Home Blog Page 334

ट्रक ने ऑटोला उडविले ; ऑटो चालक ठार, ५ जखमी

0

 

शेगाव प्रतिनिधी अर्जुन कराळे

खामगाव.
नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी ट्रक आणि ऑटो मध्ये घडलेल्या भीषण अपघातात मध्ये एक जण जागीच ठार तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली अपघातातील जखमींना खामगावच्या उपजिल्हा रुग्णालय मध्ये दाखल करण्यात आले असून यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे.
नागपूर मुंबई या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर नांदुरा कडून खामगाव कडे येणाऱ्या प्रवासी आटोला नांदुरा कडे जाणाऱ्या ट्रक ने धडक दिली या अपघातामध्ये ऑटो चालक प्रशांत अरुण साळुंखे वय 28 राहणार शिवाजी नगर खामगाव या इसमाचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले असून जखमींना खामगाव च्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले आहे जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे.

शिवजयंतीच्या निमित्ताने निलंग्यात शिवरायांच्या विश्वविक्रमी तैलचित्राचे अनावरण

0

 

लातूर/निलंगा प्रतिनिधी
डी. एस. पिंगळे

निलंगा येथे साकारण्यात आलेल्या ११ हजार चौरस फुटाच्या विश्व विक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या तैलचित्राचे लोकार्पण माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या हस्ते शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला संपन्न झाले. अक्का फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी शिवजयंतीच्या निमित्ताने वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. शिवजयंतीनिमित्त निलंगा येथे दरवर्षी नव्या संकल्पना राबविण्यात येतात. या तैलचित्राच्या निर्मितीसाठी मागील १५ दिवसांपासून मंगेश निपाणीकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मेहनत घेतली. यासाठी ४५० लिटर ऑइलपेंट वापरण्यात आले आहे. रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या हस्ते शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी (ता.१८) दीपप्रज्वलन करून तैलचित्राचे अनावरण पार पडले. यावेळी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर , भाजपचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष भारतबाई साळुंके, कृषी सभापती गोविंद चिंलकूरे, पंचायत समितीच्या सभापती राधाताई बिराजदार, निलंगा नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, उपनगराध्यक्ष मनोज कोळ्ळे, भाजपचे तालुकाध्यक्ष शाहूराज शेटे, शहराध्यक्ष वीरभद्र स्वामी, शिवजयंती महोत्सव समितीचे डॉ लालासाहेब देशमुख, शेषराव ममाळे, दत्ता शाहीर, एस. एस. शिंदे, किरण बाहेती, सय्यद इरफान, पाशामियाँ आतार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. आज शनिवारी (ता.१९) शिवजयंतीनिमित्त रक्तदानाचा महायज्ञ आयोजित करण्यात आला आहे. यासाठी एक घर एक रक्तदाता संकल्पना राबविण्यात येत आहे. यापासून हजारो युवकांना प्रेरणा मिळत राहील, असे आमदार निलंगेकर यांनी यावेळी सांगितले.

सम्मक्का-सारलम्मा जत्राचा जल्लोशात साजरा

0

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

चंद्रपूर :जिल्हात घुग्घुस नकोडा भागात असलेल्या वर्धा नदीच्या काठावर सम्मक्का सरलम्मा जत्रा मोठ्या उस्तवास साजरा केली जात आहे. चार दिवस चाललेल्या शोभायात्रेचा आज शेवटचा दिवस आहे.
16 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी दरम्यान चालणाऱ्या या सम्माक्का सरलम्मा जत्रेला तेलुगू समाजाचा महाकुंभ देखील म्हणतात.
बुधवारी सरलंमा देवीचे आगमन झाले.
गुरुवार दिवशी देवी संमक्काचेही आगमन झाले आहे, हजारो भक्त दर्शनासाठी येत आहेत आणि देवी सम्माक्का – सरलंमाचे दर्शन घेत आहेत.
दैवी शक्तींनी परिपूर्ण समक्का-सारलम्मा यांच्या दरबारात गूळ अर्पण केला जातो. नवस पूर्ण झाल्यानंतर लोक त्यांच्या वजनाच्या सोन्याच्या रूपात गुळ अर्पण करतात. संमक्का सारलम्मा जत्रा ही दर दोन वर्षातून एकदा साजरी करते, सम्मक्का सारलम्मा जत्रा गेल्या 14 वर्षांपासून नकोडा येथे सुरू आहे, जिथे हजारो भाविक हजेरी लावतात. देवीचे दर्शन घेतात. या वेळी तेलगू समाजचे,राजु रेड्डी,सुरज कन्नूर, प्रेम गंगाधरे,(सम्मक्का- सारलम्मा कमिटी मेंबर, रामय्या बाबू, टी. पी. रामलू, ताला चंदु, नरसिंग, राजया, नागराज, राज्जना, सुरज, अंजया, राजेंद्र,शंकर, पवण, दंनु, तीरुपति,)आणि कर्यकर्त उपस्थिति होते. सूर्या मराठी न्यूजसाठी रमेश सुध्दाला (घुग्घुस)

