Home Blog Page 333

यंग चांदा ब्रिगेडचे कार्यकर्ते झाले शिवरायांसमोर नतमस्तक आमदार किशोर जोरगेवार यांनी केली शिवरायांना मानवंदना

0

 

(चंद्रपूर घुग्घुस) प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शिवजयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शिवरायासमोर नतमस्तक होऊन त्यांना अभिवादन केले.
आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. या निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीनेही विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्याण छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शिवरायांना मानवंदना दिली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी शिवरायांना माल्यार्पण करीत महराजांना अभिवादन केले. यावेळी आ. जोरगेवार म्हणाले कि, रयतेच्या मनातील सुराज्य स्थापन करणारे शिवराय हे जाज्वल्य देशभक्तीचे प्रतिक होते. त्यांच्या राज्यात जनता सुखावह होती. सर्व धर्मांना समान न्याय ही त्यांच्या राज्य कारभाराची विशेषता होती. त्यामुळेच आज ३९२ वर्षांनंतरही त्यांच्या विचारांची गरज असल्याचे ते यावेळी म्हणाले, या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटीका वंदना हातगावकर, यंग चांदा ब्रिगेडचे युथ शहराध्यक्ष कलाकार मल्लारप, युवती प्रमूख भाग्यश्री हांडे, युवा नेते अमोल शेंडे, अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष सलीम शेख, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, अल्पसंख्याक विभागाचे शहर युथ अध्यक्ष राशेद हुसेन, विलास वनकर, सायली येरणे, कौसर खान, सविता दंडारे, दुर्गा वैरागडे, माला पेंदाम, वैशाली मेश्राम, विलास सोमलवार, विनोद अनंतवार, गौरव जोरगेवार, नकुल वासमवार, विश्वजित शाहा, आनंद रणशूर, तापोष डे, राम जंगम, दत्तू गवळी, रुपेश पांडेय, कल्पना शिंदे आदिंची उपस्थिती होती.

शिवजयंती दिनी काँग्रेसतर्फे मोदींचा जाहीर निषेध

0

 

देवेंद्र फडणवीसांच्या मार्फत मोदींना पाठीविले पत्र

(चंद्रपूर घुग्गूस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्गूस : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत महाराष्ट्रामूळे देशभरात कोरोना पसरला असा बिनबुडाचा व महाराष्ट्रद्रोही वक्तव्य केले.
सदर आरोप हे महाराष्ट्राचे बदनामी करणारे असल्याने प्रांताध्यक्ष नाना पटोले,पालकमंत्री विजय वड्डेटीवार, खासदार बाळु धानोरकर, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या सूचनेनुसार घुग्गूस काँग्रेस तर्फे पंतप्रधानांचा जाहीर निषेध करण्यात आला.
तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हजारो पत्र पाठवून मोदींनी महाराष्ट्राची जाहीर माफी मांगावी अशी मागणी केली.
फडणवीस हे महाराष्ट्राचे भाजप पक्षाचे प्रमुख नेते आहेत त्यांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी हेतुपूर्वक महाराष्ट्राची बदनामी केली.
कुठल्याही प्रकारे विचार न करता
देशभरात लॉकडाऊन लावला यामुळे नागरिकांची कोंडी झाली
नागरिक रस्त्यावर उघडे पडले संकटाच्या या काळात काँग्रेस ही जनतेच्या मदती करिता रस्त्यावर उतरली आणि हेच कार्य काँग्रेस नेहमीच करीत राहील आपण आपल्या नेत्याला महाराष्ट्राची माफी मागून आपल्या पापाचे प्रायश्चित्त करण्यास बाध्य करावे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्मभूमीचा
अपमान मोदींनी केला आहे
आपण या पापाचे प्रायश्चित्त करावे असे आवाहन काँग्रेस नेत्यांनी केले.
याप्रसंगी शहर अध्यक्ष राजूरेड्डी,किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे,अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष पवन आगदारी,कामगार नेते सैय्यद अनवर,किशोर बोबडे,अलीम शेख,रोशन दंतलवार,विशाल मादर, इर्शाद कुरेशी,स्टीवन गुंडेटी, श्रीहरी शेंगारप,सुकुमार गुंडेटी,सौ.पुष्पा नक्षिणे,सौ.सरिता गौरकार,सरस्वती कोवे,सौ.दीपा बोकडे,लखन हिकरे,विजय माटला,देव भंडारी,रमेश रुद्रारप,कुमार रुद्रारप,विशाल लोणगाडगे,सुमेश रंगारी,सचिन कोंडावार,संजय कोवे,सुनील पाटील,सचिन नागपुरे,सुमेश रंगारी,अय्यूब कुरेशी,साहिल सैय्यद, शेरी कुम्मरवार,अंकुश सपाटे,रंजित राखुंडे,व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

