Home Blog Page 331

शिवणी लख गावातील सर्व महिला गावातील दारू बंद करण्याचा निर्णय घेतला 

0

 

 

किल्लरी पोलीस ठाण्यात त्यांनी आपला निवेदन दिले। आणि आज सकाळी दारूच्या दुकानाची झडती घेती आणि दारू पकडली ।
गावातील सर्व महिलेचा माता मुले झाले ।
अनिता मोरे माया जमादार गीता शिंदे आशय सर्वं महिलांनी खप दिवस पासून। निर्णय घेतला आणि आज ते सर्व एकत्र येऊन दारू बंद केली ।गवती सर्व महिला नी। पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला तरी पण। दारू बबंद झाली नाही ।शेवटी महिलांनी दारू बंद करण्याचा निर्णय घेतल्या

उपोषणकर्त्यांच्या जिवीताला धोका झाल्यास प्रशासन जबाबदार – ऋषिकेश म्हस्के

0

 

रस्त्यासाठी गांगलगाववासीयांचे तिसऱ्या दिवशी उपाषण सुरूच
चिखली : गांगलगाव ते कोलारा या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून सदर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी या मागणीसाठी मागील २१ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण गांगलगाव येथील नागरीकांनी सुरू केले आहे . उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असून प्रत्यक्ष कामाला जोपर्यंत सुरुवात होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी गावकऱ्यांनी भूमिका आहे . चिखली मेहकर राज्य महामार्ग ५४८ सी ला जोडरस्ता असलेल्या गांगलगाव कोलारा हा जोडरस्ता आहे . सदर रस्ता हा गांगलगाव गावठाण जवळील २७० मीटर रस्ताला पांदण रस्त्याला लागून झाडे झुडपे असल्यामुळे या रस्त्याला जंगलाचे स्वरूप आले आहे . पावसाळ्यात हा रस्ता चिखलमय होवून गावकऱ्यांना त्रासदायक ठरतो . विशेष म्हणजे येथे सेंट्रल बँक असून बँकेत कामकाजा निमित्त येणाऱ्या ग्राहकांना तसेच शाळेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना या रस्त्यावरून येतांना प्रचंड त्रास होत आहे . मागील ५५ वर्षापासून या रस्त्याचा प्रश्न कायम प्रलंबीत आहे . यापूर्वी याच रस्त्याचा प्रश्न विधीमंडळात सुध्दा गाजला होता . मात्र अजूनही या रस्त्याच्या रुंदीकणाचा व मजबुतीकरणाचा मुहर्त प्रशासनाला सापडला नाही . शेवटी या रस्त्याच्या कामासाठी गावकऱ्यांनी उपोषणाचा मार्ग पत्कारला आहे . २१ फेब्रुवारी पासुन गावकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे . दररोज या उपोषण मंडपात उपोषणकर्त्यांची संख्या वाढत आहे . याबाबद जिल्हाधिकारी व तहसीलदार चिखली यांना वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाला जाग आली नाही . दरम्यान रस्त्याकामला सुरूवात होत नाही तोपर्यंत गावकऱ्यांनी मागे न हटण्याची भूमिका घेतल्याने हे उपोषण चिघळत आहे . सध्या गावकऱ्यांच्या वतीने गावचे प्रथम नागरिक गणेश म्हस्के , नितीन म्हस्के , गजेंद्र म्हस्के , राजेंद्र म्हस्के व ऋऋषिकेश म्हस्के , प्रल्हाद म्हस्के , सुनील म्हस्के यासह सुमारे २०० च्या वर ग्रामस्थ उपोषण करीत आहेत .
——————-कोट———
गांगलगाव ते कोलारा या रस्त्यासाठी गांगलगाव वासियांनी मागील तीन दिवसापासून उपोषण सुरू केले आहे यासंदर्भात अद्यापही प्रशासनाने दखल घेतली नाही . आता प्रशासनाने उपोषणकर्त्यांचा अंत पाहू नये , अन्यथा गावकऱ्यांच्या या मागणीसाठी आपण लोकशाहीच्या मार्गाने पुन्हा तिव्र आंदोलन करू –ऋषीकेश बबनराव म्हस्के सामाजिक कार्यकर्ते , गांगलगाव