ग्रामविकास अधिकारी सि.जी.पवार यांचे हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले आहे.

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

डोंगरकठोरा येथे कार्यरत ग्रामविकास अधिकारी सि.जी.पवार यांचे हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले आहे.

रावेर तालुक्यातील मूळ निभोरा येथील व नंतर नौकरीसाठी चोपडा येथे कुटुंबासह स्थायिक असलेले, सध्या यावल पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या डोंगर कठोरा तालुका यावल येथे ग्राम विकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले सी जी पवार यांचे पुणे येथे एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असतांना हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे.

ह्रदयविकाराचा झटका आल्याने प्रथम त्यांना जळगाव येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांना औरंगाबाद व नंतर पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले .सी जी पवार हे मनमिळावू व शिस्तबद्ध कार्यकुशल कर्मचारी म्हणून परिचित होते. त्यांच्या कुटुंबात पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्यावर आज दिनांक १९ फेब्रुवारी रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार असून चोपडा येथील लक्ष्मी नगरातील राहत्या घरून सकाळी 10 वाजता त्यांची अंत्ययात्रा निघांणार आहे.

, मे आणि जून महिन्यांमध्ये झालेल्या वादळामुळे शेतकऱ्यांचे केळी पिकाचे प्रचंड नुकसान झाले

0

 

यावल तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे

 

यावल तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ तातडीने मिळवून द्यावी, अशी मागणीचे निवेदन यावल पंचायत समितीचे माजी उपसभापती दीपक पाटील यांनी खासदार रक्षा खडसे यांच्याकडे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावल तालुक्यातील शेतकऱ्यांनी बजाज आलियांज कंपनीकडे 2020 वर्षासाठीच्या केळी पीक विमा काढला होता, मे आणि जून महिन्यांमध्ये झालेल्या वादळामुळे शेतकऱ्यांचे केळी पिकाचे प्रचंड नुकसान झाले, तसेच शासनाच्या नियमाप्रमाणे शेतकऱ्यांनी वेळेत कंपनीला तक्रार नोंदवली, नोंदवलेल्या तक्रारी प्रमाणे कंपनीचे प्रतिनिधी आणि कृषी सहाय्यक यांनी पंचनामे केले, परंतु आता कंपनीने शेतकऱ्यांचे दोन गट केले आहे, एका गटाचे पैसे दिले आणि राहिलेल्या गटाचे बद्दल विचारणा केली असता पंचनामा झाली नाही, असे उत्तर देण्यात आले. तरी उर्वरित शेतकऱ्यांना केळी विमाची रक्कम तातडीने अदा करण्यात घेण्याच्या सूचना कंपनीला देण्यात याव्यात, अशी मागणीचे निवेदन खा.रक्षाताई खडसे यांना यावल पंचायत समितीचे उपसभापती तथा गटनेता दीपक पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

याप्रसंगी भाजपाचे यावल तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, पंचायत समितीचे गटनेते दीपक पाटील, अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष उर्जित चौधरी, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, तालुका सरचिटणीस विशाल चौधरी, उज्जैनसिंग राजपूत यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

यावल तालुक्यातील अतिक्रमीत जागा व दलित वस्ती सुधार योजनेच्या निधी अंतर्गत झालेल्या गोंधळा विषयी निळे निशानची निदर्शने

