Home Blog Page 336

पुलवामा शहिदांना काँग्रेसने वाहिली श्रद्धांजली

0

 

(चंद्रपूर घुग्घुस) प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्गूस : 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू श्रीनगर राष्ट्रीय राजमार्गावर जाणाऱ्या भारतीय सुरक्षा रक्षकांच्या वाहनावर दाहशतवाद्यांन तर्फे आत्मघाती हल्ला करण्यात आला यात सी.आर.पी.एफचे जवळपास 45 जवान शहीद झाले हा दहशतवादी हल्ला पुलवामा जिल्ह्यात करण्यात आला होता.
आज शहर काँग्रेस कमेटी तर्फे पुलवामा हल्ल्यातील जवानांना पुष्पगुच्छ व मेणबत्ती अर्पण करूम श्रद्धांजली वाहण्यात आले.
“शहिद जवान अमर रहे” च्या घोषणा देण्यात आले याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी, कामगार नेते सैय्यद अनवर, उत्तर प्रदेश सेल सचिव ब्रिजेश सिंग,अजय पाटील, शैलेंद्र वनकर,तिरुपती महाकाली,रोशन दंतालवार,विशाल मादर,बालकिशन कुळसंगे,रोहित डाकूर,विजय माटला,आरिफ शेख,रफिक शेख,संजय कोवे,सुनील पाटील,कुमार रुद्रारप,कपिल गोगला,अंकुश सपाटे,रंजित राखुंडे,विशाल लोनगाडगे,सचिन गोखरे,व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान आवास योजने अंतर्गत खरे लाभार्थ्याना डावण्यात आले . नायगाव ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी नेहा भोसले यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

0

 

 

तालुका (प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायती अंतर्गत मंजूर करण्यात आलेली पंतप्रधान आवास योजनेत खऱ्या लाभार्थ्यांना वगळण्यात आले. त्वरीत लाभार्थ्यांना घरकुल देण्याची मागणी नायगाव ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी नेहा भोसले यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

 

या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनाचा आशय असा की, नायगाव ग्राम ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील लाभार्थ्यांचा सर्व्हे करून एकुण ४३६ घरकुलच्या पात्र लाभार्थ्यांची यादी मजूर करण्यात आली होती. परंतू ग्रामसभेत एकुण २०२ घरकुल मजूर करण्यात आले असल्याची माहीती समोर आली आहे. यातील २३४ पात्र लाभार्थ्यांची नांवे मात्र प्रतिक्षा यादी ठेवण्यात आल्याने गावात ग्रामस्थांमध्ये प्रचंड असे नाराजीचे वातावरण पसरले आहे. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत खरे लाभार्थ्याना डावण्यात आले असल्याने गरजु लाभार्थ्यांवर हा अन्याय होत आहे. मंजूर करण्यात आलेल्या घरकुल लाभार्थ्यांची तात्काळ चौकशी करण्यात यावी. गावातील पात्र घरकुल लाभार्थ्यांवरील झालेला अन्याय दुर करावा तसे न झाल्यास सर्व ग्रामस्थ पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा ग्रामस्थानी दिला आहे.

 

या निवेदनावर लता कोळी, विमल तडवी, ज्योती कोळी, मंगला धर्माधिकारी, सुनंदा मराठे, अर्चना धनगर, शोभा गोसावी, कस्तूरबा कोळी, सुभद्रा कोळी, सुकदेव मराठे यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मी गढीवाला नाही वाडेवाला आहे; अशोकराव पाटील निलंगेकरांचे देशमुखांना आव्हान?

