Home Blog Page 330

जिल्हा परिषद अमरावती डॉक्टर पंजाबराव देशमुख सभागृह अमरावती येथे कर्मयोगी श्रि संत गाडगेबाबा जयती निमीत कार्यक्रमाचे आयोजन

0

 

उषा पानसरे असदपूर

दिनाक 25 /फेब्रूवारी अमरावती
कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांचा जयंती निमीत्य जिल्हा परिषद डाॅक्टर पंजाबराव देशमूख सभाग्रूह अमरावतीयेथे दिनांक 23 ब्रूवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पूजन करून हार अर्पण कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये माननीय श्री अविशांत पंडा (भाप्रसे ) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती, माननीय श्री दयाराम सानू काळे सभापती समाज कल्याण समिती जिल्हा परिषद अमरावती, माननीय श्री शंकर विश्वनाथ गावंडे उर्फ बाळासाहेब हिंगणीकर सभापती अर्थ व आरोग्य समिती ,माननीय श्री चंद्रशेखर खंडारे मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी ,माननीय श्री तुकाराम जी टेकाळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य जिल्हा परिषद अमरावती, यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमांमध्ये श्री राजेश रोंघे, श्री पंकज गुल्हाने, दिपाली पडोळे, गायत्री लाचुरे ,सुशीला तानोदकर,रजनी मस्के, मनीषा घुबडे, श्रीमती समर्थ ,सो मनीषा डहाळे, सो चंचला सोळंके ,सारिका राऊत, आदित्य तायडे, मनोहर ठाकरे विजय सेलूकर, सतीश पवार, तुषार पावडे ,मनोज ठाकरे ,रोशन गोरडे ,परमेश्वर राठोड सक्षम चंदुरे ,सुदाम वानखडे ,श्रीराम मकेश्वर ,अशोक कांडेलकर ,पंकज धर्माळे ,इत्यादी कर्मचारी उपस्थित होते,

प्रति
संपादक दैनिक सदरची माहिती आपल्या लोकप्रिय दैनिकातून प्रसिद्ध करण्यात यावी ही विनंती

लोणार तालुक्यात ग्रामीण भागातील ९ हजार ६३६ बालकांना पोलिओ डोस

0

 

प्रतिनिधी..जगन पाटिल

लोणार तालुक्यातील ग्रामिण भागातील ० ते ५ वयोगटातील ९ हजार ६३६ बालकांना रविवार २७ फेब्रुवारी रोजी पल्स पोलिओचा डोस पाजण्यात येणार असून सर्व मातांनी आपल्या बालकास पोलिओ डोस पाजून घ्यावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ दैवशाला बलशेटवाड यांनी केले आहे . सायंकाळी ५ वाजेपर्यंत बालकांना पोलिओ डोस पाजला जाणार आहे यामध्ये यापुर्वी डोस पाजला असेल तरी पण , बाळ नुकतेच जन्मले असले तरी पण , बाळ आजारी असेल तरी सुध्दा २७ तारखेला पोलिओ डोस पाजणे गरजेचे आहे . हा पोलिओ डोस सर्व प्राथमिक केंद्र , सर्व उपकेंद्र , सर्व अंगणवाडी केंद्रात उपलब्ध करून दिला जाणार आहे . पोलिओना हद्दपार करण्यासाठी दर वर्षी पल्स पोलिओ मोहिम राबवली जाते २३ जानेवारी रोजी आयोजीत पल्स पोलिओ मोहिम कोरोना संसर्गामुळे २७ फेब्रुवारी रोजी राबविली जात आहे मोहिम यशस्वी करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाने तयारी केली असल्याची माहिती २५ फेब्रुवारी रोजी तालुका आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे.

