Home Blog Page 335

असदपुर येथे संत रविदास महाराज जयंती साजरी

0

 

उषा पानसरे मूख्य.का. संपादक मो,9921400542
असदपूर!

अचलपूर तालुक्यातील असदपूर येथील नरेंद्र येऊतकर यांच्या निवासस्थानी चर्मकार समाजाचे आराध्य दैवत जगद्गुरु संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची ६४६ वी जयंती राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष निलेश जामठे यांच्या मार्गदर्शनात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असदपूर ग्रामपंचायत सरपंच सौ.ममताताई येऊतकर या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष आकाश देऊळकर सामाजिक कार्यकर्ते अ.कलाम शे.हसन हे होते. यावेळी संत रविदास महाराज यांच्या फोटोचे पूजन व हारार्पण करून सर्व समाज बांधवांनी अभिवादन केले. यावेळी दीपक तायडे,प्रमोद चांगोले,विशाल चांगोले, संजय सावळे गिरीश चापके,निलेश चापके आदीसह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

लग्न जुळत नसल्याचे नैराश्यातून स्वतःला जाळून गेली आत्महत्या, पळशी खुर्द येथील घटना

0

 

अनिलसिंग चव्हाण सह विकी वानखेड़े

खामगांव : तालुक्यातील पळशी खुर्द येथील २७ वर्षीय युवकाने लग्न जुळत नसल्याच्या नैराश्यातून स्वतःला जाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत खामगाव ग्रामीण पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पळशी खुर्द येथील रहिवासी महेंद्र नामदेव बेलसरे वय २७ वर्ष या युवकाचे लग्न जुळत नसल्याच्या कारणावरून नैराश्यातून त्याने पळशी खुर्द येथे बुधवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास स्वतःला जाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शेगाव येथील गणेश नगरमध्ये राहणारे धनंजय गोविंदा शेंडे वय ४३ वर्षे यांनी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुरुवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सकाळी ८:३० वाजता तक्रार दिली असून पोलिसांनी कलम १७४ सीआरपीसी नुसार मर्ग दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश जाधव हे करीत आहेत.

शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी ची नोंदणी २८ फेब्रुवारीपर्यंत करावी: तहसीलदार सैपन नदाफ

0

 

सतीश मुलंगे लोणार प्रतिनिधि

पीक पाहणी मोबाईल अॅपच्या साहाय्याने सर्व खातेदार शेतकरी तलाठ्याकडे न जाता आपल्या स्वतःच्या मोबाईल वरून आपल्या ७/१२ वर विविध पिकांची नोंदणी करता येणे शक्य झाले आहे . महसूल विभागाचा ई – पीक नोंदणी प्रकल्प हा १५ ऑगस्टपासून महाराष्ट्रात राज्यभर राबविण्यात येत आहे . सध्या रब्बी हंगामाच्या पीक पाहणीची कार्यवाही सुरु आहे . रब्बी हंगामाच्या पीक पाहणीच्या नोंदी साठी ई – पीक पाहणी चे अपडेटेड व्हर्जन गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करून दिले आहे . सर्व खातेदार शेतकरी यांनी नवीन व्हर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे . रबी हंगामाच्या प्रत्यक्ष ई – पीक पाहणी मोबाईल अॅपद्वारे पीक पाहणी करण्यासाठी १५ फेब्रुवारी हि अंतिम तारीख निश्चित करून देण्यात आली होती . राज्याच्या काही भागात कोरोना महामारी व उशिराच्या मान्सूनमुळे शेतकर्यांना आपली पीक पाहणी पूर्ण करता आली नाही याचा विचार करून जमाबंदी आयुक्त यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्यस्थरीय अंमलबजावणी समितीच्या दिनांक १५ फेब्रुवारी रोजीच्या बैठकीत , ई – पीक पाहणी मोबाईल अॅप द्वारे शेतकरी स्तरावरील पिक पाहणीची कालमर्यादा १५ फेब्रुवारी वरून २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . लोणार तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी रबी हंगाम २०२२ ची पीक पाहणी वाढीव मुदतीत म्हणजेच दिनांक २८ फेब्रुवारी पर्यंत ई – पीक पाहणी मोबाईल अॅप द्वारे आपली पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी असे आवाहन तहसीलदार सैपन नदाफ यांनी १६ फेब्रुवारी रोजी केले आहे.