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी मिळवून दिला शेतकऱ्यांना न्याय

0

 

लोणार/जगन पाटील

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी रिलायन्स पिक विमा कंपनीच्या विरोधात लोणार तालुका कृषी कार्यालयात ठीय्या आंदोलना दखल केले त्याची दखल घेत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा 2021 चा खरीप हंगामाचा पिक विमा शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी, शेतकऱ्यांसह दिनांक 6 जानेवारी रोजी लोणार तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते,तरी आंदोलनामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा झाल्याचे रिलायन्स कृषी विमा कंपनीच्या वतीने एका पत्राद्वारे सहदेव लाड यांना कळविण्यात आले आहे,
यावर्षी झालेल्या संततधार पावसामुळे संबंध शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही पिक विमा कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ होत होती तरी लोणार तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांना पीक विमा आला नव्हता अशा काही शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांच्यासोबत संपर्क साधला यावेळी सहदेव लाड यांनी त्या सर्व शेतकऱ्यांना घेऊन लोणार तालुका कृषी कार्यालय मध्ये बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली होती आंदोलनावेळी विमा कंपनीचे प्रतिनिधी यांनी त्यांच्या वरिष्ठांनी सोबत चर्चा करून आम्हाला थोड्या दिवसाचा अवधी द्यावा अशी विनंती केली होती तरी विमा कंपनीच्या प्रतिनिधींच्या तालुका कृषी अधिकारी यांच्या विनंतीला मान देऊन सहदेव लाड यांनी त्यांच्याकडून लेखी आश्वासन घेऊन आंदोलन मागे घेतले होते तरी आंदोलनामध्ये सह

वेकोलीने घेतली काँग्रेसच्या आंदोलनाची दखल

0

 

न्यू रेल्वे सायडिंग प्रदूषण नियंत्रणा करिता वेकोलीतर्फे उपाययोजना करा:राजू रेड्डी

(चंद्रपूर घुग्गूस) प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्गूस : वेकोलीच्या न्यू रेल्वे सायडिंगलाच लागून शालिकराम ही लोकवस्ती आहे.
सायडिंगवर मोठ्या प्रमाणात कोळशा गाडीयाच्या माध्यमातून येत असतो व याठिकाणी कोळश्याची साठवणूक होऊन ती रेल्वे द्वारे इतरत्र पाठविण्यात येते
यामुळे याठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात कोळश्याची धूळ निर्माण होते व या धुळीमूळे परिसरातील नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे.
ही धूळ नियंत्रणा करिता 24 तास वॉटर टँकरने पाणी मारण्यात यावे, सायडिंग परिसरात सर्पिक्लर लावण्यात यावे विंडशीट लावण्यात यावे, सरंक्षक भिंत निर्माण करण्यात यावे यासह अन्य मागण्यांना घेवुन 22 फेब्रुवारी रोजी राजूरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम करण्यात आला होता त्या अनुषंगाने आज रेल्वे सायडिंगवर वेकोलोचे सब एरिया मॅनेजर फुल्लारे, काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी व नागरिक यांची सामूहिक चर्चा होऊन समस्या निकाली निघाली असून वेकोलीने नागरिका समक्ष
संपूर्ण मागण्या मान्य केल्या
याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर, सुकुमार गुंडेट्टी,रोशन दंतालवार,रोहित डाकूर, विजय माटला,कुमार रुद्रारप,कपिल गोगला,बालकिशन कुळसंगे,राजू शेट्टी, व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

कुठं दडलय शाळेचे बांधकाम।विद्यार्थ्यांसह पालकांचा उपोषणाचा इशारा।

0

 