चार तासाच्या आत पळालेला आरोपी आमगाव पोलिसांच्या ताब्यात

0

 

आमगाव,दि.२५:–दहा लाखाच्या खंडणीसाठी आमगाव तालुक्यातील बनगाव येथील एका १७ वर्षाच्या मुलाचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी आमगाव पोलिसांनी अटक केलेला आरोपी दुर्गाप्रसाद सुखचंद हरिणखेडे (वय २४ रा. नवेगाव खैरलांजी,मध्यप्रदेश)हा पोलीस कोठडीत असताना आज सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास पोलीस स्टेशनआवारातच असलेल्या शौचालयात शौचास गेला असता सोबत असलेल्या एकट्या पोलिसाला झटका देत भिंतीवरुन कुदून फरार झाला होता़ दरम्यान आमगावचे पोलीस निरिक्षक विलास नळे यांच्यासह स्थानिथ गुन्हे शाखेच्या पथकाने शोध मोहीम राबवित आमगाव नजीकच्या एका गावातून ताब्यात घेतले आहे़़

शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस वासराला गोठ्यातून नेले उचललून

0

 

मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्त करा : काँग्रेस

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्गूस : अमराई वॉर्ड निवासी सुधाकर झाडे यांच्या गोठ्यातून सकाळच्या सुमारास नुकतेच जन्माला आलेल्या वासरूला ओढत नेत कुत्र्यांनी शिकार केली आहे.
शहरात मोकाट कुत्र्यांची संख्येत लक्षणीय वाढ झाली असून मोकाट कुत्रे हे आता दहा ते वीस अश्या टोळक्याने फिरत कोंबडी,गाई वासरू,बकरीची शिकार करत असून रात्री अपरात्री कामावरून परत येणाऱ्या नागरिकांवर ही हल्ले चढविल्याचे प्रकरण समोर आले आहेत.
तीन दिवस पुर्वी रामनगर कॉलनीत रात्री सूर्या मराठी न्यूज चे पत्रकार यांचा घरात घुसून
दोन मांजर (भिल्ली )उचलून नेले
मोकाट कुत्र्यांचा तातळीने बंदोबस्त करावा अशी मागणी
घुग्गूस नगरपरिषदेला घुग्गूस शहर काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष राजूरेड्डी, कामगार नेते सैय्यद अनवर, रोशन दंतालवार, विशाल मादर,इर्शाद कुरेशी,सुकुमार गुंडेटी, बालकिशन कुळसंगे,संजय कोवे,अंकुश सपाटे,रंजित राखुंडे,सुनील पाटील, आरिफ शेख, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

आश्रय फॉउंडेशन आयोजित मोफत आरोग्य तपासणी व औषधेपचार शिबिर हिंगोणा येथे संपन्न

0

 

यावल तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे

 