0

 

(लातूर/निलंगा) प्रतिनिधी
डी.एस.पिंगळे

कै. डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा खरा वारसदार मीच असून त्यांची स्वप्नपूर्ती केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. अशी ग्वाही काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांनी त्यांच्या जयंती निमित्ताने दिली.
जिल्हा काॅंग्रेसमधील अंतर्गत गटबाजीच्या पार्श्वभूमीवर मी गढीवाला नाही, पण वाडेवाला आहे;असा टोला देखील त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांना नाव न घेता लगावला.
लातूर जिल्ह्यात पक्षातंर्गत निर्णय, नियुक्त्या निलंगेकर यांना विश्वासात न घेता परस्पर केल्या जात असल्यामुळे ते सध्या नाराज आहेत. या नाराजीतूनच त्यांनी नुकतीच महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांची भेट घेऊन जिल्ह्यातील काँग्रेसच्या अंतर्गत कार्यपद्धतीचे गाऱ्हाणे देखील मांडले. त्यानंतर सोशल मिडियावर अशोकराव पाटील निलंगेकरांचा वाडा आणि बाभुळगावच्या गढीच्या वादाची चर्चा रंगू लागली आहे.
सध्या निलंगा मतदार संघासह लातूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या अंतर्गत धुसफुशीची जोरदार चर्चा आहे. माजी मुख्यमंत्री कै. डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा त्यांच्या काळात काॅंग्रेसमध्ये कायम दबदबा होता. श्रेष्ठीसह सर्वच स्तरावर त्यांना विचारल्याशिवाय कुठलेच निर्य घेतले जात नव्हते. पण कालांतराने निलंगेकरांच्या वाड्याचे महत्व कमी होऊन आता बाभुळगांवच्या वाड्याचे महत्व वाढल्याचे जिल्ह्यातील अनेक घटना घडामोडींवरून स्पष्ट झाले आहे.
कै. डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा राजकीय वारसा प्रदेश सरचिटणीस असलेले अशोकराव पाटील निलंगेकर हे चालवत असल्याचे बोलले जाते. मात्र जिल्ह्याच्या काँग्रेसकडून त्यांना नवा पर्याय निर्माण करण्याच्या हालचाली पक्षातंर्गत विरोधकांकडून सुरू आहेत. मतदार संघातील बहूतांश निर्णय त्यांना विश्वासात न घेता होत असल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
त्यामुळे आगामी जिल्हापरिषद व नगरपालीका निवडणुकांमध्ये उमेदवारी देतांना मोठ्या प्रमाणात गटबाजी होऊ शकते. हे टाळण्यासाठी निलंगेकर समर्थक एकवटले आहेत. त्यातच कै.डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जयंतीदिनी अशोक पाटील निलंगेकर यांनी माध्यमासमोर जनता ऐऱ्या-गैऱ्या लोकांना भीक घालत नाही, जे काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात उघड लढले, येथे येऊन चुकीचे विष पेरले त्यांना कधीही माफ करणार नसल्याचे सांगत निशाणा साधला.
मी काँग्रेसचा महाराष्ट्र सरचिटणीस आहे पण जिल्हाध्यक्ष मात्र जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी कामकरत असल्याचा आरोपही केला. यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांची गळचेपी होत आहे. मात्र हा प्रकार अजिबात सहन केला जाणार नाही. लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष हे जातीयतेचे विष पेरण्याचे काम करत आहेत. निलंगा विधानसभा मतदार संघातील जनता असल्या गोष्टीला थारा देत नाहीत.
कै. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर आज जरी हयात नसले तरी त्यांची शिकवण ही जातीयवादाला खतपाणी घालणारी नव्हती. कधीही शिवाजीराव निलंगेकर यांनी जातियवाद केला नाही व कोणाला करू दिला नाही, असे सांगत जिल्हाध्यक्षांकडून होत असलेल्या कारभाराबाबत उघड नाराजी व्यक्त केली. यामुळे आता यापुढे देशमुख व निलंगेकर यांच्यातील संघर्ष अधिकच वाढणार असे दिसते.
गढी विरोधात वाडा असेच चित्र लातूर जिल्ह्यात सध्या निर्माण झाले असून याचे पडसाद येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती,महापालिकाव नगरपालिका निवडणूकीतून दिसून येणार आहेत. महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यावर कसा मार्ग काढतात हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

जगदीश कवडीवाले यांची राज्यस्तरीय ‘गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिएशन’च्या यावल तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली

0

 

 

यावल (प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील शिवसेनेचे शहर प्रमुख व सोने चांदीचे सराफा व्यापारी जगदीश कवडीवाले यांची नुकतीच राज्यस्तरीय ‘गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिएशन’च्या यावल तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.