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

यावल पंचायत समिती अंतर्गत शासनाकडुन मिळणाऱ्या वंचीत गरजु लोकांच्या विविध समस्या तसेच तालुक्यात अनेक कुटुंब ही आज ही अतिक्रमीत जागेत आपत्या कुंटुबास वास्तव्यास असुन त्यांची अतिक्रमीत घरे कायम गाव नमुना ८ला लावुन त्यांना घरकुलांचे लाभ देण्यात यावे तसेच दलीत वस्ती सुधार योजनांचा निधीचा तालुक्यात मोठया प्रमाणावर गैर उपयोग होत असल्याच्या व विकास कामात होत असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभुमीवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विरोधात आज यावल पंचायत समिती समोर निळे निशान या सामाजीक संस्थेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आंनद बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय निर्दशने करण्यात आली, गटविकास अधिकारी यांनी येत्या आठ दिवसात सदरच्या मागण्याकडे लक्ष देवुन समस्या न सोडविल्यास या ठीकाणी पुनश्च मोठया प्रमाणावर आंदोलन करण्यात येइल असा ईशारा संस्थेच्या वतीने देण्यात आला असुन , याप्रसंगी निळे निशान संस्थेच्या नियोजन विभागाचे जिल्हाध्यक्ष महेश तायडे, सामाजीक व रोजगार विभागाचे जिल्हा अध्यक्ष युवराज सोनवणे , जिल्हा नियोजन उपप्रमुख सदाशिवनिकम, जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे , फैजपुर विभागाचे अध्यक्ष भगवान आढाळे, तालुका अध्यक्ष विलास भास्कर तालुका उपाध्यक्ष अब्दुल सलाम , युवकचे तालुका अध्यक्ष विशाल तायडे , प्रमोद पारधे , सुभाष तायडे , गणेश भालेराव , लक्ष्मीताई मेढे यांच्यासह मोठ्या संख्येत महीला व कार्यकर्ता याप्रसंगी उस्थित होते, संस्थेच्या वतीने पंचायत समितीचे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी किशोर सपकाळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी मागण्या संदर्भातील विविध योजनांची सद्य स्थिती ची माहीती त्यांनी दिली व प्रशासनाच्या वतीने योग्य तो निर्णय घेण्यात येवुन समस्या सोडविण्याचे प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले .

स्व.डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन

0

 

लातुर/निलंगा प्रतिनिधी
डी. एस. पिंगळे

महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासात महत्वपुर्ण योगदान देणारे विकासपुरुष, काळाची पाऊले ओळखून महाराष्ट्राच्या राजकारणात धाडसी निर्णय घेणार द्रष्टा राजकारणी, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाशी असलेली निष्ठा अखेरपर्यंत जपणारे निष्ठावंत नेतृत्व, सर्वच क्षेत्रात आपल्या नैतिकतेचा दबदबा निर्माण केलेले नैतिकतेचे महामेरु स्व.डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम निलंगा येथील महाराष्ट्र शिक्षण समितीच्या संकुलात संपन्न झाला. स्व.निलंगेकर यांनी महाराष्ट्र शिक्षण समितीची स्थापना करुन तळागाळातल्या लोकापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहंचवली त्याच शिक्षण समितीच्या प्रांगणात स्व. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर स्मारकाचे भूमिपूजन झाले. या भूमिपूजन सोहळ्यासाठी स्व.डॉ. निलंगेकर यांच्या पत्नी सुशिलाबाई पाटील निलंगेकर, माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, डॉ. शरदराव पाटील निलंगेकर, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे चिटणीस अरविंद पाटील निलंगेकर, डॉ. अरुण डावळे, महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय शिवाजीराव पाटील निलंगेकर, डॉ. सर्वेश पाटील निलंगेकर, संगिताताई अशोकराव पाटील निलंगेकर, वृषालीताई विजय पाटील निलंगेकर, व सर्व कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. भूमिपूजन समारंभ स्व. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब स्मारक समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. स्मारक समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. भागवत पौळ, सचिव दिलीपराव धुमाळ, सदस्य प्राचार्य डॉ. माधव कोलपुके, उपप्राचार्य प्रा. प्रशांत गायकवाड, मुख्याध्यापक आर.के. पाचंगे, मुख्याध्यापक मोहन नटवे, मुख्याध्यापक गुंडादेव पाठक, तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य भरत गोरे, डॉ. भास्कर गायकवाड, शिला देशमुख, सय्यद आदींनी परिश्रम घेतले. यावेळी निलंगा विधानसभा मतदार संघातील प्रतिष्ठीत नागरिक, सर्व पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते, महाराष्ट्र शिक्षण समितीतील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साकळी येथे आदिवासी अविवाहीत युवकाची घरात गळफास घेऊन आत्महत्या पोलीसात घटनेची नोंद