तांबोळा येथे संत रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी….

0

 

जगन मोरे लोणार

तांबाळा येथील समाज बांधवांकडून श्री संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली संत रविदास महाराज यांची शिकवण ही तत्कालीन समाज व्यवस्थेतील तळागाळातील शेवटचा घटक सुखी व्हावा,जातीय आणि सामाजिक सलोखा निर्माण व्हावा,अशीच विचारधारा,मानवतावाद, बंधुत्ववादी विचार प्रिय होते.अश्या या महान संताची आज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
तांबोळा येथील संत रोहिदास महाराज मित्र मंडळ अध्यक्ष आकाश सरसरे,उपाध्यक्ष अमोल सरसरे,सदस्य समाधान सरसरे,भगीरथ सरसरे,राहुल सरसरे,सिताराम सरसरे,रोहिदास सरसरे,नितीन सरसरे,विजय सरसरे,संतोष सरसरे,सुमित सरसरे
यांनी ग्रामपंचायतला संत रविदास महाराज यांची प्रतिमा भेट दिली,यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच रवि राठोड,ग्रामपंचायत सदस्य उध्दव आटोळे, प्रकाश जाधव,गणेश सरसरे,समाधान सरसरे, विठ्ठल खरात,राहुल मोरे विकास सरसरे,बाबुलाल सरसरे,गजानन सरसरे इतर गावकरी मंडळी हजर होते.

कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव जा च्या आर्थिक नुसकानास कारणीभुत ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात चौकशी करून कार्यवाही करण्याबाबत तक्रार दाखल,,

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

शासनाच्या अन्नधान्य वाहन पावतीचा सेस बुडवून स्वतःचा आर्थिक फायदा करून कृषी उत्पन्न बाजार समितिच्या आर्थिक नुसकानाला कारणीभूत असलेल्या कर्मचार्यांची चौकशी करून कार्यवाही करणेबाबत अनिल शंकर इंगळे यांच्या कडून जिल्हा निबंधक कार्यालय,जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा व सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालय जळगाव जामोद येथे तक्रार करण्यात आली,,
सदरचे प्रकरण असे की
कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव जामोद येथे मुख्य प्रशासक,प्रशासक व सचिव यांच्या संगतमातीने मोठ्या भांडवल व्यापाऱ्यांकडून अन्नधान्य वाहन पावतीचा सेस चुकवून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेत आहेत व कर्त्यव्यास कसूर करून आर्थिक नुसकानाला कारणीभूत ठरत कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव जामोद चे मोठ्या प्रमाणात नुसकान केले आहे आणि करत राहतील.
कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव जामोद अंतर्गत मोठ्या प्रमाणात मालाची आवाक असून अन्नधान्य वाहतूक करणाऱ्या वाहनांचा नियमाप्रमाणे सेस न आकारता काही प्रमाणात सूट देऊन आर्थिक फायदा करून घेत आहेत,सर्रासपणे जो जास्त आर्थिक लाभ प्रशासक यांना करून देतील त्यांचे वाहने विना सेस ची सोडल्या जातात,अश्या कर्त्याव्यास कसूर कर्मचाऱ्यांची चौकशी करून निलंबन करावे जेणेकरून कृषी उत्पन्न बाजार समिती च्या आर्थिक दृष्टिकोनातून न्याय व हितासाठी योग्य आहे.संबधित तक्रार प्रकरणातील सर्व प्रकारचे ऑडिओ क्लिप स्वरूपातील पुरावे माझ्याकडे असून संबंधितांवर कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला गेला आहे,,

लोणार सरोवर परिसरातील शेतातील कोरड्या विहिरीत आढळला बिबट

0

 