आज दिनांक. २४-फेब्रुवारी २०२२वार गुरुवार रोजी आश्रय फॉउंडेशन यावल -रावेर आयोजित मोफत आरोग्य तपासणी व औषधेपचार शिबिराचे आयोजन विकास सोसायटी गाऊंड हिंगोणा येथे आश्रय फॉउंडेशन चे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे व संपूर्ण आश्रय फॉउंडेशन पदाधिकारी यांनी केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सौ. रुकसाना फिरोज तडवी (सरपंच ) होते तर शिबिराचे उदघाट्नस्थानी आश्रय फॉउंडेशन चे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे हार व पुष्पहार अर्पण करून उद्घाटन करण्यात आले. विकास सोसायटी गाऊंड हिंगोणा ता. यावल येथे डॉ कुंदन फेगडे, डॉ.राजेश चौधरी डॉ.पराग पाटील, डॉ.भरत महाजन डॉ.प्रशांत जावळे, डॉ.प्रविण पाटील, डॉ.योगेश पाटील, डॉ.प्रशांत भारंबे डॉ.नितीन महाजन, डॉ.गौरव धांडे, डॉ.दिलीप भटकर, डॉ.ललित बोरोले इ आश्रय फॉउंडेशन चे पदाधिकाऱ्यांनी मोफत रुग्ण तपासणी व औषधेपचार केले. या शिबिरामध्ये एकूण ६१५ गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला
या प्रसंगी रुकसाना फिरोज तडवी (सरपंच ) आश्रय फॉउंडेशन अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे सौ. रेखाताई पाटील, सौ.जयश्री ताई चौधरी,सौ.जयश्री ताई पाटील सौ. रेखाताई बोन्डे फिरोज तडवी, मनोज वायकोळे, महेंद्रसिंग पाटील, ज्ञानुसिंग पाटील, संतोष सावळे, शशिकांत चौधरी, सागर महाजन, विष्णू महाजन, ललित महाजन, सुभाष गाजरे, विजयशिंग पाटील, कुणाल कोल्हे, चंद्रकांत महाजन,व्यंकटेश बारी, डॉ.राजेश चौधरी डॉ.पराग पाटील, डॉ.प्रशांत जावळे, डॉ.भरत महाजन डॉ.प्रविण पाटील, डॉ.योगेश पाटील, डॉ.प्रशांत भारंबे डॉ.नितीन महाजन, डॉ.गौरव धांडे, डॉ.दिलीप भटकर, डॉ.ललित बोरोले आदींची उपस्थित होती. या मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिरामध्ये एकूण ६१५ गरजू रुग्णानानी याचा लाभ घेतला यात डॉ.दिलीप भटकर डॉ.योगेश पाटील, डॉ.भरत महाजन डॉ प्रवीण पाटील यांनी रक्तदाब, मधुमेह, थायरोईड, छातीचे विकार दम लागणे हृदयाचे विकार, वारंवार खोकला ताप येणे इ. आरोग्य तपासणी केली त्याच प्रमाणे डॉ.नितीन महाजन, डॉ.राजेश चौधरी, डॉ. प्रशांत जावळे (बालरोग तज्ञ् ) हे लहान मुलांचे आजार डायरिया, पोटदुखणे जंत होणे, बालदमा छातीचे व हृदयाचे आजार, निमोनिया, डेंगू, सर्दी, पडसे डांग्या खोकला इ, वर आरोग्य तपासणी केली त्याच प्रमाणे डॉ.ललित बोरोले व डॉ. पराग पाटील (दंत रोग तज्ञ् ) हे दात दुखणे, जबड्याला सूज येणे, तोंडाला घाण वास येणे, रूट कॅनॉल ट्रीटमेंट साठी सल्ला इ. वर आरोग्य तपासणी केली डॉ.कुंदन फेगडे व प्रशांत भारंबे (स्त्री रोग तज्ञ) हे पाळीसंबंधि समस्या, वंद्धत्व, गर्भपिशवीचे विकार, श्वेतपदर, प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीपश्चात तपासणी डॉ गौरव धांडे (अस्थिरोग तज्ञ् ) इ. आरोग्य तपासणी ही मोफत केली.
या शिबिरास अनमोल सहकार्य डॉ. कुंदन फेगडे यांचे संपर्क प्रमुख सागर लोहार, मनोज बारी हेमंत फेगडे विशाल बारी हर्षल धनगर, युवराज गाजरे, गौरव बाविस्कर, कपिल कोळी,तुषार कोळी, भगवान पाटील, हरेश भोळे, वैभव इंगळे, रोहित वारके, अनमोल सहकार्य लाभले

चुंचाळे फाटा ते चुंचाळे गावा या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे आरोग्य व शिक्षण सभापती पाटील यांच्या हस्ते भुमिपुजन करून सुरुवात

0

 

कार्यकारी संपादक विकी वानखेडे

अखेर तालुक्यातील चुंचाळे फाटा ते चुंचाळे गावापर्यंत रस्त्याच्या जिल्हा परिषदचे आरोग्य व शिक्षण सभापती रविंद्र पाटील यांच्या प्रयत्नांनी मंजुर झालेल्या निधीतुन रस्ता दुरुस्ती व डांबरीकरणाच्या कामास आजपासून सुरूवात करण्यात आली आहे.

यावल तालुक्यातील चुंचाळे फाटा ते चुंचाळे गाव हा सुमारे चार किलो मिटरच्या मार्गावरील रस्त्याची मागील काही दिवसापासुन ठीकठिकाणी मोठमोठे सोड्डे निर्माण होवुन अत्यंत दयानिय अवस्था झाली होती . यावेळी या रस्त्याच्या झालेल्या बिकट अवस्थेकडे वेळी वेळी ग्रामस्थानी लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले होते तर भिम आर्मी या सामाजीक संघटनेच्या माध्यमातुन राज्य सचिव सुपडु संदाशिव, रमाकांत तायडे, डोली श्रीकांत वानखेडे यांनी रस्ता रोको आंदोलन देखील केले होते.