छत्रपतींचा पूर्णाकृती पुतळा उभारल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे

0

 

कार्यकारी संपादक। विकी वानखेडे

भुसावळ शहरातील बहुचर्चित आणि बहु प्रतिक्षित अश्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज ‘ वंचित’ तर्फेशिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र नव्हे तर भारतभर त्यांच्या सर्वधर्म समभाव,सहिष्णुता,आणि जन कल्याणासाठी ओळखले जातात .ज्यांनी आपल्या ‘ गनिमी काव्याने ‘ रयतेचे राज्य निर्माण केले. उभा महाराष्ट्र ज्यांच्यावर अक्षरशः जीव ओवाळून टाकतो. “लाख मेले तरी चालतील पण लाखोंचा पोशिंदा जगाला पाहिजे ” अशी भावना जन सामन्यात निर्माण झाली अश्या महान राज्याच्या पुतळ्याचा प्रश्न गेली पंधरा वीस वर्षे भिजत ठेवत पूर्णाकृती पुतळा ‘ वंचित ‘ ठेवला गेला आहे.शहरात पंधरा वीस वर्षात नवीन बगीचे, उद्यान निर्माण केले गेले मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारला गेला नाही हे विशेष.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी रयतेच्या राज्याच्या पूर्णाकृती पुतळा उभारला जावा म्हणून सतत पाठपुरावा सुरू केला. बाजार पेठ पो स्टे जवळील प्रस्तावित जागेवर शिवरायाचा भव्य पुतळा उभारला गेला पाहिजे अशी पालकमंत्र्यांच्या ताफा अडवून मागणी केली होती.
आज सदर जागेवर वंचीतचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे व पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. सदर कार्यक्रमास जिल्हा महासचिव दिनेश इखारे, महीला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदनाताई सोनवणे, जिल्हा महासचिव वंदनाताई आराक,कामगार सरचिटणीस बालाजी पठाडे, भुसावळ शहराध्यक्ष गणेश जाधव, शहर महासचिव देवदत्त मकासरे मेजर, जिल्हा उपाध्यक्ष आशाताई सोनवणे,बंटी सोनवणे,निलेश जाधव, जिल्हा संघटक अरुण तायडे,महीला आघाडी जिल्हा संघटक शोभाताई सोनवणे,तालुका सचिव गणेश इंगळे, रुपेश कुऱ्हाडे, सुनिल ठाकूर, भुसावळ शहर उपाध्यक्ष अतुल पाटील,सुनील पाटिल, सागर खरात, जिल्हा उपाध्यक्षा मीराताई वानखेडे, मीनाताई भालेराव, संगीताताई तायडे, भारतीताई इंगळे,कुणाल सुरडकर, विजय मालविय,स्वप्नील सोनवणे आदी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास मराठा समाज अध्यक्ष किरण पाटिल, संविधान आर्मीचे जगनभाई सोनवणे,भीम आर्मी भा ए मि जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे, राकेश बग्गन,एड.तुषार पाटिल,मा.प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, मा.प्रभारी नगराध्यक्ष राजू नाटकर, माजी नगरसेवक ललित मराठे, भरत परदेशी, छावाचे कृष्णा शिंदे, संजय शिंदे ,भीम आर्मी सं र द जिल्हाध्यक्ष श्रीकांत वानखेडे, शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश महाजन, सोनी ठाकूर, महेन्द्र पाटिल ,सुनील सोनवणे मेजर, प्रमोद शिरसाठ आदी सह राजकीय ,सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देवून महाराजांच्या पुतळ्याचा प्रश्न हाती घेतल्या बद्दल कौतुक केले.