यावल शहरातील सोने चांदी व्यवसायातील प्रदीर्घ अनुभव व यावल शहरातील अनेक बँकाचे सोने तारण व्हॅल्यूएशनचा अनेक वर्षांचा अनुभव बघता त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्यस्तरीय महाराष्ट्र गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिशनचे प्रदेश अध्यक्ष पुरुषोत्तम काळे, उपाध्यक्ष नचिकेत भुर्के, संघटक भैय्या भामरे यांच्या सयुंक्तिक स्वाक्षरीने जारी नियुक्ती पत्राद्वारे जगदीश रत्नाकर कवडीवाले यांची निवड करण्यात आली आहे. सर्व सोने, चांदीच्या व्यापाऱ्यांनी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या या निवडीचे स्वागत करून अभिनंदन केले आहे.

न्हावीच्या एका तरुणास तीन तलवारींसह अटक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेली कारवाई सर्वत्र एकच खळबळ

0

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तलवारी बाळगणा-या तरुणास न्हावी तालुका यावल या गावातून जेरबंद केले आहे. केतन मधुकर पाटील असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. सदरची ही कारवाई दिनांक १२ फेब्रुवारी रोजी शनिवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान करण्यात आली आहे .
दरम्यान दोन दिवसांपूर्वीच नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने भुसावळ जवळील यावल तालुक्यातील अकलूद या गावा जवळील एका हॉटेल जवळून गावठी कट्टा हस्तगत करण्यात यश मिळवले असता , त्यानंतर न्हावी गावातुन एका तरुणाकडे या तलवारी मिळून आल्याची कारवाई करण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे .
न्हावी गावातील वाणीवाडा भागातील रहिवासी केतन मधुकर पाटील याच्या कब्जातून पंधरा हजार रुपये किमतीच्या तीन तलवारी पोलीसांकडुन हस्तगत करण्यात आल्या आहेत. सदरचा तरूण हा तलवारीच्या धाकावर तो गावात व परिसरत दहशत माजवत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपले सहकारी हे. कॉ. महेश महाजन, अक्रम शेख, याकुब शेख, चालक विजय चौधरी यांना पुढील कारवाईकामी रवाना केले. पथकाने केतन पाटील याचा शोध घेतल्यावर नंतर तो मिळवून आल्यावर त्यास तलवारीसह ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध फैजपूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला फैजपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या गावातून जेरबंद केले आहे. केतन मधुकर पाटील असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले यांना समजली होती. केतन पाटील यास पुढील कारवाईसाठी त्याला फैजपुर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे . पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर अखेगावकर व कॉन्स्टेबल राजेश बराटे हे करीत आहे

हंबड्री येथे आदीवासी समाज बांधवांसाठीच्या आयोजीत तडवी प्रिमियर लिगच्या खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धचे आजपासुन सुरुवात

0

 

यावल (प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील ‘हंबडी’ येथे तडवी प्रिमियर लिगच्या तालुका पातळीवरील ‘खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्ध’चे आज यावल येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ.कुंदन फेगडे आणि रागिणी फाउंडेशन सावखेडा सिम यावलचे तालुकाध्यक्ष तथा आदीवासी चळवळीतील युवा कार्यकर्त सलीम तडवी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

‘हंबड्री’ गावातील बसस्थानकाजवळील फैजपूर रोडावरील मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या आदीवासी समाज बांधवांसाठीच्या या तड़वी प्रीमियर लिग खुल्या मर्यादीत षटकांची क्रिकेट स्पर्धत तालुक्यातील तथा परिसरातील एकूण २५ आदीवासी समाजातील तरूणांच्या संघानी आपला सहभाग नोंदविला आहे.