जगन मोरे लोणार प्रतिनिधि

जागतिक कीर्ती प्राप्त लोणार सरोवरच्या चारही बाजूने घनदाट वृक्ष असल्याने लोणार सरोवरास लोणार अभयारण्य दर्जा प्राप्त असून सदरील अभयारण्यात विविध प्रकारचे प्राणी वास्तवास असून लोणार अभयारण्य मधील एक बिबट लोणार सरोवराच्या काठावरील नगर सेवक गुलाब सरदार यांच्या शेताजवळील एका कोरड्या अंदाजे २० फुट असलेल्या विहिरीत बिबट्या पडल्याने सदर बिबट्या याने डरकाळी मारल्या मुळे त्याचा आवाज एकूण शेजारील शेतातील नगर सेवक गुलाब सरदार यांनी कोरड्या विहिरी जवळ येवून पाहणी केली असता सकाळी १०.०० वाजेच्या दरम्यान कोरड्या विहिरीत एक बिबट्या असल्याचे त्यांना दिसून आले. त्यानंतर त्यांनी सदर बाब ही वनविभागातील अधिकारी यांना कळवताच वनविभागाचे अधिकारी यांनी प्रत्यक्ष स्थळी येवून पाहणी करून बुलडाणा येथील रेस्कू टीमला एका कोरड्या विहिरीत वन्यप्राणी बिबट पडला असल्याबाबत कळविताच रेस्कू टीम यांनी सदर ठिकाणी धाव घेऊन बिबट्यास काढण्या करीता रिस्कू करून सीडीच्या द्वारे बिबट्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतेवेळेस बिबट्या याने सिडीद्वारे विहिरीच्या बाहेर येवून पळ काढला. अश्या प्रकारे वनविभागाच्या बुलडाणा येथील रिस्कू टीमने एका बिबट याचे सुखरूप प्राण वाचविले आहे. सदर बिबट्या पाहण्या करीता लोणार शहरातील तसेच आजूबाजूला असणाऱ्या शेतकरी यांनी गर्दी केली असून गर्दीमुळे तेथे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये. त्यासाठी लोणार पोलीस स्टेशन ठाणेदार प्रदीप ठाकूर हे घटनास्थळी त्यांचा पोलीस बांधवासह उपस्थित होते. तसेच नगर परिषदेचे मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांनी प्रत्यक्षस्थळी येवून पाहणी केली. बुलडाणा रेस्कू टीम मध्ये समाधान मांटे वनरक्षक, प्रविण सोनुने, पवन वाघ, सागर भोसले, दिपक गायकवाड, संदीप माळवी वाहन चालक तसेच लोणार येथील रेंजर पी. डी. सावळे, आर.एफ.ओ. सुशांत पाटील, कायंदे वनपाल, चौधरी वनरक्षक, विणकर वनरक्षक, वाहन चालक पवार या वनविभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नाने अखेर दुपारी २.३० वाजेदरम्यान बिबट बाहेर काढण्यास यश मिळविले. यादरम्यान बिबट हा साडेचार घंटे कोरड्या विहिरीत असून सुद्धा कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. यामुळे तिथे उपस्थितांनी वनविभाग कर्मचारी यांचे आभार मानले.

सहायक पोलीस निरिक्षक मिलन बाळकृष्ण कोयल याचा संत्कार उषा पानसरे याचा हस्ते

0

 

उषा पानसरे असदपूर मूख्य का. संपादक मो.9921400542 अमरावती

आसेगांव पुर्णा पोलीस स्टेशन नविन ठाणेदार सहायक पोलीस निरिक्षक मिलन बाळकृष्ण कोयल आसेगाव पोलीस स्टेशन येथे दिनांक 1/2/2022 रोजी आपले पदभार साभाळले असदपूर शाहपूर रंगारवासनी तील गरिब आम नागरिक नविन ठाणेदार आल्या मूळे अतिशय खूश ठाणेदार मिलन कोयल याचा संत्कार प्रेस संपादक पत्रकार सेवा सघ महाराष्ट राज्य च्या महीला जिल्हा अध्यक्षा उषा पानसरे यांनी शाल पूंष्पू गूंच्छ देवून संत्कार केला त्यावेळी आसेगाव पोलीस मनिष , काटोकर राहूल, गोरखेर अमीत मूळे मोहन टोनके संतोष मोरे ललिता मॅडम संतोष लहाने ईतर पोलीस कर्मचारी हजर होते तसेच रंगारवासनी शाहापूर येथिल दिलीप भावू पोटे संजय कपाटे , विकी पानसरे ,निलेश झोले अलीम शेख झोले उपस्थित होते