मनवेल आदीवासी आश्रमशाळेच्या वतीने सेवानिवृत्त जवान ईश्वर पाटील यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न

0

यावल( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील मनवेल येथील कै. सदाजी नाना प्राथमिक व माध्यमिक अनुदानित आश्रमशाळेत भारतीय सैन्य दलातून हवालदार , रेडीओ ऑपरेटर म्हणून १८ वर्षे सेवा बजावून निवृत्त झालेले व मनवेल येथील रहिवाशी असलेले जवान ईश्वर भागवत पाटील यांचा मनवेल आश्रमशाळेचे अध्यक्ष हुकूमचंद पाटील यांच्या हस्ते शाल , श्रीफळ , हार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . मनवेल येथील आयोजीत सत्काराच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष बी. एल. देशमुख यांनी भूषविले .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जवान ईश्वर पाटील यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . याप्रसंगी उपस्थित शिक्षकांनी मनोगतातून जवान ईश्वर पाटील यांनी देशसेवेच्या भावनेतून केलेल्या कार्याचा गौरव केला . शाळेतील विदयार्थ्यांना सैन्य दलात जायचे असल्यास आपण अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करेल असे सेवानिवृत्त जवान ईश्वर पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले . यावेळी संस्थेचे अध्यक्ष हुकूमचंद पाटील प्रामुख्याने उपस्थित होते . कार्यक्रमाच्या शेवटी भारताची गानकोकीळा भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रध्दांजली वाहण्यात आली .
कार्यक्रमाला संस्थेच्या सचिव मीराताई पाटील , खजिनदार अ‍ॅडव्होकेट ललित पाटील , सभासद देविदास पाटील , मंगलराव पाटील , शाळेचे प्राथमिक मुख्याध्यापक संजय अलोणे , माध्यमिक मुख्याध्यापक सचिन पाटील , अधीक्षक वसंत पाटील , अधिक्षिका सरीता तडवी यांच्यासह सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व विदयार्थी उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राकेश महाजन तर आभार विजय चव्हाण यांनी मानले .

माझा राजाला दगडाच्या मंदीराची गरज नाही ?अब्जवधी लोकांचा ह्रदयात अधिराज्य गाजवनारा छत्रपती शिवाजी !

0

 

उषा पानसरे मूख्य का. सपादीका मो.9921400542 असदपूर!