शेगाव प्रतिनिधी अर्जुन कराळे

गोळेगाव
शेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम गोळेगाव बुद्रुक येथील जि प शाळेच्या एक वर्ग खोली चे भूमिपूजन 31 डिसेंम्बर 2021रोजी होऊनसुद्धा अद्यापही बांधकाम चालू झाले नसल्याने गावकरी व पालकांनी 17 फेब्रुवारी 2022 रोजी शाळेला कुलूप ठोकले आणि शाळेत विद्यार्थी पाठवणे बंद केले परंतु अद्याप कसलाही निर्णय न झाल्याने पालकांनी आज दिनांक 22,02,2022 रोजी गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती शेगाव यांना निवेदन देऊन सात दिवसात शाळा बांधकाम चालू न झाल्यास सात दिवसानंतर कोणत्याही क्षणी विद्यार्थ्यांसह उपोषणाला बसणार असल्याचे निवेदनात दिले आहे ,तसेच सदर निवेदनाच्या प्रतीलीपी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती शेगाव, माननीय मुख्य कार्यपालन अधिकारी जि प बुलढाणा, माननीय शिक्षण अधिकारी जि प बुलढाणा ,पोलिस स्टेशन शेगाव शहर, जिप सदस्य राजाभाऊ भोजने, पंचायत समिती सदस्य विठ्ठलराव पाटील, आदिना निवेदनाच्या प्रती दिल्या ।
सदर खोलीचे बांधकाम मंजुरात होऊन भूमिपूजन होऊन सुद्धा काम का चालू होत नाही हे काम कुठे दडलंय यामध्ये कोणाचे राजकारण असू शकते का असा प्रश्न आता गावकऱ्यांना पडला आहे गोळेगाव बुद्रुक येथील दोन खोल्या शिकस्त झाल्या असल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन वर्गात प्रवेश करावा लागतो सदर गंभीर प्रश्नाबाबत मुख्याध्यापक एस एस पिलात्रे यांनी गेल्या तीन ते चार वर्षापासून कागदोपत्री शिकस्त खोलांच्या बाबतीत नवीन इमारत बांधण्याकरिता कागदोपत्री माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांना दिले आहे परंतु संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांचे गेल्या तीन चार वर्षापासून येथील जि प शाळेकडे दुर्लक्षच असल्याने आता पालकांनी आपल्या पाल्यांच्या भवितव्यासाठी आपल्या पाल्यासह उपोषणाचा इशारा दिला आहे। शाळेला कुलूप ठोकण्याची बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध होतात येथील गटशिक्षणाधिकारी आणि त्यांचे सहकारी दिनांक 18 फेब्रुवारी रोजी शाळेत आले असता पालकांनी व गावकऱ्यांनी शाळेचा व्यथेचा पाळा त्यांच्यासमोर मांडला शाळेच्या दोन्ही खोल्या अतिशय शिकस्त झालेले आहेत ,मुत्रीघर ,स्वच्छालय पडक्या अवस्थेत आहे, शाळेला कंपाउंड नाही, लाईट अभावी ई-लर्निंग बंद आहे ,अंगणवाडी सुद्धा पडली पडली आहे ,ती दोन वर्षापासून भाड्याच्या खोलीत भरत आहे, भाडे न मिळाल्याने ती सुद्धा आज रोजी बंद आहे असे अनेक गंभीर प्रश्न त्यांच्या कडे सांगितल्यानंतर त्यांनी तुमचे प्रश्न रास्त असल्याचे सांगून तुमच्या गावातील शाळे संबंधित समस्या मी लवकरच सोडणार असल्याचे सांगितले तसेच सदर खोली बांधकाम हे गोळेगाव बुद्रुक ऐवजी गोळेगाव खुर्द झाल्याने सदर काम रखडले असल्याचे सांगितले आणि सदर कामाचा प्रस्ताव दुरुस्त करून लवकरच खोली बांधकाम करू असे आश्वासन दिले परंतु पालकांना आश्वासनामुळे समाधान न झाल्याने त्यांनी सदर बांधकाम लवकर चालू होण्याकरता उपोषणाचा पवित्रा घेतला आहे।सदर निवेदनावर शाळा समिती अध्यक्ष, पालक वर्ग आणि गावातील नागरिकांच्या सह्या आहेत,
शासनाने संबंधित विषयाची गांभीर्याने दखल घेऊन गोळेगाव बुद्रुक येथील शाळा बांधकाम त्वरित चालू करावे आणि विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसान थांबवावे अशी गावकऱ्यांची शासनाला ओरड आहेसहाय्यक गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती शेगाव यांना निवेदन देतांना पालक

छत्रपती शिवाजी महाराजांना नाट्यछटेतुन मानवंदना

0

 

कारंजा (घा )/प्रतिनिधी :पियुष रेवतकर .

