळी आयुष्यमान कार्ड व ई-श्रमकार्ड चे निशुल्क वितरण करण्यात आले. या उपक्रमाचा शेकडो सोनार समाजातील महिला व पुरुषांशी लाभ घेतला.

● रामनवमी नाम जप उपक्रमात महिलांचा सहभाग…
श्री रामनवमी शोभायात्रा समिती अंतर्गत महिलाना राम नाम जप लिहिण्यासाठी वह्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात जवळपास हजार महिलांनी सहभाग घेतला.

● मातृशक्तीचाही गौरव….
सोनार समाजाच्या जिल्हाध्यक्षा सिमा प्रदीप पिंजरकर,मिना अशोक अनासाने, माया हाडे,सौ मंगलाताई गुरव,सौ शहाणे आदींचा गौरव करण्यात आला.