या स्पर्धत प्रथम विजेता संघाला डॉ.कुंदन फेगडे यांच्या वतीने २१,००० रुपयांचे बक्षीस व स्मृती चिन्ह तसेच या स्पर्धतील अंतीम लढतीतील उप विजेता संघास आदीवासी सामाजिक कार्यकर्त सलीम तडवी यांच्या वतीने ११, ००० अकरा हजार रूपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे .

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सलीम तड़वी यांनी यावेळी युवा तरुण खेळाडूंशी संवाद साधतांना म्हणाले की, “आपल्या देशात ग्रामीण पातळीवरून क्रिकेट खेळून अनेक क्रिकेटपटूंनी आपल्या देशाच्या संघाचे नेतृत्व केले असून या खेळांमुळे माणसाचा बौद्धीक व शारीरिक विकास होत असतो. तरूणांनी विविध खेळांच्या माध्यमातून त्यांनी आपले कौशल्यगुण दाखवावे” असे आवाहन तडवी यांनी केले .

यावेळी इतबार तड़वी भुसावल, शोएब शब्बीर तड़वी भुसावल, मुराद तड़वी मालोद, अजित तड़वी यावल, अशरफ सर सांगवी, परवेज तड़वी यावल, अमित तड़वी यावल, ग्रामसेवक राजू तड़वी आदींची याप्रसंगी उपस्थिती लाभली. हंबड्री येथील तड़वी टाइगर ग्रुप हंबडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त तसेच आदीवासी समाज बांधव हे या प्रसंगी उपस्थित होते.

पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल कराल तर खबरदार – डी. टी. आंबेगावे

0

 

उषा पानसरे मूख्य का. संपादक
मो.9921400542 अमरावती

*प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या लातूर जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न*

लातूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या लातूर जिल्हा पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक पार पडली आहे. या बैठकीसाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य महिलाध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, मराठवाडा अध्यक्ष विष्णू अष्टीकर, लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे, जिल्हा महिलाध्यक्षा वैशालीताई पाटील, जिल्हा समन्वयक सुनील बरुरे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे, जिल्हा संघटक संजय राजुळे, जिल्हा उपाध्यक्ष महादेव पोलदासे, संघाचे पदाधिकारी नितीन हांडे, सौ. मेघा पाटील, प्रतिक्षा पिटले, निकिता पिटलवार, सूरज मद्देवाड, विवेक मुळजे, फिरोज मुजावर येजाज पठाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे म्हणाले की, पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल होऊ देणार नाही. पत्रकारांवर कोणी खोटे गुन्हे दाखल करीत असाल तर खबरदार असा इशारा दिला आहे. तसेच पत्रकारांच्या संदर्भात विनाकारण कोणी अपशब्द उच्चारत असेल किंवा धमकी देत असेल तर कदापिही त्यांना माफ केले जाणार नाही असा विश्वास दिला. महिला राज्याध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे यांनी महाराष्ट्रातील महिला पत्रकार संघासोबत मोठ्या प्रमाणावर जोडणार असल्याचे सांगितले. मराठवाडा अध्यक्ष विष्णू अष्टीकर यांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ जीवंत ठेवण्याची जबाबदारी पत्रकारांची असल्याने सर्व पत्रकारांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे यांनी प्रास्ताविकात संघटनेच्या कार्याची उज्जवल परंपरा सांगून लातूर जिल्हा कार्यकारिणी उत्कृष्ट कार्य करीत असून असेच कार्य कायम करणार असल्याचे सांगितले. जिल्हा महिलाध्यक्षा वैशालीताई पाटील, जिल्हा समन्वयक सुनील बरुरे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे यांनी आठवड्यातून एक दिवस लातूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुका कार्यकारिणीला भेट देऊन संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचा एकमताने ठराव मंजूर केला. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, लातूर जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना नांदुरा गाव तेथे शाखा घरतेथे कार्यकरता अभियान अनतरगत सोमवारी आढावा बैठक