यावेळी आंदोलनक्रर्त्यांना जिल्हा परिषदचे आरोग्य व शिक्षण समिती सभापती रविन्द्र पाटील ( छोटु भाऊ ) यांनी रस्त्याच्या कामास आपण करू असे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाचा शब्द पाळीत अखेर आज १४ लाख रुपये निधीतील डांबरीकरण रस्त्याच्या कामास प्रत्यक्षात पाटील यांच्या हस्ते भुमिपुजन व कुदळ मारून करण्यात आले.

या प्रसंगी भाजपाचे तालुका सरचिटणीस उज्जैनसिंग राजपुत , गावाचे माजी.सरपंच.नितिन राजपुत , देवचंद कोळी, चंद्रकांत तेली, प्रेमराज चौधरी, दिपक वानखेडे, सुधीर चौधरी, भिमआर्मीचे राज्य सचिव सुपडु संदाशिव,रमाकांत तायडे, नंदन तायडे, करण ठाकरे, संदीप वानखेडे, शिवाजी गजरे यांच्यासह कॉन्ट्रक्टर चेतन आर पाटील यांच्यासह चुंचाळे व बोराळे गावातील ग्रामस्थ प्रामुख्याने या प्रसंगी उपस्थित होते. रस्त्याच्या उर्वरीत भागाची देखील तात्काळ दुरुस्ती व्हावी अशी अपेक्षा ग्रामस्थकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई बॉम्ब खटल्यातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम याच्या साथीदार सोबत व्यावसायिक संबंध – लोकेश राठी

0

 

बुलढाणा- महाराष्ट्र राज्यातील सरकार मध्ये कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी व्यवहार करुन राज्याशी गद्दारी केली त्या प्रकरणात अटक झाली. अशा या मंत्र्यांना राज्यमंत्री मंडळात राहण्याचा नैतिक अधिकार नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मलिकांचा राजीनामा द्यावा अन्यथा त्यांना निष्कासित करावे या करीता माजी मंत्री, विद्यमान आमदार डॉ श्री संजुभाऊ कुटे यांच्या नेतृत्वाखाली वरवट बकाल येथे निर्देशन केले यावेळी तालुका अध्यक्ष लोकेश राठी, श्री पांडुरंग हागे, राजुभाऊ ठाकरे, गजानन भाऊ दाणे, ज्ञानदेव भारसाकळे जि प सदस्य, डॉ. गणेश दातिर जिल्हा सदस्य, तालुका सरचिटणीस प्रमोद गोसावी,संजुभाऊ उमाळे,सुभाषभाऊ हागे, प्रकाश पाटील, श्रीकृष्ण भालतिडक, सुनिल दातार,शाम आकोटकार, युवा मोर्चा अध्यक्ष, गुणवंत खोडके,निलेश टिकणार, सुधिर लव्हाळे,गणेश गोतमारे,नरसिम्हा पिंजरकार, वासुदेव सडतकार, अविनाश धर्माळ,यासह मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी पोलीस यांनी आंदोलकांना अटक केली.

पाळधी येथील महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी युवासेनेचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन

0

 