कारंजा (घा ).22 जानेवारी
स्थानिय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात 22 जानेवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची 392 वी जयंती साजरी करण्यात आली .अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष शिवश्री सुभाष अंधारे होते तर प्रमुख उपस्थिती ग्रामसेवक संघटनेचे कारंजा तालुका सचिव शिवश्री प्रदीप ताटे यांची उपस्थिती होती .शिवजयंती निमित्य शिवव्याख्यान अखिल भारतीय परिवार पार्टी चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शिवश्री अरविंद भारतीय यांनी केले .या वेळी सत्कारमूर्ती यांचे संभाजी ब्रिगेड कारंजा तालुका द्वारे सत्कार करण्यात आले या मध्ये कारंजा नगरपंचायत चे नवनिर्वाचित नगराध्यक्ष स्वाती भिलकर , नवनिर्वाचित नगरसेवक विशाल इंगळे ,प्राध्यापक डॉक्टर किरण भुयार ,अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कारंजा तालूका संघटक तथा शिक्षक राजकुमार तिरभाने ,ग्रामगीताचार्य भारती यावले ,समाजसेविका मंदा नागले यांचे संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले .कार्यक्रमाचे आयोजन संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघ कारंजा तालुका कमिटी द्वारा करण्यात आले .शिवाजी महाराजांन वर आधारित नाट्यछटा प्रस्तुत करून समाज प्रबोधन करण्यात आले या नाट्यछटे मध्ये संगीता पाटील ,विनोद पाटील ,सोयरा पाटील ,मनोज वानखेडे ,दशरथ डांगोरे ,जी .डी बोरकर ,कांचन गजभिये व संगीता पाटील यांच्या संचा चा समावेश आहे .छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार काळाची गरज आहे असे मत शिवश्री सुभाष अंधारे सर यांनी अध्यक्ष भाषणातुन व्यक्त केले .. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली इंगळे ,प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष संजय यावले ,तर आभार प्रदर्शन प्रवीण भिसे यांनी केले .कार्यक्रम नंतर उपस्थित लोकांनी जेवणाचा स्वाद घेतला .या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवश्री राजेंद्र इंगळे ,शिवश्री प्रवीण भिसे , विदर्भ कल्याणचे तालुका प्रतिनिधी शिवश्री पियुष रेवतकर ,शिवश्री अशोक नागले , शिवश्री विनोद धंदारे ,शिवश्री मंगेश जाचक सर ,शिवश्री उमेश पाचपोहर ,शिवश्री गुणवंता मुळे,शिवश्री सिलवाण ठाकरे ,संभाजी ब्रिगेड चे कारंजा तालुका अध्यक्ष शिवश्री राहुल काळे यांनी परिक्षम घेतले .

शिवगडावर शिवजन्मोत्सव सोहळा शिवगड संवर्धन समिती योगदान

0

 

उषा पानसरे असदपूर
दिनाक 23 /फेब्रूवारी अमरावती

शिव जयंती उत्साहात साजरा अमरावती शिवगडावर उत्साहात पार पडला. याप्रसंगी `शिवसृष्टी’ निर्माण कार्यात योगदान देणाऱ्या `शिवगड संवर्धन समिती’च्या सर्व कर्मचाऱ्यांचा मराठा सेवा संघाने सन्मान केला.