0

 

यावल, ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील ‘साकळी’ येथे २१ वर्षीय आदीवासी अविवाहीत युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन पोलीसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

याविषयी यावल पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहिती अशी की, ” मोहमंद इसा तडवी रा.साकळी, ता.यावल जि.जळगाव या २१ वर्षीय युवकाने आज गुरुवार, दि.१७ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास ‘साकळी’ येथील आपल्या राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यावेळी वडील इसा तडवी हे मजुरीसाठी कामानिमित्त शेतात गेले होते. ते घरी आल्यावर त्यांना मोहमंद इसा तडवी घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच यावल पोलीस स्टेशनचे सफौ युनस तडवी यांनी घटनेचा पंचनामा केला. या युवकाच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या प्रकरणी मयताचे वडील ईसा अन्वर तडवी यांनी पोलीस स्टेशनला खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे करत आहेत. यावलच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शुभम तिडके यांनी मयताच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले.

हद्दवाढ कृती समितीने घातला मनपाला घेराव

0

 

वर्षा मोरे अकोला

अकोला – हद्दवाढ कृती समिती च्या वतीने मनपाला घेराव आंदोलनात महापालिकेची महासभा सूरु असतांना कृती समितीचे पदाधिकाऱ्यांचे निवेदन स्विकारुन चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षनेता व सर्व विरोधी पक्ष नगरसेवकांनी सभा काही वेळा साठी तहकूब करून महापौर व आयुक्तांना मागणी केली,ही पालिकेतील ऐतिहासिक बाब होती.

त्यानुसार कृती समितीच्या शिष्टमंडळाशी महापौर व आयुक्तांनी चर्चा करताना पाणी कर हा चूकीच्या पध्दतीने आकारला असुन त्याची देयके पुर्वीच्या १८०० प्रतीवर्ष या प्रमाणे देण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले व संपत्ती करा बाबतीत पुन्हा नव्याने फेर आढावा घेवून कर आकारणी करण्याचे आश्वशित केले.वरील बाबी पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा ईशारा यावेळी देण्यात आला व तात्पुरते आंदोलन स्थगित केले.

या आंदोलनात जगदीश मुरूमकार, कृष्णा अंधारे, नगरसेवक मंगेश काळे, प्रमोद मुरूमकार, राजेश वगारे, डॉ. प्रविण पाटील, प्रदिप वखारिया, वसीम भाई, प्रविण खाडे, हरिभाऊ वाघमारे, गोपाल शिंदे, श्रीकांत पिंजरकर, नंदू कनोजा, छोटू पाटील, अजय शेळके, डॉ. प्रकाश गोंड, प्रविण वाहुरवाघ, विशाल कपले, दिपक गावंडे आदी सह नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते.

घुग्घुस नगर परिषदेच्या मुख्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती अश्वारूढ पुतळा उभारा

0

 

भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांची मागणी

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

गुरुवार 17 फेब्रुवारीला घुग्घुस नगर परिषदेच्या मुख्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती अश्वारूढ पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी घुग्घुस नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्शिया जुही यांची कार्यालयात भेट घेतली व या विषयावर चर्चा केली तसेच निवेदन देऊन मागणी केली आहे.
घुग्घुस नगर परिषदेचे निर्मिती झाली असून लवकरच नगर परिषदेच्या नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे नवनिर्मित घुग्घुस नगर परिषदेच्या मुख्यालयासमोर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा. घुग्घुस हे औद्योगिक शहर असल्याने घुग्घुस शहराची लोकसंख्या मोठी आहे. घुग्घुस शहर वासियांच्या मनात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आदराचे स्थान आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा हा नगर परिषदेमध्ये भेद देणाऱ्या सर्वांना नवीन ऊर्जा प्रदान करेल तसेच शासन कर्त्यांना सुद्धा आपले कर्तव्य बजावतांना व निर्णय घेतांना प्रेरणा मिळेल. त्यामुळे घुग्घुस नगर परिषदेच्या मुख्यालया समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देतांना भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे विनोद चौधरी, सिनू इसारप, शरद गेडाम, सतीश कामतवार, पियुष भोंगळे उपस्थित होते.