0

 

सुनील पवार. नांदुरा ता.प्रतिनिधी

नांदुरा महाराष्ट्र नवनिर्माण सेना नांदुरा शहर व तालुका येणाऱ्या काळात आगामी जिल्हा परिषद. पचायत समिती. नगर परिषद च्या निवडणूका लागणार असून त्यांचि पूर्व तयारी म्हणून मनसे चे गाव तेथे शाखा घर तेथे कार्य करता अभियान अंतर्गत राज्य उपाध्यक्ष विठ्ठल भाऊ लोखंडकार व जिल्हा अध्यक्ष मदन राजे गायकवाड यांच्या आदेशानुसार सर्व आजी माजी पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक महिला सेना सर्वाची आढावा बैठक व पक्ष प्रवेश दि.14/2/2022रोजि सकाळी ठिक11वाजता राजगड मध्यवरति कार्यालयाच्य शिवतीर्थ सभागृह येथे आयोजित केली असून सर्व तालुक्यातील व शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकरतेनि आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन ता.उपाधक्ष भागवत उगले. उपाध्यक्ष. कांडेलकर. राजु काळे. यांनी आवाहन केले

मोटार सायकल चोरीची टोळी केली जेरबंद 17 मोटार सायकल जप्त स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणा पथकाची कामगिरी

0

 

शेगांव प्रतिनिधी अर्जुन कराळे

जिल्हयातील दुचाकी चोरीच्या गुन्हयात झालेली वाढ रोखण्यासाठी व सदरचे गुन्हे तात्काळ उघडकीस आणण्यासाठी श्री अरविंद चावरीया, पोलीस अधिक्षक, बुलडाणा व श्री श्रवण दत्त, प्रभारी पोलीस अधीक्षक, बुलडाणा यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, बुलडाणा यांना आदेशीत केले होते. श्री बळीराम गिते, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, बुलडाणा यांनी त्यांचे अधिनस्त पथकास सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना केल्या होत्या.

आज रोजी सदर पथकास गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, शेख शाहरुख शेख फिरोज, रा फर्शी मस्जीदच्या पाठीमागे शेगांव ता शेगांव जि बुलडाणा हा चोरीची मोटार सायकल विक्री करण्याच्या बेतात आहे अशी माहिती प्राप्त होताच पथकाने सापळा रचून त्यास व त्यांचा साथीदार शेख मोबीन शेख हारुन, रा धनगर फैल रेल्वेगेट जवळ, शेगांव ता शेगांव जि बुलडाणा या दोघांना ताब्यात घेवून कौशल्यपूर्ण विचारपूस केली असता पुढील प्रमाणे मुद्देमाल जप्त करून कारवाही करण्यात आली आहे.

> जप्त करण्यात आलेला मुदेमाल: 14 मोटार सायकल, 1 मोटार सायकलचे चेसीस, गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या 02 मोटार सायकल व गुन्हयात वापरलेले 04 मोबाईल फोन, चाबीचा गुच्छा 100 overline x , असा एकुण 8,50,100/रुपये

> चोरीच्या मोटार सायकल गुन्हयात सहभागी असलेले आरोपी :

1. शेख शाहरुख शेख फिरोज, रा फर्शी मस्जीदच्या पाठीमागे ता शेगांव जि बुलडाणा 2. शेख मोबीन शेख हारुन, रा धनगर फैल रेल्वेगेट जवळ, ता शेगांव जि बुलडाणा

3. अमान खान असलम खान रा धनगरनगर अकोट रोड, शेगांव ता शेगांव जि बुलडाणा 4. मुन्शिफ खान अल्ताफ खान, रा कच्छी मस्जीद जवळ शेगांव ता शेगांव जि बुलडाणा

• उघडकीस आलेले गुन्हे :

1. पोस्टे. शेगांव शहर अप न. 19/22 क.379 भादवी पोस्टे. शेगांव शहर

2. पोस्टे. शेगांव शहर अप न. 665/21 क.379 भादवी

3. पोस्टे. शेगांव शहर अप न. 715/21 क.379 भादवी

4. पोस्टे शेगाव ग्रामीण अप न. 25 / 2022 कलम 379 भांदवि

नमुद आरोपीतांनी अकोला तसेच बुलडाणा जिल्हात मोटरसायकल चोरी केल्याचे कबुली दिलेली आहे. सदरच्या मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत overline qY नमुद अप.नं. वगळता उर्वरित जप्त गाडयांचे चेसीस व इंजीन नंबर वरून सदर गाडीचा खरा नंबर निष्पन्न करून उर्वरित गाडयांमध्ये दाखल असलेले गुन्हयाबाबत अभिलेख तपासून माहिती घेणे सूरू आहे.

नोट शेगांव परीसरातील मागील 2 वर्षामध्ये ज्यांच्या मोटरसायकल चोरीस गेलेल्या आहे त्यांनी शेगांव पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री अनिल गोपाळ, पोलीस निरीक्षक – 9881866767 यांच्याशी संपर्क साधावा.

कार्यवाही पथक

सदरची कामगिरी श्री अरविंद चावरीया, पोलीस अधिक्षक, बुलडाणा व श्री श्रवण दत्त, प्रभारी पोलीस अधीक्षक, बुलडाणा, श्री बजरंग बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक, बुलडाणा श्री अमोल कोळी, उप विभागीय पोलीस अधिकारी, खामगांव, जि बुलडाणा श्री बळीराम गिते, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणा यांचे मार्गदर्शनात श्री विलासकूमार सानप, सपोनि, श्री निलेश शेळके, पोलीस उप निरीक्षक श्री श्रीकांत जिंदमवार, पोलीस उप निरीक्षक, पोलीस अमंलदार सुधाकर काळे, पुरुषोत्तम नारायणराव आघाव, अजीस रहेमान परसुवाले, दिपक मनसुबराव वायाळ, रवी भिसे, राजू आढवे यांनी पार पाडली आहे.

 

Wcl वेकोली क्वार्टरच्या कुजलेल्या इलेक्ट्रिकल वायरिंग बदलावा : राजूरेड्डी

0

 

अग्निशमन यंत्र उपलब्ध करा

(चंद्रपूर घुग्गूस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्गूस : वेकोलीच्या इंदिरा नगर,सुभाष नगर,गांधीनगर, शास्त्री नगर, रामनगर या वसाहती मधील क्वार्टर जीर्ण झाले असून यातील विद्युत जोडणी ही कुजलेल्या अवस्थेत आल्याने वीज गळतीमूळे मोठं – मोठे आगीच्या घटना उदभवत आहे.
काल इंदिरा नगर येथे क्वार्टरला लागलेल्या आगीत राजू कोंकटवार यांचे चाळीस लाखाचे नुकसान झाले असून आग विझविण्यासाठी वेकोली जवळ अग्निशमन यंत्र ही उपलब्ध नसल्याने एसीसी कंपनीचे अग्निशमन यंत्राने आग विजविण्यात आले.
वेकोली सारख्या प्रमुख कोळसा उत्पादन करणाऱ्या कंपनी जवळ अग्निशमन यंत्र नसणे ही लाजिरवाणी बाब असून वेकोलीने तातळीने अग्निशमन यंत्र उपलब्ध करावे अशी मागणी वेकोली अधिकाऱ्यांना काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांनी केली आहे.