Home Blog Page 332

मराठी पूर्व माध्यमिक शाळा सारशिव व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी :- कावेरी प्रवीण राजगुरू

0

 

यांची निवड करण्यात आली व शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष दीपक दत्तु जाधव यांची निवड करण्यात आली.. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक लोखंडे सर , ठेंग सर तायडे सर, भारसकर सर हजर होते. प्रामुख्याने गावातील प्रतिष्ठित व्यक्ती केशव वाघ समाधान भोजने संभाजी ढोणे शिवानंद ढोणे सतीश ढोणे इतर मान्यवर उपस्थित होते…

जळगाव जामोद हद्दितील आसलगाव बाजार येथे चालत असलेल्या वरली मटका जुगार च्या ऑफिस वर छापा

0

 

मा.अप्पर पोलीस अधिक्षक साहेब . खामगाव यांचे पथकाची पोलीस स्टेशन जळगाव जामोद हद्दितील आसलगाव बाजार येथे चालत असलेल्या वरली मटका जुगार च्या ऑफिस वर छापा आज दिनांक 21/02/2022 रोजी मा . अपर पोलिस अधिक्षक साहेब खामगाव यांना माहीती मिळाली की आसलगाव येथील समाधान उर्फ पिन्टू साटोटे हा जळगाव जामोद , तालुक्यातील खेड़या पाड्यात तसेच तालुक्यात जळगाव शहरात 300 रु रोजाने एजंट नेमुन त्यांना वरली मटका जुगार खेळ खेळउन लोकांन कडून पैसे स्विकारुन सदर जुगार आकडे आसलगांव येथे असलेल्या त्याच्या वरळी मटक्याच्या ऑफिस वर मोबाइल फोन द्वारे चालवत आहे . अशा खात्री लायक खबरे प्रमाणे अपोअसा यांनी आदेश दिल्या प्रमाने पथकातील अधिकारी पो उप नी पंकज सपकाळ पो.हे. कॉ गजानन बोरसे नापोका गजानन आहेर , रघुनाथ जाधव , संदिप टाकसाळ , राम धामोडे यांनी तहसील कार्यलयातील दोन सरकारी पंच यांना सोबत घेऊन आसलगांव येथिक पिंटू साटोटे याचे असलगाव येथे नदीकाठि असलेल्या घरावर महाराष्ट्र जुगार कायदा प्रमाणे छापा टाकून वरली मटका जुगाराचा खेळ खेळवित असणारे 1.समाधान उर्फ तोताराम साटोटे रा . आसलगांव ( फरार ),2
राजेंद्र रामभाऊ भुसारी वय 42 वर्ष रा . आसलगांव 3.नानाराव रामभाऊ इंगले वय44 वर्ष. 4 विनोद शंकर महाले आसलगांव 5.संदेश सुपला डोंगरदिवे यांना जागीच पकडले मुख्य आरोपी समाधान उर्फ पिंटू तोताराम साटोटे हा फरार झाला . नमुद आरोपिताकडून वरली मटका आकडे घेण्यासाठी वापरण्यात आलेले 13 मोबाईल कि.अ. 33,000 / तसेच
वरली ,मटका जुगार खेळण्या करीता वपरलेले साहित्य , दोन मोटर सायकल असा एकूण 145950/- वरली मटका जुगाराचा मुद्देमाल व वरली मटका जुगार चालविणारा मालकासह आरोपी विरुद्ध कलम 4,5 महाराष्ट्र जुगार कायदाप्रमांजे पोस्टे जळगांव जामोद ) येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . प्रस्तुत कार्यवाही मा. अपर पोलीस अधीक्षक सा, खामगांव पदभार पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे मार्गदर्शन व आदेशा प्रमाणे पथकातील अधिकारी, अमलदार यांनी केली आहे सुर्या मराठी न्यूज़ साठी अनिलसिंग चव्हाण सह निलेश चिपडे जळगाव- बुलढाणा

पूर्णा नगर, जि. प.उर्दू शाळेत शिव जयंती साजरी !