दिनांक 19 फ्रेब्रूवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती च्या मानाचा मूजरा 19 फेब्रूवारी ला शिवाजी राजे यांची जयती मोठ्या धाटात उषा पानसरे संपादक पत्रकार याचा घरात मोठ्या थाटात एक मनात जिद्द ठेवून हिन्दू ,व मूसलिम भाई दोघे ही एक होवून शिव जयंती चा कार्यक्रमाची जिद्द पूर्ण सर्व प्रथम जिजाऊ माता,सावित्रीबाई फूले याचा प्रतिमेला हार अर्पण केले जिजा माते ने या देशाला शिवाजी दिला तर सावित्रीबाई नी मूलींना शिक्षण देवून त्याना नारी शत्ती काय आहे याचा अर्थ स्त्री समजावला छत्रपती शिवाजी महाराज च्या प्रतिमेला हार पूष्प अर्पण करुण जयंती साजरी करण्यात आली तसेच या कार्यक्रामा निमीत्य माजी पोलीस पाटील सजंय भूयार याना उषा पानसरे यांनी पूष्प गूंच्छ देवून संत्कार करण्यात आला या वेळी या कार्यक्रमाला माजी पोलीस पाटील सजंय भूयार ,अली हेप्ल ग्रूप चे अध्यक्ष अलिम शेख पूर्णा नगर दिलीप भावु पोटे ,सजंय कपाटे , शाहपूर ग्राम पंचायत सस्दस्स सचिन नितनवरे वडगाव त्याची पत्नी गोलू काळे ,अनिल साबळे ,सागर पानसरे! हमिदूआ खान ,ठेकेदार रहेमखान , काली सूबान खान ,सापीकखान, अरूण काळे कंटोल वाले गूलाबराव भूक्सट साबिर उल्ला खान अमन खान प्रतिक बारबूद्दे ईफान पठान पिकी पानसरे बेबीताई दूर्ण अनेक जन उपस्थित होते शिव जयती आज पहील्यादाच दोन धर्म हिन्दू मूसलिम या दोन धर्म मिळून साजरी केली ही एकता आज या एक महीलानी करून दाखविली आहे उषा पानसरे च्या ,दोन वळी माझा राजाला दगडाच्या मंदीराची गरज नाही , रोज पूजाव लागत नाही बोग ही लागत नाही नवस बोलावा लागत नाही माजा राजेला सोण्या चांदीचा साज सूध्दा चढावा लागत नाही तरी सूध्द अंब्जवधी लोकांच ह्रदयात अधिराज्य गाजवतात हा यूग महा पूरूष ना जातीचे ना धर्माचे छत्रपती शिवाजी राजे रयतेचे

यावल येथे छत्रपतींच्या ३९२ व्या शिवजयंती निमित्त शिव भोजनालय येथे गोरगरिबांना मोफत जेवण व मिठाई वाटप

0

यावल( प्रतिनिधी )विकी वानखेडे

हिन्दुस्थानाचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवभोजन केंद्रामध्ये गरजुंना भोजन व मिठाई वाटप करण्यात येवुन शिवजयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
यावल शहर शिवसेनेचे अध्यक्ष जगदीश कवडीवाले यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळेस गरजू व गरीब लोकांना मोफत जेवण जिलेबी देण्यात आली .
यावेळी शहर प्रमुख जगदीश कवडीवाले यांच्या सोबत भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष डॉ. निलेश गडे , रिपाईचे सामाजिक कार्यकर्ते विष्णू पारधे
हाजी फारुख शेख , भारतीय जनता पार्टीचे शहर सरचिटणीस परेश नाईक सागर कांबळे यांच्यासह असंख्य नागरिक यावेळी उपस्थित राहुन महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अपर्ण करून ३९२ वी जयंती उत्सवात साजरी करण्यात आली

महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेडोळ येथे शिवजयंती उत्सव साजरा

0

 

लातूर/निलंगा प्रतिनिधी
डी. एस. पिंगळे

आज छत्रपती स्वराज्य संस्थापक, उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, सर्वसमावेशक सहिष्णू राजा,अठरापगड जातींना सोबत घेऊन बहुजन स्वराज्य निर्मिती चे जनक, प्रतिपालक
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपन्न झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य
श्री संजीव कदम, श्री, पाटील सर,श्री जाधव सर,श्री सूर्यवंशी सर, श्री मुजावर सर,श्री काळे सर,श्री मंदे सर,
श्री सय्यद सर,श्री जावळे सर, श्री प्रा. सूदेवाड सर,श्रीमती
तूगावे मॅडम, व सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
छत्रपती चरित्रातून प्रखर राष्ट्रप्रेम, स्वाभिमान, आणि अन्याया विरुध्द लढा देण्याची उर्जा आपल्या सर्वांना मिळते…. त्यांनी निर्माण केलेली युध्दनीती, परराष्ट्र धोरणाची गरज आजही आपल्या देशाला आहे.

शिवजयंती दिनी काँग्रेसतर्फे महाराजांना अभिवादन

0

 

शहर अध्यक्ष राजू रेड्डी यांच्यातर्फे अपंग बांधवाला बैसाखी भेट

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्गूस : महाराष्ट्राचे आराध्य दैवत रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 19 फेब्रुवारी रोजी काँग्रेस कार्यलयाच्या प्रांगणात महाराजांची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली.
ही प्रतिकृती संपूर्ण शहराचे आकर्षणाचे केंद्र झाले होते.
याच ठिकाणी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
शिवजयंतीच्या पावन पर्वावर गरजवंत अपंग बांधव गोपाल ठाकरे यांना काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांच्यातर्फे बैसाखी भेट स्वरूपात देण्यात आली.
परिसरातील नागरिकांना अल्पहार स्वरूपात चना – चिवडा वितरित करण्यात आले.
सदर कार्यक्रमात शहर अध्यक्ष राजूरेड्डी, किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर, ज्येष्ठ नेते किशोर बोबडे,अलीम शेख, भैय्या भाई,स्टीवन गुंडेटी,श्रीहरी शेंगारप,सौ.पुष्पा ताई नक्षिणे,सौ.सरिता गौरकार,सरस्वती कोवे,सौ.दीपा बोकडे,लखन हिकरे,रोशन दंतलवार, विशाल मादर,इर्शाद कुरेशी, सुकुमार गुंडेटी,विजय माटला,देव भंडारी,रमेश रुद्रारप,विशाल लोणगाडगे,सचिन कोंडावार, संजय कोवे,सुनील पाटील,सचिन नागपुरे,सुमेश रंगारी,अय्यूब कुरेशी,साहिल सैय्यद, रंजित राखुंडे, व मोठ्या संख्येने नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.

नकोडा येथील निराधार महिलांना श्रावण बाल योजनेचे प्रमाणपत्र वितरण

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

नकोडा गावातील निराधार महिलांना श्रावण बाळ योजनेच्या माध्यमातून मासिक निराधार राशी मिळण्यावून देण्याच्या प्रयत्नांना यश मिळाले. नकोडा गावातील निराधार महिलांना श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळण्यास चंद्रपूर चे पालकमंत्री मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांचा मार्गदर्शनाखाली विजय वडेट्टीवार फ्यांस क्लब अध्यक्ष प्रवीणभाऊ लांडगे व कॉंग्रेस कार्यकर्ते सुनील भाऊ जुमनाके यांनी महिलांना श्रावण बाळ योजना प्रमाणपत्र मिळून दिले. योजनेचे लाभार्थी विमलाबाई वानखेडे, मुक्ताबाई पाटील, लताबाई सोनटक्के, कमलबाई पाटील, अब्दुल रफिक यांना योजनेचे प्रमाणपत्र सुपूर्त केले.

संग्रामपुर नगर पंचायत कार्यालयात शिवजयंती साजरी

0

 

आज नगर पंचायत कार्यालय संग्रामपुर येथे अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत सर्वांचे प्रेरणास्त्रोत जाणता राजा श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नगर पंचायत चे गट नेते तथा संग्रामपुर मित्र परिवाराचे संस्थापक अध्यक्ष मा शंकरभाऊ पुरोहित यांच्या हस्ते स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले व शिवजयंती साजरी करण्यात आली

या वेळी प्रा हरिभाऊ तायडे सर, नगराध्यक्षा पती सिध्दार्थ सोनोने, नगरसेवक वैभव गायकी, नगरसेवक इरफान सैय्यद,संगितराव सोनोने, हमीद पाशा, संतोष अंबलके,शालीग्राम घाटे,साबीर शेख,अनिस खान,आसिफ खान,सौरभ बावस्कार,विजयभाऊ राजनकार,श्रीकांत भोंबडे सह न प कर्मचारी उपस्थित होते