घुग्घूस कॉ.न.२ बैरम बाबा देवस्थानात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा : राजु रेड्डी

0

 

काँग्रेसची (Wcl) वेकोली प्रशासनाला मागणी

(चंद्रपूर घुग्घूस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्गूस : शहराचे आराध्य कुल दैवत बैरम बाबा यांचे देवस्थान कॉलरी नंबर 2 येथे असून याठिकाणी जिल्ह्या भरातून भाविक – भक्त दर्शनासाठी येतात
नवस फेडतात व स्वयंपाक करतात.
मात्र याठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास भोगावा लागतो.
याठिकाणी वेकोलीच्या सि.एच.पी येथून एक पाईप लाईनच्या माध्यमातून नळ घेण्यात आले होते.
मात्र सदर कनेक्शन तुटल्याने हे नळ बंद झाले असून सदर पाईपलाईन तातळीने दुरुस्त करून नळ चालू करावे अशी वेकोली सब एरिया फुल्लारे यांना निवेदनातुन काँग्रेस तर्फे मागणी करण्यात आली.
याप्रसंगी शिष्टमंडळात शहर अध्यक्ष राजूरेड्डी,कामगार नेते सैय्यद अनवर,रोशन दंतलवार,इर्शाद कुरेशी,रोहित डाकूर,विशाल मादर,सुकुमार गुंडेटी,अनुप भंडारी,बालकिशन कुळसंगे,अंकुश सपाटे,सचिन कोंडावार,सुनील पाटील,आरिफ शेख,रफिक शेख,रंजित राखुंडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

काँग्रेस महाराष्ट्र उत्तर भारतीय प्रदेश सचिव पदी ब्रिजेश सिंग यांची नियुक्ती

0

 

काँग्रेस कार्यलयात शाल – श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.

( चंद्रपूर घुग्गूस) प्रतिनिधि
रमेश सुध्दाला

घुग्गूस : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अंतर्गत कार्यरत उत्तर भारतीय सेल तर्फे मुंबई येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते ब्रिजेश सिंग यांना उत्तर भारतीय प्रदेश सचिव पदावर नियुक्ती करण्यात आले.
सिंग यांच्या घुग्गूस आगमना निमित्त शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेस कार्यलयात शहर अध्यक्ष राजूरेड्डी, अजय पाटील, शैलेंद्र वनकर, यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर,रोशन दंतलवार,विशाल मादर,रोहित डाकूर,विजय माटला,सुकुमार गुंडेटी,बालकिशन कुळसंगे,कपिल गोगला,आरिफ शेख,सुनील पाटील, रफिक शेख,संजय कोवे, कुमार रुद्रारप,प्रदीप आसेकर,अंकुश सपाटे,रंजित राखुंडे
व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

माजी मुख्याध्यापक शिवाजी पांढरे यांचा सपत्नीक शिवसेनेत जाहीर प्रवेश

0

 

(लातूर /निलंगा)प्रतिनिधी
डी एस पिंगळे

महाराष्ट्राच्या राजकारणाची धुरा शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द झाल्यापासून सबंध महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे मध्ये नवचैतन्याची लाट निर्माण झाली असून याच धर्तीवर अनेकांनी शिवसेनेमध्ये प्रवेशाचा धडाका सुरू केला आहे याचाच भाग म्हणून आज निलंगा येथे धानोरा गावचे माजी मुख्याध्यापक शिवाजीराव पांढरे यांनी सपत्नीक शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करून शिवसेनेसाठी पूर्णवेळ काम करण्याची इच्छा व्यक्त केली .
आज निलंगा येथील शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य तालुकाप्रमुख अविनाश रेशमे शहर प्रमुख सुनील नाईकवाडे शहर संघटक हरिभाऊ सगरे महिला आघाडीच्या तालुका संघटिका रेखाताई पुजारी उपशहर प्रमुख शाहूराज फट्टे महिला शहर संघटिका दैवता सगर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये मौजे धानोरा गावचे माजी मुख्याध्यापक शिवाजीराव पांढरे यांच्या सुविद्य पत्नी सौ सविता शिवाजी पांढरे यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करून शिवसेनेच्या नेतृत्वा सोबत शिवसेनेच्या विचाराने पूर्णवेळ कार्यरत राहण्याचे वचन दिले.