0

 

उषा पानसरे मू.क.! सपादक मो 9921400542 असदपूर

जि.प,उर्दू शाळा पूर्णा नगर येथे,शिव जयंती चा कार्यक्रम करण्यात आला दरवर्षी प्रमाने हया वर्षाला , छत्रपती शिवाजी महाराज याची 392, वि, जयंती साजरी करण्यात आली, यवेळी, शिवाजी महाराज च्या, प्रतिमेची पूजन करुण हारार्पण करण्यात आले, यावेळी मान्यवरनी व वर्ग 6, व 8, च्या, विधार्थी नी आपले मनोगत व्यक्त केले तस्मीया अ, अनीस उज़ेफा अ, मतीन, माहीन अ, कलीम,, अमरीन अ, सादिक, मिस्बाह अनम, मारिया नियाज अहमद, व शुमायला यानी सहभाग घेतला होता व शाळा समिति अध्यक्ष, अ, अलीम अ, तमीज, यानी मार्गदर्शन वर आपले शिव विचार मांडळे या वेळी आबिद काजी, मो, फारूक सर, नूरजहाँ बाजी, सायरा बाजी, शबाना बाजी नाजिया बाजी, नाजमीन बाजी, उपस्थित होते,
न्यूज रिपोर्टर उषा पानसरे असदपूर अमरावती

लायड्स मेटल्स कामगारांचे तीन महिन्यांचे थकीत वेतन काँग्रेस अध्यक्ष राजु रेड्डी ने मिळवून दिले

0

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्गूस : येथील लायड्स मेटल्स कंपनीत पाईप लाईनचे काम हे एस. जे.इंजिनिअरिंगचे संचालक जे.पी.यादव यांनी घेतले.
व या कामाकरिता चंद्रपूर – गडचिरोली येथील मजुरांना कामावर ठेवले त्यांना वेतन न देता फक्त अडवांस दिल्या जात होता.
तीन महिन्याचे वेतन थकीत ठेवून कंत्राटदार जे.पी. यादव हा उत्तरप्रदेश येथे निघून गेला व कामगारांचे फोन ही उचलणे बंद केले कामगारांन जवळ जेवणाचे ही पैशे नसल्याने ते हवालदिल झाले सदर कामगारांनी काँग्रेस कार्यलयात जाऊन शहर अध्यक्ष राजूरेड्डी व कामगार नेते सैय्यद अनवर यांची भेट घेवुन आपली व्यथा सांगितले असता रेड्डी यांनी तातळीने कामगारांच्या जेवणाची व्यवस्था करून कामगारांना धीर दिले व लोयड्स व्यवस्थापकाशी संपर्क साधीत कामगारांचे वेतन देण्यास बाध्य केले.
आज दिनांक 21 फेब्रुवारी रोजी लायड्स अधिकारी प्रशांत पुरी यांनी कामगारांचे वेतन चेक द्वारे
दिले.
वेतन मिळाल्या नंतर सर्व कामगारांनी काँग्रेस कार्यलयात जाऊन काँग्रेस नेत्यांचे आभार मानले.
यापूर्वी ही काँग्रेस नेत्यांनी अनेक मजुरांना वेतन मिळवून दिले आहेत.

आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

0

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळेच आपण ताठ मानेने उभे – विवेक बोढे

(चंद्रपूर घुग्घुस) प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस येथील आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या वतीने भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले तसेच आपले विचार व्यक्त केले.
याप्रसंगी बोलताना भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. आज त्यांच्यामुळेच आपण ताठ मानेने उभे राहू शकलो. महाराज आपले खरे दैवत आहेत.
यावेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी जिप सभापती नितुताई चौधरी, माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, भाजपाचे विनोद चौधरी, साजन गोहने, सिनू इसारप, महेश लठ्ठा, रत्नेश सिंग, मल्लेश बल्ला, जेष्ठ नागरिक मधुकर मालेकर, पूजा दुर्गम, वैशाली ढवस, प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे, पांडुरंग काळे, श्रीकांत सावे, राजेश मोरपाका, बबलू सातपुते, प्रवीण सोदारी, मानस सिंग, धनराज पारखी, शरद गेडाम, कोमल ठाकरे, हेमराज बोंबले, संजय भोंगळे, जनार्धन देवतळे, विक्की सारसर, विवेक तिवारी, विनोद जंजर्ला, हनीफ शेख अनिल मानकर, मधुकर धांडे, सुनील राम, आनंद झाडे, राजाराम कुम्मरवार, मंगेश राजूरकर, पियुष भोंगळे, विठोबा बोबडे, नौशाद कुरेशी, सुनील सिंग, राकेश भेदोडकर, रवी बोबडे, असगर खान,पुष्पा रामटेके, वंदना मुळेवार, सुनीता पाटील, नीलकंठ नांदे, सुशील डांगे, मंगल वैरागडे, भोजराज गोरे, पिंटू खोके, श्रीकांत पांडे, जीवन चिवंडे, भास्कर वाल्दे, मधुकर शेरेकर उपस्थित होते.

यावल येथे डीवायएसपीच्या पथकाने केली अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पकडले; यावल पोलीसात दोन जणांवर गुन्हा दाखल

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील किनगाव ते यावल रस्त्यावर अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या डंपरवर फैजपूर उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या पथकाने कारवाई करून डंपर ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात डंपरचालकासह मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, किनगावकडून यावलकडे येणाऱ्या रस्त्यावर अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सहाय्यक फौजदार शरद शिंदे, पोलीस नाईक अल्ताफ अली आणि पोलीस कॉन्स्टेबल सुमित बाविस्कर यांचे असे पथक तयार करून कारवाईच्या सुचना दिल्या. पथकाने सोमवार, दि.२१ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास यावल शहराजवळील फॉरेस्ट नाका जवळ नाका-बंदी केली. त्यावेळी किनगावकडून यावलकडे जाणारा डंपर येतांना दिसून आला. त्यात चोरटी वाहतूक करतांना दिसून आले. त्यांची चौकशी केली असता वाळू वाहतूकीचा कोणताही परवाना नसल्याचे दिसून आले. पोलीसांनी वाळूने भरलेले डंपर यावल पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल सुमित बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून डंपर चालक गणेश गंगाराम सोनवणे (वय-३२) रा. ममुराबाद ता. जि.जळगाव आणि डंपर मालक संदीप आधार साळुंखे रा. कोळन्हावी ता. यावल या दोघांविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन चव्हाण करीत आहे.

शिवाज्ञा प्रतिष्ठान,महाराष्ट्र राज्य द्वारा आयोजित ! भव्य शिवजयंती महोत्सव जाहीर व्याख्यानात

0

 

उषा पानसरे मू.का, संपादक मो.9921400542 असदपूर

शिव जयती निमीत्य शिवाज्ञा प्रतिष्ठान महाराष्ट राज्य द्रारा आयोजित भव्य शिव जयंती मोहत्सव त्या निमीत्याने जाहीर व्याख्याञ!
प्रमुख वक्ता म्हणून बोलताना अर्चना ताई पखान होत्या तर कार्यक्रमाचा अध्यक्षा सौ ममता येवूतकर सरपच होत्या
प्रमुख उपस्थिती महात्मा फुले ब्रिगेडचे स्वप्नीलभाऊ बोबडे,
श्री कोयल साहेब.(ठाणेदार आसेगाव)
पोलीस पाटील विनोद माहोरे,
शिवाज्ञा प्रतिष्ठान चे अध्यक्ष

पवन ताथोड, प्रथमेश झोले,राहुल ताथोड,चेतन उपासे ,ऋषिकेश भोपत, गणेश निबोकर ,आशिष पचारे, नितीन येवले,ऋषिकेश चराटे, रोहित ताथोड, गोपाल ढोके यांनी या कार्यक्रमात शिव विचार माडले पेरण्याची नवीन आदर्श समाजा पुढे ठेवण्यासाठी जी धडपड केली त्यांच्या प्रयत्नाला
कार्यक्रमात शोभा वाढवली संचलन आणि आभार प्रदर्शन देवानंदभाऊ भूस्कट यांनी केले.तसेच अनेक चिमूकले मावळ्याच्या वेश भूषत सह भागी होतू न्यूज रिपोर्टर उषा पानसरे असदपूर अमरावती

घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी तर्फे कुष्ठरोगी बांधवाला आर्थिक मदद

0

 

निराधार योजनेसाठी गृहकर भरण्यास दिली मदद

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्गूस : येथील आंबेडकर नगर निवासी मारोती मुकुंदा हस्ते हे वयोवृद्ध नागरिक कुष्ठरोगी असून निराधार आहेत.
शासनाच्या निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना अर्ज दाखल करावयास रहिवासी दाखल्याची नितांत गरज होती.
मात्र गृहकर भरल्याशिवाय नगरपालिका गृहकर पावती देण्यास नकार देत होते.
अनेक वर्षाची थक्कबाकी असल्याने व आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मुकुंदा कर भरण्यास असमर्थ होते.
त्यांनी आपली समस्या काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी याना सांगितली असता त्यांनी तातळीने गृहकराची रक्कम दिली.
व शक्य त्या मददतीचे आश्वासन दिले
याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर, रोशन दंतालवार,कुमार रुद्रारप,नबी शेख,कपिल गोगला, अंकुश सपाटे,संजय कोवे,बालकिशन कुळसंगे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

वर्ष न वर्ष मृत्युचा सापळा असणाऱ्या रस्त्याचे काम मार्गी…. मा.बाबुराव चांदेरे

0

 

मुळशी तालुक्यातील सुसगाव येतील स्मशान भूमी लागतचा रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी माननीय नगरसेवक बाबुराव आप्पा चांदेरे यांचा प्रयत्नांना यश आले असून काम जोरात चालू आहे तसेच आप्पा स्वतः तेथे दिवसभर उभे असतात कुटल्याच प्रकारचा अडथळा कामात येऊ नये असा प्रामाणिक प्रयत्न करत आहे आज कित्येक वर्ष हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला होता. रस्ता अपुरा असल्या कारणाने नेहमी ॲक्सीडेन्ट होत होते. कुटलेच पक्ष असो अथवा कार्यकर्ते कोणीच त्याची दक्षता घेतली नव्हती. पण आप्पांनी ग्रामस्थांचा विचार करत त्या रस्त्याचा कामाला नारळ फोडला.. त्यांच्याशी बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले यावेळी महिला प्रतिनिधी पूनम ताई विधाते, राष्ट्रवादीचे प्रामाणिक नेतृत्व सुषमा ताम्हाणे, महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ.वंदना गोपीनाथ चांदेरे, सामाजिक कार्यकर्त्या अस्मिता अमित खांडेकर,आदी महिला वर्ग उपस्थित होता

प्रतिनिधी…..

सरकारचा अंकुश नसल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक : संभाजी निलंगेकर

0

 

लातूर/निलंगा प्रतिनिधी
डी. एस.पिंगळे

राष्ट्रवादीचे रिमोट कंन्ट्रोल असल्यामुळे कारखानदारांची मक्तेदारी वाढली असून राज्य सरकारचा कोणताही अंकुश नसल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याचा आरोप आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी रविवारी (ता.२०) पत्रकार परिषदेत केला. शिवाय मन्नथपूर (ता.निलंगा) येथील एका शेतकऱ्याच्या ऊसाची पाहणीही त्यांनी यावेळी केली. निलंगेकर म्हणाले की, सध्या जिल्ह्यासह तालुक्यातील शिल्लक ऊसाचा प्रश्न गंभीर बनला असून १६ महिने झाले तरी कारखाने ऊस घेऊन जात नाहीत. यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेने त्रस्त आहेत. शिल्लक ऊस राहिल्यामुळे हा प्रश्न गंभीर बनत आहे. ऊसाला अधिक महिने झाल्यामुळे उत्पन्नात घट झाली आहे.
यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून कारखानदार मोठ्या प्रमाणात विक्रमी गाळप केले म्हणून सत्कार स्वीकारत आहेत. पारितोषिक घेत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात ऊस शिल्लक राहिला म्हणजे कारखानदारांनी गेटकेनचा ऊस कमी भावात उचलला आहे. म्हणूनच आजही लातूर जिल्ह्यात ८० टक्के ऊस शिल्लक आहे. मराठवाड्यात उसाची परिस्थिती गंभीर झाली आहे. या शिल्लक ऊसाची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी अशी मागणी निलंगेकर यांनी केली. राज्य सरकारने ऊसाला दिलेल्या भावाची व अधिक महिने होऊनही ऊस उचल केला जात नाही. याचा तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. यातील तफावत मधील रक्कम सरकारने अदा करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. भाजपचे सरकार असताना राज्यात तूर पिकाचे विक्रमी उत्पादन झाले होते. त्यामुळे बाजारातील भाव कमी झाले. यावेळी शेतकऱ्यांना तफावतीची रक्कम त्यावेळी राज्य शासनाने अदा केली होती.
त्याप्रमाणे ऊसाची एफआरपीची तफावत रक्कम राज्य शासनाने अदा करावी याबाबत आपण अर्थसंकल्पीय आधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सध्या कारखानदार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेठीस धरत असून ११ किंवा १२ महिने झालेल्या ऊसाची उचल करण्याची जबाबदारी कारखानदारांची आहे. मात्र दीडा वर्षापेक्षा अधिक कालावधी होऊनही ऊसाची उचल केली जात नाही. यामुळे उत्पादनात मोठी घट होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. शिवाय मन्नथपूर येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थेट फडावर जाऊन निलंगेकर यांनी व्यथा जाणून घेतल्या.