उषा पानसरे मू,का, संपादक मो.9921400542 असदपूर

दि.२३/ फेब्रूवारी
जळगाव – औरंगाबाद महामार्गावरील पाळधी ता.जामनेर येथील नाचणखेडा चौफुली येथे नवीन महामार्ग झाल्यापासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याच ठिकाणावरुन शाळेचे विद्यार्थी आणि अनेक ग्रामस्थांचा वावर आहे आणि वेगात येणाऱ्या वाहनांमुळे महामार्ग पार करतांना मोठी कसरत करावी लागते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी खुद्द शिक्षक महामार्गवर उभे राहुन विद्यार्थ्यांना सहकार्य करतात.
हा धोका लक्षात घेता आणि रोजच होत असणारे छोटे-मोठे अपघात रोखण्यासाठी वेगाने येणाऱ्या वाहनांची गती कमी व्हावी यासाठी पाळधी येथील नाचणखेडा चौफुली आणि जुणे बस स्थानक परिसरात गतिरोधक किंवा पर्यायी व्यवस्था करण्यात यावी अन्यथा १५-२० दिवसांनंतर संपूर्ण गाव व परिसरात मिळुन आंदोलन पुकारण्यात येईल यासंबंधीचे निवेदन शिवसेना-युवासेना जामनेर तालुक्याच्या वतीने अपर जिल्हा अधिकारी प्रविण महाजन यांना देण्यात आले.
प्रसंगी युवासेना उपजिल्हा प्रमुख विश्वजितराजे मनोहर पाटील,शिवसेना वैद्यकीय कक्ष तालुका समन्वयक ईश्वर चोरडिया,युवा तालुका प्रसिध्दी प्रमुख मुकेश जाधव,ग्रा.पं.सदस्य आसिफ पठाण, राष्ट्रवादी पदवीधर सेलचेप्रदेश चिटणीस संदिप पाटील हे उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर उषा पानसरे अमरावती

वाघोदा येथे एका तरूण विवाहीत शेतकऱ्यांने पाटचारी जवळ केली गळफास घेवुन आत्महत्या पोलीसात घटनेची नोंद

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील वाघोदा येथील एका पस्तीस वर्षीय तरुणाने पाटचारी परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याचे बुधवार (ता.२३) सायंकाळी उघडकीस आली. सदरच्या मयत विवाहीत तरुणाचे नाव जगदीश हिरामण पाटील (वय३५) असे आहे. त्याने मृत्युपूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. यावल तालुक्यातील वाघोदा येथील जगदीश हिरामण पाटील या तरुणाने सकाळी शेती कामाला जात आहे असे सांगून घरून निघून गेला होता. जगदीश हा सायंकाळ झाली तरी घरी परत आला नसल्याने तेव्हा त्याच्या कुटुंबाच्या वतीने शोधाशोध केली असता साकळी शेती शिवारातून मार्गस्थ होणाऱ्या पाटचारी जवळ जगदीश पाटील हा झाडाला गळफास घेऊन मृतावस्थेत आढळून आला.घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. यावेळी पोलीस पाटील अशोक पाटील, वाघोदाचे माजी पोलीस पाटील प्रकाश पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर पाटील, जळगावचे मधुकर पाटीलसह मयताचे नातेवाईक पोलीस ठाण्यात दाखल झाले. मयताने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे. त्यात त्याने मी माझ्या वैयक्तिक आयुष्याला कंटाळून आत्महत्या करीत आहे. माझ्या आत्महत्येत कोणाचाही काहीही संबंध नाही असा उल्लेख केला आहे. तरी कोणाला त्रास होईल असे वागू नये ही विनंती. असे मृत्यूपूर्व चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. या तरुणाच्या अशा आत्महत्येमुळे गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे गाडगे महाराज जयंती साजरी

0

 

अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन हेच संत गाडगेबाबांचे ध्येय- सौ. किरणताई बोढे

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

येथील आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या वतीने भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या मार्गदर्शनात श्रीसंत योगी गजानन महाराज प्रगट दिन व थोर संत, समाज सुधारक गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी संत गजानन महाराज व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले तसेच आपले विचार व्यक्त केले.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा सौ. किरणताई बोढे म्हणाल्या समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन हेच संत गाडगेबाबा यांचे ध्येय होते त्यांच्या एका हातात झाडू दुसऱ्या हातात मडक असायचे ते जिथे जात असत तेथील रस्ता स्वच्छ करण्याचे काम करायचे त्यांनी समाजाला शिक्षणाचे व स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.
यावेळी घुग्घुस प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा सौ. किरणताई बोढे, पियुष भोंगळे, आचल कांबळे, जया हस्ते, सविता ठाकरे, संगीता जेऊरकर, सुनंदा लिहीतकर, निशा उरकुडे, भारती परते, स्वाती गंगाधरे, उमेश दडमल, दुर्गा साहू, लता आवारी, स्नेहा कुम्मरवार उपस्थित होते.