१९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती महोत्सव शिवगडावर आयोजित करण्यात आला होता. शिवगडाच्या पायथ्याशी असलेल्या `खुले रंगमंच’ याठिकाणी सकाळी दहा वाजता कार्यक्रम सुरू झाला. २०१८ सालापासून `शिवसृष्टी’ निर्माण कार्यात योगदान देणाऱ्या सर्व सफाई कामगार, सुरक्षारक्षक, सुपरवायझर, मजूर यांचा मराठा सेवा संघ जिल्हा शाखेच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ प्रतिमा, पुस्तके भेट देऊन सन्मान करण्यात आला. `शिवगड संवर्धन समिती’चे उपाध्यक्ष दिनेश बूब यांचाही शाल, जिजाऊ प्रतिमा, पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे वक्ते प्रा.निलेश सोनटक्के, यवतमाळ यांच्या जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आला होता. व्याख्यानाचा विषय होता `अष्टपैलू व्यक्तिमत्त्व छत्रपती शिवाजी महाराज’. छत्रपतींच्या इतिहासाची मुद्देसूद मांडणी निलेश सोनटक्के यांनी केली. कार्यक्रमाला शेकडो शिवभक्त, शिवप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव तथा सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे समन्वयक संजय ठाकरे व जिजाऊ ब्रिगेडच्या प्रवक्त्या क्षिप्रा मानकर यांनी केले. प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे शहरअध्यक्ष इंजि.प्रदीप अंधारे, तर आभार सिंधू संशोधन संस्थेचे समन्वयक प्रा.डॉ.प्रफुल्ल गुडधे यांनी मानले. यावेळी प्रमुख पाहुण्या आमदार सुलभा खोडके, कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अश्विन चौधरी, तर प्रमुख उपस्थिती माजी राज्यमंत्री डॉ.सुनील देशमुख, माजी महापौर विलास इंगोले, स्विकृत नगरसेवक मिलिंद चिमोटे, मनपाचे विरोधी पक्षनेते बबलू शेखावत, `समता पर्व प्रतिष्ठान’चे सुधाकर तलवारे, मनपा आयुक्त डॉ.प्रवीण आष्टीकर, मराठा सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष इंजि.अरविंद गावंडे, `जिजाऊ ब्रिगेड’च्या आंतरराष्ट्रीय समन्वयक मयुराताई देशमुख, बंडू हिवसे, अर्जुन ठोसरे, सुप्रसिद्ध उद्योजक नितीन कदम, `जिजाऊ ब्रिगेड’च्या जिल्हाध्यक्षा मनाली तायडे, रामेश्‍वर अभ्यंकर यांची होती.
कार्यक्रमाला शेकडो शिवप्रेमीची उपस्थिती होती

एस. टी. बस सेवा पूर्ववत सुरू करुन सर्वसाधारण जनतेची गैरसोय दुर करा:एम आय एम ची मागणी

0

 

लातूर/निलंगा प्रतिनिधी
डी. एस. पिंगळे

एस. टी. बस सेवा पूर्ववत सुरू करुन व सर्वसाधारण जनतेची गैरसोय दुर करा गेल्या तीन ते चार महिन्यांपासून एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीने संप पुकारला असुन सर्व सामान्य जनतेचे हाल होत आहेत. एस टी बस बंद झाल्याने सर्व सामान्य जनतेस याची झळ पोहोचत असुन बेकायदेशीर व कालबाह्य झालेली अवैधरित्या वाहनाने प्रवासी वाहतूक होत आहे.त्यामुळे अपघात होऊन काही जणांना आपल्या जिवाने मुकावे लागले आहे.तसेच सणासुदीच्या काळात व लग्नसराईत एस टी सेवा बंद झाल्यामुळे गोर गरीब जनतेची प्रचंड प्रमाणात गैरसोय होत आहे.यामुळे खाजगी वाहने व कालबाह्य झालेली वाहनेही रोडवर येऊन उच्छाद माजवला आहे.याबाबत मुख्यमंत्री यांनी तातडीने एस टी बस सेवा पूर्ववत सुरू करुन एस टी कर्मचाऱ्यांचे संप मोडीत काढावे व नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी.असे एम आय एम चे औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी 21 फेब्रुवारी 2022 सोमवार रोजी निलंगा तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले आहे.

यावल भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या २० फेब्रुवारी या दर्पणकार जांमेकरांच्या जयंती निमित्ताने डॉ . कुंदन फेगडेच्या हस्ते प्रतिमा अनावरण

0

 

यावल (प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील युवा सामाजीक कार्यकर्ते तथा आश्रय फाउंडेशन अध्यक्ष डॉ . कुंदन सुधाकर फेगडे यांच्या हस्ते नव्या राज्य शासनाव्दारे आदेशीत केलेल्या २० फेब्रुवारी हा दिवस मराठी वृत्तपत्राचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंतीच्या पार्श्वभुमीचे औचित्य साधुन भारतीय बहुउद्देशिय पत्रकार संघ, महाराष्ट्र व्दारे आयोजीत दर्पणकार जांभेकरांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले . यावल येथे आज भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघ,महाराष्ट्रच्या वतीने मराठी वृत्तपत्राचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या महाराष्ट्र राज्य शासनाने जाहीर केलेल्या दिनांक २० फेब्रुवारी हे दर्पणकार जांभेकरांच्या जयंतीचे औचित्य साधुन युवा सामाजीक कार्यकर्त डॉ . कुंदन फेगडे यांच्या हस्ते त्यांच्या संपर्क कार्यालयात बाळशास्त्री जांमेकरांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात येवुन त्यांना प्रतिमा भेट करण्यात आली . यावेळी डॉ .कुंदन फेगडे यांनी पत्रकार संघाला प्रत्येक शासकीय कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांमेकरांची प्रतिमा भेट म्हणुन २१ प्रतिमा भेट दिल्यात , या प्रसंगी भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अय्युब जी पटेल , प्रदेश सचिव जिवन चौधरी , प्रदेश संघटक सुनिल गावडे, जळगाव ग्रामीणचे अध्यक्ष प्रकाश चौधरी ,
जिल्हा सचिव शब्बीर खान, तालुका अध्यक्ष ए टी चौधरी , तालुका उपाध्यक्ष फिरोज तडवी , संघटक विक्की वानखेडे , जिल्हा प्रतिनिधी राजेन्द्र आढाळे, दिपक नेवे आदी पत्रकार उपस्थित होते .

सातबारावरील इतर अधिकाराचे नाव कमी करण्यासाठी पाच हजाराची लाच,कोतवाल सह पंटर अटकेत

0

 

 

अनिलसिंग चव्हाण मुख्य संपादक

तालुक्यातील सावखेडासिम शिवारातील शेत गटांमधील इतर अधिकारात असलेले बहिणीचे नाव कमी करून मिळावे यासाठी पाच हजाराच्या लाचेची मागणी करण्याऱ्या मालोद येथील कोतवालासह एकास मंगळवारी लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडेल या कारवाई मुळे महसुल विभागात खळबळ उडाली आहे.
नायगाव ता यावल येथील ५० वर्षीय तक्रारदार यांचे सावखेडासिम तालुका यावल येथे शेत आहे या शेतामध्ये इतर अधिकारांमध्ये त्यांच्या बहिणीच्या नावाची नोंद आहे ते नाव कमी करण्यासाठी मंडळ अधिकारी किनगाव यांच्या कडे त्यांनी अर्ज केला होता तेव्हा सदर नाव कमी करण्यासाठी पाच हजार रुपयाची लाचेची मागणी मालोद ता. यावल येथील कोतवाल जहांगीर बहादुर तडवी यांनी केली होती व ते पैसे आज मंगळवारी किनगाव येथील विद्या जनरल स्टोर चे संचालक मनोहर दयाराम महाजन यांच्याकडे देण्याचे सांगितले होते तेव्हा संशयित कोतवाल याने मंगळवारी ती रक्कम स्वीकारली असताना सापळा लावून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांना रंगेहाथ अटक केली सदर कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव बच्छाव एन एन जाधव सहायक फौजदार दिनेश सिंग पाटील सुरेश पाटील हवालदार अशोक आहिरे हवालदार सुनील पाटील शैला धनगर मनोज जोशी जनार्धन चौधरी प्रविन पाटील महेश सोमवंशी नाशिक देशमुख प्रदीप पवार या पथकाने केली तर दोघांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक एन जाधव करीत आहे त्या महसूल विभागात झालेल्या या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे